नवीन युगात देव प्रकट झाला आहे
सहा हजार वर्षांचीदेवाची व्यवस्थापनाची योजना आता संपृष्टात येत आहे आणि ज्या कोणाला त्याच्या स्वरुपाची ओढ आहे, त्या सर्वांच्याकरिता (देवाच्या) राज्याची कवाडे आधीच खुली करण्यात आली आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, आता तुम्ही वाट कशाची पाहत आहात? तुम्ही कशाचा शोध घेत आहात? देवाने प्रत्यक्ष प्रकट होण्याची वाट पाहत आहात? की त्याची पदचिन्हे शोधत आहात? देवाच्या स्वरुपाची ओढ कशी असते! आणि देवाची पदचिन्हे शोधणे कितीसे कठीण आहे! आजच्यासारख्या अशा युगात, अशा जगात, ज्या दिवशी देव प्रकट होईल त्या दिवसाचे साक्षीदार होण्याकरिता आपण काय केले पाहिजे? देवाच्या पावलांच्या बरोबरीने चालण्याकरिता आपण काय केले पाहिजे? देव प्रकट होण्याची वाट बघणाऱ्या सर्वांना अशा प्रकारच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. तुम्ही सर्वांनीच कितीतरी प्रसंगी या प्रश्नांचा उहापोह केला असेल—पण मग त्याची फलनिष्पत्ती काय होती? देव कोठे प्रकट झाला? देवाची पदचिन्हे कोठे आहेत? अनेक लोक या प्रश्नाची उत्तरे अशा प्रकारे देतात: “जे देवाचे अनुसरण करतात त्यांच्यात देव प्रकट होतो आणि त्याची पदचिन्हे आपल्या मध्येच आहेत; हे इतके सोपे आहे!” कोणीही सुत्रबद्ध उत्तर देऊ शकतो, परंतु देव प्रकट झाला किंवा त्याची पदचिन्हे दिसली म्हणजे नेमके काय झाले, हे तुम्हाला खरोखरीच समजले आहे का? देवाचे प्रकट होणे म्हणजे त्याचे काम करण्याकरिता त्याने स्वत: पृथ्वीवर अवतरणे होय. जेव्हा एखाद्या युगाचा आरंभ करण्याचे आणि समापन करण्याचे काम करायचे असते तेव्हा तो मानवजातीत त्याची मुलभूत नैसर्गिक ओळख आणि प्रवृत्तीयासह, अवतीर्ण होतो. अशा प्रकारचे प्रकट होणे, हे काही उत्सवाच्या स्वरुपात नसते. हे काही चिन्ह, चित्र किंवा कोणत्याही प्रकारची दिव्य दृष्टी नाही आणि अगदी ही एक प्रकारची धार्मिक प्रक्रिया देखील नाही. हे अगदी खरे आणि वास्तविक सत्य आहे, त्याला स्पर्श करता येतो व त्याची कोणीही अनुभूती घेऊ शकतो. अशा प्रकारचे प्रकट होणे कोणत्याही प्रकारच्या हालचालींमधून किंवा कोणत्याही अल्पकालीन प्रकल्पाकरिता नसते: तर हे त्याच्या व्यवस्थापन योजनेतील एका पायरीकरिता असते. देवाचे प्रकट होणे नेहमीच अर्थपूर्ण असते आणि त्याच्या दैवी व्यवस्थापन योजनेशी संबंधित असते. येथे देवाचे हे प्रकट होणेहे, त्याचे मानवाला मार्गदर्शनकरण्याकरिता, पुढे नेण्याकरिता आणि ज्ञान प्रदान करण्याकरिता “दर्शन” देतो त्याहून फारच भिन्न आहे. देव प्रत्येकवेळी त्याच्या महान कार्याची एखादी पायरी पूर्ण करण्याकरिता स्वत:च स्वत:ला प्रकट करत असतो. हे काम इतर कोणत्याही युगातील कार्यापेक्षा भिन्न आहे. हे मानवाच्या कल्पनेच्या पलिकडचे आहे आणि मानवाने कधीही याची अनुभूती घेतलेली नाही. जुन्या युगाचा अंत आणि नवीन युगाचा प्रारंभ करण्याचे हे काम आहेआणि मानवाच्या पुनरुत्थानाकरिताचा नवा आणि सुधारित कार्य प्रकार आहे; इतकेच नाहीतर मानवाला नवीन युगात आणण्याचे हे कार्य आहे. देव प्रकट होण्याचा अर्थ हा आहे.
एकदा का तुम्हाला देवाचे स्वरुप काय असते ते समजले, की मग तुम्ही त्याची पदचिन्हे कशी शोधाल? या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे: जेथे कोठे देव प्रकट होतो, तेथे तुम्हाला त्याची पदचिन्हे सापडतील. असे स्पष्टीकरण अगदी सरळसोट वाटेल, परंतु प्रत्यक्षात ते इतके सोपे नाही, बऱ्याच लोकांना देव कोठे प्रकटहोतो, इतकेच नाही तर तो कोठे प्रकट होऊ इच्छितो किंवा त्याने कोठे प्रकट झाले पाहिजे हेच माहिती नसते. भावनेच्या आवेगात अनेकांचा असा विश्वास असतो की पवित्र आत्मे कार्यरत असतात तेथे तो प्रकट होतो. किंवा त्यांचा असा विश्वास असतो की जेथे उच्च प्रतिष्ठीत लोक राहतात तेथे देव प्रकट होतो. काही क्षणांकरिता हे विश्वास बरोबर आहे किंवा चूक, हे जरा बाजूला ठेवूया. अशा प्रश्नांची उकल करण्याकरिता सर्व प्रथम आपले उद्दिष्ट एकदम स्पष्ट असायला हवे: आपण आध्यात्मिक व्यक्तित्वांच्या इतकेच नाही तर प्रसिद्ध व्यक्तित्वांच्याही शोधात नाही: आपण देवाची पदचिन्हे शोधत आहोत. याच कारणास्तव, आपण देवाची पदचिन्हे शोधत असल्याने, आपण देवाच्या इच्छेचा, देवाच्या शब्दांचा, त्याच्या सुभाषितांचा शोध घेणे योग्य होईल, कारण जिथे कुठे देव नवे शब्द बोलतो, तिथे देवाचा आवाज आहे आणि जिथे कुठे देवाची पदचिन्हे आहेत, तिथे देवाचे कार्य आहे. जिथे कुठे देव अभिव्यक्त झाला आहे, तिथेच देव प्रकट होतो आणि जिथे देव प्रकट होतो, तिथेच सत्याचा वास असतो, तिथेच जीवनाचा मार्ग आणि जीवन अस्तित्वात असते. देवाची पदचिन्हे शोधत असतांना तुम्हाला पुढील शब्दांचा विसर पडला “देवच सत्य आहे, मार्ग आहे आणि जीवन आहे.” म्हणूनच अनेक लोकांचा, त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला तरीही त्यांना देवाची पदचिन्हे प्राप्त झाली आहेत यावर विश्वास बसत नाही आणि देव प्रकट झाला असल्याची बाबही त्यांच्या ध्यानात येत नाही. किती मोठी चूक! मानवाच्या कल्पनेप्रमाणे तर नाहीच पण मानवाच्या इच्छेनुसारही देव प्रकट होत नाही. देव जेव्हा त्याचे कार्य करतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या निवडी आणि त्याच्या स्वतःच्या योजना बनवतो; इतकेच नाही तर, त्याची स्वतःची उद्दिष्टे आणि त्याच्या स्वतःच्या पद्धती आहेत. तो जे काही काम करतो, त्याला त्याबद्दल मानवाशी चर्चा करण्याची किंवा त्याचा सल्ला घेण्याची गरज नसते. त्याहुनही अधिक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामाबद्दल सूचना देण्याची तर मुळीच गरज नसते. ही देवाची प्रवृत्ती आहे, अन प्रत्येकाने ही जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला देवाच्या प्रकट होण्याचे साक्षीदार होण्याची आस आहे, देवाच्या पदचिन्हांचे अनुसरण करायचे आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कल्पनांपासून फारकत घ्यावी लागेल. तुम्ही, देवा हे कर किंवा ते कर अशी मागणी करूच नका, इतकेच नाही तर तू त्याला तुझ्या मर्यादांमध्ये बांधू नकोस किंवा तुझ्या कल्पनेनुसार सिमीत करू नकोस. त्याऐवजी, तुम्ही स्वत:कडेच मागणी केली पाहिजे की तुम्हाला कशी देवाची पदचिन्हे शोधायचीच आहेत, देवाच्या प्रकटीकरणाचा स्वीकार कसा करायचाच आहे आणि देवाच्या नवीन कार्यास कसे वाहून घ्यायचेच, हे शोधायचे आहे: हेच मानवाने केले पाहिजे. मानव सत्य नाही आणि सत्य त्याच्या अखत्यारीतही नाही म्हणून त्याने शोध घ्यायचा, स्वीकार करायचा आणि आज्ञेचे पालन करायचे.
तुम्ही अमेरिकन, ब्रिटीश किंवा अन्य कोणत्याही देशाचे नागरिक असाल तरी, तुम्ही तुमच्या राष्ट्रीयत्वाच्या मर्यादा बाजूला ठेवून, स्वत: स्वत्वाच्या देखील पल्याड जाऊन आणि निर्मिती अस्तित्वाच्या ठिकाणाहून देवाच्या कार्याकडे पाहायला हवे. अशा प्रकारे, तुम्ही देवाच्या पदचिन्हांना मर्यादेत ठेवणार नाही. यामागील कारण म्हणजे आताशा अनेक लोक अशी कल्पना करत आहेत की देव विशिष्ट देशात किंवा विशिष्ट लोकांच्या मध्ये प्रकट होणे अशक्य आहे. देवाचे कार्य किती गहिरे महत्वाचे आहे आणि त्याचे प्रकट होणे किती महत्वाचे आहे! मानवाची इच्छा आणि विचार त्याची मोजदाद कशी करु शकतील? आणि म्हणूनच मी म्हणत आहे की देवाचे दर्शन घेण्याकरिता तुम्ही राष्ट्रीयत्वाच्या आणि वांशिकत्वाच्या कल्पनांच्या मर्यादा भेदल्या पाहिजेत. केवळ तेव्हाच तुम्ही तुमच्या स्वत:च्या कल्पनांच्या मर्यादेतून मुक्त होऊ शकाल, केवळ तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही देवाच्या आगमनाचे स्वागत करायला पात्र व लायक ठराल. अन्यथा तुम्ही निरंतर अंधकारात राहाल आणि कधीही देवाची मर्जी संपादन करू शकणार नाही.
देव हा सकल मानवजातीचा देव आहे. तो काही स्वत:ला कोणत्याही देशाची किंवा लोकांची खाजगी मालमत्ता समजत नाही, परंतु कोणत्याही स्वरुपाच्या, राष्ट्राच्या किंवा लोकांच्या मर्यादेत न राहता तो त्याच्या योजनेनुसार त्याचे काम करतच राहतो. कदाचित तू या स्वरुपाबद्दल कधीच कल्पना केलेली नाहीस, किंवा कदाचित या स्वरुपाबाबत तुझी वृत्ती नकारात्मक असेल किंवा कदाचित ज्या देशात देव स्वत:ला अवतीर्ण करेल आणि ज्या लोकांच्यामध्ये तो स्वत:ला प्रकट करेल त्यांच्याबाबत, प्रत्येकाने पक्षपात केलेला असेल आणि तो देश या पृथ्वीवरील सर्वात मागास ठरला असेल. तरीही देवाकडे स्वत:चा असा शहाणपणा आहे. त्याच्या महान शक्तीने, त्याच्या सत्याच्या सहाय्याने आणि त्याच्या स्वभावाने, खरोखरीच त्याला त्याच्याशी एकरूप झालेल्या लोकांचा समूह प्राप्त झाला आहे. एक परिपूर्ण गट तयार करण्याचा त्याचा मानस आहे, सर्व प्रकारच्या परिक्षा आणि यातना—दु:खातून, सर्व प्रकारच्या छळ सोसून तावून सलाखून निघालेला गट, त्याने जिंकलेला गट, अगदी अखेरपर्यंत त्याचे अनुसरण करेल असा गट. देवाच्या प्रकट होण्याचा उद्देश एका देशापुरता अथवा कोणत्याही आकारापुरता मर्यादित नाही, त्याचे प्रकट होणे त्याच्या योजनेनुरुप त्याचे काम करण्यास त्याला सक्षम करण्याकरिता आहे. ज्युडिआमध्ये देवाने जेव्हा शरीररुप धारण केले तसेच हे आहे: तेव्हा त्याचे उद्दिष्ट संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराकरिता सुळावर चढण्याचे काम पूर्ण करणे हा होता. तरीही ज्युंना असा विश्वास वाटत होता की असे करणे देवाला अशक्य आहे आणि त्यांनी विचार केला की देवाला शरीर धारण करून प्रभू येशूचे रुप घेणे अशक्य आहे. त्यांचे “अशक्य” हेच त्यांच्या देवाच्या विरोधाचा आणि प्रतिकाराचा आधार बनले आणि अंतिमत: त्याची परिणती इस्त्रायलच्या नाशाच्या दिशेने झाली. आज, अनेक लोकांनी अशाच प्रकारची चूक केली आहे. ते त्यांच्या सर्व शक्तीनिशी देवाच्या प्रकट होण्याची शक्यता घोषित करतात, तरीही त्याच वेळी त्याच्या प्रकटीकरणाची निर्भत्सना करतात; त्यांचे “अशक्य” पुन्हा एकदा त्यांच्या कल्पनाशक्तीच्या मर्यादेत देवाचे प्रकटीकरण सिमीत करतात. तसेच देवाच्या शब्दांबाबत हसून टर उडवताना मी अनेक लोकांना पाहिले आहे. परंतु हे हसणे ज्यूंची निर्भत्सना आणि ईश्वरनिंदा यापेक्षा काही वेगळे आहे का? सत्य समोर असतांना तुम्ही लोक त्याविषयी आदरभाव ठेवत नाही, त्याहुनही कमी म्हणजे सत्याची आस असण्याची वॄत्तीच तुम्हा लोकांमध्ये नाही. तुम्ही करता काय तर तारतम्य न ठेवता अभ्यास आणि सुखेनैव चिंता न करता वाट पाहता. अशा प्रकारे आणि अभ्यासकरून व वाट पाहून तुम्हाला काय प्राप्त होईल? तुम्हाला वाटते का की देव तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करेल? तू देवाच्या बोलांची पारख करू शकत नाहीस, मग देवाच्या प्रकटीकरणाचे साक्षीदार होण्यास तू कसा काय पात्र ठरशील? जेथे कोठे देव प्रकट होतो, तेथे सत्य व्यक्त होते आणि तेथेच देवाचा आवाज असतो. जे सत्याचा स्वीकार करू शकतात तेच देवाचा आवाज ऐकण्यास सक्षम असतात आणि असेच लोक देवाच्या प्रकटीकरणाचे साक्षीदार होण्यास पात्र असतात. तुझ्या धारणांचा त्याग कर! स्वत:ला एकदम शांत कर आणि काळजीपूर्वक हे शब्द वाच. जर तुला सत्याची आस असेल, देव तुला ज्ञान देईल आणि तुला त्याची इच्छा आणि शब्द समजतील. “अशक्य” बाबतची तुमची मते सोडून द्या! एखादी गोष्ट अशक्य आहे असा लोकांचा जितका जास्त विश्वास असेल तितकीच ते घडण्याची शक्यता वाढते, कारण देवाचा शहाणपणा स्वर्गाहूनही उच्च आहे, देवाचे विचार मानवाच्या विचारापेक्षा मोठे आहेत आणि देवाचे कार्य मानवाच्या विचारांच्या आणि इच्छांच्या पलिकडचे आहे. एखादी गोष्ट जितकी अशक्य वाटते, तितका त्यात सत्याचा शोध घेता येऊ शकतो. गोष्ट जितकी मानवाच्या इच्छा आणि कल्पनाशक्तीच्या पल्याडची असते तितकी त्यामध्ये देवाची इच्छा असते. याचे कारण देव स्वत:ला कोठे प्रकट करतो याने काहीही फरक पडत नाही, देव हा शेवटी देव आहे आणि त्याचे मूलतत्व, तो कोठे आणि कशा रितीने प्रकट होतो यामुळे कधीही बदलत नाही. देवाची पदचिन्हे कोठे उमटलीत याने त्याच्या स्वभावात काहीही फरक पडत नाही आणि देवाची पदचिन्हे कोठेही उमटली असली तरी देखील हा अखिल मानवमात्राचा देव आहे, जसे येशू केवळ इस्त्रायली लोकांचाच देव आहे असे नाही, तर आशिया, युरोप आणि अमेरिका येथील सर्वांचाच देव आहे, इतकेच नाही तर संपूर्ण विश्वाचा एक आणि एकमेव देव आहे. चला तर मग देवाची इच्छा काय आहे आणि त्याच्या शब्दात तो कोठे प्रकट होणार आहे, याचा शोध घेऊया आणि त्याच्या पावलांच्या बरोबरीने चालूया! देव म्हणजे सत्य, मार्ग आणि जीवन आहे. त्याचे शब्द आणि त्याचे प्रकट होणे एकाचवेळी अस्तित्वात असतात आणि त्याची स्थिर प्रवृत्ती आणि पदचिन्हे सदा सर्वकाळ मानवजातीकरिता खुली आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला आशा आहे या शब्दांमध्ये तुम्हाला देवाचे स्वरुप दिसेल, नव्या युगात मुशाफिरी करतांना तुम्ही त्याच्या पदचिन्हांचे अनुसरण सुरू करा आणि त्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी त्याने तयार केलेल्या सुंदर अशा नव्या स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रवेश करा.