दुष्टांना नक्कीच शिक्षा केली जाईल

तुम्ही जे काही करता त्या सर्वांमध्ये तुम्ही नीतिमत्त्व आचरणात आणता का आणि तुमच्या सर्व कृती देवाच्या नजरेत येत आहेत का या दोन्ही गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी स्वतःमध्ये डोकावून पहा: देवावर विश्वास ठेवणारे लोक त्यांचे व्यवहार ज्या तत्त्वाद्वारे करतात ते हेच तत्त्व आहे. तुम्ही देवाला संतुष्ट करण्यास सक्षम आहात व तुम्ही देवाचे संगोपन आणि संरक्षण स्वीकारता म्हणून तुम्हाला नीतिमान म्हटले जाईल. देवाच्या नजरेत, जे लोक देवाचे संगोपन, संरक्षण व परिपूर्णता स्वीकारतात आणि जे त्याच्याद्वारे प्राप्त केले जातात ते नीतिमान आहेत व तो त्या सर्वांना मौल्यवान मानतो. तुम्ही देवाची सध्याची वचने जितकी जास्त स्वीकाराल, तितके जास्त तुम्ही देवाची इच्छा स्वीकारण्यास आणि समजून घेण्यास सक्षम व्हाल व त्यामुळे तुम्ही देवाच्या सांगण्याप्रमाणे जगून त्याच्या आवश्यकता पूर्ण करू शकाल. ही तुम्हा लोकांसाठी देवाने सोपवलेली कामगिरी आहे आणि तुम्हा सर्वांना ती साध्य करता आली पाहिजे. जर तुम्ही देवाचे मूल्यांकन करण्यासाठी व मर्यादा घालण्यासाठी तुमच्या स्वतःच्या धारणा वापरत असाल, जसे की देव हा मातीचा एक न बदलणारा पुतळा आहे आणि जर तुम्ही देवाला पूर्णपणे बायबलच्या चौकटीतूनच पाहिले व त्याला मर्यादित कार्यकक्षेत समाविष्ट केले, तर हे सिद्ध होते की तुम्ही देवाची निंदा केली आहे. कारण जुन्या कराराच्या युगातील यहुद्यांनी देवाला एक निश्चित स्वरूपाची मूर्ती मानली जी त्यांनी त्यांच्या अंतःकरणात धारण केली, जणू काही केवळ देवालाच मशीहा म्हणता येईल आणि ज्याला मशीहा म्हटले गेले तोच देव असू शकतो, कारण मानवजातीने तो (निर्जीव) मातीचा पुतळा आहे असे मानून देवाची सेवा व उपासना केली, त्यांनी त्या काळातील येशूला वधस्तंभावर खिळवले, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली—अशा प्रकारे निर्दोष येशूला मृत्यूदंड देण्यात आला. देव कोणत्याही गुन्ह्यात दोषी नव्हता, तरीही मनुष्याने त्याला सोडण्यास नकार दिला आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा आग्रह धरला व म्हणून येशूला वधस्तंभावर खिळवण्यात आले. देव अपरिवर्तनीय आहे यावर मनुष्य नेहमी विश्वास ठेवतो आणि बायबल या एकाच पुस्तकाच्या आधारे त्याची व्याख्या करतो, की जणू काही मनुष्याला देवाच्या व्यवस्थापनाची पूर्ण समज आहे, जणू काही देव जे काही करतो ते मनुष्य त्याच्या हाताच्या तळहातावर ठेवल्याप्रमाणे पाहू शकतो. लोक अतिशय मूर्ख असतात, अतिशय गर्विष्ठ असतात व त्या सर्वांमध्ये अतिशयोक्तिची उपजत आवड असते. तुझे देवाबद्दलचे ज्ञान कितीही मोठे असले, तरीही मी अजूनही म्हणतो, की तू देवाला ओळखत नाहीस, तू अशी व्यक्ती आहेस जी देवाचा सर्वात जास्त विरोध करते आणि तू देवाचा निषेध केला आहेस, कारण तू