जे लोक देवाला ओळखत नाहीत, ते सर्व देवाला विरोध करणारे लोक आहेत

देवाच्या कार्याचा उद्देश आणि त्याच्या कार्याचा मनुष्यावर होणारा परिणाम, तसेच मनुष्यासाठी त्याची नेमकी इच्छा काय आहे, हे समजून घेणे: देवाचे अनुसरण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे प्राप्त केले पाहिजे. आजकाल देवाच्या कार्याचे ज्ञान कोणालाच नाही. जगाच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत देवाने मनुष्यांवर केलेल्या कृती, देवाचे संपूर्ण कार्य व मनुष्यासाठी देवाची नेमकी इच्छा काय आहे—या अशा गोष्टी आहेत ज्या मनुष्याला माहीत नाहीत किंवा समजतदेखील नाहीत. हे अपुरेपण केवळ धार्मिक जगतामध्येच नव्हे, तर देवावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांमध्येच दिसून येते. जेव्हा तो दिवस येतो, जेव्हा तू खरोखरच देवाला पाहतोस, जेव्हा त्याच्या शहाणपणाची खरोखर प्रशंसा करतोस, जेव्हा देवाने केलेली सर्व कृत्ये पाहतोस, जेव्हा तू ओळखतोस, की देव काय आहे आणि त्याच्याकडे काय आहे—जेव्हा तू त्याची कृपा, बुद्धी, अद्भूतता व त्याने लोकांवर केलेले कार्य पाहिलेले असेल—तेव्हा, तू तुझ्या देवावरील विश्वासात यश मिळवलेले असेल. देव सर्वव्यापी आणि दानशूर आहे असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा तो नेमका कोणत्या प्रकारे सर्वव्यापी आहे व कोणत्या प्रकारे दानशूर आहे? जर तुला हे समजत नसेल, तर तुझा देवावर विश्वास आहे, असे मानता येणार नाही. मी असे का म्हणतो, की धार्मिक जगतातील जे देवावर विश्वास ठेवत नाहीत, ते कुकर्मी आहेत, सैतानासारखेच आहेत? मी म्हणतो, की ते दुष्ट आहेत, कारण त्यांना देवाची इच्छा समजत नाही आणि ते त्याचे शहाणपण पाहू शकत नाहीत. देव कधीही त्याचे कार्य त्यांच्यासमोर प्रकट करत नाही. ते आंधळे आहेत; ते देवाचे कार्य पाहू शकत नाहीत, देवाने त्यांना सोडून दिले आहे व देवाचे संगोपन आणि संरक्षण यांपासून ते पूर्णपणे वंचित आहेत, पवित्र आत्म्याच्या कार्यापासूनही ते दूर आहेत. जे देवाच्या कार्यापासून वंचित आहेत, ते सर्व कुकर्मी व देवाचे विरोधक आहेत. मी देवाच्या विरोधकांबद्दल बोलतो, ते म्हणजे जे देवाला ओळखत नाहीत, जे देवाचे नाव आपल्या ओठांनी घेतात आणि तरीही त्याला ओळखत नाहीत, जे देवाचे अनुसरण करतात व तरीही त्याची आज्ञा मानत नाहीत आणि जे देवाच्या कृपेचा आनंद घेतात, तरी देवाची साक्ष देण्यास असमर्थ आहेत. देवाच्या कार्याचा उद्देश किंवा देव मनुष्यामध्ये जे कार्य करतो त्याबद्दल समजून घेतल्याशिवाय मनुष्य देवाच्या इच्छेशी अनुरूप असू शकत नाही किंवा तो देवाची साक्ष देऊ शकत नाही. मनुष्य देवाला विरोध का करतो, याचे कारण एकीकडे त्याची भ्रष्ट प्रवृत्ती व दुसरीकडे देवाबद्दलचे अज्ञान आणि देव ज्याआधारे कार्य करतो ती तत्त्वे व मनुष्यासाठी त्याची इच्छा यांबद्दलच्या जाणीवेचा अभाव. हे दोन पैलू, एकत्रितपणे, मनुष्याने देवाला प्रतिकार करण्याच्या इतिहासाचा भाग आहेत. श्रद्धेतील नवशिके लोक देवाला विरोध करतात कारण असा विरोध त्यांच्या स्वभावातच असतो, तर अनेक वर्षांची श्रद्धा असलेल्या लोकांचा देवाला विरोध हा त्यांचे देवाप्रती दुर्लक्ष आणि त्यांचा भ्रष्ट प्रवृत्ती यामुळे असतो. देवाने देह धारण करण्याआधीच्या काळात, एखाद्या मनुष्याने देवाला विरोध केला की नाही हे त्याने स्वर्गात देवाने सांगितलेले नियम पाळले की नाही यावरून जोखले जात असे. उदाहरणार्थ, नियमशास्त्राच्या युगात, जो कोणी यहोवाचे नियम पाळत नसे, तो देवाच्या विरोधात आहे असे समजले जात असे; जो कोणी यहोवाला अर्पण केलेल्या गोष्टी चोरत असे किंवा जो कोणी यहोवाची कृपा असलेल्यांच्या विरोधात उभा राहत असे, तो देवाच्या विरोधात आहे असे समजले जात असे व त्याला दगडांनी ठेचून ठार मारले जात असे; जो कोणी आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करत नसे व जो कोणी दुसर्‍याला मारहाण किंवा शिव्याशाप देत असे, तो नियमशास्त्रे न पाळणारा समजला जात असे. जे कोणी यहोवाचे कायदे पाळत नसत, ते सर्व त्याच्या विरुद्ध उभे असल्याचे मानले जात असे. हे असे कृपेच्या युगात राहिले नाही, या युगात जो कोणी येशूच्या विरोधात उभा राहत असे, तो देवाच्या विरोधात उभा असल्याचे मानले जात असे आणि जो कोणी येशूने उच्चारलेली वचने पाळत नसे, तो देवाच्या विरोधात उभा राहणारा मानला जात असे. या युगात, देवाच्या विरोधाची जी व्याख्या केली गेली, ती अधिक अचूक व अधिक व्यावहारिक झाली. त्या काळात जेव्हा देवाने अद्याप देह धारण केला नव्हता, तेव्हा मनुष्याने देवाला विरोध केला की नाही, हे मनुष्याने स्वर्गातील अदृश्य देवाची उपासना केली की नाही याआधारे जोखले जात असे. त्या वेळी देवाच्या विरोधाची व्याख्या ज्या प्रकारे करण्यात आली होती, ती अजिबात व्यावहारिक नव्हती, कारण मनुष्य देवाला पाहू शकत नव्हता किंवा देवाची प्रतिमा कशी आहे किंवा तो कसा कार्य करतो आणि बोलतो हे त्याला माहीत नव्हते. मनुष्याला देवाबद्दल काहीही कल्पना नव्हती व तो देवावर अस्पष्टपणे विश्वास ठेवत असे, कारण देव अद्याप मनुष्यासमोर प्रकट झाला नव्हता. म्हणून, मनुष्याने आपल्या कल्पनेत देवावर कितीही विश्वास ठेवला तरीही, देवाने मनुष्याला दोषी ठरवले नाही किंवा त्याच्याकडे जास्त मागण्या केल्या नाहीत, कारण मनुष्य देवाला पाहण्यास पूर्णपणे असमर्थ होता. जेव्हा देव देह धारण करतो आणि कार्य करण्यासाठी मनुष्यांमध्ये येतो, तेव्हा सर्वजण त्याला पाहतात व त्याची वचने ऐकतात आणि तो देहातून करत असलेले कार्य पाहतात. त्या क्षणी, मनुष्याच्या सर्व धारणा म्हणजे निव्वळ फेस बनतात. ज्यांनी देवाला देहस्वरूपात प्रकट होताना पाहिले आहे, ते स्वेच्छेने त्याची आज्ञा पाळत असतील तर त्यांना दोषी ठरवले जाणार नाही, तर जे लोक हेतुपुरस्सर त्याच्याविरुद्ध उभे राहतात, त्यांना देवाचे विरोधक मानले जाईल. असे लोक ख्रिस्तविरोधी, शत्रू आहेत जे जाणूनबुजून देवाविरुद्ध उभे राहतात. जे देवाविषयी धारणा बाळगतात परंतु तरीही त्याची आज्ञा पाळण्यास तयार व राजी आहेत त्यांना दोषी ठरवले जाणार नाही. देव मनुष्याचा हेतू आणि कृतींच्या आधारावर त्याची निंदा करतो, त्याचे विचार व कल्पना यांच्या आधारे नव्हे. जर त्याने मनुष्याचे विचार आणि कल्पना यांच्या आधारावर मनुष्याची निंदा करावयाचे ठरवले, तर एकही व्यक्ती देवाच्या क्रोधापासून वाचणार नाही. जे जाणूनबुजून देहधारी देवाच्या विरोधात उभे राहतात, त्यांना त्यांच्या अवज्ञेबद्दल शिक्षा होईल. जे लोक जाणूनबुजून देवाच्या विरोधात उभे आहेत, त्यांचा विरोध हा त्यांच्या मनात देवाबद्दल असलेल्या धारणांमुळे उद्भवतो, परिणामी, ते देवाच्या कार्यात अडथळा आणणारी कृती करतात. हे लोक हेतुपुरस्सर विरोध करतात व देवाच्या कार्याचा नाश करतात. त्यांच्या मनात केवळ देवाबद्दलच्या धारणाच असतात, असे नव्हे, तर ते देवाच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या क्रियाकल्पांतही गुंतलेले असतात आणि या कारणास्तव अशा प्रकारच्या लोकांची निंदा केली गेली पाहिजे. जे देवाच्या कार्यात जाणीवपूर्वक व्यत्यय आणत नाहीत त्यांना पापी म्हणून दोषी ठरवले जाऊ शकत नाही, कारण ते स्वेच्छेने आज्ञा पाळण्यास सक्षम आहेत व व्यत्यय आणि अशांतता निर्माण करणार्‍या क्रियाकल्पांत गुंतत नाहीत. अशा लोकांची निंदा केली जाऊ नये. परंतु, जेव्हा लोकांनी अनेक वर्षे देवाच्या कार्याचा अनुभव घेतला असेल, तरीही जर त्यांनी देवाविषयीची धारणा कायम ठेवली व जर देहधारी देवाचे कार्य जाणून घेण्यास ते असमर्थ राहिले आणि जर, त्यांनी कितीही वर्षे देवाचे कार्य अनुभवले असले, तरीही त्यांची देवाविषयीची धारणा कायम असेल व ते त्याला ओळखू शकत नसतील, तर जरी ते विघटनकारी कार्यात गुंतत नसतील, तरी त्यांचे अंतःकरण देवाबद्दलच्या अनेक धारणांनी भरलेले आहे आणि या कल्पना उघड होत नसल्या, तरी असे लोक देवाच्या कार्यात कोणत्याच उपयोगाचे नाहीत. ते देवासाठी सुवार्तेचा प्रसार करण्यास किंवा त्याची साक्ष देण्यास असमर्थ आहेत. असे लोक बिनकामाचे व मूर्ख असतात. कारण ते देवाला ओळखत नाहीत, एवढेच नव्हे तर त्याच्याबद्दलच्या त्यांच्या धारणा दूर करण्यास ते पूर्णपणे असमर्थ आहेत, म्हणून त्यांची निंदा केली जाते. हे असे म्हणता येईल: श्रद्धेमधील नवशिक्यांबाबत देवाबद्दलच्या धारणा बाळगणे किंवा त्याच्याबद्दल काहीही माहीत नसणे हे सामान्य आहे, परंतु ज्याने बऱ्याच वर्षांपासून देवावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्या कार्याचा चांगलाच अनुभव घेतला आहे, अशा व्यक्तीने या धारणा कायम ठेवणे हे सामान्य ठरणार नाही व अशा व्यक्तीला देवाचे ज्ञान नसणे हे त्यातूनही कमी सामान्य ठरेल. हे असे होते कारण त्यांची निंदा केली जाते हे सामान्य नाही. हे असाधारण प्रकारचे लोक निव्वळ कचरा आहेत; हेच लोक देवाला सर्वात जास्त विरोध करतात आणि त्यांनी विनाकारणच देवाची कृपा उपभोगली आहे. अशा सर्व लोकांना बाहेर काढून टाकले जाईल!

ज्याला देवाच्या कार्याचा उद्देश समजत नाही तो त्याला विरोध करणारा आहे आणि ज्याला देवाच्या कार्याचा हेतू समजला आहे परंतु तरीही तो देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला तर अधिकच देवाचा विरोधक मानले जायला हवे. असे लोक आहेत जे भव्य चर्चमध्ये बायबलचे वाचन करतात व दिवसभर त्याचे पठण करतात, तरी त्यांच्यापैकी एकालाही देवाच्या कार्याचा उद्देश समजत नाही. त्यांच्यापैकी कोणीही देवाला ओळखू शकत नाही; मग त्यांच्यापैकी कोणी देवाच्या इच्छेनुसार वागणे तर आणखी दूर. ते सर्व निरुपयोगी, नीच लोक आहेत, प्रत्येकजण देवाला व्याख्यान देण्यासाठी उंचावर उभे आहेत. ते देवाचा प्रचारफलक हाती घेतात, तरीही त्याला जाणीवपूर्वक विरोध करतात. देवावर श्रद्धा असल्याचा दावा करतात, तरी मांस खातात आणि मनुष्याचे रक्त प्राशन करतात. असे सर्व लोक मनुष्याच्या आत्म्याला खाऊन टाकणारे सैतान आहेत, योग्य मार्गावर जाण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या मार्गात जाणीवपूर्वक आडवे येणारी महाभुते आहेत व देवाचा शोध घेणाऱ्यांच्या मार्गातील अडथळे आहेत. ते `सुदृढ घडणी`चे दिसत असले, तरी त्यांच्या अनुयायांना हे कसे कळेल, की ते दुसरे कोणी नसून ख्रिस्तविरोधी आहेत की जे लोकांना देवाविरुद्ध उभे करतात? त्यांच्या अनुयायांना हे कसे कळेल, की ती जिवंत भुते आहेत आणि मानवी आत्म्याला खाऊन टाकण्याकडेच त्यांचे लक्ष आहे? जे स्वतःला देवाच्या सान्निध्यात उच्च मानतात, ते पुरुषांमध्ये सर्वात निंद्य असतात, तर जे स्वतःला विनम्र समजतात त्यांना सर्वाधिक सन्मान मिळतो. ज्यांना असे वाटते, की त्यांना देवाचे कार्य माहीत आहे व जे देवाचे कार्य इतरांसमोर मोठ्या गाजावाजाने घोषित करण्यास सक्षम आहेत, जरी ते `त्याच्या`कडे थेटपणे पाहतात—ते लोकांमधले सर्वाधिक अज्ञानी आहेत. असे लोक देवाच्या साक्षीशिवाय असतात, गर्विष्ठ आणि प्रचंड अहंकारी असतात. देवाचा प्रत्यक्ष अनुभव व व्यावहारिक ज्ञान असतानाही, स्वतःला देवाविषयी फारच कमी ज्ञान आहे असे मानणारे लोक देवाला सर्वात प्रिय आहेत. केवळ अशा लोकांकडेच खऱ्या अर्थाने साक्ष असते आणि ते खरोखरच देवाद्वारे परिपूर्ण होण्यास सक्षम असतात. ज्यांना देवाची इच्छा समजत नाही ते देवाचे विरोधक असतात; जे देवाची इच्छा समजणारे असतात व तरीही सत्याचे पालन करत नाहीत ते देवाचे विरोधक असतात; जे देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करतात व तरीही देवाच्या वचनांच्या मूलतत्त्वाच्या विरोधात जातात ते देवाचे विरोधक असतात; ज्यांच्या मनात देहधारी किंवा अवतारी देवाबद्दल धारणा असतात, एवढेच नव्हे, तर बंडखोरी करण्याचीही इच्छा असते, ते देवाचे विरोधक असतात; जे देवाविषयी मते व्यक्त करतात ते देवाचे विरोधक असतात; आणि जे कोणी देवाला ओळखू शकत नाहीत किंवा त्याची साक्ष देऊ शकत नाहीत ते देवाचे विरोधक असतात. म्हणून मी तुम्हा लोकांना विनंती करतो: जर तुम्हा लोकांची खरोखर श्रद्धा असेल, की तुम्ही या मार्गावर चालू शकता, तर त्याचे अनुसरण करत रहा. परंतु जर देवाला विरोध करणे टाळता येत नसेल, तर खूप उशीर होण्याआधी तुम्ही लोकांनी दूर जावे. अन्यथा, तुमच्याबाबतीत वाईट घडण्याची शक्यता खूप जास्त आहे, कारण तुम्हा लोकांचा स्वभाव खूप भ्रष्ट आहे. निष्ठा किंवा आज्ञाधारकता किंवा नीतिमत्ता व सत्याची आस लागलेले अंतःकरण, किंवा देवावर प्रेम, यापैकी एकही गोष्ट तुमच्याकडे नाही. असे म्हणता येईल, की देवासमोर तुमची परिस्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे. तुम्ही ज्याचे पालन करायलाच हवे, त्याचे पालन तुम्ही करू शकत नाही आणि जे बोलायलाच हवे ते बोलू शकत नाही. तुम्ही जे आचरणात आणायलाच हवे, ते प्रत्यक्षात आणण्यात तुम्ही अयशस्वी झाला आहात; आणि जे कार्य तुम्ही पूर्ण करायलाच हवे, ते पूर्ण करण्यात तुम्ही असमर्थ ठरलेला आहात. जी निष्ठा, विवेक, आज्ञाधारकपणा किंवा निर्धार तुमच्या ठायी असायला हवा, तो तुमच्याकडे नाही. जे दुःख भोगल्याने तुम्हाला सहनशक्तीचा फायदा होतो ते तुम्ही सहन केलेले नाही व ती श्रद्धा तुमच्या ठायी असायलाच हवी, तिचाही तुमच्याकडे अभाव आहे. अगदी सोप्या भाषेत, तुम्ही लोक कोणत्याही गुणवत्तेपासून पूर्णपणे वंचित आहात: तुम्हाला असेच जगत राहायला लाज वाटत नाही का? मी तुम्हाला पटवून देतो, की तुम्ही चिरंतन विश्रांतीसाठी डोळे बंद करणे चांगले होईल, त्यामुळे तुमची चिंता करण्यापासून आणि तुमच्यासाठी त्रास घेण्यापासून देवाची सुटका होईल. तुम्ही देवावर विश्वास ठेवता व तरीही तुम्हा लोकांना त्याची इच्छा माहीत नाही; तुम्ही देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करता व तरीही देव मनुष्याकडून अपेक्षा करतो ती मागणी पूर्ण करण्यास असमर्थ आहात. तुमचा देवावर विश्वास आहे आणि तरीही तुम्ही त्याला ओळखत नाही व तुम्ही कोणत्याही उद्दिष्टाच्या शिवाय, कोणत्याही मूल्यांशिवाय, कोणत्याही अर्थाशिवाय जिवंत राहता. तुम्ही मनुष्य म्हणून जगता आणि तरीही तुमच्यात कणभरही विवेक, सचोटी किंवा विश्वासार्हता नाही—तरीही तुम्ही लोक स्वतःला मनुष्य म्हणू शकता का? तुम्ही देवावर विश्वास ठेवता व तरीही त्याची फसवणूक करता; इतकेच काय, तुम्ही देवाचे पैसे घेता आणि त्याला वाहिलेला नैवेद्य खाता. तरीही, शेवटी तुम्ही देवाच्या भावनांचा किंवा त्याच्याबद्दलच्या कणभर विवेकाचा थोडादेखील विचार करत नाही. देवाच्या अगदी क्षुल्लक मागण्याही तुम्ही पूर्ण करू शकत नाही. तरीही तुम्ही स्वतःला मनुष्य म्हणू शकता का? देव जे अन्न देतो ते तुम्ही खाता व त्याने दिलेल्या प्राणवायूनेच श्वास घेता, त्याच्या कृपेचा आनंद घेता, तरीही शेवटी, तुम्हाला देवाविषयी थोडेदेखील ज्ञान नाही. याउलट, तुम्ही बिनकामाचे झाला आहात, जे देवाला विरोध करतात. त्यामुळे तुम्ही कुत्र्याहूनही नीच पशू बनत नाही का? प्राण्यांमध्ये, तुमच्यापेक्षा जास्त विद्वेषपूर्ण कोणी आहे का?

जे पाद्री आणि वडीलधारे उच्च व्यासपीठावर उभे राहून इतरांना शिकवतात ते देवाचे विरोधक व सैतानाचे मित्र आहेत; तुमच्यातील जे उच्च व्यासपीठावर उभे राहून इतरांना शिकवत नाहीत, ते देवाचे आणखी मोठे विरोधक नाहीत का? तुम्ही सैतानाशी त्यांच्यापेक्षाही जास्त संगनमत केले नाही का? ज्यांना देवाच्या कार्याचा उद्देश समजत नाही, त्यांना देवाच्या इच्छेनुसार कसे वागावे हे माहीत नाही. ज्यांना देवाच्या कार्याचा उद्देश समजला आहे, त्यांना देवाच्या इच्छेनुसार कसे कार्य करावे हे माहीत नसेल, असे तर निश्चितच नाही. देवाचे कार्य कधीही चुकत नाही; उलट, मनुष्याचे त्यामागे जाणे हे सदोष असते. देवाला जाणूनबुजून विरोध करणारे अधः पतनी हे त्या पाद्री आणि वडीलधाऱ्यांपेक्षाही अधिक अभद्र व दुष्ट नाहीत का? असे अनेक आहेत, जे देवाला विरोध करतात, परंतु त्यांच्यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. जसे आस्तिक लोकांमध्ये सर्व प्रकार असतात, त्याचप्रमाणे देवाला विरोध करणाऱ्यांमध्येही सर्व प्रकार असतात आणि ते एकमेकांपेक्षा वेगळे असतात. देवाच्या कार्याचा उद्देश स्पष्टपणे ओळखण्यात अयशस्वी झालेल्यांपैकी एकालाही वाचवता येणार नाही. भूतकाळात मनुष्याने देवाला कितीही विरोध केला असला, तरी जेव्हा मनुष्य देवाच्या कार्याचा उद्देश समजून घेतो व देवाला संतुष्ट करण्यासाठी आपले प्रयत्न समर्पित करतो, तेव्हा देव त्याची पूर्वीची सर्व पापे धुवून टाकतो. जोपर्यंत मनुष्य सत्याचा शोध घेतो आणि सत्य आचरणात आणतो, तोपर्यंत देव त्याने केलेल्या गोष्टी लक्षात ठेवणार नाही. एवढेच नव्हे, तर मनुष्याच्या सत्याच्या आचरणाच्या आधारावरच देव त्याला समर्थन देतो. ही देवाची नीतिमत्ता आहे. मनुष्याने देवाला पाहण्याआधी किंवा त्याचे कार्य अनुभवण्याआधी, मनुष्य देवाप्रती कसाही वागत असला, तरी देव ते लक्षात ठेवत नाही. मात्र, मनुष्याने एकदा का देवाला पाहिले व त्याचे कार्य अनुभवले की मनुष्याची सर्व कृत्ये आणि कृती देव `बखरी`त नोंदवेल, कारण मनुष्याने देव पाहिला आहे व तो देवाच्या कार्यादरम्यान राहिला आहे.

जेव्हा मनुष्याने देव म्हणजे काय आणि देवाकडे काय आहे हे खऱ्या अर्थाने पाहिले असेल, जेव्हा त्याने त्याचे श्रेष्ठत्व पाहिले असेल व जेव्हा त्याला खरोखरच देवाचे कार्य कळले असेल, एवढेच नव्हे, तर जेव्हा मनुष्याची जुनी प्रवृत्ती बदलली असेल, तेव्हा त्याने देवाला विरोध करणारी त्याची बंडखोर प्रवृत्ती पूर्णपणे सोडून दिलेली असेल. असे म्हणता येईल, की प्रत्येकाने कधी ना कधी देवाला विरोध केला आहे आणि प्रत्येकाने कधी ना कधी देवाविरुद्ध बंड केले आहे. मात्र, जर तू स्वेच्छेने देहधारी देवाची आज्ञा पाळत असशील व त्यायोगे देवाचे अंतःकरण तुझ्या निष्ठेने तृप्त करत असशील, सत्याने आचरण करायला हवे तसे करत असशील, तुझे कर्तव्य जसे पार पाडले पाहिजे, तसे पार पाडत असशील, जे पाळायला हवे ते निर्बंध पाळत असशील, तर तू देवाला संतुष्ट करण्यासाठी तुझी बंडखोरी दूर ठेवण्यास तयार आहेस आणि देवाकडून परिपूर्ण होण्यास योग्य आहेस. मात्र जर तू तुमच्या चुकांचे परीक्षण करण्यास हट्टीपणे नकार दिलास व पश्चात्तापाचा तुझा कोणताही हेतू नसेल, देवाला सहकार्य करण्याचा आणि त्याला संतुष्ट करण्याचा किमान हेतू न ठेवता तुझे बंडखोर आचरण कायम ठेवलेस, तर तुझ्यासारख्या हट्टी व कोडग्या व्यक्तीला निश्चितच शिक्षा होईल आणि तू कधीही देवाकडून परिपूर्ण होणारा ठरणार नाहीस. असे असेल तर, तू आज देवाचा शत्रू आहेस व उद्यादेखील देवाता शत्रू असशील आणि परवादेखील देवाचा शत्रू राहशील; तू सदैव देवाचा विरोधक व देवाचा शत्रू राहशील. अशा परिस्थितीत, देव तुला कसे सोडून देईल? देवाला विरोध करणे हे मनुष्याच्या स्वभावात आहे, परंतु मनुष्याने हेतुपुरस्सर देवाला विरोध करण्याचे `रहस्य` शोधू नये, कारण त्याचा स्वभाव बदलणे हे अत्यंत कठीण आहे. जर तसे असेल, तर खूप उशीर होण्याआधी तू निघून जाणे चांगले, जेणेकरून भविष्यात तुझे ताडण अधिक तीव्र होणार नाही आणि जेणेकरून शेवटी देवाने तुझे देहधारी शरीर संपुष्टात आणेपर्यंत तुझ्या पाशवी स्वभावाचा उद्रेक होणार नाही. आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू देवावर विश्वास ठेवतोस; पण शेवटी तुझ्यावर दुर्दैवाचा घाला पडला तर ते लाजिरवाणे नाही का? मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही लोकांनी दुसरी योजना बनवायला हवी होती. तुम्ही जे काही करू शकता ते देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा चांगले होईल: फक्त हाच एक मार्ग आहे, असे तर नक्कीच नाही. जर तुम्ही सत्याचा शोध घेतला नाही, तर तुम्ही टिकून राहणार नाही का? अशा प्रकारे तुम्ही देवाशी वैर का ठेवावे?

मागील:  अपरिवर्तित प्रवृत्ती असणे म्हणजे देवाशी शत्रुत्व असणे आहे

पुढील:  देवाच्या कार्यामागची दृष्टी (१)

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger