श्रद्धेविषयी तुला काय माहीत आहे?
मनुष्याकडे फक्त श्रद्धा हा अनिश्चित असा शब्द आहे, तरीही मनुष्याला, श्रद्धा कशाने घडली आहे हे कळत नाही त्याला श्रद्धा का वाटते हे कळणे तर त्याहून दूरची गोष्ट. मनुष्याला अगदीच थोडे कळते आणि मनुष्य स्वतःच ज्ञानात फार अपुरा आहे; त्याची माझ्यावरची श्रद्धा अविचारी व अज्ञानी आहे. श्रद्धा म्हणजे काय किंवा माझ्यावर त्याची श्रद्धा का आहे हे जरी त्याला कळत नसले, तरीही तो माझ्यावर झपाटल्यासारखा विश्वास ठेवत राहतो. माझी मनुष्याकडून अपेक्षा आहे ती फक्त अशा प्रकारे त्याने मला झपाटल्यागत साद घालण्याची किंवा जाता जाता माझ्यावर विश्वास ठेवण्याची नाही, कारण मी जे कार्य करतो ते, मनुष्याने मला पाहणे, मला जाणणे हे त्याला शक्य व्हावे यासाठी आहे, मनुष्य प्रभावित व्हावा आणि त्याने माझ्याकडे नव्या दृष्टिने पाहावे म्हणून नव्हे. एके काळी मी अनेक संकेत व चमत्कार प्रकट केले आणि अनेक चमत्कार घडवले व त्या काळच्या इस्रायली लोकांनी माझी अतिशय स्तुती केली आणि रोग्यांना बरे करण्याच्या व दानवांना पराभूत करण्याच्या माझ्या अनन्यसाधारण क्षमतेचा प्रचंड आदर केला. त्यावेळी, यहूद्यांना माझ्या रोगनिवारण क्षमता असामान्य वाटल्या—आणि माझ्या अनेक कृत्यांमुळे त्या सर्वांनी माझा आदर केला, माझ्या सर्व शक्तींविषयी त्यांना फार कौतुक वाटले. अशा प्रकारे, मला चमत्कार करताना ज्यांनी पाहिले त्या सर्वांनी माझे जवळून अनुसरण केले, इतके की रोग्यांना बरे करताना मला पाहण्यासाठी माझ्याभोवती हजारोंच्या संख्येने गर्दी केली. मी इतके अनेक संकेत व चमत्कार प्रकट केले, तरीही लोकांनी माझ्याकडे एक कुशल वैद्य म्हणूनच पाहिले; म्हणून, मीही त्यावेळी लोकांसाठी बरीच वचने उच्चारली, तरीही त्यांनी मला केवळ त्याच्या शिष्यांचा एक श्रेष्ठ शिक्षक म्हणूनच पाहिले. आजही, माझ्या कार्याच्या ऐतिहासिक नोंदी पाहिल्यावरदेखील त्यांचे माझ्याविषयीचे आकलन, रोग्यांना बरे करणारा एक महान वैद्य आणि अडाण्यांचा शिक्षक असेच राहते, क्षमाशील प्रभू येशू ख्रिस्त म्हणून त्यांनी माझी व्याख्या केली आहे. ज्यांनी पवित्र ग्रंथांचा अर्थ समजून घेतला आहे, ते माझ्या रोगनिवारणाच्या कौशल्यांच्या पलीकडे गेलेले असू शकतात किंवा आता त्यांच्या शिक्षकापेक्षाही पुढे गेलेले शिष्य असू शकतात, तरीही जगात ज्यांचा मोठा लौकिक आहे असे अतिशय प्रसिद्ध असलेले हे लोक, मला केवळ एक वैद्य मानण्याइतके खालच्या दर्जाचे समजतात. सागरकिनाऱ्यावरच्या वाळूच्या कणांपेक्षाही माझी कृत्ये संख्येने अधिक आहेत व माझे शहाणपण शलमोनाच्या सर्व पुत्रांपेक्षाही श्रेष्ठ आहे, तरीही लोक मला किरकोळ वैद्य आणि मनुष्याचा अज्ञात शिक्षक मानतात. अनेकजण मी त्यांना बरे करावे, म्हणूनच केवळ माझ्यावर विश्वास ठेवतात. अनेकजण मी त्यांच्या देहातून मलीन आत्म्यांना बाहेर काढण्यासाठी मी माझ्या शक्ती वापरू शकेन म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतात व अनेकजण माझ्याकडून केवळ शांती आणि आनंद प्राप्त व्हावा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतात. अनेकजण माझ्याकडे अधिक भौतिक संपत्तीची मागणी करण्यासाठी म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतात. अनेकजण हे आयुष्य शांततेत जावे व येणाऱ्या जगात आपण सुरक्षित आणि स्वस्थ राहावे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतात. अनेकजण नरकातील यातना टाळण्यासाठी व स्वर्गाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवतात. अनेकजण फक्त तात्कालिक सौख्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवतात, तरीही येणाऱ्या जगात काहीही प्राप्त करण्याची त्यांना आस नसते. जेव्हा माझा क्रोध मनुष्यावर बरसला आणि एके काळी त्याच्याकडे असलेला सर्व आनंद व शांती मी काढून घेतली, तेव्हा मनुष्य संशयी झाला. मी जेव्हा मनुष्याला नरकाच्या यातना दिल्या आणि स्वर्गाचे आशीर्वाद काढून घेतले, तेव्हा मनुष्याच्या शरमेचे रूपांतर क्रोधात झाले. मनुष्याने जेव्हा मला त्याला बरे करण्यास सांगितले, तेव्हा मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही, मला त्याचा तिरस्कार वाटला; त्यावेळी मनुष्य माझ्यापासून दूर गेला व त्याने अनिष्ट औषधे आणि जादूटोण्याचा मार्ग निवडला. मनुष्याने माझ्याकडे मागितलेले सर्व काही जेव्हा मी काढून घेतले, तेव्हा प्रत्येकजण काही मागमूस न ठेवता गायब झाला. अशा प्रकारे, मनुष्याची माझ्यावर श्रद्धा आहे कारण मी फार जास्त कृपा करतो व प्राप्त करण्यासारखे खूप काही आहे, असे माझे म्हणणे आहे. यहूद्यांनी माझ्यावर माझ्या कृपेसाठी विश्वास ठेवला आणि मी जिथे गेलो तिथे ते माझ्या मागून आले. मर्यादित ज्ञान व अनुभव असलेल्या त्या अज्ञानी लोकांनी फक्त मी प्रकट केलेले संकेत आणि चमत्कार पाहिले. महान चमत्कार करू शकणारा यहूद्यांच्या समूहाचा प्रमुख म्हणून त्यांनी माझ्याकडे पाहिले. आणि म्हणून मी जेव्हा दानवांना मनुष्यापासून वेगळे केले, तेव्हा त्यांच्यात मोठी चर्चा झाली: ते म्हणाले, मी एलीया आहे, मी मोशे आहे, सर्वांधिक प्राचीन असा प्रेषित आहे, सर्वांत महान वैद्य आहे. मी जीवन आहे, मी मार्ग आहे व सत्य आहे, असे माझ्या स्वतःच्या म्हणण्याखेरीज, कोणालाही माझे व्यक्तिव कळले नाही किंवा माझी ओळख पटली नाही. स्वर्ग ही अशी जागा आहे जिथे माझा पिता राहतो असे माझ्या स्वतःच्या म्हणण्याखेरीज कोणालाही मी देवाचा पुत्र आहे आणि स्वतः देवही आहे हे कळले नाही. मी सर्व मानवजातीचा उद्धार करेन व मनुष्याला मुक्त करेन असे माझ्या स्वतःच्या म्हणण्याखेरीज, मी मनुष्याचा उद्धारकर्ता आहे हे कोणालाही कळले नाही आणि मनुष्यांनी मला फक्त एक परोपकारी व कनवाळू मनुष्य म्हणूनच पाहिले. आणि माझे सर्व काही मी स्पष्ट करून सांगण्याखेरीज, कोणीही मला ओळखले नाही व मी जिवंत देवाचा पुत्र आहे यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. लोकांची माझ्यावरची श्रद्धा अशी असते आणि अशा प्रकारे ते मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे माझ्याविषयी असे दृष्टिकोन असताना ते माझ्यासाठी साक्ष कसे देऊ शकतात?
लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, पण ते माझ्यासाठी साक्ष द्यायला असमर्थ आहेत, त्याचप्रमाणे मी माझी ओळख त्यांना करून देईपर्यंत ते माझ्यासाठी साक्ष देऊ शकत नाहीत. निर्मिलेले प्राणी आणि सर्व पवित्र मनुष्य यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे एवढेच लोक पाहतात व मी जे कार्य करतो ते मनुष्य करू शकत नाहीत हे त्यांना कळते. अशा प्रकारे, यहूद्यांपासून आजच्या काळातील लोकांपर्यंत, ज्यांनी माझी देदीप्यमान कृत्ये पाहिली आहेत, त्या सर्वांच्या मनात माझ्याविषयी केवळ कुतूहल भरून राहिले आहे आणि एकाही निर्मिलेल्या प्राण्याचे तोंड माझ्यासाठी साक्ष देण्यास उघडलेले नाही. फक्त माझ्या पित्याने माझ्यासाठी साक्ष दिली व सर्व निर्मिलेल्या प्राण्यांमध्ये माझ्यासाठी मार्ग तयार केला; त्याने जर तसे केले नसते, तर मी कसेही कार्य केले असते तरीही मी सृष्टीचा निर्माणकर्ता प्रभू आहे हे मनुष्याला कधीही कळले नसते, कारण मनुष्याला माझ्याकडून फक्त घ्यायचे माहीत आहे, माझ्या कार्याचा परिणाम म्हणून त्याची माझ्यावर श्रद्धा नाही. मनुष्य मला ओळखतो ते केवळ मी निर्दोष आहे आणि कोणत्याही प्रकारे मी पापी नाही म्हणून, मी अनेक रहस्ये उलगडू शकतो म्हणून, मी जनसामान्यांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून किंवा मनुष्याला माझ्याकडून खूप फायदा झाला आहे म्हणून, तरीही फारच थोडेजण मला सृष्टीचा प्रभू म्हणून ओळखतात. म्हणूनच मी म्हणतो, की मनुष्याची माझ्यावर का श्रद्धा आहे हे त्याला कळत नाही; माझ्यावर श्रद्धा ठेवण्याचा हेतू व महत्त्व त्याला कळत नाही. मनुष्याकडे वास्तविकतेचा अभाव आहे, इतका की माझ्यासाठी साक्ष देण्यास तो जवळपास अपात्र आहे. तुमच्याकडे सच्ची श्रद्धा अगदीच अल्प आहे आणि तुम्हाला फारच अल्प मिळालेले आहे, त्यामुळे तुमच्याकडे अगदी अल्प साक्ष आहे. त्याचप्रमाणे, तुम्हा लोकांना अगदीच थोडे कळते व अभाव खूप जास्त आहे, इतका की माझ्या कृत्यांची साक्ष देण्यास तुम्ही जवळजवळ अपात्र आहात. तुम्हा लोकांचा निर्धार खरोखर लक्षणीय आहे, पण देवाच्या मूलतत्त्वाची तुम्ही यशस्वीरीत्या साक्ष देऊ शकाल याची तुम्हाला खात्री आहे का? तुम्ही जे अनुभवले आणि पाहिले आहे ते सर्व युगांतील पवित्र जनांपेक्षा व प्रेषितांपेक्षा मोठे आहे, पण भूतकाळातील या पवित्र जनांच्या आणि प्रेषितांच्या वचनांपेक्षा मोठी साक्ष देण्यास तुम्ही समर्थ आहात का? मी आत्ता तुम्हा लोकांना जे दिले आहे ते मी मोशेला जे दिले त्यापेक्षा जास्त आहे व ते दावीदालाही झाकोळून टाकते, तेव्हा या न्यायाने, तुमची साक्षही मोशेपेक्षा मोठी आणि तुमची वचने दावीदापेक्षा मोठी झाली पाहिजेत, असे माझे सांगणे आहे. मी तुम्हा लोकांना शतपटीने देतो—म्हणूनच मी तुम्हाला त्याच प्रमाणात वस्तुमानाने परतफेड करण्यास सांगतो. मनुष्याला जीवन देणारा मीच आहे व तुम्ही माझ्यापासून जीवन प्राप्त करता, हे तुम्हाला माहीत असले पाहिजे आणि तुम्ही माझ्यासाठी साक्ष दिली पाहिजे. हे मी तुम्हा लोकांना नेमून दिलेले कर्तव्य आहे व ते तुम्ही माझ्यासाठी पार पाडायला पाहिजे. मी माझा संपूर्ण महिमा तुम्हाला दिला आहे, मी तुम्हाला असे जीवन दिले आहे जे निवडलेल्या लोकांना, इस्रायली लोकांना, कधीही मिळाले नाही. अगदी हक्कपूर्वक, तुम्ही माझ्यासाठी साक्ष दिली पाहिजे आणि तुमचे तारुण्य मला समर्पित करून आयुष्य वेचले पाहिजे. मी ज्या कुणाला माझ्या महिम्याचे आशीर्वाद देतो, तो माझ्यासाठी साक्ष देईल व माझ्यासाठी आयुष्यही वेचेल. मी हे पूर्वीपासूनच निर्धारित करून ठेवले आहे. मी माझ्या महिम्याचे आशीर्वाद तुम्हा लोकांना देतो हे तुमचे सुदैव आहे आणि माझ्या महिम्याची साक्ष देणे हे तुम्हा लोकांचे कर्तव्य आहे. केवळ आशीर्वाद मिळवण्यासाठी जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल, तर माझ्या कार्याला महत्त्व उरणार नाही व तुम्ही लोक तुमचे कर्तव्य पार पाडू शकणार नाही. इस्रायली लोकांना केवळ माझी दया, प्रेम, महानता दिसली आणि यहूद्यांना केवळ माझा संयम व सुटका दिसली. माझ्या चेतनेच्या कार्याचा फार थोडा भाग त्यांनी पाहिला. इतका थोडा, की तुम्ही लोकांनी जे ऐकले आणि पाहिले आहे त्याचा एक दशसहस्रांश भागच त्यांना समजला. तुम्ही जे पाहिले आहे ते, त्यांच्यातील प्रमुख याजकांपेक्षाही जास्त आहे. आज तुम्हाला जी सत्ये समजतात ती त्यांना समजलेल्या सत्यांपेक्षा जास्त आहेत; आज तुम्ही जे पाहता ते नियमशास्त्राच्या युगात, तसेच कृपेच्या युगात जे पाहिले गेले होते त्यापेक्षा जास्त आहे व तुम्ही जे अनुभवले आहे ते मोशे आणि एलीया यांच्यापेक्षाही जास्त आहे. कारण इस्रायली लोकांना जे समजले ते केवळ यहोवाचे नियमशास्त्र होते व त्यांनी जे पाहिले ती केवळ यहोवाची पार्श्व बाजू होती; यहूद्यांना जे समजले ती केवळ येशूची सुटका होती, त्यांना जे मिळाले ती केवळ येशूची कृपा होती आणि त्यांनी जे पाहिले ती केवळ यहूद्यांच्या घरातील येशूची प्रतिमा होती. आजच्या दिवशी तुम्ही जे पाहता आहात तो यहोवाचा महिमा आहे, येशूची सुटका आहे व आजपर्यंतची माझी सर्व कृत्ये आहेत. तेव्हा, तुम्ही माझ्या आत्म्यातून आलेली सर्व वचने ऐकली आहेत, माझ्या शहाणपणाची स्तुती केली आहे, माझा चमत्कार जाणला आहे आणि माझी प्रवृत्तीसुद्धा जाणली आहे. मी तुम्हा सर्वांना माझी व्यवस्थापनाची योजनाही सांगितली आहे. तुम्ही ज्याला पाहिले आहे तो प्रेमळ व क्षमाशील देव आहे, तसेच तो नीतिमत्तेने परिपूर्ण असलेला देव आहे. तुम्ही माझे आश्चर्यकारक कार्य पाहिले आहे आणि हे जाणले आहे, की मी वैभवाने व क्रोधाने ओतप्रोत आहे. त्याहून अधिक म्हणजे, एके काळी मी इस्रायलवर माझ्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला होता हे तुम्हाला माहीत आहे आणि आज तो तुमच्यावर होतो आहे. तुम्ही माझ्या स्वर्गातील रहस्यांविषयी यशया व योहान यांच्यापेक्षाही जास्त जाणता; माझा प्रेमळपणा आणि मान यांविषयी तुम्ही भूतकाळातील सर्व पवित्र जनांपेक्षाही जास्त जाणता. तुम्हाला माझे सत्य, माझा मार्ग व माझे जीवन प्राप्त झालेले आहे, तसेच योहानापेक्षाही मोठी अशी दृष्टी आणि साक्षात्कार प्राप्त झाला आहे. तुम्हाला आणखी अनेक रहस्ये समजतात व तुम्ही माझी खरी चर्याही पाहिली आहे; माझा न्याय तुम्ही अधिकच स्वीकारलेला आहे आणि माझ्या नीतिमान प्रवृत्तीविषयी तुम्हाला अधिक माहिती आहे. आणि म्हणून, तुमचा जन्म जरी शेवटच्या दिवसांत झालेला असला, तरीही तुमचे आकलन आधीच्या काळाचे, भूतकाळाचे आहे व तुम्हाला आजच्या गोष्टींचाही अनुभव आहे आणि हे सर्व मी स्वतः व्यक्तिशः केले आहे. मी तुमच्याकडे जे मागतो आहे ते फार जास्त नाही, कारण मी तुम्हाला इतके काही दिलेले आहे. अशा प्रकारे, मी तुम्हाला माझ्यासाठी युगांपूर्वीच्या पवित्र जनांसमोर साक्ष देण्यास सांगतो आहे व ही माझी हृदयातली एकमेव इच्छा आहे.
माझ्यासाठी प्रथम साक्ष दिली ती माझ्या पित्याने, पण मला अधिक महानता प्राप्त करायची आहे आणि निर्मिलेल्या प्राण्यांच्या तोंडून साक्ष मिळवायची आहे—म्हणून मी माझे सर्व काही तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण कराल व ज्यामुळे माझे मनुष्यांमधील कार्य संपेल. तुमचा माझ्यावर का विश्वास आहे हे तुम्ही समजून घ्यायला हवे; तुम्हाला माझे फक्त शिकाऊ अनुयायी किंवा माझा रुग्ण किंवा स्वर्गातील माझे पवित्र जन व्हायचे असेल, तर तुम्ही माझे अनुसरण करणे निरर्थक ठरेल. अशा प्रकारे माझे अनुसरण करणे म्हणजे निव्वळ शक्ती वाया घालवणे आहे; माझ्यावर अशा प्रकारची श्रद्धा असणे म्हणजे केवळ तुमचे दिवस वाया घालवणे, तुमचे तारुण्य वाया घालवणे आहे. आणि अखेरीस, तुम्हाला त्यातून काहीच मिळणार नाही. मग हा खटाटोप व्यर्थ जाणार नाही का? यहूद्यांपासून मी फार पूर्वीच दूर गेलेलो आहे व आता मी मनुष्याचा वैद्यही नाही किंवा मनुष्यासाठीचे औषधही नाही. मी आता मनुष्याने ज्याला त्याच्या इच्छेने हाकावे किंवा मानेवरून सुरी फिरवावी असा पशू नाही; किंबहुना, मी मनुष्याचा न्याय करण्यासाठी आणि त्याला ताडण देण्यासाठी मनुष्यामध्ये आलो आहे, जेणेकरून मनुष्य मला जाणून घेऊ शकेल. मी एकदा सुटकेचे कार्य केले आहे हे तुला माहीत असायला हवे. मी एकदा येशू होतो, पण मी सदैव येशू राहू शकलो नाही, तसेच मी एकदा यहोवा होतो पण नंतर येशू झालो. मी मानवजातीचा देव आहे, सृष्टीचा प्रभू आहे, पण मी सदैव येशू किंवा यहोवा म्हणून राहू शकत नाही. मनुष्य ज्याला वैद्य मानतो तोही मी होतो, पण देव हा मानवजातीचा केवळ वैद्य आहे असे म्हणता येत नाही. म्हणून, तू माझ्यावर श्रद्धा ठेवताना जुन्या धारणा कायम ठेवल्यास, तर तुला काहीच प्राप्त होणार नाही. आज तू माझी कितीही स्तुती कर: “देवाचे मनुष्यावर किती प्रेम आहे; तो मला बरे करतो व मला आशीर्वाद, शांती आणि आनंद देतो. देव मनुष्याशी किती चांगला वागतो; आपली जर त्याच्यावर श्रद्धा असेल, तर आपल्याला पैशाअडक्याची व संपत्तीची चिंता करण्याची गरज नाही…,” तरीही मी माझ्या मूळ कार्यात व्यत्यय आणू शकत नाही. आज जर तुझा माझ्यावर विश्वास असेल, तर तुला फक्त माझा महिमा प्राप्त होईल आणि तू माझ्यासाठी साक्ष देण्यास पात्र होशील व इतर सर्व काही दुय्यम होईल. हे तुला स्पष्टपणे माहीत असले पाहिजे.
आता, तुझा माझ्यावर विश्वास का आहे हे खरोखर तुला माहीत आहे का? माझ्या कार्याचा हेतू आणि महत्त्व तुला खरोखर माहीत आहे का? तुला तुझे कर्तव्य खरोखर माहीत आहे का? तुला माझी साक्ष खरोखर माहीत आहे का? तुझा माझ्यावर फक्त विश्वास असेल, मात्र तुझ्यामध्ये जर माझ्या महिम्याची किंवा साक्षीची जराही खूण नसेल, तर मी फार पूर्वीच तुला बाहेर काढून टाकले असते. ज्यांना हे सर्व माहीत आहे, ते तर माझ्या डोळ्यांत व माझ्या घरात अधिकच खुपतात, ते निव्वळ माझ्या मार्गातील अडथळे आहेत, समूळ उखडून टाकावे असे ते माझ्या कार्यातील तण आहेत, त्यांचा काहीही उपयोग नाही, ते कवडीमोलाचे आहेत आणि मी पूर्वीपासूनच त्यांचा तिरस्कार करतो. साक्ष नसलेल्या सर्वांवर माझा क्रोध अनेकदा बरसतो व माझा दंड त्यांच्यापासून कधीच दुरावत नाही. मी फार पूर्वीच त्यांना दुष्टाच्या स्वाधीन केले आहे; माझ्या आशीर्वादापासून ते वंचित आहेत. जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा त्यांचे ताडण हे मूर्ख स्त्रियांना मिळणाऱ्या ताडणाहून अधिक दुःखदायी असेल. आज मी केवळ जे माझे कर्तव्य आहे असेच कार्य करतो; मी गव्हाच्या सगळ्या ओंब्या तणासकट एकत्र बांधेन. ते आज माझे कार्य आहे. ती तणे माझ्या साफसफाईच्या काळात समूळ नष्ट केली जातील, मग गव्हाचे दाणे गोदामात गोळा केले जातील आणि उखडलेली ती तणे भस्मसात होण्यासाठी अग्नीच्या स्वाधीन केली जातील. माझे आताचे कार्य सर्व मनुष्यांना एकत्र गठ्ठ्यात बांधण्याचे आहे; म्हणजेच त्यांच्यावर पूर्ण विजय मिळवण्याचे आहे. त्यानंतर, सर्व मनुष्यांचा शेवट उघड करत, मी तणे उखडण्याचे कार्य सुरू करेन. आणि म्हणून, मला आता कसे संतुष्ट करायचे व माझ्यावरील श्रद्धा योग्य मार्गावर कशी आणायची, हे तुला माहीत असले पाहिजे. मला आता जे हवे आहे ती तुझी निष्ठा आणि आज्ञाधारकपणा, आताचे तुझे प्रेम व साक्ष. साक्ष म्हणजे काय किंवा प्रेम म्हणजे काय हे तुला याक्षणी जरी माहीत नसले, तरी तू सर्वस्वासकट माझ्याकडे यावेस आणि तुझ्याकडे असलेला एकमेव खजिना म्हणजे तुझी निष्ठा व आज्ञाधारकपणा मला द्यावास. तुला हे माहीत असायला हवे, की मी सैतानाच्या केलेल्या पराभवाची, त्याचप्रमाणे मनुष्यावर माझ्या संपूर्ण विजयाची साक्ष मनुष्याच्या निष्ठेत आणि आज्ञाधारकपणात निहित आहे. तुझ्या माझ्यावरील श्रद्धेचे कर्तव्य माझ्यासाठी साक्ष देण्यात, इतर कोणाहीपेक्षा केवळ व केवळ माझ्याशीच एकनिष्ठ राहण्यात आणि अखेरपर्यंत आज्ञाधारक राहण्यात सामावले आहे. मी माझ्या कार्याचा पुढचा टप्पा सुरू करण्यापूर्वी, तू माझ्यासाठी साक्ष कशी देशील? तू माझ्याप्रती एकनिष्ठ व आज्ञाधारक कसा राहशील? तू संपूर्ण निष्ठा तुझ्या कार्याप्रती ठेवतोस, की सरळ ते सोडून देतोस? तू माझ्या प्रत्येक व्यवस्थेला अधीन जाशील (मग तो मृत्यू असो किंवा विनाश), की माझे ताडण टाळण्यासाठी म्हणून मधूनच पळून जाशील? मी तुझे ताडण करतो, जेणेकरून तू माझ्यासाठी साक्ष द्यावीस आणि माझ्याप्रती एकनिष्ठ व आज्ञाधारक राहावेस. त्याहीपेक्षा जास्त, सध्याची शिक्षा ही, माझ्या कार्याचा पुढचा टप्पा उलगडण्यासाठी आणि कार्याची प्रगती अबाधित राखता येण्यासाठी आहे. म्हणून, माझे तुला सांगणे आहे, की तू शहाणे व्हावेस व जीवन आणि तुझ्या अस्तित्वाचे महत्त्व हे कवडीमोल वाळूचे कण आहेत असे समजू नयेस. माझे येणारे भावी कार्य काय असेल हे तू नेमकेपणाने जाणू शकतोस का? येणाऱ्या दिवसांत मी कसे कार्य करेन व माझे कार्य कसे उलगडेल हे तुला माहीत आहे का? माझ्या कार्याबद्दलच्या तुझ्या अनुभवाचे महत्त्व आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे तुझ्या माझ्यावरील श्रद्धेचे महत्त्व तुला माहीत असले पाहिजे. मी इतके काही केलेले आहे; तुला वाटते त्याप्रमाणे मी ते अर्धवट कसे सोडेन? मी इतके व्यापक कार्य केले आहे; ते मी नष्ट कसे करू शकेन? खरोखर, मी या युगाचा शेवट करण्यासाठी आलो आहे. हे खरे आहे, पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे, तुला हे माहीत असले पाहिजे, की मी एक नवीन युग सुरू करणार आहे, नवीन कार्य सुरू करणार आहे व सर्वात महत्त्वाचे, राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करणार आहे. त्यामुळे तुला माहीत असायला हवे, की सध्याचे कार्य हे केवळ एक नवीन युग सुरू करण्यासाठी आणि येणाऱ्या काळात सुवार्तेचा प्रसार करण्याचा पाया घालण्यासाठी तसेच भविष्यात या युगाचा शेवट करण्यासाठी आहे. माझे कार्य तुला वाटते तितके सोपे नाही, तसेच तुला वाटू शकते तसे ते क्षुल्लक व निरर्थकही नाही. म्हणून, अजूनही मी तुला हे सांगितले पाहिजे: तू तुझे जीवन माझ्या कार्यासाठी दिलेच पाहिजेस आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे, तू स्वतःला माझ्या महिम्याला समर्पित केले पाहिजेस. फार पूर्वीपासून, तू माझ्यासाठी साक्ष द्यावीस ही आस मी बाळगून आहे व त्याहीपेक्षा अधिक काळ तू माझ्या सुवार्तेचा प्रसार करण्याची आस मी बाळगून आहे. माझ्या हृदयात काय आहे हे तुला समजले पाहिजे.