सात मेघगर्जनांचा घंटानाद—राज्याची सुवार्ता विश्वात सर्वत्र प्रसारित होईल अशी भविष्यवाणी करणे
मी माझ्या कार्याचा परराष्ट्रांमध्ये विस्तार करत आहे. माझा गौरव संपूर्ण विश्वावर चमकत आहे; सर्व तारा-तारा-बिंदू-बिंदू प्रकारचे लोक स्वतःमध्ये माझी इच्छा धारण करतात आणि ते सर्व माझ्या हातांच्या निर्देशानुसार चालतात आणि मी दिलेली कार्ये करू लागतात. या क्षणापासून मी एका नव्या युगात प्रवेश केला आहे आणि सर्व लोकांना एका दुसर्या विश्वात आणले आहे. जेव्हा मी माझ्या “स्वभूमी”ला परत आलो, तेव्हा मनुष्याने मला अधिक सखोलपणे जाणून घ्यावे यासाठी मी माझ्या मूळ योजनेतील कार्याच्या अजून एका वेगळ्या भागाची सुरुवात केली. मी संपूर्ण विश्वाचा एकत्रितपणे विचार करतो आणि ते पाहतो, की[अ] ही माझ्या कार्यासाठी योग्य वेळ आहे, म्हणून मी मानवजातीवर माझा नवीन कार्यभाग साध्य करीत सर्वत्र त्वरा करत असतो. सरतेशेवटी, हे नवीन युग आहे आणि नवीन लोकांना अधिक प्रमाणावर नव्या युगात नेण्यासाठी व ज्यांना मी बाहेर काढून टाकणार आहे त्यातील अधिकतर लोकांना दूर करण्यासाठी मी हे नवीन कार्य आरंभले आहे. मोठ्या अग्निवर्ण अजगराच्या देशात मानवजातीला अतर्क्य वाटेल अशा स्थितीपर्यंत मी हे कार्य पूर्ण केले आहे, त्यानंतर ते वार्यावर हिंदकळू लागतील; पुढे, वार्याच्या झोतामुळे अनेकजण हळू हळू दूर जाऊ लागतील. खरोखरच, मी आता स्वच्छ करणार आहे तीच ही, “झोडपणीची जागा” आहे; हीच माझी तीव्र इच्छा आहे आणि तीच माझी योजना आहे. मी काम करत असताना, अनेक दुष्ट लोक आले आहेत, परंतु त्यांना दूर घालवण्याची मला घाई नाही. उलट, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा मी त्यांना दूर करीन. त्यानंतरच माझ्यावर जे खरे प्रेम करतात त्यांना मी अंजीराचे फळ आणि लिलीचा सुगंध देऊन मी जीवनाचा स्रोत होईन. ज्या धुळीने भरलेल्या भूमीत सैतान राहतो, तिथे शुद्ध सोने नसते, फक्त वाळूच असते, अशा परिस्थितीला तोंड देत मी या टप्प्यापर्यंत कार्य करत आहे. तुम्हाला समजायला हवे, की मला जे मिळते ते शुद्ध अस्सल सोने आहे, वाळू नव्हे. ते दुष्ट लोक माझ्या घरात कसे राहू शकतील? माझ्या स्वर्गामध्ये मी त्या शक्तींना परोपजीवी बनून रहायला कशी बरे परवानगी देईन? या अडचणी दूर करण्यासाठी मी प्रत्येक विचारार्ह पद्धतीचा वापर करतो. माझी मनोकामना जाहीर होण्याआधी मी काय करणार आहे याची कुणालाही कल्पना नसते. या संधीचा लाभ घेऊन, मी त्या दुष्ट लोकांना घालवून देतो आणि त्यांना माझ्यासमोरून नाहीसे व्हावे लागते. दुष्ट लोकांबरोबर मी हे असेच करतो, परंतु तरीही, एक दिवस असा येईल की त्यांना माझी सेवा करावी लागेल. मनुष्याला वरदान मिळावे अशी खूप तीव्र इच्छा असते; म्हणून मी माझे शरीर पालटतो आणि माझा गौरवपूर्ण चेहरा परराष्ट्रीयांना दाखवतो, जेणेकरून सर्व लोक आपापल्या जगात राहतील आणि स्वतःचा न्याय करतील व मला जे म्हणायचे असते ती वचने मी म्हणत राहीन आणि मानवजातीला जे हवे ते पुरवीत राहीन. माझ्या कार्या चा विस्तार करून बराच काळ झाल्यावर जेव्हा लोक भानावर येतील, तेव्हा मी माझी इच्छा लोकांपुढे व्यक्त करीन आणि मानवजातीसाठी माझ्या कार्याच्या दुसर्या भागाची सुरुवात करीन; त्यामुळे माझ्या कार्याशी समन्वय साधत सर्व लोक माझे लक्षपूर्वक अनुसरण करतील तसेच, मी करायला हवे ते सर्व कार्य माझ्याबरोबर यथाशक्ती करू शकतील.
माझा गौरव पाहू शकू यावर कुणाचाच विश्वास नाही आणि मी त्यांना तशी सक्ती करणार नाही, पण उलट मानवजातीमधून माझा गौरव काढून घेऊन मी तो दुसर्या जगात नेईन. लोकांना जेव्हा पुन्हा पश्चात्ताप होईल, तेव्हा त्याहूनही अधिक सश्रद्ध लोकांना मी माझा गौरव दाखवीन. मी याच तत्वानुसार कार्य करतो. कारण माझा गौरव कानन मधून निघून जातो ती एक वेळ असते आणि माझा गौरव काही निवडक लोकांना सोडून जातो ती एक वेळ असते. शिवाय, माझा गौरव संपूर्ण पृथ्वीला मंद प्रकाशित करत सोडून जातो आणि पृथ्वी अंधःकारात बुडून जाते ती एक वेळ असते. काननची भूमीदेखील सूर्यप्रकाश बघू शकणार नाही, सर्व लोकांची श्रद्धा संपून जाईल; परंतु कुणालाही काननच्या भूमीचा सुवास सोडून जाणे सहन होणार नाही. मी जेव्हा नवीन स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये प्रवेश करेन, तेव्हाच फक्त मी माझ्या गौरवाचा दुसरा अंश घेऊन प्रथमतः तो काननच्या भूमीत व्यक्त करेन; त्यामुळे गडद अंधारात बुडालेल्या संपूर्ण पृथ्वीवर मिणमिणता प्रकाश चमकू लागेल, ज्यायोगे सर्व पृथ्वी उजळू लागेल; ज्यायोगे पृथ्वीवरील सर्व लोकांना या प्रकाशाच्या शक्तीतून सामर्थ्य प्राप्त होऊ शकेल, माझा गौरव वाढू लागेल आणि प्रत्येक देशाला तो नव्याप्रमाणे भासू लागेल; आणि सर्व मानवजातीला कळेल की मी बर्याच काळापूर्वी मानवी जगात आलो आहे आणि फार काळापूर्वी मी माझा गौरव इस्रायलमधून पूर्वेकडे घेऊन आलो आहे; कारण माझा गौरव पूर्वेकडून चमकत आला आहे व तो कृपेच्या युगापासून आजपर्यंत आणण्यात आला आहे. परंतु मी इस्रायलमधून निघालो होतो आणि मी तिथून पूर्वेकडे आलो आहे. फक्त जेव्हा पूर्वेचा प्रकाश हळू हळू शुभ्र होऊ लागतो, तेव्हा पृथ्वीवरील अंधार उजेडात पालटू लागतो आणि तेव्हाच मानवाला कळते की मी फार पूर्वी इस्रायलमधून निघून गेलो आहे आणि पुन्हा पूर्वेकडे नव्याने उगवत आहे. एकदा इस्रायलमध्ये उतरल्यावर आणि नंतर तिथून निघून गेल्यावर, मला पुन्हा इस्रायलमध्ये जन्म घेणे शक्य नाही, कारण माझे कार्य सगळ्या विश्वाला मार्गदर्शन करत असते आणि, याशिवाय, ही विद्युल्लेखा थेट पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकत जाते. या कारणासाठी मी पूर्वेत अवतरलो आहे आणि पूर्वेकडील लोकांसाठी मी कानन आणले आहे. मी सर्व पृथ्वीवरील लोकांना काननच्या भूमीकडे नेईन आणि म्हणून मी संपूर्ण जगावर नियंत्रण ठेवण्यासाठी काननच्या भूमीमध्ये बोलतच राहीन. या समयी, पृथ्वीवर काननशिवाय दुसरीकडे कुठेच प्रकाश पडलेला नाही आणि सर्व लोक भूक आणि थंडीने पीडित आहेत. मी माझा गौरव इस्रायलला दिला आणि नंतर तो काढून घेतला आणि त्यायोगे मी इस्रायली लोकांना पूर्वेकडे आणले, तसेच सर्व मानवजात पूर्वेकडे आणली. त्या सर्वांनी पुन्हा प्रकाशाशी संलग्न व्हावे व पुन्हा त्याचा शोध घ्यायला लागू नये म्हणून मी त्यांना प्रकाशात आणले आहे; जे कोणी शोध घेत आहेत त्यांना मी तो प्रकाश पुन्हा पाहू देईन आणि माझ्याकडे इस्रायलमध्ये जो गौरव होता तो पाहू देईन; मी त्यांना पाहू देईन की मी फार पूर्वी एका शुभ्र ढगावर स्वार होऊन मानवजातीमध्ये आलो आहे, त्यांना शुभ्र ढग आणि फळांचे अमर्याद समूह पाहू देईन; आणि, त्याशिवाय त्यांना इस्रायलमधील यहोवा देव पाहू देईन. मी त्यांना ज्यू लोकांचा आवडता प्रेषित, त्यांचा स्वामी पाहू देईन आणि अनेक युगांमध्ये अनेक राजांकडून छळ झालेल्या स्थितीतले माझे संपूर्ण रूप पाहू देईन. मी सगळ्या विश्वावर कार्य करत राहीन आणि अखेरच्या दिवसात माझा गौरव आणि माझी कार्ये मानवाला दाखवून देत मी महान कार्य पार पाडेन. जे अनेक वर्षे माझी वाट पाहत आहेत, ज्यांना मी एका शुभ्र ढगावर बसून यावे अशी इच्छा आहे त्यांना आणि मी पुन्हा अवतार घ्यावा अशी कामना बाळगणार्या इस्रायलला आणि माझा छळ करणार्या सर्व मानवजातीला मी माझा गौरवपूर्ण चेहरा दाखवेन, म्हणजे सर्वांना समजेल की मी फार पूर्वी माझा गौरव घेऊन तो पूर्वेकडे आणला आहे आणि आता यापुढे ते यहूदियामध्ये नाही. कारण शेवटचे दिवस आधीच आले आहेत!
मी पूर्ण ब्रह्मांडात माझे कार्य करत आहे आणि पूर्वेकडून असंख्य गर्जना गर्जत आहेत, ज्या सर्व संप्रदाय आणि पंथांना हादरवत आहेत. ही माझी वाणी आहे जिने सर्व मनुष्यांचे वर्तमानात नेतृत्व केले आहे. मी माझ्या वाणीने सर्व मनुष्यांवर विजय प्राप्त करतो, त्यांना प्रवाहात वाहवतो आणि माझ्या समोर प्रस्तुत करतो, कारण फार पूर्वी संपूर्ण पृथ्वीमधून मी माझा गौरव पुन्हा घेऊन त्याला नव्याने पूर्वेला प्रस्तुत केले आहे. कुणाला माझा गौरव पहायला आवडणार नाही? कोण माझ्या परतीची मनापासून वाट पाहत नाही? कोणाला माझ्या पुनरागमनाची तहान लागलेली नाही? कोण माझ्या प्रेमासाठी उत्सुक नसतो? कोणाला प्रकाशाकडे यायचे नसते? कोणाला कनानची समृद्धी पाहायची नाही? कोणाला उद्धारकाच्या पुनरागमनाची इच्छा नसते? ज्याच्याकडे महान सामर्थ्य आहे त्याची भक्ती कोण करत नाही? माझी वाणी सर्व विश्वात पसरू लागेल; मी माझ्या निवडक लोकांसमोर जाईन आणि त्यांच्यासमोर अधिक वचने उच्चारेन. पर्वत आणि नद्यांना हलवून टाकणार्या प्रचंड मेघगर्जनांप्रमाणे मी सर्व जगाला आणि मानवजातीला उद्देशून माझी वचने उच्चारत असतो. म्हणून माझ्या मुखातून निघणारी वचने मानवजातीसाठी एक ठेवा बनली आहेत आणि सर्व लोक माझी वचने उराशी बाळगतात. ही वीज पूर्वेकडून थेट पश्चिमेपर्यंत चमकत जाते. माझी वचने अशी आहेत की मनुष्य ती सोडून द्यायला नाराज असतो आणि त्याच वेळी त्याला ती अथांग वाटत असतात, पण तरीही तो त्यातून अधिकच आनंद प्राप्त करत असतो. सर्व लोक माझ्या आगमनाचे स्वागत करत आनंदात आणि मजेत असतात, जणु काही नवीन बाळ नुकतेच जन्माला आले आहे. मी माझ्या वाणीतून सर्व लोकांना माझ्यापुढे बोलवेन. त्यानंतर, मी अधिकृतपणे मानवजातीत प्रवेश करीन म्हणजे ते माझी पूजा करायला येऊ शकतील. मी प्रसृत करत असलेला गौरव आणि माझ्या मुखातील वचने यातून मी असे काही करेन की सर्व लोक माझ्यासमोर येतील आणि पाहतील की ती विद्युल्लेखा पूर्वेकडून चमकत जात आहे आणि पाहतील की मीसुद्धा पूर्वेकडील जैतूनच्या पर्वतावर अवतरलो आहे. ते पाहतील, की मी बर्याच काळापासून यहूद्यांचा पुत्र म्हणून नव्हे तर पूर्वेकडील तडिताघात म्हणून आधीपासूनच पृथ्वीवर अस्तित्वात आहे, कारण माझा फार पूर्वीच पुनर्जन्म झाला आहे आणि मी मानवजातीतून निघून जाऊन त्या गौरवासह लोकांमध्ये पुन्हा अवतरलो आहे. अनंत युगांपूर्वी ज्याची पूजा होत होती तो मीच आहे आणि अनंत युगांपूर्वी इस्रायली लोकांनी टाकून दिलेले ते अर्भकही मीच आहे. शिवाय, मी सध्याच्या युगातील सर्वात गौरवशाली सर्वशक्तिमान देव आहे! सर्वांनी माझ्या सिंहासनासमोर यावे आणि माझे गौरवशाली स्वरूप पहावे, माझी वाणी ऐकावी आणि माझ्या कार्यांचा आदर करावा. हीच माझी संपूर्ण इच्छा आहे; हीच माझ्या योजनेची सुरुवात, अंत व सर्वोच्च बिंदू आहे, तसेच माझ्या व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे: प्रत्येक देशाने माझी पूजा करावी, प्रत्येक भाषेने माझे अस्तित्व मानावे, प्रत्येक व्यक्तीने माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवावा आणि सर्व लोकांनी माझ्या अधीन व्हावे!
तळटीप:
अ. मूळ मजकुरात “पाहू की” असा शब्दप्रयोग नाही.