जे ख्रिस्ताशी विजोड आहेत ते नक्कीच देवाचे विरोधक आहेत
सर्व लोक येशूचे खरे रूप पाहण्याची इच्छा बाळगतात आणि त्याच्याबरोबर राहण्याची सर्वांची इच्छा असते. मला वाटत नाही, की कोणीही भाऊ किंवा बहीण असे म्हणेल, की त्यांना येशूला पाहण्याची किंवा त्याच्यासोबत राहण्याची इच्छा नाही. तुम्ही येशूला पाहण्याआधी—तुम्ही देह धारण केलेल्या देवाला पाहण्यापूर्वी—तुम्ही बहुधा सर्व प्रकारचे कल्पनारंजन कराल, उदाहरणार्थ, येशूचे स्वरूप, त्याची बोलण्याची पद्धत, त्याची जीवनशैली, आणि असेच काही. पण एकदा तुम्ही त्याला खरोखर पाहिले, की तुमच्या कल्पना झपाट्याने बदलतील. असे का? तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? मनुष्याच्या विचाराकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, ते सत्य आहे—परंतु त्याहूनही अधिक, ख्रिस्ताचे मूलतत्त्व मनुष्याद्वारे बदलले जाऊ शकत नाही. तुम्ही ख्रिस्ताला अमर किंवा ज्ञानी पुरुष मानता, परंतु कोणीही त्याला दैवी मूलतत्त्व धारण करणारा सामान्य मनुष्य मानत नाही. देवाला पाहण्यासाठी रात्रंदिवस तळमळणारे अनेक जण खरे तर देवाचे शत्रू आहेत आणि त्याच्याशी विजोड आहेत. ही मनुष्याची चूक नाही का? आताही तुम्हाला वाटते, की तुमचा विश्वास व निष्ठा तुम्हाला ख्रिस्ताचा चेहरा पाहण्यास पात्र बनवण्यासाठी पुरेशी आहे, परंतु मी तुम्हाला अधिक व्यावहारिक गोष्टींसह सुसज्ज होण्याचा सल्ला देतो! कारण भूतकाळात, वर्तमानात आणि भविष्यकाळात, ख्रिस्ताच्या संपर्कात आलेल्यांपैकी बरेच जण अयशस्वी झाले आहेत किंवा अयशस्वी होतील; ते सर्व परुश्यांची भूमिका बजावतात. तुमच्या अपयशाचे कारण काय आहे? तुमच्या धारणांमधील देव उदात्त आणि कौतुकास पात्र आहे हेच त्याचे कारण आहे. पण सत्य मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नसते. ख्रिस्त उदात्त नाहीच, तर तो विशेषकरून लहानही आहे; तो केवळ मनुष्यच नाही तर तो एक सामान्य मनुष्य आहे; तो स्वर्गात जाऊ शकत नाही, तसेच तो पृथ्वीवर मुक्तपणे फिरू देखील शकत नाही. आणि असे असल्याने, लोक त्याच्याशी एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे वागतात; जेव्हा ते त्याच्याबरोबर असतात तेव्हा ते त्याच्याशी अनौपचारिकपणे वागतात व एकीकडे “खरा ख्रिस्त” येण्याची वाट पाहत असतानाच, त्याच्याशी अनवधानाने बोलतात. आधीच आलेल्या ख्रिस्ताला तुम्ही एक सामान्य मनुष्य समजता आणि त्याची वचने ही एखाद्या सामान्य मनुष्याची वचने समजता. या कारणास्तव, तुम्हाला ख्रिस्ताकडून काहीही मिळालेले नाही आणि त्याऐवजी तुम्ही तुमची स्वतःची कुरूपता प्रकाशात पूर्णपणे उघड केली आहे.
ख्रिस्ताच्या संपर्कात येण्यापूर्वी, तुझा असा विश्वास असू शकतो, की तुझी प्रवृत्ती पूर्णपणे बदललेली आहे, तू ख्रिस्ताचा निष्ठावान अनुयायी आहेस, ख्रिस्ताचे आशीर्वाद घेण्यास तुझ्यापेक्षा योग्य कोणीही नाही—आणि अनेक रस्त्यांवरून प्रवास करून, खूप कार्य करून व भरपूर फळ मिळवून, सरतेशेवटी, तू नक्कीच मुकुट मिळवणाऱ्यांपैकी एक होशील. तरीही एक सत्य आहे जे तुला कदाचित माहीत नसेल: जेव्हा मनुष्य ख्रिस्ताला पाहतो, तेव्हा त्याची भ्रष्ट प्रवृत्ती आणि त्याची बंडखोरी व प्रतिकार उघड होतो व यावेळी उघडकीस आलेली बंडखोरी आणि प्रतिकार इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक संपूर्णतः व पूर्णपणे उघड होतो. कारण ख्रिस्त हा मनुष्याचा पुत्र आहे—मनुष्याचा पुत्र जो सामान्य माणुसकी धारण करतो—जिचा मनुष्य सन्मानही करत नाही किंवा आदरही करत नाही. देव देहात राहतो म्हणून मनुष्याची बंडखोरी इतक्या बारकाईने आणि इतक्या तपशीलवारपणे प्रकाशात आणली जाते. म्हणून माझे असे म्हणणे आहे, की ख्रिस्ताच्या आगमनाने मानवजातीतील सर्व बंडखोरी उघडकीस आणली आहे आणि मानवजातीच्या स्वभावाला स्पष्टपणे प्रकाशात आणले आहे. याला “वाघाला डोंगराच्या खाली उतरण्यासाठी आमिष दाखवणे” व “लांडग्याला त्याच्या गुहेतून बाहेर आणण्यासाठी आमिष दाखवणे” असे म्हणतात. तू देवाशी एकनिष्ठ आहेस असे म्हणण्याचे धाडस तुझ्यात आहे का? तू देवाप्रति संपूर्णतः आज्ञाधारक आहेस असे म्हणण्याचे धाडस तुझ्यात आहे का? तू बंडखोर नाहीस असे म्हणण्याचे धाडस तुझ्यात आहे का? काही जण म्हणतील: “जेव्हा जेव्हा देव मला नवीन परिस्थितींमध्ये टाकतो, तेव्हा मी नेहमीच कुरकुर न करता आज्ञा पाळतो आणि एवढेच नव्हे, तर मी देवाबद्दल कोणत्याही धारणा बाळगत नाही.” काही जण म्हणतील: “देव मला जे काही काम देतो ते मी माझ्या क्षमतेनुसार करतो व कधीही निष्काळजीपणा करत नाही.” अशा परिस्थितीत, मला तुम्हाला हे विचारायचे आहे: तुम्ही ख्रिस्तासोबत वास्तव्य करताना त्याच्याशी अनुरूप होऊ शकता का? आणि तुम्ही त्याच्याशी किती काळ अनुरूप राहाल? एक दिवस? दोन दिवस? एक तास? दोन तास? तुमची श्रद्धा प्रशंसनीय असू शकते, पण तुमच्याकडे चिकाटी फार नाही. तू खरोखर ख्रिस्तासोबत वास्तव्य केल्यानंतर, तुझी स्व-धार्मिकता आणि आत्मप्रौढी तुझ्या शब्दांतून आणि कृतींतून हळूहळू प्रकट होईल, त्याचप्रमाणे तुझ्या फाजील इच्छा, तुझी अवज्ञाकारी मानसिकता आणि असंतोष स्वाभाविकपणे प्रकट होईल. शेवटी, जसे पाणी व अग्नी परस्परांशी विसंगत आहे तसा तू ख्रिस्ताशी विसंगत होत जाशील तोपर्यंत, तुझा अहंकार अधिकाधिक वाढेल आणि नंतर तुझा स्वभाव पूर्णपणे उघड होईल. त्या वेळी, तुझ्या धारणा लपवल्या जाऊ शकणार नाहीत, तुझ्या तक्रारी देखील स्वाभाविकपणे बाहेर येतील व तुझी भ्रष्ट माणुसकी पूर्णपणे उघड होईल. तरीही, तू मात्र स्वतःची बंडखोरी कबूल करण्यास नकार देतोस, व त्याऐवजी असा विश्वास ठेवतोस, की अशा ख्रिस्ताचा स्वीकार करणे मनुष्यासाठी सोपे नाही, तो मनुष्यासाठी खूपच कडक आहे आणि जर तो अधिक दयाळू ख्रिस्त असता तर तू पूर्णपणे अधीन झाला असतास. तुमचा विश्वास आहे, की तुमची बंडखोरी न्याय्य आहे आणि जेव्हा तो तुम्हाला खूप त्रास देतो तेव्हाच तुम्ही त्याच्याविरुद्ध बंड करता. तुम्ही एकदाही विचार केला नाही, की तुम्ही ख्रिस्ताला देव म्हणून पाहत नाही, त्याची आज्ञा पाळण्याचा तुमचा हेतू नाही. उलट, तुझ्या स्वतःच्या इच्छेनुसार ख्रिस्ताने कार्य करावे असा हट्ट धरतोस व तुझ्या स्वतःच्या विचारांशी विरूद्ध अशी एखादी गोष्ट त्याने करताच, तो देव नसून मनुष्य आहे असे तू मानतोस. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी त्याच्याशी अशा प्रकारे युक्तीवाद केलेला नाही का? शेवटी, तुमचा विश्वास कोणावर आहे? आणि तुम्ही कोणत्या मार्गाने पाठपुरावा करत आहात?
तुमची नेहमी ख्रिस्ताला पाहण्याची इच्छा असते, पण माझी तुम्हाला विनंती आहे, की तुम्ही स्वतःला इतका उच्च सन्मान देऊ नका; ख्रिस्ताला कोणीही पाहू शकतो, परंतु माझे असे म्हणणे आहे, की ख्रिस्ताला पाहण्यास कोणीही योग्य नाही. कारण मनुष्याचा स्वभाव दुष्टपणा, अहंकार आणि बंडखोरीने भरलेला आहे, ज्या क्षणी तू ख्रिस्ताला पहाशील, तेव्हा तुझा स्वभाव तुझा नाश करेल व तुला मृत्युदंड देईल. भावासोबत (किंवा बहिणीसोबत) तुझा सहवास तुझ्याबद्दल फारसे काही दाखवणार नाही, परंतु तू ख्रिस्तासोबत सहवास करतोस तेव्हा ते इतके सोपे नसते. तुझ्या धारणा कधीही मूळ धरू शकतात, तुझ्या अहंकाराला धुमारे फुटू लागतात आणि तुझी बंडखोरी सुरू होऊ शकते. अशा माणुसकीने, तू ख्रिस्ताशी सहवास करण्यास योग्य कसे असू शकतोस? प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणाला तू त्याला देव मानण्यास खरोखरच सक्षम आहेस का? तुला खरोखरच देवाच्या अधीन राहण्याची वास्तविकता लाभेल का? तुम्ही दृश्य ख्रिस्ताला मनुष्य मानत असताना, तुमच्या अंतःकरणातील उदात्त देवाची यहोवा म्हणून उपासना करता. तुमची संवेदना खूप हीन व तुमची माणुसकी खूप हिणकस आहे! तुम्ही नेहमी ख्रिस्ताकडे देव म्हणून पाहण्यास असमर्थ आहात; केवळ अधूनमधून, जेव्हा तुम्हाला आवडेल, तेव्हा तुम्ही त्याची देव म्हणून उपासना करता. म्हणूनच माझे असे म्हणणे आहे, की तुम्ही देवावर विश्वास ठेवणारे नाही, तर ख्रिस्ताविरुद्ध लढणाऱ्या जत्थ्याचे साथीदार आहात. इतरांबद्दल दयाळूपणा दाखवणाऱ्या मनुष्यांना देखील त्यांच्या कार्याची किंमत मिळते आणि तरीही ख्रिस्ताने, ज्याने तुमच्यामध्ये एवढे कार्य केले आहे, त्याला मनुष्याचे प्रेम किंवा त्याचा मोबदला व अधीनता मिळाली नाही. ही हृदयद्रावक गोष्ट नाही का?
असे असू शकते, की तू देवावर श्रद्धा ठेवत असलेल्या सर्व वर्षांमध्ये, तू कधीही कोणाला शाप दिलेला नाहीस किंवा वाईट कृत्य केले नाहीस, तरीही ख्रिस्ताच्या सहवासात तू सत्य बोलू शकत नाहीस, प्रामाणिकपणे वागू शकत नाहीस किंवा ख्रिस्ताच्या वचनाचे पालन करू शकत नाहीस; त्या बाबतीत, माझे असे म्हणणे आहे, की तू जगातील सर्वात अभद्र आणि आकसपूर्ण व्यक्ती आहेस. तू तुझे नातेवाईक, मित्र, पत्नी (किंवा पती), मुलगे व मुली आणि पालकांप्रती असामान्यपणे दयाळू व समर्पित असशील आणि इतरांचा कधीच फायदा घेत नसशील, परंतु जर तू ख्रिस्ताशी अनुरूपता साधण्यास असमर्थ असशील, जर तू त्याच्याशी सुसंवाद साधू शकत नसशील, तर मग तू तुझे सर्व काही तुझ्या शेजाऱ्यांच्या मदतीसाठी खर्च केलेस अथवा तुझे वडील, आई व तुझ्या घरातील सदस्यांची व्यवस्थित काळजी घेतलीस, तरीही मी म्हणेन, की तू अजूनही दुष्टच आहेस आणि एवढेच नव्हे, तर धूर्त, कावेबाज व्यक्ती आहेस. फक्त तू इतरांशी जुळवून घेतोस किंवा तू काही चांगली कृत्ये करतोस म्हणून स्वतःला ख्रिस्ताशी अनुरूप समजू नकोस. तुझा परोपकारी हेतू स्वर्गातील गैरमार्गाने प्राप्त केलेल्या आशीर्वादांना पूर्ण करू शकेल असे तुला वाटते का? काही चांगली कृत्ये करणे हे तुझ्या आज्ञाधारकतेला पर्याय आहे असे तुला वाटते का? तुमच्यापैकी कोणीही कारवाई होणे आणि दोषांची छाटणी ह्या बाबी स्वीकारण्यास सक्षम नाही व तुम्हा सर्वांना ख्रिस्ताच्या सर्वसामान्य मानवतेला सामावून घेणे कठीण वाटते, तरीही तुम्ही सतत देवाविषयी तुमच्या आज्ञाधारकतेचे तुणतुणे वाजवत आहात. तुमच्यासारखी श्रद्धा चोख प्रतिशोध आणेल. काल्पनिक भ्रमांमध्ये गुंतणे आणि ख्रिस्ताला पाहण्याची इच्छा बाळगणे थांबवा, कारण तुमची पातळी खूप कमी आहे, इतकी कमी की तुम्ही त्याला पाहण्यासही पात्र नाही. जेव्हा तू तुझ्या बंडखोरीपासून पूर्णपणे मुक्त होशील व ख्रिस्ताशी अनुरूप होण्यास सक्षम असशील, त्या क्षणी देव तुझ्यासमोर नैसर्गिकरीत्या प्रकट होईल. जर तू दोष-छाटणी किंवा न्याय्य निवाडा यांतून न जाता देवाला भेटायला गेलास, तर तू नक्कीच देवाचा विरोधक होशील व तुझा नाश होईल. मनुष्याचा स्वभाव मूळातच देवाशी शत्रुत्वाचा आहे, कारण सर्व मनुष्यमात्र सैतानाच्या सर्वात गहन भ्रष्टाचाराच्या अधीन झाले आहात. मनुष्याने आपल्या स्वतःच्या भ्रष्टतेतून देवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला, तर यातून काहीही चांगले होणार नाही हे निश्चित आहे; त्याची कृती आणि वचने निश्चितपणे प्रत्येक वळणावर त्याचा भ्रष्टाचार उघड करतील व देवाशी संबंध ठेवताना त्याची बंडखोरी त्याच्या प्रत्येक पैलूतून प्रकट होईल. मनुष्य नकळत ख्रिस्ताला विरोध करायला, ख्रिस्ताला फसवायला आणि ख्रिस्ताचा त्याग करायला सुरुवात करतो; जेव्हा हे घडते, तेव्हा मनुष्य आणखी अस्थिर व डळमळीत अवस्थेत असेल आणि, हे असेच चालू राहिल्यास तो शिक्षेला पात्र होईल.
काहींचा असा विश्वास असेल, की जर देवासोबतचा सहवास इतका धोकादायक असेल, तर देवाला दूर ठेवणे अधिक शहाणपणाचे ठरेल. अशा लोकांना काय लाभू शकते? ते देवाशी एकनिष्ठ राहू शकतात का? निःसंशयपणे, देवासोबत सहवास करणे खूप कठीण आहे—परंतु मनुष्य भ्रष्ट आहे हे त्याचे कारण आहे, देव त्याच्याशी संबंध ठेवण्यास असमर्थ आहे म्हणून नाही. स्वतःला जाणून घेण्याच्या सत्यासाठी अधिक प्रयत्न करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम राहील. तुमच्यावर देवाची कृपा का झाली नाही? तुमची प्रवृत्ती त्याच्यासाठी तिरस्करणीय का आहे? तुमच्या बोलण्याने त्याचा तिरस्कार का जागृत होतो? तुम्ही थोडी निष्ठा दाखवताच, तुम्ही स्वतःचे गुणगान गाता, आणि थोड्या योगदानासाठी बक्षीसाची मागणी करता; जेव्हा तुम्ही आज्ञाधारकपणा दाखवता तेव्हा तुम्ही इतरांना तुच्छतेने पाहता व काही क्षुल्लक कार्य पूर्ण केल्यावर देवाचा तिरस्कार करता. देवाच्या प्राप्तीद्वारे, तुम्ही पैसे, भेटवस्तू आणि प्रशंसा यांची मागणी करता. एक किंवा दोन नाणी देताना तुमच्या हृदयाला वेदना होतात; जेव्हा तुम्ही दहा नाणी देता, तेव्हा तुम्हाला आशीर्वाद व विशेष वर्तणूक मिळण्याची इच्छा असते. तुमच्यासारख्या माणुसकीविषयी बोलणे किंवा ऐकणे पूर्णपणे अवमानकारक आहे. तुमच्या बोलण्यात आणि कृतीत काही प्रशंसनीय आहे का? जे त्यांचे कर्तव्य बजावतात व जे बजावत नाहीत; जे नेतृत्व करतात आणि जे अनुसरण करतात; जे देवाचे स्वागत करतात आणि जे करत नाहीत; जे देणगी देतात आणि जे देत नाहीत; जे उपदेश करतात व जे वचने स्वीकारतात आणि असे बरेच काही: असे सर्व लोक स्वतःची प्रशंसा करतात. तुम्हाला हे हास्यास्पद वाटत नाही का? तुमचा देवावर विश्वास आहे हे पूर्णपणे माहीत असूनही, तुम्ही देवाशी अनुरूप होऊ शकत नाही. तुम्ही काहीच योग्यता नसलेले आहात हे पूर्णपणे जाणत असतानाही, तुम्ही त्याच सर्व गोष्टीची बढाई मारणे सुरू ठेवता. तुमची संवेदना इतकी खालावली आहे, की तुमच्याकडे आता आत्मसंयम राहिलेला नाही असे तुम्हाला वाटत नाही का? अशा भावनेने, तुम्ही देवासोबत सहवास करण्यास कसे योग्य आहात? या क्षणी तुम्हाला स्वतःची भीती वाटत नाही का? तुमची प्रवृत्ती आधीच इतकी बिघडली आहे, की तुम्ही देवाशी अनुरूप होऊ शकत नाही. हे असे असल्याने तुमचा विश्वास हास्यास्पद नाही का? तुमचा विश्वास अर्थशून्य, नाही का? तू तुझ्या भविष्याकडे कसा जाणार आहेस? कोणता मार्ग धरायचा हे तू कसे निवडणार आहेस?