सत्याने आचरण न करणाऱ्या लोकांसाठी इशारा

बंधू आणि भगिनींपैकी जे नेहमी त्यांची नकारात्मकता व्यक्त करत असतात, ते सैतानाचे सेवक आहेत व ते चर्चच्या कार्यात अडथळा आणतात. अशा लोकांना एक दिवस हुसकावूनच लावले पाहिजे आणि बाहेरच काढले पाहिजे. देवावरील त्यांच्या श्रद्धेनुसार, जर लोकांच्या मनात देवाविषयी पूज्यभाव नसेल, देवाप्रति आज्ञाधारक हृदय नसेल, तर ते त्याच्यासाठी कोणतेही कार्य करू शकणार नाहीत एव्हढेच नाही तर, उलटपक्षी ते असे लोक बनतील की जे देवाच्या कार्यात अडथळा आणतात आणि त्याचा अवमान करतात. देवावर विश्वास ठेवणे, परंतु त्याची आज्ञा न मानणे किंवा त्याचा आदर न करणे व त्याऐवजी त्याचा प्रतिकार करणे, ही आस्तिकासाठी सर्वात मोठी अप्रतिष्ठा आहे. जर आस्तिकांचे बोलणे आणि वर्तन हे नास्तिकांसारखेच निष्काळजी व अनियंत्रित असेल, तर ते नास्तिकांपेक्षाही जास्त वाईट ठरतात; ती पुरातन काळची भुते आहेत. जे चर्चमध्ये त्यांचे विषारी, दुर्भावनापूर्ण विचार उघड करतात, जे अफवा पसरवतात, विसंवाद भडकवतात आणि बंधूभगिनींमध्ये गटबाजी करतात—त्यांना चर्चमधून हुसकावून लावले पाहिजे. तरीही, आताचा काळ हा देवाच्या कार्याचा एक वेगळा काळ असल्यामुळे, हे लोक प्रतिबंधित आहेत, कारण त्यांना निश्चितच काढून टाकले जाईल. सैतानाने भ्रष्ट केलेल्या सर्वांच्या प्रवृत्ती भ्रष्ट आहेत. काहींमध्ये भ्रष्ट प्रवृत्तीपेक्षा अधिक काही नसते, तर काही वेगळे असतात: त्यांच्याकडे भ्रष्ट सैतानी प्रवृत्ती असते एव्हढेच नाही तर त्यांचा स्वभाव अत्यंत द्वेषभावना परवणारा असतो. त्यांच्या बोलण्यातून व कृतीतून त्यांची भ्रष्ट, सैतानी प्रवृत्ती प्रकट होत राहते; एवढेच नव्हे, तर हे लोक, खरेखुरे दुष्ट सैतान असतात. त्यांची वर्तणूक देवाच्या कार्यात व्यत्यय आणि अडथळा आणते, ती बंधू व भगिनींच्या जीवनातील प्रवेशाला अडथळा आणते आणि चर्चच्या सामान्य जीवनाचे नुकसान करते. आज ना उद्या, मेंढ्यांच्या पोशाखातील हे लांडगे बाहेर काढले पाहिजेत; सैतानाच्या या सेवकांप्रति निर्दयी वृत्ती, त्यांना नाकारण्याची वृत्ती बाळगली पाहिजे. केवळ हेच देवाच्या बाजूने उभे असणे आहे व जे असे करण्यात अपयशी ठरतात ते सैतानासोबत चिखलात लोळत आहेत. जे लोक देवावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवतात, त्यांच्या अंतःकरणात तो नेहमी असतो आणि त्यांच्यामध्ये नेहमी देवाचा आदर करणारे, देवावर प्रेम करणारे हृदय असते. जे देवावर विश्वास ठेवतात त्यांनी सावधपणे व काळजीपूर्वक गोष्टी केल्या पाहिजेत, आणि ते जे काही करतात ते देवाच्या आवश्यकतेनुसार व त्याचे हृदय संतुष्ट करण्यास सक्षम असले पाहिजे. त्यांनी भडक डोक्याचे असता कामा नये व त्यांना वाटेल ते त्यांनी करून टाकू नये; हे सदाचरणी व्यक्तीला शोभत नाही. देवाचा ध्वज फडकवत असताना, लोकांनी सर्वत्र आपला तोरा दाखवत किंवा फसवाफसवी करत उन्मादाने वागताच कामा नये हे सर्वात बंडखोर आचरण आहे. कुटुंबांना त्यांचे नियम असतात व राष्ट्रांचे आपापले कायदेकानू असतात—आणि देवाच्या घरात तर त्याचे अधिकच महत्त्व नाही का? येथे तर अधिक कठोर मानके असू नयेत का? यासाठी तरी काही थोडे जास्त प्रशासकीय आदेश असू नयेत का? लोक त्यांना काय हवे तसे करण्यास मोकळे आहेत, परंतु देवाचे प्रशासकीय आदेश इच्छेनुसार बदलता येणार नाहीत. देव हा देवच आहे की जो मनुष्याचा अपराध सहन करत नाही; तो असा देव आहे जो लोकांना मरण देतो. लोकांना हे आधीपासूनच माहीत नाही का?

प्रत्येक चर्चमध्ये असे लोक असतात जे चर्चच्या कार्यात अडथळा आणतात किंवा देवाच्या कार्यात हस्तक्षेप करतात. हे सर्व सैतान आहेत ज्यांनी देवाच्या घरामध्ये लपूनछपून घुसखोरी केली आहे. असे लोक अभिनय करण्यात चांगले असतात: ते माझ्यासमोर मोठ्या श्रद्धेने येतात, पुढे वाकून चापलुसी करतात, हिडीस कुत्र्यासारखे राहतात आणि त्यांचे “सर्व काही” स्वतःचे ध्येय साध्य करण्यासाठी समर्पित करतात—परंतु बंधू व भगिनींसमोर ते त्यांची कुरूप बाजू दर्शवतात. जेव्हा ते जरबेने आचरण करणारे लोक पाहतात, तेव्हा ते त्यांच्यावर प्रहार करतात आणि त्यांना बाजूला करतात; जेव्हा ते लोकांना स्वतःहून अधिक हतबल पाहतात, तेव्हा ते त्यांची खुशामत करतात व त्यांची स्तुती करतात. ते चर्चमध्ये वेड्यासारखे धाव घेतात. असे म्हटले जाऊ शकते, की असे “स्थानिक गुंड,” असे “पाळीव कुत्रे” बहुसंख्य चर्चमध्ये अस्तित्वात आहेत. ते एकमेकांना डोळे मिचकावून आणि गुप्त संकेत पाठवून एकत्र सैतानी कृती करतात व त्यापैकी कोणीही सत्याने आचरण करत नाही. ज्याच्याकडे सर्वात जास्त विष आहे तो “मुख्य राक्षस” असतो व ज्याला सर्वात जास्त प्रतिष्ठा आहे तो त्यांचा ध्वज उंच धरून त्यांचे नेतृत्व करतो. हे लोक चर्चमध्ये गोंधळ घालतात, त्यांची नकारात्मकता पसरवतात, मृत्यूला वाव देतात, त्यांच्या इच्छेनुसार करतात, त्यांना हवे ते बोलतात आणि कोणीही त्यांना रोखण्यास धजावत नाही. ते सैतानाच्या प्रवृत्तीशी एकरूप होतात. त्यांनी चर्चमध्ये अडथळा आणताच, चर्चमध्ये मृत्यूचे सावट निर्माण होते. चर्चमधील जे लोक सत्याचे आचरण करतात ते नाकारले जातात, जे त्यांचे सर्व काही देऊ शकत नाहीत, त्यांना बाहेर टाकले जाते, तर जे चर्चला त्रास देतात व मृत्यू पसरवतात ते आतमध्ये गोंधळ घालतात—आणि इतकेच काय, बहुतेक लोक त्यांचे अनुसरण करतात. अशा चर्चवर सैतान, सरळसरळ राज्य करतात; भूत त्यांचा राजा असतो. जर प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांपैकी एकाने उठून मुख्य भुताला नाकारले नाही, तर त्यांचाही आज ना उद्या नाश होईल. यापुढे अशा चर्चवर कारवाई झालीच पाहिजे. जे थोडेसे सत्य आचरणात आणण्यास सक्षम आहेत त्यांनी प्रयत्न केला नाही, तर ते चर्च नष्ट केले जाईल. जर एखाद्या चर्चमध्ये सत्याने आचरण करण्यास तयार असलेला कोणीही नसेल आणि देवासाठी साक्षीदार होऊ शकणारा कोणी नसेल, तर ते चर्च पूर्णपणे वेगळे केले पाहिजे व इतर चर्चशी त्याचे संबंध तोडले पाहिजेत. याला “मृतांचे दफन करणे” म्हणतात; सैतानाला नाकारण्याचा हाच अर्थ आहे. जर चर्चमध्ये अनेक स्थानिक गुंड असतील आणि त्यांच्या “मागेमागे फिरणारे क्षुल्लक लोक” असतील ज्यांमध्ये विवेकबुद्धीचा पूर्णपणे अभाव आहे व जर प्रार्थनेसाठी जमलेले लोक सत्य पाहिल्यानंतरही, या गुंडांचे बंधन आणि हाताळणी नाकारण्यास असमर्थ असतील, तर शेवटी त्या सर्व मुर्खांना बाहेर काढून टाकले जाईल. या मागेमागे फिरणाऱ्या क्षुल्लक लोकांनी कदाचित काहीही भयंकर केले नसेल, परंतु ते आणखी फसवे, अधिक चपळ व टाळाटाळ करणारे आहेत आणि यासारख्या प्रत्येकाला बाहेर काढून टाकले जाईल. एकालाही राहू द्यायचे नाही! जे सैतानाचे आहेत ते सैतानाकडे परत जातील, तर जे देवाचे आहेत ते नक्कीच सत्याच्या शोधात जातील; हे त्यांच्या स्वभावानुसार ठरवले जाते. जे सैतानाचे अनुसरण करतात त्या सर्वांचा नाश होऊ द्या! अशा लोकांवर दया दाखवली जाणार नाही. जे सत्याचा शोध घेतात त्यांच्यासाठी तरतूद केली केली जाईल व त्यांना त्यांचे समाधान होईपर्यंत देवाच्या वचनाचा आनंद मिळेल. देव नीतिमान आहे; तो कोणाबद्दलही पक्षपातीपणा करणार नाही. जर तू सैतान असशील, तर तू सत्याने आचरण करण्यास असमर्थ आहेस; जर तू सत्याचा शोध घेणारा असशील, तर हे निश्चित आहे की सैतान तुला पकडू शकणार नाही. हे सर्व संशयाच्या पलीकडे आहे.

जे लोक प्रगतीसाठी धडपडत नाहीत, त्यांची, इतरांनी देखील त्यांच्यासारखेच नकारात्मक आणि आळशी असावेत अशी नेहमी इच्छा असते. जे सत्य आचरणात आणत नाहीत त्यांना, ते करणार्‍यांचा हेवा वाटतो व जे गडबडलेले असतात आणि ज्यांच्यात विवेकबुद्धीचा अभाव आहे, त्यांना फसवण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. हे लोक ज्या गोष्टींची वाच्यता करीत असतात त्यामुळे तुझी अधोगती होऊ शकते, तू खाली घसरू शकतोस, विचित्र स्थिती विकसित होऊ शकते व तुझ्यापुढे अंधार पसरू शकतो. ते तुला देवापासून दूर जाण्यास आणि देहाचे चोचले पुरवून स्वतःला आनंद देण्यास प्रवृत्त करतात. जे लोक सत्यावर प्रेम करत नाहीत आणि जे नेहमी देवाप्रती निष्काळजी असतात ते स्वतःबद्दल जागरूक नसतात व अशा लोकांची प्रवृत्ती इतरांना पापे करण्यास आणि देवाला धुडकावण्यास प्रवृत्त करते. ते सत्य आचरणात आणत नाहीत किंवा इतरांना ते आचरणात आणू देत नाहीत. ते पापाची भलावण करतात व त्यांना स्वतःचा तिरस्कार वाटत नाही. ते स्वतःला ओळखत नाहीत आणि ते इतरांनाही स्वतःला जाणून घेण्यापासून रोखतात; ते इतरांना सत्याची इच्छा करण्यापासून देखील रोखतात. ते ज्यांना फसवतात ते प्रकाश पाहू शकत नाहीत. ते अंधारात जाऊन पडतात, स्वतःला ओळखत नाहीत, त्यांना सत्याबद्दल स्पष्टता नसते व ते देवापासून अधिकाधिक दूर होत जातात. ते सत्य आचरणात आणत नाहीत आणि ते इतरांना सत्याने आचरण करण्यापासून रोखतात, त्या सर्व मूर्खांना त्यांच्यासमोर आणतात. ते देवावर विश्वास ठेवतात असे म्हणण्यापेक्षा ते त्यांच्या पूर्वजांवर विश्वास ठेवतात किंवा ते ज्यांच्यावर विश्वास ठेवतात ते त्यांच्या हृदयातील मूर्ती आहेत असे म्हणणे योग्य ठरेल. जे लोक देवाचे अनुसरण करण्याचा दावा करतात त्यांनी त्यांचे डोळे उघडून ते नक्की कोणावर विश्वास ठेवतात हे पाहणे सर्वोत्तम राहिल: तुझा खरोखर देवावर विश्वास आहे की सैतानावर? तू ज्यावर विश्वास ठेवतोस तो देव नसून तुझ्या स्वतःच्या मूर्ती आहेत हे जर तुला माहीत असेल, तर तू आस्तिक असल्याचा दावा न करणेच उत्तम. तुझा कोणावर विश्वास आहे हे तुला खरोखरच माहीत नसेल तर, पुन्हा एकदा तू विश्वास ठेवण्याचा दावा न करणेच उत्तम होईल. असे म्हणणे ईश्वरनिंदा होईल! कोणीही तुम्हाला देवावर विश्वास ठेवण्यास भाग पाडत नाही. तुमचा माझ्यावर विश्वास आहे असे म्हणू नका; मी अशा गोष्टी भरपूर ऐकल्या आहेत आणि त्या पुन्हा ऐकण्याची माझी इच्छा नाही, कारण तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता ती तुमच्या हृदयातील मूर्ती व तुमच्यातील स्थानिक गुंड आहे. जे सत्य समजल्यावर अविश्वासाने त्यांचे डोके हलवतात, जे मृत्यूची चर्चा ऐकून दात विचकतात, ती सर्व सैतानाची पिल्ले आहेत आणि त्यांना बाहेर काढून टाकले जाईल. चर्चमधील अनेकांमध्ये विवेकबुद्धी नाही. जेव्हा एखादी फसवी गोष्ट घडते तेव्हा ते अनपेक्षितपणे सैतानाच्या बाजूने उभे राहतात; त्यांना सैतानाचे सेवक म्हटल्याबद्दल ते नाराज देखील होतात. जरी लोक असे म्हणाले, की त्यांच्याकडे विवेकबुद्धी नाही, तरीही ते नेहमी सत्याशिवाय असलेल्या बाजूला उभे राहतात, ते निर्णायक वेळी सत्याच्या बाजूने उभे राहत नाहीत, ते कधीही सत्याच्या बाजूने उभे राहत नाहीत आणि सत्यासाठी वाद घालत नाहीत. त्यांच्यात खरोखरच विवेकबुद्धीचा अभाव आहे का? ते अनपेक्षितपणे सैतानाची बाजू का घेतात? सत्याच्या समर्थनार्थ न्याय्य व वाजवी असा एकही शब्द ते कधीच का बोलत नाहीत? खरोखर त्यांच्या क्षणिक गोंधळामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे का? लोकांमध्ये विवेकबुद्धी जितकी कमी असते तितके ते सत्याच्या बाजूने उभे राहण्यास कमी सक्षम असतात. हे काय दाखवते? विवेकबुद्धी नसलेल्या लोकांना दुष्ट गोष्टी आवडतात हे यावरून दिसून येत नाही का? हा प्रकार म्हणजे ती सैतानाची एकनिष्ठ पिल्ले आहेत हे दाखवत नाही का? ते नेहमी सैतानाच्या बाजूने उभे राहून त्याची भाषा का बोलतात? त्यांचा प्रत्येक शब्द आणि कृती, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव हे सर्व हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत, की ते कोणत्याही प्रकारे सत्यप्रेमी नाहीत; उलट, ते सत्याचा तिरस्कार करणारे लोक आहेत. ते सैतानाच्या बाजूने उभे राहू शकतात हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे, की सैतानाचे या क्षुद्र भुतांवर खरोखर प्रेम आहे जे सैतानासाठी लढण्यात त्यांचे आयुष्य घालवतात. ही सर्व पुरेशा प्रमाणात स्पष्ट नाहीत का? जर तू खरेच सत्यावर प्रेम करणारी व्यक्ती असशील, तर जे सत्याने आचरण करतात त्यांच्याबद्दल तुला अजिबात आदर का नाही, आणि जे सत्याने आचरण करत नाहीत त्यांनी जराशी नजर टाकली तरी तू लगेच त्यांचे अनुसरण का करतोस? ही कोणत्या प्रकारची समस्या आहे? तुझ्यात विवेकबुद्धी आहे की नाही याची मला पर्वा नाही. तू किती मोठी किंमत दिली आहेस याची मला पर्वा नाही. तुझी शक्ती किती मोठी आहे याची मला पर्वा नाही आणि तू स्थानिक दादागिरी करणारा आहेस किंवा अग्रभागी असलेला नेता आहेस याची मला पर्वा नाही. जर तुझी शक्ती मोठी असेल तर ते केवळ सैतानाच्या सामर्थ्याच्या मदतीमुळे आहे. जर तुझी प्रतिष्ठा जास्त असेल, तर त्याचे कारण फक्त एवढेच आहे की तुझ्या आजूबाजूला बरेच लोक आहेत जे सत्याने आचरण करत नाहीत. जर तुझी हकालपट्टी झाली नसेल, तर त्याचे कारण असे आहे, की आता हुसकावून लावण्याची वेळ आलेली नाही; खरे तर, निर्मूलनाच्या कार्याची वेळ आली आहे. आता तुला बाहेर काढण्याची घाई नाही. मी फक्त त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा तुला बाहेर काढून टाकल्यानंतर मी तुला शिक्षा करेन. जो सत्याने आचरण करत नाही त्याला बाहेर काढून टाकले जाईल!

जे लोक देवावर मनापासून विश्वास ठेवतात ते असे लोक आहेत जे देवाचे वचन आचरणात आणण्यास आणि सत्य आचरणात आणण्यास तयार आहेत. जे लोक देवाला दिलेल्या त्यांच्या साक्षीत खंबीरपणे उभे राहण्यास खरोखर सक्षम आहेत, ते देखील असे आहेत की जे त्याचे वचन आचरणात आणण्यास तयार आहेत व खऱ्या अर्थाने सत्याच्या बाजूने उभे राहू शकतात. जे लोक फसवणूक आणि अन्यायाचा अवलंब करतात त्या सर्वांमध्ये सत्याचा अभाव असतो व ते सर्व देवाला लाज आणतात. जे चर्चमध्ये वाद निर्माण करतात ते सैतानाचे सेवक आहेत, ते सैतानाचे मूर्त स्वरूप आहेत. असे लोक खूप विद्वेषपूर्ण वृत्तीचे असतात. ज्यांना विवेकबुद्धी नाही आणि जे सत्याच्या बाजूने उभे राहण्यास असमर्थ आहेत ते सर्व वाईट हेतू बाळगतात व सत्याला कलंकित करतात. त्याहीपेक्षा अधिक म्हणजे, ते सैतानाचे आदिमरूपातील प्रतिनिधी आहेत. ते पापातून मुक्त करण्याच्या पलीकडे आहेत व त्यांना स्वाभाविकच काढून टाकले जाईल. जे सत्याने आचरण करत नाहीत त्यांना देवाचे कुटुंब राहण्याची अनुमती देत नाही किंवा जे जाणूनबुजून चर्च उध्वस्त करतात त्यांनाही राहण्याची अनुमती देत नाही. मात्र, आता हकालपट्टीचे कार्य करण्याची वेळ नाही; असे लोक शेवटी उघडे य पडतील व काढून टाकले जातील. या लोकांवर आता याहून अधिक निरुपयोगी कार्य करायचे नाही; जे सैतानाचे आहेत ते सत्याच्या बाजूने उभे राहू शकत नाहीत, तर जे सत्याचा शोध घेतात ते सत्याच्या बाजूने उभे राहू शकतात. जे लोक सत्याने आचरण करत नाहीत ते सत्याचा मार्ग ऐकण्यास आणि सत्याची साक्ष देण्यास अयोग्य असतात. सत्य हे त्यांच्या कानावर पडण्यासाठी नाही; उलट, ते आचरण करणाऱ्यांवर निर्देशित केले जाते. प्रत्येक व्यक्तीचा अंत उघड होण्याआधी, जे चर्चला त्रास देतात व देवाच्या कार्यात व्यत्यय आणतात त्यांना प्रथम सध्यापुरते बाजूला ठेवले जाईल, त्यांच्याकडे नंतर लक्ष दिले जाईल. एकदा कार्य पूर्ण झाल्यावर, या लोकांपैकी प्रत्येकाला उघडे पाडले जाईल आणि नंतर त्यांना काढून टाकले जाईल. सध्यापुरते, सत्य प्रकट केले जात असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाईल. जेव्हा मानवजातीसमोर संपूर्ण सत्य उघड होईल तेव्हा त्या लोकांना काढून टाकले पाहिजे; ही अशी वेळ असेल जेव्हा सर्व लोकांना त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकृत केले जाईल. विवेकबुद्धी नसलेल्यांच्या क्षुल्लक युक्त्या दुष्टांच्या हातून त्यांचा नाश करतील, ते त्यांना आमिष दाखवून भुलवतील ते कधीही परत येणार नाहीत. आणि ते अशाच वागणुकीसाठी पात्र आहेत, कारण ते सत्यावर प्रेम करत नाहीत, कारण ते सत्याच्या बाजूने उभे राहण्यास असमर्थ आहेत, कारण ते दुष्ट लोकांचे अनुसरण करतात व दुष्ट लोकांच्या बाजूने उभे राहतात आणि ते दुष्ट लोकांशी संगनमत करतात व देवाचा अवमान करतात. ते दुष्ट लोक जे काही दर्शवतात तो दुष्टपणाच आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे, तरीही ते त्यांचेच मनःपूर्वक ऐकतात आणि त्यांचे अनुसरण करण्यासाठी सत्याकडे पाठ फिरवतात. हे लोक जे सत्याने आचरण करत नाहीत पण जे विध्वंसक व घृणास्पद गोष्टी करतात ते सर्वच दुष्कृत्य करत नाहीत का? जरी त्यांच्यामध्ये स्वतःला राजे म्हणवून घेणारे आणि इतर त्यांचे अनुकरण करणारे लोक असले तरी, त्यांचा देवाला धुडकावून लावणारा स्वभाव सारखाच नाही का? देव त्यांना वाचवत नाही असा दावा करण्यासाठी त्यांच्याकडे कोणती सबब असू शकते? देव नीतिमान नाही असा दावा करण्यासाठी त्यांच्याकडे कोणती सबब असू शकते? त्यांच्या स्वतःच्याच दुष्टपणामुळे त्यांचा नाश होत नाही का? त्यांची स्वतःचीच बंडखोरी त्यांना नरकात नेऊन टाकत नाही का? जे लोक सत्याने आचरण करतात ते सरतेशेवटी तारले जातील व सत्यामुळे परिपूर्ण बनतील. जे सत्याने आचरण करत नाहीत ते शेवटी सत्यामुळे स्वतःचा नाश करवून घेतील. जे सत्याने आचरण करतात आणि जे करत नाहीत त्यांना हे असे शेवट लाभणार आहेत. जे लोक सत्याने आचरण करण्याची योजना करत नाहीत त्यांना मी सल्ला देतो की त्यांनी आणखी पापे करू नयेत, म्हणूनच लवकरात लवकर चर्च सोडावे. जेव्हा वेळ येईल तेव्हा पश्चात्ताप करण्यास उशीर झालेला असेल. विशेषतः, जे गटबाजी करतात व मतभेद निर्माण करतात आणि जे चर्चमधील स्थानिक गुंड आहेत त्यांनी तर आणखी लवकर निघूनच जावे. दुष्ट लांडग्यांचा स्वभाव असलेले असे लोक बदल घडवण्यास असमर्थ असतात. त्यांनी लवकरात लवकर चर्च सोडणे, बंधू आणि भगिनींच्या सर्वसामान्य जीवनात पुन्हा कधीही अडथळा न आणणे व त्याद्वारे देवाच्या शिक्षेपासून दूर राहणे अधिक चांगले होईल. तुमच्यापैकी जे त्यांच्यासोबत गेले आहेत त्यांनी या संधीचा उपयोग करून स्वतःविषयीचे चिंतन करणे चांगले होईल. तुम्ही दुष्टांसोबत चर्च सोडाल की येथे राहून आज्ञाधारकपणे नपसरण कराल? तुम्ही याबाबत काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. मी तुम्हाला निवड करण्याची आणखी एक संधी देतो आणि मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे.

मागील:  पवित्र आत्म्याचे कार्य आणि सैतानाचे कार्य

पुढील:  तू असा कोणी आहेस का जो जिवंत झाला आहे?

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger