अपराध मनुष्याला नरकात घेऊन जातील
मी तुमच्यावर विजय मिळवण्याच्या हेतूने तुम्हाला अनेक इशारे दिले आहेत आणि अनेक सत्ये तुम्हाला सांगितली आहेत. आत्तापर्यंत, तुम्हा सर्वांना तुम्ही पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक समृद्ध असल्याचे जाणवत आहे, एखादी व्यक्ती कशी असावी याविषयीची अनेक तत्त्वे तुम्ही समजून घेतली आहेत व श्रद्धाळू लोकांकडे असलेले पुष्कळ सामान्य व्यवहारज्ञान तुमच्याकडे आले आहे. हे सर्व तुम्ही अनेक वर्षांच्या कालावधीत पेरलेल्याचे फळ आहे. मी तुमचे कर्तृत्व नाकारत नाही, परंतु मला हेदेखील स्पष्टपणे सांगायचे आहे, की तुम्ही इतक्या वर्षांत माझ्याविरूद्ध केलेल्या असंख्य अवज्ञा आणि बंडखोरी मी नाकारत नाही, कारण तुमच्यामध्ये एकही जण संत नाही. तुम्ही सैतानाने भ्रष्ट झालेले लोक आहात यात काहीच अपवाद नाही; तुम्ही ख्रिस्ताचे शत्रू आहात. आजपर्यंत, तुमचे अपराध व अवज्ञा इतक्या आहेत, की त्यांची गणना केली जाऊ शकत नाही, म्हणून मी तुम्हाला नेहमीच छळत असतो हे क्वचितच विचित्र मानले जाऊ शकते. मला तुमच्याबरोबर अशा प्रकारे एकत्र राहण्याची इच्छा नाही—परंतु तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या गंतव्यस्थानांसाठी, मी तुम्हाला इथे आणि आता पुन्हा एकदा त्रास देईन. मला आशा आहे, की तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन कराल व त्याशिवाय तुम्ही माझ्या प्रत्येक उच्चारावर विश्वास ठेवण्यास सक्षम व्हाल आणि माझ्या वचनांचा गहन अर्थ समजू शकाल. मी काय म्हणतो याबद्दल शंका घेऊ नका, तुमच्या मनात आले की माझ्या वचनांचा स्वीकार केला आणि मनात आले की ती बाजूला फेकून दिली हे तर मुळीच नका करू; हे मला असह्य वाटते. माझी वचने चांगली की वाईट याचा विचार करू नका आणि तुम्ही त्यांना गांभीर्याने न घेणे किंवा मी तुम्हाला नेहमीच मोहात पाडतो असे म्हणणे अथवा त्याहूनही वाईट म्हणजे मी तुम्हाला जे सांगितले ते चुकीचे आहे असा विचार तर मुळीच नका करू. याही गोष्टी मला असह्य वाटतात. कारण तुम्ही माझ्याशी संशयाने वागता व मी जे काही बोलतो त्यावर संशय घेता, माझ्या वचनांचा कधीही विचार करत नाही आणि माझ्याकडे दुर्लक्ष करता, म्हणूनच मी तुम्हा प्रत्येकाला गांभीर्याने सांगतो: मी जे बोलतो त्याचा संबंध तत्त्वज्ञानाशी जोडू नका; माझ्या वचनांचा संबंध खोटेपणाशी जोडू नका. तुम्ही माझ्या वचनांना तुच्छतेने प्रतिसाद देणे तर कदापि करू नका. कदाचित मी तुम्हाला जे सांगत आहे ते भविष्यात तुम्हाला कोणीही सांगू शकणार नाही किंवा तुमच्याशी इतक्या औदार्याने बोलू शकणार नाही, या मुद्द्यांवर तुमच्याशी तितक्या धीराने संवाद साधणे तर दूरचीच बाब असेल. येणारे दिवस तुम्ही चांगल्या वेळेची आठवण काढण्यात किंवा मोठ्याने रडण्यात अथवा वेदनेने ओरडण्यात घालवाल अथवा तुम्ही सत्य किंवा जीवनाचा अंशही नसताना अंधाऱ्या रात्रीत जगत असाल अथवा