देवाच्या कार्याचे पालन करण्यास व देवाने परिपूर्ण बनवण्याच्या मार्गावर चालण्यास पूर्णपणे असमर्थ आहात. देव मनुष्याच्या कृतींनी कधीच समाधानी का होत नाही? कारण मनुष्य देवाला ओळखत नाही, कारण त्याच्या पुष्कळ धारणा आहेत आणि त्याचे देवाबद्दलचे ज्ञान कोणत्याही प्रकारे वास्तविकतेशी जुळणारे नाही, परंतु ते लक्षात न घेता तो नीरसपणे त्याच विषयांची तशीच पुनरावृत्ती करतो व प्रत्येक परिस्थितीसाठी तोच दृष्टिकोन वापरतो. आणि म्हणून, आज पृथ्वीवर आलेल्या देवाला मनुष्याने पुन्हा एकदा वधस्तंभावर खिळले आहे. क्रूर मानवजात! कानाडोळा करणे व कारस्थान करणे, दुसऱ्याकडून चोरणे आणि हिसकावून घेणे, प्रसिद्धी व संपत्तीसाठी धडपड, एकमेकांच्या कत्तली करणे—हे कधी संपेल तरी का? देवाने शेकडो-हजारो वचने उच्चारली असली तरीही, कोणीही ताळ्यावर आलेला नाही. लोक त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींसाठी, त्यांच्या कारकिर्दीसाठी, भविष्यातील शक्यतांसाठी, पदासाठी, बढाईसाठी आणि पैशासाठी, अन्न, वस्त्र व देह यांच्यासाठी कार्य करतात. पण असा कोणीएक आहे का, की ज्याची कृती खऱ्या अर्थाने देवासाठी आहे? देवासाठी कृती करणाऱ्यांमध्येही देवाला ओळखणारे फार थोडे आहेत. स्वतःच्या हितासाठी कृती न करणारे असे किती लोक आहेत? स्वतःच्या पदाचे रक्षण करण्यासाठी इतरांवर अत्याचार न करणारे किंवा इतरांना बहिष्कृत न करणारे असे किती लोक आहेत? आणि म्हणून, देवाला असंख्य वेळा जबरदस्तीने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे व असंख्य क्रूर न्यायाधीशांनी देवाला दोषी ठरवले आहे आणि पुन्हा एकदा त्याला वधस्तंभावर खिळले आहे. किती जणांना ते खरोखर देवासाठी कार्य करतात म्हणून नीतिमान म्हणता येईल?

देवासमोर पवित्र जन किंवा नीतिमान व्यक्ती म्हणून परिपूर्ण होणे इतके सोपे आहे का? “या पृथ्वीवर कोणीही नीतिमान नाहीत, नीतिमान या जगात नाहीत” हे विधान सत्य आहे. जेव्हा तुम्ही देवासमोर येता, तेव्हा तुम्ही काय परिधान करत आहात याचा विचार करा, तुमचा प्रत्येक शब्द आणि कृती, तुमचा प्रत्येक विचार व कल्पना आणि तुम्ही दररोज पाहत असलेली स्वप्नेदेखील विचारात घ्या—ते सर्व तुमच्या स्वतःसाठी आहे. हीच खरी स्थिती नाही का? “नीतिमत्त्व” याचा अर्थ इतरांना दान देणे असा नाही, याचा अर्थ आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करणे असा नाही व याचा अर्थ भांडणे आणि विवाद किंवा लुटमार करणे व चोरी करण्यापासून दूर राहणे असा नाही. नीतिमत्त्वाचा अर्थ म्हणजे देवाने सोपवलेल्या कामगिरीला आपले कर्तव्य मानणे आणि देवाच्या नियोजित कृतीचे व व्यवस्थेचे पालन हे, वेळ किंवा स्थान विचारात न घेता, स्वर्गातून पाठवलेले जिवितकार्य म्हणून करणे, जसे प्रभू येशूने सर्व काही केले होते त्याप्रमाणे करणे. देवाने सांगितलेले हेच ते नीतिमत्त्व आहे. लोट याला