अध्याय ८८
माझी गती किती वेगाने वाढली आहे याची लोक कल्पना करू शकत नाहीत: हे एक असे आश्चर्य आहे जे मनुष्यासाठी अनाकलनीय आहे. जगाच्या निर्मितीपासून माझी गती कायम राहिली आहे आणि माझे कार्य कधीही थांबलेले नाही. संपूर्ण विश्व जग दिवसेंदिवस बदलत आहे व लोकदेखील सतत बदलत आहेत. हे सर्व माझ्या कार्याचा भाग आहे, माझ्या योजनेचा सर्व भाग आहे आणि त्याशिवाय, ते माझ्या व्यवस्थापनाचा भाग आहे व कोणत्याही मनुष्याला या गोष्टी माहीत नाहीत किंवा समजत नाहीत. जेव्हा मी तुम्हाला सांगतो तेव्हाच, जेव्हा मी तुमच्याशी समोरासमोर संवाद साधतो, तेव्हाच तुम्हाला अगदी क्षुल्लक गोष्टदेखील कळते; अन्यथा, माझ्या व्यवस्थापन योजनेच्या विस्तृत रूपरेषेची कोणालाही कल्पना असू शकत नाही. ही माझी महान शक्ती आहे आणि त्याशिवाय, अशा माझ्या अद्भुत कृती आहेत. या अशा गोष्टी आहेत ज्या कोणीही बदलू शकत नाही. म्हणूनच, आज मी जे म्हणतो ते चालते व हे बदलूच शकत नाही. मानवी धारणेमध्ये माझ्याबद्दलचे थोडेसेही ज्ञान नसते—ती सर्व निरर्थक बडबड आहे! तुम्हाला पुरेसे मिळाले आहे किंवा तुम्ही समाधानी आहात असा विचार करू नका! मी तुला हे सांगतो: तुम्हाला अजून खूप पुढे जायचे आहे! माझ्या संपूर्ण व्यवस्थापन योजनेबद्दल, तुम्हाला फार थोडे ज्ञान आहे, म्हणून मी जे सांगतो ते तुम्ही ऐकले पाहिजे आणि मी तुम्हाला जे सांगेन ते तुम्ही केले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत माझ्या इच्छेनुसार वागा व तुम्हाला माझे आशीर्वाद नक्कीच मिळतील; जो विश्वास ठेवतो तो आशीर्वाद प्राप्त करू शकतो, तर जो विश्वास ठेवत नाही त्याच्यात त्यांनी कल्पना केलेले “काहीही” पूर्ण होणार नाही. हे माझे नीतिमत्त्व आहे आणि त्याहूनही अधिक, ते माझे वैभव, माझा क्रोध व माझे ताडण आहे. अगदी एक विचार किंवा कृतीसह देखील मी कोणाला निसटून जाऊ देणार नाही.
माझी वचने ऐकून, बहुतेक लोक घाबरतात आणि थरथर कापतात, त्यांचे चेहरे चिंतेने सुरकुततात. मी तुझ्यावर खरोखरच अन्याय केला आहे का? असे होऊ शकते की तू अग्निवर्ण अजगराचे मूल नाहीस? तू चांगले असल्याचा आव आणतोस! तू माझा ज्येष्ठ पुत्र असल्याचे भासवत आहेस! मी आंधळा आहे असे तुला वाटते का? मी लोकांमध्ये फरक ओळखू शकत नाही असे तुला वाटते का? मी देव आहे जो लोकांच्या हृदयांचा शोध घेतो: हे मी माझ्या पुत्रांना सांगतो व हेच मी तुम्हाला, अग्निवर्ण अजगराच्या पुत्रांनादेखील सांगतो. मी सर्व काही स्पष्टपणे पाहतो, किंचितही चूक करत नाही. मी काय करतो हे मला कसे कळणार नाही? मी काय करतो हे मला स्फटिकासारखे स्वच्छ माहीत आहे! मी स्वतः देव आहे, विश्व आणि सर्व गोष्टींचा निर्माता आहे असे मी का म्हणतो? लोकांच्या हृदयांची खोलवर जाऊन तपासणी करणारा मी देव आहे असे मी का म्हणतो? मला प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीची चांगली जाणीव आहे. मी काय करावे किंवा मी काय बोलावे हे मला कळत नाही असे तुम्हाला वाटते का? याचा विचार तुम्ही करण्याची गरज नाही. तुम्ही माझ्या हातून मारले जाणार नाही याची काळजी घ्या; अशा प्रकारे तुमचे नुकसान होईल. माझे प्रशासकीय आदेश कोणालाही क्षमा करत नाहीत. तुम्हाला हे समजले का? वरील सर्व माझ्या प्रशासकीय आदेशांचे भाग आहेत. जेव्हा मी तुम्हाला ते सांगतो, त्यानंतर पुढे जर तुम्ही काही अपराध केलेत, तर शिक्षा होईल, कारण पूर्वी तुम्हाला समजले नव्हते.
आता मी तुमच्यासाठी माझे प्रशासकीय आदेश विस्तृतपणे जारी करत आहे (ते जारी करण्याच्या दिवसापासून लागू होतील, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे ताडण सोपवले जाईल):
मी माझी वचने पाळतो आणि सर्व काही माझ्या हातात आहे: जो कोणी संशय घेईल तो नक्कीच मारला जाईल. कोणताही विचार करण्यास संधी नाही; ते ताबडतोब नष्ट केले जातील, अशा प्रकारे माझ्या हृद्य द्वेषापासून मुक्त होईल. (आतापासून हे निश्चित झाले आहे, की जो कोणी मारला जाईल तो माझ्या राज्याचा सदस्य नसावा आणि तो सैतानाचा वंशज असावा.)
जेष्ठ पुत्र या नात्याने तुम्ही तुमची स्वतःची पदे राखली पाहिजेत आणि तुमची स्वतःची कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडली पाहिजेत व नसत्या चौकशा करू नये. तुम्ही माझ्या व्यवस्थापन योजनेसाठी स्वतःला देऊ केले पाहिजे आणि तुम्ही जेथे जाल तेथे तुम्ही माझ्याबद्दल चांगले साक्षीदार असले पाहिजे व माझ्या नावाचा गौरव केला पाहिजे. लज्जास्पद कृती करू नका; माझ्या सर्व पुत्रांसाठी आणि माझ्या लोकांसाठी उदाहरण व्हा. एका क्षणासाठीही भ्रष्ट होऊ नका: तुम्ही नेहमी ज्येष्ठ पुत्रांची ओळख असलेल्या प्रत्येकासमोर हजर राहावे व गुलाम होऊ नये; त्याऐवजी, तुम्ही डोके ताठ ठेवून पुढे जावे. मी तुम्हाला माझ्या नावाचा गौरव करण्यास सांगत आहे, माझ्या नावाची बदनामी करू नका. जे जेष्ठ पुत्र आहेत त्या प्रत्येकाचे स्वतःचे वैयक्तिक कार्य असते आणि ते सर्वच कार्ये करू शकत नाहीत. ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवली आहे व ती तुम्ही चुकवू नये. मी तुमच्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही अंतःकरणापासून संपूर्ण मनाने आणि तुमच्या सर्व शक्तीने स्वतःला समर्पित केले पाहिजे.
या दिवसापासून, संपूर्ण विश्वात, माझ्या सर्व पुत्रांचे आणि माझ्या सर्व लोकांचे पालनपोषण करण्याचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी माझ्या ज्येष्ठ पुत्रांवर सोपवले जाईल व हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जे त्यांचे संपूर्ण हृदय आणि मन समर्पित करू शकत नाही त्यांचे मी ताडण करेन. हे माझे नीतिमत्त्व आहे. मी माझ्या ज्येष्ठ पुत्रांनाही सोडणार नाही किंवा त्यांच्याशी सौम्यपणे वागणार नाही.
माझ्या पुत्रांमध्ये किंवा माझ्या लोकांमध्ये असा कोणी असेल जो माझ्या ज्येष्ठ पुत्रांपैकी एकाचा उपहास आणि अपमान करत असेल, तर मी त्यांना कठोर शिक्षा करेन, कारण माझे ज्येष्ठ पुत्र माझे प्रतिनिधित्व करतात; कोणी त्यांच्याशी जे काही वागेल ते माझ्याशीही वागलेले असेल. हे माझ्या प्रशासकीय आदेशांपैकी सर्वात कठोर आहे. माझे पुत्र आणि माझे लोक यांपैकी जो कोणी या हुकुमाचे उल्लंघन करेल त्यांच्याविरुद्ध मी माझ्या ज्येष्ठ पुत्रांना त्यांच्या इच्छेनुसार माझे नीतिमत्वाचे प्रशासन करू देईन.
जो कोणी मला क्षुल्लक मानतो आणि फक्त माझे अन्न, वस्त्र व झोप यावर लक्ष केंद्रित करतो, फक्त माझ्या बाह्य गोष्टींकडे लक्ष देतो आणि माझ्या ओझ्याकडे लक्ष देत नाही, व स्वतःचे कार्य योग्यरीत्या पार पाडण्याकडे लक्ष देत नाही, अशा प्रत्येकाचा मी हळूहळू त्याग करेन. ज्यांना कान आहेत त्यांना हे निर्देशित केले जाते.
जो कोणी माझी सेवा पूर्ण करतो त्याने आज्ञाधारकपणे गोंधळ न करता माघार घ्यावी. सावध राहा, नाहीतर मी तुला शिक्षा करेन. (हा एक पूरक आदेश आहे.)
माझे जेष्ठ पुत्र आतापासून लोखंडी दंडुका उचलतील आणि सर्व राष्ट्रे व लोकांवर राज्य करण्याचा, सर्व राष्ट्रांमध्ये आणि लोकांमध्ये चालण्याचा व सर्व राष्ट्रे व लोकांमध्ये माझा न्याय, नीतिमत्त्व आणि गौरव पोहोचवण्याचा माझा अधिकार बजावण्यास सुरवात करतील. माझे पुत्र आणि माझे लोक मला घाबरतील, माझी स्तुती करतील, माझा जयजयकार करतील व माझा अथकपणे गौरव करतील, कारण माझी व्यवस्थापन योजना पूर्ण झाली आहे आणि माझे ज्येष्ठ पुत्र माझ्याबरोबर राज्य करू शकतात.
हा माझ्या प्रशासकीय आदेशांचा एक भाग आहे; यानंतर, कार्य जसजसे पुढे जाईल तसतसे मी ते तुम्हाला सांगेन. वरील प्रशासकीय आदेशांवरून, मी माझे कार्य कोणत्या गतीने करतो, तसेच माझे कार्य कोणत्या टप्प्यावर पोहोचले आहे हे तुम्हाला दिसेल. हे एक पुष्टीकरण असेल.
मी आधीच सैतानाचा न्याय केला आहे. कारण माझी इच्छा बाधित नाही आणि माझ्या ज्येष्ठ पुत्रांनी माझ्याबरोबर वैभव प्राप्त केल्यामुळे, मी जगावर व सैतानाच्या सर्व गोष्टींवर माझे नीतिमत्व आणि वैभव आधीच वापरले आहे. मी एक बोटही उचलत नाही किंवा सैतानाकडे अजिबात लक्ष देत नाही (कारण तो माझ्याशी संभाषण करण्यास पात्र नाही). मला जे करायचे आहे ते मी करत राहतो. माझे कार्य टप्प्याटप्प्याने सुरळीतपणे सुरू आहे व संपूर्ण पृथ्वीवर माझी इच्छा अखंड आहे. यामुळे सैतानाला काही प्रमाणात लाज वाटली आहे आणि तो पूर्णपणे नष्ट झाला आहे, परंतु यामुळे माझी इच्छा पूर्ण झालेली नाही. मी माझ्या ज्येष्ठ पुत्रांनाही त्यांच्यावरील माझे प्रशासकीय आदेश पाळण्याची परवानगी देतो. एकीकडे, मी सैतानाला जे पाहू देतो तो माझा त्याच्याविषयीचा क्रोध आहे; दुसरीकडे, मी त्याला माझे वैभव पाहू दिले (पाहा, की माझे ज्येष्ठ पुत्र सैतानाच्या अपमानाचे सर्वात निर्णायक साक्षीदार आहेत). मी त्याला व्यक्तिशः शिक्षा करत नाही; त्याऐवजी, मी माझ्या ज्येष्ठ पुत्रांना माझे नीतिमत्व व वैभव पूर्ण करू देतो. कारण सैतान माझ्या पुत्रांवर अत्याचार करायचा, माझ्या पुत्रांचा छळ करायचा आणि माझ्या पुत्रांवर दडपण आणायचा, आज त्याची सेवा संपल्यानंतर, मी माझ्या ज्येष्ठ पुत्रांना त्याला शिक्षा करू देईन. सैतान पतनाविषयी हतबल आहे. जगातील सर्व राष्ट्रांचे लुळेपण ही उत्तम साक्ष आहे; लढणारे लोक व युद्धात असलेले देश हे सैतानाच्या राज्याच्या पतनाचे स्पष्ट प्रकटीकरण आहेत. भूतकाळात मी कोणतेही संकेत आणि चमत्कार न दाखवण्याचे कारण म्हणजे सैतानाचा अपमान करणे व टप्प्याटप्प्याने माझ्या नावाचा गौरव करणे हे आहे. जेव्हा सैतान पूर्णपणे संपतो, तेव्हा मी माझे सामर्थ्य दाखवू लागतो: मी जे सांगतो ते अस्तित्वात येते आणि मानवी धारणांशी सुसंगत नसलेल्या अलौकिक गोष्टी पूर्ण होतील (हे म्हणजे लवकरच येणारे आशीर्वाद). कारण मी स्वतः व्यावहारिक देव आहे व मी कोणतेही नियम पाळत नाही आणि मी माझ्या व्यवस्थापन योजनेतील बदलांनुसार बोलत असल्यामुळे, मी भूतकाळात जे सांगितले आहे ते वर्तमानात लागू होईलच असे नाही. तुमच्या स्वतःच्या धारणांना चिकटून राहू नका! मी नियमांचे पालन करणारा देव नाही; माझ्याबरोबर, सर्व काही विनामूल्य, श्रेष्ठ व पूर्णपणे मुक्त आहे. कदाचित काल जे सांगितले होते ते आज कालबाह्य झाले आहे किंवा कदाचित ते आज बाजूला टाकले जाऊ शकते (तथापि, माझे प्रशासकीय आदेश, ते प्रसिध्द झाल्यामुळे, कधीही बदलणार नाहीत). या माझ्या व्यवस्थापन योजनेतील पायऱ्या आहेत. नियमांना चिकटून राहू नका. दररोज नवीन प्रकाश येतो व नवीन प्रकटीकरणे होतात आणि ही माझी योजना आहे. दररोज माझा प्रकाश तुझ्यामध्ये प्रकट होईल व माझी वाणी विश्व जगाला ऐकवली जाईल. तुला समजले का? हे तुझे कर्तव्य आहे, मी तुझ्यावर सोपवलेली जबाबदारी आहे. त्याकडे क्षणभरही दुर्लक्ष करू नको. मला मान्य असतील त्या लोकांचा मी शेवटपर्यंत वापर करेन आणि हे कधीही बदलणार नाही. मी सर्वशक्तिमान देव आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारच्या व्यक्तीने कोणती गोष्ट करावी, तसेच कोणत्या प्रकारची व्यक्ती कोणती गोष्ट करण्यास सक्षम आहे, हे मला माहीत आहे. हा माझा सर्वशक्तिमानपणा आहे.