अपरिवर्तित प्रवृत्ती असणे म्हणजे देवाशी शत्रुत्व असणे आहे
अनेक हजार वर्षांच्या भ्रष्टाचारानंतर मनुष्य सुन्न आणि बधीर झाला आहे; तो राक्षस बनला आहे जो देवाचा विरोध करतो, इतका की देवाप्रति मनुष्याची बंडखोरी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नोंदवली गेली आहे व मनुष्य स्वतःदेखील त्याच्या बंडखोर वर्तनाचा संपूर्ण हिशोब देण्यास असमर्थ आहे—कारण सैतानाने मनुष्याला पूर्णपणे भ्रष्ट केले आहे आणि सैतानाने त्याला अशा प्रकारे चुकीच्या मार्गावर नेले आहे, की त्याला कुठे जावे हे माहीत नाही. आजही, मनुष्य देवाचा विश्वासघात करतो: जेव्हा मनुष्य देवाला पाहतो, तेव्हा तो त्याचा विश्वासघात करतो व जेव्हा तो देवाला पाहू शकत नाही, तेव्हादेखील तो त्याचा विश्वासघात करतो. असेही काही लोक आहेत ज्यांनी, देवाचे शाप आणि देवाचा क्रोध पाहिल्यानंतरही, त्याचा विश्वासघात केला. आणि म्हणूनच मी म्हणतो, की मनुष्याच्या तर्कशक्तीने त्याचे मूळ कार्य गमावले आहे व मनुष्याच्या सद्सद्विवेकबुद्धीनेदेखील त्याचे मूळ कार्य गमावले आहे. मी ज्या मनुष्याकडे पाहतो तो मानवी पोशाखातील पशू आहे, तो विषारी साप आहे आणि माझ्या डोळ्यांसमोर त्याने कितीही दयनीय बनण्याचा प्रयत्न केला, तरी मी त्याच्यावर कधीही दया दाखवणार नाही, कारण मनुष्याला काय चांगले व काय वाईट यातील फरक कळत नाही आणि खरे काय व खोटे काय यांच्यातील फरक कळत नाही. मनुष्याची भावना खूप क्षीण झाली आहे, तरीही तो आशीर्वाद मिळवू इच्छितो; त्याची माणुसकी इतकी नीच आहे, तरीही त्याला राजाचे सार्वभौमत्व मिळण्याची इच्छा आहे. अशा भावनेने तो कोणाचा राजा होऊ शकतो? अशी माणुसकी असलेला तो सिंहासनावर कसा बसू शकतो? मनुष्याला खरोखरच लाज नसते! तो एक गर्विष्ठ दुष्ट आहे! तुमच्यापैकी ज्यांना आशीर्वाद मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी मी सुचवतो, की तुम्ही आधी आरसा शोधा आणि तुमचे स्वतःचे कुरूप प्रतिबिंब पहा—राजा होण्यासाठी जे काही लागते ते तुझ्याकडे आहे का? आशीर्वाद मिळवू शकणार्याचा चेहरा तुझ्याकडे आहे का? तुझ्या प्रवृत्तीत थोडासाही बदल झालेला नाही व तू कोणतेही सत्य आचरणात आणले नाहीस, तरीही तुला उद्याचा सुंदर दिवस पाहण्याची इच्छा आहे. तू स्वतःचीच फसवणूक करत आहेस! अशा घाणेरड्या भूमीत जन्माला आलेल्या, मनुष्यावर समाजाचा गंभीर परिणाम झाला आहे, त्याच्यावर सरंजामी आचारसंहितेचा प्रभाव आहे आणि त्याला “उच्च शिक्षण संस्था” मध्ये शिकवले गेले आहे. मागासलेली विचारसरणी, भ्रष्ट नैतिकता, जीवनाकडे पाहण्याचा क्षुद्र दृष्टिकोन, जगण्याबद्दलचे तिरस्करणीय तत्त्वज्ञान, पूर्णपणे निरुपयोगी अस्तित्व व विकृत जीवनशैली आणि चालीरीती—या सर्व गोष्टींनी मनुष्याच्या हृदयामध्ये गंभीरपणे घुसखोरी केली आहे व त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीवर गंभीरपणे आक्रमण केले आहे. परिणामी, मनुष्य देवापासून अधिक दूर जातो आणि त्याला आधीपेक्षा अधिक विरोध करतो. मनुष्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस अधिक वाईट होत जाते व असा एकही मनुष्य नाही जो स्वेच्छेने देवासाठी काहीही सोडून देईल, असा एकही मनुष्य नाही जो स्वेच्छेने देवाची आज्ञा पाळेल किंवा असा एकही मनुष्य नाही जो स्वेच्छेने देवाचे स्वरूप शोधेल. त्याऐवजी, सैतानाच्या अधिपत्याखाली, सुखाचा पाठपुरावा करण्याशिवाय दुसरे काहीही करत नाही आणि मनुष्य चिखलाच्या भूमीत देहाच्या भ्रष्टतेच्या स्वाधीन होऊन राहतो. सत्य ऐकूनही, अंधारात राहणारे लोक ते आचरणात आणण्याचा कोणताही विचार करत नाहीत किंवा त्यांनी देवाचे स्वरूप पाहिले असले, तरीही त्याचा शोध घेण्याची त्यांची इच्छा नसते. एवढ्या भ्रष्ट मानवजातीला तारणाची संधी कशी असेल? इतकी अधोगती असलेली मानवजात प्रकाशात कशी जगू शकते?
मनुष्याच्या प्रवृत्तीतील बदलाची सुरुवात त्याच्या मूलतत्त्वाच्या ज्ञानाने आणि त्याच्या विचार, स्वभाव व मानसिक दृष्टिकोनातील बदलांद्वारे—मूलभूत बदलांद्वारे होते. अशा पद्धतीनेच मनुष्याच्या प्रवृत्तीत खरे बदल घडून येतील. मनुष्यामध्ये निर्माण झालेल्या भ्रष्ट प्रवृत्तींचे मूळ कारण सैतानाची फसवणूक, भ्रष्टाचार आणि विष आहे. मनुष्याला सैतानाने बांधून ठेवले आहे व त्यावर नियंत्रण केले आहे आणि सैतानाने त्याचे विचार, नैतिकता, अंतर्दृष्टी आणि संवेदना यावर केलेले भयंकर नुकसान त्याला सहन करावे लागते. मनुष्याच्या मूलभूत गोष्टी सैतानाने दूषित केल्या आहेत व देवाने त्या मूळतः जशा बनवल्या होत्या त्यापेक्षा त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत, त्यामुळेच मनुष्य देवाचा विरोध करतो आणि सत्य स्वीकारू शकत नाही. म्हणून, मनुष्याच्या प्रवृत्तीतील बदलांची सुरुवात त्याचे विचार, अंतर्दृष्टी आणि तर्कशक्तीतील बदलांनी झाली पाहिजे ज्यामुळे त्याचे देवाबद्दलचे ज्ञान व सत्याबद्दलचे ज्ञान बदलेल. ज्यांचा जन्म सगळ्यात खोलवर भ्रष्ट झालेल्या देशात झाला आहे, ते देव म्हणजे काय किंवा देवावर विश्वास ठेवण्याचा अर्थ काय याविषयी अधिकच अनभिज्ञ आहेत. लोक जितके अधिक भ्रष्ट तितकेच त्यांना देवाचे अस्तित्व कमी कळते आणि त्यांची तर्कशक्ती व अंतर्दृष्टी तितकी कमी असते. मनुष्याच्या विरोधाचे आणि देवाविरुद्ध बंडखोरीचे मूळ म्हणजे सैतानाने त्याला भ्रष्ट करणे. सैतानाच्या भ्रष्टतेमुळे मनुष्याची सद्सद्विवेकबुद्धी सुन्न झाली आहे; तो अनैतिक आहे, त्याच्या विचारांचे अधःपतन झालेले आहे व त्याचा मानसिक दृष्टिकोन मागासलेला आहे. सैतानाकडून भ्रष्ट होण्याआधी, मनुष्य स्वाभाविकपणे देवाचे अनुसरण करत होता आणि त्याची वचने ऐकून त्याचे पालन करत होता. त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे योग्य तर्कशक्ती व सद्सद्विवेकबुद्धी आणि सामान्य मानवता होती. सैतानाने भ्रष्ट केल्यावर, मनुष्याची मूळ तर्कशक्ती, सद्सद्विवेकबुद्धी व मानवता निस्तेज झाली आणि सैतानाने ती खराब केली. अशा प्रकारे, त्याने देवाप्रति त्याची आज्ञाधारकता व प्रेम गमावले आहे. मनुष्याची सद्सद्विवेकबुद्धी विस्कळीत झाली आहे, त्याची प्रवृत्ती जनावरासारखी झाली आहे आणि देवाप्रती त्याची बंडखोरी अधिक वारंवार व गंभीर होत आहे. तरीही मनुष्याला हे कळत नाही किंवा ओळखता येत नाही आणि तो फक्त विरोध करतो व आंधळेपणाने बंड करतो. मनुष्याची प्रवृत्ती त्याची तर्कशक्ती, अंतर्दृष्टी आणि सद्सद्विवेकबुद्धीच्या अभिव्यक्तीतून प्रकट होते; कारण त्याची सद्सद्विवेकबुद्धी व अंतर्दृष्टी अशक्त आहे आणि त्याची सद्सद्विवेकबुद्धी अत्यंत निस्तेज झाली आहे, त्यामुळे त्याची प्रवृत्ती देवाविरुद्ध बंडखोरीची आहे. जर मनुष्याची सद्सद्विवेकबुद्धी व अंतर्दृष्टी बदलू शकत नसेल, तर देवाच्या इच्छेनुसार त्याच्या प्रवृत्तीत बदल होण्याचा प्रश्नच नाही. जर मनुष्याची तर्कशक्ती योग्य नसेल, तर तो देवाची सेवा करू शकत नाही आणि देवाने त्याचा उपयोग करून घेण्यास तो अयोग्य आहे. “सामान्य तर्कशक्ती” म्हणजे देवाची आज्ञा पाळणे व श्रद्धा ठेवणे, देवाबद्दल तळमळ, देवाप्रति निरपेक्ष असणे आणि देवाप्रति सद्सद्विवेकबुद्धी असणे. हे देवाप्रती एक हृदय व मनाचे असणे आणि जाणूनबुजून देवाचा विरोध न करणे आहे. भरकटलेली सद्सद्विवेकबुद्धी असणे नाही. मनुष्याला सैतानाने भ्रष्ट केल्यामुळे, त्याच्या मनात देवाबद्दल धारणा निर्माण झाल्या आहेत व त्याला देवाप्रति निष्ठा नाही किंवा त्याच्यासाठी तळमळ नाही, तो देवाप्रति सद्सद्विवेकबुद्धीने काहीही बोलू शकत नाही. मनुष्य जाणूनबुजून देवाचा विरोध करतो आणि त्याच्याबद्दल मत व्यक्त करतो व शिवाय, त्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी करतो. तो देव आहे हे स्पष्ट माहीत असतानाही मनुष्य देवाच्या पाठीमागे त्याच्याविषयी मत व्यक्त करतो; देवाची आज्ञा पाळण्याचा मनुष्याचा हेतू नसतो आणि तो केवळ त्याच्याकडे आंधळ्या मागण्या व विनंत्या करतो. असे लोक—ज्या लोकांची तर्कशक्ती भरकटलेली आहे—त्यांच्या स्वतःच्या घृणास्पद वर्तनाबद्दल किंवा त्यांच्या बंडखोरपणाबद्दल खेद व्यक्त करण्यास असमर्थ असतात. जर लोक स्वतःला जाणून घेण्यास सक्षम असतील, तर त्यांनी त्यांची थोडीशी तर्कशक्ती परत मिळवली आहे; जे लोक अजून स्वतःला ओळखू शकत नाहीत ते देवाविरुद्ध जितके जास्त बंडखोर आहेत, तितकी त्यांची योग्य तर्कशक्ती कमी आहे.
मनुष्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीच्या प्रकटीकरणाचा उगम मनुष्याची मंद सद्सद्विवेकबुद्धी, त्याचा दुर्भावनापूर्ण स्वभाव आणि त्याची अयोग्य तर्कशक्ती याशिवाय कशातही नाही; जर मनुष्याची सद्सद्विवेकबुद्धी व तर्कशक्ती पुन्हा सामान्य होऊ शकली, तर तो देवासमोर वापरण्यासाठी योग्य व्यक्ती होईल. मनुष्याची सद्सद्विवेकबुद्धी नेहमीच बधीर राहिली आहे आणि मनुष्याची तर्कशक्ती, जी कधीही योग्य नव्हती, ती दिवसेंदिवस निस्तेज होत चालली आहे, इतकी की मनुष्य देवाप्रति बंडखोर होत चालला आहे, त्याने येशूला वधस्तंभावर खिळले व शेवटच्या दिवसांतील देहधारी देवाला त्याच्या घरामध्ये प्रवेश नाकारला आणि देवाच्या देहाची निंदा केली व देवाच्या देहाला कमी लेखले. जर मनुष्यामध्ये थोडीशी माणुसकी असती, तर तो देहधारी देवासोबतच्या वर्तनात इतका क्रूर नसता; जर त्याच्याकडे थोडीशी तर्कशक्ती असती, तर तो देहधारी देवासोबतच्या वर्तनात इतका दुष्ट नसता; जर त्याच्याकडे थोडीशी सद्सद्विवेकबुद्धी असती, तर त्याने अशा प्रकारे देवाचे “उपकार” मानले नसते. मनुष्य देवाच्या देहधारणेच्या युगात जगतो, तरीही त्याला इतकी चांगली संधी दिल्याबद्दल देवाचे आभार मानण्यास तो असमर्थ असतो आणि त्याऐवजी तो देवाच्या आगमनाला शाप देतो किंवा देवाच्या देहधारणेच्या वस्तुस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो व त्याच्या विरोधात आणि त्याला कंटाळलेला दिसतो. मनुष्याने देवाच्या आगमनाबद्दल काहीही विचार केला, तरीही थोडक्यात, देवाने नेहमीच धीराने त्याचे कार्य पार पाडले आहे—जरी मनुष्याने त्याचे जराही स्वागत केले नाही व आंधळेपणाने त्याला विनंती केली तरी. मनुष्याची प्रवृत्ती अत्यंत दुष्ट बनली आहे, त्याची तर्कशक्ती अत्यंत मंद झाली आहे आणि त्याची सद्सद्विवेकबुद्धी दुष्टाने पूर्णपणे पायदळी तुडवली आहे व मनुष्याची मूळ सद्सद्विवेकबुद्धी फार पूर्वीपासून सुन्न झाली आहे. मानवजातीला इतके जीवन आणि कृपा दिल्याबद्दल मनुष्य देहधारी देवाबद्दल कृतघ्न आहे, एवढेच नाही, तर त्याला सत्य दिल्याबद्दल देवाचा रागही निर्माण झाला आहे; मनुष्याला सत्यामध्ये किंचितही रस नसल्यामुळे त्याचा देवाप्रति राग वाढला आहे. मनुष्य देहधारी देवासाठी त्याचा जीव देण्यास असमर्थ असतो, तसेच तो त्याच्याकडून उपकार मिळवण्याचा प्रयत्न करतो व मनुष्याने देवाला जे काही दिले आहे त्यापेक्षा डझनपटीने जास्त व्याजाचा दावा करतो. अशा सद्सद्विवेकबुद्धीच्या लोकांना वाटते, की ही काही मोठी गोष्ट नाही आणि तरीही ते मानतात, की त्यांनी देवासाठी स्वतः इतके कष्ट घेतले आहेत व देवाने त्यांना खूप कमी दिले आहे. असे लोक आहेत ज्यांनी मला एक वाटी पाणी देऊन हात पुढे करून दोन वाट्या दुधाची किंमत चुकवण्याची मागणी करतात किंवा मला एका रात्रीसाठी खोली देऊन अनेक रात्रींचे भाडे देण्याची मागणी करतात. अशी माणुसकी आणि अशी सदसद्विवेकबुद्धी असूनही तुम्हाला जीवन प्राप्त करण्याची इच्छा कशी असू शकते? तुम्ही किती तिरस्करणीय आहात! मनुष्यामधील ही माणुसकी व मनुष्यामधील अशा प्रकारची सद्सद्विवेकबुद्धी यामुळेच देहधारी देव संपूर्ण भूमीवर भटकत असतो, त्याला कोठेही आश्रय मिळत नाही. ज्यांच्याकडे खरोखर सद्सद्विवेकबुद्धी आणि माणुसकी आहे त्यांनी देहधारी देवाची उपासना केली पाहिजे व मनापासून सेवा केली पाहिजे, त्याने किती कार्य केले आहे म्हणून नाही, तर त्याने कोणतेही कार्य केले नाही तरीही. ज्यांची तर्कशक्ती योग्य आहे त्यांनी हे केलेच पाहिजे आणि ते मनुष्याचे कर्तव्य आहे. बहुतेक लोक देवाच्या सेवेतील अटींबद्दलदेखील बोलतात: तो देव आहे की मनुष्य आहे याची त्यांना पर्वा नाही व ते फक्त त्यांच्या स्वतःच्या परिस्थितीबद्दल बोलतात आणि फक्त त्यांच्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही माझ्यासाठी स्वयंपाक करता, तेव्हा तुम्ही सेवा शुल्काची मागणी करता, जेव्हा तुम्ही माझ्यासाठी धावता, तेव्हा तुम्ही धावण्याचे शुल्क मागता, जेव्हा तुम्ही माझ्यासाठी काम करता, तेव्हा तुम्ही कामाचे शुल्क मागता, जेव्हा तुम्ही माझे कपडे धुता, तेव्हा तुम्ही कपडे धुण्याचे शुल्क मागता, जेव्हा तुम्ही चर्चसाठी पैसे देता, तुम्ही पुनर्प्राप्ती खर्चाची मागणी करता, जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा तुम्ही बोलण्याचे शुल्क मागता, जेव्हा तुम्ही पुस्तके देता, तेव्हा तुम्ही वितरण शुल्काची मागणी करता व जेव्हा तुम्ही लिहिता, तेव्हा तुम्ही लेखन शुल्काची मागणी करता. ज्यांच्याशी मी व्यवहार केला आहे ते माझ्याकडून भरपाईची मागणी करतात, तर ज्यांना घरी पाठवले आहे ते त्यांच्या नावाच्या बदनामीसाठी भरपाईची मागणी करतात; जे अविवाहित आहेत ते हुंडा मागतात किंवा त्यांच्या हरवलेल्या तरुणपणाची भरपाई मागतात; जे कोंबडी मारतात ते कसायाचे शुल्क मागतात, जे अन्न तळतात ते तळण्याचे शुल्क मागतात आणि जे सूप बनवतात ते सुद्धा त्यासाठी पैसे मागतात…. ही तुमची गर्विष्ठ व उदात्त माणुसकी आहे आणि तुमची प्रेमळ सद्सद्विवेकबुद्धी या कृती करावयास सांगते. तुमची तर्कशक्ती कुठे आहे? कुठे आहे तुमची माणुसकी? मी तुम्हाला सांगतो! तुम्ही असेच सुरू ठेवलेत, तर मी तुमच्यात कार्य करणे सोडून देईन. मी मानवी पोशाखातील पशूंच्या समूहामध्ये कार्य करणार नाही, अशा लोकांच्या समूहासाठी मी असा त्रास सहन करणार नाही ज्यांच्या गोऱ्या चेहऱ्याआड जंगली अंतःकरण लपवलेले आहे, मी अशा प्राण्यांच्या समूहासाठी सहन करणार नाही ज्यांना तारण मिळण्याची किंचितही शक्यता नाही. ज्या दिवशी मी तुमच्याकडे पाठ फिरवतो त्या दिवशी तुमचा मृत्यू होतो, त्या दिवशी तुमच्यावर अंधार पसरतो व त्या दिवशी प्रकाश तुमचा त्याग करतो. मी तुम्हाला सांगतो! मी तुमच्यासारख्या समूहावर कधीही उपकार करणार नाही, जो समूह प्राण्यांच्याही खाली आहे! माझ्या वचनांना आणि कृतींना मर्यादा आहेत व तुमची माणुसकी आणि सद्सद्विवेकबुद्धी जशी आहे ते पाहता मी यापुढे कोणतेही कार्य करणार नाही, कारण तुमच्यामध्ये सद्सद्विवेकबुद्धीची कमतरता आहे, तुम्ही मला खूप त्रास दिला आहे व तुमचे घृणास्पद वर्तन मला खूप तिरस्करणीय वाटते. ज्या लोकांमध्ये माणुसकी आणि सद्सद्विवेकबुद्धीचा अभाव आहे त्यांना तारणाची संधी कधीच मिळणार नाही; अशा निर्दयी व कृतघ्न लोकांना मी कधीही वाचवणार नाही. जेव्हा माझा दिवस येईल, तेव्हा मी अवज्ञा करणार्या मुलांवर अनंतकाळासाठी माझ्या जळत्या ज्वालांचा वर्षाव करेन, ज्यांनी एके काळी माझा भयंकर क्रोध भडकवला, मी त्या प्राण्यांना माझी चिरंतन शिक्षा देईन, ज्यांनी एके काळी माझ्यावर आक्षेपार्ह हल्ला केला आणि मला सोडून दिले, अवज्ञाकारी पुत्र जे एके काळी माझ्याबरोबर जेवले व एकत्र राहिले, परंतु माझ्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांनी माझा अपमान केला आणि विश्वासघात केला त्या सर्वांना मी माझ्या क्रोधाच्या अग्नीत जाळून टाकेन. ज्यांनी माझा राग भडकावला त्या सर्वांना मी माझ्या शिक्षेच्या अधीन करेन, मी माझा संपूर्ण राग त्या प्राण्यांवर टाकेन ज्यांनी एके काळी माझ्या समतुल्य म्हणून माझ्या पाठीशी उभे राहण्याची इच्छा धरली होती, तरीही त्यांनी माझी उपासना केली नाही किंवा आज्ञा पाळली नाही; ज्या काठीने मी मनुष्याला मारतो ती ज्यांनी एके काळी माझ्या संगोपनाचा आनंद घेतला व एके काळी मी बोललेल्या रहस्यांचा आनंद घेतला आणि ज्यांनी माझ्याकडून भौतिक आनंद घेण्याचा प्रयत्न केला त्या प्राण्यांवर पडेल. माझी जागा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मी क्षमा करणार नाही. जे माझ्याकडून अन्न व कपडे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मी सोडणार नाही. तूर्तास, तुम्ही हानीपासून मुक्त आहात आणि तुम्ही मर्यादा ओलांडून माझ्याकडे मागण्या करत आहात. जेव्हा क्रोधाचा दिवस येईल, तेव्हा तुम्ही माझ्याकडे आणखी काही मागण्या करणार नाही. त्या वेळी, मी तुम्हाला तुमच्या मनापासून “आनंद” घेऊ देईन, मी तुम्हाला जबरदस्तीने पृथ्वीमध्ये गाडून टाकेन व तुम्ही पुन्हा कधीही उठू शकणार नाही! कधी ना कधी, मी तुमचे हे ऋण “फेडणार” आहे—आणि मला आशा आहे, की तुम्ही या दिवसाच्या आगमनाची धीराने वाट पाहत आहात.
जर हे तिरस्करणीय लोक खरोखरच त्यांच्या अवाजवी इच्छा बाजूला ठेवून देवाकडे परत येऊ शकत असतील, तर त्यांना अजूनही तारणाची संधी आहे; जर मनुष्याच्या हृदयामध्ये खरोखरच देवासाठी तळमळ असेल, तर देव त्याला त्यागणार नाही. मनुष्य देवाला प्राप्त करण्यात अयशस्वी ठरतो, ते देवाला भावना आहे म्हणून किंवा मनुष्याने देवाला प्राप्त करू नये अशी त्याची इच्छा आहे म्हणून नाही, तर मनुष्याला देवाला प्राप्त करायचे नाही म्हणून आणि मनुष्य देवाला तातडीने शोधत नाही म्हणून. जे खरोखर देवाचा शोध घेतात त्यांच्यापैकी एखाद्याला देवाचा शाप कसा लागू शकतो? योग्य तर्कशक्ती व संवेदनशील सद्सद्विवेकबुद्धी असलेल्याला देव शाप कसा देईल? जो खरोखर देवाची उपासना करतो आणि त्याची सेवा करतो तो त्याच्या क्रोधाच्या अग्नीत कसा भस्मसात होऊ शकतो? जो देवाची आज्ञा आनंदाने पाळतो त्याला देवाच्या घरातून कसे हाकलून दिले जाऊ शकते? जो देवावर भरपूर प्रेम करतो तो देवाच्या शिक्षेत कसा जगू शकेल? जो देवासाठी सर्वस्वाचा आनंदाने त्याग करतो त्याच्याकडे काहीही कसे उरणार नाही? मनुष्य देवाचा पाठपुरावा करण्यास तयार नाही, देवासाठी त्याची संपत्ती खर्च करण्यास तयार नाही व देवासाठी आयुष्यभर प्रयत्न करण्यास तयार नाही; त्याऐवजी, तो म्हणतो की देव खूप दूर गेला आहे, देवाबद्दल खूप काही मनुष्याच्या धारणांशी विसंगत आहे. अशा माणुसकीच्या सहाय्याने, जरी तुम्ही अथक प्रयत्न करत असलात, तरीही तुम्ही देवाची स्वीकृती मिळवू शकणार नाही, या वस्तुस्थितीबद्दल काहीही सांगू शकत नाही, की तुम्ही देव शोधत नाही. तुम्ही मानवजातीची दोषपूर्ण वस्तू आहात हे तुम्हाला माहीत नाही का? तुमच्यापेक्षा कोणतीही माणुसकी कमी नाही हे तुम्हाला माहीत नाही का? तुमचा सन्मान करण्यासाठी इतर तुम्हाला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत नाही का? जे देवावर खरोखर प्रेम करतात ते तुम्हाला लांडग्याचे वडील, लांडग्याची आई, लांडग्याचा मुलगा आणि लांडग्याचा नातू म्हणतात; तुम्ही लांडग्याचे वंशज आहात, लांडग्याचे लोक आहात व तुम्हाला तुमची स्वतःची ओळख माहीत असली पाहिजे आणि ती कधीही विसरू नका. तुम्ही काही श्रेष्ठ व्यक्ती आहात असे समजू नका: तुम्ही मानवजातीतील गैर-मानवांचा सर्वात दुष्ट समूह आहात. तुम्हाला यातील काही माहीत नाही का? तुमच्यामध्ये कार्य करून मी किती जोखीम पत्करली हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुमची तर्कशक्ती पुन्हा सामान्य होऊ शकत नाही व तुमची सद्सद्विवेकबुद्धी सामान्यपणे कार्य करू शकत नाही, तर तुम्ही “लांडगा” हे नाव कधीही सोडू शकणार नाही, तुम्ही शापाच्या दिवसापासून कधीही सुटू शकणार नाही आणि तुमच्या शिक्षेच्या दिवसापासून कधीही सुटणार नाही. तुमचा जन्म हीन दर्जाचा, कोणतीही किंमत नसलेली गोष्ट आहे. तुम्ही स्वभावाने भुकेल्या लांडग्यांचा कळप, कचऱ्याचा व अर्थशून्य गोष्टींचा ढीग आहात आणि तुमच्या विपरीत, मी उपकार मिळवण्यासाठी तुमच्यावर कार्य करत नाही, परंतु कार्याच्या गरजेमुळे करतो. जर तुम्ही असेच बंड करत राहिलात, तर मी माझे कार्य थांबवेन व तुमच्यावर कधीही कार्य करणार नाही. याउलट, मी माझे कार्य मला संतुष्ट करणार्या दुसर्या समूहाकडे हस्तांतरित करेन आणि अशा प्रकारे तुम्हाला कायमचे सोडून देईन, कारण जे माझ्याशी वैर करतात त्यांच्याकडे मी पाहण्यास तयार नाही. तर मग, तुम्हाला माझ्याशी सुसंगत व्हायचे आहे की माझ्याशी शत्रूत्व ठेवायचे आहे?