नीतिमान म्हणता येईल कारण त्याने स्वतःच्या नफ्या-तोट्याचा विचार न करता देवाने पाठवलेल्या दोन देवदूतांना वाचवले; त्या वेळी त्याने जे केले ते नीतिमान म्हटले जाऊ शकते, परंतु त्याला नीतिमान पुरुष म्हणता येणार नाही. कारण लोट याने देवाला पाहिल्यामुळेच त्याने देवदूतांच्या बदल्यात त्याच्या दोन मुली दिल्या, परंतु भूतकाळातील त्याचे सर्व वर्तन नीतिमानतेसाठी गणले गेले नाही. आणि म्हणून मी म्हणतो “या पृथ्वीवर कोणीही नीतिमान नाहीत.” अगदी पुनर्प्राप्तीच्या प्रवाहामधील सदस्यांनादेखील नीतिमान म्हणता येणार नाही. तुझ्या कृती कितीही चांगल्या असल्या, तू देवाच्या नावाचा कितीही गौरव करताना दिसत असशील, इतरांना मारत नसशील किंवा शाप देत नसशील अथवा लुटत नसशील किंवा इतरांना लुबाडत नसशील, तरीही तुला नीतिमान म्हणता येणार नाही, कारण एक सामान्य मनुष्य असेच करण्यास सक्षम असतो. सध्या मुख्य गोष्ट म्हणजे तू देवाला ओळखत नाहीस. हे फक्त असे म्हणता येईल, की सध्या तुझ्याकडे थोडीफार सामान्य मानवता आहे, परंतु देवाने सांगितलेल्या नीतिमत्त्वाचे कोणतेही घटक नाहीत व म्हणून तू जे काही करत आहेस ते तू देवाला ओळखतोस हे सिद्ध करण्यास सक्षम नाही.

पूर्वी, जेव्हा देव स्वर्गात होता, तेव्हा मनुष्याने अशा प्रकारे व्यवहार केला जो देवाप्रती फसवा होता. आज, देव मनुष्यामध्ये आहे—याला किती वर्षे झाली हे कोणालाच माहीत नाही—तरीही गोष्टी करताना मनुष्य अजूनही त्याच हालचाली करत आहे आणि त्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. मनुष्य त्याच्या विचारात फार मागासलेला नाही का? यहूदाच्या बाबतीतही असेच होते: येशू येण्यापूर्वी, यहूदा त्याच्या भावांना व बहिणींना फसवण्यासाठी खोटे बोलत असे आणि येशू आल्यानंतरही तो बदलला नाही; तो येशूला अजिबात ओळखत नव्हता व शेवटी त्याने येशूचा विश्वासघात केला. तो देवाला ओळखत नव्हता म्हणून हे घडले नाही का? जर, आज, तुम्ही अजूनही देवाला ओळखत नसाल, तर हे शक्य आहे की तुम्ही दुसरा यहूदा व्हाल आणि हे असेच पुढे चालले तर दोन हजार वर्षांपूर्वीच्या कृपेच्या युगात येशूला वधस्तंभावर खिळले गेल्याची शोकांतिका पुन्हा घडेल. तुमचा यावर विश्वास नाही का? ही वस्तुस्थिती आहे! सध्या, बहुसंख्य लोकांची अशीच परिस्थिती आहे—मी हे थोडे लवकर सांगत आहे—व असे लोक सर्व यहूदाची भूमिका बजावत आहेत. मी मूर्खपणाचे बोलत नाही आहे, परंतु वस्तुस्थितीच्या आधारावर बोलतो—आणि तुझी खात्री पटवता येणार नाही. पुष्कळ लोक नम्रतेचे ढोंग करत असले, तरी त्यांच्या अंतःकरणात भावनेचे तरंग उठत नाहीत, ते दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके याशिवाय दुसरे काहीच नसते. सध्या चर्चमध्ये असे बरेच आहेत व तुम्हा लोकांना असे वाटते, की मी याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहे. आज, माझा आत्मा माझ्यासाठी निर्णय घेतो आणि माझ्यासाठी साक्ष देतो. मला काहीच माहीत नाही असे तुला वाटते का? तुमच्या अंतःकरणातील भ्रष्ट विचार, तुम्ही तुमच्या अंतःकरणात ठेवलेल्या गोष्टींबद्दल मला काहीच समजत नाही असे तुला वाटते का? देवाला हरवणे इतके सोपे आहे का? तुम्हाला वाटते, की तुम्ही त्याच्याशी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने वागू शकता? पूर्वी, मला काळजी वाटत होती, की तुमची कोंडी होऊ नये, म्हणून मी तुम्हाला स्वातंत्र्य देत राहिलो, पण मानवजात मी त्यांच्याशी चांगले वागतो हे सांगू शकली नाही व मी त्यांना एक बोट दिले तर त्यांनी माझा गळा धरला. आपापसात एकमेकांना विचारा: मी बहुतकरुन कधीही कोणाशीही सामना केला नाही आणि बहुतकरुन कधीही कोणालाही थोडेफारदेखील फटकारले नाही—तरीही मी मनुष्याच्या प्रेरणा व धारणा याबद्दल अगदी स्पष्ट आहे. स्वतः देव, ज्याविषयी देव साक्ष देतो, तो मूर्ख आहे असे तू समजतोस का? त्या बाबतीत, मी म्हणतो की तू पूर्णपणे आंधळा आहेस! मी तुला उघडे पाडणार नाही पण तू किती भ्रष्ट होऊ शकतोस ते पाहू या. तुझे हुशारीचे डावपेच तुला वाचवू शकतात का किंवा देवावर प्रेम करण्याचा तुझा सर्वोत्तम प्रयत्न तुला वाचवू शकतो का, ते आपण पाहू या. आज, मी तुला दोषी ठरवणार नाही; तो तुला कशी शिक्षा देतो हे पाहण्यासाठी आपण देवाच्या वेळेपर्यंत थांबू या. माझ्याकडे आता तुझ्याशी शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी वेळ नाही आणि मी फक्त तुझ्यासाठी माझे मोठे कार्य लांबवण्यासदेखील तयार नाही. देवाला तुझ्याशी व्यवहार करायला जो वेळ लागेल त्यासाठी तुझ्यासारखा अर्धवट वाढ झालेला माणूस पात्र नाही—म्हणून आपण पाहू या, की तू किती दुराचारी बनू शकतोस. असे लोक देवाविषयी किंचितही ज्ञान मिळवत नाहीत किंवा त्यांच्यात त्याच्याबद्दल किंचितही प्रेम नाही व तरीही देवाने त्यांना नीतिमान म्हणावे अशी त्यांची इच्छा आहे-हा विनोद नाही का? थोडके लोकच खरोखर प्रामाणिक आहेत, म्हणून मी आता मनुष्याला जीवन प्रदान करत राहण्याकडे लक्ष केंद्रित करेन. मी जे केले पाहिजे तेच मी आज करेन, परंतु भविष्यात मी प्रत्येक व्यक्तीला त्यांनी केलेल्या कृत्यानुसार योग्य ती शिक्षा देईन. मला जे काही सांगायचे आहे ते मी सांगितले आहे, कारण मी नेमके हेच कार्य करतो. मी फक्त तेच करतो जे मला करायला हवे आणि जे करू नये ते करत नाही. तरी सुद्धा, मला आशा आहे की तुम्ही चिंतनात अधिक वेळ घालवाल: देवाबद्दलचे तुझे ज्ञान नेमके किती खरे आहे? देवाला पुन्हा एकदा वधस्तंभावर खिळणारा तू आहेस का? माझी शेवटची वचने ही आहेत: जे देवाला वधस्तंभावर खिळवतात त्यांचा धिक्कार असो.

मागील:  ज्यांना परिपूर्ण केले गेले आहे त्यांच्यासाठी वचने

पुढील:  देवाच्या इच्छेशी मेळ साधून सेवा कशी करावी

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger