देह असलेली कोणतीही व्यक्ती क्रोधाच्या दिवसापासून सुटू शकत नाही

आज, माझे कार्य सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आणि सर्व देशांमधील व राष्ट्रांमधील लोकांसाठी माझी वचने, अधिकार, गौरव आणि न्याय प्रकट करणारे माझे प्रारंभिक कार्य संपूर्ण विश्वात अधिक योग्य व परिपूर्णपणे पार पाडण्यासाठी, तुमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी मी तुम्हाला असा सल्ला देत आहे. मी तुमच्यामध्ये केलेले कार्य म्हणजे संपूर्ण विश्वात माझ्या कार्याची सुरुवात आहे. जरी आता शेवटच्या दिवसांची वेळ आली असली तरी, हे जाणून घ्या, की “शेवटचे दिवस” हे केवळ एका युगाचे नाव आहे; कायद्याचे युग आणि कृपेचे युग यांप्रमाणे ते एका युगाचा संदर्भ देते व ते अंतिम काही वर्षे किंवा महिन्यांऐवजी संपूर्ण युग दर्शवते. तरीही शेवटचे दिवस कृपेचे युग आणि कायद्याचे युग यांच्यापेक्षा वेगळे आहेत. शेवटच्या दिवसांचे कार्य इस्रायलमध्ये नाही तर परराष्ट्रांमध्ये केले जाते; इस्रायलच्या बाहेरील सर्व राष्ट्रे आणि जमातींमधील लोकांवर माझ्या सिंहासनासमोरील हा विजय आहे जेणेकरून, संपूर्ण विश्वातील माझा गौरव ब्रह्मांड व संपूर्ण आकाशात भरू शकेल. हे मला अधिक गौरव प्राप्त होण्यासाठी आहे जेणेकरून, पृथ्वीवरील सर्व जीव माझा गौरव प्रत्येक राष्ट्रापर्यंत, पिढ्यानुपिढ्या पुढे नेऊ शकतील आणि स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व जीव मला पृथ्वीवर मिळालेला गौरव पाहू शकतील. शेवटच्या दिवसांत केलेले कार्य म्हणजे विजयाचे कार्य आहे. हे पृथ्वीवरील सर्व लोकांच्या जीवनासाठी मार्गदर्शन नाही, तर पृथ्वीवरील मानवजातीच्या अविनाशी, सहस्राब्दी-प्रदीर्घ दुःखाच्या जीवनाचा शेवट आहे. परिणामी, शेवटच्या दिवसांचे कार्य इस्रायलमधील हजारो वर्षांच्या कार्यासारखे असू शकत नाही किंवा ते यहूदीयातील केवळ काही वर्षांच्या कार्यासारखे असू शकत नाही जे देवाच्या दुसर्‍या अवतारापर्यंत दोन सहस्र वर्षे सुरू होते. शेवटच्या दिवसांतील लोक केवळ उद्धारकाच्या देहातील पुनरागमनाला सामोरे जातात आणि त्यांना देवाचे वैयक्तिक कार्य व वचने प्राप्त होतात. शेवटचे दिवस संपण्यास दोन हजार वर्षे लागणार नाहीत; येशूने यहूदीयात केलेल्या कृपेच्या युगाचे कार्याप्रमाणे ते संक्षिप्त आहेत. याचे कारण असे, की शेवटचे दिवस संपूर्ण युगाचा समारोप आहेत. ते देवाच्या सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेची पूर्णता आणि समाप्ती आहेत व ते मानवजातीच्या दुःखद जीवन प्रवासाचा शेवट करतात. ते संपूर्ण मानवजातीला नवीन युगात घेऊन जात नाहीत किंवा मानवजातीचे जीवन पुढे सुरू ठेवू देत नाहीत; त्यामुळे माझ्या व्यवस्थापन योजनेचे किंवा मनुष्याच्या अस्तित्वाचे काहीही महत्त्व उरणार नाही. जर मानवजातीने असेच पुढे सुरू ठेवले, तर कधी ना कधी सैतान त्यांना पूर्णपणे गिळंकृत करेल आणि जे माझ्या मालकीचे आत्मे आहेत त्यांना शेवटी सैतान मारून टाकेल. माझे कार्य सहा हजार वर्षे टिकते व मी वचन दिले होते, की संपूर्ण मानवजातीवर दुष्ट व्यक्तीचे नियंत्रण सहा हजार वर्षांहून अधिक काळ टिकणार नाही. तर, आता वेळ संपली आहे. मी हे पुढे सुरू ठेवणार नाही किंवा आणखी उशीरदेखील करणार नाही: शेवटच्या दिवसांत मी सैतानाचा पराभव करेन, मी माझा सर्व गौरव परत घेईन आणि मी पृथ्वीवरील माझ्या मालकीचे सर्व आत्मे परत प्राप्त करेन जेणेकरून, हे त्रासलेले आत्मे दुःखाच्या सागरातून सुटू शकतील व अशा प्रकारे पृथ्वीवरील माझे संपूर्ण कार्य पूर्ण होईल. या दिवसापासून, मी पुन्हा कधीही पृथ्वीवर देह धारण करणार नाही आणि माझा सर्व नियंत्रक आत्मा पृथ्वीवर पुन्हा कधीही कार्य करणार नाही. मी पृथ्वीवर फक्त एकच गोष्ट करेन: मी मानवजातीची पुनर्निर्मिती करेन, अशी मानवजाती जी पवित्र आहे व जे पृथ्वीवरील माझ्यावर श्रद्धा असणारे शहर आहे. परंतु हे जाणून घ्या, की मी संपूर्ण जगाचा नाश करणार नाही आणि संपूर्ण मानवजातीचाही नाश करणार नाही. मी तो उरलेला तिसरा ठेवेन—ज्या तिसऱ्याचे माझ्यावर प्रेम आहे व त्याच्यावर मी पूर्णपणे विजय मिळवला आहे आणि इस्रायलच्या लोकांनी जसे कायद्यांतर्गत केले तसे मी या तिसऱ्याला फलदायी बनवेन व पृथ्वीवर वृद्धिंगत करेन, त्याला भरपूर मेंढ्या आणि गुरेढोरे व पृथ्वीवरील सर्व संपत्ती देऊन त्याचे पालनपोषण करेन. ही मानवजात माझ्यासोबत कायमची राहील, तरीही ती आजची मलीन ओंगळवाणी मानवजात नसेल, तर ती अशी मानवजात असेल ज्यांमध्ये मी प्राप्त केलेल्या सर्व लोकांचा समूह असेल. अशा मानवजातीचे सैतानाकडून नुकसान होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही किंवा सैतान त्यांना घेरणार नाही आणि मी सैतानावर विजय मिळवल्यानंतर पृथ्वीवर अस्तित्वात असलेली ही एकमेव मानवजात असेल. ही अशी मानवजात आहे ज्यावर आज मी विजय मिळवला आहे व ज्यांनी माझे वचन प्राप्त केले आहे. आणि म्हणूनच, शेवटच्या दिवसांत ज्या मानवजातीवर विजय मिळवला गेला आहे ही तीच मानवजात आहे, जिला वाचवले जाईल व माझे चिरस्थायी आशीर्वाद प्राप्त होतील. सैतानावर माझ्या विजयाचा हा एकमेव पुरावा असेल आणि सैतानाशी झालेल्या माझ्या लढाईची ही एकमेव लूट असेल. युद्धातील ही लूट मी सैतानाच्या हुकूमतीतून वाचवली आहे आणि ती माझ्या सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेचे एकमेव स्फटिकीकरण व फळ आहे. ते प्रत्येक राष्ट्र व संप्रदायातून, संपूर्ण विश्वातील प्रत्येक ठिकाण आणि देशातून आले आहेत. ते वेगवेगळ्या वंशांचे आहेत, त्यांच्या भाषा, रीतिरिवाज व त्वचेचे रंग भिन्न आहेत आणि ते जगातील प्रत्येक राष्ट्र व संप्रदाय आणि अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. अखेरीस, ते एकत्र येऊन संपूर्ण मानवजातीची निर्मिती करतील, असा समूह ज्यांपर्यंत सैतानाचा प्रभाव पोहोचू शकणार नाही. मानवजातीमधील ज्यांचे तारण झाले नाही आणि ज्यांच्यावर मी विजय मिळवला नाही ते समुद्रात खोलवर शांतपणे बुडतील व अनंतकाळासाठी माझ्या ज्वालेमध्ये जळतील. मी या जुन्या, अत्यंत ओंगळवाण्या मानवजातीचा नाश करेन, ज्याप्रमाणे मी इजिप्तच्या प्रथम जन्मलेल्या पुत्रांचा आणि गुरांचा नायनाट केला, फक्त इस्रायली लोकांना सोडले, ज्यांनी कोकराचे मांस खाल्ले, कोकराचे रक्त प्राशन केले व त्यांच्या दारावर कोकराच्या रक्ताने चिन्हांकित केले. माझा अंश असलेल्या कोकराचे मांस खाणारे लोक आणि त्याचे रक्त पिणारे लोक व मी उद्धार केलेले आणि माझी पूजा करणारे लोक हे मी विजय मिळवलेले व माझ्या कुटुंबातील लोक नाहीत का? अशा लोकांना नेहमी माझ्या गौरवाची साथ नसते का? माझा अंश असलेल्या कोकराचे मांस न खाणारे लोक आधीच शांतपणे समुद्राच्या खोल पाण्यात बुडाले नाहीत का? आज तुम्ही मला विरोध करता आणि आज माझी वचने यहोवाने इस्रायलच्या पुत्रांना व नातवांना सांगितल्याप्रमाणेच आहेत. तरीही तुमच्या अंतःकरणातील कठोरपणामुळे माझा क्रोध वाढत आहे, ज्यामुळे तुमच्या देहावर अधिक दुःख, तुमच्या पापांवर अधिक न्याय व तुमच्या अधार्मिकतेवर अधिक क्रोध निर्माण होत आहे. जर तुम्ही आज माझ्याशी असे वागणार असाल, तर माझ्या क्रोधाच्या दिवशी कोणाला वाचवले जाईल का? माझ्या ताडणाच्या नजरेतून कोणाची अधार्मिकता सुटू शकेल का? कोणाची पापे माझ्या, सर्वशक्तिमानाच्या हातातून सुटू शकतात? माझ्या, सर्वशक्तिमानाच्या न्यायापासून कोणाची अवहेलना सुटू शकते? मी, यहोवा, तुमच्याशी, परराष्ट्रीय कुटुंबातील वंशजांशी जसे बोलतो आणि मी तुम्हाला जी वचने सांगतो ती कायद्याच्या युगाच्या आणि कृपेच्या युगाच्या सर्व उच्चारांपेक्षा श्रेष्ठ आहेत, तरीही तुम्ही इजिप्तच्या सर्व लोकांपेक्षा कठोर आहात. मी माझे कार्य निश्चिंतपणे करत असताना तुम्ही माझा क्रोध वाढवत नाही का? माझ्या, सर्वशक्तिमानाच्या दिवसापासून तुम्ही कोणत्याही शिक्षेशिवाय कसे सुटू शकता?

मी तुमच्यामध्ये अशा प्रकारे कार्य केले आहे आणि बोललो आहे, मी खूप कार्यशक्ती व मेहनत खर्च केली आहे, तरीही मी तुम्हाला जे स्पष्टपणे सांगतो ते तुम्ही कधी ऐकले आहे का? मला सर्वशक्तिमान देवाला, तुम्ही कुठे नमन केले आहे? तुम्ही माझ्याशी असे का वागता? तुम्ही जे काही बोलता आणि करता त्यामुळे माझा राग का उत्तेजित होतो? तुमची अंतःकरणे इतकी कठोर का आहेत? मी तुम्हाला कधी मारले आहे का? तुम्ही मला नेहमी दुःखी आणि चिंताग्रस्त का करता? तुम्ही माझ्या, यहोवाच्या क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्याची वाट पाहत आहात का? तुमच्या आज्ञाभंगामुळे निर्माण झालेला राग मी पुढे पाठवण्याची तुम्ही वाट पाहत आहात का? मी केलेले सर्व काही तुमच्यासाठी नाहीये का? तरीही, तुम्ही नेहमी माझ्याशी, यहोवाशी अशा प्रकारे वागला आहात: माझे त्याग चोरले, शावकांना आणि त्यांच्या शावकांना चारण्यासाठी माझ्या वेदीचे अर्पण लांडग्याच्या गुहेत नेले; लोक रागीट नजरेने आणि तलवारी व भाल्याने माझी, सर्वशक्तिमानाची वचने मलमूत्रानुसार मलीन बनण्यासाठी शौचालयात टाकून एकमेकांशी भांडतात. तुमचा प्रामाणिकपणा कुठे आहे? तुमची माणुसकी जनावरासारखी झाली आहे! तुमची अंतःकरणे फार पूर्वीपासून दगडासारखी बनली आहेत. माझ्या क्रोधाचा दिवस येईल तेव्हा तुम्ही माझ्याविरुद्ध, सर्वशक्तिमानाविरुद्ध केलेल्या दुष्कृत्यांचा मी न्याय करेन, हे तुम्हाला माहीत नाही का? अशा प्रकारे मला मूर्ख बनवून, माझे शब्द चिखलात टाकून आणि ते ऐकून न घेता—माझ्या पाठीमागे असे वागून तुम्ही माझ्या क्रोधित नजरेपासून वाचू शकाल, असे तुम्हाला वाटते का? जेव्हा तुम्ही माझे त्याग चोरले आणि माझ्या मालमत्तेचा लोभ धरला तेव्हा मी, यहोवाने ते पाहिले आहे हे तुम्हाला माहीत नाही का? जेव्हा तुम्ही माझी अर्पणे चोरली, तेव्हा ती अर्पण केल्या जाणाऱ्या वेदीसमोरच तुम्ही ते केले होते, हे तुम्हाला माहीत नाही का? अशा प्रकारे मला फसवण्याइतपत तुम्ही स्वतःला हुशार कसे मानू शकता? तुमच्या भयंकर पापांपासून माझा क्रोध कसा दूर होईल? तुमच्या दुष्कृत्यांपासून माझा संताप कसा ओसरणार? आज तुम्ही केलेले दुष्कृत्य तुमच्यासाठी मार्ग उघडत नाही, तर तुमच्या उद्यासाठी ताडण साठवून ठेवते; हे मला, सर्वशक्तिमानाला, तुम्हाला ताडण करण्यास उद्युक्त करते. तुमची दुष्कृत्ये आणि दुष्ट शब्द माझ्या ताडणापासून कसे सुटतील? तुमची प्रार्थना माझ्या कानापर्यंत कशी पोहोचेल? तुमच्या अधार्मिकतेसाठी मी मार्ग कसा उघडू शकतो? माझी अवहेलना करून तुम्ही केलेली दुष्कृत्ये मी कशी सोडू शकेन? तुमची सापासारखी विषारी जीभ मी कशी कापू शकत नाही? तुम्ही तुमच्या धार्मिकतेसाठी मला हाक मारत नाही, तर त्याऐवजी तुमच्या अधार्मिकतेमुळे माझा क्रोध साठवून ठेवता. मी तुम्हाला माफ कसे करू शकतो? माझ्या, सर्वशक्तिमानाच्या दृष्टीने तुमचे शब्द आणि कृती ओंगळवाण्या आहेत. माझी, सर्वशक्तिमानाची दृष्टी, तुमची अधार्मिकता ही अखंड ताडण म्हणून पाहते. माझे नीतिमान ताडण व न्याय तुमच्यापासून कसा दूर होईल? तुम्ही माझ्याशी असे वागत असल्यामुळे, मला दुःखी आणि क्रोधित करत असल्यामुळे, मी तुम्हाला माझ्या हातून कसे सोडवू व ज्या दिवशी मी, यहोवा, तुम्हाला ताडण आणि शाप देईन त्या दिवसापासून मी तुम्हाला कसे सोडवू शकेन? तुमचे सर्व दुष्ट शब्द व उच्चार माझ्या कानापर्यंत पोचले आहेत, हे तुम्हाला माहीत नाही का? तुमच्या अधार्मिकतेने माझ्या धार्मिकतेच्या पवित्र वस्त्राला आधीच कलंक लावला आहे हे तुम्हाला माहीत नाही का? तुमच्या आज्ञाभंगामुळे माझा तीव्र क्रोध आधीच भडकला आहे हे तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही मला खूप दिवसांपासून क्रोधित सोडले आहे आणि खूप दिवस माझ्या सहनशीलतेची परीक्षा घेतली आहे हे तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही माझ्या देहाचे आधीच नुकसान केले आहे, त्याचा खूप छळ केला आहे हे तुम्हाला माहीत नाही का? मी आत्तापर्यंत सहन केले आहे, पण मी माझा राग सोडला आहे, यापुढे मी तुमच्या बाबतीत सहनशीलता दाखवणार नाही. मी तुमची दुष्कृत्ये पाहिली आहेत आणि माझे रडणे माझ्या पित्याच्या कानापर्यंत आधीच पोहोचले आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? तो तुम्हाला माझ्याशी असे वागण्याची परवानगी कशी देईल? मी तुमच्यामध्ये जे काही कार्य करतो ते तुमच्यासाठी नाही का? तरीसुद्धा, माझ्या, यहोवाच्या कार्यावर तुमच्यापैकी कोणाचे जास्त प्रेम आहे? मी अशक्त असल्यामुळे आणि मी जे दुःख सहन केले आहे त्यामुळे मी माझ्या पित्याच्या इच्छेबाबतीत अश्रद्ध असू शकतो का? तुम्हाला माझे अंतःकरण समजत नाही का? यहोवा जसे तुमच्याशी बोलला तसेच मी तुमच्याशी बोलतो; मी तुमच्यासाठी खूप काही समर्पित केले नाही का? जरी मी माझ्या पित्याच्या कार्यासाठी हे सर्व दुःख सहन करण्यास तयार असलो, तरीही माझ्या दुःखामुळे मी तुमच्यावर आणलेल्या ताडणापासून तुम्ही मुक्त कसे होणार? तुम्ही माझा इतका आनंद घेतलेला नाही का? आज, माझ्या पित्याने मला तुमच्यासाठी पाठवले आहे; माझ्या समृद्ध वचनांमुळे तुम्हाला खूप आनंद होतो, हे तुम्हाला माहीत नाही का? तुमच्या आयुष्यासाठी आणि तुम्ही ज्या गोष्टींचा आनंद घेता त्यासाठी माझे आयुष्य पणाला लागले, हे तुम्हाला माहीत नाही का? माझ्या पित्याने सैतानाशी युद्ध करण्यासाठी माझे जीवन वापरले व त्याने माझे जीवनही तुमच्यासाठी दिले, ज्यामुळे तुम्हाला शंभरपट प्राप्त झाले आणि तुम्हाला अनेक प्रलोभने टाळता आली, हे तुम्हाला माहीत नाही का? माझ्या कार्यामुळेच तुम्हाला अनेक प्रलोभनांपासून व अनेक जहाल ताडणांपासून मुक्तता मिळाली आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? फक्त माझ्यामुळेच माझा पिता तुम्हाला आनंद घेऊ देत आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? तुमच्या अंतःकरणात निष्ठुरपणा वाढल्याप्रमाणे, आज तुम्ही इतके कठोर आणि निर्दयी कसे राहू शकता? आज तुम्ही जी दुष्कृत्ये करता ती मी पृथ्‍वीवरून निघून जाण्यानंतरच्या क्रोधाच्या दिवसापासून कशी सुटू शकतील? जे इतके कठोर आणि निर्दयी आहेत, त्यांना मी यहोवाच्या रागापासून कसे सुटू देऊ शकतो?

भूतकाळाचा विचार करा: माझी नजर तुमच्यावर कधी रागावली आणि माझा आवाज तुमच्याबाबतीत कधी कठोर झाला? मी तुमच्यासोबत कधी वाद घातले? मी तुम्हाला विनाकारण कधी फटकारले? मी तुम्हाला तुमच्या तोंडावर कधी फटकारले? तुम्हाला प्रत्येक मोहापासून वाचवण्यासाठी मी माझ्या पित्याला हाक मारतो, हे माझ्या कार्यासाठी नाही का? तुम्ही माझ्याशी असे का वागता? मी माझ्या अधिकाराचा उपयोग तुमच्या देहाला मारहाण करण्यासाठी कधी केला आहे का? तुम्ही मला अशी परतफेड का करता? माझ्याशी कधी चांगले तर कधी वाईट वागून, तुम्ही चांगलेही नसता किंवा वाईटही नसता व नंतर तुम्ही माझी खुशामत करून माझे मन वळवण्याचा प्रयत्न करता आणि माझ्यापासून गोष्टी लपवता व तुमच्या तोंडामध्ये अधार्मिकतेच्या गोष्टी भरलेल्या आहेत. तुमची जीभ माझ्या आत्म्याला फसवू शकते, असे तुम्हाला वाटते का? तुमची जीभ माझ्या क्रोधापासून वाचू शकेल, असे तुम्हाला वाटते का? तुमची जीभ माझ्या, यहोवाच्या कृत्यांचा न्याय देऊ शकते, असे तुम्हाला वाटते का? मनुष्य ज्याचा न्याय करतो, तोच देव मी आहे का? मी अशा प्रकारे माझी निंदा करण्यासाठी एका लहान किड्याला परवानगी देऊ शकतो का? अशा अवज्ञाकारी पुत्रांना मी माझ्या चिरंतन आशीर्वादांमध्ये कसे स्थान देऊ शकेन? तुमचे शब्द आणि कृती फार पूर्वीच उघड झालेल्या आहेत आणि तुमचा निषेध करत आहेत. जेव्हा मी स्वर्ग पसरवला आणि सर्व गोष्टी निर्माण केल्या, तेव्हा मी कोणत्याही जीवाला त्यांच्या इच्छेनुसार सहभागी होऊ दिले नाही, माझ्या कार्यात व माझ्या व्यवस्थापनात कोणालाही त्याच्या इच्छेनुसार व्यत्यय आणू देणे तर दूरच. मी कोणत्याही मनुष्याला किंवा वस्तूला सहन केले नाही; जे माझ्याशी क्रूरपणे आणि अमानवीय वागतात, त्यांना मी कसे सोडू शकेन? जे माझ्या वचनांविरुद्ध बंड करतात, त्यांना मी कसे माफ करू शकेन? जे माझी आज्ञा मोडतात, त्यांना मी कसे सोडू शकेन? मनुष्याचे नशीब माझ्या, सर्वशक्तिमानाच्या हातात नाही का? तुझ्या अधार्मिकतेला आणि अवज्ञेला मी पवित्र कसे मानू? तुझी पापे माझी पवित्रता कशी अपवित्र करू शकतात? मी अधार्मिकतेच्या अपवित्रतेने अपवित्र होत नाही आणि मी अधार्मिक लोकांनी अर्पण केलेल्या गोष्टींचा आनंद घेत नाही. जर तू माझ्याशी, यहोवाशी एकनिष्ठ असशील, तर तू माझ्या वेदीवरील अर्पणे स्वतःसाठी घेऊ शकतोस का? माझ्या पवित्र नावाची निंदा करण्यासाठी तू तुझ्ये विषारी जिभेचा वापर करू शकतोस का? तू माझ्या वचनांविरुद्ध अशा प्रकारे बंड करू शकतोस का? तू माझा गौरव आणि पवित्र नाव हे दुष्ट सैतानाची सेवा करण्याचे साधन मानू शकतोस का? माझे जीवन पवित्र लोकांच्या आनंदासाठी दिलेले आहे. तुझ्या इच्छेनुसार मी तुला माझ्या आयुष्याशी कसे खेळू देऊ शकतो आणि ते तुमच्यातील संघर्षाचे साधन म्हणून कसे वापरू देऊ शकतो? तुम्ही इतके निर्दयी कसे असू शकता आणि तुम्ही माझ्याशी ज्याप्रकारे वागता त्यामध्ये चांगुलपणा इतका कमी कसा असू शकतो? मी तुमची दुष्कृत्ये या जीवनातील वचनांमध्ये लिहून ठेवली आहेत, हे तुम्हाला माहीत नाही का? जेव्हा मी इजिप्तचे ताडण करतो, तेव्हा तुम्ही क्रोधाच्या दिवसापासून कसे सुटू शकता? अशा प्रकारे वेळोवेळी मी तुम्हाला मला विरोध करण्याची आणि माझा अवमान करण्याची परवानगी कशी देऊ शकतो? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, जेव्हा तो दिवस येईल तेव्हा तुमचे ताडण इजिप्तपेक्षा अधिक असह्य असेल! माझ्या क्रोधाच्या दिवसापासून तुम्ही कसे सुटू शकता? मी तुम्हाला खरे सांगतो: माझी सहनशीलता तुमच्या दुष्कृत्यांसाठी तयार होती आणि तुमच्या ताडणाच्या दिवसासाठी ती अस्तित्वात आहे. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला, की क्रोधाने शिक्षा भोगणारे तुम्हीच नसाल का? सर्व गोष्टी माझ्या, सर्वशक्तिमानाच्या हातात नाहीत का? स्वर्गाच्या खाली मी तुम्हाला माझी आज्ञा मोडण्याची परवानगी कशी देऊ शकेन? तुमचे जीवन खूप कठीण असेल कारण तुम्ही ख्रिस्ताला भेटला आहात, ज्याच्याबद्दल असे म्हटले होते, की तो येईल पण जो कधीही आला नाही. तुम्ही त्याचे शत्रू नाही का? येशू तुमचा मित्र आहे, तरीही तुम्ही ख्रिस्ताचे शत्रू आहात. तुम्ही येशूचे मित्र असूनही, तुमच्या दुष्कृत्यांनी घृणास्पद लोकांची भांडी भरली आहेत हे तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही यहोवाच्या अगदी जवळ असलात तरी, तुमचे दुष्ट शब्द यहोवाच्या कानावर पडले आणि त्याचा क्रोध वाढला, हे तुम्हाला माहीत नाही का? तो तुझ्या जवळ कसा असू शकतो आणि दुष्कृत्यांनी भरलेली तुझी भांडी तो कसा जाळू शकत नाही? तो तुझा शत्रू कसा नसेल?

मागील:  जेव्हा गळणारी पाने त्यांच्या मुळांकडे परत येतात, तेव्हा तू केलेल्या सर्व दुष्कृत्यांचा तुला पश्चात्ताप होईल

पुढील:  तारणहार आधीच “पांढऱ्या मेघा” वर परतला आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger