तारणहार आधीच “पांढऱ्या मेघा” वर परतला आहे

अनेक सहस्राब्दींपासून, मनुष्याला तारणहाराच्या आगमनाचा साक्षीदार होण्यास सक्षम होण्याची आस आहे. ज्यांना हजारो वर्षांपासून त्याची आस लागली आहे, त्यांच्यापैकी, मनुष्य एक आहे ज्याला तारणहार येशूला पांढऱ्या मेघावर स्वार होऊन उतरताना प्रत्यक्ष पाहण्याची तीव्र इच्छा आहे. तारणहार परत येण्याची आणि त्यांच्याशी पुन्हा जोडले जाण्याची मनुष्याची इच्छा आहे; म्हणजेच, हजारो वर्षांपासून लोकांपासून विभक्त झालेल्या तारणहार येशूने परत यावे व त्याने यहुद्यांमध्ये केलेले सुटकेचे कार्य पुन्हा एकदा पार पाडावे, मनुष्याप्रती दयाळू आणि प्रेमळ व्हावे, मनुष्याच्या पापांना क्षमा करावी व मनुष्याच्या पापांना सहन करावे आणि मनुष्याचे सर्व अपराधदेखील सहन करावेत व मनुष्याला पापापासून मुक्त करावे, अशी आस मनुष्याला आहे. मनुष्य ज्याची इच्छा करतो ती म्हणजे तारणहार येशू हा पूर्वीसारखाच असावा—असा तारणहार जो प्रेमळ, दयाळू आणि आदरणीय आहे, जो मनुष्यावर कधीही क्रोधित होत नाही व जो कधीही मनुष्याची निंदा करत नाही, उलट तो मनुष्याच्या सर्व पापांना क्षमा करतो आणि स्वीकारतो व जो पूर्वीप्रमाणेच मनुष्यासाठी वधस्तंभावर प्राणदेखील देतो. येशू निघून गेल्यापासून, त्याच्यामागे चालणारे शिष्य, तसेच त्याच्या नावाने तारले गेलेले सर्व संत त्याच्यासाठी आतुरतेने उभे आहेत आणि त्याची वाट पाहत आहेत. कृपेच्या युगात येशू ख्रिस्ताच्या कृपेने ज्यांचे तारण झाले होते, ते सर्व शेवटच्या दिवसातील त्या आनंदी दिवसाची असोशीने वाट पाहत आहेत, जेव्हा तारणहार येशू सर्व लोकांसमोर येण्यासाठी पांढऱ्या मेघावर स्वार होऊन उतरतो. अर्थात, आज तारणहार येशूचे नाव स्वीकारणाऱ्या सर्वांची ही सामूहिक इच्छा आहे. या विश्वातील प्रत्येकजण ज्याला तारणहार येशूच्या तारणाची माहिती आहे, येथू ख्रिस्ताने पृथ्वीवर असताना जे सांगितले होते ते पूर्ण करण्यासाठी तो अचानक येईल अशी त्यांची तीव्र आस आहे: “मी जसा निघालो, तसाच परत येईन.” मनुष्याचा असा विश्वास आहे, की वधस्तंभावर व पुनरुत्थानानंतर, येशू पांढऱ्या मेघावर स्वार होऊन परमोच्च देवाच्या उजव्या बाजूला असलेले त्याचे स्थान ग्रहण करण्यासाठी परत स्वर्गात गेला. अशाच प्रकारे, येशू पुन्हा एका पांढऱ्या मेघावर स्वार होऊन उतरेल (येशू स्वर्गात परतताना ज्या मेघावर स्वार झाला होता तोच हा मेघ), ज्यांना हजारो वर्षांपासून त्याची तीव्र आस लागली होती आणि यहुद्यांची प्रतिमा धारण करेल व त्यांची वस्त्रे परिधान करेल. मनुष्याला दर्शन दिल्यानंतर, तो त्यांना अन्न देईल आणि त्यांच्यासाठी जिवंत पाण्याचा झरा वाहवेल व ठळकपणे आणि वास्तविकतेने, कृपेने व प्रेमाने परिपूर्ण असा मनुष्यांमध्ये वास्तव्य करेल. या सर्व धारणा आहेत, ज्यावर लोकांचा विश्वास आहे. तरीही तारणहार येशूने हे केलेले नाही; त्याने मनुष्याच्या कल्पनेच्या उलट केले. ज्यांना त्याच्या परतीची आस होती, त्यांच्यामध्ये तो आला नाही आणि पांढऱ्या मेघावर स्वार झालेला असताना तो सर्व लोकांना दिसला नाही. तो आधीच आला आहे, परंतु मनुष्याला हे माहीत नाही व तो अज्ञानी राहतो. मनुष्य केवळ त्याची उद्देशहीन वाट पाहत आहे, त्याला हे माहीत नाही, की तो आधीच एका “पांढऱ्या मेघा” वर स्वार होऊन उतरला आहे (तो मेघ हा त्याचा आत्मा आहे, त्याची वचने, त्याची संपूर्ण प्रवृत्ती आणि त्याचे सर्व रूप आहे) व आता तो शेवटच्या दिवसांमध्ये निर्माण करणार असलेल्या विजय मिळवणाऱ्यांच्या गटात आहे. मनुष्याला हे माहीत नाही: पवित्र तारणहार येशूला मनुष्याबद्दल सर्व आपुलकी आणि प्रेम असले तरीही, मलिनता व अशुद्ध आत्म्यांची वस्ती असलेल्या “मंदिरांमध्ये” तो कसा कार्य करू शकतो? मनुष्य त्याच्या आगमनाची वाट पाहत असला तरी, जे अनीतिमानांचे मांस खातात, अनीतिमानांचे रक्त प्राशन करतात, अनीतिमानांची वस्त्रे परिधान करतात, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, परंतु त्याला ओळखत नाहीत आणि जे सतत त्याला लुटत असतात त्यांना तो कसे दर्शन देईल? मनुष्य केवळ हेच जाणतो, की तारणहार येशू हा प्रेमाने भरलेला व करुणेने ओतप्रोत आहे, तो पापार्पण आहे, सुटकेने भरलेला आहे. तथापि, मनुष्याला याची कल्पना नाही, की तो स्वतः देव आहे, जो नीतिमत्त्व, वैभव, क्रोध आणि न्यायाने भरलेला आहे, अधिकार धारण केलेला आहे व प्रतिष्ठेने परिपूर्ण आहे. म्हणून, जरी मनुष्य मुक्तीदात्याच्या परत येण्याची आतुरतेने आणि असोशीने वाट पाहत असला व त्यांच्या प्रार्थनांनीही “स्वर्ग” हलवला, तरीही जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, मात्र त्याला ओळखत नाहीत, त्यांना तारणहार येशू दर्शन देत नाही.

“यहोवा” हे नाव मी इस्रायलमधील माझ्या कार्यादरम्यान घेतले होते आणि याचा अर्थ इस्रायली लोकांचा (देवाने निवडलेले लोक) देव आहे जो मनुष्यावर दया करू शकतो, मनुष्याला शाप देऊ शकतो व मनुष्याच्या जीवनाला मार्गदर्शन करू शकतो; देव ज्याच्याकडे महान सामर्थ्य आहे आणि तो ज्ञानाने परिपूर्ण आहे. “येशू” म्हणजे इमॅन्युएल आहे, याचा अर्थ पापार्पण जे प्रेमाने भरलेले आहे, करुणेने भरलेले आहे व जे मनुष्याची सुटका करते. त्याने कृपेच्या युगाचे कार्य केले आणि तो कृपेच्या युगाचे प्रतिनिधित्व करतो व तो व्यवस्थापन योजनेच्या कार्याच्या केवळ एका भागाचे प्रतिनिधित्व करू शकतो. म्हणजेच, केवळ यहोवा हाच इस्रायलच्या निवडलेल्या लोकांचा देव आहे, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव, मोशेचा देव व सर्व इस्रायली लोकांचा देव आहे. आणि म्हणूनच, सध्याच्या युगात, यहुदी लोकांच्या जोडीलाच, सर्व इस्रायली लोक यहोवाची उपासना करतात. ते त्याला वेदीवर अर्पणे वाहतात व पुजाऱ्यांची वस्त्रे परिधान करून मंदिरात त्याची सेवा करतात. त्यांना यहोवाच्या पुनरागमनाची आशा आहे. केवळ येशू हाच मनुष्यजातीचा मुक्तिदाता आहे आणि तोच पापार्पण आहे ज्याने मनुष्यजातीची पापातून सुटका केली. म्हणजेच, येशूचे नाव कृपेच्या युगातून आले व कृपेच्या युगातील सुटकेच्या कार्यामुळे ते अस्तित्वात आले. कृपेच्या युगातील लोकांना पुनर्जन्माची आणि वाचवण्याची परवानगी देण्यासाठी येशूचे नाव अस्तित्वात आले व संपूर्ण मनुष्यजातीच्या सुटकेसाठी हे एक विशिष्ट नाव आहे. अशा प्रकारे, येशू हे नाव सुटकेच्या कार्याचे प्रतिनिधित्व करते आणि कृपेचे युग दर्शवते. यहोवा हे नाव इस्रायली लोकांसाठी एक विशिष्ट नाव आहे, जे नियमशास्त्राच्या अधीन राहत होते. प्रत्येक युगात व कार्याच्या प्रत्येक टप्प्यात, माझे नाव निराधार नाही, परंतु त्याला प्रातिनिधिक महत्त्व आहे: प्रत्येक नाव एका युगाचे प्रतिनिधित्व करते. “यहोवा” हे नाव नियमशास्त्राच्या युगाचे प्रतिनिधित्व करते आणि इस्रायली लोक ज्याची उपासना करत, त्या देवाचे हे नामाभिधान होते. “येशू” हे नाव कृपेच्या युगाचे प्रतिनिधित्व करते व कृपेच्या युगात ज्यांची सुटका करण्यात आली त्या सर्वांच्या देवाचे हे नाव आहे. शेवटच्या दिवसांत जर मनुष्य अद्यापही तारणहार येशूच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असेल आणि त्याने यहूदीयात धारण केलेल्या प्रतिमेतच तो येईल अशी अपेक्षा करत असेल, तर संपूर्ण सहा हजार वर्षांची व्यवस्थापन योजना सुटकेच्या युगात थांबली असती आणि तिची पुढे प्रगती झाली नसती. शिवाय, शेवटचे दिवस कधीही आले नसते व युग कधीही संपुष्टात आले नसते. याचे कारण असे, की तारणहार येशू हा केवळ मनुष्यजातीच्या सुटकेसाठी आणि तारणासाठी आहे. मी केवळ कृपेच्या युगातील सर्व पापी लोकांसाठी येशू हे नाव घेतले, परंतु हे ते नाव नाही ज्याद्वारे मी संपूर्ण मनुष्यजातीचा अंत करेन. जरी यहोवा, येशू व मशीहा हे सर्वच माझ्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करत असले तरी, ही नावे केवळ माझ्या व्यवस्थापन योजनेच्या विविध युगांना सूचित करतात आणि संपूर्णपणे माझे प्रतिनिधित्व करत नाहीत. पृथ्वीवरील लोक ज्या नावांनी मला संबोधतात, ती माझी संपूर्ण प्रवृत्ती व मी जे काही आहे ते स्पष्ट करू शकत नाहीत. ती केवळ भिन्न नावे आहेत, ज्यांनी मला वेगवेगळ्या युगांमध्ये संबोधले जाते. आणि म्हणूनच, जेव्हा अंतिम युग—शेवटच्या दिवसांचे युग—येईल, तेव्हा माझे नाव पुन्हा बदलेल. मला यहोवा किंवा येशू म्हटले जाणार नाही, मशीहा तर अगदीच कमी—मला स्वतःला शक्तिशाली सर्वशक्तिमान देव म्हटले जाईल व या नावाखाली मी संपूर्ण युगाचा अंत करेन. मला एकेकाळी यहोवा म्हणून ओळखले जात असे. मला मशीहा देखील म्हटले गेले आणि लोकांनी मला प्रेमाने व आदराने तारणहार येशू असेही म्हटले. मात्र, आज मी तो यहोवा किंवा येशू राहिलेलो नाही जो पूर्वी लोकांना माहीत होता; मी शेवटच्या दिवसांत परत आलेला देव आहे, जो युगाचा अंत करणारा देव आहे. मी स्वतः देव आहे जो पृथ्वीच्या टोकापासून वर येतो, मी माझ्या संपूर्ण प्रवृत्तीने परिपूर्ण आणि अधिकार, सन्मान व वैभवाने परिपूर्ण आहे. लोकांनी माझ्याशी कधीच संबंध ठेवला नाही, मला कधीच ओळखले नाही आणि माझ्या प्रवृत्तीबद्दल ते सदैव अज्ञानी राहिले. जगाच्या निर्मितीपासून आजपर्यंत, एकाही व्यक्तीने मला पाहिले नाही. हा तो देव आहे जो शेवटच्या दिवसांत मनुष्याला दिसतो, पण तो मनुष्यामध्येच लपलेला असतो. तो मनुष्यामध्ये वास्तव्य करतो, तो खरा व वास्तविक आहे, प्रखर सूर्यासारखा आणि प्रज्वलित ज्वाळेसारखा, सामर्थ्याने भरलेला व अधिकाराने भरलेला आहे. अशी एकही व्यक्ती किंवा गोष्ट नाही, की जिचा माझ्या वचनांद्वारे न्याय केला जाणार नाही आणि अशी एकही व्यक्ती किंवा गोष्ट अशी नाही जी अग्नीमध्ये शुद्ध होणार नाही. अखेरीस, माझ्या वचनांमुळे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील आणि माझ्या वचनांमुळेच त्यांचा सर्वनाश होईल. अशाप्रकारे, शेवटच्या दिवसांतील सर्व लोक पाहतील, की मीच तारणहार परत आलो आहे व मी सर्वशक्तिमान देव आहे जो सर्व मनुष्यजातीवर विजय मिळवतो आणि सर्वांना दिसेल, की मी एकेकाळी मनुष्यासाठी पापार्पण होतो, परंतु शेवटच्या दिवसांत मी सूर्याच्या ज्वाला बनतो जो सर्व गोष्टी भस्मसात करतो, तसेच नीतिमत्तेचा सूर्य बनतो जो सर्व गोष्टी प्रकट करतो. हे माझे शेवटच्या दिवसांतील कार्य आहे. मी हे नाव धारण केले आहे व ही प्रवृत्ती मला प्राप्त झाली आहे, यासाठी की मी एक नीतिमान देव आहे, धगधगता सूर्य, प्रज्वलित ज्वाला आहे हे लोकांनी पाहावे आणि सर्वांनी माझी, एकाच खऱ्या देवाची भक्ती करावी व त्यांनी माझा खरा चेहरा पाहावा: मी केवळ इस्रायली लोकांचा देव नाही आणि मी केवळ मुक्तिदाता नाही; मी आकाश, पृथ्वी व समुद्र या सर्व ठिकाणच्या प्राणीमात्रांचा देव आहे.

जर तारणहार शेवटच्या दिवसांत आला आणि तरीही त्याला येशू म्हटले गेले व त्याने पुन्हा एकदा यहूदीयात जन्म घेतला आणि तेथे त्याचे कार्य केले, तर हे सिद्ध होईल, की मी केवळ इस्रायली लोकांची निर्मिती केली व केवळ इस्रायली लोकांची सुटका केली आणि माझे परराष्ट्रीयांशी काहीही देणेघेणे नाही. “आकाश व पृथ्वी आणि सर्व गोष्टी निर्माण करणारा मी प्रभू आहे” हा माझ्याच शब्दांचा विरोधाभास होणार नाही का? मी यहुदिया सोडले व परराष्ट्रीयांमध्ये माझे कार्य केले कारण मी केवळ इस्रायली लोकांचा देव नाही, तर सर्व प्राणीमात्रांचा देव आहे. मी शेवटच्या दिवसांत परराष्ट्रीयांमध्ये दर्शन देतो, कारण मी केवळ यहोवा, म्हणजेच इस्रायली लोकांचा देव नाही, तर यासोबतच, मी परराष्ट्रीयांमध्ये माझ्या निवडलेल्या सर्वांचा निर्माणकर्ता आहे. मी केवळ इस्रायल, इजिप्त आणि लेबनॉन निर्माण केलेले नाही, तर इस्रायलच्या पलीकडे सर्व परराष्ट्रेदेखील निर्माण केली. यामुळे, मी सर्व प्राणीमात्रांचा प्रभू आहे. मी केवळ माझ्या कार्यासाठी प्रारंभ बिंदू म्हणून इस्रायलचा वापर केला, यहूदीया व गालील यांना माझ्या सुटकेच्या कार्याचे किल्ले म्हणून नियुक्त केले आणि आता मी परराष्ट्रांचा तळ म्हणून वापर करतो, जिथून मी संपूर्ण युगाचा शेवट करेन. मी इस्रायलमध्ये दोन टप्प्यांमध्ये कार्य केले (कार्याचे हे दोन टप्पे म्हणजे नियमशास्त्राचे युग व कृपेचे युग) आणि मी कार्याचे आणखी दोन टप्पे (कृपेचे युग व राज्याचे युग) इस्रायलच्या बाहेरील भूमीवर पार पाडत आहे. परराष्ट्रांमध्ये, मी विजयाचे कार्य करेन आणि म्हणून युगाची समाप्ती करेन. जर मनुष्य सदैव मला येशू ख्रिस्त म्हणत असेल, परंतु शेवटच्या दिवसांत मी नवीन युग सुरू केले आहे व नवीन कार्य हाती घेतले आहे हे त्याला माहीत नसेल आणि जर मनुष्य तारणहार येशूच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत राहिला असेल, तर मी अशा लोकांना माझ्यावर विश्वास न ठेवणारे लोक म्हणेन; ते असे लोक आहेत जे मला ओळखत नाहीत व त्यांचा माझ्यावरचा विश्वास खोटा आहे. असे लोक तारणहार येशूच्या स्वर्गातून होणाऱ्या आगमनाचे साक्षीदार होऊ शकतात का? ते माझ्या आगमनाची नव्हे, तर यहुद्यांच्या राजाच्या आगमनाची वाट पाहतात. या अशुद्ध जुन्या जगाचा नाश करावा, यासाठी ते माझ्यासाठी तळमळत नाहीत, तर उलट येशूच्या दुसऱ्या आगमनाची इच्छा बाळगतात, ज्यानंतर त्यांची सुटका होईल. या अशुद्ध आणि अनीतिमान भूमीतून सर्व मनुष्यजातीची पुन्हा एकदा येशूने सुटका करावी, याकडे ते डोळे लावून बसतात. असे लोक शेवटच्या दिवसांत माझे कार्य पूर्ण करणारे कसे बनतील? मनुष्याच्या इच्छा माझ्या इच्छा पूर्ण करण्यास किंवा माझे कार्य पूर्ण करण्यास असमर्थ आहेत, कारण मनुष्य केवळ मी पूर्वी केलेल्या कामाची प्रशंसा करतो किंवा त्याची कदर करतो व त्याला कल्पना नसते, की मी स्वतः देवच आहे जो सदैव नवीन नसतो आणि कधीही जुना नसतो. मानुष्याला केवळ मी यहोवा व येशू आहे हे माहीत असते आणि मनुष्यजातीला संपवणारा शेवटच्या दिवसांपैकी मी एक आहे याची त्याला कल्पना नसते. मनुष्य ज्यासाठी तळमळतो व जे जाणतो, ते सर्व त्यांच्या स्वतःच्या धारणांमधून येते आणि केवळ तेच ते त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकतात. हे मी करत असलेल्या कार्याशी सुसंगत नाही, तर त्याच्याशी विसंगत आहे. जर माझे कार्य मनुष्याच्या कल्पनांनुसार चालले असेल, तर ते कधी संपेल? मनुष्यजात विश्रांतीमध्ये कधी प्रवेश करेल? व मी सातव्या दिवसात, शब्बाथमध्ये कसा प्रवेश करू शकेन? मी माझ्या योजनेनुसार आणि माझ्या उद्देशानुसार कार्य करतो—मनुष्याच्या हेतूनुसार नाही.

मागील:  देह असलेली कोणतीही व्यक्ती क्रोधाच्या दिवसापासून सुटू शकत नाही

पुढील:  सुवार्ता पसरवण्याचे काम हे माणसाला वाचवण्याचे काम देखील आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger