देहधारणेचे रहस्य (१)
कृपेच्या युगात, योहानाने येशूसाठी मार्ग तयार केला. योहान स्वतः देवाचे कार्य करू शकला नाही, परंतु त्याने केवळ मनुष्याचे कर्तव्य पार पाडले. योहान हा प्रभूचा अग्रगामी असला, तरी तो देवाचे प्रतिनिधित्व करण्यास असमर्थ होता; तो केवळ पवित्र आत्म्याने वापरलेला मनुष्य होता. येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला. त्यानंतर त्याने त्याचे कार्य सुरू केले, म्हणजेच त्याने ख्रिस्ताचे सेवाकार्य करण्यास सुरुवात केली. म्हणूनच त्याने देवाची ओळख धारण केली, कारण तो देवाकडूनच आला होता. याआधी त्याची श्रद्धा कशी होती हे महत्त्वाचे नाही—तो काही वेळा कमकुवत झाला असेल किंवा काही वेळा मजबूत असेल—हे सर्व त्याचे सेवाकार्य करण्यापूर्वी त्याने जगलेल्या सामान्य मानवी जीवनाशी संबंधित होते. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर (म्हणजे अभिषिक्त झाल्यानंतर), देवाची शक्ती आणि गौरव लगेच त्याच्याकडे आले आणि अशा रितीने त्याने त्याचे सेवाकार्य करण्यास सुरुवात केली. तो संकेत आणि आश्चर्ये घडवू शकला, चमत्कार करू शकला आणि त्याच्याकडे सामर्थ्य आणि अधिकार होता, कारण तो स्वतः देवाच्या वतीने थेट कार्य करत होता; तो त्याच्या जागी आत्म्याचे कार्य करत होता आणि आत्म्याचा आवाज व्यक्त करत होता. म्हणून, तो स्वतः देव होता; हे निर्विवाद आहे. योहान अशी व्यक्ती होता ज्याचा पवित्र आत्म्याने वापर केला होता. तो देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नव्हता किंवा देवाचे प्रतिनिधित्व करणेही त्याला शक्य नव्हते. जर त्याची तशी इच्छा असती, तरी पवित्र आत्म्याने त्याला त्यासाठी अनुमती दिली नसती, कारण देवाने स्वतः जे कार्य पूर्ण करायचे होते ते करण्यास तो असमर्थ होता. कदाचित त्याच्यामध्ये मनुष्याच्या इच्छेसारखे बरेच काही होते किंवा विचलित करणारे काही तरी होते; कोणत्याही परिस्थितीत तो थेट देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नव्हता. त्याच्या चुका आणि मूर्खपणा या केवळ त्याचे स्वतःचे प्रतिनिधित्व करत होत्या, परंतु त्याचे कार्य पवित्र आत्म्याचे प्रतिनिधीत्व करणारे होते. तरीही, तो पूर्णपणे देवाचे प्रतिनिधित्व करत होता असे म्हणता येणार नाही. त्याचे विचलित होणे आणि चुका करणे हे देवाचे प्रतिनिधित्व करू शकते का? मनुष्याचे प्रतिनिधित्व करताना चुका करणे हे सामान्य आहे, परंतु जर कोणी देवाचे प्रतिनिधित्व करताना चूक करत असेल, तर तो देवाचा अपमान ठरणार नाही का? ते पवित्र आत्म्याविरुद्ध केलेली ईश्वरनिंदा ठरणार नाही का? इतरांनी मनुष्याला उच्च पद बहाल केले असले तरीही पवित्र आत्मा त्याला सहजतेने देवाची जागा घेऊ देत नाही. जर तो देव नसेल, तर तो अखेरीस स्थिर राहू शकणार नाही. मनुष्याला वाटते म्हणून तसे देवाचे प्रतिनिधित्व करण्याची अनुमती पवित्र आत्मा देत नाही! उदाहरणार्थ, योहानाला साक्ष देणारा पवित्र आत्मा होता आणि येशूसाठी मार्ग तयार करणारा म्हणून त्याला प्रकट करणाराही पवित्र आत्माच होता, परंतु पवित्र आत्म्याने त्याच्यावर हे मोजून-मापून केलेले कार्य होते. योहानाला जे करण्यास सांगण्यात आले होते, ते म्हणजे येशूच्या कार्यासाठी पायाभरणी करणे, त्याच्यासाठी मार्ग तयार करणे. म्हणजेच, पवित्र आत्म्याने केवळ मार्ग तयार करण्याच्या त्याच्या कार्याचे समर्थन केले आणि त्याला केवळ असे कार्य करण्याची अनुमती दिली—त्याला इतर कोणतेही कार्य करण्याची अनुमती नव्हती. योहानाने एलीयाचे प्रतिनिधित्व केले आणि त्याने मार्ग मोकळा करणाऱ्या संदेष्ट्याचे प्रतिनिधित्व केले. पवित्र आत्म्याने या कार्यात त्याचे समर्थन केले; जोपर्यंत त्याचे कार्य मार्ग मोकळे करण्याचे होते, तोपर्यंत पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले. परंतु, जर त्याने स्वतःच देव असल्याचा दावा केला असता आणि तो सुटकेचे कार्य पूर्ण करण्यासाठी आला आहे असे म्हटले असते, तर मात्र पवित्र आत्म्याला त्याला शिस्त लावावी लागली असती. योहानाचे कार्य कितीही महान असले आणि पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले असले तरीही, त्याच्या कार्याला सीमा होत्या. पवित्र आत्म्याने खरोखरच त्याच्या कार्याचे समर्थन केले आहे हे मान्य केले, तरी त्यावेळी त्याला दिलेली शक्ती ही केवळ मार्ग तयार करण्यापुरती मर्यादित होती. तो इतर कोणतेही कार्य बिलकुल करू शकत नव्हता, कारण तो केवळ योहान होता ज्याने मार्ग तयार केला होता, तो येशू नव्हता. म्हणून, पवित्र आत्म्याची साक्ष महत्त्वाची आहेच, परंतु पवित्र आत्म्याने मनुष्याला जे कार्य करण्याची परवानगी दिली आहे ते अधिकच महत्त्वाचे आहे. त्यावेळी योहानाला निर्णायक साक्ष मिळाली नव्हती का? त्याचे कार्यही महान नव्हते का? परंतु त्याने केलेले कार्य येशूच्या कार्याला मागे टाकू शकले नाही, कारण तो पवित्र आत्म्याने वापरलेल्या मनुष्यापेक्षा अधिक कोणीही नव्हता आणि तो थेट देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नव्हता आणि म्हणून त्याने केलेले कार्य मर्यादित होते. त्याने मार्ग तयार करण्याचे कार्य पूर्ण केल्यानंतर, पवित्र आत्म्याने यापुढे त्याच्या साक्षीचे समर्थन केले नाही, कोणतेही नवीन कार्य त्याच्या मागे आले नाही आणि देवाचे स्वतःचेच कार्य सुरू झाल्यावर तो निघून गेला.
असे काही जण असतात ज्यांना दुष्ट आत्म्याने पछाडलेले असते आणि ते मोठमोठ्याने ओरडतात, “मी देव आहे!” तरीही, अखेर त्यांचे खरे स्वरूप उघड होते, कारण ते ज्याचे प्रतिनिधित्व करतात ते चुकीचे असते. ते सैतानाचे प्रतिनिधित्व करतात आणि पवित्र आत्मा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तू स्वतःला कितीही उंच भासवलेस किंवा कितीही जोरजोरात आरडाओरडा केलास, तरीही तू निर्माण केलेला प्राणी आहेस आणि तू सैतानाच्या बाजूचे आहेस. “मी देव आहे, मी देवाचा प्रिय पुत्र आहे!” असे मी कधीच ओरडत नाही पण मी जे कार्य करतो ते देवाचे कार्य आहे. मला ओरडण्याची गरज आहे का? उदात्तीकरणाची काहीही गरज नाही. देव त्याचे स्वतःचे कार्य स्वतः करतो आणि मनुष्याने त्याला दर्जा देण्याची किंवा त्याला सन्माननीय पदवी देण्याची आवश्यकता नसते: त्याचे कार्य हेच त्याची ओळख आणि त्याचा दर्जा दर्शवते. त्याच्या बाप्तिस्म्यापूर्वी, येशू स्वतःच देव नव्हता का? तो देवाचा देहधारी अवतार नव्हता का? साक्ष मिळाल्यानंतरच तो देवाचा एकुलता एक पुत्र झाला, असे नक्कीच म्हणता येणार नाही? त्याने त्याचे कार्य सुरू करण्याच्या खूप आधीपासून, येशूच्याच नावाचा एक मनुष्य तेथे नव्हता का? तू नवीन मार्ग पुढे आणण्यास किंवा आत्म्याचे प्रतिनिधित्व करण्यास असमर्थ आहेस. आत्म्याचे कार्य किंवा तो जी वचने उच्चारतो ती तू व्यक्त करू शकत नाहीस. स्वतः देवाचे कार्य करण्यास तू असमर्थ आहेस आणि आत्म्याचे कार्य तू करू शकत नाहीस. देवाचे शहाणपण, आश्चर्य आणि अथांगता आणि संपूर्ण प्रवृत्ती ज्याद्वारे देव मनुष्याचे ताडण करतो—हे सर्व तुझ्या अभिव्यक्तीच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. म्हणून देव असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न करणे निरुपयोगी ठरेल; तुमच्याकडे केवळ नाव असेल आणि कोणताही मतितार्थ नसेल. स्वतः देव आला आहे, परंतु कोणीही त्याला ओळखत नाही, तरीही तो त्याचे कार्य पुढे सुरू ठेवतो आणि आत्म्याचे प्रतिनिधित्व करतो. तू त्याला मनुष्य किंवा देव, प्रभू किंवा ख्रिस्त म्हण किंवा तिची बहीण म्हण, यामुळे काही फरक पडत नाही. परंतु तो जे कार्य करतो ते आत्म्याचे कार्य असते आणि ते स्वतः देवाच्या कार्याचे प्रतिनिधित्व करते. मनुष्य ज्या नावाने त्याला हाक मारतो त्याची त्याला पर्वा नसते. ते नाव त्याचे कार्य निर्धारित करू शकते का? तू त्याला कोणत्याही नावाने संबोधत असलास, तरी जोपर्यंत देवाचा संबंध आहे, तोपर्यंत तो देवाच्या आत्म्याचा देहधारी देव आहे; तो आत्म्याचे प्रतिनिधित्व करतो आणि आत्म्याने त्याला मान्यता दिली आहे. जर तू एका नवीन युगासाठी मार्ग काढू शकत नसशील किंवा जुन्या युगाचा अंत करू शकत नसशील किंवा नवीन युगाची सुरुवात करू शकत नसशील किंवा नवीन कार्य करू शकत नसशील, तर तुला देव म्हणता येणार नाही!
पवित्र आत्म्याने ज्याचा वापर केला आहे असा मनुष्य देखील स्वतः देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. याचा अर्थ, असा मनुष्य देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही तसेच तो जे कार्य करतो ते देखील प्रत्यक्ष देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, मानवी अनुभव थेट देवाच्या व्यवस्थापनामध्ये ठेवता येऊ शकत नाही आणि ते देवाच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. स्वतः देव जे कार्य करतो ते संपूर्णपणे त्याच्या स्वतःच्या व्यवस्थापन योजनेत करू इच्छितो असे कार्य आहे आणि ते त्या महान व्यवस्थापनाशी संबंधित आहे. मनुष्याने केलेल्या कार्यात त्यांचा वैयक्तिक अनुभव असतो. त्यामध्ये, पूर्वीच्या लोकांनी चोखाळलेल्या मार्गाच्या पलीकडे अनुभवाचा एक नवीन मार्ग शोधणे आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या बंधुभगिनींना मार्गदर्शन करणे समाविष्ट आहे. हे लोक जे देतात ते त्यांचे वैयक्तिक अनुभव किंवा आध्यात्मिक लोकांचे आध्यात्मिक लेखन असते. या लोकांचा पवित्र आत्म्याकडून वापर केला जात असला तरी, ते जे कार्य करतात ते सहा हजार वर्षांच्या योजनेतील व्यवस्थापनाच्या महान कार्याशी संबंधित नाही. ते केवळ असे लोक आहेत ज्यांना पवित्र आत्म्याने वेगवेगळ्या कालखंडात ते करू शकतील अशी कार्ये संपेपर्यंत किंवा त्यांचे जीवन संपेपर्यंत पवित्र आत्म्याच्या प्रवाहात लोकांना नेण्यासाठी वाढवले आहे. ते जे कार्य करतात ते केवळ स्वतः देवासाठी योग्य मार्ग तयार करणे किंवा स्वतः देवाच्या व्यवस्थापनाचा एखादा विशिष्ट पैलू पृथ्वीवर पुढे सुरू ठेवणे हा आहे. हे लोक त्याच्या व्यवस्थापनाचे मोठे कार्य स्वतःहून करण्यास असमर्थ असतात किंवा ते नवीन मार्ग साकारू शकत नाहीत, मग त्यांच्यापैकी कोणीही पूर्वीच्या युगापासूनच्या देवाच्या सर्व कार्याची पूर्तता करणे तर दूरच. म्हणून, ते जे कार्य करतात ते केवळ निर्मिलेल्या प्राणिमात्राने त्याचे कार्य करण्याचे प्रतिनिधित्व करते आणि ते स्वतः देव त्याचे सेवाकार्य करतो त्याचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. याचे कारण असे, की ते जे कार्य करतात ते, स्वतः देवाने केलेल्या कार्यापेक्षा वेगळे आहे. नवीन युगात प्रवेश करण्याचे कार्य हे देवाच्या ऐवजी मनुष्य करू शकत नाही. हे कार्य स्वतः देवाखेरीज इतर कोणीही करू शकत नाही. मनुष्याने केलेले सर्व कार्य हे निर्मिलेला प्राणी म्हणून त्याचे कर्तव्य पार