ख्रिस्त सत्याने न्यायनिवाडा करण्याचे काम करतो
समय समीप आलाय आणि देवाचा दिवस आला असल्याने, सर्वांना त्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळे करणे आणि देवाचा व्यवस्थापनाच्या योजनेचे समापन करणे ही शेवटच्या दिवसांची कामे आहेत. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देवाशी एकनिष्ठ राहणाऱ्या, त्याच्या राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वांना देव स्वत: देवाच्या युगात घेऊन येतो. तरीही खुद्द देवाचे राज्य येण्यापूर्वी, मानवाच्या कर्माचे अवलोकन करणे किंवा मानवाच्या जीवनाची चौकशी करणे, ही काही देवाची कामं नाहीत तर मानवाच्या अवज्ञेचे मूल्यमापन करणे हे काम आहे, कारण त्याच्या सिंहासनासमोर येणाऱ्या प्रत्येकाला देव पवित्र करेल. आजतागायतदेवाच्या पदचिन्हांचे अनुसरण करणारे सर्व देवाच्या सिंहासनासमोर येतात आणि असे असल्याने, अंतिम टप्प्यातील देवाचे काम स्वीकारणारी प्रत्येक व्यक्ती देवाच्या शुद्धीकरणाचे लक्ष्य असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, देवाचे अंतिम टप्प्यातील काम स्वीकारणारी प्रत्येक व्यक्ती देवाच्या न्यायनिर्णयाचेलक्ष्य असते.
गत काळातील देवाच्या घरच्या न्यायाच्या सुरुवातीबद्दल बोलले जाते की, यातील “न्यायनिर्णय” हा शब्द म्हणजे देवाच्या सिंहासनासमोर शेवटच्या दिवशी येणाऱ्या लोकांचा देवाने केलेला न्यायनिर्णय या संदर्भाने येतो. कदाचित अशा प्रकारच्या अलौकिक कल्पनांवर विश्वास ठेवणारेही काही जण असतील की, शेवटच्या दिवशी देव स्वर्गांमध्ये एक भलेमोठे मेज मांडेल व त्यावर पांढरेशुभ्र कापड अंथरेल, अन त्याच्या महान सिंहासनावर बसेल आणि सर्व मानव त्याच्या समोर जमिनीवर गुडघे टेकून असतील, तो प्रत्येक मानवाची पापे उघड करेल आणि ठरवेल की त्यांना स्वर्गात पाठवायचे की, त्यांना खाली आगीच्या आणि गंधकाच्या तळ्यात पाठवायचे. मानवाने काहीही कल्पना केली तरी त्याने काही फरक पडत नाही, त्यामुळे देवाच्या कामाचे सत्त्व बदलू शकत नाही. माणसाची कल्पना म्हणजे त्याच्या विचारांच्या रचनेखेरीजदुसरे काही नाही; त्या मानवाच्या मेंदूतून आल्या आहेत, मानवाने पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींचे तुकडे एकत्रित करून ते निर्माण केले आहे. त्यामुळेच मी म्हणतो, की कितीही बुद्धिमान प्रतिमा तयार केल्या असल्या तरी ती केवळ व्यंगचित्रे आहेत आणि देवाच्या कार्याची योजना बदलण्यास असमर्थ आहेत. अखेर मानव सैतानाने भ्रष्ट केला आहे, मग तो देवाचे विचार कसे काय जाणून घेऊ शकेल? मानवाला देवाचे न्यायनिर्णयाचे कार्य म्हणजे काहीतरी विलक्षण आहे असे वाटते. त्याचा विश्वास आहे की देव खुद्द हे कार्य करत आहे, त्यामुळे हे काम अगदी मोठ्या प्रमाणातच झाले पाहिजे आणि ते मर्त्य मानवाच्या आकलनापलिकडचे असले पाहिजे आणि संपूर्ण स्वर्गात गुंजणारे तसेच पृथ्वीला हादरविणारे असले पाहिजे. असे नसेल तर मग ते देवाच्या न्यायनिर्णयाचे काम कसे असू शकेल बरे? हे न्यायनिर्णयाचे काम असल्याने त्याचा असा विश्वास आहे की काम करत असतांना देव विशेषत: भव्य आणि दिव्य असलाच पाहिजे आणि ज्यांच्या न्याय करण्यात येत आहे ते सर्व साश्रू नयनांनी गुडघ्यावर बसून दयेची भीक मागत असले पाहिजेत. अशी दृष्य नक्कीच नाट्यपूर्ण असतील आणि खूप प्रभावी असतील…. प्रत्येक जण कल्पना करतो की देवाचे न्यायनिर्णयाचे काम विलक्षण असेल. तथापि तुला माहिती आहे का की, देवाने त्याचे माणसांचा न्याय करण्याचे काम फार पूर्वीच सुरू केले आहे, तेव्हा तू तर निद्रावस्थेत पेंगुळलेला होतास? तू जेव्हा विचार करतोस की देवाने अखेर त्याचे न्यायनिर्णयाचे काम औपचारिकपणे सुरू केले आहे तेव्हा तर त्या आधीच देवाची नवीन स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करून झाली असेल? त्यावेळी, कदाचित, नुकताच तुला जीवन म्हणजे काय याचा अर्थ उमगला असेल, मात्र देवाचे शिक्षा करण्याचे निर्दयी कार्य तुला नरकात अधिक गहिऱ्या निद्रेच्या अधीन करून टाकेल. केवळ तेव्हाच अचानकपणे तुला जाणीव होईल की देवाचे न्यायनिर्णयाचे काम आधीच पूर्ण झालेले आहे.
चला, आपला अमूल्य वेळया घृणास्पद आणि तिरस्करणीय विषयावर अधिक बोलूनवाया घालवता कामा नये. त्याऐवजी न्यायनिर्णय कसा तयार होतो त्याबाबत बोलूया. “न्यायनिर्णय” या शब्दाच्या उल्लेखाबरोबर, यहोवाने प्रत्येक प्रदेशातील लोकांना सूचना करण्यासाठी आणि येशूने फारसींना फटकरण्यासाठी उच्चारलेल्या शब्दांचा विचार तुझ्या मनात येईल. ते कितीही कठोर असले तरी हे शब्द म्हणजे मानवाचा देवाने केलेला न्यायनिर्णय नव्हे; ते केवळ विभिन्न परिस्थितीमध्ये देवाने उच्चारलेले शब्द आहेत, म्हणजेच विभिन्न संदर्भामध्ये बोललेले शब्द होत. हे शब्द म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये मानवाचा न्यायनिर्णय करतांना ख्रिस्त बोलले त्या शब्दांसारखे नाहीत. शेवटच्या दिवसांमध्ये मानवाला शिकविण्याकरिता, मानव म्हणजे नेमके काय हे उघड करतांना तसेच मानवाचे शब्द आणि कर्म यांचे बारकाईने विश्लेषण करतांना ख्रिस्ताने विविध सत्यांचा उपयोग केला आहे. या शब्दांमध्ये विविध प्रकारच्या सत्यांचा समावेश आहे जसे की मानवाची कर्तव्ये, मानवाने देवाच्या आज्ञेचे पालन कसे करावे, मानवाने देवाशी कसे एकनिष्ठ राहावे, मानवाने कसे सर्वसाधारणपणे माणूसकीने जगावे, त्याच प्रमाणे देवाची बुद्धिमता आणि देवाची वृत्ती आणि असेच. हे शब्द मानवाचे द्रव्य आणि त्याची भ्रष्ट वृत्ती याकडे निर्देशित आहेत. विशेषत: हे सर्व शब्द मानव कशा प्रकारे देवाला झिडकारतो आणि मानव कशाप्रकारे सैतानाचे स्वरुप आहे आणि देवाच्या विरुद्ध शक्ती आहे, हे उघड करण्याच्या संदर्भात आहे. त्याचे न्यायनिर्णयाचे कार्य करत असताना, देव केवळ काही शब्दांमध्ये मानवाचे स्वरूप स्पष्ट करत नाही; वाईट वृत्ती आणि अप्रिय व्यक्तींना तो उघड करतो, हाताळतो. या सर्व उघड करणे, हाताळणे आणि छाटण्याच्या विभिन्न पद्धती, हे सामान्य शब्दांनी बदलता येते नाहीत, परंतु या सत्यापासून मानव पूर्णपणे वंचित आहे. केवळ अशा प्रकारच्या पद्धतीलाच न्यायनिर्णय म्हणता येईल; केवळ अशाप्रकारच्या न्यायनिर्णयानेच मानवाला वठणीवरआणणे शक्य होईल आणि देवाबद्दल पूर्ण खातरजमा करता येईल आणि इतकेच नाही तर देवाचे खरे ज्ञान प्राप्त होऊ शकेल. न्यायाच्या कामाने काय होते तर मानवाला देवाच्या खऱ्या स्वरुपाबद्दल आणि त्याच्या स्वत:च्या बंडखोरीबाबतचे सत्य समजते. न्यायनिर्णयाच्या कामाने मानवाला देवाची इच्छा, देवकार्याचा हेतू आणि त्याला अगम्य असलेली गुपिते याबद्दल अधिक समज प्राप्त करून घेता येते. याच बरोबर यामुळे मानवाला त्याचे भ्रष्ट स्वरुप आणि त्याच्या भ्रष्ट वृत्तीची पाळमुळं तसे मानवाचे कुरुपत्व शोधण्यास देखील मदत होते. हे सर्व परिणाम न्यायनिवाड्याच्या कामामुळे होतात, देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना देवाच्या जीवनाचा मार्ग आणि सत्य उघड करून सांगणे, हे या कामाचे सत्व आहे. हे काम म्हणजे देवाने केलेले न्यायनिर्णयाचे काम आहे. तू जर हे सत्य महत्त्वाचे वाटत नसेल, तू केवळ हे कसे टाळायचे याचाच विचार करत असशील किंवा त्यांचा समावेश नसलेला नवीन मार्ग कसा शोधायचा याचाच विचार करत असशील, तर मी म्हणेन की तू एकदम महापापी आहेस. जर तुझी देवावर श्रद्धा आहे अन तरीही तू सत्याचा किंवा देवाच्या इच्छेचा शोध घेत नाहीस, तसेच देवाजवळ जाण्याच्या पद्धतीवर प्रेम करत नाहीस, तर मग मी म्हणेन की तू न्यायनिवाड्यापासून वाचण्याचा प्रयत्नात आहेस आणि महान शुभ्रधवल सिंहासनापासून दूर जाणारे बाहुले आणि द्रोही आहेस. देव त्याच्या नजरेखालून पळून जाणाऱ्या कोणत्याही बंडखोराला क्षमा करणार नाही. अशा माणासांना तर अधिक कठोर शासन केले जाईल. जे देवासमोर न्यायनिवाड्याकरिता येतील आणि इतकेच नाहीतर जे पवित्र होतील ते कायमस्वरूपी देवाच्या राज्यात राहतील. अर्थात हे असे काही आहे जे भविष्यात होणार आहे.
न्यायनिवाडा करण्याचे काम हे देवाचे स्वत:चे काम आहे, म्हणूनच खुद्द देवानेच ते करणे नैसर्गिक आहे; त्याच्याऐवजी माणूस हे करू शकत नाही. कारण मानवजातीवर विजय प्राप्त करण्याकरिता सत्याचा उपयोग करणे म्हणजे न्यायनिर्णय होय, त्यामुळे मानवमात्रामध्ये अवतार स्वरुपात हे कार्य करण्यासाठी देव दर्शन देईल यात शंकाच नाही. याचा अर्थ असा की शेवटच्या दिवसातील ख्रिस्त जगभरातील लोकांना शिकविण्याकरिता सत्याचा उपयोग करेल आणि त्यांना सर्व सत्यांची माहिती करून देईल. हेच देवाचे न्यायनिर्णयाचे काम आहे. अनेकांना देवाच्या दुसऱ्या अवताराबद्दल वाईट वाटते आहे, कारण लोकांना हे अशक्य वाटते की न्यायनिर्णयाचे काम करण्याकरिता देव मर्त्यरुप धारण करेल. तरीसुद्धा, मी तुला सांगितलेच पाहिजे की, बहुदा देवाचे कार्य मानवी अपेक्षांच्या अगदी पलिकडे जाते आणि मानवीमनाला हे स्वीकारणे कठीण होते. कारण लोक हे केवळ पृथ्वीवरील किडामुंगीसमान आहेत आणि देव मात्र विश्व व्यापक सर्वोच्च शक्ती आहे; माणसाचे मन म्हणजे खराब पाण्याचा खड्डा आहे आणि त्यात केवळ अळ्याच तयार होतात, देवाच्या विचारांनी दिग्दर्शित केलेल्या कामाची प्रत्येक पायरी म्हणजे देवाच्या शहाणपणाची फलश्रुती आहे. लोक नेहमीच देवाशी वाद घालण्याचा प्रयत्न करतात, याबाबत माझे असे म्हणणे आहे की अखेर ते हरतील, यांत काही शंकाच नाही. मी तुम्हा सर्वांना विनवितो की, स्वत:ला सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान समजू नका. जर इतर देवाचा न्यायनिवाडा स्वीकारतात तर मग तू का नाही? इतरांहून तू किती श्रेष्ठ आहेस? जर इतर सत्यासमोर आपले शिर झुकवितात, तर मग तू सुद्धा का नाही करू शकत? देवाच्या कार्याला न थांबिविता येणारा आवेग आहे, केवळ तू काही “सहयोग” दिला आहेस म्हणून तो काही न्यायनिर्णयाचे काम पुन्हा करणार नाही आणि इतकी महान संधी हातची जाऊ दिल्याबद्दल तुला पश्चाताप होईल. जर तुझा माझ्या शब्दांवर विश्वास नसेल तर मग आकाशातील महान शुभ्र धवल सिंहासन तुझा न्याय करेपर्यंत वाट पाहा! तुला माहिती असलेच पाहिजे की सर्व इस्रायली लोकांनी येशूकडे पाठ फिरवली आणि त्याला नाकारले आणि तरीही येशूने संपूर्ण विश्वातील आणि पृथ्वीवर सर्वदूर मानवमात्राचा उद्धार केला. हे वास्तव देवाने फार पूर्वीच निर्माण केले नाही का? तू जर अजूनही येशूने येऊन तुला स्वर्गात नेण्याची वाट पाहत असशील तर मग मी म्हणेन की तू एक असहाय्य[अ] तुकड्यासम हट्टी आहेस. तुझ्यासारख्या खोट्या श्रद्धावानाला येशू ओळखणार नाही, जो सत्याशी द्रोह करतो आणि केवळ आशीर्वादच मिळवू इच्छितो. त्याऐवजी, तुझ्यासारख्याला दहा हजार वर्षांकरिता आगीच्या तळ्यात टाकतांना तो कोणतीही दयामाया दाखविणार नाही.
आता तुला न्यायनिवाडा म्हणजे काय आणि सत्य काय आहे, हे समजले का? असे असल्यास मी तुला विनवितो की तू आज्ञाधारकपणे न्यायनिर्णया पुढे शरण जा अन्यथा तुला कधीही देवाकडून प्रशंसा प्राप्त करण्याची किंवा खुद्द त्याने तुला त्याच्या राज्यात घेऊन जाण्याची संधी प्राप्त होणार नाही. न्यायनिर्णयाचे काम सुरू असतानाच मध्ये पळून जाणारे, न्यायनिवाड्याचा स्वीकार करणारे मात्र कधीही पवित्र होऊ न शकणाऱ्यांचा देव सैदव तिरस्कार करेल आणि त्यांना नाकारेल. त्यांची पापे देवाचा विश्वासघात करणाऱ्या आणि देवाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या फारसींपेक्षा अधिक गंभीर आणि जास्त आहेत. अशा प्रकारचे लोक जे सेवा करण्यासदेखील पात्र नाहीत अशांना अधिक कठोर शासन होईल, शाश्वत अशी शिक्षा होईल. शाब्दिक एकनिष्ठता दाखविणाऱ्या आणि प्रत्यक्षात मात्र त्याला दगा देणाऱ्या कोणालाही देव सोडणार नाही. अशा लोकांना चैतन्य, आत्मा आणि शरीर यांच्या द्वारे शिक्षा करून प्रतिदंडीत केले जाईल. यातून देवाचा सात्विक स्वभाव अगदी नेमकेपणे उघड होत नाही का? मानवाचा न्यायनिवाडा करणे आणि त्यांस उघड करण्यामागे देवाचा हा हेतू नाही का? न्यायनिवाडा करत असताना सर्व प्रकारची दृष्ट कृत्य करणाऱ्या सर्वांना देव दृष्ट आत्म्यांनी ग्रस्त असलेल्या ठिकाणी पाठवतो आणि त्या दृष्ट आत्म्यांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या देहाची वाताहत करू देतो आणि त्या लोकांच्या देहातून मृतदेहाची दुर्गंधी बाहेर पडते. अशा प्रकारे त्यांचे योग्य प्रतिदंडन होते. त्या सर्व विश्वासघातकी खोट्या श्रद्धावंताची, खोट्या प्रेषितांची आणि खोट्या कामगारांची सर्व पापे देव त्याच्या नोंदवहीत लिहून ठेवतो; नंतर योग्य वेळी त्यांना अपवित्र आत्म्यांच्यात टाकून देतो, त्या अपवित्र आत्म्यांना त्यांच्या संपूर्ण देहाची त्यांच्या इच्छेनुसार वाताहातकरू देतो, जेणे करून त्यांना कधीही पुनर्जन्म प्राप्त होणार नाही आणि त्यांना पुन्हा कधीही प्रकाश दिसणार नाही. काही कालावधीकरिता सेवा करणाऱ्या परंतु अखेरपर्यंत एकनिष्ठ राहण्यास असमर्थ असलेल्या त्या ढोंगी लोकांची देव दृष्टांमध्ये गणना करतो, जेणेकरून ते दृष्टांसोबत भांडणात पडतील आणि त्यांच्या अव्यवस्थित भाऊगर्दीचा भाग होऊन जातील; शेवटी देव त्यांचा नाश करेल. जे कधीच ख्रिस्तासोबत एकनिष्ठ नव्हते किंवा ज्यांनी कधीही त्यांच्या सामर्थ्याचे काहीही योगदान केले नाही, अशांना देव वेगळेच ठेवतो आणि त्यांची दखलही घेत नाही तसेच समय बदलाच्या वेळी त्या सर्वांचा नाश करतो. ते यापुढे पृथ्वीवर अस्तित्वात राहत नाहीत, इतकेच नाही तर देवाच्या राज्यात त्यांना प्रवेश प्राप्त होत नाही. जे कधीही देवाशी प्रामाणिक नव्हते परंतु परिस्थितीमुळे ते त्याच्याशी निरुत्साहीपणे व्यवहार करत होते, अशांची गणना त्याच्या लोकांकरिता सेवा करणाऱ्यांमध्ये होते. यातील केवळ अगदी थोडे लोकच बचावतील, बहुसंख्य लोक मानकांनुरुप सेवा न करणाऱ्यांसोबत नष्ट केले जातील. अखेर, लोक आणि देवाचे पूत्र तसेच देवाने ज्यांच्या दैवात धर्मगुरु होणे निश्चित केले आहे अशा देवासारखेच मन असलेल्या सर्वांना देव त्याच्या राज्यात घेऊन येईल. ते देवाच्या कार्याचे शुद्धीकरण असतील. देवाने निश्चित केलेल्या कोणत्याही श्रेणीमध्ये न येणाऱ्या सर्वांची गणना नास्तिकांमध्ये केली जाईल आणि तुम्ही नक्कीच कल्पना करू शकता की त्यांचे पारिपत्य काय होईल. तुम्हा सर्वांना जे काही सांगितले पाहिजे ते सर्व मी या आधीच सांगितले आहे; तुम्ही निवडलेला मार्ग ही केवळ तुमचीच निवड आहे. तुम्ही पुढील बाब समजून घेतली पाहिजे: देवासोबत चालू न शकणाऱ्यांकरिता देवाचे काम वाट पाहत बसत नाही तसेच देवाचा नीतिमान स्वभाव कोणत्याही मानवाला दयामाया दाखवित नाही.
तळटीप:
अ. पीस ऑफ डेडवुड: एक चिनी वाक्प्रचार, अर्थ: “असहाय्य.”