सहस्राब्दी राज्याचा काळ आला आहे

लोकांच्या या गटासोबत देव कोणते कार्य पूर्ण करेल हे तुम्ही पाहिले आहे का? देवाने एकदा म्हटले होते, सहस्राब्दी राज्यामध्येसुद्धा लोकांनी देवाच्या उच्चारांचे पालन केले पाहिजे आणि भविष्यात देवाचे उच्चार कनानच्या पवित्र भूमीमध्येदेखील माणसाच्या जीवनाला थेट मार्गदर्शन देतील. मोझेस वाळवंटात होता तेव्हा, देवाने त्याला निर्देश दिले आणि त्याच्याशी थेट बोलला. लोकांना आनंद मिळावा म्हणून देवाने स्वर्गातून अन्न, पाणी आणि मान्ना पाठवले व ते आजही तसेच आहे: लोकांना आनंद मिळावा म्हणून देवाने वैयक्तिकरीत्या खाण्यापिण्याच्या गोष्टी पाठवल्या आहेत आणि त्याने लोकांचे ताडण करण्यासाठी वैयक्तिक रीत्या शापसुद्धा पाठवले आहेत. आणि म्हणूनच, त्याच्या कार्याची प्रत्येक पायरी देव स्वतः जातीने पूर्ण करतो. आज, लोक वस्तुस्थितीचा शोध घेतात, ते संकेत आणि चमत्कार शोधतात व अशा सर्व लोकांना बहिष्कृत केले जाण्याची शक्यता आहे, कारण देवाचे कार्य अधिकाधिक व्यावहारिक होत आहे. देव स्वर्गातून अवतरला आहे हे कोणालाच ठाऊक नाही, देवाने स्वर्गातून अन्न आणि शक्तिवर्धक पदार्थ पाठवले आहेत, हे देखील कोणालाही ठाऊक नाही—तरीही देव प्रत्यक्षात अस्तित्वात आहे व लोकांच्या कल्पनेमधील सहस्राब्दी राज्याची मोहक दृश्येदेखील देवाचे वैयक्तिक उच्चार आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि यालाच पृथ्वीवर देवासोबत राज्य करणे म्हणतात. पृथ्वीवर देवासोबत राज्य करण्याचा संदर्भ देहाशी आहे. जे देहाचे नाही ते पृथ्वीवर अस्तित्वात नाही आणि अशा प्रकारे जे लोक तिसऱ्या स्वर्गात जाण्यावर लक्ष केंद्रित करतात त्या लोकांचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. एके दिवशी, जेव्हा संपूर्ण विश्व देवाकडे परतेल, तेव्हा संपूर्ण विश्वामधील त्याच्या कार्याच्या केंद्रस्थानी देवाच्या उच्चारांचे पालन केले जाईल; इतरत्र, देवाचे उच्चार प्राप्त करण्यासाठी काही लोक टेलिफोनचा वापर करतील, काही विमानाने जातील, काही बोटीने समुद्र ओलांडतील आणि काही लोक लेझर वापरतील. गुणगाण गाणारी आणि ओढ असणारी प्रत्येक व्यक्ती देवाच्या जवळ येईल आणि देवाजवळ जमा होईल व देवाची उपासना करेल—आणि ही सर्व देवाची कार्ये असतील. हे लक्षात ठेवा! देव पुन्हा कधीही इतरत्र नक्कीच सुरू करणार नाही. देव ही वस्तुस्थिती पूर्ण करेल: तो संपूर्ण विश्वातील सर्व लोकांना त्याच्यासमोर येण्यास आणि पृथ्वीवरील देवाची उपासना करण्यास भाग पाडेल व त्याचे इतर ठिकाणचे कार्य थांबेल आणि लोकांना सत्य मार्ग शोधण्यास भाग पाडले जाईल. ते जोसेफसारखे असेल: सर्वजण अन्नासाठी त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला नमन केले, कारण त्याच्याकडे खाण्याच्या गोष्टी होत्या. दुष्काळ टाळण्यासाठी, लोकांना सच्चा मार्ग शोधण्यास भाग पाडले जाईल. संपूर्ण धार्मिक समुदायाला भयंकर दुष्काळ सहन करावा लागेल आणि केवळ आजचा देव जिवंत पाण्याचा झरा आहे, मानवाच्या उपभोगासाठी प्रदान केलेल्या सतत वाहणाऱ्या झऱ्याचा स्रोत आहे व लोक येऊन त्याच्यावर अवलंबून राहतील. हीच ती वेळ असेल जेव्हा देवाची कार्ये उघड होतील आणि देवाला गौरव प्राप्त होइल; संपूर्ण विश्वातील सर्व लोक या सर्वसाधारण “मानवाची” उपासना करतील. हा देवाच्या गौरवाचा दिवस नसेल का? एक दिवस, जुने पाद्री जिवंत पाण्याच्या झऱ्यामधून पाणी शोधण्यासाठी तारा पाठवतील. ते वयस्कर असतील, तरीदेखील त्यांनी ज्या व्यक्तीला कमी लेखले होते त्या व्यक्तीची पूजा करण्यासाठी ते येतील. ते त्यांच्या मुखाने त्याचा स्वीकार करतील आणि त्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवतील—हा एक संकेत आणि आश्चर्य नाही का? जेव्हा संपूर्ण राज्य आनंदित होईल तो देवाच्या गौरवाचा दिवस असेल आणि जे कोणी तुमच्याकडे येतील व देवाची सुवार्ता प्राप्त करतील त्यांना देव आशीर्वाद देईल आणि जे देश व लोक असे करतील त्यांना देव आशीर्वाद देईल आणि त्यांची काळजी घेईल. भविष्यातील दिशा अशी असेल: ज्यांना देवाच्या मुखातून उच्चार प्राप्त होतात त्यांना पृथ्वीवर पुढे जाण्याचा मार्ग मिळेल मग ते व्यापारी असोत किंवा शास्त्रज्ञ असोत, शिक्षणतज्ज्ञ असोत किंवा उद्योगपती असोत. ज्यांना देवाचे उच्चार प्राप्त होणार नाहीत त्यांना कोणताही मार्ग शोधणे कठीण जाईल आणि त्यांना सच्चा मार्ग शोधण्यास भाग पाडले जाईल. याचा अर्थ असा आहे, की “सत्याने तुम्ही संपूर्ण जग फिराल; सत्याशिवाय तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही.” वस्तुस्थिती अशी आहे: देव संपूर्ण विश्वाला आज्ञा देण्यासाठी आणि मानवजातीवर राज्य करण्यासाठी व जिंकण्यासाठी मार्ग (म्हणजेच त्याची सर्व वचने) वापरेल. देवाच्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये लोक नेहमी मोठ्या बदलाची अपेक्षा करतात. स्पष्टपणे सांगायचे तर, देव वचनांद्वारेच लोकांवर नियंत्रण ठेवतो आणि तुझी इच्छा असो वा नसो, तो जे सांगतो ते तू केलेच पाहिजेस; ही वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती आहे व ती सर्वांनी पाळलीच पाहिजे आणि म्हणूनच, ते कठोर आहे आणि सर्वांना ज्ञात आहे.

पवित्र आत्मा लोकांना भावना देतो. देवाची वचने वाचल्यानंतर, लोक त्यांच्या अंतःकरणात स्थिरता आणि शांतता अनुभवतात, तर, ज्यांना देवाची वचने मिळत नाहीत त्यांना रिक्त वाटते. ही देवाच्या वचनांची शक्ती आहे. लोकांनी ती वाचली पाहिजेत आणि ते वाचल्यानंतर त्यांचे कल्याण होते आणि या वचनांशिवाय ते काहीही करू शकत नाहीत. लोकांनी अफू घेतल्यानंतर त्यांना जसे वाटते तसे: ती त्यांना शक्ती देतात आणि त्याशिवाय त्यांना त्याचे प्रचंड आकर्षण वाटते व त्यांच्यामध्ये त्राण नसते. आज लोकांची प्रवृत्ती अशीच आहे. देवाची वचने वाचून लोकांना शक्ती मिळते. जर त्यांनी ते वाचले नाही, तर त्यांना निराश वाटते, परंतु ते वाचल्यानंतर ते ताबडतोब त्यांच्या “आजारातून” उठतात. पृथ्वीवरील सत्तेसाठी आणि पृथ्वीवरील देवाच्या राज्यासाठी देवाचे हे वचन वापरले जाते. काही लोक देवाचे कार्य सोडू इच्छितात किंवा ते त्याच्या कार्याला कंटाळले आहेत. काहीही असो, ते स्वतःला देवाच्या वचनांपासून वेगळे करू शकत नाहीत; ते कितीही कमकुवत असले तरीदेखील त्यांनी देवाच्या वचनांनुसार जगले पाहिजे आणि ते कितीही बंडखोर असले तरीही ते देवाची वचने सोडण्याचे धाडस करत नाहीत. जेव्हा देवाची वचने खरोखरच त्यांचे सामर्थ्य दर्शवतात तेव्हा देव राज्य करतो आणि शक्तीचा वापर करतो; देव अशा प्रकारे कार्य करतो. सरतेशेवटी, देव असाच कार्य करत असतो आणि कोणीही ते सोडू शकत नाही. देवाची वचने असंख्य घरांमध्ये पसरतील, ते सर्वांना ज्ञात होतील आणि तेव्हाच त्याचे कार्य संपूर्ण विश्वात पसरेल. याचा अर्थ असा आहे, की देवाच्या गौरवाच्या दिवशी, देवाची वचने त्यांचे सामर्थ्य आणि अधिकार दर्शवतील. अनादी काळापासून ते आजपर्यंतचे त्याचे प्रत्येक वचन यशस्वी होईल आणि पूर्ण होईल. अशाप्रकारे, पृथ्वीवर देवाचा गौरव होईल, म्हणजेच त्याची वचने पृथ्वीवर राज्य करतील. सर्व पापी लोकांचे देवाच्या मुखातून बोललेल्या वचनांनी ताडण केले जाईल, सर्व सदाचरणी लोकांना देवाच्या मुखातून बोललेल्या वचनांनी आशीर्वाद दिला जाईल आणि त्याच्या मुखातून निघालेल्या वचनांनी सर्व स्थापित आणि परिपूर्ण होतील. तसेच तो कोणतेही संकेत किंवा चमत्कार प्रकट करणार नाही; सर्व काही त्याच्या वचनांनी पूर्ण होईल आणि त्याची वचने वस्तुस्थिती सादर करतील. पृथ्वीवरील प्रत्येकजण देवाची वचने साजरे करेल, मग ते प्रौढ असोत किंवा लहान मुले, पुरुष असोत, स्त्रिया असोत, वृद्ध असोत किंवा तरुण असोत, सर्व लोक देवाच्या वचनांना शरण जातील. देवाची वचने देहस्वरुपात दिसतात, ज्यामुळे पृथ्वीवरील लोकांना ती स्पष्ट आणि जिवंत दिसतात. वचनाचा देह होण्याचा अर्थ हाच आहे. “वचनाचा देह होणे” ही वस्तुस्थिती पूर्ण करण्यासाठी देव मुख्यत्वेकरून पृथ्वीवर आला आहे, ज्याचा अर्थ असा आहे, की तो आला आहे जेणेकरून त्याची वचने देहातून सादर केली जावीत (जुन्या करारातील मोझेसच्या काळाप्रमाणे नाही, जेव्हा देवाचा आवाज थेट आकाशातून आला होता). त्यानंतर, त्याची सर्व वचने सहस्राब्दी राज्याच्या युगात पूर्ण होतील, ती मनुष्याच्या डोळ्यांसमोर दिसणारी वस्तुस्थिती बनतील आणि लोक त्यांना त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी कोणत्याही किरकोळ विसंगतीशिवाय पाहतील. हा देवाच्या अवताराचा सर्वोच्च अर्थ आहे. याचा अर्थ असा, की आत्म्याचे कार्य देहाद्वारे आणि वचनांद्वारे पूर्ण होते. हा “वचनाचा देह होणे” आणि “वचनाचे देहातील स्वरूप” याचा खरा अर्थ आहे. फक्त देवच आत्म्याच्या इच्छेनुसार बोलू शकतो आणि केवळ देहस्वरुपातील देवच आत्म्याच्या वतीने बोलू शकतो; देवाच्या अवतारामध्ये देवाची वचने स्पष्ट केली जातात व त्यांच्याद्वारे इतर सर्वांचे मार्गदर्शन केले जाते. याला कोणीही अपवाद नाही, ते सर्व या कार्यक्षेत्रात अस्तित्वात आहेत. केवळ या उच्चारांमधून लोक जागरूक होऊ शकतात; ज्यांना अशा प्रकारे फायदा होत नाही आणि त्यांना स्वर्गामधून उच्चार प्राप्त होतील असे त्यांना वाटत असेल तर ते दिवास्वप्न पाहत आहेत. हाच अधिकार देवाच्या अवतारी देहात दाखवून दिला जातो, ज्यामुळे सर्व पूर्ण श्रद्धेने त्यावर विश्वास ठेवतात. अगदी आदरणीय तज्ञ आणि धार्मिक पाद्रीदेखील ही वचने बोलू शकत नाहीत. त्या सर्वांनी त्यांना शरण गेले पाहिजे आणि कोणीही दुसरी सुरुवात करू शकणार नाही. विश्वावर विजय मिळवण्यासाठी देव वचनांचा वापर करेल. हे तो त्याच्या अवतारी देहाने करणार नाही, तर देवाच्या मुखातून आलेल्या उच्चारांचा वापर करून संपूर्ण विश्वातील सर्व लोकांना जिंकण्यासाठी देह अवतार घेतला जातो; केवळ हेच वचनाचा देह होणे आहे फक्त हेच वचनाचे देहातील स्वरूप आहे. कदाचित, मनुष्याला असे दिसते, की जणू देवाने फारसे कार्य केलले नाही—परंतु देवाला त्याची वचने उद्गारायची आहेत आणि त्यांना पूर्णतः खात्री पटेल व ते आश्चर्यचकित होतील. वस्तुस्थितीशिवाय, लोक ओरडतात आणि आक्रोश करतात; देवाच्या वचनाने ते शांत होतात. देव ही वस्तुस्थिती निश्चितपणे पूर्ण करेल, कारण ही देवाची दीर्घ-स्थापित योजना आहे: पृथ्वीवर वचनाच्या आगमनाची वस्तुस्थिती पूर्ण करणे. खरे पाहता, मी समजावून सांगण्याची आवश्यकता नाही, की पृथ्वीवरील सहस्राब्दी राज्याचे आगमन म्हणजेच पृथ्वीवर देवाच्या वचनांचे आगमन आहे. नवीन जेरुसलेमचे स्वर्गातून अवतरणे म्हणजे मनुष्यामध्ये वास्तव्य करण्यासाठी, मनुष्याच्या प्रत्येक कृतीला आणि त्याच्या सर्व आंतरिक विचारांना साथ देण्यासाठी देवाच्या वचनांचे आगमन आहे. ही देखील एक वस्तुस्थिती आहे की देव साध्य करेल; हे सहस्राब्दी राज्याचे सौंदर्य आहे. ही देवाने ठरवलेली योजना आहे: त्याची वचने पृथ्वीवर हजार वर्षांपर्यंत प्रकट होतील आणि ते त्याची सर्व कार्ये समोर आणतील व पृथ्वीवरील त्याची सर्व कार्ये पूर्ण करतील, ज्यानंतर मानवजातीचा हा टप्पा समाप्त होईल.

मागील:  नवीन युगातील आज्ञा

पुढील:  व्यावहारिक देव हा स्वयमेव देवच आहे हे तुला माहीत असायला हवे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger