सर्वशक्तिमान देवाचा निःश्वास

तुझ्या हृदयात एक मोठे रहस्य आहे ज्याची तुला कधीच जाणीव नव्हती, कारण तू एका प्रकाशहीन जगात राहत होतास. तुझे हृदय आणि आत्मा एका दुष्ट अस्तित्वाने हिसकावून घेतले आहे. तुझी दृष्टी अंधारामुळे अंधुक झाली आहे व तुला आकाशातील सूर्य दिसत नाही की रात्री चमकणारा तारा दिसत नाही. तुझ्या कानात फसवे शब्द दाटले आहेत आणि तुला यहोवाचा विराट आवाज ऐकू येत नाही की दिव्य सिंहासनावरून वाहत येणार्‍या पाण्याचा आवाज ऐकू येत नाही. जे काही हक्काने तुझे आहे, जे काही सर्वशक्तिमान देवाने तुला बहाल केले आहे, ते सर्व तू गमावले आहेस. स्वतःला वाचवण्याची ताकद नाही, जगण्याची आशा नाही अशा अवस्थेत तू दुःखाच्या एका अनंत सागरात प्रवेश केला आहेस व फक्त धडपड करत आहेस, इकडे तिकडे धावत आहेस…. त्या क्षणापासून, सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादांपासून खूप दूर, सर्वशक्तिमान देवाने केलेल्या व्यवस्थेच्या बाहेर अप्राप्य अशा ठिकाणी परतीचा मार्ग नसलेल्या रस्त्यावर चालत त्या दुष्ट अस्तित्वाने दिलेली पीडा भोगणे तुझ्या नशिबात होते. लक्षावधी हाका, आरोळ्या तुझे हृदय आणि आत्मा जागृत करू शकत नाहीत. तुला एका दिशाहीन अथवा मार्गदर्शिका नसलेल्या अमर्याद प्रदेशाच्या दिशेने भुलवणार्‍या त्या दुष्ट अस्तित्वाच्या ताब्यात तू गाढ झोपला आहेस. त्यामुळे तुझा मूळ निरागसपणा व पावित्र्य हरवले आहे आणि तू परमेश्वराने दाखवलेल्या आस्थेकडे दुर्लक्ष केले आहेस. ते दुष्ट अस्तित्व तुझ्या हृदयातील सर्व विषयात तुला सुकाणूसारखे वळवत आहे व ते आता तुझे आयुष्य बनले आहे. तुला आता त्याची भीती वाटत नाही, तू त्याला टाळत नाहीस की त्याच्यावर शंका घेत नाहीस; उलट तू त्याला तुझ्या हृदयात देवच समजतोस. तू त्याला गाभार्‍यात बसवून त्याची उपासना करू लागतोस आणि तुम्हा दोघांना शरीर व सावलीप्रमाणे वेगळे करता येत नाही, तुम्ही बरोबरच जगण्यास आणि मरण्यास प्रवृत्त होत असता. तुला कुठलीच कल्पना नाही, की तू कुठून आलास, तू का जन्माला आलास किंवा तू का मरण पावणार आहेस. तू सर्वशक्तिमान देवाकडे एक परके अस्तित्व म्हणून बघतोस, त्याने तुझ्यासाठी काय केले आहे ते तर बाजूलाच राहू द्या, तुला त्याचे मूळ स्वरूप माहीत नाही; त्याच्याकडून येणारे सर्व काही तुझ्याकरता तिरस्करणीय असते; तू ते जपून ठेवत नसतोस की त्याचे मूल्य तुला माहीत नसते. ज्या दिवसापासून तुला सर्वशक्तिमान देवाच्या कृपेची प्राप्ती झाली आहे तेव्हापासून तू त्या दुष्ट अस्तित्वाबरोबरच चालत आला आहेस. तू हजारो वर्षे अनेक वादळे व तुफानांमध्ये त्या दुष्ट अस्तित्वाबरोबर टिकाव धरून आहेस आणि तुझ्या जीवनाचा स्रोत असलेल्या देवाच्या समोर तू त्याच्याबरोबर उभा आहेस. तू विलयाच्या पराकोटीस पोहोचला आहेस याचा मागमूसही नसताना तुला कुठलाच पश्चात्ताप वाटत नाही. त्या दुष्ट अस्तित्वाने तुला भुरळ घातली आहे व तुला त्रास होत आहे हे तू विसरला आहेस; तू तुझा प्रारंभ विसरला आहेस. अशा प्रकारे आजच्या दिवसापर्यंत त्या दुष्ट अस्तित्वाने तुला प्रत्येक टप्प्यावर ग्रासले आहे. तुझे हृदय आणि आत्मा बधिर झाले आहेत व कुजले आहेत. तू मनुष्यांच्या जगातील दुःखाविषयी तक्रार करणे थांबवले आहेस; तुला जग आता अन्यायकारक वाटत नाही. आणि सर्वशक्तिमान देव आहे की नाही याची तुला तितकीही पर्वा नाही. याचे कारण असे, की तू फार पूर्वी ठरवले आहेस की ते दुष्ट अस्तित्व तुझे खरे पिता आहेत व तू त्याच्यापासून वेगळा होऊ शकत नाहीस. हेच तुझ्या हृदयातले गुपित आहे.

पहाट होताच, प्रातःकाळचा एक तारा पूर्वेला चमकू लागतो. या तार्‍याला आधी कधीच पाहिलेले नसते आणि तो मनुष्याच्या हृदयात लुप्त झालेल्या प्रभेला पुनः जागृत करत शांत, अंधुक आकाशाला उजळवत असतो. तुला व इतरांनाही प्रकाशमान करणार्‍या या तेजामुळे मानवजात आता एकाकी राहिली नाही. तरीही फक्त तू त्या अंधार्‍या रात्रीत गाढ झोपलेला आहेस. तुला कुठला आवाज ऐकू येत नाही की कुठला उजेड दिसत नाही; तुला एका नवीन स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या, एका नव्या युगाच्या उद्गमाची संवेदना नसते, कारण तुझे वडील तुला सांगत असतात, “माझ्या बाळा, नको उठूस, अजून खूप वेळ आहे. हवा थंडगार आहे म्हणून बाहेर जाऊ नकोस नाहीतर तुझ्या डोळ्यात तलवार व भाला घुसतील.” तू फक्त तुझ्या वडिलांच्याच बोलण्यावर विश्वास ठेवतोस कारण तुला वाटत असते, की तुझे वडीलच फक्त बरोबर आहेत कारण ते तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि त्यांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. अशा बोलण्यामुळे अणि प्रेमामुळे, जगात तेजोप्रभा आहे या गोष्टीवरचा तुझा विश्वास नाहीसा होऊ लागतो; ते तुला या जगात सत्य अजूनही अस्तित्वात आहे याची फिकीर करू देत नाहीत. आता तुझ्याकडे तो सर्वशक्तिमान देव तुला वाचवू शकेल अशी आशा करण्याचे धारिष्ट्य नसते. तू आहे त्या स्थितीत समाधानी असतोस, त्या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे तुला आता त्या दिव्य प्रभेच्या उदयाची अपेक्षा नसते, तू आता सर्वशक्तिमान देवाच्या आगमनाचा शोध घेत नसतोस. तुझ्यापुरते पाहिले तर जे काही सुंदर आहे ते पुनर्जीवित होऊ शकत नाही, ते असू शकत नाही. तुझ्या दृष्टीने मानवजातीचा पुढचा काळ, मानवजातीचे भविष्य केवळ संपलेले असते, पुसले गेलेले असते. तू तुझ्या वडिलांच्या कष्टात स्वेच्छेने सहभागी होऊन, आपला सहप्रवासी व दूरच्या प्रवासाची दिशा हरवेल का अशी प्रचंड भीती वाटत असलेल्या स्थितीत त्यांच्या वस्त्रांना सर्व शक्तिनिशी घट्ट धरून ठेवत असतोस. मनुष्यांच्या त्या विशाल आणि गोंधळलेल्या विश्वात, तुमच्यापैकी अनेकजण असे घडले आहेत जे या जगातील निरनिराळ्या भूमिका निर्भयपणे व निग्रहाने पार पाडत असतात. त्यातून मृत्यूचे भय नसलेले अनेक “योद्धे” जन्मले आहेत. याहूनही अधिक म्हणजे, त्यातून आपल्या निर्मितीचा हेतूच माहीत नसलेल्या बधिर व पंगू झालेल्या मनुष्यांच्या झुंडीच्या झुंडी तयार झाल्या आहेत. सर्वशक्तिमान देवाचे डोळे खोलवर दुःखात बुडालेल्या मानवजातीच्या एक न एक सदस्याचे अवलोकन करत असतात. त्याला वेदनाग्रस्तांचे विव्हळणे ऐकू येत असते, त्याला जे बाधित आहेत त्यांचे निलाजरेपण दिसत असते आणि त्याला मोक्षाचा अनुग्रह गमावलेल्या मानवजातीची असहायता व भीती जाणवत असते. मानवजात आपल्याच मार्गावर चालत जाण्याचा पर्याय मान्य करून त्याच्या संगोपनाला नाकारते आणि शत्रूच्या सहवासात सखोल समुद्रातील कडवटपणाचा शेवटच्या थेंबापर्यंत आस्वाद घेणे पसंत करीत त्याच्या नजरेत दिसणारी चिकित्सा टाळण्याचा प्रयत्न करते; आता सर्वशक्तिमान देवाचे हात या दुर्दैवी मानवजातीला गोंजारू इच्छित नसतात. वेळोवेळी तो त्यांना त्याच्या कवेत घेत असतो व पुनः पुनः तो अपयशी होत असतो आणि अशा प्रकारे त्याचे कार्य पुनः पुनः चालू राहते. त्या क्षणापासून तो थकू लागतो, त्याला क्षीणपणा जाणवू लागतो व मग तो हातातले काम थांबवतो आणि मानवजातीमध्ये विहार करणे बंद करतो…. मानवजातीला अशा कुठल्याही बदलांची, पुढे काय येत आहे व जात आहे, परमेश्वराच्या दुःखाची आणि विषण्णतेची अजिबात जाणीव नसते.

सर्वशक्तिमान देवाच्या विचारांनुसार आणि त्याच्या डोळ्याखाली जगातील सर्व काही जलद गतीने बदलत असते. मानवजातीने आधी कधीच न ऐकलेल्या गोष्टी अस्तित्वात येतात व दीर्घ काळ मानवजातीकडे असलेल्या गोष्टी निघून जातात. कुणालाच सर्वशक्तिमान देवाच्या ठिकाणाची खोली समजत नाही; सर्वशक्तिमान देवाच्या जीवन शक्तीची श्रेष्ठता आणि महानता तर कुणालाच कळत नाही. मनुष्याला ज्याचे आकलन होत नाही ते त्याला उमजते यात त्याची श्रेष्ठता आहे. तो तोच आहे की ज्याला मानवजातीने सोडून दिले आहे व तरीही तो मानवजातीचा उद्धार करतो म्हणून तो महान आहे. त्याला जीवन आणि मृत्यूचा अर्थ माहीत आहे व अधिक म्हणजे, त्याला उत्पत्ती झालेल्या मानवजातीने पाळायला हवेत ते अस्तित्वाचे नियम माहीत आहेत. तो मानवी अस्तित्वाचा पाया आहे आणि तो मानवजातीला पुनर्जीवित करणारा उद्धारक आहे. तो केवळ त्याच्या कार्यपूर्तीसाठी व त्याच्या योजनापूर्तीसाठी सुखी जीवांना दुःखी करण्यासाठी व दुःखी जीवांना सुख देण्यासाठी भार टाकत असतो.

सर्वशक्तिमान देवाच्या व्यवस्थेपासून दूर गेलेल्या मानवजातीला अस्तित्वाच्या हेतूची कल्पना नसते पण तरी तिला मृत्यूची भीती वाटते. त्यांच्याकडे कुठला आधार नसतो किंवा मदत नसते, तरीही ते त्यांचे डोळे बंद करू इच्छित नाहीत आणि स्वतःच्या आत्म्याची जाणीव नसलेले मांसाचे गोळे बनून या जगात स्वतःचे एक हीन अस्तित्व कोरण्यासाठी स्वतःलाच कठोर करत असतात. तू व इतर लोकही अशाच प्रकारे दिशाहीन अवस्थेत निराशेत जगत असता. त्या दैवी कथेतील पवित्र आत्माच त्याच्या आगमनाची अगतिकपणे दीर्घ काळ वाट पहात असलेल्या आणि दुःखात शोक करत असलेल्या लोकांना वाचवेल. ज्यांच्यात आत्मभान राहिले नाही अशा लोकांना आतापर्यंत ही समज आली नाही. तरीही लोक अशा प्रकारे तीच इच्छा बाळगत असतात. ज्यांनी खूप दुःख सोसले आहे त्यांच्यावर सर्वशक्तिमान देव दया करत असतो; त्याच वेळी ज्यांच्यात आत्मभान राहिले नाही अशा लोकांबाबत तो कंटाळलेला असतो कारण त्याला मानवजातीकडून उत्तरासठी फार काळ वाट पहावी लागलेली असते. तो तुझ्या हृद्याचा व आत्म्याचा शोध घेत असतो; तू पुढेही तहानलेले आणि भुकेले राहू नयेस, तुला जागृत करावेस म्हणून तो तुला पाणी व अन्न देऊ इच्छितो. जेव्हा तू थकलेला असतोस आणि जेव्हा या जगातील उदास अनुत्सुकतेची थोडी जाणीव होत असते, तेव्हा हरवून जाऊ नकोस, अश्रू ढाळू नकोस. सर्वशक्तिमान सर्वशक्तिमान देव, तो अवलोकनकर्ता तुझ्या आगमनाचे कुठल्याही क्षणी स्वागत करेल. तो तुझ्या बाजूला तू परत फिरण्याची वाट बघत उभा आहे. जेव्हा तुला तुझे अस्तित्व देवातून निर्माण झाले आहे हे कळेल, एका अज्ञात क्षणी तू तुझी दिशा हरवून बसलास हे कळेल, एका अज्ञात वेळी रस्त्यावर तुझी शुद्ध हरपली हे कळेल व एका अज्ञात वेळी “पिता” गवसला हे कळेल; शिवाय, सर्वशक्तिमान देव खूप दीर्घ काळ, सदैव वाट पाहत लक्ष ठेवून आहे हे कळेल, तेव्हा तुला तुझी स्मृती अचानक परत मिळेल आणि त्या दिवसाची तो वाट पहात आहे. तो उत्तर न मिळता तुझ्या प्रतिसादाची तीव्र इच्छा धरून लक्ष ठेवून आहे. त्याची प्रतीक्षा व अवधान अमूल्य आहे आणि मानवी मन व आत्म्यासाठीच त्यांचे अधिष्ठान आहे. कदाचित ही प्रतीक्षा आणि अवधान अनिश्चित असेल व कदाचित त्यांचा शेवट आला असेल. परंतु, तुझे हृदय आणि आत्मा आता या क्षणी कुठे आहेत हे तुला नेमके माहीत असायला हवे.

२८ मे २००३

मागील:  देवच मनुष्याच्या जीवनाचा स्रोत आहे

पुढील:  नवीन युगात देव प्रकट झाला आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger