अध्याय २
फिलाडेल्फियाचे चर्च आकारास आले आहे आणि हे पूर्णपणे देवाच्या कृपेमुळे व दयेमुळे झाले आहे. त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात न डगमगणाऱ्या अनेक संतांच्या हृदयात देवाप्रती प्रेम जागृत होते. एकच खरा देव देहधारी झाला आहे, तोच विश्वाचा प्रमुख आहे ज्याची सर्व गोष्टींवर सत्ता असतो, हा त्यांचा ठाम विश्वास असतो: पवित्र आत्म्याने याची पुष्टी केली आहे, तो पर्वताप्रमाणे अविचल असतो! आणि तो कधीही बदलणार नाही!
हे सर्वशक्तिमान देवा! आज तूच आमचे आध्यात्मिक डोळे उघडले आहेस, अंधाला दृष्टी दिली आहेस, पंगूला चालण्याची शक्ती दिली आहेस, आणि महारोग्यांना बरे केले आहेस. तूच स्वर्गाचे दार उघडले आहेस व आम्हाला आध्यात्मिक जगताची रहस्ये उमगू दिली आहेस. तुझ्या वचनांनी आम्ही भारून गेलो आहोत आणि सैतानाने भ्रष्ट केलेल्या आमच्या मानवतेपासून वाचलो आहोत—असे तुझे अपार महान कार्य आहे व तुझी अपरंपार महान दया आहे. आम्ही तुझे साक्षी आहोत!
बराच काळ तू नम्रपणे आणि शांतपणे लपून राहिला आहेस. तू मरणानंतरचे पुनरुत्थान, वधस्तंभावर खिळण्याचा त्रास, मानवी जीवनातील आनंद व दुःख, आणि छळ व विपरीत परिस्थिती अशा अनुभवांतून गेला आहेस; तू मानवी जगातील दुःखाचा अनुभव आणि चव घेतली आहेस व युगाने तुझा त्याग केलेला आहे. देहधारी देव हा स्वयंभू देव आहे. देवाच्या इच्छेखातर, तू आम्हाला घाणीतून वाचवलेस, तुझ्या उजव्या हाताने धरून वर काढलेस आणि तू आमच्यावर मुक्तपणे कृपा करत आहेस. सर्व प्रकारचे कष्ट सोसून, तू तुझे जीवन आमच्यासाठी अर्पिले आहेस; तू तुझ्या रक्त, घाम व अश्रूंनी चुकती केलेली त्याची किंमत पवित्र जनांवर प्रकट झाली आहे. आम्ही तुझ्या अथक प्रयत्नांची निर्मिती[अ] आहोत; आम्ही म्हणजे, तू चुकवलेली किंमत आहोत.
हे सर्वशक्तिमान देवा! तुझ्या प्रेमळ अशा दया आणि क्षमेमुळे, तुझ्या नीतिमत्त्वामुळे व वैभवामुळे, तुझ्या पवित्रतेमुळे आणि नम्रतेमुळे सर्व लोक तुझ्यासमोर नतमस्तक होतात व निरंतर तुझी पूजा करतात.
आज तू सर्व चर्चना—फिलाडेल्फियाच्या चर्चला—पूर्ण केले आहेस—आणि अशा प्रकारे तुझी ६,००० वर्षांची व्यवस्थापन योजना पूर्ण केली आहेस. पवित्र जन तुझ्यासमोर विनम्रपणे शरण येऊ शकतात, ते आत्म्याने जोडलेले व प्रेमाचे अनुसरण करणारे असतात, ते झऱ्याच्या उगमाशी जोडलेले असतात. जीवनाच्या जिवंत पाण्याचा झरा अविरत वाहत असतो, चर्चमधील सर्व चिखल आणि घाणेरडे पाणी धुवून टाकत असतो व पुन्हा एकदा तुझे मंदिर शुद्ध करत असतो. आम्ही प्रत्यक्षातल्या खऱ्या देवाला जाणले आहे, त्याच्या वचनांचे अनुसरण केले आहे, आमची स्वतःची कार्ये आणि कर्तव्ये ओळखली आहेत व चर्चसाठी आम्हाला शक्य ते सर्व केले आहे. तुझ्यासमोर नित्य शांत राहून, आम्ही पवित्र आत्म्याच्या कार्याकडे लक्ष दिलेच पाहिजे, अन्यथा, आमच्यातील तुझ्या कार्यात अडथळा येईल. पवित्र जनांमध्ये परस्परप्रेम असते आणि काहींच्या बलस्थानांमुळे बाकीच्यांच्या अपयशांची भरपाई होते. पवित्र आत्म्याचा साक्षात्कार लाभून व त्याने प्रकाशित होऊन ते सर्वकाळ आत्म्यामध्ये विहार करू शकतात. सत्याचे आकलन झाल्यावर ते तत्काळ सत्य आचरणात आणतात. नवीन प्रकाशाच्या गतीने ते मार्गक्रमण करतात आणि देवाच्या पदचिह्नांचे अनुसरण करतात.
देवाला सक्रिय सहकार्य करा; त्याच्याकडे नियंत्रण सोपवणे म्हणजे त्याच्यासह मार्गक्रमण करणे. आमच्या स्वतःच्या सर्व कल्पना, धारणा, मते आणि धर्मनिरपेक्ष गुंतागुंती धुराप्रमाणे हवेत विरून जातात. आम्ही आमच्या आत्म्यामध्ये देवाला सर्वोच्च राज्य करू देतो, त्याच्यासह मार्गक्रमण करतो, व अशा प्रकारे जगावर मात करून मुक्ती मिळवतो आणि आमचे आत्मे मुक्तपणे विहार करतात व सुटका प्राप्त करतात: सर्वशक्तिमान देव जेव्हा राजा होतो, तेव्हा हा परिणाम मिळतो. त्याच्या स्तुतीमध्ये आम्ही नृत्य-गायन का करणार नाही, व आमची स्तुतीस्तोत्रे का गाणार नाही, आणि नवीन प्रार्थनागीते का म्हणणार नाही?
देवाची स्तुती करण्याचे खरोखर अनेक मार्ग आहेत: त्याचे नाव घेणे, त्याच्या जवळ जाणे, त्याचा विचार करणे, प्रार्थना वाचणे, पूजा-अर्चेत सहभागी होणे, चिंतन आणि मनन करणे, प्रार्थना व स्तोत्रे गाणे. अशा प्रकारच्या स्तुतीमध्ये आनंद असतो आणि अभिषेक वि असतो; स्तुतीमध्ये ताकद असते व तो एक भारदेखील असतो. स्तुतीमध्ये विश्वास असतो आणि एक नवे आकलन असते.
देवाला सक्रिय सहकार्य करा, सेवेमध्ये समन्वय ठेवा आणि एकरूप व्हा, सर्वशक्तिमान देवाचे हेतू पूर्ण करा, पवित्र आध्यात्मिक शरीर होँण्यासाठी त्वरा करा, सैतानाला पायदळी चिरडा व सैतानाच्या दैवाचा अंत करा. फिलदेल्फियाच्या चर्चने देवाच्या उपस्थितीत स्वर्गारोहण केले आहे आणि त्याच्या गौरवात तेथे प्रकट झाले आहे.
तळटीप:
अ. मूळ मजकुरात “ची निर्मिती” असा शब्दप्रयोग नाही.