अध्याय ५
पर्वत आणि नद्यांमध्ये बदल होतो, पाणी आपल्या मार्गाने वाहते आणि मनुष्याचे जीवन पृथ्वी व आकाश जसे चिरकाल टिकते तसे टिकत नाही. एकमेव सर्वशक्तिमान देव म्हणजे शाश्वत जीवन आहे आणि तो अनंतकाळ पिढ्यान पिढ्या पुनर्जन्म घेतच राहतो. सर्व वस्तुमात्र आणि घडणारे सर्व प्रसंग त्याच्या हातात असतात आणि सैतान त्याच्या पायाखाली असतो.
आज, देवाच्या पूर्वधारित निर्णयानुसार तो आपल्याला सैतानाच्या तावडीतून सोडवणार आहे. तो खरोखर आपला उद्धारक आहे. आज खरोखर ख्रिस्ताच्या पुनर्जात शाश्वत जीवनाने आपल्यामध्ये परिणाम घडवलेला आहे; त्यामुळे आपण खरोखर त्याला सामोरे जाऊ शकू, त्याचे सेवन, प्राशन करू शकू आणि त्याचा आनंद घेऊ शकू आणि अशा प्रकारे देवाच्या जीवनाशी जोडले जाणे हे आपले संचित राहिल. स्वतःच्या हृदयातील रक्ताचे मोल मोजून केलेले हे देवाचे निःस्वार्थी समर्पण आहे.
वारा आणि हिमवृष्टी पार करत अनेक ऋतू येतील आणि जातील, जीवनात अनेक दुःखे, शिक्षा आणि आपत्तींना तोंड द्यावे लागेल, जगात अनेक ठिकाणी नकार आणि बदनामी स्वीकारावी लागेल, अनेक सरकारी, खोट्या आरोपांचा सामना करावा लागेल, तरीही देवाची श्रद्धा आणि त्याचा निश्चय अजिबात कमी होणार नाही. देवाची इच्छा आणि देवाचे व्यवस्थापन व नियोजन साध्य व्हावे या उद्देशाला मनःपूर्वक वाहून घेऊन, तो त्याचे स्वतःचे जीवन बाजूला ठेवतो. स्वतःच्या असंख्य लोकांसाठी तो कुठलेही कष्ट करण्यास मागेपुढे पहात नाही, तो त्यांचे काळजीपूर्वक पोषण करत असतो, त्यांना पाणी देत असतो. आपण कितीही अज्ञानी असलो, कितीही कठीण परिस्थितीत असलो, तरी आपण फक्त त्याला शरण गेलेच पाहिजे आणि ख्रिस्ताचे पुनर्जन्म झालेले जीवन हे, आपला जुना स्वभाव बदलून टाकेल …. कारण या ज्येष्ठ पुत्रांसाठी तो खाणे किंवा विश्रांती बाजूला ठेवून अथकपणे परिश्रम करत असतो. भाजून टाकणारी उष्णता आणि गोठवणारी थंडी अशा स्थितीत तो किती तरी रात्री आणि दिवस सीयोनातून मनापासून लक्ष देत असतो.
त्याने हे जग, घर, कार्य आणि सर्व काही आनंदाने, स्वेच्छेने सोडून दिले आहे व भौतिक सुखसोयींशी त्याचा काही संबंध नसतो… त्याच्या मुखातून येणारी वचने आपल्या मनात शिरकाव करतात आणि आपल्या हृदयात खोल लपलेल्या गोष्टी उघड करतात. तर मग आपल्याला हे का नाही पटणार? त्याच्या मुखातून निघणारे प्रत्येक वाक्य आपल्या आयुष्यात केव्हाही प्रत्यक्षात येऊ शकते. आपण जे काही करतो ते त्याच्या समोर असो किंवा त्याच्यापासून लपवून केलेले असो ते, त्याला ठाऊक नाही किंवा, त्याला कळतच नाही असे काहीही नसते. आपण स्वतःच्या कितीही योजना आणि व्यवस्था केल्या तरी त्याच्यासमोर खरोखर सर्व काही नक्कीच उघड होईल.
आपल्या आत्म्यामधील आनंदाचा अनुभव घेत असताना निश्चिंतपणे व शांतपणे, तरीही सतत रिक्त वाटत असताना त्याच्यासमोर बसणे: हे साध्य करण्याच्या दृष्टीने अकल्पनीय आणि अशक्य असे आश्चर्य आहे. सर्वशक्तिमान देवच एकमेव खरा देव आहे हे सिद्ध करण्यासाठी पवित्र आत्मा पुरेसा आहे! हा निर्विवाद पुरावा आहे! या समूहातील आम्हा लोकांना वर्णनापलीकडेचे आशीर्वाद लाभले आहेत! देवाची कृपा आणि दया नसती तर, आम्ही केवळ विनाशाकडेच गेलो असतो आणि सैतानाचे अनुसरण करू लागलो असतो. फक्त सर्वशक्तिमान देवच आपल्याला वाचवू शकतो!
हे! सर्वशक्तिमान देवा, प्रत्यक्षात अवतरलेल्या देवा! तूच आहेस की ज्याने आमचे आध्यात्मिक डोळे उघडून आम्हाला आध्यात्मिक जगाची रहस्ये निरखू दिली. राज्याच्या प्रगतीच्या भावी शक्यता अमर्याद आहेत. प्रतीक्षा करत असताना आपण सतर्क राहू या. तो दिवस काही फार दूर असणे शक्यच नाही.
युद्धाच्या ज्वाळा घुमू लागतील, तोफेच्या धुराने वातावरण भरून जाईल, हवा तापू लागेल, हवामान बदलू लागेल आणि मग प्लेग व इतर रोगराई पसरू लागेल, जगण्याची आशा नसल्यामुळे लोक फक्त मृत्युमुखीच पडू शकतील.
हे! सर्वशक्तिमान देवा, प्रत्यक्षात अवतरलेल्या देवा! तू आमचा अभेद्य किल्ला आहेस. तू आमचा आसरा आहेस. आम्ही तुझ्या पंखाखाली एकत्र झालो, की आम्हाला संकटाचा स्पर्श होऊ शकत नाही. असे असते तुझ्याकडून मिळणारे दैवी संरक्षण आणि संगोपन.
आम्ही सगळे गीत गात आमचा आवाज वर चढवू, आम्ही स्तुतीपर गीते गाऊ, आणि आम्ही केलेल्या प्रशंसेचा आवाज सार्या सीयोनामध्ये दुमदुमू लागेल! त्या सर्वशक्तिमान देवाने, प्रत्यक्षात अवतरलेल्या देवाने आम्हाला त्या वैभवशाली गंतव्यस्थानासाठी सज्ज केले आहे, लक्ष द्या—आणि, सतर्क रहा! अजूनही वेळ गेलेली नाही.