सुवार्ता पसरवण्याचे काम हे माणसाला वाचवण्याचे काम देखील आहे
सर्व लोकांनी पृथ्वीवरील माझ्या कार्याची उद्दिष्टे समजून घेणे आवश्यक आहे, म्हणजे, मला अखेर काय कमवायचे आहे आणि हे काम पूर्ण होण्यापूर्वी मला त्यात कोणता स्तर गाठायचा आहे. जर, आजपर्यंत माझ्यासोबत चालल्यानंतर देखील लोकांना माझे कार्य काय आहे हे समजत नाही, तर त्यांनी माझ्याबरोबर चालणे व्यर्थ नाही का? जर लोक माझे अनुसरण करतात, तर त्यांना माझी इच्छा माहित असायला हवी. मी हजारो वर्षांपासून पृथ्वीवर काम करत आहे आणि आजपर्यंत मी याच प्रकारे माझे काम करत आहे. माझ्या कामात अनेक प्रकल्प असले, तरी त्याचा उद्देश कायम आहे; जरी मी मनुष्याप्रती न्याय आणि ताडण हे धोरण ठेवणार आहे, उदाहरणार्थ, तरी मी जे काही करतो ते मनुष्य पूर्ण झाल्यावर त्याला वाचवण्यासाठी आणि माझ्या सुवार्तेचा अधिक चांगल्या प्रकारे प्रसार करण्यासाठी तसेच सर्व गैरयहुदीराष्ट्रांमध्ये माझे कार्य अधिक विस्तारित करण्यासाठी आहे. म्हणून आज, ज्या वेळी अनेक लोक निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत, त्यावेळीही मी माझे काम सुरू ठेवतो, माणसाचा न्याय आणि ताडण करण्यासाठी मी जे काम केले पाहिजे, ते मी सुरू ठेवतो. जरी माझ्या सांगण्याचा मनुष्याला वीट आला आहे आणि माझ्या कामाशी संबंधित असण्याची त्याला इच्छा नाही, तरीही मी माझे कर्तव्य पार पाडत आहे, कारण माझ्या कामाचा उद्देश कायम आहे आणि माझी मूळ योजना खंडित होणार नाही. माझ्या न्यायाचे कार्य हे मनुष्याला माझ्या आज्ञांचे अधिक चांगल्या प्रकारे पालन करण्यास सक्षम करणे हे आहे आणि माझ्या शिक्षेचे कार्य हे मनुष्याला अधिक परिणामकारकरीत्या बदल घडवू देणे हे आहे. जरी मी जे काही करतो त्यामागे माझ्या व्यवस्थापनाचा हेतू आहे, तरी मी कधीही असे काहीही केले नाही जे मनुष्याच्या फायद्याचे नाही, कारण मला इस्रायलच्या पलीकडे असलेल्या सर्व राष्ट्रांना इस्रायलींएवढेच आज्ञाधारक बनवायचे आहे, त्यांना खरेखुरे मानव बनवायचे आहे, त्यायोगे इस्रायलच्या बाहेरच्या प्रदेशात मला पाऊल ठेवता येईल. हे माझे व्यवस्थापन आहे; हे काम मी गैरयहुदी राष्ट्रांमध्ये पूर्ण करत आहे. आजही, अनेकांना माझे व्यवस्थापन समजत नाही, कारण त्यांना अशा गोष्टींमध्ये रस नाही आणि त्यांना फक्त त्यांच्या स्वतःच्या भविष्यांची आणि गंतव्यस्थानांची काळजी आहे. मी काहीही म्हटले तरी, मी करत असलेल्या कामाबद्दल ते उदासीन राहतात, त्याऐवजी ते केवळ त्यांच्या उद्याच्या गंतव्यस्थानावर लक्ष केंद्रीत करतात. जर हे असेच चालू राहिले, तर माझ्याचा कार्याचा विस्तार कसा होईल? माझी सुवार्ता जगभरात कशी पसरवता येईल? हे जाणून घ्या की, जेव्हा माझे कार्य पसरेल, तेव्हा मी तुम्हाला विखरून टाकीन आणि तुम्हाला मोठा दणका देईन, जसे की यहोवाने इस्रायलच्या प्रत्येक जमातीला दणका दिला. हे सर्व यासाठी केले जाईल, जेणेकरून माझी सुवार्ता संपूर्ण पृथ्वीवर पसरेल, माझे कार्य परराष्ट्रीयांपर्यंत पोहोचेल, जेणेकरून माझ्या नावाची भव्यता प्रौढ आणि मुलांमध्ये त्याच प्रकारे ठसावी आणि माझे पवित्र नाव सर्व जमातीतील आणि सर्व राष्ट्रांतील लोकांच्या मुखी व्हावे. हे यासाठी की, या अंतिम युगात, गैरयहुदी राष्ट्रांमध्ये माझे नाव मोठे व्हावे, जेणेकरून माझी कृती गैरयहुदी राष्ट्रीयांना दिसावी आणि माझ्या कृतींमुळे त्यांनी मला सर्वशक्तिमान म्हणावे आणि माझे शब्द लवकरच त्यांच्या कानावर पडावेत. मी सर्व लोकांना हे ज्ञात करून देईन की, मी फक्त इस्रायलींचाच देव नाही, तर इस्रायलबाहेरील सर्व गैरयहुदी राष्ट्रांचा, मी ज्यांना शाप दिला आहे, त्यांचाही देव आहे. मी सर्व निर्मित सृष्टीचा देव आहे, हे मी सर्व लोकांना पाहू देईन. हे माझे सर्वात मोठे कार्य आहे, शेवटच्या दिवसांसाठीच्या माझ्या कार्य योजनेचा हा उद्देश आहे आणि शेवटच्या दिवसांत पूर्ण करण्याचे हे एकमेव कार्य आहे.
हजारो वर्षांपासून मी जे काम सांभाळत आहे, ते केवळ शेवटच्या दिवसांतच माणसासमोर पूर्णपणे उघड होईल. केवळ आताच मी माझ्या व्यवस्थापनाचे संपूर्ण रहस्य माणसासमोर उलगडले आहे आणि माणसाला माझ्या कार्याचा उद्देश कळला आहे, एवढेच नव्हे तर माझी सर्व रहस्ये समजली आहेत. माणसाला ज्या गंतव्यस्थानाची चिंता आहे, त्याविषयीच्या सर्व गोष्टी मी आधीच त्याला सांगितल्या आहेत. मी आधीच माणसासमोर माझी सर्व रहस्ये, ५,९०० वर्षांहून अधिक काळ लपून राहिलेली रहस्ये उलगडली आहेत. यहोवा कोण आहे? मसीहा कोण आहे? येशू कोण आहे? तुम्हा लोकांना हे सर्व माहित असले पाहिजे. माझ्या कामासाठी ही नावे म्हणजे महत्त्वाचे वळण आहेत. तुम्हा लोकांना ते समजले आहे का? माझ्या पवित्र नावाची घोषणा कशी करावी? ज्या राष्ट्रांनी माझ्या कोणत्याही नावाने मला साद घातली आहे, त्या राष्ट्रांमध्ये माझ्या नावाचा प्रसार कसा व्हावा? माझे कार्य विस्तारत आहे आणि मी ते संपूर्णतः कोणत्याही आणि सर्व राष्ट्रांमध्ये पसरवीन. माझे कार्य तुम्हा लोकांमध्ये चालू आहे, म्हणून मी तुम्हाला पराभूत करीन, ज्याप्रमाणे यहोवाने इस्रायलमधील डेव्हिड घराण्याच्या मेंढपाळांना पराभूत केले, त्यामुळे तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये विखुरले जाल. कारण अखेरच्या दिवसांत, मी सर्व राष्ट्रांचे तुकडे तुकडे करीन आणि त्यामधील लोकांना पुन्हा नव्याने विभागून टाकीन. जेव्हा मी पुन्हा परतेन, तेव्हा राष्ट्रे आधीच माझ्या जळत्या ज्वाळांनी निश्चित केलेल्या सीमांनुसार विभागली गेलेली असतील. त्या वेळी, मी प्रखर सूर्याच्या रूपात मानवजातीसमोर नव्याने प्रकट होईन, ज्याला त्यांनी कधीही पाहिलेले नाही अशा पवित्र देवाच्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट होईन, खूप सा-या राष्ट्रांमध्ये चालत जाईन, जसा मी, यहोवा, एकेकाळी ज्यू जमातींसोबत चाललो होतो. तेव्हापासून पुढे, मी मानवजातीचे पृथ्वीवरील त्यांच्या आयुष्यात नेतृत्व करीन. तेथे त्यांना माझे मोठेपणाचे वैभव नक्कीच दिसेल आणि त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करण्यासाठी हवेत ढगाचा खांब देखील दिसेल, कारण मी पवित्र स्थळी दर्शन देईन. मनुष्य माझ्या नीतिमानतेचा दिवस पाहील आणि माझे तेजस्वी रूप देखील पाहील. जेव्हा मी संपूर्ण पृथ्वीवर राज्य करीन आणि माझ्या अनेक पुत्रांना वैभव प्राप्त करून देईन, तेव्हा असे होईल. पृथ्वीवर सर्वत्र, माणसे नतमस्तक होतील आणि आज मी करत असलेल्या कामाच्या आधारावर, मानवतेमध्ये माझे प्रार्थनामंदिर भक्कमपणे उभारले जाईल. लोक माझीही मंदिरात सेवा करतील. घाणेरड्या आणि घृणास्पद गोष्टींनी झाकलेल्या वेदीचे मी तुकडे तुकडे करीन आणि ती नवीन बांधीन. नवजात कोकरे आणि वासरांची रास पवित्र वेदीवर ठेवली जाईल. मी आजचे मंदिर पाडून नवीन बांधीन. आता उभे असलेले, तिरस्करणीय माणसांनी भरलेले मंदिर