देवाची प्रवृत्ती समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे
तुम्हाला अनेक गोष्टी मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे, तरी तुमच्या सर्व कृती, तुमच्या आयुष्याबद्दलचे सर्व काही, मी जे सांगणार आहे ते पूर्ण करू शकत नाही, म्हणून तुम्हाला माझी इच्छा स्पष्ट करून सांगण्यासाठी सरळ मुद्द्यावर येण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा पर्याय नाही नाही. तुमची सद्सद्विवेकबुद्धी कमी आहे आणि प्रशंसा करण्याची कुवतही तशी कमीच असल्यामुळे, तुम्ही माझी प्रवृत्ती व मूलतत्त्व याबद्दल जवळजवळ पूर्णपणे अनभिज्ञ आहात—म्हणून त्याबद्दल तुम्हाला सांगणे हे निकडीचे आहे. तुला हे मुद्दे पूर्वी कितीही समजले असले, तुला ते समजून घेण्याची इच्छा असली किंवा नसली, तरीही मी तुम्हाला ते तपशिलात जाऊन सांगितले पाहिजेत. हे मुद्दे तुम्हाला पूर्णपणे नवीन नाहीत, तरी त्याच्या अर्थाविषयी तुमचे आकलन, परिचय खूपच कमी आहे. तुमच्यातील अनेकांना तोकडे आकलन आहे आणि तेही अंशतः व अपुरे आहे. तुम्ही सत्याचे आचरण अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी—माझ्या वचनांचे अधिक चांगल्या प्रकारे आचरण करण्यासाठी—या गोष्टी तुम्हाला सर्वप्रथम माहिती पाहिजेत असे मला वाटते. अन्यथा तुमची श्रद्धा अस्पष्ट, ढोंगी राहील आणि धार्मिक कर्मकांडात अडकून पडेल. जर तुला देवाची प्रवृत्ती कळली नाही, तर तू त्याच्यासाठी जे कार्य केले पाहिजेस ते करणे तुझ्यासाठी अशक्य होईल. जर तुला देवाचे मूलतत्त्व माहीत नसेल, तर तुला त्याच्याविषयी आदर व भीती वाटणे अशक्य होईल; उलट हा केवळ निष्काळजीपणा आणि टाळाटाळ असेल व शिवाय सुधारता न येणारी ईश्वरनिंदा ठरेल. जरी देवाची प्रवृत्ती समजून घेणे खरोखर महत्त्वाचे असले आणि देवाचे मूलतत्त्व जाणून घेण्याकडे दुर्लक्ष करता येणार नसले, तरी कोणीही या मुद्द्यांकडे नीट लक्ष कधीही दिले नाही किंवा खोलात शिरलेले नाही. हे सरळ दिसत आहे, की तुम्ही सर्वांनी मी सांगितलेले प्रशासकीय आदेश धुडकावले आहेत. जर तुम्हाला देवाची प्रवृत्ती समजत नसेल, तर तुम्ही त्याच्या प्रवृत्तीचा अपमान करण्याची शक्यता मोठी आहे. तुम्ही त्याच्या प्रवृत्तीचा अपमान करणे म्हणजे देवाचाच राग ओढवून घेणे आहे, सरतेशेवटी तुझ्या कृतींचे फळ प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करणे असेल. आता तू हे लक्षात घेतले पाहिजेस, की जेव्हा तुला देवाचे मूलतत्त्व माहीत असते, तेव्हा तुला त्याची प्रवृत्तीही समजते—आणि जेव्हा तुला त्याची प्रवृत्ती समजते, तेव्हा तुला प्रशासकीय आदेशही समजले असतील. हे सांगण्याची गरज नाही, की प्रशासकीय आदेशांमधे सांगितलेल्या पुष्कळ गोष्टी देवाच्या प्रवृत्तीला स्पर्श करून जातात, पण त्यामध्ये त्याची पूर्ण प्रवृत्ती अभिव्यक्त होत नाही; म्हणून तुम्ही त्याच्या प्रवृत्तीविषयीचे आकलन वाढवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.
मी आज तुमच्याशी बोलत आहे ते नेहमीच्या संभाषणासारखे नाही, म्हणून माझ्या वचनांकडे काळजीपूर्वक पाहणे व शिवाय त्यावर सखोल चिंतन करणे आवश्यक आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे, की माझ्या वचनांकडे लक्ष देण्याचा तुम्ही अत्यंत कमी प्रयत्न केला आहे. तुम्हाला देवाच्या प्रवृत्तीचा विचार करण्याची इच्छा तर त्याहून कमी आहे; अगदीच क्वचित कोणी त्यासाठी प्रयत्न करतो. यामुळे मी म्हणतो, की तुमची श्रद्धा म्हणजे भपकेबाजपणा व्यतिरिक्त अन्य काही नाही. आत्ताही तुमच्यापैकी एकानेही स्वतःच्या मोठ्या कमतरतेवर काम करण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न केलेले नाहीत. तुमच्यासाठी मी इतके परिश्रम केले मात्र तुम्ही मला निराश केले. तुम्हाला देवाबद्दल काहीच वाटत नाही आणि तुमच्या आयुष्यात सत्याचा अभाव आहे यात काहीच आश्चर्य नाही. अशा लोकांना पवित्र जन कसे मानता येईल? स्वर्गाचे नियमशास्त्र ही गोष्ट कदापि मान्य करणार नाही! तुम्हाला या गोष्टीची इतकी कमी समज आहे की मला अधिक कंठशोष करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
देवाची प्रवृत्ती ही गोष्ट प्रत्येकाला अतिशय अमूर्त वाटते व शिवाय ती प्रत्येकाला स्वीकारायला सोपीही नाही, कारण त्याची प्रवृत्ती मनुष्याच्या व्यक्तिमत्वासारखी नाही. देवालाही आनंद, राग, दुःख आणि संतोष अशा स्वतःच्या भावना असतात, पण या भावना मनुष्याच्या भावनांपेक्षा निराळ्या असतात. देव जसा आहे तसा आहे व त्याच्याकडे जे आहे ते आहे. तो जे काही व्यक्त करतो आणि उघड करतो, ते त्याचे मूलतत्त्व व त्याची ओळख दर्शवणाऱ्या गोष्टी आहेत. तो जे आहे आणि त्याच्याकडे जे आहे, तसेच त्याचे मूलतत्त्व व त्याची ओळख या गोष्टी कोणाही मनुष्याला बदलता येणार नाहीत. त्याची प्रवृत्ती मानवजातीबद्दल प्रीती, मानवजातीविषयी समाधान, मानवजातीचा तिरस्कार, एवढेच नाही तर मानवजातीचे संपूर्ण आकलन यांना कवेत घेणारी आहे. मनुष्याचे व्यक्तिमत्व मात्र आशावादी, उत्फुल्ल किंवा भावनाहीन असू शकते. देवाची प्रवृत्ती सर्व गोष्टींच्या आणि प्राणिमात्रांच्या शासकाची आहे, सर्व निर्मितीच्या प्रभूची आहे. त्याची प्रवृत्ती सन्मान, सामर्थ्य, सभ्यता, महानता, इतकेच नव्हे तर सर्वश्रेष्ठ सत्ता दर्शवते. त्याची प्रवृत्ती अधिकाराचे प्रतीक आहे, जे जे नीतिमान आहे त्याचे प्रतीक आहे, जे जे सुंदर व चांगले आहे त्याचे प्रतीक आहे. याहीपेक्षा, ज्यावर अंधार आणि शत्रू शक्ती मात करू शकत नाही किंवा ज्यावर आक्रमण करू शकत नाही अशा गोष्टीचे प्रतीक आहे, तसेच निर्मिलेल्या कोणाहीकडून ज्याचा अपमान केला जाऊ शकत नाही (आणि तो अपमान सहनही करणार नाही) अशा गोष्टीचे प्रतीक आहे. त्याची प्रवृत्ती ही सर्वोच्च शक्तीची खूण आहे. कोणीही मनुष्य वा मनुष्ये त्याचे कार्य किंवा त्याच्या प्रवृत्तीत व्यत्यय आणू शकत नाहीत. पण मनुष्याचे व्यक्तिमत्व म्हणजे फक्त पशुपेक्षाच किंचित वरचढ असल्याचे चिन्ह आहे. मनुष्याचे स्वतःचे व त्याच्या स्वतःमध्ये असे काही अधिकार नाहीत, स्वायत्तता नाही आणि स्वतःच्या पलीकडे जाऊ शकेल अशी क्षमता नाही, पण जो सर्व प्रकारच्या लोकांच्या, प्रसंगांच्या व गोष्टींच्या दबावाखाली असतो असे त्याच्या मूलतत्वात आहे. देवाला आनंद होतो ते प्रामाणिकपणाचा आणि प्रकाशाचा उद्भव व अस्तित्वामुळे, अंधार आणि वाईटाच्या झालेल्या निःपातामुळे. मानवजातीसाठी प्रकाश व चांगले जीवन देण्यात त्याला आनंद मिळतो; त्याचा आनंद प्रामाणिक आनंद आहे, जे जे सकारात्मक आहे त्याच्या अस्तित्वाचे ते प्रतीक आहे, एवढेच नाही, तर मंगलतेचे प्रतीक आहे. अन्यायाच्या अस्तित्वाने व हस्तक्षेपामुळे त्याच्या मानवजातीला भोगावा लागणारा त्रास, वाईट प्रवृत्ती आणि अंधाराचे अस्तित्व, सत्याला भिरकावून टाकणाऱ्या गोष्टींचे अस्तित्व, इतकेच नाही तर चांगले व सुंदर यांना विरोध करणाऱ्या गोष्टींच्या अस्तित्वाचा देवाला राग येतो. यापुढे सर्व नकारात्मक गोष्टींचे अस्तित्व संपावे याचे प्रतीक म्हणजे त्याचा राग आहे, एवढेच नाही तर त्याच्या पावित्र्याचे ते प्रतीक आहे. ज्या मानवजातीबद्दल त्याला आशा आहेत ती अंधःकारात बुडलेली आहे, तो जे कार्य मनुष्यावर करतो ते त्याच्या अपेक्षेनुसार होत नाही व तो ज्या मानवजातीवर प्रेम करतो ती सर्व प्रकाशात राहू शकत नाही हे त्याचे दुःख आहे. त्याला निरागस मानवजातीबद्दल, प्रामाणिक परंतु अज्ञानी मनुष्याबद्दल आणि चांगल्या पण स्वतःचा दृष्टिकोन नसणाऱ्या मनुष्याबद्दल वाईट वाटते. त्याचे दुःख त्याच्या चांगुलपणाचे व त्याच्या दयेचे प्रतीक आहे, सौंदर्य आणि दयाळूपणाचे प्रतीक आहे. त्याला आनंद होतो तो अर्थात त्याच्या शत्रूंचा पाडाव केल्यावर व मनुष्याची श्रद्धा प्राप्त झाल्यावर. इतकेच नाही, तर सर्व शत्रू शक्तींना हुसकावून व नायनाट करून, तसेच मानवजातीला जे चांगले व शांत आयुष्य लाभते त्यामुळेही त्याला आनंद होतो. देवाचा संतोष हा मनुष्याच्या आनंदापेक्षा वेगळा आहे; खरे तर चांगली फळे वेचण्याची ती भावना, जी आनंदापेक्षा देखील मोठी आहे. त्याचा संतोष हा यापुढे मानवजात दुःखमुक्त होण्याचे व प्रकाशाच्या जगात प्रवेश करण्याचे प्रतीक आहे. याउलट मनुष्याच्या भावना त्यांच्या स्वतःच्या फायद्यापोटी उपजतात, त्या नीतिमत्त्वासाठी, प्रकाशासाठी वा जे सुंदर आहे त्यासाठी निर्माण होत नाहीत, स्वर्गातून लाभणाऱ्या कृपाप्रसादासाठी तर अजिबात निर्माण होत नाहीत. मनुष्याच्या भावना स्वार्थी आणि अंधाराच्या साम्राज्यातील असतात. त्या इच्छाशक्तीसाठी नसतात, देवाच्या योजनेसाठी तर मुळीच नसतात, म्हणूनच मनुष्य व देव एका श्वासात कधीच उच्चारले जाऊ शकत नाहीत. देव कायमच सर्वश्रेष्ठ आहे आणि नेहमीच आदरणीय आहे, तर मनुष्य नेहमीच तळाशी व नेहमीच कवडीमोल आहे. याचे कारण देव नेहमी त्याग करत असतो आणि मानवजातीसाठी स्वतःला समर्पित करतो; मात्र मनुष्य कायमच केवळ स्वतःसाठी प्रयत्न करतो. देव नेहमी मानवजात टिकून राहावी यासाठी कष्ट घेतो, तरी मनुष्य कधीच प्रकाश व नीतिमत्त्वासाठी काही योगदान देत नाही. जरी मनुष्याने काही काळ प्रयत्न केले तरी तो एकही तडाखा सहन करू शकत नाही कारण मनुष्याचे प्रयत्न नेहमीच स्वतःसाठी असतात, दुसऱ्यांसाठी नसतात. मनुष्य कायमच स्वार्थी असतो, तर देव कायमच निःस्वार्थी असतो. जे जे न्याय्य, चांगले आणि सुंदर आहे त्या सर्वांचे उगमस्थान देव आहे, तर मनुष्य सर्व कुरूप व वाईटात यश मिळवणारा व त्याचेच प्रकटीकरण करणारा आहे. देव नीतिमत्त्व आणि सौंदर्य हे त्याचे मूलतत्त्व कधीच बदलणार नाही, तर मनुष्य मात्र केव्हाही व कोणत्याही परिस्थितीत नीतिमत्त्वाशी प्रतारणा करण्याची आणि देवापासून दूर भरकटण्याची पूर्ण क्षमता बाळगून असतो.
मी बोललेल्या प्रत्येक वाक्यात देवाची प्रवृत्ती आहे. माझ्या वचनांचा तुम्ही लक्षपूर्वक विचार केलात तर तुमचे भले होईल आणि तुमचा निश्चितपणे मोठा फायदा होईल. देवाचे मूलतत्त्व समजण्यासाठी अतिशय कठीण असते पण मला असे वाटते तुम्हाला देवाच्या प्रवृत्तीविषयी काहीतरी कल्पना असेल. त्यामुळे मला आशा आहे, की देवाच्या प्रवृत्तीचा अपमान न करता केलेल्या मला दाखवण्यासारख्या गोष्टी तुमच्याकडे असतील. मग माझी खात्री पटेल. उदाहरणार्थ, तुझ्या हृदयात देव सदैव राहू दे. तू जेव्हा काही कृती करतोस, तेव्हा ती त्याच्या वचनानुसार असू दे. सर्व गोष्टींमधील त्याचे हेतू शोध व त्याचा अनादर करणाऱ्या व त्याची अप्रतिष्ठा करणाऱ्या गोष्टी करणे टाळ. यापेक्षा सुद्धा कमी म्हणजे, तुझ्या हृदयात भविष्यातील पोकळी भरून काढण्यासाठी म्हणून देवाला जर तुम्ही नेणीवेच्या पातळीवर ठेवले तर. जर तू हे केलेस, तर तू देवाच्या प्रवृत्तीचा अपमान करशील. समज, तू कधीच ईश्वरनिंदा करत नसशील किंवा आयुष्यभरात कधीच देवाच्या विरुद्ध तक्रारी केल्या नसशील आणि पुन्हा समज, की तुझ्यावर त्याने जे काही सोपवलेले आहे ते नीट पार पाडले असशील व संपूर्ण आयुष्य त्याच्या वचनांना समर्पित असशील, तर प्रशासकीय आदेश उल्लंघणे तू टाळलेले असशील. उदाहरणार्थ, तू जर कधी म्हणाला असशील, “तो देव आहे असा मी का विचार करत नाही?” “मला वाटते हे शब्द पवित्र आत्म्याच्या ज्ञानापेक्षा अधिक नाहीत,” “माझ्या मते देव करतो ती प्रत्येक गोष्ट बरोबर असतेच असे नाही,” “देवाची मानवता माझ्या मानवतेपेक्षा श्रेष्ठ नाही,” “देवाची वचने चक्क अविश्वसनीय आहेत” किंवा इतर अशी मतदर्शक विधाने—तर मी तुला बजावतो, की तुम्ही तुमच्या पापांची कबुली आणि पश्चात्ताप अधिक करावा. नाही तर तुला क्षमेची संधी कधीच मिळणार नाही, कारण तू मनुष्याचा नाही, तर स्वतः देवाचा अपमान करत आहेस. तुला वाटत असेल की तुम्ही मनुष्याबद्दल मतविधान करत आहेस, पण देवाचा आत्मा तसा विचार करत नाही. तुझा त्याच्या देहाबद्दलचा अनादर म्हणजेच त्याचा अनादर. असे असल्यामुळे तू देवाच्या प्रवृत्तीचा अपमान करत नाहीस का? हे ध्यानात ठेवले पाहिजे, की जे सर्व देवाच्या आत्म्याकडून केले जाते ते देहातील त्याचे कार्य सुरक्षित ठेवण्यासाठी व ते नीट केले जावे म्हणून केले जाते. तू जर याकडे दुर्लक्ष केलेस, तर मी म्हणेन की तू असा कोणीतरी आहेस, ज्याला देवावर विश्वास ठेवण्यात कधीच यश मिळणार नाही, कारण तू देवाच्या कोपाला आमंत्रण दिले आहेस. आणि म्हणून तुला धडा शिकवण्यासाठी तो योग्य शिक्षा देईल.
देवाचे मूलतत्त्व समजणे ही क्षुल्लक बाब नाही. तुम्हाला त्याची प्रवृत्ती समजावी लागते. या प्रकारे, तुला हळुहळू आणि नकळतपणे देवाचे मूलतत्त्व समजेल. तुला जेव्हा हे ज्ञान प्राप्त होईल, तेव्हा तू अधिक सुंदर व वरच्या स्थितीत प्रवेश करशील. शेवटी तुला तुझ्या हिडीस आत्म्याची लाज वाटेल, एवढेच नाही, तर त्या लाजेपासून लपायला जागा नाही असेही वाटेल. त्यावेळी देवाच्या प्रवृत्तीचा अपमान होईल असे तुझ्या कृतीत कमीत कमी असेल, तुझे हृदय देवाच्या हृदयाच्या अधिकाधिक जवळ येईल आणि त्याच्याप्रती तुझ्या हृदयात हळुहळू प्रीती वाढत जाईल. मानवजात एका सुंदर अवस्थेत प्रवेश करण्याची ती खूण आहे. पण अजूनपर्यंत तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले नाही, कारण तुम्ही सगळे तुमच्या नशिबामागे धावत असताना, देवाचे मूलतत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात कोणाला रस असतो? हे असेच चालू राहिले, तर तुम्ही नकळतपणे प्रशासकीय आदेश उल्लंघाल, कारण तुम्हाला देवाच्या प्रवृत्तीविषयी अगदीच कमी समजले आहे. म्हणजे देवाच्या प्रवृत्तीचा अपमान करण्याचा पायाच तुम्ही आत्ता रचत नाही का? देवाची प्रवृत्ती समजून घेण्यास सांगणे हे माझ्या कार्यापासून भिन्न नाही. कारण, जर तुम्ही प्रशासकीय आदेश वारंवार उल्लंघलेत, तर तुमच्यापैकी कोण शिक्षेपासून वाचेल? मग माझे कार्य पूर्ण वायाच जाणार नाही का? म्हणून मी पुन्हा सांगतो, की तुमचे स्वतःचे आचरण तपासण्याव्यतिरिक्त तुम्ही जी पावले उचलता त्याबद्दल दक्ष रहा. तुमच्याकडे मी ही वरच्या दर्जाची मागणी करतो व आशा करतो की तुम्ही तिचा काळजीपूर्वक विचार कराल आणि त्यासाठी जिवापाड प्रयत्न कराल. तुमच्या कृतींमुळे माझ्या प्रकोपाला निमंत्रण मिळण्याचा दिवस जर उजाडला, तर परिणाम तुम्हाला एकट्याला भोगावे लागतील व तुमच्याऐवजी शिक्षा भोगण्यासाठी इतर कोणीही नसेल.