फक्त हताशपणे वाट पाहत असाल किंवा अशा कटू पश्चातापामध्ये राहाल की तुम्हाला काही कळणार नाही…. तुमच्यापैकी जवळजवळ कोणीही या शक्यतांपासून वाचू शकत नाही. कारण तुमच्यापैकी कोणीही अशी जागा व्यापू शकत नाही जिथून तुम्ही देवाची खरी उपासना कराल, परंतु स्वतःला लज्जास्पद व दुष्टतेच्या जगात बुडवून टाकता, तुमच्या विश्वासांमध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये, सारामध्ये आणि शरीरात, अशा अनेक गोष्टींमध्ये गुंतून जाता ज्यांचा जीवनाशी व सत्याशी काहीही संबंध नाही आणि जे प्रत्यक्षात त्यांच्या विरोधात आहेत. म्हणूनच मी तुमच्यासाठी आशा करतो, की तुम्हाला प्रकाशाच्या मार्गावर आणता येईल. माझी एकमात्र आशा आहे, की तुम्ही स्वतःची काळजी घेण्यास, स्वतःकडे लक्ष देण्यास सक्षम व्हाल व तुमची वर्तणूक आणि अपराध उदासीनतेने पाहणार नाही आणि तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानाला जास्त महत्त्व देणार नाही.
बऱ्याच काळापासून, जे लोक देवावर विश्वास ठेवतात ते सर्वजण एक सुंदर गंतव्यस्थानाची उत्कटतेने आशा करत आहेत आणि देवावर विश्वास ठेवणारे सर्व लोक आशा करतात, की त्यांना अचानक चांगले भाग्य लाभेल. त्या सर्वांना आशा आहे, की त्यांना काही कळण्याआधीच, ते स्वर्गातील एखाद्या ठिकाणी शांतपणे बसलेले असतील. पण मी म्हणतो, की हे लोक मनमोहक विचार करतात, परंतु स्वर्गातून खाली पडणारे सौभाग्य प्राप्त करण्याची किंवा आसनावर बसण्याची त्यांची पात्रता आहे की नाही हे त्यांना कधीच कळलेले नाही. तुम्हाला, सध्या, तुमच्याबद्दल चांगले ज्ञान आहे, तरीही शेवटच्या दिवसांत सर्वशक्तिमान देव दुष्टांना शिक्षा करतो तेव्हा तुम्ही आपत्ती व त्याच्या दंडातून सुटण्याची आशा करता. असे दिसते, की गोड स्वप्ने पाहणे आणि त्यांच्या मनाला येईल त्या गोष्टी हव्या असणे हे सैतानाने भ्रष्ट केलेल्या सर्व लोकांचे एक सामान्य वैशिष्ट्य आहे, हे अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या कोणत्याही एकाकी व्यक्तीचे वैशिष्ट्य नाही. असे असले तरी, मला अजूनही तुमच्या या अवाजवी इच्छा, तसेच आशीर्वाद मिळवण्याची तुमची उत्सुकता संपवायची आहे. तुमचे अपराध पुष्कळ आहेत आणि तुमची बंडखोरी सतत वाढत आहे हे लक्षात घेता, या गोष्टी तुमच्या भविष्यासाठीच्या विस्तृत योजनेच्या सुंदर रुपरेषेशी कशा जुळतील? जर तुला मनाला येईल त्या चुका करायच्या असतील, कोणतीही गोष्ट मागे न सोडता, स्वप्ने सत्यात उतरवायची असतील, तर मी तुला तुझ्या धुंदीत राहण्याची व कधीही जागे न होण्याची विनंती करतो—कारण तुझे स्वप्न पोकळ आहे आणि नीतिमान देवाच्या उपस्थितीत, तो तुझ्यासाठी अपवाद करणार नाही. जर तुला स्वप्ने सत्यात उतरवायची असतील, तर कधीही स्वप्न पाहू नकोस; त्याऐवजी, सत्य व तथ्यांना कायम सामोरे जा. हा एकमेव मार्ग आहे ज्याने तुला वाचवले जाऊ शकते. या पद्धतीचे ठोस टप्पे काय आहेत?
प्रथम, तुझ्या सर्व अपराधांवर एक नजर टाक आणि सत्याशी सुसंगत नसलेले कोणतेही वर्तन व विचारांचे निरीक्षण कर.
ही गोष्ट तुम्ही सहज करू शकता आणि माझा विश्वास आहे, की सर्व बुद्धिमान लोक हे करू शकतात. तथापि, ज्यांना अपराध व सत्य याचा अर्थच कधी कळत नाही ते अपवाद आहेत, कारण मूलभूत स्तरावर ते बुद्धिमान लोक नाहीत. मी अशा लोकांशी बोलत आहे ज्यांना देवाने मान्यता दिली आहे, जे प्रामाणिक आहेत, ज्यांनी कोणत्याही प्रशासकीय आदेशाचे गंभीरपणे उल्लंघन केले नाही आणि जे त्यांचे स्वतःचे अपराध सहजपणे ओळखू शकतात. जरी मला तुमच्याकडून अपेक्षित असलेली ही एक गोष्ट पूर्ण करणे सोपे असले तरी, मला तुमच्याकडून फक्त हीच गोष्ट अपेक्षित नाही. काहीही असो, मला आशा आहे, की तुम्ही या आवश्यकतेवर खाजगीत हसणार नाही व विशेषतः तुम्ही याकडे तुच्छतेने पाहणार नाही किंवा हलकेच घेणार नाही. तुम्ही ते गांभीर्याने हाताळले पाहिजे आणि गांभीर्याने विचार केला पाहिजे.
दुसरे म्हणजे, तुझा प्रत्येक अपराध आणि अवज्ञांसाठी, तू संबंधित सत्य शोधले पाहिजेस व नंतर त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या सत्यांचा वापर केला पाहिजेस. यानंतर, तुझ्या अपराधाच्या कृती आणि अवज्ञाकारी विचार व कृतींची जागा सत्याच्या आचरणाने बदल.
तिसरे म्हणजे, तुम्ही एक प्रामाणिक व्यक्ती असले पाहिजे, नेहमी धूर्त आणि सतत फसवी असणारी व्यक्ती असू नये. (येथे मी तुम्हाला पुन्हा एक प्रामाणिक व्यक्ती होण्यास सांगत आहे.)
जर तू या तिन्ही गोष्टी साध्य करू शकत असलास, तर तू भाग्यवानांपैकी एक आहेस—ज्या व्यक्तीची स्वप्ने सत्यात उतरतात आणि ज्याला चांगले भाग्य मिळते. कदाचित तुम्ही या तीन अप्रिय आवश्यकतांना गांभीर्याने हाताळाल किंवा कदाचित तुम्ही त्या बेजबाबदारपणे हाताळाल. काहीही असो, तुमची स्वप्ने पूर्ण करणे व तुमचे आदर्श आचरणात आणणे हा माझा उद्देश आहे, तुमची चेष्टा करणे अथवा तुम्हाला मूर्ख बनवणे नाही.
माझ्या मागण्या सोप्या असू शकतात, पण मी तुम्हाला जे सांगत आहे ते एक अधिक एक म्हणजे दोन इतके सोपे नाही. जर तुम्ही याबद्दल फक्त साधारणपणे बोलणे किंवा पोकळ, उच्चरवात चर्चा करणे एवढेच केले, तर तुमच्या विस्तृत योजनेची सुंदर रूपरेषा आणि तुमच्या इच्छा या कायम कोरे पानच राहतील. तुमच्यापैकी जे इतकी वर्षे सहन करतात व इतके कष्ट करतात, त्यांच्याबद्दल मला दया येणार नाही. याउलट, ज्यांनी माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत त्यांना मी शिक्षा देईन, बक्षिसे नाही, त्यांच्याशी सहानुभूतीने वागणे तर दूरचीच बाब असेल. तुम्ही कदाचित कल्पना करता, की इतकी वर्षे अनुयायी राहून तुम्ही खूप कष्ट केलेत आणि देवाच्या घरामधील सेवेकरी म्हणून तुम्हाला एक वाटी तांदूळ दिले जावे. मी म्हणेन की तुमच्यापैकी बहुसंख्य लोक असा विचार करतात, कारण तुम्ही नेहमीच गोष्टींचा फायदा कसा घ्यायचा आणि तुमचा गैरफायदा घेतला जाऊ नये या तत्त्वाचा पाठपुरावा केला आहे. म्हणूनच, मी आता तुम्हाला पूर्ण गांभीर्याने सांगत आहे: तुझे परिश्रम किती गुणवान आहे, पात्रता किती प्रभावी आहे, तू माझे किती जवळून अनुसरण करतोस, तू किती प्रसिद्ध आहेस किंवा तुझी वृत्ती किती सुधारली आहे याची मला पर्वा नाही; जोपर्यंत तू माझ्या मागण्या पूर्ण करत नाहीस, तोपर्यंत तुला माझ्याकडून कधीही कौतुक लाभू शकणार नाही. तुमच्या त्या सर्व कल्पना व हिशोब लवकरात लवकर दूर सारा आणि माझ्या आवश्यकता गांभीर्याने हाताळण्यास सुरुवात करा; अन्यथा, माझे कार्य शेवटाला नेण्यासाठी मी प्रत्येकाला राख करून टाकेन व सर्वात वाईट म्हणजे माझे कार्य आणि कष्ट व्यर्थ ठरेल, कारण मी माझ्या शत्रूंना व वाईट गोष्टींचा विचार करणार्या आणि सैतानाचे स्वरूप असणाऱ्या लोकांना माझ्या राज्यात आणू शकत नाही किंवा त्यांना पुढील युगात घेऊन जाऊ शकत नाही.
मला खूप आशा आहेत. मला आशा आहे, की तुम्ही योग्य आणि चांगले आचरण कराल, तुमचे कर्तव्य श्रद्धेने पूर्ण कराल, सत्य व माणुसकी बाळगू शकाल, असे लोक व्हाल जे त्यांच्याकडे असलेले सर्व काही आणि अगदी त्यांचे जीवनदेखील देवासाठी देऊ शकतात, आणखी असे बरेच काही. या सर्व आशा तुमचा अपुरेपणा व तुमचा भ्रष्टाचार आणि अवज्ञा यातून निर्माण होतात. जर मी तुमच्याशी केलेले कोणतेही संभाषण तुमचे लक्ष वेधून घेण्यास पुरेसे नसेल, तर कदाचित मी आता काहीही न बोलणे इतकेच करू शकेन. तथापि, त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला समजते. मी वारंवार विश्रांती घेत नाही, म्हणूनच मी बोललो नाही तर लोकांनी पाहावे यासाठी काही तरी करेन. मी एखाद्याची जीभ कुजवू शकतो किंवा एखाद्याचे तुकडे करून त्याला मृत्यू देऊ शकतो अथवा लोकांना मज्जातंतूची विकृती देऊ शकतो आणि त्यांना बऱ्याच मार्गांनी भयानक दिसण्यास भाग पाडू शकतो. मग पुन्हा, मी लोकांना यातना सहन करायला लावू शकतो ज्या मी विशेषतः त्यांच्यासाठी तयार केल्या आहेत. अशा प्रकारे मला आनंद मिळेल, खूप बरे व खूप संतुष्ट वाटेल. नेहमी असे म्हटले जाते, की “चांगल्याची परतफेड चांगल्याने आणि वाईटाची परतफेड वाईटाने केली जाते,” मग आता का नाही? जर तुला मला विरोध करायचा असेल आणि माझ्याबद्दल काही न्याय करायचा असेल तर मी तुझे तोंड कुजवेन व ते मला खूप आनंदित करेल. याचे कारण म्हणजे, शेवटी तू जे केलेस ते सत्य नाही, त्याचा जीवनाशी तर काहीच संबंध नाही, तर मी जे काही करतो ते सत्य आहे; माझ्या सर्व कृती माझ्या कार्याच्या तत्त्वांशी आणि मी मांडलेल्या प्रशासकीय आदेशांशी सुसंगत आहेत. म्हणूनच, मी तुम्हा प्रत्येकाला काही पुण्य जमवण्याची विनंती करतो, इतके वाईट करणे थांबवा व तुमच्या मोकळ्या वेळेत माझ्या मागण्यांकडे लक्ष द्या. तेव्हा मला आनंद वाटेल. तुम्ही देहात जे प्रयत्न केलेत त्याच्या एक सहस्रांश सुद्धा सत्यासाठी योगदान (किंवा दान) केले तर मी म्हणतो, की तू वारंवार अपराध करणार नाहीस आणि तुझे तोंड कुजणार नाही. हे स्वाभाविक नाही का?
तू जितके जास्त अपराध करशील, चांगले गंतव्यस्थान मिळवण्यासाठी तुला तितक्या कमी संधी मिळतील. याउलट, तू जितके कमी अपराध करशील, तितकी तुझी देवाकडून स्तुती होण्याची शक्यता अधिक वाढेल. जर तुझे अपराध इतके वाढले, की तुला क्षमा करणे माझ्यासाठी अशक्य आहे, तर तू क्षमा मिळवण्याची शक्यता पूर्णपणे वाया घालवली असशील. यामुळे, तुझे गंतव्यस्थान वर नाही, तर खाली असेल. जर तू माझ्यावर विश्वास ठेवत नसशील, तर चूक करण्याची हिंमत कर व तुला काय मिळते ते पहा. जर तू सत्याचे आचरण अत्यंत प्रामाणिकपणे करणारी व्यक्ती असशील, तर तुला तुझ्या अपराधांबद्दल क्षमा मिळण्याची संधी नक्कीच मिळेल आणि तू कमीत कमी वेळा अवज्ञा करशील. जर तू सत्याचे आचरण करण्यास तयार नसलेली व्यक्ती असशील, तर देवासमोर तुझे अपराध नक्कीच वाढतील व जोपर्यंत तू तुझ्या संपूर्ण विनाशाच्या वेळेपर्यंत पोहोचत नाहीस, तोपर्यंत तू अधिकाधिक अवज्ञा करशील. तेव्हा तुझे आशीर्वाद घेण्याचे सुखद स्वप्न उद्ध्वस्त होईल. तुझे अपराध म्हणजे अपरिपक्व किंवा मूर्ख व्यक्तीच्या चुका समजू नकोस; तुझ्या कमी क्षमतेमुळे सत्याने आचरण करणे शक्य झाले नाही अशी सबब वापरू नकोस. शिवाय, तू केलेल्या अपराधांना फारसे ज्ञान नसलेल्या व्यक्तीच्या कृती मानू नकोस. जर तू स्वतःला क्षमा करण्यास व औदार्याने वागण्यात चांगला असशील, तर मी म्हणतो की तू भित्रा आहेस ज्याला सत्य कधीच प्राप्त होणार नाही किंवा तुझे अपराध तुझा पाठलाग करणे कधीही थांबवणार नाहीत; ते तुला सत्याच्या मागण्या पूर्ण करण्यापासून कायम रोखतील आणि तुला कायम सैतानाचे एकनिष्ठ साथीदार राहण्यास भाग पाडतील. माझा अजूनही तुला हाच सल्ला आहे: तुझे छुपे अपराध लक्षात न घेता फक्त तुझ्या गंतव्यस्थानाकडे लक्ष देऊ नकोस; अपराधांचा गांभीर्याने विचार कर व तुझ्या गंतव्यस्थानाच्या चिंतेने त्यापैकी कोणत्याहीकडे दुर्लक्ष करू नका.