अध्याय १५

सर्व चर्चमध्ये देवाचे स्वरूप आधीच दिसून आले आहे. बोलणारा आत्मा आहे; तो प्रखर अग्नी आहे, तो वैभवसंपन्न आहे आणि तो न्याय करतो. तो मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ वस्त्र परिधान केलेला, आणि छातीवरून “सोन्याचा” पट्टा बांधलेला असा आहे; त्याचे डोके व केस लोकरीसारखे, पांढरे आहेत; त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत, त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे आहेत आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी आहे. त्याच्या उजव्या हातात सात तारे आहेत; त्याच्या तोंडात तीक्ष्ण दुधारी तलवार आहे आणि त्याची मुद्रा परमतेजाने प्रकाशणार्‍या सूर्यासारखी आहे!

मनुष्याच्या पुत्राला साक्ष मिळाली आहे आणि स्वतः देव उघडपणे प्रकट झाला आहे. देवाचा गौरव प्रकट झाला आहे, जळत्या सूर्याप्रमाणे प्रखरपणे चमकत आहे! त्याची गौरवी चर्या चमकदार प्रकाशाने उजळली आहे; कोणाच्या डोळ्यांमध्ये त्याचा प्रतिकार करण्याचे धाडस आहे? प्रतिकार मृत्यूकडे नेतो! तू तुझ्या अंतःकरणात जो काही विचार करतोस, तू उच्चारलेले कोणतेही शब्द किंवा तू जे करतोस त्याबद्दल किंचितही दया दाखवली जात नाही. तुम्ही काय मिळवले आहे हे तुम्हा सर्वांना समजेल आणि दिसेल—माझ्या न्यायाशिवाय काहीही नाही! जर तुम्ही माझ्या वचनांचे सेवन व प्राशन करण्याचे प्रयत्न करत नसाल आणि त्याऐवजी स्वैरपणे अडथळे आणून माझी रचना नष्ट करत असाल तर मी ते सहन करू शकेन का? मी अशा व्यक्तीशी सौम्यपणे वागणार नाही! जर तुझी वर्तणूक अधिक गंभीरपणे भ्रष्ट होत गेली तर तू अग्नीमध्ये भस्मसात होशील! डोके ते पायाच्या बोटाला जोडणारा रक्तामांसाचा किंचितही अंश न घेता सर्वशक्तिमान देव एका आध्यात्मिक देहात प्रकट होतो. तो विश्व जगाच्या पलीकडे आहे, तिसऱ्या स्वर्गात गौरवशाली सिंहासनावर बसलेला आहे, तो सर्व गोष्टींचे प्रशासन सांभाळतो! विश्व व सर्व गोष्टी माझ्या हातात आहेत. मी बोललो तर तसे होईल. जर मी ते ठरवले तर ते तसेच होईल. सैतान माझ्या पायाखाली आहे; तो अथांग खड्ड्यात आहे! जेव्हा माझी वाणी ऐकू येईल, तेव्हा स्वर्ग आणि पृथ्वी नष्ट व नाहीशी होईल! सर्व गोष्टींचे नूतनीकरण केले जाईल; हे एक अपरिवर्तनीय सत्य आहे जे अगदी योग्य आहे. मी जगावर, तसेच सर्व दुष्टांवर मात केली आहे. मी येथे बसून तुमच्याशी बोलत आहे आणि ज्यांना कान आहेत त्यांनी ऐकले पाहिजे व जे जिवंत आहेत त्यांनी ते स्वीकारले पाहिजे.

दिवस संपतील; या जगातील सर्व गोष्टी नष्ट होतील आणि सर्व गोष्टी नव्याने जन्माला येतील. हे लक्षात ठेवा! विसरू नको! कोणतीही संदिग्धता असू शकत नाही! आकाश व पृथ्वी नाहीशी होईल परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत! मी तुम्हाला पुन्हा एकदा उपदेश करत आहे: व्यर्थ धावू नका! जागे व्हा! पश्चात्ताप कराल, तर तारण जवळ आहे! मी तुमच्यामध्ये आधीच प्रकट झालो आहे व माझी वाणी ऐकू आली आहे. माझी वाणी तुम्हाला ऐकू आली आहे; प्रत्येक दिवशी तुम्ही तिचा सामना करता, समोरासमोर असता आणि प्रत्येक दिवस ती तेजस्वी व नवीन असते. तू मला पाहतोस आणि मी तुला पाहतो; मी तुझ्याशी सतत बोलतो व तुझ्याशी समोरासमोर असतो. तरीसुद्धा, तू मला नाकारतोस आणि मला ओळखत नाहीस. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, तरीही तुम्ही संकोच करता! तुम्ही संकोच करता! तुमचे अंतःकरण जड झाले आहे, तुम्हाला सैतानाने आंधळे केले आहे व तुम्ही माझी तेजस्वी चर्या पाहू शकत नाही—तुम्ही किती दयनीय आहात! किती दयनीय!

माझ्या सिंहासनासमोर असलेले सात आत्मे पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पाठवले गेले आहेत आणि मी माझ्या दूताला चर्चशी बोलण्यासाठी पाठवेन. मी नीतिमान व श्रद्धाळू आहे; मी देव आहे जो मनुष्याच्या अंतःकरणाच्या सर्वात खोल भागांचे परीक्षण करतो. पवित्र आत्मा चर्चशी बोलतो आणि ती माझी वचने आहेत जी माझ्या पुत्राच्या अंतःकरणातून बाहेर पडतात; ज्यांना कान आहेत त्या सर्वांनी ती ऐकली पाहिजेत! जे जगत आहेत त्यांनी स्वीकारले पाहिजे! फक्त त्यांचे सेवन व प्राशन करा आणि शंका घेऊ नका. जे लोक माझ्या वचनांच्या आधीन जातात व त्यांचे पालन करतात त्यांना मोठे आशीर्वाद मिळतील! जे लोक माझ्या चर्येचा आस्थेने शोध घेतात त्यांना नक्कीच नवीन प्रकाश, नवीन ज्ञान व नवीन अंतर्दृष्टी मिळेल; सर्व तेजस्वी आणि नवीन असेल. माझी वचने तुझ्यासमोर कधीही प्रकट होतील व ती तुझ्या आत्म्याचे डोळे उघडतील जेणेकरून, तू आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व रहस्ये पाहू शकशील आणि हे राज्य मनुष्यांमध्ये आहे हे पाहू शकशील. शरण त्याच्या आश्रयाला जा व सर्व कृपा आणि आशीर्वाद तुला मिळतील; दुष्काळ व प्लेग तुला स्पर्शही करू शकणार नाहीत आणि लांडगे, नाग, वाघ व बिबटे तुला इजा करू शकणार नाहीत. तू माझ्यासोबत जाशील, माझ्यासोबत चालशील आणि माझ्यासोबत गौरवात प्रवेश करशील!

सर्वशक्तिमान देव! त्याचा तेजस्वी देह उघडपणे दिसतो, पवित्र आध्यात्मिक देह उभा राहतो आणि तो स्वतः पूर्ण देव आहे! जग व देह दोन्ही बदलले आहेत आणि पर्वतावरील त्याचे रूपांतर म्हणजे देवाची व्यक्ती आहे. तो त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट धारण करतो, त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र आहेत, छातीवर एक सोन्याचा पट्टा आहे व जग आणि सर्व गोष्टी त्याचे पायस्थान आहेत. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालासारखे आहेत, त्याच्या तोंडात तीक्ष्ण दुधारी तलवार आहे आणि त्याच्या उजव्या हातात सात तारे आहेत. राज्याकडे जाण्याचा मार्ग असीम तेजस्वी आहे व त्याचा गौरव होतो आणि तो चमकतो; पर्वत आनंदी आहेत व पाणी हसत आहे आणि सूर्य, चंद्र व तारे सर्व त्यांच्या सुव्यवस्थित व्यवस्थेत फिरतात, अद्वितीय, खऱ्या देवाचे स्वागत करतात ज्याचे विजयी पुनरागमन त्याच्या सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेच्या पूर्णतेची घोषणा करते. सर्व उड्या मारतात आणि आनंदाने नाचतात! जयजयकार हो! सर्वशक्तिमान देव त्याच्या तेजस्वी सिंहासनावर विराजमान आहे! गाणे गा! सर्वशक्तिमान देवाची विजयी पताका वैभवसंपन्न, भव्य सियोन पर्वतावर उंचावली आहे! सर्व राष्ट्रे जयजयकार करत आहेत, सर्व लोक गात आहेत, सियोन पर्वत आनंदाने हसत आहे व देवाचा गौरव होत आहे! मला स्वप्नातही वाटले नव्हते, की मला देवाच्या चर्येचे दर्शन होईल, पण आज मी ते पाहिले आहे. दररोज त्याच्याशी समोरासमोर, मी माझे हृदय त्याच्यासमोर ठेवतो. तो उदारपणे अन्न आणि पेय पुरवतो. जीवन, वचने, कृती, विचार, कल्पना—त्याचा तेजस्वी प्रकाश त्या सर्वांना प्रकाशित करतो. तो मार्गातील प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतो व तो कोणत्याही बंडखोर हृदयाचा लगेच न्याय करतो.

सेवन करणे, एकत्र वास्तव्य करणे आणि देवासोबत एकत्र राहणे, त्याच्याबरोबर एकत्र राहणे, एकत्र चालणे, एकत्र आनंद घेणे, एकत्र गौरव व आशीर्वाद मिळवणे, त्याच्याबरोबर राजपद सामायिक करणे आणि राज्यात एकत्र असणे—अरे, किती आनंदाची बाब आहे! अरे, किती गोड आहे! आम्ही दररोज त्याच्याशी समोरासमोर असतो, दररोज त्याच्याशी बोलत असतो व सतत बोलत असतो आणि दररोज नवीन ज्ञान व नवीन अंतर्दृष्टी बहाल केली जात असते. आमचे आध्यात्मिक डोळे उघडले जातात आणि आम्ही सर्व काही पाहतो; आत्म्याची सर्व रहस्ये आमच्यासमोर प्रकट होतात. पवित्र जीवन खरोखर निश्चिंत आहे; वेगाने धावा व थांबू नका आणि सतत पुढे जात राहा—पुढे आणखी आश्चर्यकारक जीवन आहे. फक्त गोड चवीने तृप्त होऊ नका; देवामध्ये प्रवेश करण्याचा सतत प्रयत्न करा. तो सर्वसमावेशक व उदार आहे आणि त्याच्याकडे सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याची आमच्याकडे कमतरता आहे. सक्रियपणे सहकार्य करा व त्याच्यामध्ये प्रवेश करा आणि काहीही पुन्हा पूर्वीसारखे राहणार नाही. आमचे जीवन श्रेष्ठ असेल आणि कोणतीही व्यक्ती, बाब किंवा वस्तू आम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत.

श्रेष्ठता! श्रेष्ठता! खरी श्रेष्ठता! देवाचे श्रेष्ठ जीवन अंतःकरणात आहे आणि सर्व गोष्टी खरोखर आरामशीर झाल्या आहेत! आम्ही संसार व ऐहिक गोष्टींच्या पलीकडे जातो, पती किंवा मुलांबद्दल आसक्ती वाटत नाही. आम्ही आजारपण आणि वातावरणाच्या नियंत्रणाच्या पलीकडे जातो. सैतान आम्हाला त्रास देण्याचे धाडस करत नाही. आम्ही सर्व संकटांना पूर्णपणे पार करतो. हे देवाला राजपद घेण्यास अनुमती देत आहे! आम्ही सैतानाला पायदळी तुडवतो, चर्चसाठी साक्षीदार होतो व सैतानाचा कुरूप चेहरा पूर्णपणे उघड करतो. चर्चची रचना ख्रिस्तामध्ये आहे आणि तेजस्वी शरीर समोर आले आहे—हे स्वर्गारोहणात जगणे आहे!

मागील:  अध्याय ५

पुढील:  अध्याय ४९

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger