अध्याय १

सीयोनेची प्रशंसा झाली आहे आणि देवाचे निवासस्थान प्रकट झाले आहे. गौरवशाली पवित्र नाव, सर्व लोकांद्वारे गौरवले जाते, त्याचा प्रसार केला जातो. हे सर्वशक्तिमान देवा! विश्वाचा प्रमुख, शेवटच्या दिवसांतील ख्रिस्त—तो सीयोन पर्वतावरून उगवलेला प्रकाशमान सूर्य आहे, जो पूर्ण विश्वावर आपल्या भव्यतेने विराजमान आहे…

सर्वशक्तिमान देवा! आम्ही आनंदाने तुला साद घालतो; आम्ही नाचतो आणि गातो. हे विश्वाच्या महान राजा, तू खरोखर आमचा उद्धारकर्ता आहेस! तू मात करणाऱ्यांचा समूह केला आहेस आणि देवाची व्यवस्थापन योजना पूर्ण केली आहेस. सर्व लोक या पर्वताकडे प्रस्थान करतील. सर्व लोक या सिंहासनासमोर प्रणाम करतील! तू एकमेव खरा देव आहेस आणि तू महिमा आणि सन्मानाला पात्र आहेस. या सिंहासनाला सर्व महिमा, प्रशंसा, आणि अधिकार लाभो! जीवनाचा झरा या सिंहासनामधून उगम पावतो, देवाच्या असंख्य लोकांचे पालनपोषण करतो. दररोज जीवन बदलते; नवा प्रकाश आणि प्रकटीकरण आपल्यामागे येते आणि देवाविषयीचे नवनवीन आकलन सातत्याने होत जाते. अनुभवांच्या दरम्यान, आम्हाला देवाविषयी पूर्ण निश्चितता प्राप्त होते. त्याची वचने सातत्याने प्रकट होत राहतात, जे योग्य आहेत त्यांच्यामध्ये प्रकट होतात. आम्हाला खरोखरच वरदान लाभले आहे! देवाला दररोज समक्ष भेटणे, सर्व गोष्टींमध्ये देवाशी संवाद साधणे आणि इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देवाला श्रेष्ठत्व देणे. आम्ही देवाच्या वचनांवर काळजीपूर्वक विचार करतो, आमची हृदये देवाच्या ठायी शांतपणे विसावतात आणि अशा प्रकारे आम्ही देवासमोर येतो, जिथे आम्हाला त्याचा प्रकाश प्राप्त होतो. आमच्या जीवनात, कृतींमध्ये, शब्दांमध्ये, विचारांमध्ये आणि कल्पनांमध्ये दररोज आम्ही देवाच्या वचनांमध्ये राहतो, सर्वकाळ विचार करू शकतो. देवाच्या वचनांमुळे धागादेखील सुईत जाऊ शकतो; आमच्या अंतःकरणात लपलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे एकामागून एक प्रकाशात येतात. देवाशी सहभागितेत कोणताही विलंब होत नाही; आमचे विचार आणि कल्पना देव उघड करून ठेवतो. प्रत्येक क्षणी आम्ही ख्रिस्ताच्या आसनासमोर जगत असतो जिथे आमचा न्याय होतो. आमच्या शरीरातील प्रत्येक जागा सैतानाने व्यापलेली राहते. आज, देवाचे सार्वभौमत्व पुनःप्रस्थापित करण्यासाठी, त्याचे मंदिर स्वच्छ झाले पाहिजे. देवाने पूर्णपणे भारून जाण्यासाठी आम्ही जीवन-मृत्यूच्या संघर्षात गुंतले पाहिजे. आमचे पूर्वीचे अस्तित्व जेव्हा वधस्तंभावर खिळले जाईल तेव्हाच ख्रिस्ताचे पुनरुत्थित जीवन सर्वोच्च बनेल.

आता पवित्र आत्मा आमच्या प्रत्येक अंशात आमच्या उद्धाराची लढाई करण्यासाठी आक्रमण करतो! जोवर आम्ही स्वतःला नाकारण्यास तयार आहोत आणि देवाला सहकार्य करण्यास उत्सुक आहोत, तोवर देव नक्कीच सर्वकाळ आम्हाला आतून प्रकाशित करेल आणि शुद्ध करेल आणि जे सैतानाने व्यापले आहे ते नव्याने प्राप्त करेल, जेणेकरून देव आम्हाला शक्य तितक्या लवकर पूर्ण करू शकेल. वेळ वाया घालवू नका—प्रत्येक क्षण देवाच्या वचनात जगा. संतांसहवाढत जा, राज्यात आणले जा आणि देवासह एकत्र महिम्यात प्रवेश करा.

पुढील:  अध्याय २

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger