देहधारणेचे रहस्य (२)

जेव्हा येशू यहूदीयात कार्य करत होता, त्यावेळी त्याने ते उघडपणे केले, परंतु आज, मी तुमच्यामध्ये गुप्तपणे कार्य करतो आणि बोलतो. अश्रद्धांना त्याची बिलकुल कल्पना नसते. तुमच्यामधील माझे कार्य हे बाहेरच्या लोकांसाठी बंद आहे. ही वचने, ही ताडणे आणि न्याय, हे केवळ तुम्हालाच माहीत आहेत, इतर कोणालाही माहीत नाहीत. हे सर्व कार्य तुमच्यामध्ये पार पाडले जाते आणि ते केवळ तुम्हालाच दाखवले जाते; अश्रद्धांपैकी कोणालाही हे माहीत नाही, कारण अद्याप ती वेळ आलेली नाही. येथील हे लोक ताडण सहन करून परिपूर्ण होण्याच्या जवळ आले आहेत, पण बाहेरच्या लोकांना याविषयी काहीच माहिती नाही. हे कार्य खूप गुप्त आहे! त्यांच्यासाठी देवाची देहधारणा गुप्त आहे, परंतु या प्रवाहात असलेल्यांसाठी ती उघड आहे असे म्हणता येईल. जरी देवामध्ये सर्व काही उघड असले, सर्व काही प्रकट असले आणि सर्व काही मुक्त केलेले असले, तरी हे केवळ त्यांच्यासाठीच सत्य आहे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात; इतरांना, अश्रद्धांना यातील काहीही कळत नाही. तुमच्यामध्ये आणि चीनमध्ये सध्या सुरू असलेले कार्य त्यांना कळू नये म्हणून ते पूर्णपणे बंदिस्त केले आहे. त्यांना या कार्याची जाणीव झाली, तर ते केवळ त्याचा निषेध करतील आणि छळ करतील. त्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही. या सर्वात मागासलेल्या, महान अग्निवर्ण अजगराच्या राष्ट्रात कार्य करणे सोपे नाही. जर हे कार्य उघडपणे सुरू ठेवले, तर पुढे सुरू ठेवणे अशक्य होईल. या ठिकाणी कार्याचा हा टप्पा पार पाडता येत नाही. जर हे कार्य उघडपणे करायचे असेल, तर ते याला पुढे कसे जाऊ देतील? यामुळे कार्य आणखीच धोक्यात येणार नाही का? जर हे कार्य गुप्त ठेवलेले नसते, त्याऐवजी येशूच्या काळाप्रमाणे केले गेले असते, जसे त्याने नेत्रदीपकपणे आजारी लोकांना बरे केले आणि भुतांना काढून टाकले, तर ते कार्य त्या दुष्टांनी फार पूर्वी “ताब्यात घेतले” नसते का? ते देवाचे अस्तित्व सहन करू शकले असते का? जर मी आता (सिनेगॉगमध्ये) सभास्थानात जाऊन मनुष्याला उपदेश व व्याख्यान दिले असते, तर माझे फार पूर्वीच तुकडे झाले नसते का? आणि जर हे घडले असते तर माझे कार्य कसे पुढे सुरू राहिले असते? कोणतेही संकेत आणि चमत्कार उघडपणे प्रकट केली जात नाहीत, कारण ती गुप्त ठेवली जातात. म्हणून, अश्रद्धांना माझे कार्य दिसत नाही, माहीत नाही किंवा ते शोधूही शकत नाहीत. जर कार्याचा हा टप्पा कृपेच्या युगात येशूच्या कार्याप्रमाणेच केला गेला असता, तर तो आजच्या इतका स्थिर राहू शकला नसता. त्यामुळे, अशा प्रकारे गुप्तपणे कार्य करणे हे तुमच्यासाठी आणि एकूणच कार्यासाठी फायद्याचे आहे. जेव्हा पृथ्वीवरील देवाचे कार्य समाप्त होईल, म्हणजेच जेव्हा हे गुप्त कार्य पूर्ण होईल, तेव्हा कार्याचा हा टप्पा उघड होईल. सगळ्यांना कळेल, की चीनमध्‍ये विजय प्राप्त करणार्‍यांचा एक समूह आहे; सगळ्यांना कळेल, की देवाची देहधारणा चीनमध्ये आहे आणि त्याचे कार्य संपले आहे. तेव्हाच मनुष्याला ते झाले असल्याचे कळेल: चीनचे अद्याप अपकर्ष किंवा पतन का झालेले नाही? असे दिसून आले, की देव चीनमध्ये वैयक्तिकरीत्या त्याचे कार्य पार पाडत आहे आणि त्याने लोकांच्या एका समूहाला विजयी बनवले आहे.

देव देह धारण करतो, तेव्हा तो वैयक्तिकरीत्या त्याचे कार्य पार पाडत असतानाच्या काळात जे लोक त्याचे अनुसरण करतात, त्यांच्या एका भागामध्ये तो स्वतःला प्रकट करतो, तो सर्व प्राणीमात्रांसमोर प्रकट होत नाही. त्याने केवळ त्याच्या कार्याचा एक टप्पा पूर्ण करण्यासाठी देह धारण केला, मनुष्याला त्याचे प्रतिरूप दाखवण्यासाठी नाही. परंतु, त्याचे कार्य त्याने स्वतःच केले पाहिजे, म्हणून देह धारण करून ते करणे त्याच्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा हे कार्य पूर्ण होईल, तेव्हा तो मानवी जगातून निघून जाईल; पुढे येणा-या कार्याच्या मार्गात उभे राहण्याच्या भीतीने तो मानवजातीमध्ये दीर्घकाळ राहू शकत नाही. तो लोकसमुदायासमोर जे प्रकट करतो, ती केवळ त्याची नीतिमान प्रवृत्ती आणि त्याची सर्व कृत्ये असतात आणि त्याने दोनदा देह धारण केला तेव्हाचे प्रतिरूप तो प्रकट करत नाही, कारण देवाचे प्रतिरूप केवळ त्याच्या प्रवृत्तीद्वारे दर्शवले जाऊ शकते आणि त्याच्या देहधारणेच्या प्रतिरूपाने ते बदलता येत नाही. त्याच्या देहधारणेचे प्रतिरूप केवळ मर्यादित लोकांनाच दर्शवले जाते, तो देहधारण करून कार्य करत असताना जे त्याचे अनुसरण करतात त्यांनाच ते दर्शवले जाते. त्यामुळे सध्या सुरू असलेले कार्य गुप्तपणे केले जाते. त्याचप्रकारे, येशूने जेव्हा त्याचे कार्य केले तेव्हा त्याने केवळ यहूद्यांना दर्शन दिले, इतर कोणत्याही राष्ट्राला कधीही जाहीरपणे दर्शन दिले नाही. अशा प्रकारे, त्याचे कार्य पूर्ण झाल्यावर, तो मानवी जगातून त्वरित निघून गेला, तिथेच राहिला नाही; नंतर, मनुष्याचे प्रतिरूप असलेल्या त्याने मनुष्याला दर्शन दिले नाही, परंतु ज्याने प्रत्यक्ष हे कार्य केले त्या पवित्र आत्म्याने हे केले. देहधारी देवाचे कार्य पूर्णतः समाप्त झाल्यानंतर तो नश्वर जगातून निघून जाईल आणि देह धारण केलेला असताना त्याने जे केले त्यासारखे कार्य तो कधीही करणार नाही. यानंतर, सर्व कार्य थेट पवित्र आत्म्याद्वारे केले जाते. या काळात, मनुष्याला त्याच्या देहधारी शरीराचे प्रतिरूप क्वचितच दिसते; तो मनुष्याला अजिबात दर्शन देत नाही, तर तो सदैव लपून राहतो. देहधारी देवाच्या कार्याचा वेळ मर्यादित आहे. हे विशिष्ट युगात, कालावधीत, राष्ट्रात आणि विशिष्ट लोकांमध्ये पार पाडले जाते. हे कार्य केवळ देवाच्या देहधारणेच्या काळातील कार्याचे प्रतिनिधित्व करते; हे एका युगाचे प्रतिनिधित्व करते आणि ते एका विशिष्ट युगातील देवाच्या आत्म्याच्या कार्याचे प्रतिनिधित्व करते, त्याच्या संपूर्ण कार्याचे प्रतिनिधित्व करत नाही. म्हणून, देहधारी देवाचे प्रतिरूप सर्व लोकांना दर्शवले जाणार नाही. तो दोनदा देहधारी झाला तेव्हाचे त्याचे प्रतिरूप न दाखवता, लोकसमुदायाला जे दर्शवले जाते ते म्हणजे देवाचे नीतिमत्व आणि त्याची संपूर्ण प्रवृत्ती. मनुष्याला दर्शवले जाते ते एकच प्रतिरूप नाही किंवा दोन प्रतिरूपे एकत्रित केलेलीही नाहीत. म्हणून, हे आवश्यक आहे की देहधारी देवाने करायलाच हवे ते गरजेचे कार्य पूर्ण केल्यावर पृथ्वीवरून निघून गेले पाहिजे, कारण, तो केवळ त्याने करावयाचेच आहे ते कार्य करण्यासाठी येतो, लोकांना त्याचे प्रतिरूप दाखवण्यासाठी नाही. जरी देहधारणेचे महत्त्व देवाने दोनदा देह धारण करून आधीच पूर्ण केले आहे, तरीही ज्या राष्ट्राने त्याला यापूर्वी कधीही पाहिले नाही अशा कोणत्याही राष्ट्रासमोर तो स्वतःला उघडपणे प्रकट करणार नाही. येशू पुन्हा कधीही स्वतःला नीतीमत्वाचा सूर्य म्हणून यहूद्यांना दाखवणार नाही किंवा तो माउंट ऑफ ऑलिव्हवर उभा राहून सर्व लोकांना दर्शन देणार नाही; सर्व यहूदी लोकांनी जे पाहिले आहे ते म्हणजे येशूचे यहूदीयात असतानाच्या काळातील चित्र आहे. याचे कारण म्हणजे, येशूचे त्याच्या देहधारणेतील कार्य दोन हजार वर्षांपूर्वी संपले; तो यहूद्याच्या प्रतिरूपात यहूदीयात परत येणार नाही, कोणत्याही परकीय राष्ट्रांना तो यहूद्याच्या प्रतिरूपात दर्शन देणार नाही, कारण येशूचे देहधारणेचे प्रतिरूप हे ही केवळ यहूद्याचे प्रतिरूप आहे, योहानाने पाहिलेल्या मनुष्याच्या पुत्राचे प्रतिरूप नाही. जरी येशूने त्याच्या अनुयायांना तो पुन्हा येईल असे वचन दिले असले तरी, तो परकीय राष्ट्रांतील सर्व लोकांसमोर स्वतःला केवळ यहूद्याच्या प्रतिरूपात दाखवणार नाही. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे, की देवाचे देहधारणेचे कार्य हे एका युगाची सुरुवात करणे आहे. हे कार्य काही वर्षांपुरते मर्यादित आहे आणि ते देवाच्या आत्म्याचे सर्व कार्य पूर्ण करू शकत नाही, ज्याप्रमाणे येशूचे यहूदी हे प्रतिरूप त्याने केवळ यहूदीयात कार्य केलेल्या देवाचे प्रतिरूप दर्शवते आणि तो केवळ वधस्तंभावर खिळण्याचे कार्य करू शकतो. ज्या काळात येशूने देह धारण केला होता, त्या काळात तो युगाचा अंत किंवा मानवजातीचा नाश करण्याचे कार्य करू शकला नाही. म्हणून, त्याला वधस्तंभावर खिळल्यानंतर आणि त्याचे कार्य पूर्ण केल्यानंतर, तो सर्वोच्च उंचीवर गेला आणि त्याने स्वतःला मनुष्यापासून कायमचे लपवले. तेव्हापासून, परकीय राष्ट्रांतील ते विश्वासू श्रद्धाळू लोक प्रभू येशूचे रूप पाहू शकले नाहीत, परंतु त्यांनी केवळ भिंतीवर चिकटवलेले त्याचे चित्र पाहिले. हे चित्र मनुष्याने रेखाटलेले आहे आणि जे तो मनुष्याला दाखवतो तसे ते देवाचे प्रतिरूप नाही. देवाने दोनवेळा देह धारण केला तेव्हाचे त्याचे प्रतिरूप तो उघडपणे लोकसमुदायासमोर दाखवणार नाही. तो मानवजातीमध्ये जे कार्य करतो ते म्हणजे त्यांना त्याची प्रवृत्ती समजून घेण्याची अनुमती देणे यासाठी. हे सर्व मनुष्याला वेगवेगळ्या युगांच्या कार्याद्वारे दाखवले जाते; हे येशूच्या प्रकटीकरणाद्वारे न करता त्याने प्रकट केलेल्या प्रवृत्तीद्वारे आणि त्याने केलेल्या कार्याद्वारे साध्य होते. म्हणजेच, देवाचे प्रतिरूप देहधारी प्रतिरूपाद्वारे नाही, तर ज्याला प्रतिरूप आणि आकार दोन्ही आहे अशा देहधारी देवाने केलेल्या कार्याद्वारे मनुष्याला दर्शवले जाते; आणि त्याच्या कार्याद्वारे, त्याचे प्रतिरूप दर्शवले जाते आणि त्याच्या प्रवृत्तीची ओळख करून दिली जाते. देहधारण करून त्याला जे कार्य करावयाचे आहे त्याचे हेच महत्त्व आहे.

देवाच्या दोन देहधारणांचे कार्य संपले, की तो अश्रद्धांच्या सर्व राष्ट्रांमध्ये त्याची नीतिमान प्रवृत्ती दाखवण्यास सुरवात करेल, त्यामुळे लोकसमुदायाला त्याचे प्रतिरूप पाहता येईल. तो त्याची प्रवृत्ती प्रकट करेल आणि याद्वारे मनुष्याच्या विविध श्रेणींचे अंत स्पष्ट करेल, ज्यामुळे जुन्या युगाचा संपूर्ण अंत होईल. देहधारणेतील त्याचे कार्य मोठ्या प्रमाणात विस्तारत नाही (जसे येशूने केवळ यहूदीयात कार्य केले आणि आज मी केवळ तुमच्यामध्येच कार्य करतो,) याचे कारण त्याच्या देहधारणेतील कार्याला सीमा आणि मर्यादा असतात. तो केवळ सामान्य देहाच्या प्रतिरूपात अल्प कालावधीसाठी कार्य करत असतो; तो या देहधारणेचा उपयोग अनंतकाळचे कार्य करण्यासाठी किंवा अश्रद्ध राष्ट्रांतील लोकांना दर्शन देण्याचे कार्य करण्यासाठी करत नाही. देहातील कार्याच्या केवळ व्याप्तीला मर्यादा असू शकतात (जसे की केवळ यहूदीयामध्ये किंवा केवळ तुमच्यामध्येच कार्य करणे) आणि नंतर, या सीमांच्या आत केलेल्या कार्याद्वारे, नंतर त्याची व्याप्ती वाढवता येते. अर्थात, विस्ताराचे कार्य थेट त्याच्या आत्म्याने पार पाडावयाचे असते, मग, ते त्याच्या देहधारणेचे कार्य असत नाही. देहातील कार्याला सीमा असल्यामुळे आणि ते विश्वाच्या सर्व कोपऱ्यांपर्यंत पसरत नाही त्यामुळे—ते साध्य केले जाऊ शकत नाही. देहातील कार्याद्वारे, त्याचा आत्मा पुढे करावयाचे असलेले कार्य पार पाडतो. म्हणून, देहात केलेले कार्य हे उद्घाटनाच्या स्वरूपाचे असते जे विशिष्ट सीमांमध्ये पार पाडले जाते; यानंतर, हे कार्य करत असतो तो त्याचा आत्मा आणि तो विस्तारित कार्यक्षेत्रात हे कार्य करतो.

देव केवळ युगाचे मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने पृथ्वीवर कार्य करण्यासाठी येतो; त्याचा उद्देश केवळ नवीन युगाची सुरुवात करणे आणि जुन्या युगाचा अंत करणे एव्हढाच असतो. पृथ्वीवरील मनुष्याचे जीवन जगण्यासाठी, मनुष्यजगताच्या जीवनातील सुख-दुःखांचा स्वतः अनुभव घेण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला त्याच्या हाताने परिपूर्ण करण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीची प्रगती होत असताना ती वैयक्तिकरीत्या पाहण्यासाठी तो आलेला नाही. हे त्याचे कार्य नाही; त्याचे कार्य केवळ नवीन युग सुरू करणे आणि जुन्याचा अंत करणे हे आहे. म्हणजेच, तो व्यक्तिशः एक युग सुरू करेल आणि व्यक्तिशः दुसर्‍या युगाचा अंत करेल आणि व्यक्तिशः त्याचे कार्य पार पाडून सैतानाचा पराभव करेल. प्रत्येक वेळी तो व्यक्तिशः त्याचे कार्य पार पाडतो, तेव्हा जणू तो रणांगणावर पाय ठेवत असतो. प्रथम, तो जगावर विजय प्राप्त करतो आणि देह धारण केलेला असताना सैतानावर वर्चस्व प्राप्त करतो; तो सर्व श्रेष्ठत्वाचा ताबा घेतो आणि दोन हजार वर्षांच्या संपूर्ण कार्यावरील पडदा उचलतो, जेणेकरून पृथ्वीवरील सर्व लोकांना मार्गक्रमणाचा योग्य मार्ग लाभेल आणि शांतता आणि आनंदाचे जीवन जगता येईल. मात्र, देव पृथ्वीवर मनुष्याबरोबर जास्त काळ राहू शकत नाही, कारण अखेर देव हा देव आहे आणि तो मनुष्यासारखा नाही. तो सामान्य व्यक्तीचे आयुष्य जगू शकत नाही, म्हणजेच तो पृथ्वीवर सामान्यांपेक्षा वेगळी व्यक्ती म्हणून राहू शकत नाही, कारण त्याचे मानवी जीवन टिकवून ठेवण्यासाठी त्याच्याकडे सामान्य मनुष्याच्या सामान्य मानवतेचा केवळ एक किमान असा छोटासा भाग असतो. दुसऱ्या शब्दांत, देव पृथ्वीवर कुटुंब कसे सुरू करू शकेल, व्यवसाय कसा करू शकेल आणि मुलांना कसा वाढवू शकेल? हा त्याला एक कलंक ठरणार नाही का? त्याला सामान्य मानवता प्राप्त झाली आहे, ती केवळ सामान्य रीतीने कार्य करण्याच्या उद्देशाने, त्याला सामान्य व्यक्तीप्रमाणे कुटुंब आणि व्यवसाय करण्यास सक्षम करण्यासाठी नाही. त्याची सामान्य ज्ञान-शक्ती, सामान्य मन आणि त्याच्या देहाचे सामान्य आहार आणि वस्त्रे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत, की त्याच्याकडे सामान्य मानवता आहे; तो सामान्य मानवतेने सुसज्ज आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला कुटुंब किंवा व्यवसाय करण्याची गरज नाही. हे पूर्णपणे अनावश्यक असेल! देवाचे पृथ्वीवर येणे म्हणजे देह धारण करणे एव्हढेच आहे; तो केवळ मनुष्याला त्याची वचने समजून घेण्याची आणि त्याचे वचन पाहण्याची अनुमती देतो, म्हणजेच त्या देहाद्वारे पार पाडले जायचे कार्य आहे ते पाहण्याची अनुमती मनुष्याला देतो. लोकांनी त्याच्या देहाला विशिष्ट प्रकारे वागणूक द्यावी असा त्याचा हेतू नाही, परंतु मनुष्याने शेवटपर्यंत आज्ञाधारक राहावे, म्हणजेच त्याच्या मुखातून निघणाऱ्या सर्व वचनांचे पालन करावे आणि तो करत असलेल्या सर्व कार्यास शरण जावे हा त्याचा हेतू आहे. तो केवळ देहात कार्य करतो; तो जाणूनबुजून मनुष्याला त्याच्या देहाची महानता आणि पावित्र्य वाढवण्यास सांगत नाही, तर त्याउलट तो त्याच्या कार्याचे शहाणपण आणि त्याच्याकडे असलेले सर्व अधिकार मनुष्याला दाखवतो. म्हणूनच, त्याच्याकडे उत्कृष्ट मानवता असली, तरी तो कोणतीही घोषणा करत नाही आणि केवळ, त्याने करावयाचे आहे त्या कार्यावर लक्ष केंद्रित करतो. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे, की देवाने देह का धारण केला आणि तरीही तो, त्याच्या सामान्य मानवतेची प्रसिद्धी किंवा साक्ष का देत नाही आणि त्याऐवजी त्याला करावयाचे आहे ते कार्य पार पाडतो. म्हणून, तुम्ही देहधारी देवाकडून जे काही पाहू शकता ते त्याचे दैवी रूप आहे; याचे कारण असे, तो मनुष्यरूपाने काय आहे हे तो कधीही जाहीर करत नाही जेणेकरून मनुष्य त्याचे अनुकरण करू शकेल. जेव्हा मनुष्य लोकांचे नेतृत्व करतो तेव्हाच तो मनुष्य म्हणून काय आहे हे बोलतो, त्यांची प्रशंसा आणि दृढता प्राप्त करण्यासाठी आणि त्याद्वारे इतरांचे नेतृत्व प्राप्त करण्यासाठी तो हे करतो. याउलट, देव केवळ त्याच्या कार्याद्वारे (म्हणजे मनुष्याला अप्राप्य असलेल्या कार्याद्वारे) मनुष्यावर विजय प्राप्त करतो; मनुष्याने त्याची प्रशंसा केली किंवा मनुष्याला त्याची उपासना करायला लावली, हे महत्त्वाचे नाही. तो केवळ मनुष्यामध्ये त्याच्याबद्दल आदराची किंवा त्याच्या अथांगतेची भावना निर्माण करतो. मनुष्याला प्रभावित करण्याची देवाला गरज नाही; तू त्याच्या प्रवृत्तीचे साक्षीदार झाल्यानंतर त्याचा आदर करावा एवढीच त्याला अपेक्षा आहे. देव जे कार्य करतो ते त्याचे स्वतःचे असते; त्याच्या जागी मनुष्य ते कार्य करू शकत नाही किंवा मनुष्याला ते साध्य करता येणार नाही. केवळ स्वतः देव त्याचे कार्य करू शकतो आणि मनुष्याला नवीन जीवनात नेण्यासाठी नवीन युगाची सुरुवात करू शकतो. तो जे कार्य करतो ते मनुष्याला नवीन जीवन प्राप्त करण्यास आणि नवीन युगात प्रवेश करण्यास सक्षम करणे हे आहे. बाकीचे कार्य हे सर्वसामान्य मानवता असलेल्यांवर सोपवले जाते की ज्यांचे इतरांनी कौतुक केले आहे. म्हणून, कृपेच्या युगात, त्याने दोन हजार वर्षांचे कार्य त्याच्या देहधारणेच्या तेहतीस वर्षांपैकी केवळ साडेतीन वर्षांत पूर्ण केले. जेव्हा देव पृथ्वीवर त्याचे कार्य पार पाडण्यासाठी येतो, तेव्हा तो नेहमीच दोन हजार वर्षांचे किंवा एका संपूर्ण युगाचे कार्य अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत पूर्ण करतो. तो थांबत नाही, आणि विलंब करत नाही; अनेक वर्षांच्या कार्याला तो केवळ अशा प्रकारे संकुचित करतो, की ते अवघ्या काही वर्षात पूर्ण होते. याचे कारण असे, की तो स्वतः जे कार्य करतो ते संपूर्णपणे नवीन मार्ग उघड करण्यासाठी आणि नवीन युगाचा प्रारंभ करण्यासाठी आहे.

मागील:  देहधारणेचे रहस्य (१)

पुढील:  देहधारणेचे रहस्य (३)

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger