त्रैक्य अस्तित्वात आहे का?
येशूने देह धारण करण्याचे सत्य प्रकट झाल्यानंतर, मनुष्याने विश्वास ठेवला, की स्वर्गात केवळ पिताच नाही, तर पुत्र आणि आत्मादेखील आहे. स्वर्गात यासारखा देव आहे ही मनुष्याने बाळगलेली पारंपरिक धारणा आहे: असा त्रिगुण देव जो पिता, पुत्र व पवित्र आत्मा आहे. सर्व मानवजातीच्या या धारणा आहेत: देव हा एकच देव आहे, परंतु त्याचे तीन भाग आहेत, पारंपरिक धारणांमध्ये गंभीरपणे अडकलेल्या सर्व लोकांना असे वाटते, की ते भाग म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आहेत. त्या तीन भागांना एक केले तरच तो संपूर्ण देव आहे. पवित्र पित्याशिवाय, देव संपूर्ण होणार नाही. त्याचप्रमाणे, पुत्र किंवा पवित्र आत्म्याशिवायदेखील देव पूर्ण होणार नाही. त्यांच्या धारणांमध्ये, त्यांचा असा विश्वास आहे, की एकटा पिता किंवा एकटा पुत्र या दोघांनाही देव मानले जाऊ शकत नाही. केवळ पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांना एकत्रितपणेच देव मानले जाऊ शकते. आता, सर्व धार्मिक सश्रद्ध आणि तुमच्यातील सर्व अनुयायीदेखील हा विश्वास बाळगतात. तरीही, हा विश्वास बरोबर आहे की नाही, हे कोणीही स्पष्ट करू शकत नाही, कारण तुम्ही स्वतः देवाच्या गोष्टींबद्दल नेहमी गोंधळलेले असता. जरी या धारणा असल्या, तरी त्या योग्य आहेत की अयोग्य हे तुम्हाला माहीत नाही, कारण तुम्ही धार्मिक धारणांनी खूप गंभीरपणे ग्रासलेले आहात. धर्माच्या या पारंपरिक धारणा तुम्ही खूप खोलवर स्वीकारल्या आहेत आणि हे विष तुमच्या आत खूप खोलवर गेले आहे. म्हणूनच, या बाबतीतही तुम्ही या नाशकारक प्रभावाला बळी पडले आहात, कारण त्रिगुण देव अस्तित्वातच नाही. म्हणजेच, पिता, पुत्र व पवित्र आत्म्याचे त्रैक्य अस्तित्वातच नाही. या सर्व मनुष्याच्या पारंपरिक धारणा आणि मनुष्याच्या चुकीच्या समजुती आहेत. अनेक शतकांपासून, मनुष्याने या त्रैक्यावर विश्वास ठेवला आहे, जे मनुष्याच्या मनातील धारणांनी तयार केले आहे, मनुष्याने बनवले आहे व मनुष्याने ते यापूर्वी कधीही पाहिलेले नाही. या संपूर्ण वर्षांमध्ये, अनेक बायबल विवरणकर्त्यांनी त्रैक्याचा “खरा अर्थ” स्पष्ट केला आहे, परंतु एकाच तत्त्वाच्या तीन वेगवेगळ्या व्यक्ती असे त्रिगुण देवाचे स्पष्टीकरण संदिग्ध आणि अस्पष्ट होते व देवाच्या “रचने” मुळे लोक गोंधळलेले आहेत. आजपर्यंत कोणताही महापुरुष सखोल स्पष्टीकरण देऊ शकला नाही; बहुतेक स्पष्टीकरणे तर्कावर आधारित आहेत आणि कागदावरच राहतात, परंतु एकाही मनुष्याला त्याचा अर्थ पूर्णतः स्पष्टपणे समजलेला नाही. याचे कारण असे, की मनुष्याने त्याच्या हृदयात धारण केलेले हे त्रैक्य अस्तित्वातच नाही. कारण देवाची खरी चर्या आजवर कोणी पाहिलेली नाही किंवा देवाच्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेण्याचे भाग्य कोणालाही मिळालेले नाही, जेणेकरून देव जेथे आहे तेथे कोणकोणत्या वस्तू आहेत, “देवाच्या घरामध्ये” नेमक्या किती हजारो किंवा शेकडो लाखो पिढ्या आहेत किंवा देवाची अंगभूत रचना किती भागांनी तयार केली आहे याचा तपास करता येईल. मुख्यतः जे तपासले जाणे आवश्यक आहे ते म्हणजे: पिता आणि पुत्र यांचे तसेच पवित्र आत्म्याचे युग; प्रत्येक व्यक्तीचे संबंधित स्वरूप; ते नेमके कसे वेगळे झाले व ते कसे एक झाले. दुर्दैवाने, इतक्या वर्षांत, एकही मनुष्य या प्रकरणांची सत्यता निर्धारित करू शकला नाही. ते सर्व फक्त अंदाज लावतात, कारण एकही मनुष्य कधीही भेटीसाठी स्वर्गात गेला नाही आणि सर्व मानवजातीसाठी “अन्वेषक अहवाल” घेऊन परत आला नाही, जेणेकरून या प्रकरणाची सत्यता त्रैक्याविषयी चिंता करणाऱ्या सर्व उत्साही व निस्सीम धार्मिक विश्वासूंना कळवता येईल. अर्थात, अशा धारणा निर्माण केल्याबद्दल मनुष्याला दोष देता येणार नाही, कारण यहोवा पित्याने मानवजातीला निर्माण केले, तेव्हा त्याच्यासोबत पुत्र येशू का नव्हता? सुरुवातीला, सर्व काही यहोवाच्या नावाने गेले असते, तर बरे झाले असते. जर दोष द्यायचाच असेल, तर तो यहोवा देवाच्या क्षणिक चुकांना द्यावा, ज्याने निर्मितीच्या काळात पुत्र आणि पवित्र आत्म्याला त्याच्यासमोर बोलावले नाही, परंतु त्याऐवजी त्याचे कार्य एकट्याने पार पाडले. जर सर्वांनी एकाच वेळी कार्य केले असते, तर ते एक झाले नसते का? जर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ यहोवा हेच नाव असते व कृपेच्या युगापासून येशूचे नाव नसते किंवा त्याला तेव्हाही यहोवाच म्हटले गेले असते, तर मानवजातीने केलेल्या या विभागणीच्या त्रासापासून देवाला वाचवले गेले नसते का? या सगळ्यासाठी यहोवाला दोष देता येणार नाही हे नक्की; जर दोष द्यायचाच असेल, तर तो पवित्र आत्म्याला द्यावा, ज्याने हजारो वर्षे यहोवाच्या, येशूच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानेदेखील त्याचे कार्य पुढे सुरू ठेवले, मनुष्याला इतके भांबावून सोडले व गोंधळात टाकले, की देव नक्की कोण आहे हेच मनुष्याला कळले नाही. जर पवित्र आत्म्याने स्वतः कोणत्याही रूपाशिवाय किंवा प्रतिमेशिवाय आणि एवढेच नव्हे तर येशूसारख्या नावाशिवाय कार्य केले असते व मनुष्य त्याला स्पर्श करू शकला नसता किंवा पाहू शकला नसता, फक्त मेघगर्जनेचे आवाज ऐकू शकला असता, तर अशा प्रकारच्या कार्याचा मानवजातीला अधिक फायदा झाला नसता का? मग आता काय करता येईल? मनुष्याच्या धारणा पर्वताएवढ्या उंच आणि समुद्राएवढ्या रुंद झाल्या आहेत, त्या एवढ्या प्रमाणात वाढल्या आहेत की आजचा देव त्यांना सहन करू शकत नाही व त्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. भूतकाळात जेव्हा फक्त यहोवा, येशू आणि त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा होता, तेव्हा त्याचा सामना कसा करायचा हे मनुष्याला तेव्हादेखील समजत नव्हते व आता सर्वशक्तिमानाची भर पडली आहे, त्यालासुद्धा देवाचा एक भाग म्हटले जाते. तो कोण आहे आणि त्रैक्याच्या कोणत्या व्यक्तीमध्ये तो किती वर्षे मिसळला आहे किंवा लपलेला आहे हे कोणाला माहीत? मनुष्य हे कसे सहन करू शकेल? एका त्रिगुण देवाबद्दल समजावून सांगण्यासाठी मनुष्याला संपूर्ण आयुष्य द्यावे लागले, परंतु आता “चार व्यक्तींमध्ये एक देव” आहे. हे कसे स्पष्ट केले जाऊ शकते? तू याचे स्पष्टीकरण देऊ शकतोस का? बंधू आणि भगिनिंनो! आजपर्यंत अशा देवावर तुम्ही विश्वास कसा ठेवला? मी तुमची स्तुती करतो. त्रिगुण देवाला सहन करणे हे आधीच पुरेसे होते; चार व्यक्तींमध्ये एक देव यावर तुम्ही अढळ विश्वास कसा ठेवू शकता? तुम्हाला बाहेर पडण्याचा आग्रह केला, तरीही तुम्ही नकार दिलात. किती अकल्पनीय आहे हे! मला तुमचे खूपच आश्चर्य वाटत आहे! एखादी व्यक्ती चार देवांवर विश्वास ठेवण्याइतपत पुढे जाऊ शकते व त्यातून काहीही बोध घेत नाही; तुम्हाला हा चमत्कार वाटत नाही का? तुमच्याकडे पाहता, कोणालाही कळणार नाही की तुम्ही इतका मोठा चमत्कार करण्यास सक्षम आहात! मी तुम्हाला सांगू इच्छितो, की खरे तर या विश्वात त्रिगुण देव कुठेही अस्तित्वात नाही. देवाला पिता नाही आणि पुत्र नाही व पिता आणि पुत्र संयुक्तपणे पवित्र आत्म्याचा एक साधन म्हणून वापर करतात ही संकल्पना तर फारच दूरची आहे. हे सर्व या जगातील सर्वात मोठे असत्य आहे व हे अस्तित्वातच नाही! तरीही अशा असत्य गोष्टीचे मूळ आहे आणि ते पूर्णपणे निराधार नाही, कारण तुमची मने इतकी साधी नाहीत व तुमचे विचार अकारण नाहीत. उलट, ते अगदी योग्य आणि कल्पक आहेत, इतके की ते कोणत्याही सैतानासाठीदेखील अभेद्य आहेत. वाईट या गोष्टीचे वाटते, की हे सर्व विचार चुकीचे आहेत व अस्तित्वातच नाहीत! तुम्ही खरे सत्य अजिबात पाहिलेले नाही; तुम्ही केवळ अंदाज बांधता लावता आणि कल्पना करता, नंतर लबाडीने इतरांचा विश्वास मिळवण्यासाठी व बुद्धी किंवा तर्कशक्ती नसलेल्या सर्वात मूर्ख लोकांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी या सर्वांची कथा करता, जेणेकरून ते तुमच्या महान आणि प्रसिद्ध “तज्ञ शिकवणींवर” विश्वास ठेवतील. हे खरे आहे का? मनुष्याला जीवनाचा हाच मार्ग प्राप्त झाला पाहिजे का? हा सर्व मूर्खपणा आहे! एकही शब्द योग्य नाही! एवढ्या वर्षात, देव तुमच्याद्वारे अशा प्रकारे विभागला गेला आहे, प्रत्येक पिढीनुसार अधिकाधिक सूक्ष्म विभागणी होत आहे, इतकी की एक देव उघडपणे तीन देवांमध्ये विभागला गेला आहे. आणि आता देवाला एक म्हणून पुन्हा जोडणे मनुष्याला केवळ अशक्य आहे, कारण तुम्ही त्याला खूप सूक्ष्मपणे विभागले आहे! खूप उशीर होण्याआधी मी तत्परतेने कार्य केले नसते, तर तुम्ही निर्लज्जपणे किती दिवस असे सुरू ठेवले असते हे सांगणे कठीण आहे! अशा प्रकारे देवाची विभागणी करत राहिलात, तर तो अजूनही तुमचा देव कसा असू शकतो? तुम्ही देवाला अजूनही ओळखाल का? तरीही तुम्ही तुमची मुळे शोधाल का? जर मी नंतर आलो असतो, तर कदाचित तुम्ही “पिता व पुत्र,” यहोवा आणि येशू यांना परत इस्रायलला पाठवले असते व तुम्ही स्वतः देवाचा भाग असल्याचा दावा केला असता. सुदैवाने, आता शेवटचे दिवस आहेत. अखेरीस, मी ज्याची बरीच वाट पाहत होतो तो दिवस आला आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने कार्याचा हा टप्पा पार पाडल्यानंतरच तुम्ही स्वतः देवाची विभागणी करणे थांबवले आहे. तसे नसते तर, तुम्ही अजून पुढे गेला असता, अगदी तुमच्यातील सर्व सैतानांना उपासनेसाठी तुमच्या मेजावर बसवले असते. हे तुमचे कौशल्य आहे! हे तुमचे देवाची विभागणी करण्याचे माध्यम आहे! तुम्ही आताही हे करणे पुढे सुरू ठेवणार आहात का? मी तुम्हाला विचारतो: किती देव आहेत? कोणता देव तुम्हाला तारण देईल? तुम्ही नेहमी प्रार्थना करता तो पहिला देव, दुसरा की तिसरा? तुम्ही नेहमी कोणावर विश्वास ठेवता? तो पिता आहे का? किंवा पुत्र? किंवा तो आत्मा आहे? तू कोणावर विश्वास ठेवतोस ते मला सांग. तुमच्या प्रत्येक शब्दात तुम्ही देवावर विश्वास ठेवता असे म्हणत असला, तरी तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता तो तुमचा स्वतःचा मेंदू आहे! तुमच्या हृदयात देव अजिबातच नाही! आणि तरीही तुमच्या मनात अशा अनेक त्रिमूर्ती आहेत! तुम्ही सहमत नाही का?
जर त्रैक्याच्या या संकल्पनेनुसार कार्याच्या तीन टप्प्यांचे मूल्यमापन केले, तर तीन देव असणे आवश्यक आहे कारण प्रत्येकाने पार पाडलेले कार्य सारखे नाही. जर तुमच्यापैकी कोणी म्हणत असेल, की त्रैक्य खरोखर अस्तित्वात आहे, तर तीन व्यक्तींमधील हा एक देव नक्की कोणता आहे ते स्पष्ट करा. पवित्र पिता म्हणजे काय? पुत्र म्हणजे काय? पवित्र आत्मा म्हणजे काय? यहोवा पवित्र पिता आहे का? येशू पुत्र आहे का? मग पवित्र आत्म्याचे काय? पिता आत्मा नाही का? पुत्राचे मूलतत्त्वदेखील आत्मा नाही का? येशूचे कार्य हे पवित्र आत्म्याचे कार्य नव्हते का? त्यावेळी यहोवाचे कार्य येशूप्रमाणेच आत्म्याद्वारे पार पाडले जात नव्हते का? देवाचे किती आत्मे असू शकतात? तुझ्या स्पष्टीकरणानुसार, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तीन व्यक्ती एक आहेत; जर असे असेल तर तीन आत्मे आहेत, परंतु तीन आत्मे असणे म्हणजे तीन देव आहेत. याचा अर्थ असा, की एक खरा देव कोणीच नाही; या प्रकारच्या देवामध्ये अजूनही देवाचे अंतर्निहित मूलतत्त्व कसे असू शकते? एकच देव आहे हे जर तू मान्य केलेस, तर त्याला पुत्र कसा असेल व तो पिता कसा होईल? या सर्व फक्त तुझ्या धारणा नाहीत का? फक्त एकच देव आहे, या देवामध्ये फक्त एकच व्यक्ती आहे आणि देवाचा एकच आत्मा आहे, जसे बायबलमध्ये लिहिले आहे, की “केवळ एकच पवित्र आत्मा व फक्त एकच देव आहे.” तू ज्या पिता आणि पुत्राविषयी बोलत आहेस ते अस्तित्वात असले तरीही, देव एकच आहे व पिता, पुत्र आणि तुम्ही ज्या पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवता ते पवित्र आत्म्याचे मूलतत्त्व आहे. दुसऱ्या शब्दांत, देव आत्मा आहे, परंतु तो देह धारण करण्यास व मनुष्यांमध्ये राहण्यास तसेच सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ होण्यास सक्षम आहे. त्याचा आत्मा सर्वसमावेशक व सर्वव्यापी आहे. तो एकाच वेळी देहात आणि संपूर्ण विश्वात असू शकतो. जर सर्व लोक म्हणतात, की देव हा एकच खरा देव आहे, तर एकच देव आहे, ज्याची कोणीही स्वतःच्या इच्छेने विभागणी करू शकत नाही! देव फक्त एकच आत्मा आहे व फक्त एकच व्यक्ती आहे; आणि तो देवाचा आत्मा आहे. जर तू म्हणतोस तसे पिता, पुत्र व पवित्र आत्मा असतील, तर ते तीन देव नाहीत का? पवित्र आत्मा एक बाब आहे, पुत्र दुसरी आणि पिता ही आणखी वेगळी बाब आहे. त्यांची व्यक्तित्वे वेगवेगळी आहेत व त्यांची मूलतत्त्वे वेगवेगळी आहेत, मग ते सर्व एकाच देवाचे अंश कसे असू शकतात? पवित्र आत्मा एक आत्मा आहे; हे मनुष्याला समजणे सोपे आहे. जर असे असेल, तर पिता हा त्याहूनही अधिक आत्मा आहे. तो कधीही पृथ्वीवर उतरला नाही व त्याने कधीही देह धारण केला नाही; मनुष्याच्या हृदयात तो यहोवा देव आहे आणि तो निश्चितच आत्मादेखील आहे. मग त्याचे व पवित्र आत्म्याचे नाते काय? ते पिता पुत्राचे नाते आहे का? की हे पवित्र आत्मा आणि पित्याचा आत्मा यांच्यातील नाते आहे? प्रत्येक आत्म्याचे मूलतत्त्व सारखे आहे का? किंवा पवित्र आत्मा पित्याचे एक साधन आहे का? हे कसे स्पष्ट केले जाऊ शकते? आणि मग पुत्र व पवित्र आत्मा यांच्यात काय नाते आहे? हे दोन आत्म्यांमधील नाते आहे की मनुष्य आणि आत्मा यांच्यातील नाते आहे? या सर्व बाबींचे कोणतेही स्पष्टीकरण नाही! जर ते सर्व एक आत्मा आहेत, तर तीन व्यक्तींबद्दल बोलता येणार नाही, कारण त्यांचा आत्मा एकच आहे. जर त्या वेगळ्या स्वतंत्र व्यक्ती असतील, तर त्यांचे आत्मे सामर्थ्याने वेगळे असतील व ते फक्त एकच आत्मा असू शकत नाहीत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ही संकल्पना अत्यंत हास्यास्पद आहे! ही संकल्पना देवाची विभागणी करते व त्याला तीन व्यक्तींमध्ये विभागते, प्रत्येकाला वेगळा दर्जा आणि आत्मा देते; मग तो तरीही एक आत्मा व एकच देव कसा असू शकतो? मला सांगा, स्वर्ग आणि पृथ्वी व सर्व गोष्टी पित्याने, पुत्राने की पवित्र आत्म्याने निर्माण केल्या होत्या? काही म्हणतात, की त्यांनी हे सर्व मिळून तयार केले. मग मानवजातीची सुटका कोणी केली? तो पवित्र आत्मा, पुत्र की पिता होता? काही म्हणतात, की मानवजातीची सुटका करणारा पुत्र होता. मग मूलतः पुत्र कोण आहे? तो देवाच्या आत्म्याचा देहधारी नाही का? निर्मिलेल्या मनुष्याच्या दृष्टिकोनातून देहधारी देव स्वर्गातील देवाला पिता म्हणतो. पवित्र आत्म्याच्या संकल्पनेतून येशूचा जन्म झाला हे तुला माहीत नाही का? त्याच्या अंतःकरणात पवित्र आत्मा आहे; तू काहीही म्हटलेस तरी, तो अजूनही स्वर्गातील देवाशी सुसंगत आहे, कारण तो देवाच्या आत्म्याचा देहधारी आहे. पुत्राची ही कल्पना असत्यच आहे. तो एक आत्मा आहे जो सर्व कार्य पार पाडतो; फक्त स्वतः देव, म्हणजेच देवाचा आत्मा त्याचे कार्य पार पाडतो. देवाचा आत्मा कोण आहे? तो पवित्र आत्मा नाही का? येशूमध्ये कार्य करणारा पवित्र आत्मा नाही का? जर हे कार्य पवित्र आत्म्याने (म्हणजे देवाच्या आत्म्याने) पार पाडले नसते, तर त्याचे कार्य स्वतः देवाचे प्रतिनिधित्व करू शकले असते का? जेव्हा येशूने प्रार्थना करताना स्वर्गातील देवाला पित्याच्या नावाने हाक मारली, तेव्हा हे केवळ एका निर्मिलेल्या मनुष्याच्या दृष्टिकोनातून केले गेले होते, कारण देवाच्या आत्म्याने एक साधारण आणि सामान्य देह धारण केला होता व बाह्य आवरण निर्मिलेल्या प्राण्याचे होते. जरी त्याच्यामध्ये देवाचा आत्मा असला, तरी त्याचे बाह्य स्वरूप सामान्य मनुष्यासारखेच होते; दुसऱ्या शब्दांत, तो “मनुष्याचा पुत्र” बनला होता ज्याबद्दल सर्व लोक, स्वतः येशूदेखील बोलला होता. त्याला मनुष्याचा पुत्र म्हटले जाते हे लक्षात घेता, तो असा व्यक्ती आहे (मग तो स्त्री असो वा पुरुष, कोणत्याही परिस्थितीत मनुष्याच्या बाह्य कवचासह असलेली व्यक्ती आहे), जो सामान्य लोकांच्या सामान्य कुटुंबात जन्माला आला आहे. म्हणूनच, येशूने स्वर्गातील देवाला पित्याच्या नावाने हाक मारणे हे तुम्ही त्याला पहिल्यांदा पिता म्हणण्याप्रमाणे होते; त्याने निर्मिलेल्या मनुष्याच्या दृष्टिकोनातून असे केले. येशूने तुम्हाला लक्षात ठेवायला शिकवलेली प्रभूची प्रार्थना तुम्हाला अजूनही आठवते का? “आमचा स्वर्गातील पिता….” त्याने सर्व मनुष्यांना स्वर्गातील देवाला पित्याच्या नावाने हाक मारण्यास सांगितले. आणि त्यानेदेखील त्याला पिता म्हटल्यामुळे, त्याने तुम्हा सर्वांसोबत समान पायावर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून असे केले. तुम्ही स्वर्गातील देवाला पित्याच्या नावाने हाक मारली असल्याने, येशूने स्वतःला तुमच्या बरोबरीने व पृथ्वीवर देवाने निवडलेला मनुष्य (म्हणजे देवाचा पुत्र) म्हणून पाहिले. जर तुम्ही देवाला पिता म्हणता, तर तुम्ही निर्माण केलेले प्राणी आहात म्हणून ते म्हणत नाही का? पृथ्वीवरील येशूचा अधिकार कितीही मोठा असला, तरी वधस्तंभावर खिळण्याआधी, तो फक्त मनुष्याचा पुत्र होता आणि पृथ्वीवरील निर्मिलेला एक प्राणी होता ज्याला पवित्र आत्म्याने (म्हणजे देव) निर्देशित केले होते, कारण त्याला त्याचे कार्य अद्याप पूर्ण करायचे होते. म्हणून, स्वर्गातील देवाला पिता म्हणणे ही त्याची विनम्रता व आज्ञाधारकता होती. मात्र, त्याने देवाला (म्हणजे स्वर्गातील आत्मा) अशा प्रकारे संबोधित करणे, हे तो स्वर्गातील देवाच्या आत्म्याचा पुत्र होता हे सिद्ध करत नाही. उलट, त्याचा दृष्टिकोनच वेगळा होता, तो वेगळा मनुष्य होता असे नाही. वेगवेगळ्या व्यक्तींचे अस्तित्व हे असत्य आहे! त्याच्या वधस्तंभावर खिळण्याआधी, येशू देहाच्या मर्यादांनी बांधलेला मनुष्याचा पुत्र होता आणि त्याच्याकडे आत्म्याचा अधिकार पूर्णपणे नव्हता. म्हणूनच तो केवळ निर्मिलेल्या प्राण्याच्या दृष्टिकोनातून परमपिता परमेश्वराची इच्छा शोधू शकला. हे त्याने गेथशेमानेमध्ये तीनदा प्रार्थना केल्याप्रमाणे होते: “मी करेन तसे नको तर तुझ्याप्रमाणे होऊ दे.” त्याला वधस्तंभावर ठेवण्यापूर्वी, तो फक्त यहूद्यांचा राजा होता; तो ख्रिस्त होता, मनुष्याचा पुत्र होता व ते गौरवाचे शरीर नव्हते. म्हणूनच, निर्मिलेल्या प्राण्याच्या दृष्टिकोनातून, त्याने देवाला पिता म्हटले. आता, तू असे म्हणू शकत नाहीस, की जे देवाला पिता म्हणतात ते सर्व पुत्र आहेत. जर असे असते, तर येशूने तुम्हाला प्रभूची प्रार्थना शिकवल्यानंतर तुम्ही सर्वजण पुत्र झाला नसता का? तरीही तुम्हाला पटत नसेल, तर मला सांगा, तुम्ही ज्याला पिता म्हणता तो कोण आहे? जर तुम्ही येशूचा उल्लेख करत असाल, तर येशूचा पिता तुमच्यासाठी कोण आहे? येशू गेल्यानंतर, पिता आणि पुत्राची ही कल्पना राहिली नाही. ही कल्पना केवळ त्या वर्षांसाठी योग्य होती जेव्हा येशूने देह धारण केला होता; इतर सर्व परिस्थितीत, जेव्हा तुम्ही देवाला पिता म्हणता, तेव्हा ते नाते सृष्टीचा प्रभू व निर्मिलेल्या प्राण्यामधील असते. पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या त्रैक्याची ही कल्पना कधीही टिकणार नाही; हे असत्य आहे जे युगानुयुगे क्वचितच पाहिले जाते आणि ते अस्तित्वात नाही!
देवाची उत्पत्तीतील ही वचने बहुतेक लोकांच्या लक्षात येतील: “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू” (उत्पत्ती १:२६). देव म्हणतो की “आपण आपल्या प्रतिमेप्रमाणे मनुष्य बनवू या,” तर “आपण” हा शब्द दोन किंवा अधिक लोक सूचित करतो; त्याने “आपण” असे म्हटले, म्हणजे फक्त एकच देव नाही. अशा प्रकारे, मनुष्य वेगवेगळ्या व्यक्तींच्या अमूर्ततेबद्दल विचार करू लागला आणि या वचनांमधून पिता, पुत्र व पवित्र आत्म्याची कल्पना निर्माण झाली. मग पिता कसा आहे? पुत्र कसा आहे? आणि पवित्र आत्मा कसा आहे? असे असण्याची शक्यता आहे का, की आजची मानवजात अशा प्रतिमेत निर्माण केली गेली जी तीन प्रतिमांनी एकत्र होते? मग मनुष्याची प्रतिमा पित्याची, पुत्राची किंवा पवित्र आत्म्याची आहे का? मनुष्य देवाच्या कोणत्या व्यक्तित्वाची प्रतिमा आहे? मनुष्याची ही कल्पना निव्वळ चुकीची व निरर्थक आहे! ती फक्त एका देवाला अनेक देवांमध्ये विभागू शकते. त्या वेळी जगाच्या निर्मितीनंतर मानवजातीची निर्मिती झाली, त्यानंतर मोशेने उत्पत्ती लिहिली. अगदी सुरुवातीस, जेव्हा जगाची सुरुवात झाली, तेव्हा मोशे अस्तित्वात नव्हता. आणि त्यानंतर काही कालावधीतच मोशेने बायबल लिहिले, मग स्वर्गातील देव काय बोलत होता हे त्याला कसे समजले असेल? देवाने जग कसे निर्माण केले याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. बायबलच्या जुन्या करारात पिता, पुत्र व पवित्र आत्म्याचा उल्लेख नाही, फक्त एकाच खऱ्या देवाचा, यहोवाचा उल्लेख आहे, जो इस्रायलमध्ये त्याचे कार्य पार पाडतो. युग बदलते तसे त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते, परंतु यामुळे प्रत्येक नाव वेगळ्या व्यक्तीला सूचित करते हे सिद्ध होऊ शकत नाही. असे असते तर देवामध्ये असंख्य व्यक्ती नसतील का? जुन्या करारात जे लिहिले आहे ते यहोवाचे कार्य आहे, नियमशास्त्राच्या युगात सुरू होणारा स्वतः देवाच्या कार्याचा टप्पा आहे. हे देवाचे कार्य होते, जेथे तो बोलला तसे ते होते आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते तसे झाले. यहोवाने कधीही असे म्हटले नाही, की तो कार्य करण्यासाठी आलेला पिता आहे किंवा त्याने कधीही मानवजातीची सुटका करण्यासाठी पुत्र येणार असल्याची भविष्यवाणी केली नाही. जेव्हा येशूचा काळ आला, तेव्हा फक्त असे म्हटले होते, की मानवजातीची सुटका करण्यासाठी देवाने देह धारण केला आहे, पुत्र आला होता असे म्हटले नाही. कारण युगे एकसारखी नसतात आणि स्वतः देव करत असलेले कार्यदेखील वेगवेगळे असते, त्याला त्याचे कार्य वेगवेगळ्या क्षेत्रात पार पाडणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, तो ज्या ओळखीचे प्रतिनिधित्व करतो ती ओळखदेखील वेगळी असते. मनुष्याचा असा विश्वास आहे, की यहोवा हा येशूचा पिता आहे, पण हे खरेतर येशूने मान्य केले नाही, ज्याने म्हटले: “आम्हाला पिता आणि पुत्र असे कधीच ओळखले गेले नाही; मी आणि स्वर्गातील पिता एकच आहोत. पिता माझ्यामध्ये आहे व मी पित्यामध्ये आहे; जेव्हा मनुष्य पुत्राला पाहतो, तेव्हा तो स्वर्गीय पित्याला पाहतो.” जेव्हा सर्व काही सांगितले जाते, मग ते पिता असो किंवा पुत्र, ते एकच आत्मा आहेत, वेगळ्या व्यक्तींमध्ये विभागलेले नाहीत. मनुष्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा, वेगवेगळ्या व्यक्तींच्या कल्पना, तसेच पिता, पुत्र व आत्मा यांच्यातील नातेसंबंध यांमुळे गोष्टी गुंतागुतीच्या होतात. जेव्हा मनुष्य वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल बोलतो, तेव्हा यामुळे देवाला मूर्त रूप मिळत नाही का? मनुष्य व्यक्तींना अगदी प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी स्थानेदेखील देतो; या सर्व मनुष्याच्या फक्त कल्पना आहेत, त्या संदर्भास पात्र नाहीत व पूर्णपणे अवास्तविक आहेत! जर तू त्याला विचारलेस: “किती देव आहेत?” तो म्हणेल की देव हा पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्या यांचे त्रैक्य आहे: एकच खरा देव. जर तुम्ही पुढे विचारले: “पिता कोण आहे?” तो म्हणेल: “पिता हा स्वर्गातील देवाचा आत्मा आहे; तो सर्वांचा प्रभारी आहे व तो स्वर्गाचा स्वामी आहे.” “मग यहोवा आत्मा आहे का?” तो म्हणेल: “होय!” जर त्यावर तू त्याला विचारलेस, “पुत्र कोण आहे?” तो म्हणेल, की अर्थात येशू हा पुत्र आहे. “मग येशूची कथा काय आहे? तो कुठून आला?” तो म्हणेल: “पवित्र आत्म्याच्या संकल्पनेतून येशूचा जन्म मरीयेपासून झाला.” मग त्याचे मूलतत्त्वदेखील आत्माच नाही का? त्याचे कार्य म्हणजेदेखील पवित्र आत्म्याचे कार्य नाही का? यहोवा हा आत्मा आहे आणि येशूचेही मूलतत्त्व आहे. आता शेवटच्या दिवसात, तो अजूनही आत्मा आहे असे म्हणण्याची आवश्यकता नाही; ते भिन्न व्यक्ती कसे असू शकतात? केवळ देवाचा आत्माच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आत्म्याचे कार्य पार पाडत नाही का? त्यामुळे व्यक्तींमध्ये फरक नाही. येशूची गर्भधारणा पवित्र आत्म्याने केली होती व निःसंशयपणे, त्याचे कार्य पवित्र आत्म्याचे होते. यहोवाने केलेल्या कार्याच्या पहिल्या टप्प्यात, त्याने देह धारण केला नाही किंवा तो मनुष्यासमोर प्रकटदेखील झाला नाही. त्यामुळे मनुष्याने त्याचे स्वरूप कधीच पाहिले नाही. तो कितीही महान आणि कितीही उंच असला, तरीही तो आत्मा होता, स्वतः देव होता ज्याने सुरुवातीला मनुष्याला निर्माण केले. म्हणजेच तो देवाचा आत्मा होता. तो मेघांमधून मनुष्याशी बोलला, फक्त एक आत्मा म्हणून व कोणीही त्याचे स्वरूप पाहिले नाही. केवळ कृपेच्या युगात जेव्हा देवाच्या आत्म्याने देह धारण केला आणि तो यहूदीयामध्ये अवतरला, तेव्हा मनुष्याने प्रथमच यहूदी म्हणून देहधारणेची प्रतिमा पाहिली. त्यामध्ये यहोवाचे काहीही नव्हते. तथापि, त्याची गर्भधारणा पवित्र आत्म्याद्वारे झाली होती, म्हणजेच स्वतः यहोवाच्या आत्म्याने त्याची गर्भधारणा केली होती व येशू अजूनही देवाच्या आत्म्याचे मूर्त रूप म्हणून जन्माला आला होता. मनुष्याने पवित्र आत्म्याला येशूवर कबुतरासारखा उतरताना प्रथम पाहिले होते; तो केवळ येशूसाठी आलेला आत्मा नव्हता, तर पवित्र आत्मा होता. मग येशूचा आत्मा पवित्र आत्म्यापासून वेगळा होऊ शकतो का? जर येशू हा येशू, म्हणजेच पुत्र आणि पवित्र आत्मा हा पवित्र आत्मा असेल, तर ते एक कसे असू शकतात? तसे असेल तर कार्य होऊ शकले नसते. येशूमधील आत्मा, स्वर्गातील आत्मा व यहोवाचा आत्मा हे सर्व एकच आहेत. त्याला पवित्र आत्मा, देवाचा आत्मा, सातपट तीव्र आत्मा आणि सर्वसमावेशक आत्मा असे म्हणतात. देवाचा आत्मा बरेच कार्य करू शकतो. तो जग निर्माण करण्यास व पूर आणून पृथ्वीला नष्ट करण्यास सक्षम आहे; तो सर्व मानवजातीची सुटका करू शकतो आणि शिवाय, तो सर्व मानवजातीवर विजय मिळवून ती नष्ट करू शकतो. हे सर्व कार्य स्वतः देव करतो आणि त्याच्या जागी देवाच्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाद्वारे ते केले जाऊ शकत नाही. त्याच्या आत्म्याला यहोवा व येशू तसेच सर्वशक्तिमान या नावाने संबोधले जाऊ शकते. तो प्रभू आणि ख्रिस्त आहे. तो मनुष्याचा पुत्रदेखील होऊ शकतो. तो स्वर्गातही आहे व पृथ्वीवरही आहे; तो विश्वाच्या वर आणि लोकांमध्ये उच्च आहे. तोच स्वर्ग व पृथ्वीचा एकमेव स्वामी आहे! निर्मितीच्या काळापासून ते आजपर्यंत हे कार्य स्वतः देवाच्या आत्म्याने केले आहे. स्वर्गातील कार्य असो वा देहातील कार्य असो, सर्व त्याच्या आत्म्याद्वारे पार पाडले जाते. सर्व प्राणी, मग ते स्वर्गातील असोत किंवा पृथ्वीवरील, त्याच्या सर्वशक्तिमान तळहातावर आहेत; हे सर्व स्वतः देवाचे कार्य आहे आणि त्याच्या जागी ते इतर कोणीही करू शकत नाही. स्वर्गात, तो आत्मा आहे पण स्वतः देवदेखील आहे; मनुष्यांमध्ये, तो देह आहे परंतु तो स्वतः देवच राहतो. जरी त्याला शेकडो हजारो नावांनी संबोधले जात असले तरी, तो अजूनही स्वतः देवच आहे, त्याच्या आत्म्याची थेट अभिव्यक्ती आहे. त्याला वधस्तंभावर खिळण्याद्वारे सर्व मानवजातीची सुटका हे त्याच्या आत्म्याचे थेट कार्य होते व त्याचप्रमाणे शेवटच्या दिवसांत सर्व राष्ट्रांसाठी आणि सर्व देशांसाठी केलेली घोषणा हेही त्याचेच कार्य आहे. प्रत्येक वेळी, स्वतः देवाला केवळ सर्वशक्तिमान व एकच खरा देव, सर्वसमावेशक देव म्हटले जाऊ शकते. वेगवेगळ्या व्यक्ती अस्तित्त्वात नाहीत, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याबद्दलची ही कल्पना तर दूरच. स्वर्गात व पृथ्वीवर एकच देव आहे!
देवाची व्यवस्थापन योजना सहा हजार वर्षांच्या कालावधीमध्ये पसरली आहे आणि त्याच्या कार्यातील फरकांनुसार तीन युगांमध्ये विभागली गेली आहे: पहिले युग हे नियमशास्त्राच्या जुन्या कराराचे युग आहे; दुसरे म्हणजे कृपेचे युग; आणि तिसरे युग म्हणजे शेवटच्या दिवसाचे युग—राज्याचे युग. प्रत्येक युगात वेगळी ओळख दर्शवली आहे. हे केवळ कार्यातील फरक, म्हणजेच कार्याच्या आवश्यकतांमुळे आहे. नियमशास्त्राच्या युगात कार्याचा पहिला टप्पा इस्रायलमध्ये पार पाडला गेला व सुटकेच्या कार्याची समाप्ती करण्याचा दुसरा टप्पा यहूदीयामध्ये पार पडला. सुटकेच्या कार्यासाठी, येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या संकल्पनेद्वारे आणि एकुलता एक पुत्र म्हणून झाला. हे सर्व कार्याच्या आवश्यकतेसाठी होते. शेवटच्या दिवसांत, देवाला त्याचे कार्य परराष्ट्रांमध्ये वाढवायचे आहे व तेथील लोकांवर विजय मिळवायचा आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये त्याचे नाव मोठे व्हावे. तो मनुष्याला सर्व सत्य समजून घेण्यासाठी आणि त्यात प्रवेश करण्यासाठी मार्गदर्शन करू इच्छितो. हे सर्व कार्य एका आत्म्याद्वारे पार पाडले जाते. जरी तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून असे करत असला तरी, कार्याचे स्वरूप व तत्त्वे समान राहतात. तू त्यांनी केलेल्या कार्याची तत्त्वे आणि स्वरूपाचे निरीक्षण करतोस, तेव्हा तुला कळेल की हे सर्व एका आत्म्याने केले आहे. तरीही काही जण म्हणतील: “पिता हा पिता आहे; पुत्र हा पुत्र आहे; पवित्र आत्मा हा पवित्र आत्मा आहे व शेवटी, ते एक केले जातील.” मग तू त्यांना एक कसे करावे? पिता आणि पवित्र आत्मा यांना एक कसे करता येईल? जर ते जन्मतःच दोन असतील, तर ते कसेही जोडले गेले असले, तरी ते दोन भाग राहणार नाहीत का? जेव्हा तुम्ही त्यांना एक करण्याबद्दल बोलता, तेव्हा एक पूर्ण भाग करण्यासाठी दोन स्वतंत्र भाग जोडणे नव्हे का? पण एक पूर्ण भाग होण्यापूर्वी ते दोन भाग नव्हते का? प्रत्येक आत्म्याचे वेगळे मूलतत्त्व असते व दोन आत्मे एकत्र करता येत नाहीत. आत्मा ही भौतिक वस्तू नाही व भौतिक जगातील इतर सर्व गोष्टींपेक्षा वेगळी आहे. जसे मनुष्य हे पाहतो, पिता एक आत्मा आहे, पुत्र दुसरा आणि पवित्र आत्मा आणखी दुसरा आहे, मग तीन पेल्यातील पाणी एकत्र मिसळते तसे तीन आत्मे एकमेकांमध्ये मिसळतात. मग हेच तिघांना एकत्र करणे झाले की नाही? हे निव्वळ चुकीचे व हास्यास्पद स्पष्टीकरण आहे! हे देवाला विभागणे नाही का? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या सर्वांना एक कसे करता येईल? ते वेगवेगळे स्वभाव असलेले तीन भाग नाहीत का? असे काही लोक आहेत जे म्हणतात, “येशू हा त्याचा प्रिय पुत्र होता असे देवाने स्पष्टपणे सांगितले नव्हते का?” येशू हा देवाचा प्रिय पुत्र आहे, ज्याच्यावर तो संतुष्ट आहे—हे निश्चितपणे स्वतः देवाने सांगितले होते. हे देवाने स्वत:बद्दल साक्ष देणे होते, परंतु केवळ वेगळ्या दृष्टिकोनातून, हे स्वर्गातील आत्म्याने त्याच्या स्वतःच्या देहधारणेची साक्ष देणे होते. येशू हा त्याचा अवतार आहे, त्याचा स्वर्गातील पुत्र नाही. तुला समजले का? “मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे” येशूची ही वचने ते एकच आत्मा असल्याचे सूचित करत नाहीत का? आणि देहधारणेमुळेच ते स्वर्ग व पृथ्वी यांच्यात वेगळे झाले नाहीत का? प्रत्यक्षात, ते अजूनही एकच आहेत; काहीही असो, तो फक्त स्वतःची साक्ष देणारा देव आहे. युगांमधील बदल, कार्याच्या आवश्यकता आणि त्याच्या व्यवस्थापन योजनेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमुळे, मनुष्य त्याला ज्या नावाने हाक मारतो तेदेखील वेगळे आहे. जेव्हा तो कार्याचा पहिला टप्पा पार पाडण्यासाठी आला, तेव्हा त्याला फक्त यहोवा म्हटले जाऊ शकते, जो इस्रायली लोकांचा मेंढपाळ आहे. दुसऱ्या टप्प्यात, देहधारी देवाला फक्त प्रभू व ख्रिस्त म्हटले जाऊ शकते. परंतु त्या वेळी, स्वर्गातील आत्म्याने केवळ तो देवाचा प्रिय पुत्र असल्याचे सांगितले आणि तो देवाचा एकुलता एक पुत्र असल्याचा कोणताही उल्लेख केला नाही. अजिबात घडले नाही. देवाला एकुलता एक पुत्र कसा असेल? मग देव मनुष्य झाला नसता का? तो देहधारी होता, म्हणून त्याला देवाचा प्रिय पुत्र म्हटले गेले व यातूनच पिता आणि पुत्र यांच्यातील नाते निर्माण झाले. हे फक्त स्वर्ग व पृथ्वी यांच्यातील पृथक्करणामुळे होते. येशूने देहाच्या दृष्टिकोनातून प्रार्थना केली. त्याने अशा सामान्य मानवतेचा देह धारण केल्यामुळे, तो देहाच्या दृष्टिकोनातून म्हणाला: “माझे बाह्य कवच हे एका निर्मिलेल्या प्राण्याचे आहे. या पृथ्वीवर येण्यासाठी मी देह धारण केल्यामुळे, मी आता स्वर्गापासून खूपच लांब आहे.” या कारणास्तव, तो केवळ देहाच्या दृष्टिकोनातून परमपिता परमेश्वराला प्रार्थना करू शकतो. हे त्याचे कर्तव्य होते आणि हे तेच होते ज्याने देवाचा देहधारी आत्मा सुसज्ज असला पाहिजे. त्याने देहाच्या दृष्टिकोनातून पित्याची प्रार्थना केली, केवळ यावरून तो देव नव्हता असे म्हणता येणार नाही. जरी त्याला देवाचा प्रिय पुत्र म्हटले गेले, तरीही तो स्वतः देव होता, कारण तो देवाच्या आत्म्याचा अवतार होता व त्याचे मूलतत्त्व अजूनही आत्माच होते. जर तो स्वतः देव असेल तर त्याने प्रार्थना का केली याचे लोकांना आश्चर्य वाटते. याचे कारण असे, की तो देहधारी देव होता, देहात राहणारा देव होता, स्वर्गातील आत्मा नव्हता. जसे मनुष्य पाहतो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे सर्व देव आहेत. फक्त तिघांना एकत्र करून एक केलेला एकमेव खरा देव मानला जाऊ शकतो व अशा प्रकारे, त्याची शक्ती अतिशय महान आहे. असे काही लोक आहेत जे म्हणतात, की केवळ अशा प्रकारे तो सातपट प्रखर आत्मा आहे. जेव्हा त्याच्या आगमनानंतर पुत्राने प्रार्थना केली, तेव्हा त्याने आत्म्याची प्रार्थना केली होती. प्रत्यक्षात, तो निर्मिलेल्या प्राण्याच्या दृष्टिकोनातून प्रार्थना करत होता. कारण देह परिपूर्ण नाही, तो परिपूर्ण नव्हता आणि जेव्हा तो देहात आला तेव्हा त्याच्यात अनेक कमतरता होत्या व देहात त्याचे कार्य पार पाडताना तो खूप त्रासलेला होता. म्हणूनच त्याने वधस्तंभावर खिळण्याआधी परमपिता परमेश्वराला तीनदा प्रार्थना केली तसेच त्याआधीही अनेक वेळा प्रार्थना केली. त्याने त्याच्या शिष्यांमध्ये प्रार्थना केली; त्याने डोंगरावर एकट्याने प्रार्थना केली; त्याने मासेमारीच्या बोटीवर प्रार्थना केली; त्याने पुष्कळ लोकांमध्ये प्रार्थना केली; त्याने भाकरीचा तुकडा करताना प्रार्थना केली; आणि त्याने इतरांना आशीर्वाद देताना प्रार्थना केली. त्याने असे का केले? त्याने आत्म्याची प्रार्थना केली होती; तो देहाच्या दृष्टिकोनातून आत्म्याला, स्वर्गातील देवाला प्रार्थना करत होता. म्हणूनच, मनुष्याच्या दृष्टिकोनातून, कार्याच्या त्या टप्प्यावर येशू पुत्र बनला. तथापि, या टप्प्यावर, तो प्रार्थना करत नाही. हे असे का? हे असे आहे कारण तो जे समोर आणतो ते वचनाचे कार्य आहे व वचनाचा न्याय आणि ताडण आहे. त्याला प्रार्थनेची गरज नाही व त्याचे सेवाकार्य त्याच्याबद्दल बोलते. त्याला वधस्तंभावर खिळले जात नाही आणि मनुष्याने त्याला सत्तेवर असलेल्यांच्या स्वाधीन केले नाही. तो फक्त त्याचे कार्य पार पाडतो. ज्या वेळी येशूने प्रार्थना केली त्या वेळी, तो स्वर्गाचे राज्य खाली उतरवण्यासाठी, पित्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी व आगामी कार्यासाठी परमपिता परमेश्वराकडे प्रार्थना करत होता. या टप्प्यात, स्वर्गाचे राज्य आधीच खाली आले आहे, तर त्याला अद्याप प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे का? त्याचे कार्य हे युग समाप्त करण्याचे आहे आणि आता नवीन युगे नाहीत, मग पुढच्या टप्प्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे का? मला वाटते की हे तसे नाही!
मनुष्याच्या स्पष्टीकरणांमध्ये अनेक विरोधाभास आहेत. खरे तर, या सर्व मनुष्याच्या धारणा आहेत; आणखी चौकशीशिवाय, तुम्ही सर्व विश्वास ठेवाल की ती स्पष्टीकरणे बरोबर आहेत. तुम्हाला माहीत नाही का, की त्रिगुण देवाबद्दलच्या या कल्पना केवळ मनुष्याच्या धारणा आहेत? मनुष्याचे कोणतेही ज्ञान पूर्ण आणि परिपूर्ण नसते. त्यात नेहमी अशुद्धता असतात व मनुष्याकडे खूप कल्पना आहेत; यावरून असे दिसून येते की निर्मिलेला प्राणी देवाच्या कार्याचे स्पष्टीकरण अजिबातच देऊ शकत नाही. मनुष्याच्या मनात बरेच काही आहे, जे सर्व तर्क आणि विचारातून आलेले आहे, जे सत्याच्या विरोधी आहे. तुझे तर्क देवाच्या कार्याचा पूर्णपणे अभ्यास करू शकते का? तुम्हाला यहोवाच्या सर्व कार्याचे अंतर्ज्ञान प्राप्त होऊ शकते का? हे सर्व पाहणारा मनुष्य तू आहेस, की तो स्वतः देव आहे जो अनंतकाळपासून अनंतकाळपर्यंत पाहण्यास सक्षम आहे? फार पूर्वीपासूनच्या अनंतकाळापासून पुढे येणाऱ्या अनंतकाळापर्यंत तूच पाहू शकतोस की देव असे करू शकतो? तू काय म्हणतोस? देवाला समजावण्यास तू कसा पात्र आहेस? तुझे स्पष्टीकरण कोणत्या आधारावर आहे? तू देव आहेस का? आकाश आणि पृथ्वी व सर्व गोष्टी स्वतः देवाने निर्माण केल्या आहेत. हे तू केलेले नाहीस, मग तू चुकीचे स्पष्टीकरण का देत आहेस? आता तू त्रिगुण देवावर विश्वास ठेवणे पुढे सुरू ठेवणार आहेस का? तुला असे वाटत नाही का, की हे खूप जास्त होते आहे? तीन देवांवर नव्हे तर एका देवावर विश्वास ठेवणे तुझ्यासाठी चांगले होईल. हलके असणे उत्तम आहे, कारण प्रभूचे ओझे हलके आहे.