तुमचा देवावर विश्वास असल्यामुळे तू सत्यासाठी जगलेच पाहिजेस

सर्व लोकांमध्ये अस्तित्वात असलेली सर्वसाधारण समस्या म्हणजे त्यांना सत्य समजते पण ते प्रत्यक्ष आचरणात आणणे जमत नाही. याचे कारण असे, की एका बाजूला त्याची किंमत मोजण्याची त्यांची तयारी नसते आणि दुसऱ्या बाजूला, त्यांची विवेकबुद्धी अगदीच अपुरी असते; ते जे काय आहेत त्यासाठी दैनंदिन जीवनाच्या बऱ्याच अडचणी पाहण्यास ते असमर्थ असतात व योग्यरीत्या आचरण कसे करावे हे त्यांना माहीत नसते. कारण लोकांचे अनुभव फारच उथळ असतात, त्यांची कुवत अतीसामान्य असते आणि त्यांची सत्याची समज मर्यादित असते, त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना सामोरे जावे लागते त्या समस्या सोडवण्याचा कोणताही मार्ग त्यांच्याकडे नसतो. त्यांचा देवावरील विश्वास केवळ तोंडी असतो व देवाला त्यांच्या दैनंदिन जीवनांमध्ये आणण्याची त्यांची क्षमताच नसते. म्हणजेच, देव हा देव आहे, जीवन हे जीवन आहे आणि ते असे आहे की त्यांच्या जीवनांमध्ये देवाशी जणू काही संबंधच नसतो. प्रत्येकजण हा असाच विचार करतो. अशा प्रकारे देवावर विश्वास ठेवण्याने त्याच्याकडून प्रत्यक्षात लोकांना काही लाभ होणार नाही किंवा परिपूर्ण बनवले जाणार नाही. खरे म्हणजे, देवाच्या वचनाला संपूर्ण अभिव्यक्ती मिळाली नाही असे नाही, तर उलट त्याचे वचन प्राप्त करण्याची लोकांची क्षमता फारच अपुरी आहे, एखादी व्यक्ती असे म्हणू शकते, की देवाच्या मूळ हेतूंनुसार जवळजवळ कोणीही कृती करत नाही; त्याऐवजी त्यांची देवावरील श्रद्धाही, त्यांच्या स्वतःच्या हेतूंनुसार, भूतकाळात त्यांनी बाळगलेल्या धार्मिक धारणांनुसार व त्यांच्या स्वतःच्या जीवनशैलीनुसार असते. देवाचे वचन स्वीकारून आमुलाग्र बदल झालेले आणि त्याच्या इच्छेनुरुप कृती करण्यास सरुवात करणारे लोक थोडेसेच असतात. त्याऐवजी, ते त्यांच्या चुकीच्या विश्वासांना चिकटून राहतात. जेव्हा लोक देवावर विश्वास ठेवायला सुरूवात करतात, तेव्हा ते धर्माच्या रूढ नियमांवर आधारुन विश्वास ठेवतात व त्यांची जगण्याची रीत व इतरांबरोबरचा व्यवहार संपूर्णतः स्वतःच्या जीवन तत्वज्ञानावर आधारित असतो. एखादी व्यक्ती असे म्हणू शकते, की प्रत्येक दहापैकी नऊ जणांची स्थिती अशी असते. देवावर विश्वास ठेवायला सुरूवात केल्यानंतर वेगळीच योजना आखणारे आणि एक नवीनच पान उघडणारे फार थोडे असतात. मानवजात देवाचे वचन सत्य मानण्यात किंवा ते सत्य मानून ते आचरणात आणण्यात अपयशी ठरली आहे.

उदाहरणार्थ, येशूवरची श्रद्धा घ्या. कोणीतरी नुकताच विश्वास ठेवायला सुरूवात केलेली असो किंवा प्रदीर्घ काळापर्यंत विश्वास ठेवलेला असो, सर्वजण केवळ त्यांच्याकडे असलेल्या प्रतिभा उपयोगात आणतात आणि त्यांच्याजवळ जी काही कौशल्ये असतील ती प्रदर्शित करतात. लोकांनी त्यांच्या नेहमीच्या आयुष्यात फक्त “देवावरची श्रद्धा” हे शब्द जोडले आहेत, मात्र त्यांच्या प्रवृत्तीमध्ये तिळमात्र बदल केला नाही व त्यांच्या देवावरच्या श्रद्धेत किंचितही वाढ झाली नाही. त्यांचा पाठपुरावा निकाराचाही नव्हता आणि धीमाही नव्हता. ते त्यांची श्रद्धा सोडून देणार असेही म्हणाले नाहीत, पण देवाला संपूर्णपणे समर्पितही झाले नाहीत. त्यांनी कधीही देवावर खरोखर प्रेम केले नाही किंवा त्याची आज्ञाही पाळली नाही. त्यांची देवावरची श्रद्धा अस्सल व बनावट यांचे मिश्रण होती, एक डोळा उघडा व एक डोळा बंद अशा प्रकारे ते देवाला सामोरे गेले व श्रद्धेनुसार आचरण करण्यात ते प्रामाणिक नव्हते. ते नेहमीच अशा गोंधळाच्या स्थितीत होते आणि सरतेशेवटी या गोंधळलेल्या अवस्थेतच त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्याचा मुद्दा काय आहे? आज, व्यावहारिक देवावर विश्वास ठेवण्यासाठी, तुम्ही योग्य मार्गावर पाऊल टाकलेच पाहिजे. जर तुमचा देवावर विश्वास असेल, तर तुम्ही त्याचे आशिर्वाद घेतले पाहिजेत तसेच देवावर प्रेम केले पाहिजे व त्याला जाणून घेतले पाहिजे. त्याच्या ज्ञानप्राप्तीतून, तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक शोधकार्यामधून, तुम्ही त्याच्या वचनाचे सेवन व प्राशन करू शकता, देवाची खरीखुरी समज विकसित करु शकता आणि देवावर तुमच्या हृदयाच्या तळातून उमलून येणारे खरेखुरे प्रेम करु शकता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा तुझे देवासाठीचे प्रेम खरेखुरे असेल व तुझे त्याच्यावरचे प्रेम कोणी नष्ट करू शकत नसेल किंवा तुझ्या आणि त्याच्या प्रेमाच्या मार्गात कोणी आडवे येऊ शकत नसेल, तेव्हा त्यावेळी तू देवावरच्या तुमच्या विश्वासाबाबत योग्य मार्गावर आहेस. यावरुन सिद्ध होते, की तू देवाचा आहेस, कारण तुझे हृदय आधीच देवाच्या ताब्यात आहे व इतर कोणतीही गोष्ट मग तुझा ताबा घेऊ शकत नाही. तुझ्या अनुभवामधून, तू मोजलेल्या किंमतीतून आणि देवाच्या कार्यामधून तू देवावर निःसंदिग्ध प्रेम विकसित करू शकत आहेस—व तू असे करतोस, तेव्हा तू सैतानाच्या प्रभावातून मुक्त होतोस व देवाच्या वचनाच्या प्रकाशात जीवन जगतोस. तू जेव्हा अंधाराच्या प्रभावाला भेदतोस फक्त तेव्हाच तुला देव प्राप्त झाला आहे असे म्हणता येईल. तुझ्या देवावरच्या विश्वासाबाबत, तू हे ध्येय गाठण्याचा प्रयत्न केलाच पाहिजेस. तुमच्यापैकी प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे. तुमच्यापैकी कोणीही सध्याच्या स्थितीत समाधानी असता कामा नये. देवाच्या कार्याबद्दल तुमची द्विधा मनःस्थिती असूच शकत नाही किंवा ते महत्त्वाचे नाही असे समजून उडवून लावू शकत नाही. तुम्ही सर्वच बाबतीत आणि सदा सर्वदा देवाचा विचार केला पाहिजे व केवळ त्याच्यासाठीच सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही बोलता किंवा कृती करता, तेव्हा तुम्ही देवाच्या घराच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. केवळ अशा प्रकारेच तुम्ही देवाच्या हृदयात राहू शकता.

देवावरच्या त्यांच्या श्रद्धेत, लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते तोंडाने देवाचे नाव घेण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात देव सर्वथा गैरहजर असतो. सर्व लोक, खरोखर, देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात, तरीही देव त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग नाही. लोक तोंडाने देवाच्या अनेक प्रार्थना म्हणतात, पण त्यांच्या हृदयात देवासाठी थोडीच जागा असते व म्हणून देव त्यांची पुन्हा पुन्हा कसोटी घेतो. याचे कारण असे, की लोक अशुद्ध असल्यामुळे त्यांची कसोटी घेण्याशिवाय देवाला गत्यंतरच नाही, जेणेकरून यामुळे तरी लोकांना लाज वाटेल आणि या कसोटीदरम्यान त्यांना स्वतःची ओळख होईल. असे न घडल्यास, मानवजात ही आद्यदेवदूताची वंशज बनेल व अधिकाधिक भ्रष्ट होत जाईल. देवाच्या निरंतर सुरु असलेल्या शुद्धीकरण प्रक्रियेत, त्यांच्या देवावरच्या श्रद्धेच्या प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तीचे अनेक वैयक्तिक हेतू आणि उद्दिष्टे गळून पडतात. असे न घडल्यास, कोणाचाही वापर करण्याचा कोणताही मार्ग देवाकडे असणार नाही व त्याने लोकांमध्ये केलेच पाहिजे ते कार्य करण्याचा कोणताही मार्ग असणार नाही. देव प्रथम लोकांना शुद्ध करतो आणि या प्रक्रियेमधून, त्यांना स्वतःची ओळख होऊ शकते व देव त्यांचे परिवर्तन करू शकतो. त्याच्यानंतरच, देव त्याचे जीवन त्यांच्यात आणण्याचे कार्य करतो आणि केवळ याच पद्धतीने त्यांची हृदये संपूर्णतः देवाकडे वळवली जाऊ शकतात. व म्हणून मी म्हणतो, की लोक म्हणतात तसा देवावर विश्वास ठेवणे तेवढे सोपे नाही. देव याकडे असे बघतो, जर तुझ्याकडे फक्त ज्ञान आहे आणि त्याचे वचन तू जीवनात आणले नाहीस व जर तू तुझ्या ज्ञानापुरताच मर्यादित असशील, पण जीवनात सत्याचे आचरण करत नसशील किंवा देवाचे वचन मानून जगत नसशील तर मग तो याचा पुरावा आहे, की देवावर प्रेम करणारे हृदयच तुझ्याकडे नाही आणि त्यातून हेच दिसते, की तुझे हृदय देवाचे झालेले नाही. कोणीही देवावर विश्वास ठेवून त्याला जाणून घेऊ शकतो: हे अंतिम ध्येय आहे व मनुष्याच्या पाठपुराव्याचे ध्येय आहे. तू जीवनात देवाच्या वचनांचे आचरण करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजेस, जेणेकरून तुला त्या आचरणाची फळे मिळू शकतील. जर तुझ्याकडे फक्त सैद्धांतिक ज्ञान असेल तर तुझा देवावरील विश्वास शून्य आहे. मग जर तू देवाच्या वचनाचे आचरण केलेस आणि प्रत्यक्ष जीवनात त्यांच्यानुसार जगलास तरीदेखील तुझा विश्वास संपूर्ण असल्याचे व तो देवाच्या इच्छेनुसार असल्याचे मानले जाईल. या मार्गावर, अनेक लोक तोंडाने ज्ञान पाजळू शकतात, पण त्यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या डोळ्याच्या कडा अश्रूंनी डबडबतात आणि संपूर्ण आयुष्य अगदी वृदधापकाळ येईपर्यंत काहीही न करता वेळ वाया घालवल्याबद्दल ते स्वतःचा तिरस्कार करायला लागतात. त्यांना फक्त सिद्धांत समजतात, पण सत्य आचरणात आणू शकत नाही किंवा देवाची साक्ष देऊ शकत नाही; त्याऐवजी ते केवळ इकडेतिकडे धावत राहतात, मधमाशीसारखे व्यस्त राहतात व केवळ मृत्यूच्या उंबरठ्यावर त्यांना अंतिमतः समजते, की त्यांच्याकडे खरी साक्ष नाही आणि त्यांना देवाची अजिबातच ओळख नाही. हा फारच उशीर नव्हे का? तुम्हाला प्रिय असलेल्या सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही आजच्या दिवसाचा उपयोग का करत नाही? उद्यापर्यंत वाट का पाहता? जर जीवन जगत असताना तुम्ही सत्यप्राप्तीकरिता प्रयत्न केला नाही किंवा यातना सहन केल्या नाहीत, तर मग, तुमच्या मृत्यूसमयी तुम्हाला खेद वाटण्याची इच्छा असू शकते का? असे असेल, तर मग देवावर विश्वास का ठेवता? खरे म्हणजे, इतक्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये लोकांनी अगदी थोडेसे जरी कष्ट घेतले, तरीही त्यांना सत्य आचरणात आणता येऊ शकेल व देवाला संतुष्ट करता येऊ शकेल. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांच्या हृदयांवर कायम दुष्टात्म्यांचा ताबा आहे ज्यामुळे त्यांना देवासाठी काही कृती करताच येत नाही व त्यांच्या देहासाठी ते सतत वणवण करतात, पण सरतेशेवटी सर्वच अर्थहीन होते, कशाचा काहीच उपयोग होत नाही. याच कारणास्तव, लोक त्रास आणि अडचणी यांनी सतत गांजलेले असतात. या सर्व सैतानी यातना नाहीत का? हे देहाचे अधःपतन नाही का? तू तोंडातल्या तोंडात पुटपुटून देवाला फसवण्याचा प्रयत्न करू नयेस. उलट, स्पष्ट व निश्चित कृती केलीच पाहिजे. तू स्वतःला फसवू नको—तसे करण्यात काय अर्थ आहे? तुझ्या देहासाठी जगून व लाभ आणि प्रसिद्धीसाठी धडपडून तू काय मिळवू शकणार आहेस?

मागील:  देवाचे कार्य मनुष्याला वाटते तेवढे साधे आहे का?

पुढील:  सात मेघगर्जनांचा घंटानाद—राज्याची सुवार्ता विश्वात सर्वत्र प्रसारित होईल अशी भविष्यवाणी करणे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger