अध्याय ६५
माझी वचने नेहमी तुमच्या दुबळेपणावर प्रहार करतात, म्हणजेच ते तुमच्या घातक कमकुवतपणाकडे लक्ष वेधतात; अन्यथा, आता कोणती वेळ आहे याची कल्पनाही नसताना तुम्ही तुमची कामे कासवाच्या गतीने कामे करत राहिला असतात. हे जाणून घ्या! मी तुम्हाला वाचवण्यासाठी प्रेमाचा मार्ग वापरतो. तुम्ही कसेही वागलात, तरी मी मंजूर केलेल्या गोष्टी मी नक्कीच पूर्ण करेन आणि कोणतीही चूक करणार नाही. मी, नीतिमान सर्वशक्तिमान देव, चूक करू शकतो का? ही मानवी धारणा नाही का? मला सांगा: मी जे काही करतो व बोलतो ते तुमच्यासाठी नाही का? काही लोक नम्रपणे म्हणतील, “हे देवा! तू जे काही करतोस ते आमच्यासाठी आहे, पण तुझ्यासोबत सहकार्य करण्यासाठी कसे वागावे हे आम्हाला माहीत नाही.” असे अज्ञान! माझ्याशी सहकार्य कसे करावे हेच कळत नाही असे म्हणण्यापर्यंत तुम्ही गेलात! या सर्व लज्जास्पद खोट्या गोष्टी आहेत! तुम्ही अशा गोष्टी बोलल्या आहेत हे लक्षात घेता, खरे तर, तुम्ही वारंवार देहाचा विचार का करता? तुमचे शब्द चांगले वाटतात, परंतु तुम्ही सहज आणि आनंददायी रीतीने वागत नाही. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे: आज मी तुमच्याकडे फारसे काही मागत नाही किंवा माझ्या आवश्यकता तुमच्या आकलनाच्या पलीकडेही नाहीत; उलट, त्या मनुष्याद्वारे साध्य करता येतात. मी तुम्हाला मुळीसुद्धा अतिमहत्त्व देत नाही. मला मनुष्याच्या क्षमतांची जाणीव नाही का? मला त्याची पूर्णपणे स्पष्ट समज आहे.
माझी वचने तुम्हाला सतत ज्ञान देतात, तरीही तुमची अंतःकरणे खूप कठोर झाली आहेत आणि तुम्ही तुमच्या आत्म्यात माझी इच्छा समजून घेऊ शकत नाही! मला सांगा: मी तुम्हाला किती वेळा आठवण करून दिली आहे, की तुम्ही अन्न, कपडे किंवा तुमच्या दिसण्यावर लक्ष केंद्रीत करू नका व त्याऐवजी तुमच्या आंतरिक जीवनावर लक्ष केंद्रीत करा? तुम्ही ऐकणारच नाही. मला बोलूनही वैताग आला आहे. तुम्ही एवढे बधीर झालात का? तुम्ही पूर्णपणे मूर्ख आहात का? असे होऊ शकते, की माझे वचने उच्चारणे व्यर्थ आहे? मी काही चुकीचे बोललो का? माझ्या पुत्रांनो! माझ्या प्रामाणिक हेतूंबद्दल विचार करा! एकदा तुमचे जीवन परिपक्व झाले, की काळजी करण्याची गरज राहणार नाही आणि सर्वकाही प्रदान केले जाईल. सध्या त्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याला काहीच किंमत नाही. माझे राज्य पूर्णपणे साकार झाले आहे व ते सार्वजनिकपणे जगात अवतरले आहे; हे सर्व याचे अधिक द्योतक आहे, की माझा न्याय पूर्णपणे आला आहे. तुम्ही याचा अनुभव घेतला आहे का? मला तुमचा न्याय करायला तिरस्कार वाटतो, पण तुम्ही माझ्या हृदयाचा काहीही विचार करत नाही. निर्दयी न्यायाऐवजी तुम्हाला माझ्या प्रेमाचे संगोपन आणि संरक्षण सतत दिले जावे ही माझी इच्छा आहे. असे होऊ शकते का, की तुम्ही तुमचा न्याय करून घेण्यास इच्छुक आहात? जर नाही, तर तुम्ही वारंवार माझ्या जवळ का येत नाही, माझ्याशी सहभागिता का करत नाही आणि माझा सहवास का घेत नाही? तू माझ्याशी खूप भावनाशून्यतेने वागतोस, मात्र जेव्हा सैतान तुला कल्पना देतो, तेव्हा तुला आनंद होतो, तुला वाटते की त्या कल्पना तुझ्या स्वतःच्या इच्छेशी जुळतात—तरीही तू माझ्यासाठी काहीही करत नाहीस. माझ्याशी नेहमी इतके क्रूरपणे वागावे असे तुम्हाला वाटते का?
मी तुला देऊ इच्छित नाही असे नाही, परंतु तुम्ही त्याची किंमत द्यायला तयार नाही. जणू काही, तुमचे हात रिकामे आहेत, त्यामध्ये काहीही धरलेले नाही. पवित्र आत्म्याचे कार्य किती वेगाने पुढे जात आहे हे तुम्हाला दिसत नाही का? माझे हृदय चिंतेने जळते हे तुम्हाला दिसत नाही का? मी तुम्हाला माझ्याबरोबर सहकार्य करण्यास सांगतो, परंतु तुम्ही तयार नाही. एकामागून एक सर्व प्रकारची संकटे येतील; सर्व राष्ट्रे आणि ठिकाणे आपत्ती अनुभवतील: सर्वत्र प्लेग, उपासमार, पूर, दुष्काळ व भूकंप होतील. या आपत्ती फक्त एक-दोन ठिकाणी घडत नाहीत किंवा एक-दोन दिवसांत संपणार नाहीत; उलट, त्याऐवजी ते मोठमोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारतील आणि अधिकाधिक तीव्र होतील. या काळात, सर्व प्रकारचे कीटकजन्य प्लेग एकामागून एक उद्भवतील व नरभक्षकपणाच्या घटना सर्वत्र घडतील. हा माझा न्याय सर्व राष्ट्रांवर आणि लोकांवर आहे. माझ्या पुत्रांनो! तुम्ही संकटांचे दुःख किंवा त्रास सहन करू नये. माझी इच्छा आहे, की तुम्ही लवकर वयात याल व शक्य तितक्या लवकर माझ्या खांद्यावर असलेले ओझे उचलून घ्याल. तुम्हाला माझी इच्छा का समजत नाही? पुढील कार्य अधिकाधिक कठीण होत जाईल. तुम्ही इतके कठोर मनाचे आहात का, की सर्व काम माझ्या हाती सोडून, मला स्वतःला इतके कठोर परिश्रम करायला लावाल? मी ते अधिक स्पष्टपणे सांगेन: ज्यांचे जीवन परिपक्व आहे ते शरण जातील आणि त्यांना वेदना किंवा त्रास सहन करावा लागणार नाही; ज्यांचे जीवन परिपक्व होत नाही त्यांना वेदना व हानी सहन करावी लागते. माझी वचने पुरेशी स्पष्ट आहेत, नाही का?
माझे नाव सर्व दिशांना आणि सर्व ठिकाणी पसरले पाहिजे, जेणेकरून प्रत्येकजण माझे पवित्र नाव जाणून घेईल व मला ओळखेल. अमेरिका, जपान, कॅनडा, सिंगापूर, सोव्हिएत युनियन, मकाऊ, हाँगकाँग आणि इतर देशांतील सर्व स्तरातील लोक खरा मार्ग शोधत लगेच चीनमध्ये एकत्र येतील. माझ्या नावाची त्यांना आधीच साक्ष देण्यात आली आहे; फक्त तुम्ही शक्य तितक्या लवकर परिपक्व होणे आता बाकी आहे, जेणेकरून तुम्ही त्यांचे पालनपोषण करू शकाल व त्यांचे नेतृत्व करू शकाल. म्हणूनच मी म्हणतो, की अजून कार्य करायचे आहे. आपत्तींमुळे माझे नाव मोठ्या प्रमाणावर प्रसारित होईल आणि जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही, तर तुम्ही तुमचा योग्य वाटा गमवाल. तुम्हाला भीती वाटत नाही का? माझे नाव सर्व धर्म, सर्व क्षेत्रे, सर्व राष्ट्रे व सर्व संप्रदायांमध्ये पसरलेले आहे. हे माझे कार्य सुव्यवस्थितपणे, जवळच्या संबंधाने केले जात आहे; हे सर्व माझ्या शहाणपणाने केलेल्या व्यवस्थेमुळे घडते. माझी केवळ हीच इच्छा आहे, की माझ्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही प्रत्येक पावलावर पुढे जाण्यास सक्षम असावे.