कोसळेल आणि जे मी बांधणार आहे ते माझ्याशी एकनिष्ठ सेवकांनी भरून जाईल. माझ्या मंदिराच्या वैभवासाठी ते पुन्हा एकदा उभे राहून माझी सेवा करतील. ज्या दिवशी मला मोठा गौरव प्राप्त होईल, तो दिवस तुम्ही लोक नक्कीच पाहाल आणि तो दिवसही तुम्हाला नक्कीच दिसेल जेव्हा मी मंदिर पाडून नवीन बांधीन. तसेच, तुम्ही माझे प्रार्थनामंदिर माणसांच्या जगात येण्याचा दिवस नक्कीच पाहाल. जसे मी मंदिर फोडून टाकीन, त्याचप्रमाणे मी माझे निवासस्थान माणसांच्या जगात आणीन, जसे ते माझे वंश पाहतील. मी सर्व राष्ट्रांना चिरडून टाकल्यानंतर, मी त्यांना पुन्हा नव्याने एकत्र करीन, पुढे माझे मंदिर बांधेन आणि माझ्या वेदीची स्थापना करेन, जेणेकरून सर्वांनी माझ्यापुढे समर्पण करावे, माझ्या मंदिरात माझी सेवा करावी आणि गैरयहुदी राष्ट्रांमध्ये माझ्या कार्यात स्वतःला विश्वासूपणे वाहून घ्यावे. ते आजच्या काळातील इस्रायली लोकांसारखे असतील, ते पुरोहिताची वस्त्रे आणि मुकुटाने सजलेले असतील, त्यांच्यामध्ये माझे, यहोवाचे वैभव असेल आणि माझे राजवैभव त्यांच्यावर घिरट्या घालत, कायम त्यांच्याबरोबर राहील. गैरयहुदी राष्ट्रांमध्ये देखील माझे कार्य त्याच प्रकारे पार पाडले जाईल. माझे कार्य जसे इस्रायलमध्ये होते, तसेच गैरयहुदी राष्ट्रांमध्ये पार पडेल. कारण मी इस्रायलमध्ये माझ्या कार्याचा विस्तार करेन आणि ते गैरयहुदी राष्ट्रांमध्ये देखील पसरवेन.
आता ती वेळ आहे जेव्हा माझा आत्मा महान कार्य करतो आणि जेव्हा मी गैरयहुदी राष्ट्रांमध्ये माझे कार्य सुरू करतो. एवढेच नव्हे, तर हीच वेळ आहे जेव्हा मी, निर्माण झालेल्या सर्व प्राण्यांचे वर्गीकरण करतो, प्रत्येकाला आपापल्या श्रेणीत ठेवतो, जेणेकरून माझे कार्य अधिक जलद आणि परिणामकारकपणे पुढे जावे. म्हणूनच, मी तुम्हा लोकांना आवाहन करतो की, तू माझ्या सर्व कामांसाठी तुझे सर्वस्व अर्पण करावेस, एवढेच नव्हे, तर मी तुझ्यामध्ये केलेल्या सर्व कामांची स्पष्टपणे ओळख करून घ्यावीस आणि ते निश्चित करावे आणि तुझी सर्व शक्ती माझ्या कामासाठी वाहावीस जेणेकरून ते अधिक परिणामकारक होईल. हे तू समजून घेतलेच पाहिजेस. आपापसात भांडणे, परतीचा मार्ग शोधणे किंवा शारीरिक सुखसोयींचा शोध घेणे यांपासून स्वतःला दूर ठेव, नाही तर त्यामुळे माझ्या कार्याला आणि तुझ्या अद्भूत भविष्याला विलंब होईल. ते केल्याने तुझे रक्षण होणे तर दूरच, उलट तुझा नाश होईल. हा तुझा मूर्खपणाच ठरणार नाही का? आज तू ज्या गोष्टीचा लोभीपणाने आनंद घेतोस, तीच गोष्ट तुझे भविष्य उद्ध्वस्त करत आहे, तर आज तू जी वेदना सहन करतोस, तीच तुझे संरक्षण करत आहे. तुला या गोष्टींची स्पष्ट जाणीव असणे आवश्यकच आहे, जेणेकरून, ज्यातून बाहेर पडणे कठीण अशा प्रलोभनांना बळी पडणे तुला टाळता येईल, दाट धुक्यामध्ये चूक टाळता येईल आणि सूर्याचा शोध घेण्यातील अक्षमता टाळता येईल. जेव्हा दाट धुके विरून जाईल, तेव्हा महान दिवसाच्या निर्णयामध्ये तू स्वतःला पाहशील. तोपर्यंत, माझा दिवस मानवजातीच्या जवळ येत असेल. तू माझ्या न्यायापासून कशी सुटका करून घेऊ शकशील? सूर्याचे कडक ऊन तू कसे सहन करू शकशील? जेव्हा मी मनुष्याला माझी विपुलता देतो, तेव्हा तो ती आपल्या कुशीत ठेवत नाही, तर ती कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा ठिकाणी टाकतो. जेव्हा माझा दिवस माणसावर येऊन ठेपेल, त्यापुढे तो माझ्या विपुलतेचा शोध घेऊ शकणार नाही किंवा मी त्याच्याशी खूप पूर्वी बोललेले सत्याचे कडू शब्दही त्याला सापडणार नाहीत. तो रडेल, भेकेल, कारण त्याने प्रकाशाची चमक गमावलेली असेल आणि तो अंधाराच्या खाईत पडलेला असेल. आज तुम्हाला जी दिसते, ती केवळ माझ्या तोंडाची धारदार तलवार आहे. माझ्या हातातील काठी किंवा ज्या ज्वाळेने मी माणसाला भस्म करतो, ती ज्वाळा तुम्ही पाहिलेली नाही आणि म्हणूनच तुम्ही माझ्या उपस्थितीतही अजूनही गर्विष्ठ आणि उतावळे आहात. याच कारणामुळे तुम्ही अजूनही माझ्या घरी माझ्याशी भांडता, मी माझ्या तोंडून जे बोललो त्यावर तुमच्या मानवी जिभेने वाद घालता. मनुष्य मला घाबरत नाही आणि जरी तो आजही माझ्याशी वैर करीत असला तरी तो कोणत्याही भीतीशिवाय राहतो. तुमच्या तोंडात अनीतिमान जीभ आणि दात आहेत. तुमचे शब्द आणि कृती त्या सापाप्रमाणे आहेत, ज्याने इव्हला पाप करण्यास उद्युक्त केले. तुम्ही एकमेकांकडून डोळ्याच्या बदल्यात डोळा आणि दाताच्या बदल्यात दात मागता आणि स्वतःसाठी पद, प्रसिद्धी आणि नफा मिळवण्यासाठी माझ्या उपस्थितीत संघर्ष करता, तरीही तुम्हाला हे माहित नाही की, मी गुप्तपणे तुमचे शब्द आणि कृत्ये यावर लक्ष ठेवतो आहे. तुम्ही माझ्या पुढ्यात येण्यापूर्वीच, मी तुम्हा लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल असा इशारा दिलेला आहे. मनुष्य नेहमी माझ्या हाताच्या पकडीतून सुटू इच्छितो आणि माझी नजर चुकवण्याचा प्रयत्न करतो, परंतु मी कधीही त्याचे शब्द किंवा कृती उडवून लावलेली नाही. त्याऐवजी, मी हेतुपुरस्सर ते शब्द आणि कृत्ये माझ्या नजरेस येण्याची परवानगी देतो, जेणेकरून मी मनुष्याच्या अनीतिमानतेला ताडण करू शकेन आणि त्याच्या बंडखोरीचा न्याय करू शकेन. अशा प्रकारे, मनुष्याचे शब्द आणि कृत्ये गुप्तपणे माझ्या न्यायासनासमोर असतात आणि माझा न्याय माणसाला कधीही सोडून देत नाही, कारण त्याची बंडखोरी खूप आहे. माझ्या आत्म्याच्या उपस्थितीत मनुष्याने उच्चारलेले सर्व शब्द आणि केलेली सर्व कृत्ये जाळून शुद्ध करणे हे माझे कार्य आहे. अशाप्रकारे,[अ] जेव्हा मी पृथ्वी सोडेन, तेव्हा देखील लोक माझ्यावर निष्ठा कायम ठेवतील आणि जसे माझे पवित्र सेवक माझ्या कामात करतात तशी माझी सेवा करतील, त्यायोगे पृथ्वीवरील माझे कार्य ते पूर्ण होण्याच्या दिवसापर्यंत पुढे चालू राहिल.
तळटीप:
अ. मूळ मजकुरात “अशाप्रकारे” असा शब्दप्रयोग नाही.