पाडणे असते आणि जेव्हा तो पवित्र आत्म्याने प्रेरित किंवा त्याच्या ज्ञानाने प्रकाशित होतो तेव्हा ते केले जाते. हे लोक जे मार्गदर्शन करतात ते संपूर्णपणे मनुष्याला दैनंदिन जीवनातील आचरणाचा मार्ग दाखवून देतात आणि त्याने देवाच्या इच्छेनुसार कसे वागले पाहिजे हे दर्शवतात. मनुष्याच्या कार्यात देवाच्या व्यवस्थापनाचा समावेश नाही किंवा ते आत्म्याच्या कार्याचे प्रतिनिधित्व देखील करत नाही. उदाहरण म्हणून, विटनेस ली आणि वॉचमन नी यांचे कार्य मार्ग दाखवण्याचे होते. तो मार्ग नवीन असो वा जुना, हे कार्य बायबलच्या अधिपत्याखाली राहण्याच्या तत्त्वावर आधारित होते. स्थानिक चर्च पुन्हा उभारणे असो किंवा स्थानिक चर्च बांधणे असो, त्यांचे कार्य चर्च स्थापन करण्याशी संबंधित होते. येशू आणि त्याच्या प्रेषितांनी जे कार्य अपूर्ण सोडले होते किंवा कृपेच्या युगात जे पुढे विकसित झाले नव्हते, ते कार्य त्यांनी केले. त्यांनी जे कार्य केले ते म्हणजे येशूने त्याच्या कार्यकाळात जे काही कार्य केले होते, त्याच्यामागोमाग येणाऱ्या पिढ्यांना जे करायला सांगितले होते ते पुन्हा उभारणे, जसे की, त्यांचे डोके झाकून ठेवणे, बाप्तिस्मा घेणे, भाकरी तोडणे किंवा वाइन पिणे. असे म्हणता येईल, की त्यांचे कार्य बायबलचे पालन करणे आणि बायबलनुसार मार्ग शोधणे हे होते. त्यांनी कोणत्याही प्रकारे नवीन प्रगती केली नाही. म्हणूनच, त्यांच्या कार्यात केवळ बायबलमधील नवीन मार्गांचा शोध तसेच अधिक चांगल्या आणि अधिक वास्तववादी पद्धतींचा शोध कोणी पाहू शकेल. परंतु त्यांच्या कार्यात देवाची सध्याची इच्छा सापडत नाही, मग देवाने शेवटच्या दिवसांत जे नवीन कार्य करण्याची योजना आखली आहे ते तर दूरच. याचे कारण असे, की ते ज्या मार्गावर चालले होते तो मार्ग अद्याप जुनाच होता—तेथे कोणतेही नूतनीकरण किंवा प्रगती नव्हती. येशूला वधस्तंभावर खिळणे, लोकांना पश्चात्ताप करण्यास आणि त्यांच्या पापांची कबुली देण्यास सांगण्याची प्रथा पाळणे आणि जो शेवटपर्यंत टिकून राहतो त्याला वाचवले जाईल आणि पुरुष हा स्त्रीचा प्रमुख आहे, स्त्रीने तिच्या पतीची आज्ञा पाळली पाहिजे, एवढेच नव्हे तर बहिणी उपदेश करू शकत नाहीत, परंतु केवळ आज्ञा पाळतात या पारंपरिक धारणेसह सर्व उक्तींचे पालन करणे हेच ते सतत सांगत राहिले. जर अशीच नेतृत्वाची पद्धत पाळली गेली असती, तर पवित्र आत्मा कधीही नवीन कार्य करू शकला नसता, लोकांना नियमांपासून मुक्त करू शकला नसता किंवा त्यांना स्वातंत्र्य आणि सौंदर्याच्या क्षेत्रात नेऊ शकला नसता. म्हणून, कार्याच्या या टप्प्यावर, जेथे युग बदलते, त्यासाठी स्वतः देवाने कार्य करणे आणि बोलणे आवश्यक आहे; त्याच्या जागी कोणीही मनुष्य असे करू शकत नाही. आतापर्यंत, या प्रवाहाच्या बाहेरील पवित्र आत्म्याचे सर्व कार्य ठप्प झाले आहे आणि ज्यांचा पवित्र आत्म्याने वापर केला होता त्यांनी त्यांचा रुबाब गमावला आहे. म्हणून, पवित्र आत्म्याद्वारे वापरल्या जाणार्या लोकांचे कार्य हे स्वतः देवाने केलेल्या कार्यापेक्षा वेगळे असल्याने, त्यांची ओळख आणि ते ज्यांच्या वतीने कार्य करतात त्या व्यक्ती देखील वेगळ्या आहेत. याचे कारण असे, की पवित्र आत्म्याला जे कार्य करायचे आहे ते वेगळे आहे आणि या कारणास्तव जे समान कार्य करतात त्यांना वेगळी ओळख आणि दर्जा दिला जातो. पवित्र आत्म्याने वापरलेले लोक काही नवीन कार्य देखील करू शकतात आणि पूर्वीच्या युगात केलेले काही कार्य काढून टाकू शकतात, परंतु ते जे करतात ते नवीन युगातील देवाची प्रवृत्ती आणि इच्छा व्यक्त करू शकत नाहीत. ते केवळ पूर्वीचे कार्य काढून टाकण्यासाठी कार्य करतात आणि स्वतः देवाच्या प्रवृत्तीचे थेट प्रतिनिधित्व करण्याच्या हेतूने नवीन कार्य करत नाही. अशा प्रकारे, त्यांनी कितीही कालबाह्य प्रथा रद्द केल्या किंवा किती नवीन प्रथा सुरू केल्या, तरीही ते मनुष्याचे आणि निर्मिलेल्या प्राणिमात्रांचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा स्वतः देव कार्य करतो, मात्र, तो उघडपणे जुन्या काळातील प्रथा रद्द करण्याची घोषणा करत नाही किंवा नवीन युगाच्या प्रारंभाची थेट घोषणा करत नाही. तो त्याच्या कार्यात थेट आणि सरळ आहे. तो जे कार्य करू इच्छितो ते तो स्पष्टपणे करतो; म्हणजेच, त्याने जे कार्य घडवून आणले आहे ते तो थेट व्यक्त करतो, मूळ हेतूप्रमाणे प्रत्यक्षपणे त्याचे कार्य करतो, त्याचे अस्तित्व आणि प्रवृत्ती व्यक्त करतो. मनुष्य पाहतो त्याप्रमाणे, त्याची प्रवृत्ती आणि त्याचप्रमाणे त्याचे कार्य हे भूतकाळातील लोकांपेक्षा वेगळे आहे. मात्र, स्वतः देवाच्या दृष्टिकोनातून, हे केवळ त्याचे कार्य पुढे नेणे आणि त्याचा विकास आहे. जेव्हा स्वतः देव कार्य करतो, तेव्हा तो त्याची वचने व्यक्त करतो आणि थेट नवीन कार्य करतो. याउलट, जेव्हा मनुष्य कार्य करतो, तेव्हा ते विचारविनिमय आणि अभ्यासाद्वारे होते किंवा ते ज्ञानाचा विस्तार आणि इतरांच्या कार्यावर आधारित आचरणानुसार असते. म्हणजेच, मनुष्याने केलेल्या कार्याचे मूलतत्त्व हे प्रस्थापित आदेशाचे पालन करणे आणि “जुन्या मार्गांवर नवीन पादत्राणे घालून चालणे” आहे. याचा अर्थ असा, की पवित्र आत्म्याने वापरलेले लोक ज्या मार्गावर चालले तो मार्ग देखील स्वतः देवाने सुरू केलेल्या मार्गावर बांधला जातो. म्हणून, सारासार विचार करता, मनुष्य हा केवळ मनुष्य आहे आणि देव हा देवच आहे.
योहानाचा जन्म अभिवचनाने झाला होता, जसा अब्राहामाला इसहाक झाला होता. त्याने येशूसाठी मार्ग तयार केला आणि बरेच कार्य केले, परंतु तो देव नव्हता. उलट, तो संदेष्ट्यांपैकी एक होता, कारण त्याने केवळ येशूसाठी मार्ग तयार केला. त्याचे कार्यदेखील महान होते आणि त्याने मार्ग तयार केल्यावरच येशूने अधिकृतपणे त्याचे कार्य सुरू केले. थोडक्यात, त्याने केवळ येशूसाठी परिश्रम केले आणि त्याने केलेले कार्य येशूच्या कार्याच्या सेवेसाठी होते. त्याने मार्ग तयार केल्यानंतर, येशूने त्याचे कार्य सुरू केले, हे कार्य नवीन, अधिक ठोस आणि अधिक तपशीलवार होते. योहानाने कार्याचा केवळ सुरुवातीचा भाग पूर्ण केला; नवीन कार्याचा मोठा भाग येशूने पार पाडला. योहानाने देखील नवीन कार्य केले, परंतु तो नवीन युगाची सुरुवात करणारा नव्हता. योहानाचा जन्म अभिवचनाने झाला होता आणि त्याचे नाव देवदूताने ठेवले होते. त्यावेळी, काही जणांना त्याचे नाव त्याचे वडील जखऱ्या यांच्या नावावरून ठेवायचे होते, परंतु त्याची आई म्हणाली, “या मुलाला त्या नावाने संबोधले जाऊ शकत नाही. त्याला योहान म्हटले पाहिजे.” हे सर्व पवित्र आत्म्याच्या आदेशानुसार होते. येशूचे नावदेखील पवित्र आत्म्याच्या आज्ञेनुसार ठेवण्यात आले होते, त्याचा जन्म पवित्र आत्म्याद्वारेच झाला होता आणि त्याला पवित्र आत्म्याने वचन दिले होते. येशू हा देव होता, ख्रिस्त होता आणि मनुष्याचा पुत्र होता. पण, योहानाचे कार्यही महान होते, मग त्याला देव का म्हटले गेले नाही? येशूने केलेले कार्य आणि योहानाने केलेले कार्य यात नेमका काय फरक होता? योहानाने येशूसाठी मार्ग तयार केला, हे एकमेव कारण होते का? की हे देवाने पूर्वनियोजित केले होते म्हणून? जरी योहानाने असेही म्हटले की, “पश्चात्ताप करा: कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” आणि त्याने देखील स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली, तरी त्याचे कार्य अधिक विकसित झाले नाही आणि ती केवळ सुरुवात होती. याउलट, येशूने नवीन युगाची सुरुवात केली तसेच जुन्या युगाचा अंत केला, परंतु त्याने जुन्या कराराचे नियमशास्त्र देखील पूर्ण केले. त्याने केलेले कार्य योहानाच्या कार्यापेक्षा मोठे होते, एवढेच नव्हे तर तो सर्व मानवजातीची सुटका करण्यासाठी आला होता—त्याने कार्याचा तो टप्पा पूर्ण केला. योहानाबद्दल बोलायचे तर, त्याने केवळ मार्ग तयार केला. जरी त्याचे कार्य महान होते, त्याने पुष्कळ वचने उच्चारली आणि त्याचे अनुसरण करणारे शिष्य असंख्य असले तरी, त्याच्या कार्याने मनुष्याला एक नवीन सुरुवात करून देण्याहून अधिक काही केले नाही. मनुष्याला त्याच्याकडून कधीच जीवन, मार्ग किंवा सखोल सत्ये प्राप्त झाली नाहीत किंवा त्याच्याद्वारे मनुष्याला देवाच्या इच्छेची समज देखील प्राप्त झाली नाही. योहान हा एक महान संदेष्टा (एलीया) होता ज्याने येशूच्या कार्यासाठी नवीन मैदान खुले केले आणि निवडलेल्यांना तयार केले; तो कृपेच्या युगाचा अग्रगामी होता. अशा बाबी केवळ त्यांच्या सामान्य मानवी स्वरूपाचे निरीक्षण करून ओळखल्या जाऊ शकत नाहीत. हे सर्व अधिक योग्य आहे, कारण योहानाने देखील लक्षणीय कार्य केले, याशिवाय, त्याला पवित्र आत्म्याने वचन दिले होते आणि त्याच्या कार्याला पवित्र आत्म्याने समर्थन दिले होते. हे असे असल्याने, केवळ त्यांच्या कार्यातूनच त्यांच्या ओळखींमध्ये फरक करता येऊ शकतो, कारण मनुष्याच्या बाह्य रूपावरून त्याचे मूलतत्त्व सांगण्याचा कोणताही मार्ग नाही किंवा पवित्र आत्म्याची साक्ष काय आहे हे निश्चित करण्याचा कोणताही मार्ग मनुष्याकडे नाही. योहानाने केलेले कार्य आणि येशूने केलेले कार्य वेगळे होते आणि वेगळ्या स्वरूपाचे होते. यावरूनच योहान देव होता की नाही हे ठरवता येऊ शकते. सुरुवात करणे, पुढे सुरू ठेवणे, पूर्ण करणे आणि फलदायी करणे हे येशूचे कार्य होते. त्याने यापैकी प्रत्येक पायरी पार पाडली, तर योहानाचे कार्य सुरुवात करून देण्यापेक्षा अधिक नव्हते. सुरुवातीला, येशूने सुवार्तेचा प्रसार केला आणि पश्चात्तापाचा मार्ग सांगितला आणि नंतर मनुष्याचा बाप्तिस्मा करण्यासाठी, आजारी लोकांना बरे करण्यासाठी आणि भुते काढण्यासाठी तो पुढे गेला. अखेरीस, त्याने मानवजातीची पापातून सुटका केली आणि संपूर्ण युगासाठीचे त्याचे कार्य पूर्ण केले. तो सर्वत्र फिरला आणि मनुष्याला उपदेश केला आणि स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता पसरवली. या बाबतीत, तो आणि योहान सारखेच होते, फरक एवढाच की येशूने एका नवीन युगाची सुरुवात केली आणि मनुष्यासाठी कृपेचे युग आणले. कृपेच्या युगात मनुष्याने कसे आचरण करावे आणि कोणत्या मार्गाचे अनुसरण करावे याविषयीची वचने त्याच्या मुखातून बाहेर पडली आणि अखेर, त्याने सुटकेचे कार्य पूर्ण केले. योहान हे कार्य कधीच पार पाडू शकला नसता. आणि म्हणून येशूनेच स्वतः देवाचे कार्य केले आणि तोच स्वतः देव आहे आणि तोच थेट देवाचे प्रतिनिधित्व करतो. मनुष्याच्या धारणा सांगतात की जे लोक वचनाने जन्मले आहेत, आत्म्याने जन्मलेले आहेत, पवित्र आत्म्याने समर्थन केलेले आहेत आणि जे नवीन मार्ग खुला करतात ते देव आहेत. या तर्कानुसार, योहान देखील देव असेल आणि मोशे, अब्राहाम आणि दावीद…, ते सर्व देखील देव असतील. हा निव्वळ विनोद नाही का?
त्याचे सेवाकार्य करण्याआधी, येशू देखील केवळ एक सामान्य मनुष्य होता, पवित्र आत्म्याने जे काही केले त्याप्रमाणे तो वागला. त्या वेळी त्याला त्याच्या स्वतःच्या ओळखीची जाणीव असो वा नसो, त्याने देवाकडून आलेल्या सर्व आज्ञांचे पालन केले. पवित्र आत्म्याचे सेवाकार्य सुरू होण्यापूर्वी त्याने त्याची ओळख कधीही प्रकट केली नाही. त्याने त्याचे सेवाकार्य सुरू केल्यानंतरच ते नियम आणि ती नियमशास्त्रे रद्द केली आणि त्याने अधिकृतपणे त्याचे सेवाकार्य सुरू केल्यानंतरच त्याच्या वचनांमध्ये अधिकार आणि सामर्थ्य भरले गेले. त्याने त्याचे सेवाकार्य सुरू केल्यानंतरच त्याचे नवीन युग सुरू करण्याचे कार्य सुरू झाले. त्याआधी, पवित्र आत्मा २९ वर्षे त्याच्यामध्ये लपलेला होता, त्या काळात तो केवळ एका मनुष्याचे प्रतिनिधित्व करत होता आणि देव म्हणून त्याची ओळख नव्हती. त्याने त्याचे कार्य आणि सेवाकार्य सुरू केल्यापासून देवाचे कार्य सुरू झाले, मनुष्याला त्याच्याबद्दल किती माहिती आहे हे लक्षात न घेता त्याने त्याचे कार्य त्याच्या अंतर्गत योजनेनुसार केले आणि त्याने केलेले कार्य हे स्वतः देवाचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व होते. त्यावेळी, येशूने त्याच्या सभोवतालच्या लोकांना विचारले, “पण तुम्ही मला कोण आहे म्हणून म्हणता?” त्यांनी उत्तर दिले, “तू संदेष्ट्यांमधील सर्वश्रेष्ठ आहेस आणि आमचा उत्कृष्ट वैद्य आहेस.” आणखी काहींनी उत्तर दिले, “तू आमचा प्रमुख धर्मोपदेशक आहेस” वगैरे. सर्व प्रकारची उत्तरे दिली गेली, काहींनी तो योहान होता, तो एलीया होता, असेही म्हटले. येशूने मग शिमोन पेत्राकडे वळून विचारले, “पण तू मला कोण म्हणून म्हणतोस?” पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.” तेव्हापासून, लोकांना तो देव असल्याची जाणीव झाली. जेव्हा त्याची ओळख सांगितली गेली, तेव्हा प्रथम पेत्राला याची जाणीव झाली आणि त्याच्या मुखातून ते बोलले गेले. तेव्हा येशू म्हणाला, “तू जे काय म्हणालास ते मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या पित्याने हे प्रकट केले आहे.” त्याच्या बाप्तिस्म्यानंतर, इतरांना हे माहीत असो वा नसो, त्याने केलेले कार्य हे देवाच्या वतीने केलेले होते. तो त्याचे कार्य पार पाडण्यासाठी आला होता, त्याची ओळख प्रकट करण्यासाठी नाही. पेत्राने याबद्दल बोलल्यानंतरच त्याची ओळख उघड झाली. तो स्वतः देव आहे याची जाणीव तुला असली किंवा नसली, तरी जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने त्याचे कार्य सुरू केले. आणि तुला हे माहीत असले किंवा नसले, तरी तो पूर्वीप्रमाणेच त्याचे कार्य करत राहिला. जरी तू ते नाकारलेस, तरीही तो त्याचे कार्य करणारच होता आणि जेव्हा ते करण्याची वेळ आली होती तेव्हा ते तो पूर्ण पार पाडणारच होता. तो त्याचे कार्य करण्यासाठी आणि त्याचे सेवाकार्य पार पाडण्यासाठी आला, मनुष्याने त्याला देहात ओळखावे म्हणून नव्हे, तर मनुष्याने त्याचे कार्य स्वीकारावे म्हणून तो आला. या दिवसाच्या कार्याचा टप्पा हे स्वतः देवाचे कार्य आहे हे ओळखण्यात जर तू अयशस्वी ठरला असशील, तर त्याचे कारण म्हणजे तुझ्याकडे दृष्टीचा अभाव आहे. तरीही, तू कार्याचा हा टप्पा नाकारू शकत नाहीस; हे ओळखण्यात तुला अपयश आले यामुळे हे सिद्ध होत नाही की पवित्र आत्मा कार्य करत नाही किंवा त्याचे कार्य चुकीचे आहे. असे काही लोक आहेत जे बायबलमधील येशूच्या कार्याच्या तुलनेत वर्तमानातील कार्य तपासतात आणि त्यातील कोणतीही विसंगती पुढे करून कार्याचा हा टप्पा नाकारतात. ही अंधपणे केलेली कृती नाही का? बायबलमध्ये नोंदवलेल्या गोष्टी मर्यादित आहेत; ते देवाच्या कार्याचे संपूर्णपणे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. चार सुवार्तांमध्ये मिळून एकूण शंभरहून कमी अध्याय आहेत, ज्यामध्ये येशूने अंजीराच्या झाडाला शाप देणे, पेत्राने प्रभूला दिलेले तीन नकार, वधस्तंभावर खिळल्यानंतर आणि पुनरुत्थानानंतर येशूने शिष्यांना दर्शन देणे, उपवासाबद्दल शिकवण, प्रार्थनेबद्दल शिकवण, घटस्फोटाबद्दल शिकवण, येशूचा जन्म आणि वंशावळ, येशूकडून शिष्यांची नियुक्ती आणि यांसारख्या मर्यादित घटनांची नोंद आहे. परंतु, मनुष्य त्यांना खजिना मानतो आणि आजच्या कार्याची त्यांच्याशी तुलना देखील करतो. त्यांचा असा सुद्धा विश्वास आहे की येशूने त्याच्या जीवनात केलेले सर्व कार्य केवळ इतकेच होते, जणू काही देव इतकेच करण्यास सक्षम आहे आणि पुढे काहीही करण्यास सक्षम नाही. हे मूर्खपणाचे नाही का?
येशूचा पृथ्वीवरचा काळ साडे तेहत्तीस वर्षांचा होता, म्हणजेच तो पृथ्वीवर साडे तेहत्तीस वर्षे राहिला. या काळातील केवळ साडेतीन वर्षे सेवाकार्य पार पाडण्यात गेली; उर्वरित काळ तो केवळ एक सामान्य मानवी जीवन जगला. सुरुवातीला, तो सभास्थानातील सेवांना उपस्थित राहिला आणि तेथे त्याने धर्मोपदेशकांचे धर्मग्रंथांचे सादरीकरण आणि इतरांचे उपदेश ऐकले. त्याने बायबलचे बरेच ज्ञान प्राप्त केले: तो अशा ज्ञानासह जन्माला आला नव्हता आणि केवळ वाचन आणि श्रवण करून त्याने ते प्राप्त केले. बायबलमध्ये हे स्पष्टपणे नोंदवले गेले आहे, की त्याने वयाच्या बाराव्या वर्षी सभास्थानातील शिक्षकांना प्रश्न विचारले: प्राचीन संदेष्ट्यांच्या भविष्यवाण्या काय होत्या? मोशेच्या नियमशास्त्रांचे काय? जुन्या कराराचे काय? आणि मंदिरात धर्मोपदेशकांच्या पोशाखात देवाची सेवा करणाऱ्या मनुष्याचे काय? … त्याने अनेक प्रश्न विचारले, कारण त्याच्याकडे ज्ञान किंवा समज देखील नव्हती. तो पवित्र आत्म्यापासून जन्माला आला असला तरी, तो पूर्णपणे सामान्य मनुष्य म्हणून जन्माला आला होता; त्याच्यात काही खास वैशिष्ट्ये असली, तरीही तो एक सामान्य मनुष्य होता. त्याचे शहाणपण त्याच्या पातळीनुसार आणि त्याच्या वयाच्या अनुषंगाने निरंतर वाढत गेले आणि तो सामान्य मनुष्याच्या जीवनातील टप्प्यांतून गेला. लोकांना असे वाटते, की येशूने बालपण किंवा किशोरावस्था अनुभवलीच नाही; तो जन्मल्याबरोबरच तीस वर्षांच्या मनुष्याचे जीवन जगू लागला आणि त्याचे कार्य पूर्ण झाल्यावर त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. सामान्य मनुष्याच्या आयुष्यातील टप्प्यांमधून तो कदाचित गेला नसावा; त्याने इतर लोकांसोबत सेवन केले नाही किंवा त्यांच्याशी संबंध देखील ठेवले नाहीत आणि त्याची ओझरते दर्शन घेणे लोकांसाठी सोपे नव्हते. तो कदाचित एक विक्षिप्त होता की, जो त्याला पाहणाऱ्यांना घाबरवू शकत होता, कारण तो देव होता. लोकांचा असा विश्वास आहे, की देह धारण करणारा देव निश्चितच सामान्य मनुष्याप्रमाणे जगत नाही; त्यांचा असा विश्वास आहे की तो दात न घासता किंवा चेहरा न धुता शुद्ध आहे, कारण तो एक पवित्र व्यक्ती आहे. या मनुष्याच्या निव्वळ धारणा नाहीत का? बायबलमध्ये येशूच्या मनुष्य म्हणून असलेल्या जीवनाची नोंद नाही, तर केवळ त्याच्या कार्याची नोंद आहे, परंतु यावरून हे सिद्ध होत नाही, की त्याच्या ठायी सामान्य मानवता नव्हती किंवा तो वयाच्या तीस वर्षांपूर्वी सामान्य मनुष्यासारखे जीवन जगला नाही. त्याने अधिकृतपणे वयाच्या २९ व्या वर्षी त्यांचे कार्य सुरू केले, परंतु त्या वयाआधीचे त्याचे आयुष्य हे केवळ मनुष्याचे आयुष्य होते हे तू खोडून काढू शकत नाहीस. बायबलने तो काळ केवळ त्याच्या नोंदींमधून वगळला आहे; कारण ते एक सामान्य मनुष्य म्हणून त्याचे जीवन होते आणि तो त्याच्या दैवी कार्याचा कालावधी नसल्यामुळे ते लिहून काढण्याची गरज नव्हती. येशूच्या बाप्तिस्म्यापूर्वी, पवित्र आत्म्याने प्रत्यक्षपणे कार्य केले नाही, परंतु येशूने त्याचे सेवाकार्य करण्याच्या दिवसापर्यंत एक सामान्य मनुष्य म्हणून त्याला कायम राखले. तो देहधारी देव असला, तरीही तो सामान्य मनुष्याप्रमाणेच परिपक्व होण्याच्या प्रक्रियेतून पार पडला. परिपक्व होण्याची ही प्रक्रिया बायबलमधून वगळण्यात आली. ते वगळण्यात आले, कारण त्यामुळे मनुष्याच्या जीवनात वाढीसाठी कोणतीही मोठी मदत होणार नव्हती. त्याच्या बाप्तिस्म्यापूर्वीचा काळ हा एक छुपा कालावधी होता, ज्यामध्ये त्याने कोणतेही संकेत दाखवले नाहीत आणि चमत्कार केले नाहीत. येशूने त्याच्या बाप्तिस्म्यानंतरच मानवजातीच्या सुटकेचे सर्व कार्य सुरू केले, जे विपुल आहे आणि कृपा, सत्य आणि प्रेम आणि दया यांनी परिपूर्ण आहे. या कार्याची सुरुवात हीच कृपेच्या युगाची तंतोतंत सुरुवात होती; या कारणास्तव, ते लिहिले गेले आणि आजपर्यंत पुढे आले. कृपेच्या युगात असलेल्यांना कृपेच्या युगाच्या मार्गावर आणि क्रूसाच्या मार्गावर जाण्यासाठी एक मार्ग खुला करणे आणि सर्व काही साध्य करण्यासाठी हे होते. मनुष्याने लिहून ठेवलेल्या नोंदीतून हे बाहेर आले असले, तरी काही ठिकाणी लहान-सहान चुका आढळतात त्या वगळता हे सर्व तथ्य आहे. असे असले, तरी या नोंदी खोट्या आहेत असे म्हणता येणार नाही. नोंदवलेल्या बाबी पूर्णपणे वास्तव सत्य आहेत, केवळ त्या लिहिण्यात लोकांनी चुका केल्या आहेत. असे काही आहेत जे म्हणतील की, जर येशूच्या ठायी सामान्य मानवता होती, तर तो संकेत आणि चमत्कार करण्यास सक्षम कसा काय होता? येशूला ज्या चाळीस दिवसांच्या मोहाला सामोरे जावे लागले तो एक अद्भूत संकेत होता, जे साध्य करण्यास एखादा सामान्य मनुष्य असमर्थ ठरला असता. त्याचा चाळीस दिवसांचा मोह म्हणजे पवित्र आत्म्याच्या कार्याचे स्वरूप होते; मग त्याच्यामध्ये अलौकिकता नव्हती असे कसे म्हणता येईल? संकेत आणि चमत्कार करण्याची त्याची क्षमता हे सिद्ध करत नाही, की तो एक श्रेष्ठ मनुष्य होता आणि सामान्य मनुष्य नव्हता; हे केवळ असे आहे की पवित्र आत्म्याने त्याच्यासारख्या सामान्य मनुष्यामध्ये कार्य केले, अशा प्रकारे त्याला चमत्कार करणे आणि आणखी मोठे कार्य करणे शक्य झाले. येशूने त्याचे सेवाकार्य पार पाडण्याआधी किंवा बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये उतरण्याआधी, येशू एक सामान्य मनुष्य होता आणि कोणत्याही प्रकारे अलौकिक नव्हता. जेव्हा पवित्र आत्मा त्याच्यामध्ये उतरला, म्हणजेच जेव्हा त्याने त्याच्या सेवाकार्याची सुरुवात केली, तेव्हा तो अलौकिकतेने ओतप्रोत भरला. अशा प्रकारे, मनुष्य असा विश्वास ठेवतो, की देहधारी देवामध्ये सामान्य मानवता नसते; शिवाय, तो चुकीने असा विचार करतो, की देहधारी देवाच्या ठायी केवळ दैवत्व असते, मानवता नसते. निश्चितच, जेव्हा देव त्याचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर येतो, तेव्हा मनुष्य केवळ अलौकिक घटना पाहतो. ते त्यांच्या डोळ्यांनी जे पाहतात आणि कानांनी जे ऐकतात ते सर्व अलौकिक असते, कारण त्याचे कार्य आणि त्याची वचने त्यांच्यासाठी अनाकलनीय आणि अप्राप्य असतात. जर स्वर्गातील काही पृथ्वीवर आणले तर ते अलौकिक असण्याखेरीज दुसरे काही कसे असू शकते? जेव्हा स्वर्गाच्या राज्याची रहस्ये पृथ्वीवर आणली जातात, अशी रहस्ये जी मनुष्याला अगम्य आणि अथांग अशी आहेत, जी खूप आश्चर्यकारक आणि सुज्ञतेची आहेत—ती सर्व अलौकिक नाहीत का? मात्र, तू हे जाणून घेतले पाहिजेस, की ते कितीही अलौकिक असले तरीही, सर्वकाही त्याच्या सामान्य मानवतेमध्ये पार पाडले जाते. देहधारी देव मानवतेने ओतप्रोत भरलेला आहे; जर तसे नसते, तर तो देहधारी देव नसता. येशूने त्याच्या काळात खूप मोठे चमत्कार केले. तत्कालीन इस्रायली लोकांनी जे पाहिले ते अलौकिक गोष्टींनी भरलेले होते; त्यांनी देवदूत आणि दूत पाहिले आणि त्यांनी यहोवाचा आवाज ऐकला. हे सर्व अलौकिक नव्हते का? नक्कीच, आज काही दुष्ट आत्मे आहेत जे अलौकिक गोष्टींनी मनुष्याला फसवतात; जे सध्या पवित्र आत्म्याद्वारे केले जात नाही अशा कार्याद्वारे मनुष्याला फसवण्यासाठी ते त्यांच्याकडून केले जाणारे केवळ अनुकरण आहे, अन्य काहीही नाही. पुष्कळ लोक चमत्कार करून आजारी लोकांना बरे करतात आणि भुतांना पळवून लावतात; हे दुष्ट आत्म्यांच्या कार्याखेरीज दुसरे काहीही नाही, कारण पवित्र आत्मा सध्याच्या काळात असे कार्य करत नाही आणि ज्यांनी पवित्र आत्म्याच्या कार्याचे त्या काळापासून अनुकरण केले ते सर्व खरोखरच दुष्ट आत्मे आहेत. त्या वेळी इस्रायलमध्ये पार पडलेले सर्व कार्य हे अलौकिक स्वरूपाचे कार्य होते, मात्र पवित्र आत्मा आता अशा पद्धतीने कार्य करत नाही आणि आताच्या काळातील असे कोणतेही कार्य हे सैतानाचे अनुकरण आणि त्याने लपूनछपून केलेले कार्य आणि त्याचा गोंधळ आहे. परंतु तू असे म्हणू शकत नाहीस, की जे काही अलौकिक आहे ते दुष्ट आत्म्यांकडून येते—हे देवाच्या कार्याच्या युगावर अवलंबून असेल. सध्याच्या काळात देहधारी देवाने केलेल्या कार्याचा विचार करा: त्यातील कोणता पैलू अलौकिक नाही? त्याची वचने तुझ्यासाठी अगम्य आणि अप्राप्य आहेत आणि तो जे कार्य करतो ते कोणीही मनुष्य करू शकत नाही. त्याला जे समजते ते समजण्याचा मनुष्याकडे कोणताही मार्ग नाही आणि त्याचे ज्ञान कोठून येते हे मनुष्याला माहीत नाही. असे काही लोक आहेत जे म्हणतात, “मी देखील तुझ्यासारखाच सामान्य आहे, पण तुला जे माहीत आहे ते मला कसे माहीत नाही? मी अनुभवाने मोठा आणि श्रीमंत आहे, तरीही जे मला माहीत नाही ते तुला कसे माहीत असते?” मनुष्याला हे सर्व प्राप्त करण्याचा कोणताही मार्ग नाही. शिवाय, असेही लोक आहेत जे म्हणतात, “इस्रायलमध्ये जे कार्य पार पडले त्याबद्दल कोणालाही माहिती नाही आणि बायबलचे व्याख्याते देखील याबद्दल काही स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत; मग तुला कसे कळले?” या सर्व अलौकिक बाबी नाहीत का? त्याला चमत्कारांचा कोणताही अनुभव नाही, तरीही तो सर्व जाणतो; तो अगदी सहजतेने सत्य बोलतो आणि व्यक्त करतो. हे अलौकिक नाही का? त्याचे कार्य देह जे प्राप्त करू शकतो त्याच्याही पलीकडे आहे. मांसाचा देह असलेल्या कोणत्याही मनुष्याच्या विचारास ते अप्राप्य आहे आणि मनुष्याच्या मनाच्या तर्काला पूर्णपणे अनाकलनीय आहे. त्याने बायबल कधीच वाचले नसले, तरी त्याला इस्रायलमधील देवाचे कार्य समजते. आणि तो बोलत असताना पृथ्वीवर उभा असला, तरी तो तिसऱ्या स्वर्गातील रहस्यांबद्दल बोलतो. जेव्हा मनुष्य ही वचने वाचतो, तेव्हा ही भावना त्याच्या मनात ओथंबून येईल: “ही तिसऱ्या स्वर्गाची भाषा नाही का?” या सर्व बाबी सामान्य मनुष्याच्या क्षमतेच्याही पलिकडे जात नाहीत का? त्यावेळी, जेव्हा येशूने चाळीस दिवस उपवास केला, तेव्हा ते अलौकिक नव्हते का? चाळीस दिवसांचा उपवास हा सर्व बाबतीत अलौकिक, दुष्ट आत्म्यांचे कृत्य आहे, असे जर तू म्हणत असशील, तर तू येशूची निंदा केली नाहीस का? त्याचे सेवाकार्य पार पाडण्याआधी, येशू सामान्य मनुष्यासारखा होता. तोही शाळेत गेला; त्याशिवाय तो लिहिणे आणि वाचणे कसे शिकले असता? जेव्हा देवाने देह धारण केला, तेव्हा आत्मा देहात लपला. तरीसुद्धा, एक सामान्य मनुष्य असल्याने, त्याला वाढीच्या आणि परिपक्व होण्याच्या प्रक्रियेतून जाणे आवश्यक होते आणि त्याची बोधात्मक क्षमता परिपक्व होईपर्यंत आणि तो गोष्टी ओळखण्यास समर्थ होईपर्यंत त्याला सामान्य मनुष्य मानले जाऊ शकत होते. त्याची मानवता परिपक्व झाल्यानंतरच तो त्याचे सेवाकार्य करू शकला. त्याची सामान्य मानवता अपरिपक्व असताना आणि त्याचा तर्क बिनबुडाचा असताना तो त्याचे सेवाकार्य कसे करू शकला असता? वयाच्या सहा किंवा सातव्या वर्षी त्याच्याकडून सेवाकार्य करण्याची अपेक्षा निश्चितच केली जाऊ शकत नाही! देवाने जेव्हा प्रथम देह धारण केला, तेव्हाच त्याने स्वतःला उघडपणे प्रकट का केले नाही? त्याचे कारण असे, की त्याच्या देहधारणेतील मानवता अजूनही अपरिपक्व होती; त्याच्या देहाची बोधात्मक प्रक्रिया, तसेच या देहाची सामान्य मानवता ही पूर्णपणे त्याच्या ताब्यात नव्हती. या कारणास्तव, त्याच्याकडे सामान्य मानवता आणि सामान्य मनुष्याची सामान्य जाणीव असणे अत्यंत आवश्यक होते—त्याने त्याचे कार्य सुरू करण्याआधी—देहधारणेमध्ये त्याचे कार्य सुरू करण्यासाठी तो पुरेसा सज्ज असणे आवश्यक होते. जर तो कार्याच्या तोडीचा नसता, तर त्याला प्रगती करत राहणे आणि परिपक्व होत राहणे आवश्यक झाले असते. येशूने वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षी त्याचे कार्य सुरू केले असते, तर मनुष्याने त्याला एक अद्भूत व्यक्ती मानले नसते का? सर्व लोकांना तो लहान मुलगा वाटला नसता का? त्याचे म्हणणे कोणाला पटले असते का? एक सात-आठ वर्षांचा मुलगा, जो त्याच्यापेक्षा उंच व्यासपीठामागे उभा होता—तो धर्मप्रचार करण्यास योग्य ठरला असता का? त्याची सामान्य मानवता परिपक्व होण्याआधी, तो कार्य करण्यास तयार नव्हता. आतापर्यंत अपरिपक्व असलेल्या त्याच्या मानवतेचा संबंध होता, कार्याचा एक मोठा भाग केवळ अप्राप्य होता. देहधारी देवाच्या आत्म्याचे कार्य देखील त्याच्या स्वतःच्या तत्त्वांद्वारे नियंत्रित केले जात असते. जेव्हा तो सामान्य मानवतेने सुसज्ज असेल तेव्हाच तो कार्य करू शकतो आणि पित्याची जबाबदारी स्वीकारू शकतो. त्यावेळीच तो त्याचे कार्य सुरू करू शकेल. येशूच्या बालपणी, प्राचीन काळात जे काही घडले होते त्याबद्दल येशूला काहीही समजू शकले नाही आणि केवळ सभास्थानातील शिक्षकांना विचारूनच त्याला हे समजले. जर त्याने बोलायला शिकल्याबरोबरच त्याचे कार्य सुरू केले असते, तर त्याच्याकडून चुका न होणे कसे शक्य झाले असते? देव कसे चुकीचे पाऊल उचलू शकतो? म्हणून, तो कार्य करण्यास समर्थ झाल्यानंतरच त्याने त्याचे कार्य सुरू केले; ते पूर्ण करण्यास समर्थ होईपर्यंत त्यांनी कोणतेही कार्य केले नाही. वयाच्या २९ व्या वर्षी, येशू खूप परिपक्व झाला होता आणि त्याला जे कार्य करायचे होते ते करण्यासाठी त्याची मानवता पुरेशी होती. तेव्हाच देवाचा आत्मा अधिकृतपणे त्याच्यामध्ये कार्य करू लागला. त्यावेळी, योहानाने त्याच्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी सात वर्षे तयारी केली होती आणि त्याचे कार्य पूर्ण केल्यावर त्याला तुरुंगात टाकण्यात आले. त्यानंतर संपूर्ण भार येशूवर पडला. जर त्याने वयाच्या २१ किंवा २२ व्या वर्षी हे कार्य हाती घेतले असते, जेव्हा त्याच्यामध्ये मानवतेची अजूनही कमतरता होती, जेव्हा त्याने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले होते आणि अनेक गोष्टी त्याला अजूनही समजलेल्या नव्हत्या, तर तेव्हा तो नियंत्रण प्राप्त करण्यास असमर्थ ठरला असता. त्या वेळी, येशूने त्याचे कार्य सुरू करण्याच्या काही काळ आधीच योहानाने त्याचे कार्य केले होते, तोपर्यंत तो आधीच मध्यमवयीन झाला होता. त्या वयात, त्यांची सामान्य मानवता त्याने करावयाचे कार्य हाती घेण्यासाठी पुरेशी होती. आता, देहधारी देवाकडे देखील सामान्य मानवता आहे आणि तुमच्यामधील वृद्धांच्या तुलनेत जरी ती परिपक्व नसली, तरीही ती त्याचे कार्य करण्यासाठी पुरेशी आहे. आजच्या कार्याच्या सभोवतालची परिस्थिती पूर्णपणे येशूच्या काळातील परिस्थितीसारखी नाही. येशूने बारा प्रेषितांची निवड का केली? हे सर्व त्याच्या कार्याच्या समर्थनार्थ होते आणि त्याच्याशी एकरूप होते. एकीकडे, ते त्याच्या त्यावेळच्या कार्याची पायाभरणी करण्यासाठी होते, तर दुसरीकडे ते त्याच्या पुढील काळातल्या कार्याचा पाया घालण्यासाठी होते. त्यावेळच्या कार्याच्या अनुषंगाने, बारा प्रेषितांची निवड करणे ही येशूची इच्छा होती, कारण ती स्वतः देवाची इच्छा होती. त्याचा विश्वास होता, की त्याने बारा प्रेषितांची निवड करावी आणि नंतर त्यांना प्रत्येक ठिकाणी धर्मप्रचार करण्यासाठी न्यावे. पण आज तुमच्यामध्ये याची गरज नाही! जेव्हा देहधारी देव देहात कार्य करतो, तेव्हा अनेक तत्त्वे असतात आणि अशा अनेक बाबी असतात ज्या मनुष्याला समजतच नाहीत; मनुष्य सदैव त्याच्या स्वतःच्या धारणांनुसार त्याचे मोजमाप करत असतो किंवा देवाकडे अवाजवी मागण्या करत असतो. तरीही आजतागायत, बरेच लोक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत, की त्यांचे ज्ञान म्हणजे केवळ त्यांच्या स्वतःच्या धारणा आहेत. देव ज्या युगात किंवा ज्या ठिकाणी देहधारी झाला आहे, त्याच्या देहधारणेतील कार्याची तत्त्वे कधीही बदलत नाहीत. तो देहधारण करून त्याच्या कार्यात देहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही; मग देहधारण करून देहाच्या सामान्य मानवतेमध्ये कार्य करणे तर दूरच. अन्यथा, देवाच्या देहधारणेचे महत्त्व नाहीसे होईल आणि वचने देह धारण करून पूर्णपणे निरर्थक होतील. शिवाय, केवळ स्वर्गातील पित्याला (आत्मा) देवाच्या देहधारणेबद्दल माहिती आहे आणि इतर कोणालाही माहिती नाही, अगदी प्रत्यक्ष त्या देहाला किंवा स्वर्गातील दूतांनाही नाही. असे असल्याने, देहात देवाचे कार्य अधिक सामान्य आहे आणि वचनांनी देह धारण केला आहे हे दाखवण्यास समर्थ आहे आणि देह म्हणजे एक सर्वसाधारण व सामान्य माणूस मनुष्य आहे.
काहींच्या मनात असा प्रश्न येईल की, “युगाची सुरुवात देवानेच का करायला हवी? त्याच्या ऐवजी निर्माण केलेला प्राणी ते करू शकत नाही का?” तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की नवीन युगात प्रवेश करण्याच्या स्पष्ट हेतूनेच देव देह धारण करतो आणि अर्थातच, जेव्हा तो नवीन युगात प्रवेश करतो, तेव्हाच त्याने पूर्वीचे युग पूर्ण केलेले असते. देव प्रारंभ आणि शेवट आहे; तो स्वतःच त्याच्या कार्याला गती देतो आणि म्हणून, पूर्वीच्या युगाची जो समाप्ती करतो तो तो स्वतःच असला पाहिजे. त्याने सैतानाचा पराभव करण्याचा आणि जगावर विजय प्राप्त करण्याचा हाच पुरावा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तो स्वतः मनुष्यामध्ये कार्य करतो, तेव्हा ती एका नवीन लढाईची सुरुवात असते. नवीन कार्याच्या सुरुवातीशिवाय, साहजिकच जुने कार्य समाप्त होणार नाही. आणि जर जुने कार्य समाप्त झाले नाही, तर तो पुरावा आहे, की सैतानाशी लढाई अद्याप संपलेली नाही. जर स्वतः देव आला आणि त्याने मनुष्यामध्ये नवीन कार्य केले, तरच मनुष्य सैतानाच्या वर्चस्वातून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो आणि नवीन जीवन आणि नवीन सुरुवात प्राप्त करू शकतो. अन्यथा, मनुष्य सदैव जुन्या युगात जगेल आणि कायम सैतानाच्या जुन्या प्रभावाखाली जगेल. देवाच्या नेतृत्वाखालील प्रत्येक युगासोबत मनुष्याचा एक भाग मुक्त होतो आणि अशा प्रकारे मनुष्य देवाच्या कार्याच्या सोबतीने नवीन युगाकडे वाटचाल करतो. देवाचा विजय म्हणजे त्याचे अनुसरण करणाऱ्या सर्वांचा विजय आहे. जर निर्माण केलेल्या मानवांच्या वंशावर युगाची समाप्ती करण्याचे कार्य दिले, तर मग मनुष्याच्या दृष्टिकोनातून असो किंवा सैतानाच्या दृष्टिकोनातून, हे देवाचा विरोध किंवा विश्वासघात करण्याच्या कृतीपेक्षा वेगळे नाही, हे देवाचे आज्ञापालन ठरणार नाही आणि मनुष्याचे कार्य हे सैतानाचे एक साधन बनेल. जर मनुष्याने प्रत्यक्ष देवाने सुरू केलेल्या युगात देवाची आज्ञा पाळली आणि त्याचे अनुसरण केले, तरच सैतानावर विजय प्राप्त करता येऊ शकतो, कारण तेच निर्मिलेल्या प्राणिमात्राचे कर्तव्य आहे. म्हणून, मी म्हणतो, की तुम्ही केवळ अनुसरण आणि आज्ञापालन करण्याची गरज आहे, तुमच्याकडून आणखी काही अपेक्षित नाही. प्रत्येकाने आपापले कर्तव्य पाळावे आणि प्रत्येकाने आपापले कार्य पार पाडावे असाच याचा अर्थ होतो. देव त्याचे स्वतःचे कार्य करतो, त्याचे कार्य मनुष्याने करण्याची त्याला गरज नसते, निर्मिलेल्या जीवांच्या कार्यात तो भागही घेत नाही. मनुष्य त्याचे स्वतःचे कार्य पार पाडतो आणि तो देवाच्या कार्यात सहभागी होत नाही. केवळ हेच आज्ञापालन आहे आणि केवळ हाच सैतानाच्या पराभवाचा पुरावा आहे. स्वतः देवाने नवीन युगाची सुरुवात करण्याचे कार्य पूर्ण केल्यानंतर, त्याचे कार्य करण्यासाठी तो स्वतः खाली मनुष्यामध्ये येत नाही. तेव्हाच मनुष्य त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि निर्मिलेला जीव म्हणून त्याचे कार्य करण्यासाठी अधिकृतपणे नव्या युगात पाऊल ठेवतो. याच तत्त्वांच्या आधारे देव कार्य करतो आणि कोणीही याचे उल्लंघन करू शकत नाही. केवळ अशा प्रकारे कार्य करणेच शहाणपणाचे आणि रास्त आहे. देवाचे कार्य स्वतः देवानेच पार पाडावयाचे असते. तोच त्याच्या कार्याला गती देतो आणि तोच त्याचे कार्य पूर्ण करतो. तोच त्याच्या कार्याची योजना आखतो, तोच त्याचे व्यवस्थापन करतो, एवढेच नव्हे तर तोच त्याचे कार्य फळाला नेतो. बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे, “मीच प्रारंभ आहे आणि मीच शेवट आहे; मीच पेरणारा आणि मीच कापणारा आहे.” त्याच्या व्यवस्थानाच्या कार्याशी संबंधित असलेले सर्व कार्य देवाने केले आहे. सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेचा तो शासक आहे; त्याच्या जागी इतर कोणीही त्याचे कार्य करू शकत नाही आणि कोणीही त्याचे कार्य समाप्त करू शकत नाही, कारण सर्व काही त्याच्याच हातात आहे. जगाची निर्मिती केल्यावर, तो संपूर्ण जगाला त्याच्या प्रकाशात जगण्यासाठी नेईल आणि तो संपूर्ण युगाची समाप्ती देखील करेल, त्यामुळे त्याची संपूर्ण योजना फळाला येईल!