तुमच्या दृष्टीने वरदान म्हणजे काय?

आजच्या युगात जन्मलेले लोक जरी सैतानाने आणि घाणेरड्या राक्षसांनी भ्रष्ट केलेले असले, तरी अशा भ्रष्टाचारामुळे ते पराकोटीच्या मोक्षाप्रतही पोचले आहेत. इयोबाच्या पर्वतप्राय संपत्तीपेक्षा आणि अगणित गुराढोरांपेक्षा, आणि सत्त्वपरीक्षेदरम्यान इयोबालाला जे परमेश्वराचे दर्शन झाले, त्याहीपेक्षा हा मोक्ष मोठा आहे. इयोब मृत्यूच्या कसोटीतून पार पडल्यानंतरच त्याला वावटळीतून परमेश्वराची वाणी, त्याचा आवाज ऐकू आला. तरीही त्याला परमेश्वराचे मुखदर्शन झाले नाही, आणि त्याच्या प्रकृतीचे आकलनही त्याला झाले नाही. इयोबाला फक्त भौतिक संपत्ती मिळाली आणि त्यामुळे त्याला शारीरिक सुखोपभोगांची आणि आसपासच्या सर्व शहरांतील सुंदर अपत्यांची प्राप्ती झाली, त्याप्रमाणे स्वर्गस्थ देवदूतांकडून संरक्षण प्राप्त झाले. त्याला परमेश्वर कधीही दिसला नाही. आणि जरी त्याला सदाचरणी म्हटले जात असले, तरीही त्याला परमेश्वराच्या प्रकृतीचे आकलन कधीही झाले नाही. आणि आजच्या लोकांची भौतिक सुखे ही तात्कालिक क्षुद्र आहेत किंवा बाहेरच्या जगातले वातावरण प्रतिकूल आहे असे म्हणता येत असले, तरी मी माझी प्रकृती प्रकट करतो, जी मी प्राचीन काळापासून कधीही मानवासमोर प्रकट केलेली नाही आणि जी कायमच गुप्त होती. तसेच युगानुयुगांची रहस्ये मी अशा लोकांसमोर प्रकट करतो जे सर्वांत कनिष्ठ स्तरावर आहेत, पण ज्यांचे मी महानतम पापमोचन केले आहे. एवढेच नव्हे, मी या गोष्टी प्रकट करण्याची ही पहिलीच वेळ आहे; यापूर्वी कधीही मी असे केलेले नाही. तुम्ही जरी इयोबापेक्षा कितीतरी कनिष्ठ असलात, तरी तुम्हाला जे मिळाले आहे आणि तुम्ही आतापर्यंत जे पाहिले आहे, ते त्याच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ दर्जाचे आहे. तुम्हाला जरी सर्व प्रकारच्या त्रासांचा आणि सर्व प्रकारच्या दुःखांचा अनुभव आलेला असला, तरी हा त्रास इयोबाच्या सत्त्वपरीक्षेसारखा नव्हे; उलट, लोकांना त्यांच्या बंडखोरीमुळे, त्यांच्या प्रतिकारामुळे, आणि माझ्या न्यायी प्रकृतीमुळे मिळालेला निवाडा आणि ताडण आहे. तो न्याय, ताडण, शाप आहे. याउलट, इस्रायली लोकांमध्ये इयोब हा सच्छील माणूस होता आणि त्याला परमेश्वराचे महान प्रेम आणि जिव्हाळा मिळाला. त्याने कोणतीही दुष्कृत्ये केली नव्हती आणि त्याने परमेश्वराला विरोधही केला नव्हता; उलट तो निष्ठेने परमेश्वराची भक्ती करत होता. त्याच्या सच्छीलतेमुळे, त्याला सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागले आणि तो परमेश्वराचा एकनिष्ठ सेवक होता, म्हणून त्याने या कठोर परीक्षा दिल्या. आजच्या लोकांना त्यांच्या अधर्मीपणामुळे आणि भ्रष्टपणामुळे माझ्या न्यायनिर्णयाला आणि शापाला सामोरे जावे लागते. इयोबाने आपले पशुधन, आपली मालमत्ता, आपले सेवक, आपली मुले, आणि जवळच्या सर्व माणसांना गमावले तेव्हा त्याला जो त्रास भोगावा लागला, त्या तुलनेत त्यांचे दुःख काहीच नाही, तरीही ते जे भोगतात ती तप्त शुद्धिक्रिया आणि दाह असतो. आणि इयोबाच्या सत्त्वपरीक्षांपेक्षाही हे अधिक गंभीर ठरते, कारण लोक दुबळे आहेत म्हणून अशा सत्त्वपरीक्षा बदलत नसतात; तर उलट त्या अधिक काळ चालतात आणि लोकांच्या आयुष्याच्या अंतिम दिवसापर्यंत चालू राहतात. ही शिक्षा असते, हा न्यायनिर्णय असतो आणि शाप असतो; हे क्षमारहित जळणे असते आणि त्याहीपेक्षा जास्त, हा मानवाला मिळालेला हक्काचा “वारसा” असतो. हीच लोकांची पात्रता असते, आणि इथेच माझा नीतिमान स्वभाव व्यक्त होतो. हे सर्वश्रुत आहे. तरीही, लोकांना जे प्राप्त झाले आहे, ते त्यांच्या आजच्या दुःखापेक्षा कितीतरी जास्त आहे. तुम्हाला भोगावा लागणारा त्रास हा केवळ तुमच्या मूर्खपणामुळे बसलेला फटका असतो, तर तुम्हाला जे मिळालेले असते, ते तुमच्या त्रासापेक्षा शेकडो पट जास्त असते. जुन्या करारातील इस्रायलच्या कायद्यांनुसार, जे मला विरोध करतील, जे माझ्यावर उघडपणे निवाडा देतील, आणि जे माझ्या मार्गाचे पालन करणार नाहीत आणि याउलट मला धृष्टतेने निषिद्ध गोष्टी अर्पण करतील, असे सर्व लोक निश्चितपणे मंदिरातील अग्नीत नष्ट होतील किंवा काही निवडक लोकांकडून दगडांनी ठेचून मारले जातील आणि त्यांच्या कुळांतील वंशजांना आणि इतर थेट संबंधितांनाही माझा शाप भोगावा लागेल. येणाऱ्या जन्मांत ते मुक्त होणार नाहीत, ते माझ्या सेवकांचे गुलाम होतील, आणि मी त्यांना परराष्ट्रांमध्ये धाडून देईन, आणि ते त्यांच्या मातृभूमीला परतून येऊ शकणार नाहीत. आजच्या लोकांच्या कृती आणि वर्तनानुसार, त्यांना भोगावा लागणारा त्रास हा इस्रायली लोकांना भोगाव्या लागलेल्या शिक्षेच्या तुलनेत काहीच नाही. तुम्ही आज जे भोगत आहात ते प्रायश्चित्त आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, कारण तुम्ही खरोखरच मर्यादाभंग केला आहे. तुम्ही जर इस्रायलमध्ये असता, तर तुम्ही अनंतकाळचे पापी ठरला असतात आणि इस्रायली लोकांनी तुमची कधीच खांडोळी केली असती, आणि जेहोव्हाच्या मंदिरातील स्वर्गीय अग्नीत तुम्हाला जाळून टाकले असते. मग आत्ता तुम्हाला मिळाले आहे ते काय आहे? तुम्हाला काय मिळाले आहे, आणि तुम्ही कशाचा उपभोग घेतला आहे? मी तुमच्यामध्ये माझी न्यायी प्रकृती प्रकट केली आहे, पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मानवजातीचा उद्धार करण्यात मी माझा संयम प्रकट केला आहे. कोणी म्हणेल की मी तुमच्यामध्ये केलेले कार्य हे संयमाचे कार्य आहे; ते माझ्या व्यवस्थेसाठी केलेले आहे, आणि त्याखेरीज, ते मानवजातीच्या आनंदासाठी केलेले आहे.

इयोबाला जरी यहोवाच्या सत्त्वपरीक्षांना सामोरे जावे लागले, तरी तो यहोवाची पूजा करणारा केवळ एक नीतीमान मनुष्य होता. त्या कसोट्यांना सामोरे जावे लागून सुद्धा, त्याने परमेश्वराविरुद्ध तक्रार केली नाही, आणि त्याने परमेश्वराशी झालेली भेट मोलाची मानली. आजचे लोक परमेश्वराच्या उपस्थितीचा केवळ अनादरच करतात असे नव्हे, तर ते त्याच्या स्वरूपाला नाकारतात, त्याचा तिरस्कार करतात, त्याविषयी तक्रार करतात आणि त्याची थट्टा उडवतात. तुम्हाला कधी काहीतरी मिळाले आहे का? तुमचा त्रास खरोखरच इतका मोठा आहे का? मेरी आणि जेम्सपेक्षा तुम्ही जास्त सुदैवी नाही का? आणि तुमचा प्रतिकार खरोखरच एवढा क्षुल्लक आहे का? मला तुमच्याकडून जे हवे आहे आणि मी तुमच्याकडून जे मागितले आहे ते फार मोठे आणि फार जास्त आहे असे असू शकते का? ज्यांनी मला प्रतिकार केला, ते इस्रायलीच माझ्या क्रोधाचे लक्ष्य ठरले आहेत, थेट तुम्ही नव्हे; तुम्हाला जे मिळाले आहे तो केवळ माझा कठोर न्यायनिर्णय आणि प्रकटीकरण आहे, आणि न्यायनिष्ठुर दाहक शुद्धीकरणही आहे. असे असूनही, लोक मला विरोध आणि माझा तिरस्कार करतातच आणि त्यात त्यांना जराही भीती वाटत नाही. काहीजण असेही असतात जे माझ्यापासून दूर जातात, मला नाकारतात; असे लोक आणि मोझेसला विरोध करणारे कोराह आणि दाथान यांचे अनुयायी यांत काही फरक नाही. लोकांची मने फार कठोर झाली आहेत आणि त्यांचा स्वभाव फार हटवादी. ते जुन्या पद्धती बदलायला कधीही राजी होत नाहीत. मी म्हणतो की, दिवसाढवळ्या नग्न होणाऱ्या वेश्यांसारखे ते असतात आणि माझे शब्द “कानात तापलेलं शिस ओतल्यासारखं” वाटेल इतके कठोर असतीलही, पण ते लोकांनाही दिवसाढवळ्या नग्न करतात—तरीही ते फक्त माना डोलवतात, थोडेफार अश्रू ढाळतात, आणि मारुन मुटकून थोडंसं दुःख करतात. एकदा हे संपलं, की ते डोंगरातल्या जंगली प्राण्यांच्या राजासारखेच निर्दय होतात, आणि त्यांना थोडीही जाणीव नसते. अशा स्वभावाच्या लोकांना ते इयोबापेक्षा शेकडो पट सुदैवी आहेत हे कसे उमगणार? त्यांना जे मिळाले आहे ते युगानुयुगे दुर्मिळ असणारे आणि यापूर्वी कोणालाही प्राप्त न झालेले वरदान आहे, हे त्यांना कसे कळणार? असे वरदान, असे शिक्षायुक्त वरदान लोकांच्या जाणिवेला कसे कळावे? खरे सांगायचे तर, मला तुमच्याकडून हे अपेक्षित आहे की, तुम्ही माझ्या कार्याचे उदाहरण व्हावे, माझ्या संपूर्ण प्रकृतीचे आणि माझ्या सर्व कृतींचे साक्षी व्हावे, आणि याद्वारे तुम्ही सैतानाच्या पकडीतून मुक्त व्हावे. तरीही लोक नेहमी माझ्या कार्याचा तिरस्कार करतात जाणीवपूर्वक त्याचा अनमान करतात. असे लोक मला इस्रायलचे कायदे परत आणायला का भाग पाडणार नाहीत, आणि इस्रायलवर माझा क्रोध बरसला तसा त्यांच्यावर का बरसणार नाही? माझ्याप्रति “आज्ञाधारक आणि विनम्र” असणारेही अनेक लोक तुमच्यात आहेत, तरीही कोराहच्या टोळक्यासारखे असणारे लोक त्याहूनही जास्त आहेत. एकदा मी माझे संपूर्ण सामर्थ्य प्राप्त केले, की स्वर्गीय अग्नीचा वापर करून मी त्यांना भस्मसात करीन. तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, मी यापुढे माझ्या शब्दांनी लोकांचे ताडण करणार नाही; तर इस्रायलचे काम करण्यापूर्वी, मी मला विरोध करणाऱ्या आणि ज्यांना मी फार पूर्वीच बाहेर काढून टाकले होते त्या “कोराहच्या टोळक्याला” पूर्णपणे भस्मसात करेन. मानवजातीला माझ्या कृपेचे सुख अनुभवण्याची संधी मिळणार नाही; त्याऐवजी त्यांना दिसेल तो माझा क्रोध आणि स्वर्गस्थ अग्नीच्या ज्वाळा. मी सर्व प्रकारच्या लोकांना त्यांच्या कर्माची विविध फळे दाखवून देईन आणि त्यांची मी वेगवेगळ्या श्रेणींत विभागणी करीन. त्यांच्या प्रत्येक विद्रोही कृतीची माझ्याकडे नोंद असेल आणि त्यानंतर मी माझे कार्य संपवीन, जेणेकरून लोकांना मिळणारी फळे याच जगात, माझ्या निवाड्याच्या आधाराने तसेच त्यांच्या माझ्याविषयीच्या दृष्टिकोनावरून ठरतील. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा त्यांना भोगावे लागणारे परिणाम कशानेही बदलणार नाहीत. लोकांना आपापली फळे प्रकट करूदे! मग मी लोकांची फळे स्वर्गस्थ पित्याकडे सुपूर्द करीन.

मागील:  तू भविष्यातील कामगिरीमध्ये कसे सहभागी व्हावे?

पुढील:  तुझ्या दृष्टीने देव म्हणजे काय?

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger