तुला माहीत होते? देवाने मनुष्यांमध्ये महान गोष्ट केलेली आहे
जुने युग संपून नवीन युग सुरू झाले आहे. वर्षानुवर्षे आणि दिवसेंदिवस देवाने खूप कार्य केलेले आहे. या जगात तो आला, आणि निघून गेला. अनेक पिढ्या हे चक्र चालू राहिले. आज, त्याने केलीच पाहिजेत अशी कार्ये, त्याने अजून पूर्ण न केलेली कार्ये देव पूर्वीसारखीच करतो, कारण अजूनपर्यंत त्याने चिरविश्रांती घेतलेली नाही. निर्माणापासून आजपर्यंत देवाने पुष्कळ कार्य केले आहे. पण तुला माहीत आहे का, की देव पूर्वीपेक्षा आज जास्त कार्य करतो, आणि त्याच्या कार्याचे प्रमाण पूर्वीपेक्षाही अधिक मोठे आहे? यासाठी मी म्हणतो, की देवाने मनुष्यांमधे महान गोष्ट केली आहे. मनुष्यासाठी असो वा देवासाठी, देवाचे सर्वच कार्य महत्त्वाचे आहे, कारण त्याच्या कार्यातील प्रत्येक बाब मनुष्याशी संबंधित आहे.
देवाचे कार्य दिसत नाही अगर त्याला स्पर्श करता येत नाही—जगाने तर ते कमीच पाहिले आहे—मग ते कसे महान असेल? कोणत्या प्रकारची गोष्ट महान समजली जाऊ शकते? हे नक्कीच कोणी नाकारू शकत नाही, की देव जे काही कार्य करतो ते महान समजले जाऊ शकते, पण आज देवाने केलेल्या कार्याबद्दल मी असे का म्हणत आहे? मी जेव्हा म्हणतो, की देवाने महान कार्य केले आहे, त्यामध्ये निःसंशयपणे माणसाला अजून न समजलेली अनेक रहस्ये गुंतलेली आहेत. त्यांच्याबद्दल आपण आता बोलू.
येशू एका गोठ्यात अशा युगात जन्माला आला जे युग त्याचे अस्तित्व सहन करत नव्हते. तरीही, जग त्याच्या मार्गाआड येऊ शकले नाही आणि तो माणसांमध्ये देवाच्या देखभालीखाली तेहत्तीस वर्षे राहिला. या त्याच्या आयुष्यात त्याने जगाची कटुता अनुभवली आणि पृथ्वीवर दुःखी जीवन भोगले. सर्व मानवजात पापाच्या शिक्षेतून मुक्त होण्यासाठी त्याने वधस्तंभावर खिळले जाण्याचे भयंकर दुःख वागवले. सैतानाच्या अंमलाखाली राहणाऱ्या सर्व पाप्यांना त्याने शिक्षेतून मुक्त केले, आणि शेवटी त्याचा पुनरुत्थान झालेला देह त्याच्या विश्रांतीच्या स्थळी परतला. आता देवाचे नवीन कार्य सुरू झाले आहे, आणि ती नवीन युगाची नांदीही आहे. देव त्याचे तारणाचे नवीन कार्य सुरू करण्यासाठी, सोडवलेल्या पाप्यांना त्याच्या घरी आणतो. यावेळचे तारणाचे कार्य पूर्वीच्या काळापेक्षा अधिक परिपूर्ण आहे. मनुष्यामधील पवित्र आत्मा त्याच्यामध्ये स्वतःहून बदल करायला भाग पाडत नाहीये, तसेच माणसामधील येशूचे रूप ते कार्य करत नाहीये आणि हे सर्व कार्य इतर साधनांच्या द्वारे तर अगदीच कमी होत आहे. खरे तर देहधारी देवच हे कार्य स्वतः करत आहे आणि करायला सांगत आहे. माणसाला नवीन कार्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी तो हे करत आहे. ही गोष्ट महान नाही का? देव हे कार्य काही मनुष्यांद्वारे किंवा भाकिताद्वारे करत नाही; तर देव ते स्वतः करत आहे. काहीजण म्हणू शकतील, की ही महान गोष्ट नाही आणि त्याने मनुष्याला परमानंद मिळू शकत नाही. मात्र मी तुला असे सांगेन, की देवाचे कार्य एवढेच नाही, तर याहून अधिक महान आणि जास्त आहे.
यावेळेस कार्य करण्यासाठी देव आध्यात्मिक देहात येत नाही, तर अत्यंत सामान्य रूपात येतो. शिवाय, देवाचा तो केवळ दुसरा अवतार असलेला देह आहे एव्हढेच नाही, तर देवच त्या देहाद्वारे परत आला आहे. तो अत्यंत सामान्य देह आहे. तो इतरांहून वेगळा असा तुला दिसणारच नाही, पण तुला त्याच्याकडून पूर्वी कधी न ऐकलेली सत्ये कळू शकतात. हा नगण्य देह देवाच्या सर्व सत्य वचनांचे मूर्त स्वरूप आहे, तो शेवटच्या दिवसातील देवाचे कार्य करतो, आणि देवाची संपूर्ण प्रवृत्ती मनुष्याला कळेल असे सांगतो. तुम्हाला स्वर्गातील देव पाहण्याची तीव्र इच्छा नाही का? तुला स्वर्गातील देव समजून घेण्याची तीव्र इच्छा नाही का? तुला मानवजातीचे गंतव्यस्थान पाहण्याची तीव्र इच्छा नाही का? तो तुला ही सर्व रहस्ये सांगेल—अशी रहस्ये जी कोणीही मनुष्य तुला सांगू शकलेला नाही आणि तो तुला अशाही सत्यांबद्दल सांगेल जी तुला कळत नाहीत. त्याच्या राज्यात प्रवेशण्यासाठी तो तुझे द्वार आहे, आणि नवीन युगातील तो तुझा मार्गदर्शक आहे. या सामान्य देहात थांग न लागण्याजोगी रहस्ये आहेत. त्याची कृत्ये तुला अगम्य वाटू शकतील, पण तो करत असलेल्या कार्याचा पूर्ण हेतू पाहता तुझ्या लक्षात येईल, की लोकांना वाटते तसा हा काही साधा देह नाही. कारण तो देवाच्या इच्छेचे व शेवटच्या दिवसांमधील मानवजातीप्रति देवाला वाटणाऱ्या काळजीचे प्रतिनिधित्व करतो. स्वर्ग व पृथ्वी हलवू शकतील असे त्याचे शब्द तुला जरी ऐकू येत नसले, तुला त्याच्या डोळ्यातील ज्वालेची ज्योत दिसत जरी नसली आणि त्याच्या लोखंडी कांबेच्या शिस्तीचा प्रसाद मिळत नसला, तरीही तुला त्याच्या शब्दांतून ऐकू येईल, की देव क्रोधी आहे आणि समजेल, की देव मानवजातीप्रति करुणा दाखवतो; तुला देवाची प्रामाणिक प्रवृत्ती आणि त्याचे शहाणपण दिसेल आणि त्याहून जास्त म्हणजे देवाची सर्व मानवजातीविषयी असलेली तळमळ जाणवेल. स्वर्गातील देव पृथ्वीवरील मनुष्यांमध्ये राहत असलेला बघायला देणे, आणि देव समजून घेण्यासाठी, त्याचे आज्ञापालन करण्यासाठी, त्याला पूजण्यासाठी आणि त्याच्यावर प्रीती करण्यासाठी मनुष्याला लायक बनवणे हे शेवटच्या दिवसांतील देवाचे कार्य आहे. म्हणूनच तो दुसऱ्यांदा देहात परतला आहे. जरी देव मनुष्यासारखाच आहे असे मनुष्याला आज दिसत असले—नाक आणि दोन डोळे असलेला, आणि वेगळा न वाटण्याजोगा देव असला तरी सरतेशेवटी देव तुम्हाला दाखवेल, की हा मनुष्य जर नसता तर स्वर्ग आणि पृथ्वीवर जबरदस्त बदल झाले असते; हा माणूस जर नसता तर स्वर्ग फिका झाला असता, पृथ्वीवर हाहाःकार माजला असता आणि सर्व मानवजात दुष्काळ व प्लेगमधे होरपळली असती तो तुम्हाला दाखवेल, की जर शेवटच्या दिवसांत देहधारी देव तुम्हाला वाचवायला आला नसता, तर देवाने पुष्कळ पूर्वीच मानवजातीला नरकात संपवून टाकले असते; जर हा देह नसता, तर तुम्ही कायमचे पक्के पापी राहिले असतात आणि अधिकाधिक प्रेतवत झाले असतात. तुम्हाला माहीत असायला हवे, की जर हा देह नसता, तर पूर्ण मानवजातीला अटळ अरिष्टाला सामोरे जावे लागले असते आणि शेवटच्या दिवसात देव जी शिक्षा करतो त्या अधिक जबर शिक्षेपासून वाचणे अशक्य झाले असते. हा देह जन्माला आला नसता तर तुम्ही सगळे अशा परिस्थितीत असता, की जगणे शक्य नसतानाही आयुष्याची भीक मागितली असती आणि मरणे शक्य नसताना मरणासाठी प्रार्थना केली असती. जर हा देह नसता, तर तुम्हाला सत्यप्राप्ती होऊ शकली नसती आणि तुम्ही देवाच्या सिंहासनापुढे आज येऊ शकला नसतात. उलट देव तुमच्या भयंकर पापांबद्दल तुम्हाला शिक्षा करेल. तुम्हाला माहीत होते का, की देवाचे देहात परतणे झाले नसते तर कोणालाही तारणाची संधी मिळाली नसती आणि हा देह परत आला नसता तर देवाने फार पूर्वीच जुन्या युगाचा अंत केला असता? असे आहे तरीही तुम्ही अजून देवाच्या दुसऱ्या अवताराला नाकारू शकता का? तुम्ही या सामान्य मनुष्याकडून इतके फायदे मिळवू शकता, तर तुम्ही त्याला आनंदाने स्वीकारत का नाही?
देवाचे कार्य असे आहे, की ज्याची तू कल्पना करू शकत नाहीस. जर तुला तुझी निवड योग्य आहे की नाही याचे पूर्ण आकलनही तुला होत नाही आणि देवाच्या कामाला यश मिळेल की नाही हे माहीतही नाही, तर तू तुझ्या नशिबावरच हवाला ठेवून बघत का नाहीस, की हा सामान्य मनुष्य तुला मदत करेल का, आणि देवाने खरोखरच महान कार्य करून ठेवले आहे की नाही? मात्र मला हे तुला सांगितलेच पाहिजे, की नोहाच्या काळात माणसे खात पीत होती, लग्न करत होती आणि लग्नाला इतकी शरण जात होती की देवाला ते पाहणे अशक्य होते, म्हणून केवळ सर्व पशुपक्षी आणि नोहाचे आठ जणांचे कुटुंब सोडून बाकी मानवजातीला उद्ध्वस्त करण्यासाठी त्याने भयंकर पूर पाठवला. शेवटच्या दिवसांत मात्र देवाच्या तावडीतून वाचलेले सर्व लोक असे आहेत जे शेवटपर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ होते. देवाला पाहता येण्यास अशक्य असा भ्रष्टाचार दोन्ही युगात असला आणि त्या दोन्ही युगातील मानवजात इतकी भ्रष्ट झाली व त्यांनी देव त्यांचा प्रभू आहे हे नाकारले तरी देवाने केवळ नोहाच्याच काळचे लोक नष्ट केले. दोन्ही युगातील मानवजातीने देवाला अतिशय दुःख दिले, तरीही देव शेवटच्या दिवसांतील मनुष्यांबाबत आत्तापर्यंत सहनशील राहिला. याचे कारण काय? तुम्हाला याचे कधीच आश्चर्य वाटले नाही? तुम्हाला जर खरोखरच माहीत नसेल, तर मला सांगू दे. मनुष्यांवर देव शेवटच्या दिवसांत कृपा करू शकतो याचे कारण ते नोहाच्या काळच्या लोकांपेक्षा कमी भ्रष्ट आहेत, किंवा त्यांनी देवाजवळ पश्चात्ताप व्यक्त केला आहे असे नाही, शेवटच्या दिवसात तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की देव त्यांना नष्ट करू शकत नाही हे तर कारण मुळीच नाहीच. उलट, त्याचे कारण हे, की शेवटच्या दिवसांत देवाला लोकांच्या समुहात कार्य करायचे आहे आणि देहधारी देव ते कार्य स्वतः करणार आहे. शिवाय, देव या समूहातील एक भाग तारणासाठीची वस्तू म्हणून आणि त्याच्या नियोजनाची फळे म्हणून निवडेल, आणि या लोकांना पुढील युगात आणेल. म्हणून काहीही झाले, तरी देवाने मोजलेली ही किंमत पूर्णपणे त्या देहधारी अवताराच्या कामाची शेवटच्या दिवसांतील तयारी आहे. तुम्ही आजच्या दिवसापर्यंत पोहोचला आहात हे त्या देहामुळे शक्य झाले आहे. देव त्या देहात राहतो म्हणून तुम्हाला जगण्याची संधी मिळते. हे सर्व सुदैव या सामान्य मनुष्यामुळे आहे. केवळ हेच नाही, तर शेवटी प्रत्येक देश या सामान्य मनुष्याची पूजा करेल तसेच या सामान्य मनुष्याचे आभार मानेल आणि त्याची आज्ञा पाळेल, कारण सत्य, जीवन आणि त्याने ज्या प्रकारे ते आणले त्यामुळे सर्व मानवजात वाचली, देव आणि मनुष्यातील संघर्ष कमी झाला, त्यांच्यातील अंतर कमी झाले आणि देवाचे विचार आणि माणूस यांच्यात नाते तयार झाले. हा तोच आहे ज्याने देवासाठी अधिक गौरव मिळवला. असा सामान्य मनुष्य तुझा आदर आणि विश्वासास अपात्र आहे का? हा सामान्य देह ख्रिस्त म्हणण्यास अयोग्य आहे का? असा सामान्य माणूस मनुष्यांतील देवाची अभिव्यक्ती असू शकत नाही का? ज्या मनुष्याने मानवजातीला नाशापासून वाचवले, तो तुमचे प्रेम आणि त्यास धरून राहण्याची इच्छा यासाठी लायक नाही का? त्याच्या तोंडून निघालेली सत्ये जर तुम्ही नाकारत असाल आणि तुमच्यामधील त्याचे अस्तित्व तुम्हाला रुचत नसेल, तर तुमचे शेवटी काय होईल?
शेवटच्या दिवसांतील देवाचे सर्व कार्य या सामान्य मनुष्याद्वारे होते. तो तुला सर्व काही देईल आणि शिवाय तुझ्याबाबतीतले सर्व काही त्याला ठरवता येईल. असा मनुष्य ज्याला तुम्ही अत्यंत साधा समजता, तो अनुल्लेखनीय ठरेल का? त्याचे सत्य हे तुमची पूर्णपणे खात्री पटवण्यास पुरेसे नाही? त्याची कृती दिसणे तुमची पूर्णपणे खात्री पटवण्यास पुरेसे नाही का? की तो दाखवतो तो मार्ग तुम्ही चालण्यासाठी लायक नसलेला आहे? जेव्हा सर्व काही सांगितले आणि केले गेले आहे, तेव्हा काय कारण आहे, ज्यामुळे तुम्ही त्याचा तिरस्कार करता किंवा त्याला बाजूला सारून टाळता? हा तो मनुष्य आहे जो सत्य सांगतो, हा तो माणूस आहे जो सत्य प्रदान करतो, आणि हा तो माणूस आहे जो तुम्हाला अनुसरण्यासाठी मार्ग देतो. असे आहे का, की तुम्हाला अजूनही या सत्यांमध्ये देवाच्या कामाच्या खुणा सापडू शकल्या नाहीत? येशूच्या कार्याशिवाय मानवजात वधस्तंभावरून खाली उतरू शकली नसती, पण जे वधस्तंभावरून खाली येतात त्यांना आजच्या देहधारणाशिवाय कधीच देवाची मान्यता मिळत नाही किंवा ते नवीन युगात जात नाहीत. या सामान्य मनुष्याशिवाय तुम्हाला देवाची खरी मुद्रा दिसण्याची संधी मिळाली नसती, किंवा तुम्ही खरे तर फार पूर्वीच नाश होण्याच्या लायकीचे असताना त्या संधीस पात्र झाला नसतात. देवाची दुसरी देहधारणा आल्यामुळे, देवाने तुम्हाला क्षमा केली आहे आणि दया दाखवली आहे. तरीही, तुम्हाला सांगायचे माझे शेवटचे शब्द हेच आहेत: हा सामान्य मनुष्य जो देहधारी आहे तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हे महान कार्य मनुष्यांमध्ये देवाने अगोदरच केले आहे.