पवित्र आत्म्याचे कार्य आणि सैतानाचे कार्य
आत्म्याबद्दल सखोल माहिती कशी मिळते? पवित्र आत्मा मनुष्यामध्ये कसे कार्य करतो? सैतान मनुष्यामध्ये कसे कार्य करतो? दुष्ट आत्मे माणसामध्ये कसे कार्य करतात? प्रकटीकरण काय आहे? तुझ्या बाबतीत काही घडते, तेव्हा ते पवित्र आत्म्याकडून येते का आणि तू त्याचे पालन करावेस की ते नाकारावेस? लोकांच्या प्रत्यक्ष व्यवहारात, मानवी इच्छेतून बरेच काही उद्भवते, जे पवित्र आत्म्याकडूनच येते, असा लोकांचा सदैव विश्वास असतो. काही गोष्टी दुष्ट आत्म्यांकडून येतात, तरीही लोकांना वाटते की त्या पवित्र आत्म्याकडून आलेल्या आहेत आणि काही वेळा पवित्र आत्मा लोकांना अंतःकरणातून मार्गदर्शन करतो, तरीही लोकांना अशी भीती वाटते, की हे मार्गदर्शन सैतानाकडून येत आहे आणि म्हणून ते आज्ञा पाळण्याचे धाडस करत नाहीत, मात्र प्रत्यक्षात ते मार्गदर्शन हे पवित्र आत्म्याकडून प्राप्त झालेले ज्ञान असते. अशा प्रकारे, जोपर्यंत भेद ओळखून आचरण करत नाही, तोपर्यंत स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा कोणताही मार्ग नाही; भेद ओळखण्याशिवाय, जीवन प्राप्त करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. पवित्र आत्मा कसे कार्य करतो? दुष्ट आत्मे कसे कार्य करतात? मनुष्याच्या इच्छेतून काय उदयास येते? आणि पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आणि ज्ञानप्राप्तीमधून काय जन्माला आले आहे? जर पवित्र आत्म्याने मनुष्यासाठी केलेल्या कार्याचे नमुने समजून तू घेत असशील, तर, तुझ्या दैनंदिन जीवनात आणि प्रत्यक्ष अनुभवांदरम्यान, तू तुझे ज्ञान वृद्धिंगत करू शकशील आणि फरक ओळखू शकशील; देवाला जाणू शकशील, सैतानाला समजण्यास व ओळखण्यास सक्षम होशील; आज्ञापालन किंवा पाठपुरावा करण्यात तुझा गोंधळ होणार नाही आणि तू अशी व्यक्ती असशील, जिचे विचार स्पष्ट आहेत, जी पवित्र आत्म्याच्या कार्याचे पालन करते.
पवित्र आत्म्याचे कार्य हे सक्रिय मार्गदर्शन आणि सकारात्मक ज्ञानप्राप्तीच्या स्वरूपात असते. ते लोकांना निष्क्रिय होऊ देत नाही. हे त्यांचे सांत्वन करते, त्यांना श्रद्धा आणि संकल्प देते आणि देवाकडून परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करण्यास त्यांना सक्षम करते. जेव्हा पवित्र आत्मा कार्य करतो, तेव्हा लोक सक्रियपणे प्रवेश करण्यास सक्षम असतात; ते निष्क्रिय नसतात किंवा त्यांना सक्ती केली जात नाही, तर त्यांच्या स्वत:च्या पुढाकाराने कार्य करतात. जेव्हा पवित्र आत्मा कार्य करतो, तेव्हा लोक आनंदी आणि इच्छुक असतात, आज्ञा पाळण्यास तयार असतात आणि स्वतःला नम्र करण्यात त्यांना आनंद मिळतो. त्यांचे अंतःकरण दुखावलेले आणि नाजूक असले, तरी त्यांच्यामध्ये सहकार्याचा संकल्प असतो; ते आनंदाने दुःख सहन करतात, ते आज्ञा पाळण्यास सक्षम असतात आणि ते मानवी इच्छेने भ्रष्ट झालेले नसतात, मनुष्याच्या विचाराने भ्रष्ट झालेले नसतात आणि मानवी इच्छा आणि प्रेरणांनी तर निश्चितच भ्रष्ट झालेले नसतात. जेव्हा लोक पवित्र आत्म्याच्या कार्याचा अनुभव घेतात, तेव्हा त्यांचे अंतःकरण विशेषतः पवित्र असते. ज्यांना पवित्र आत्म्याचे कार्य लाभले आहे ते देवाच्या आणि त्यांच्या बंधुभगिनींच्या प्रेमाच्या साहाय्याने जगतात; ज्या गोष्टी देवाला आवडतात त्यामध्ये ते आनंदी असतात आणि ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत त्यांचा ते तिरस्कार करतात. पवित्र आत्म्याच्या कार्याने प्रभावित झालेल्या लोकांमध्ये सामान्य मानवता असते. ते सतत सत्याचा पाठपुरावा करतात आणि ते मानवता बाळगतात. जेव्हा पवित्र आत्मा लोकांसाठी कार्य करतो, तेव्हा त्यांची स्थिती अधिकाधिक चांगली होत जाते आणि त्यांची मानवता अधिकाधिक सामान्य होत जाते आणि त्यांचे काही सहकार्य मूर्खपणाचे असले, तरी त्यांच्या प्रेरणा योग्य असतात, त्यांचा प्रवेश सकारात्मक असतो, ते अडथळे आणण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि त्यांच्या अंगी कोणताही द्वेष नसतो. पवित्र आत्म्याचे कार्य सामान्य आणि खरे आहे, पवित्र आत्मा मनुष्याच्या सामान्य जीवनाच्या नियमांनुसार मनुष्यामध्ये कार्य करतो आणि सामान्य लोकांच्या प्रत्यक्ष पाठपुराव्यानुसार तो लोकांना ज्ञान आणि मार्गदर्शन करतो. जेव्हा पवित्र आत्मा लोकांमध्ये कार्य करतो, तेव्हा तो सामान्य लोकांच्या गरजेनुसार त्यांना मार्गदर्शन करतो आणि ज्ञान देतो. तो त्यांना त्यांच्या गरजांनुसार पुरवतो आणि त्यांच्या कमतरतेनुसार तो त्यांना सकारात्मक मार्गदर्शन करतो आणि त्यांचे प्रबोधन करतो. पवित्र आत्म्याचे कार्य लोकांना प्रत्यक्ष जीवनात ज्ञान देणे आणि मार्गदर्शन करणे आहे; जर त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात देवाच्या वचनांचा अनुभव आला तरच ते पवित्र आत्म्याचे कार्य पाहू शकतील. जर, त्यांच्या दैनंदिन जीवनात, लोक सकारात्मक स्थितीत असतील आणि त्यांचे आध्यात्मिक जीवन सामान्य असेल, तर त्यांच्याकडे पवित्र आत्म्याचे कार्य असते. अशा अवस्थेत, ते जेव्हा देवाच्या वचनांचे प्राशन आणि सेवन करतात, तेव्हा त्यांच्या ठायी श्रद्धा असते; जेव्हा ते प्रार्थना करतात तेव्हा त्यांना प्रेरणा मिळते; जेव्हा ते एखाद्या गोष्टीच्या विरोधात उभे राहतात, तेव्हा ते निष्क्रिय नसतात; आणि जसजसे काही घडते, तसतसे ते त्या गोष्टींमधील धडे घेतात, जे त्यांनी शिकावे, असे देवाला वाटते. ते निष्क्रिय किंवा कमकुवत नसतात आणि त्यांना खरोखर अडचणी येत असल्या तरी, ते देवाच्या सर्व व्यवस्थांचे पालन करण्यास तयार असतात.
पवित्र आत्म्याच्या कार्यामुळे कोणते परिणाम साध्य होतात? तू कदाचित मूर्ख असशील आणि विवेकशून्य असशील, परंतु पवित्र आत्म्याला फक्त कार्य करायचे असते आणि तुझ्यावर विश्वास असेल आणि तुला नेहमी असे वाटेल, की देवावर कितीही प्रेम केले तरी ते कमीच असेल. पुढे कितीही अडचणी आल्या, तरीही तू सहकार्य करण्यास तयार असशील. तुझ्यासोबत गोष्टी घडत जातील आणि ते देवाकडून आले आहेत की सैतानाकडून हे तुला कळणार नाही, परंतु तू प्रतीक्षा करण्यास सक्षम असशील आणि निष्क्रिय असणार नाहीस किंवा दुर्लक्ष करणार नाहीस. हे पवित्र आत्म्याचे सामान्य कार्य आहे. जेव्हा पवित्र आत्मा तुझ्यामध्ये कार्य करतो, तेव्हादेखील खर्या अडचणी येतात: कधीकधी तुझ्या डोळ्यात अश्रू येतील आणि काहीवेळा अशा गोष्टी घडतील ज्यावर तू मात करू शकणार नाहीस, परंतु हे सर्व पवित्र आत्म्याच्या सामान्य कार्याचा केवळ एक टप्पा आहे. जरी तू त्या अडचणींवर मात केली नाहीस आणि त्या वेळी तू दुर्बल आणि तक्रारींनी भरलेला असशील, तरीही, त्यानंतर तू पूर्ण श्रद्धेने देवावर प्रेम करू शकशील. तुझी निष्क्रियता तुला सामान्य अनुभव घेण्यापासून रोखू शकत नाही आणि इतर लोक काय म्हणतात आणि इतर लोक तुझ्यावर कसा हल्ला करतात याची पर्वा न करता, तुदेखील देवावर प्रेम करू शकतोस. प्रार्थनेदरम्यान, तुला नेहमी असे वाटते की भूतकाळात तू देवाचे खूप ऋणी होतास आणि जेव्हा जेव्हा तू अशा गोष्टींचा सामना करतोस, तेव्हा तू देवाला संतुष्ट करण्याचा आणि देहाचा त्याग करण्याचा संकल्प करतोस. हे सामर्थ्य हेच दाखवते, की पवित्र आत्म्याचे कार्य तुझ्यामध्ये आहे. ही पवित्र आत्म्याच्या कार्याची सामान्य स्थिती आहे.
सैतानाकडून येणारे कार्य काय आहे? सैतानाकडून येणार्या कार्यात, लोकांमधील दृष्टी अस्पष्ट असतात; लोक सामान्य मानवतेपासून वंचित असतात, त्यांच्या कृतींमागील प्रेरणा चुकीच्या असतात आणि जरी त्यांना देवावर प्रेम करायचे असले तरी त्यांच्यामध्ये नेहमीच आरोप असतात. हे आरोप आणि विचार त्यांच्यामध्ये सतत हस्तक्षेप करतात, त्यांच्या जीवनाच्या वाढीस अडथळे आणतात आणि त्यांना सामान्य स्थितीत देवासमोर येण्यापासून रोखतात. म्हणजेच असे म्हणायचे आहे, की सैतानाचे कार्य लोकांमध्ये सुरू होताच, त्यांचे चित्त देवासमोर शांत होऊ शकत नाही. अशा लोकांना स्वतःचे काय करावे हे कळत नाही—जेव्हा ते लोकांना एकत्र जमलेले पाहतात, तेव्हा त्यांना पळून जावेसे वाटते आणि इतर लोक प्रार्थना करतात, तेव्हा त्यांना डोळे बंद करता येत नाहीत. दुष्ट आत्म्यांच्या कार्यामुळे मनुष्य आणि देव यांच्यातील सामान्य नातेसंबंध बिघडतात आणि लोकांची पूर्वीची दृष्टी किंवा त्यांचा जीवनप्रवेशाचा पूर्वीचा मार्ग बिघडतो; त्यांच्या अंतःकरणात ते कधीही देवाच्या जवळ येऊ शकत नाहीत आणि अशा गोष्टी नेहमी घडतात ज्यामुळे त्यांना अडथळा येतो आणि त्यांच्यावर बंधने येतात. त्यांच्या अंतःकरणाला शांती मिळत नाही आणि त्यांच्याकडे देवावर प्रेम करण्याची शक्ती उरलेली नसते आणि त्यांचे आत्मे गर्तेत जात असतात. हे सैतानाच्या कार्याचे रूप असते. सैतानाच्या कार्याचे प्रकटीकरण पुढीलप्रमाणे असते: तू भूमिकेवर ठाम उभे राहण्यास आणि साक्ष देण्यास असमर्थ असतस, तू देवासमोर चूक असलेली आणि देवाप्रती श्रद्धा नसलेली व्यक्ती बनतोस. जेव्हा सैतान हस्तक्षेप करतो, तेव्हा तू तुझ्यातील देवाविषयीचे प्रेम आणि निष्ठा गमावून बसतोस, तुझा देवासोबतचा सामान्य नातेसंबंध संपुष्टात येतो, तू सत्याचा पाठलाग करत नाहीस किंवा स्वतःच्या सुधारणेचा प्रयत्न करत नाहीस; तू मागे पडतोस आणि निष्क्रिय बनतोस, तू स्वतःमध्ये मग्न होतोस, तुम्ही पापाच्या प्रसाराला मोकळा मार्ग देतोस आणि पापाचा तिरस्कार करत नाहीस; शिवाय, सैतानाच्या हस्तक्षेपामुळे तू विरघळून जातोस; यामुळे तुला असलेला देवाचा स्पर्श नाहीसा होतो आणि तुला देवाविषयी तक्रार करण्यास आणि त्याला विरोध करण्यास प्रवृत्त करतो, तुला देवाविषयी प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करतो; यामुळे तू देवाचा त्याग करण्याचाही धोका असतो. हे सर्व सैतानाकडून आलेले असते.
तुझ्या दैनंदिन जीवनात तुझ्यासोबत एखादी गोष्ट घडते तेव्हा ती पवित्र आत्म्याच्या कार्यातून येते की सैतानाच्या कार्यातून येते, यातील फरक कसा ओळखावा? जेव्हा लोकांची परिस्थिती सामान्य असते, तेव्हा त्यांचे आध्यात्मिक जीवन आणि त्यांचे दैहिक जीवन सामान्य असते आणि त्यांची तर्कशक्ती सामान्य आणि व्यवस्थित असते. जेव्हा ते या अवस्थेत असतात, तेव्हा ते जे अनुभवतात आणि स्वतःमध्ये जे जाणून घेतात, ते सामान्यतः पवित्र आत्म्याने स्पर्श केल्यामुळे असते, असे म्हटले जाऊ शकते. (अंतर्दृष्टी असणे किंवा देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करताना साधे ज्ञान असणे किंवा काही गोष्टींमध्ये श्रद्धाळू असणे किंवा काही गोष्टींमध्ये देवावर प्रेम करण्याची ताकद असणे—हे सर्व पवित्र आत्म्यापासून येते). मनुष्यामध्ये पवित्र आत्म्याचे कार्य विशेषतः सामान्य आहे; मनुष्य ते जाणून घेण्यास असमर्थ आहे आणि ते मनुष्याकडूनच येत असल्याचे दिसते, मात्र ते पवित्र आत्म्याचे कार्य आहे. दैनंदिन जीवनात, पवित्र आत्मा प्रत्येकामध्ये लहान आणि मोठे दोन्ही कार्य करतो आणि या कार्याची केवळ व्याप्ती बदलत असते. काही लोकांची क्षमता चांगली असते आणि त्यांना गोष्टी लवकर समजतात आणि पवित्र आत्म्याचे ज्ञान त्यांच्यामध्ये विशेषतः महान असते. तर, काही लोकांची क्षमता कमी असते आणि त्यांना गोष्टी समजण्यास जास्त वेळ लागतो, परंतु पवित्र आत्मा त्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करतो आणि तेदेखील, देवावर श्रद्धा ठेवण्यात सक्षम होतात—पवित्र आत्मा त्या सर्वांमध्ये कार्य करतो जे देवाचे अनुसरण करतात. जेव्हा, दैनंदिन जीवनात, लोक देवाला विरोध करत नाहीत किंवा त्याविरुद्ध बंड करत नाहीत, देवाच्या योजनेशी विसंगत असलेल्या गोष्टी करत नाहीत आणि देवाच्या कार्यात अडथळा आणत नाहीत, तेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येकामध्ये देवाचा आत्मा कमी-जास्त प्रमाणात कार्य करत असतो; तो त्यांना स्पर्श करतो, त्यांना ज्ञान देतो, त्यांना श्रद्धा देतो, त्यांना शक्ती देतो, सक्रिय होण्यास उत्तेजन देतो आणि आळशी न होता किंवा देहभोगाचा लोभ न बाळगता, सत्याने आचरण करण्यास इच्छुक आणि देवाच्या वचनांची उत्कंठा बाळगण्यास प्रवृत्त करतो. हे सर्व काम पवित्र आत्म्याने केले आहे.
जेव्हा लोकांची स्थिती सामान्य नसते, तेव्हा पवित्र आत्मा त्यांचा त्याग करतो; त्यांच्या मनात ते तक्रार करण्यास प्रवृत्त होतात, त्यांच्या प्रेरणा चुकीच्या असतात, ते आळशी असतात, ते देहभोगातच रमतात आणि त्यांची अंतःकरणे सत्याविरुद्ध बंड करतात. हे सर्व सैतानाकडून आलेले असते. जेव्हा लोकांची परिस्थिती सामान्य नसते, जेव्हा त्यांचे अंतःकरण अंधःकाराने भरलेले असते आणि त्यांनी सामान्य तर्कबुद्धी गमावलेली असते, पवित्र आत्म्याने त्यांचा त्याग केलेला असतो आणि ते स्वतः देव अनुभवू शकत नाहीत, तेव्हा सैतान त्यांच्यामध्ये कार्य करत असतो. जर लोकांमध्ये नेहमीच सामर्थ्य असेल आणि ते नेहमी देवावर प्रेम करत असतील, तर सामान्यतः, जेव्हा त्यांच्या बाबतीत काही गोष्टी घडतात तेव्हा त्या पवित्र आत्म्याकडून आलेल्या असतात आणि ज्यांना ज्यांना ते भेटतात, त्या भेटी देवाने घडवलेल्या असतात. याचा अर्थ असा, की जेव्हा तू सामान्य स्थितीत असतोस, पवित्र आत्म्याच्या महान कार्यामध्ये असतोस, तेव्हा सैतानाने तुला डगमगावणे अशक्य असते. या आधारे असे म्हणता येते, की सर्व काही पवित्र आत्म्याकडून येते आणि जरी तुझे विचार चुकीचे असले तरी तू त्यांचा त्याग करू शकतोस आणि त्यांचे अनुसरण करत नाहीस. हे सर्व पवित्र आत्म्याच्या कार्यातून येते. सैतान कोणत्या परिस्थितीत हस्तक्षेप करतो? जेव्हा तुझी परिस्थिती सामान्य नसते, जेव्हा तुला देवाचा स्पर्श झालेला नसतो आणि तू देवाच्या कार्यापासून वंचित असतोस, जेव्हा तुझे अंतःकरण कोरडे आणि मूल्यहीन असते, जेव्हा तू देवाची प्रार्थना करतोस पण काहीही समजून घेत नाहीस आणि जेव्हा तू देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करतोस परंतु तरीही ज्ञान प्राप्त करत नाहीस किंवा प्रकाशित होत नाहीस, तेव्हा तुझ्यामध्ये काम करणे सैतानासाठी सोपे असते. दुसऱ्या शब्दांत, जेव्हा तुला पवित्र आत्म्याने सोडून दिलेले असते आणि तू देव अनुभवू शकत नाहीस, तेव्हा तुझ्यासोबत अनेक गोष्टी घडतात ज्या सैतानाच्या मोहातून येतात. पवित्र आत्मा जसा कार्य करत असतो, तसाच सैतानदेखील कार्य करत असतो. पवित्र आत्मा मनुष्याच्या अंतःकरणाला स्पर्श करतो, त्याच वेळी सैतान मनुष्यामध्ये हस्तक्षेप करतो. तथापि, पवित्र आत्म्याचे कार्य अग्रस्थान घेते आणि ज्या लोकांची परिस्थिती सामान्य आहे ते विजय मिळवू शकतात; सैतानाच्या कार्यावर पवित्र आत्म्याच्या कार्याचा हा विजय आहे. पवित्र आत्मा कार्य करत असताना, लोकांमध्ये एक भ्रष्ट प्रवृत्ती अजूनही अस्तित्वात असते; तथापि, पवित्र आत्म्याच्या कार्यादरम्यान, लोकांना त्यांचा बंडखोरपणा, प्रेरणा आणि भ्रष्टता शोधणे आणि ओळखणे सोपे असते. तेव्हाच लोकांना पश्चाताप होतो आणि पश्चात्ताप करण्याची इच्छा निर्माण होते. अशा प्रकारे, त्यांची बंडखोर आणि भ्रष्ट प्रवृत्ती हळुहळू देवाच्या कार्याद्वारे दूर लोटली जाते. पवित्र आत्म्याचे कार्य विशेषतः सामान्य आहे; तो लोकांमध्ये कार्य करत असताना, त्यांना अजूनही त्रास होत असतो, ते अजूनही रडत असतात, त्रस्त असतात, अजूनही अशक्त असतात आणि अजूनही त्यांनाही न कळलेल्या बऱ्याच गोष्टी असतात. तरीही या स्थितीत ते स्वतःला मागे हटण्यापासून रोखू शकतात, देवावर प्रेम करू शकतात आणि जरी ते रडत असले आणि दुःखी असले, तरीही ते देवाची स्तुती करण्यास सक्षम असतात. पवित्र आत्म्याचे कार्य विशेषतः सामान्य आहे, ते किंचितही अलौकिक नाही. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे, की जेव्हा पवित्र आत्मा कार्य करण्यास सुरुवात करतो, तेव्हा लोकांच्या स्थितीत बदल घडतात आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी काढून टाकल्या जातात. अशा समजुती चुकीच्या आहेत. जेव्हा पवित्र आत्मा मनुष्यासाठी कार्य करतो, तेव्हा मनुष्याच्या निष्क्रिय गोष्टी अजूनही तेथे असतात आणि त्याची उंची तशीच राहते, परंतु त्याला पवित्र आत्म्याचा प्रकाश आणि ज्ञान प्राप्त होते आणि त्यामुळे त्याची स्थिती अधिक सक्रिय होते, त्याच्या अंतर्गत परिस्थिती सामान्य बनते आणि तो वेगाने बदलतो. लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवांमध्ये, ते प्रामुख्याने पवित्र आत्मा किंवा सैतानाच्या कार्याचा अनुभव घेतात आणि जर ते या स्थिती समजून घेण्यास आणि भेद ओळखण्यास असमर्थ असतील, तर प्रत्यक्ष अनुभवांमध्ये प्रवेश करण्याचा, प्रवृत्तीमधील बदलांबद्दल काहीही म्हणायचा प्रश्नच येत नाही नाही. अशा प्रकारे, देवाच्या कार्याचा अनुभव घेण्याची गुरुकिल्ली म्हणजे अशा गोष्टींच्या आरपार पाहण्यात सक्षम असणे होय; अशा प्रकारे, त्यांना ते अनुभवणे सोपे होईल.
पवित्र आत्म्याचे कार्य हे लोकांना सकारात्मक प्रगती करू देते तर सैतानाच्या कार्यामुळे ते नकारात्मक होतात व माघार घेतात, देवाविरुद्ध बंड करतात आणि त्याचा प्रतिकार करतात, त्याच्यावरील विश्वास गमावतात व त्यांचे कर्तव्य बजावण्यात कमकुवत होतात. पवित्र आत्म्याच्या ज्ञानातून निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट अगदी नैसर्गिक आहे; ती तुझ्यावर लादलेली नाही. जर तू त्याच्या अधीन गेलास, तर तुला शांती लाभेल; जर तू तसे केले नाहीस, तर तुला नंतर फटकारले जाईल. पवित्र आत्म्याच्या ज्ञानाने, तू जे काही करत आहेस, त्यात हस्तक्षेप केला जाणार नाही किंवा प्रतिबंधित केले जाणार नाही; तुला मुक्त केले जाईल, तुझ्या कृतींमध्ये आचरणाचा मार्ग असेल आणि तुझ्यावर कोणतेही प्रतिबंध नसतील, परंतु तू देवाच्या इच्छेनुसार कार्य करण्यास सक्षम असशील. सैतानाचे कार्य तुला अनेक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्यास भाग पाडते; हे तुझी प्रार्थना करण्याची इच्छा संपवते, देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करण्यास खूप आळशी बनवते आणि चर्चचे जीवन जगण्यास अस्वस्थ करते आणि आध्यात्मिक जीवनापासून दूर करते. पवित्र आत्म्याचे कार्य तुझ्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणत नाही आणि तुझ्या सामान्य आध्यात्मिक जीवनात व्यत्यय आणत नाही. अनेक गोष्टी ज्या क्षणी घडतात त्या क्षणी तू ओळखू शकत नाहीस, तरीही काही दिवसांनी, तुझे हृदय उजळते आणि तुझे मन स्वच्छ होते. तुला आत्म्याच्या गोष्टींबद्दल थोडीशी जाणीव होते आणि हळुहळू तुला हे ओळखता येते, की हा विचार देवाकडून आला आहे की सैतानाकडून. काही गोष्टी स्पष्टपणे तुला देवाचा विरोध करण्यास आणि देवाविरुद्ध बंड करण्यास भाग पाडतात, किंवा देवाचे शब्द आचरणात आणण्यापासून रोखतात; या सर्व गोष्टी सैतानाकडून येतात. काही गोष्टी स्पष्ट नसतात आणि त्या नेमक्या काय आहेत हे त्या क्षणी तू सांगू शकत नाहीस; नंतर, तू त्यांचे रूप पाहू शकतोस आणि नंतर विवेकबुद्धीचा वापर करू शकतोस. कोणत्या गोष्टी सैतानाकडून येतात आणि कोणत्या पवित्र आत्म्याने निर्देशित केल्या आहेत, हे जर तू स्पष्टपणे ओळखू शकत असशील, तर तुझ्या अनुभवांमध्ये तू सहजासहजी भरकटणार नाहीस. कधीकधी, जेव्हा तुझी स्थिती चांगली नसते, तेव्हा तुझ्याकडे काही विचार असतात जे तुला तुझ्या निष्क्रिय अवस्थेतून बाहेर काढतात. हे दर्शवते, की तुझी स्थिती प्रतिकूल असली, तरीही तुझे काही विचार पवित्र आत्म्याकडून येऊ शकतात. असे नाही, की जेव्हा तू निष्क्रिय असतोस तेव्हा तुझे सर्व विचार सैतानाने पाठवलेले असतात. जर ते खरे असतील, तर तू सकारात्मक स्थितीत कधी येऊ शकशील? काही काळासाठी निष्क्रिय राहिल्यानंतर, पवित्र आत्मा तुला परिपूर्ण बनण्याची संधी देतो; तो तुला स्पर्श करतो आणि तुला निष्क्रिय अवस्थेतून बाहेर काढतो व तू सामान्य स्थितीत प्रवेश करतोस.
पवित्र आत्म्याचे कार्य काय आहे आणि सैतानाचे कार्य काय आहे हे जाणून घेतले, तर तू तुझ्या अनुभवांदरम्यान स्वतःच्या स्थितीशी आणि स्वतःच्या अनुभवांशी त्यांची तुलना करू शकतोस. अशाप्रकारे तुझ्या अनुभवांतील तत्त्वांशी संबंधित अनेक सत्ये असतील. तत्त्वाबद्दलची ही सत्ये समजून घेतल्यानंतर, तू तुझ्या प्रत्यक्ष स्थितीवर प्रभुत्व मिळवू शकशील, तुम्ही लोक आणि घटनांमध्ये फरक करू शकशील आणि तुला पवित्र आत्म्याचे कार्य मिळवण्यासाठी इतके कष्ट करावे लागणार नाहीत. अर्थात, हे तुझ्या प्रेरणा योग्य असण्यावर आणि शोधण्याच्या आणि आचरणाच्या तुझ्या इच्छेवर अवलंबून असेल. तुझ्या अनुभवांमध्ये यासारखी भाषा—तत्त्वांशी संबंधित असलेली भाषा असावी. त्याशिवाय, तुझे अनुभव सैतानाच्या हस्तक्षेपाने आणि मूर्ख ज्ञानाने भरलेले असतील. जर तुला पवित्र आत्मा कसे कार्य करतो हे समजत नसेल, तर तू देवाची प्रार्थना कशी करावीस आणि प्रवेश कसा करावास हे तुला समजत नाही आणि जर सैतान लोकांना फसवण्यासाठी आणि हस्तक्षेप करण्यासाठी कसे वर्तन करतो, हे तुला समजत नसेल, तर सैतानाला कसे नाकारायचे आणि साक्षीत ठाम राहायचे हे तुला माहीत नसते. पवित्र आत्मा कसा कार्य करतो आणि सैतान कशा प्रकारे कार्य करतो या गोष्टी लोकांना समजल्या पाहिजेत आणि त्या अशा गोष्टी आहेत ज्यांचा देवावरील लोकांच्या विश्वासात अनुभव घेतला पाहिजे.