जेव्हा गळणारी पाने त्यांच्या मुळांकडे परत येतात, तेव्हा तू केलेल्या सर्व दुष्कृत्यांचा तुला पश्चात्ताप होईल

मी तुमच्यामध्ये केलेले कार्य तुम्ही सर्वांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे, मी जी वचने उच्चारली आहेत ती तुम्ही स्वतः ऐकली आहेत आणि तुम्हा सर्वांना माझी तुमच्याबद्दलची वृत्ती माहीत आहे, म्हणूनच मी तुमच्यामध्ये हे कार्य का करत आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, शेवटच्या दिवसांतील माझ्या विजयाच्या कार्यासाठी तुम्ही फक्त साधने आहात, परराष्ट्रांमध्ये माझ्या कार्याचा विस्तार करण्याची साधने आहात. मी माझ्या कार्याचा अधिक चांगल्या प्रकारे विस्तार करण्यासाठी आणि परराष्ट्रांमध्ये माझ्या नावाचा प्रसार करण्यासाठी, म्हणजेच इस्रायलच्या बाहेरील कोणत्याही राष्ट्रांमध्ये प्रसार करण्यासाठी, तुमची अधार्मिकता, मलिनता, प्रतिकार व बंडखोरपणा यांद्वारे बोलतो. याचे कारण असे आहे, की माझ्या नावाचा, माझ्या कृत्यांचा आणि माझ्या आवाजाचा सर्व परराष्ट्रांमध्ये प्रसार करता येईल व अशा प्रकारे इस्रायलव्यतिरीक्त इतर राष्ट्रांवर मला विजय मिळवता येईल आणि ते माझी उपासना करू शकतील व इस्रायल आणि इजिप्त या देशाबाहेरील माझी पवित्र भूमी बनतील. माझ्या कार्याचा विस्तार करणे म्हणजे खरेतर माझ्या विजयाच्या कार्याचा विस्तार करणे आणि माझ्या पवित्र भूमीचा विस्तार करणे आहे; हे पृथ्वीवर माझ्या भक्कम पायाचा विस्तार करणे आहे. तुम्हाला हे स्पष्टपणे समजले पाहिजे, की मी विजय मिळवलेल्या परराष्ट्रांमध्ये तुम्ही फक्त निर्माण केलेले जीव आहात. मूलतः, तुमचा काही दर्जाही नव्हता किंवा उपयोगासाठी कोणते मूल्यदेखील नव्हते आणि तुम्ही अजिबात उपयुक्त नव्हता. संपूर्ण भूमीवर मी विजय मिळवल्याचा नमुना म्हणून, संपूर्ण भूमीवर मी विजय मिळवल्याचे एकमेव “संदर्भ साहित्य” म्हणून मी शेणाच्या ढिगाऱ्यातून किडे उचलले, ज्यामुळे तुम्हाला माझ्या संपर्कात येण्याचे आणि माझ्याशी संलग्न होण्याचे भाग्य लाभले आहे. तुमच्या कनिष्ठ दर्जामुळेच मी तुम्हाला माझ्या विजयाच्या कार्याचे नमुने आणि आदर्श म्हणून निवडले आहे. केवळ याच कारणासाठी मी तुमच्यामध्ये कार्य करतो व बोलतो आणि तुमच्याबरोबर जगतो व वास्तव्य करतो. तुम्हाला माहीत असले पाहिजे, की हे फक्त माझ्या व्यवस्थापनामुळे आणि शेणाच्या ढिगाऱ्यातल्या किड्यांबद्दल मला असलेल्या प्रचंड तिरस्कारामुळे मी तुमच्यामध्ये बोलत आहे—हे इतके पुढे गेले आहे की माझा संताप होत आहे. तुमच्यामध्ये माझे कार्य हे यहोवाने इस्रायलमध्ये केलेल्या कार्यासारखे नाही आणि विशेषतः, येशूने यहूदीयात केलेल्या कार्यासारखे नाही. मी खूप सहनशीलतेने बोलतो आणि कार्य करतो व रागाने आणि न्यायाने मी या भ्रष्टांवर विजय मिळवतो. हे यहोवाने इस्रायलमध्ये त्याच्या लोकांचे नेतृत्व केल्यासारखे बिलकुल नाही. इस्रायलमधील त्याचे कार्य अन्न आणि जिवंत पाणी देणे हे होते व लोकांसाठी कार्य करत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये भरभरून दया आणि प्रेम होते. ज्या लोकांना निवडलेले नाही अशा लोकांच्या शापित राष्ट्रामध्ये आजचे कार्य केले जाते. तेथे मुबलक अन्न नाही, तहान शमवणाऱ्या जिवंत पाण्याचे पोषण नाही आणि पुरेशा भौतिक वस्तूंचा पुरवठा फारच कमी आहे; तेथे फक्त पुरेसा न्याय, शाप आणि ताडण यांचा पुरवठा आहे. शेणाच्या ढिगाऱ्यात राहणारे हे किडे गुरेढोरे आणि मेंढ्यांनी भरलेले पर्वत, प्रचंड संपत्ती व संपूर्ण भूमीतील सर्वात सुंदर मुले मिळवण्यास पूर्णपणे अयोग्य आहेत, जे मी इस्रायलला दिले आहेत समकालीन इस्रायल वेदीवर गुरेढोरे, मेंढ्या आणि सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण करतात ज्यांनी मी त्यांच्या लोकांचे पालनपोषण करतो, कायद्यानुसार यहोवाला आवश्यक असलेल्या एक दशांशपेक्षा हे जास्त आहे व म्हणून कायद्यानुसार इस्रायलला मिळायला हवे त्याहूनही शंभरपट जास्त मी त्यांना दिले आहे. अब्रामाने आणि इसहाकाने मिळवलेल्या सर्व गोष्टींपेक्षा मी इस्रायलचे पालनपोषण जास्त करतो. मी इस्रायलचे कुटुंब फलद्रूप करेन व वाढवेन आणि मी इस्रायलच्या माझ्या लोकांना संपूर्ण पृथ्वीवर पसरवेन. ज्यांना मी आशीर्वाद देतो आणि ज्यांची मी काळजी घेतो ते अजूनही इस्रायलचे निवडलेले लोक आहेत—म्हणजेच, ते लोक जे मला सर्व काही समर्पित करतात आणि ज्यांनी माझ्याकडून सर्व काही प्राप्त केले आहे. कारण ते मला लक्षात ठेवून त्यांची नवजात वासरे व कोकरे माझ्या पवित्र वेदीवर अर्पण करतात आणि त्यांच्याकडे जे काही आहे ते माझ्यासमोर अर्पण करतात, अगदी माझ्या परत येण्याच्या अपेक्षेने त्यांचे नवजात पहिले मूलदेखील अर्पण करतात. आणि तुम्ही काय करता? तुम्ही माझा क्रोध वाढवता, माझ्याकडे मागणी करता आणि जे लोक मला अर्पणे वाहतात त्यांची अर्पणे चोरता. तुम्ही माझे मन दुखावत आहात हे तुम्हाला माहीत नाही; अशा प्रकारे, तुम्ही फक्त अंधारात रडणे आणि शिक्षा भोगणे प्राप्त करता. तुम्ही माझा राग बर्‍याच वेळा भडकावला आहे व मी माझ्या धगधगत्या अग्नीचा वर्षाव केला आहे, ज्यामुळे काही लोकांचा दुःखद अंत झाला आहे आणि आनंदी घरे उद्ध्वस्त होऊन कबर बनली आहेत. माझ्या हृदयामध्ये या किड्यांसाठी अविरत राग आहे व त्यांना आशीर्वाद देण्याचा माझा कोणताही हेतू नाही. केवळ माझ्या कार्यासाठीच मी अपवाद केला आणि तुमची उन्नती केली व प्रचंड अपमान सहन करून तुमच्यामध्ये कार्य केले. माझ्या पित्याची इच्छा नसती, तर शेणाच्या ढिगाऱ्यात लोळत असलेल्या किड्यांसोबत मी त्याच घरात कसा राहू शकलो असतो? मला तुमच्या सर्व कृती आणि शब्दांबद्दल अत्यंत तिरस्कार वाटतो व तरीही, मला तुमची मलिनता आणि बंडखोरपणामध्ये काही “स्वारस्य” असल्यामुळे, माझ्या वचनांचा हा एक मोठा संग्रह बनला आहे. अन्यथा, मी इतके दिवस तुमच्यामध्ये राहिलो नसतो. म्हणून, तुम्हाला हे समजले पाहिजे, की तुमच्याबद्दलची माझी वृत्ती केवळ सहानुभूती आणि दया आहे; माझे तुमच्यावर तीळमात्र प्रेम नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी फक्त सहनशीलता आहे, कारण मी हे फक्त माझ्या कार्यासाठी करतो. आणि तुम्ही माझी कृत्ये फक्त यासाठी पाहिलीत कारण मी मलिनता व बंडखोरपणा यांना “कच्चा माल” म्हणून निवडले आहे; अन्यथा, मी माझी कृत्ये या किड्यांसमोर कधीच उघड केली नसती. मी तुमच्यामध्ये नाखुशीनेच कार्य करतो, ज्या तत्परतेने आणि इच्छेने मी इस्रायलमध्ये माझे कार्य केले तसे अजिबात करत नाही. तुमच्यामध्ये स्वतःला बोलायला भाग पाडताना मी माझा राग सहन करत आहे. जर हे माझ्या महान कार्यासाठी नसते, तर अशा किड्यांना सतत पाहणे मी कसे सहन करू शकेन? जर हे माझ्या नावासाठी नसते, तर मी फार पूर्वीच सर्वोच्च शिखरावर गेलो असतो आणि त्यांच्या शेणाच्या ढिगाऱ्यांसह या किड्यांना पूर्णपणे भस्मसात केले असते! जर हे माझ्या गौरवासाठी नसते, तर मी या दुष्ट राक्षसांना उघडपणे माझ्या डोळ्यांसमोर डोके हलवून माझा प्रतिकार कसा करू दिला असता? जर माझे कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीतपणे पार पाडायचे नसते, तर मी या किडेसदृश लोकांना माझा अपमान कसा करू दिला असता? जर इस्रायलमधील एका खेडेगावातील शंभर लोक माझा असा प्रतिकार करण्यासाठी उठले, मग जरी त्यांनी माझ्यासाठी त्याग केले तरीही, मी त्यांना नष्ट करेन आणि त्यांना जमिनीतल्या भेगांमध्ये फेकून देईन जेणेकरून, इतर शहरांतील लोक पुन्हा कधीही बंड करणार नाहीत. मी सर्व भस्म करणारा अग्नी आहे व मला पाप सहन होत नाही. कारण सर्व मनुष्यांना मीच निर्माण केले आहे, मी जे काही बोलतो आणि करतो त्याचे पालन त्यांनी केलेच पाहिजे व त्यांनी बंड करू नये. लोकांना माझ्या कार्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आणि माझ्या कार्यात व माझ्या वचनांमध्ये काय योग्य किंवा अयोग्य आहे याचे विश्लेषण करण्यास तर ते मुळीच पात्र नाहीत. मी सृष्टीचा प्रभू आहे आणि मला जे सर्व काही हवे आहे ते सृष्टीतील निर्मितींनी हृदयात आदर बाळगून माझ्यासाठी प्राप्त करावे; त्यांनी माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नये व त्यांनी विशेषतः प्रतिकार करू नये. माझ्या अधिकाराने, मी माझ्या लोकांवर शासन करतो आणि माझ्या निर्मितीचा भाग असलेल्या सर्वांनी माझ्या अधिकाराच्या अधीन राहिले पाहिजे. आज जरी तुम्ही माझ्यासमोर धाडसी आणि गर्विष्ठ आहात, जरी मी तुम्हाला शिकवलेल्या वचनांची तुम्ही अवज्ञा करता व तुम्ही घाबरत नाही, तरी मी तुमच्या बंडखोरपणाच्या बाबतीत फक्त सहनशीलता दर्शवत आहे; शेणाच्या ढिगाऱ्यातील लहान, क्षुल्लक किड्यांनी घाण ढवळून काढली म्हणून मी माझा संयम गमावणार नाही व माझ्या कार्यावर परिणाम होऊ देणार नाही. ज्या गोष्टींची मला किळस वाटते व ज्या गोष्टींचा मला तिरस्कार वाटतो, त्या सर्वांचे अस्तित्व मी केवळ माझ्या पित्याच्या इच्छेसाठी सहन करतो आणि माझे उच्चार पूर्ण होईपर्यंत, माझ्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी तसे करेन. काळजी करू नका! मी एका निनावी किड्याच्या पातळीवर जाऊ शकत नाही व मी माझ्या कौशल्याची तुझ्याशी तुलना करणार नाही. मी तुझा तिरस्कार करतो, पण मी सहन करू शकतो. तू माझी आज्ञा पाळत नाहीस, परंतु ज्या दिवशी मी तुला ताडण करेन त्या दिवसापासून तू सुटू शकत नाहीस, हे वचन माझ्या पित्याने मला दिले होते. निर्माण केलेल्या किड्याची सृष्टीच्या प्रभूशी तुलना होऊ शकते का? शरद ऋतूमध्ये, गळणारी पाने त्यांच्या मुळांकडे परत येतात; तू तुझ्या “पित्याच्या” घरी परत जाशील आणि मी माझ्या पित्याकडे परत येईन. मला त्याच्या प्रेमळ ममतेची साथ मिळेल व तुला तुझ्या पित्याकडून दुःख मिळेल. मला माझ्या पित्याचा महिमा लाभेल आणि तुला तुझी लाज मिळेल. मी बऱ्याच काळापासून तुझ्यासाठी राखून ठेवलेल्या ताडणाचा उपयोग करेन आणि हजारो वर्षांपासून भ्रष्ट झालेल्या तुझ्या नासक्या देहाने तू माझे ताडण भोगशील. मी सहनशीलतेने माझ्या वचनांचे कार्य तुझ्यामध्ये समाप्त केलेले असेल आणि तू माझ्या वचनांमधून संकटे भोगण्याची भूमिका पार पाडण्यास सुरुवात करशील. मला खूप आनंद होईल व मी इस्रायलमध्ये कार्य करेन; तू चिखलात राहून आणि मरून रडशील व दात चावशील. मी माझे मूळ रूप पुन्हा प्राप्त करेन आणि यापुढे तुझ्यासोबत घाणीमध्ये राहणार नाही, तर तू तुझी मूळ कुरूपता परत मिळवून शेणाच्या ढिगाऱ्यात बिळामध्ये राहशील. जेव्हा माझे कार्य आणि वचने पूर्ण होतील, तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल. जेव्हा तुझा प्रतिकार आणि बंडखोरी पूर्ण होईल, तो तुझ्यासाठी रडण्याचा दिवस असेल. मी तुझ्याबद्दल सहानुभूती दाखवणार नाही आणि तू मला पुन्हा कधीही पाहणार नाहीस. मी यापुढे तुझ्याशी संवाद साधणार नाही व तू मला पुन्हा कधीही भेटणार नाहीस. मी तुझ्या बंडखोरीचा तिरस्कार करेन आणि तुला माझ्या प्रेमाची आठवण होईल. मी तुला फटकारेन व तू माझ्यासाठी झुरत राहशील. मी आनंदाने तुझ्यापासून दूर जाईन आणि तुला तुझ्यावर असलेल्या माझ्या ऋणाची जाणीव होईल. मी तुला पुन्हा भेटणार नाही, परंतु तू सदैव माझी वाट पाहशील. तू सध्या मला विरोध करत असल्यामुळे मी तुझा तिरस्कार करेन व तुला माझी आठवण येईल कारण मी तुला सध्या ताडण केलेले आहे. मी तुझ्यासोबत राहण्यास तयार नसेन, परंतु तू तशी तीव्र इच्छा करशील आणि अनंतकाळापर्यंत रडशील, कारण तू माझ्याबाबतीत केलेल्या सर्व गोष्टींचा तुला पश्चात्ताप होईल. तुमच्या बंडखोरीबद्दल व प्रतिकाराबद्दल तुला पश्चात्ताप होईल, तू पश्चात्तापाने जमिनीवर माझ्यासमोर पडशील आणि पुन्हा कधीही माझी अवज्ञा न करण्याची शपथ घेशील. तुझ्या अंतःकरणात मात्र तू फक्त माझ्यावर प्रेम करशील, तरीही तुला माझा आवाज कधीच ऐकू येणार नाही. मी तुला स्वतःचीच लाज वाटायला भाग पाडेन.

आता मी तुझा बेताल देह पाहत आहे जो माझी खुशामत करेल आणि माझ्याकडे तुझ्यासाठी फक्त एक छोटा इशारा आहे, परंतु मी ताडण देऊन तुझी “सेवा” करणार नाही. माझ्या कार्यात तुझी कोणती भूमिका आहे हे तुला कळले पाहिजे, त्याने मी समाधानी होईन. याच्या पलीकडे असलेल्या बाबींमध्ये, जर तू मला विरोध केलास किंवा माझे पैसे खर्च केलेस अथवा माझ्यासाठी, यहोवासाठी दिलेल्या अर्पणांचे सेवन केलेस किंवा तुम्हा किड्यांनी एकमेकांना चावे घेतले अथवा तुम्हा कुत्र्यासारखे भांडलात किंवा एकमेकांवर हात उगारलात—तरी मला त्याची काहीही पर्वा नाही. तुम्ही काय आहात हे फक्त तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, त्याने मी समाधानी होईन. या व्यतिरिक्त, जर तुम्हाला एकमेकांवर शस्त्रांनी वार करायचा असेल किंवा वचनांनी एकमेकांशी लढायचे असेल तर ते ठीक आहे; मला अशा गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही आणि मानवी बाबींमध्ये मी किंचितही गुंतलेला नाही. तुमच्यातील संघर्षांची मला पर्वा नाही असे नाही; तर मी तुमच्यापैकी नाही व म्हणून तुमच्यामध्ये असलेल्या प्रकरणांमध्ये मी भाग घेत नाही. मी स्वतः एक निर्माण केलेला जीव नाही आणि या जगामधील नाही, म्हणून मी लोकांचे गडबडीचे जीवन व त्यांच्यातील गोंधळलेल्या, अयोग्य नातेसंबंधांचा तिरस्कार करतो. मला विशेषतः गोंगाट करणाऱ्या गर्दीचा तिरस्कार वाटतो. तथापि, मला प्रत्येक निर्मितीच्या हृदयातील अशुद्धतेचे सखोल ज्ञान आहे आणि मी तुम्हाला निर्माण करण्यापूर्वी, मला मानवी हृदयात खोलवर असलेल्या अधार्मिकतेबद्दल आधीच माहिती होती व मानवी हृदयातील सर्व फसवणूक आणि कुटिलपणा मला माहीत होता. म्हणून, जरी लोक अधार्मिक गोष्टी करत असल्याच्या कोणत्याही खुणा नसल्या तरीही, मला माहीत आहे, की तुमच्या अंतःकरणात असलेली अधार्मिकता मी निर्माण केलेल्या सर्व गोष्टींच्या समृद्धतेपेक्षा जास्त आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण गर्दीच्या शिखरावर गेला आहे; तुम्ही जनसामान्यांचे पूर्वज बनला आहात. तुम्ही अत्यंत अनियंत्रित आहात आणि तुम्ही सर्व किड्यांमध्ये माथेफिरूपणाने पळत आहात, आरामाची जागा शोधत आहात व तुमच्यापेक्षा लहान असलेल्या किड्यांना खाऊन टाकण्याचा प्रयत्न करत आहात. समुद्राच्या तळाशी बुडालेल्या भुतांनाही मागे टाकून तुमची अंतःकरणे दुर्भावनापूर्ण आणि पापी झालेली आहेत. तुम्ही शेणाच्या तळाशी राहता, वरपासून खालपर्यंतच्या किड्यांना त्रास देऊन त्यांची शांतता भंग करता, थोडा वेळ एकमेकांशी भांडून नंतर शांत होता. तुम्हाला तुमची जागा माहीत नाही, तरीही शेणात तुम्ही एकमेकांशी भांडता. अशा संघर्षातून तुम्हाला काय मिळवता येईल? जर तुमच्या अंतःकरणात माझ्याबद्दल खरोखरच आदर असेल, तर तुम्ही माझ्या पाठीमागे एकमेकांशी कसे भांडू शकता? तुझा दर्जा कितीही उंच असला, तरी तुम्ही शेणातले दुर्गंधीयुक्त किडे नाहीत का? तुम्हाला पंख फुटून कबुतर बनून आकाशात झेपावता येईल का? तुम्ही दुर्गंधीयुक्त किडे माझ्या, यहोवाच्या वेदीवरील अर्पणे चोरता. असे करून, तुझी उद्ध्वस्त झालेली, अयशस्वी प्रतिष्ठा वाचवता येईल का आणि इस्रायलचे निवडलेले लोक बनता येईल का? तुम्ही निर्लज्ज दुष्ट आहात! जे लोक माझा आदर करतात त्यांनी परोपकारी भावनांची अभिव्यक्ती म्हणून वेदीवर माझ्यासाठी ती अर्पणे वाहिली होती. ती माझ्या नियंत्रणासाठी आणि माझ्या वापरासाठी आहेत, मग लोकांनी मला दिलेली छोटी कबुतरे तू माझ्यापासून कशी लुटू शकतोस? तुला यहूदा होण्याची भीती वाटत नाही का? तुझी जमीन रक्ताचे शेत होईल, याची तुला भीती वाटत नाही का? तुम्ही निर्लज्ज आहात! लोकांनी अर्पण केलेली कबुतरे तुझ्यासारख्या किड्यांच्या पोटाचे पालनपोषण करण्यासाठी आहेत असे तुला वाटते का? मी तुला जे दिले तेच मी समाधानी वृत्तीने तुला द्यायला तयार आहे; जे मी तुला दिले नाही ते माझ्या ताब्यात आहे. तू माझी अर्पणे अशी चोरू शकत नाहीस. जो कार्य करतो तो मी आहे, यहोवा—सृष्टीचा प्रभू—आणि लोक माझ्यासाठी अर्पणे वाहतात. तू करत असलेल्या सर्व धावपळीची ही भरपाई आहे असे तुला वाटते का? तू खरोखरच निर्लज्ज आहेस! तू कोणासाठी धावतोस? ते स्वतःसाठीच नाही का? तू माझी अर्पणे का चोरतोस? तू माझ्या पैशाच्या पिशवीतून पैसे का चोरतोस? तुम्ही यहूदा इस्कर्योतचा पुत्र नाहीस का? मला, यहोवाला वाहिलेली अर्पणे धर्मोपदेशकांनी उपभोगायची आहेत. तू धर्मोपदेशक आहेस का? तू माझी अर्पणे खाण्याचे धाडस करतोस आणि ते टेबलवरदेखील ठेवतोस; तुझी काहीच किंमत नाही! तू लायकी नसलेली दुष्ट व्यक्ती आहेस! माझा अग्नी, यहोवाचा अग्नी, तुला जाळून टाकेल!

मागील:  श्रद्धेविषयी तुला काय माहीत आहे?

पुढील:  देह असलेली कोणतीही व्यक्ती क्रोधाच्या दिवसापासून सुटू शकत नाही

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger