व्यावहारिक देव हा स्वयमेव देवच आहे हे तुला माहीत असायला हवे
व्यावहारिक देवाबद्दल तुला काय माहीत असायला हवे? आत्मा, व्यक्तित्व आणि वचन यांमधून व्यावहारिक देव बनतो व स्वयमेव व्यावहारिक देव याचा हा खरा अर्थ आहे. तुला केवळ व्यक्ती माहीत असेल—जर त्याच्या सवयी आणि व्यक्तिमत्त्व माहीत असेल—पण आत्म्याचे कार्य किंवा आत्मा देहातून जे करतो ते माहीत नसेल व तू जर केवळ आत्म्याकडे आणि वचनाकडे लक्ष दिलेस व फक्त आत्म्यासमोर प्रार्थना केलीस, पण व्यावहारिक देवाद्वारे केले जाणारे देवाच्या आत्म्याचे कार्य तुला माहीत नसेल, तर तू व्यावहारिक देवाला जाणत नाहीस हे यातून पुन्हा एकदा सिद्ध होते. व्यावहारिक देवाचे ज्ञान यामध्ये त्याची वचने जाणणे आणि अनुभवणे व पवित्र आत्म्याच्या कार्याचे नियम आणि तत्त्वे व देवाचा आत्मा देहातून कार्य कसे करतो हे जाणून घेणे यांचा समावेश आहे. तसेच, देवाने देहातून केलेली प्रत्येक कृती आत्म्याद्वारे नियंत्रित असते आणि त्याने उच्चारलेली वचने ही त्याच्या आत्म्याची थेट अभिव्यक्ती असते हे जाणून घेणेही त्यामध्ये समाविष्ट आहे. अशा प्रकारे, व्यावहारिक देवाला जाणू घेण्यासाठी, देव मानवतेमध्ये व देवत्वामध्ये कसे कार्य करतो हे जाणून घेणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे; हे आत्म्याच्या अभिव्यक्तींशी संबंधित आहे, ज्यामध्ये सर्व लोक मग्न असतात.
आत्म्याच्या अभिव्यक्तींचे पैलू काय आहेत? काही वेळा देव मानवतेमध्ये कार्य करतो आणि काही वेळा देवत्वामध्ये—पण दोन्ही बाबतींत नियंत्रण आत्म्याचेच असते. लोकांमधील आत्मा कोणताही असो, त्यांची बाह्य अभिव्यक्ती अशीच असते. आत्मा सामान्यपणाने कार्य करतो, पण आत्म्याद्वारे त्याच्या मार्गदर्शनाचे दोन भाग असतात: त्याचे मानवतेमधील कार्य हा एक भाग असतो आणि त्याचे देवत्वाद्वारे कार्य हा दुसरा भाग असतो. तुला हे स्पष्टपणे माहीत असायला हवे. आत्म्याचे कार्य परिस्थितीनुसार बदलते: जेव्हा त्याचे मानवी कार्य आवश्यक असेल तेव्हा आत्मा या मानवी कार्याला दिशा देतो आणि जेव्हा त्याचे दैवी कार्य आवश्यक असेल, तेव्हा ते पार पाडण्यासाठी देवत्व थेट प्रकट होते. देव देहातून कार्य करत असल्यामुळे आणि देहरूपात दिसत असल्याने, तो मानवता व देवत्व या दोन्हीमध्ये कार्य करतो. त्याच्या मानवतेतील कार्याला आत्मा दिशा देतो आणि लोकांच्या दैहिक गरजा भागवण्यासाठी, त्यांची देवाशी संलग्नता सुकर करण्यासाठी, त्यांना देवाची वास्तविकता व सामान्यता पाहता यावी यासाठी आणि देवाचा आत्मा देह धारण करून मनुष्यांमध्ये आला आहे, मनुष्यांमध्ये राहतो आहे व मनुष्याशी संलग्न आहे हे त्यांना दिसावे यासाठी ते केले जाते. त्याचे देवत्वातील कार्य हे लोकांच्या आयुष्यात सुविधा देण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत लोकांना सकारात्मक बाजूने मार्गदर्शन करण्यासाठी केले जाते. यातून लोकांची प्रवृत्ती बदलते व आत्म्याचे देहातील प्रकटीकरण त्यांना खऱ्या अर्थाने पाहता येते. मुख्यतः, मनुष्याच्या आयुष्यातील विकास हा देवाच्या कार्यातून आणि देवत्वातील वचनांतून थेट साधला जातो. लोकांनी जर देवाचे देवत्वातील कार्य स्वीकारले, तरच ते त्यांच्या स्वभावातील बदल साध्य करू शकतात व केवळ त्यानंतरच ते आत्म्यातून समाधानी होऊ शकतात; जर, याच्या जोडीने, मानवतेमधील कार्य—देवाने केलेला मानवतेचा सांभाळ, आधार आणि सोय—असेल, तरच देवाच्या कार्याचे परिणाम पूर्णपणे साध्य होऊ शकतात. आज ज्याबद्दल बोलले आहे तो व्यावहारिक देव स्वतः मानवता व देवत्व अशा दोन्हींमध्ये कार्य करतो. व्यावहारिक देवाच्या प्रकटीकरणातून, त्याचे सामान्य मानवी कार्य आणि जीवन व त्याचे पूर्णपणे दैवी कार्य साध्य होते. त्याची मानवता आणि देवत्व एकत्रित संलग्न आहेत व दोन्हींचेही कार्य वचनांच्या माध्यमातून साध्य होते; मग ते मानवतेतील असो किंवा देवत्वातील, तो वचने उच्चारतो. देव जेव्हा मानवतेमध्ये कार्य करतो, तेव्हा तो मानवतेची भाषा बोलतो जेणेकरून, लोक त्यात रमू शकतील आणि ते समजू शकतील. त्याची वचने सरळपणे सांगितलेली असतात व समजायला सोपी असतात, जी सर्व लोकांना सुविधा देऊ शकतात; मग लोक ज्ञानी असोत किंवा कमी शिक्षित असोत, ते देवाची वचने प्राप्त करू शकतात. देवाचे दैवत्वामधील कार्य हे वचनांच्या माध्यमातूनही पार पाडले जाते, पण ते सुविधेने परिपूर्ण असते, जीवनाने परिपूर्ण असते, मानवी कल्पनांनी मलीन झालेले नसते, त्यात मानवी प्राधान्यांचा समावेश नसतो आणि त्याला मानवी मर्यादा नसतात, ते कोणत्याही सामान्य मानवतेच्या बंधनांच्या बाहेर असते; ते देहाद्वारे पार पाडले जाते, पण ती आत्म्याची थेट अभिव्यक्ती असते. लोकांनी जर देवाचे फक्त मानवतेतील कार्य स्वीकारले, तर ते एका विशिष्ट व्याप्तीत बद्ध राहतील व त्यामुळे त्यांच्यात अगदी सूक्ष्म बदल घडण्यासाठीदेखील त्यांना अखंड हाताळणी, छाटणी आणि शिस्त यांची आवश्यकता असेल. मात्र पवित्र आत्म्याचे कार्य किंवा उपस्थिती नसेल, तर ते नेहमीच जुन्याच मार्गांकडे वळतील; केवळ देवत्वाच्या कार्याद्वारेच या अनिष्टता व कमतरता दुरुस्त केल्या जाऊ शकतात आणि त्यानंतरच लोक परिपूर्ण बनू शकतात. शाश्वत हाताळणी व छाटणी याऐवजी काय गरजेचे असेल तर ते म्हणजे सकारात्मक तरतूद, सर्व उणिवा भरून काढण्यासाठी वचने वापरणे, लोकांची प्रत्येक अवस्था प्रकट करण्यासाठी वचने वापरणे, त्यांच्या आयुष्यांना, त्यांच्या प्रत्येक उच्चारणाला, त्यांच्या प्रत्येक कृतीला दिशा देण्यासाठी, त्यांचे उद्देश आणि प्रेरणा उघड करण्यासाठी वचने वापरणे. हे व्यावहारिक देवाचे वास्तविक कार्य आहे. अशा प्रकारे, व्यावहारिक देवाबद्दलच्या तुमच्या दृष्टिकोनात, तुम्ही त्याला ओळखून व त्याची दखल घेऊन, त्याच्या मानवतेला ताबडतोब शरण जायला हवे आणि त्यानंतर तुम्ही त्याचे दैवी कार्य व वचनेही ओळखायला आणि स्वीकारायला हवीत. देवाचे देहातील प्रकटीकरण याचा अर्थ देवाच्या आत्म्याचे सर्व कार्य व वचने त्याच्या सामान्य मानवतेच्या माध्यमातून आणि त्याच्या प्रत्यक्ष देहाच्या माध्यमातून केली जातात. दुसऱ्या शब्दांत, देवाचा आत्मा ताबडतोब त्याच्या मानवी कार्याला दिशा देतो व देवत्वाचे कार्य देहातून पार पाडतो आणि देहधारी देवामध्ये तू देवाचे मानवतेतील व पूर्णपणे दैवी अशी दोन्ही कार्ये पाहू शकतोस. व्यावहारिक देवाच्या देहातील प्रकटीकरणाचे हे खरे महत्त्व आहे. तू जर हे स्पष्टपणे पाहू शकलास, तर तू देवाचे सर्व वेगवेगळे भाग जोडू शकशील; त्याच्या देवत्वातील कार्याला अनाठायी महत्त्व देणे तू थांबवेल आणि त्याच्या मानवतेतील कार्याकडे अनाठायी तुच्छतेने पाहणे थांबवशील व कोणत्याही टोकाला जाणार नाही किंवा भरकटणार नाही. एकंदरीत, व्यावहारिक देव याचा अर्थ असा आहे, की त्याची मानवता आणि त्याचे देवत्व यांचे कार्य, आत्म्याच्या निर्देशाप्रमाणे, त्याच्या देहातून व्यक्त होते जेणेकरून, तो स्पष्ट व सजीव, वास्तविक आणि खरा आहे हे लोक पाहू शकतील.
देवाच्या आत्म्याच्या मानवतेतील कार्याच्या तात्कालिक अवस्था असतात. मानवतेला परिपूर्ण करून, तो त्याच्या मानवतेला आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारण्यास सक्षम करतो आणि त्यानंतर त्याची मानवता चर्चला सुविधा देण्यास व सांभाळण्यास सक्षम होते. देवाच्या सामान्य कार्याची ही एक अभिव्यक्ती आहे. अशा प्रकारे, देवाच्या मानवतेतील कार्याची तत्त्वे जर तू स्पष्टपणे पाहू शकलास, तर देवाच्या मानवतेतील कार्याविषयी तू धारणा बाळगण्याची शक्यता कमी आहे. बाकी काहीही असले तरी, देवाचा आत्मा चूक असू शकत नाही. तो बरोबर असतो आणि त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नसतात; तो कोणतीही गोष्ट चुकीच्या तऱ्हेने करत नाही. दैवी कार्य हे देवाच्या इच्छेची थेट अभिव्यक्ती असते, त्यात मानवतेचा हस्तक्षेप नसतो. ते परिपूर्णतेच्या प्रक्रियेतून जात नाही, तर ते थेट आत्म्याकडून येते. मात्र, तो देवत्वातील कार्य करू शकतो ही बाब शक्य होते ती त्याच्या सामान्य मानवतेमुळे; ते जराही अलौकिक नसते व ते एखाद्या सामान्य व्यक्तीने पार पाडल्यासारखे दिसते. देव स्वर्गातून पृथ्वीवर आला तो मुख्यतः देवाची वचने देहातून व्यक्त करण्यासाठी, देवाच्या आत्म्याचे कार्य देहाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आला आहे.
आज, लोकांचे व्यावहारिक देवाचे ज्ञान हे फारच एकतर्फी आहे आणि देहधारणेच्या महत्त्वाचे त्यांचे आकलन अद्यापही फारच नगण्य आहे. देवाच्या देहामुळे लोक त्याच्या कार्याच्या व वचनांच्या पलीकडेही देवाच्या आत्म्यात जे काही समाविष्ट आहे ते, तो किती समृद्ध आहे ते पाहू शकतात. तरीही काहीही असो, देवाची साक्ष अंतिमतः देवाच्या आत्म्यातूनच येते: देव देहाद्वारे काय करतो, तो कोणत्या तत्त्वांनुसार कार्य करतो, मानवतेमध्ये तो काय करतो आणि दैवत्वामध्ये तो काय करतो. लोकांना याचे ज्ञान असले पाहिजे. आज तू या व्यक्तीची पूजा करू शकत आहेस, पण मूलतः तू आत्म्याची पूजा करत आहेस व देहधारी देवाच्या ज्ञानाबाबत लोकांनी किमान हे साध्य करावयास हवे: देहाच्या माध्यमातून आत्म्याचे सार जाणून घेणे, आत्म्याचे देहातील दैवी कार्य आणि देहातील मानवी कार्य जाणून घेणे, आत्म्याची सर्व वचने व देहातील सर्व उच्चार स्वीकारणे आणि देवाचा आत्मा देहाला कसे मार्गदर्शन करतो व त्याची शक्ती देहातून कशी दाखवतो हे पाहणे. म्हणजे असे की, मनुष्य देहाच्या माध्यमातून स्वर्गातील आत्म्याला जाणतो; व्यावहारिक देवाचे मनुष्यांमध्ये प्रकटीकरण झाल्याने लोकांच्या कल्पनेतील अज्ञात देवाचे उच्चाटन झाले आहे. लोकांनी स्वयमेव व्यावहारिक देवाची पूजा केल्याने त्यांचा देवाप्रतीचा आज्ञाधारकपणा वाढला आहे आणि देवाच्या आत्म्याच्या देहातील दैवी कार्याच्या व देहातील त्याच्या मानवी कार्याच्या माध्यमातून, मनुष्याला प्रकटीकरण प्राप्त होते आणि त्याला सांभाळले जाते व मनुष्याच्या जीवनधारणेत बदल साध्य होतात. आत्म्याच्या देहातील आगमनाचा हा खरा अर्थ आहे. लोकांचा देवाशी संपर्क येऊ शकेल, त्याच्यावर अवलंबून राहता येईल आणि त्यांना देवाचे ज्ञान प्राप्त होऊ शकेल हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे.
मुख्यतः, लोकांचा व्यावहारिक देवाप्रति दृष्टिकोन काय असावा? देहधारणेविषयी, वचनाच्या देहातील प्रकटीकरणाविषयी, देवाच्या देहातील प्रकटीकरणाविषयी, व्यावहारिक देवाच्या कृत्यांविषयी तुला काय माहीत आहे? आजच्या चर्चेचे मुख्य विषय काय आहेत? देहधारणा, वचनाचे देहातील आगमन व देवाचे देहातील प्रकटीकरण हे सर्व विषय समजून घेतले पाहिजेत. तुम्ही हळूहळू हे विषय समजून घेतले पाहिजेत आणि तुमच्या स्थितीच्या आधारावर व त्या काळाच्या आधारावर, तुमच्या जीवनानुभवात, त्यांची स्पष्ट जाणीव तुम्हाला असली पाहिजे. ज्या प्रक्रियेने लोक देवाच्या वचनांचा अनुभव घेतात आणि ते ज्याप्रकारे देवाच्या वचनांचे देहात प्रकटीकरण जाणतात ती प्रक्रिया सारखीच असते. लोक देवाच्या वचनांचा जितका जास्त अनुभव घेतात, तितके जास्त ते देवाच्या आत्म्याला जाणतात; देवाच्या वचनांचा अनुभव घेण्यातून लोकांना आत्म्याच्या कार्याच्या तत्त्वांचे आकलन होते व ते स्वयमेव व्यावहारिक देवाला जाणू लागतात. खरे तर, देव जेव्हा लोकांना परिपूर्ण करतो आणि त्यांना प्राप्त करतो, तेव्हा तो त्यांना व्यावहारिक देवाची कृत्ये जाणू देत असतो; लोकांना देहधारणेचे प्रत्यक्ष महत्त्व दाखवून देण्यासाठी, देवाचा आत्मा खरोखरच मनुष्यासमोर प्रकट झाला आहे हे त्यांना दाखवण्यासाठी तो व्यावहारिक देवाच्या कार्याचा उपयोग करतो. देव जेव्हा लोकांना प्राप्त करतो व त्यांना परिपूर्ण करतो, तेव्हा व्यावहारिक देवाच्या अभिव्यक्तींनी त्यांना जिंकून घेतलेले असते; व्यावहारिक देवाच्या वचनांनी त्यांना बदललेले असते आणि त्याचे स्वतःचे जीवन त्यांच्यात घडवलेले असते व त्यांना तो जो आहे त्याने भरून टाकलेले असते (मग तो मानवतेच्या रूपातील देव असो किंवा दैवी स्वरूपातील). त्याने त्यांना आपल्या वचनांच्या मूलतत्त्वाने भरून टाकलेले असते आणि लोकांना आपली वचने जगायला लावलेले असते. जेव्हा देव लोकांना प्राप्त करतो, तेव्हा लोकांच्या कमतरतांचा सामना करण्याचा मार्ग म्हणून व त्यांची बंडखोर प्रवृत्ती उघड करण्यासाठी प्रथमतः, त्यांना ज्याची गरज आहे ते प्राप्त करून देऊन आणि देव मनुष्यांमध्ये आला आहे हे त्यांना दाखवून, तो वचने व उच्चार यांचा उपयोग करतो. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, व्यावहारिक देवाने केलेले कार्य हे प्रत्येक व्यक्तीला सैतानाच्या प्रभावापासून वाचवण्याचे, घाणीच्या प्रदेशापासून त्यांना दूर नेण्याचे आणि त्यांची भ्रष्ट प्रवृत्ती उखडून टाकण्याचे आहे. व्यावहारिक देवाकडून प्राप्त केले जाण्याचे सर्वात प्रमुख महत्त्व म्हणजे एक आदर्श व नमुना म्हणून व्यावहारिक देवासह सामान्य मानवता आचरणात आणू शकणे, किंचितही विचलित न होता किंवा न भरकटता व्यावहारिक देवाची वचने आणि आवश्यक गोष्टी आचरणात आणू शकणे, तो जसे म्हणेल त्याप्रकारे आचरण करणे व तो जे सांगेल ते साध्य करू शकणे. अशा प्रकारे, देव तुला प्राप्त करू शकतो. जेव्हा देव तुला प्राप्त करतो, तेव्हा तुला पवित्र आत्म्याचे कार्य प्राप्त होते; इतकेच नव्हे तर तत्त्वतः, तुला व्यावहारिक देवाच्या अपेक्षांनुसार आचरण करणे शक्य होते. केवळ पवित्र आत्म्याचे कार्य असणे म्हणजे तुझ्याकडे जीवन असणे नव्हे. महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यावहारिक देवाच्या तुझ्याकडून असलेल्या अपेक्षांनुसार तू कृती करू शकतोस की नाही. हे देवाने तुला प्राप्त करण्याशी संबंधित आहे. व्यावहारिक देवाच्या देहातील कार्याचा हा महानतम अर्थ आहे. म्हणजे असे, की देव खरोखर आणि प्रत्यक्षात देहात प्रकट होऊन व स्पष्ट आणि सजीव होऊन, लोकांच्या नजरेस पडून, आत्म्याचे कार्य देहातून प्रत्यक्ष करून व देहातील लोकांसमोर आदर्श म्हणून कार्य करून लोकांच्या समूहाला प्राप्त करतो. देवाचे देहात आगमन याचा प्रमुख उद्देश लोकांनी देवाची वास्तविक कृत्ये पाहू शकणे, निराकार आत्म्याला दैहिक आकार देणे आणि लोकांना त्याला पाहू व स्पर्श करू देणे हा आहे. अशा प्रकारे, त्याने ज्यांना परिपूर्ण केले आहे ते त्याचे आचरण करतील, त्याच्याकडून प्राप्त केले जातील आणि त्याच्या हृदयात असतील. देव जर केवळ स्वर्गात बोलला असता व प्रत्यक्षात पृथ्वीवर आला नसता, तर लोक देवाला जाणू शकले नसते; केवळ पोकळ सिद्धांत वापरून त्यांनी देवाच्या कृतींवर प्रवचन दिले असते आणि वास्तविकतेत त्यांना देवाची वचने कळली नसती. मुख्यतः, देव ज्यांना प्राप्त करणार आहे त्यांच्यासाठी एक आदर्श व नमुना म्हणून कार्य करण्यासाठी म्हणून तो पृथ्वीवर आला आहे. केवळ अशाच प्रकारे लोक देवाला प्रत्यक्षात जाणू शकतात, देवाला स्पर्श करू शकतात आणि त्याला पाहू शकतात व त्यानंतरच ते देवाद्वारे खरोखर प्राप्त केले जाऊ शकतात.