तू देवावर सच्चा विश्वास ठेवणारा व्यक्ती आहेस का?
तू कदाचित एक किंवा दोन वर्षांहून अधिक काळ देवावरील श्रद्धेच्या मार्गावर चालला असशील आणि या वर्षांमध्ये कदाचित तू तुझ्या आयुष्यात खूप त्रास सहन केला असशील; किंवा कदाचित तू जास्त त्रास सहन केलाही नसशील आणि त्याउलट तुला खूप कृपा प्राप्त झाली असेल. असे देखील असू शकते, की तू त्रास किंवा कृपा काहीही अनुभवले नसशील, परंतु काहीसे साधारण जीवन जगले असशील. तरीही, तू अजूनही देवाचा अनुयायी आहेस, म्हणून आपण देवाचे अनुसरण करण्याच्या विषयावर सहभागिता करुया. तथापि, हे शब्द वाचणार्या सर्वांना मी आठवण करून देणे आवश्यक आहे, की देवाचे वचन हे फक्त त्याला मानणाऱ्या आणि त्याचे अनुसरण करणाऱ्या लोकांसाठीच निर्देशित केलेले आहे, त्याचा स्वीकार करणाऱ्या किंवा न करणाऱ्या सर्वच लोकांसाठी ते नसते. देव जनतेशी, जगातील सर्व लोकांशी बोलतो असा जर तुझा विश्वास असेल तर देवाच्या वचनाचा तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तर, तू या सर्व वचनांना तुझ्या अंतःकरणात लक्षात ठेवले पाहिजेस आणि स्वतःला त्यांच्यापासून कधीही दूर करू नयेस. कोणत्याही परिस्थितीत, आपण आपल्या घरात काय घडत आहे याबद्दल बोलू या.
तुम्हा सर्वांना आता देवावरील श्रद्धेचा खरा अर्थ समजला पाहिजे. देवावरील श्रद्धेचा अर्थाबद्दल मी यापूर्वी बोललो होतो, तो तुमच्या सकारात्मक प्रवेशाशी संबंधित आहे. आजचा दिवस वेगळा आहे: आज, मला तुमच्या देवावरील श्रद्धेच्या साराचे विश्लेषण करायचे आहे. अर्थात, हे तुम्हाला नकारात्मक पैलूपासून दूर ठेवण्यास मार्गदर्शन करण्यासाठी आहे; जर मी तसे केले नाही, तर तुम्हाला तुमचा खरा चेहरा कधीच कळणार नाही आणि तुम्ही तुमच्या धार्मिकतेबद्दल व श्रद्धाळूपणाबद्दल कायमच बढाई मारत राहाल. हे म्हणणे रास्त आहे, की जर मी तुमच्या अंतःकरणातील कुरूपता उघड केली नाही, तर तुमच्यापैकी प्रत्येकजण स्वतःच्या डोक्यावर मुकुट ठेवेल आणि सर्व वैभव स्वतःसाठीच ठेवेल. तुमचा मगरूर आणि अहंकारी स्वभाव तुम्हाला स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीचा विश्वासघात करण्यास, ख्रिस्ताविरुद्ध बंड करण्यास व त्याला विरोध करण्यास आणि तुमची कुरूपता प्रकट करण्यास प्रवृत्त करतो, ज्यामुळे तुमचे हेतू, मत, बेताल इच्छा व लालसेने भरलेले डोळे हे उघड होतात. तरीही तुम्ही ख्रिस्ताच्या कार्याविषयी तुमच्या आजीवन उत्कटतेबद्दल सतत बडबड करत राहता व ख्रिस्ताने फार पूर्वी सांगितलेली सत्ये वारंवार पुन्हा बोलत राहता. ही तुमची “श्रद्धा” आहे—तुमची “अशुद्धता नसलेली श्रद्धा”. मी मनुष्यासाठी कठोर मानके ठरवून ठेवली आहेत. जर तुझी निष्ठा हेतुपूर्वक आणि सशर्त असेल, तर मी तुझ्या तथाकथित निष्ठेशिवाय राहणे पसंत करेन, कारण जे लोक त्यांच्या हेतूंद्वारे मला फसवतात आणि शर्ती घालून माझी पिळवणूक करतात त्यांचा मी प्रचंड तिरस्कार करतो. माझी फक्त हीच इच्छा आहे, की मनुष्याने माझ्याशी पूर्णपणे एकनिष्ठ रहावे आणि सर्व कार्ये फक्त एका गोष्टीसाठी व एक शब्द सिद्ध करण्यासाठी करावीत: श्रद्धा. मला आनंदित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या मधुर वाणीचा मी तिरस्कार करतो, कारण मी तुम्हाला नेहमीच प्रामाणिकपणे वागवले आहे आणि म्हणूनच तुम्ही माझ्यावर सच्ची श्रद्धा ठेवून वागावे अशी माझी इच्छा आहे. श्रद्धेचा प्रश्न येतो तेव्हा, बऱ्याच लोकांना असे वाटू शकते, की त्यांची देवावर श्रद्धा आहे म्हणून ते देवाचे अनुसरण करतात. अन्यथा, त्यांना असे दुःख सहन करावे लागले नसते. म्हणूनच मी तुला हे विचारत आहे: जर देवाच्या अस्तित्वावर तुझा विश्वास असेल, तर तू त्याचा आदर का करत नाहीस? जर देवाच्या अस्तित्वावर तुझा विश्वास असेल, तर तुझ्या हृदयात त्याच्याबद्दल थोडीदेखील भीती का नाही? ख्रिस्त हा देवाचे प्रत्यक्ष रूप आहे हे तू स्वीकारतोस, मग तू त्याचा अवमान का करतोस? तू त्याच्याशी उद्धटपणे का वागतोस? तू त्याच्याविषयी उघडपणे मत का मांडतोस? तू त्याच्या हालचालींवर नेहमी लक्ष का ठेवतोस? तू त्याच्या योजनेस शरण का जात नाहीस? तू त्याच्या शब्दाप्रमाणे का वागत नाहीस? तू त्याच्या समर्पणांपासून त्याची पिळवणूक करण्याचा आणि त्याला लुटण्याचा प्रयत्न का करतोस? तू ख्रिस्ताच्या जागेवरून का बोलत आहेस? त्याचे कार्य आणि त्याचे वचन बरोबर आहे की नाही हे तू का ठरवतोस? तू त्याच्या पाठीमागे त्याची निंदा करण्याचे धाडस का करतोस? तुझे हे आणि इतर वागणे म्हणजे तुझी श्रद्धा आहे का?
तुमच्या शब्दांमधून आणि वर्तनामधून तुमचा ख्रिस्तावरील अविश्वास प्रकट होतो. तुमच्या सर्व हेतूमध्ये आणि उद्दिष्टांमध्ये अविश्वास व्यापलेला आहे. तुमच्या टक लावून पाहण्याचे स्वरुप देखील ख्रिस्तावरील अविश्वासाचे आहे. प्रत्येक मिनिटाला तुमच्यापैकी प्रत्येकजण अविश्वासाची भावना बाळगत आहे, असेही म्हणता येईल. याचा अर्थ असा, की प्रत्येक क्षणी, तुम्ही ख्रिस्ताचा विश्वासघात करण्याचा धोका आहे, कारण तुमच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्तामध्ये प्रत्यक्ष रुप धारण केलेल्या देवावरही अविश्वास भरलेला आहे. म्हणूनच, माझे असे म्हणणे आहे, की देवावरील श्रद्धेच्या मार्गावर तुम्ही सोडलेल्या पाऊलखुणा खऱ्या नाहीत; देवावरील श्रद्धेच्या मार्गावर चालत असताना, तुम्ही तुमचे पाय जमिनीमध्ये घट्ट रोवत नाही—तुम्ही केवळ हालचाल करत पुढे जात आहात. तुम्ही ख्रिस्ताच्या वचनावर कधीही पूर्णपणे विश्वास ठेवत नाही आणि ते लगेच आचरणात आणण्यासदेखील असमर्थ आहात. हेच कारण आहे, की तुमची ख्रिस्तावर श्रद्धा नाही. त्याच्याबद्दल नेहमी कल्पना असणे हे दुसरे कारण आहे, की तुमची त्याच्यावर श्रद्धा नाही. ख्रिस्ताच्या कार्याबद्दल कायम संशय बाळगणे, ख्रिस्ताचे वचन ऐकूनही न ऐकल्यासारखे करणे, ख्रिस्ताद्वारे जे कोणतेही कार्य घडले त्याबद्दल मत असणे आणि हे कार्य योग्यरीत्या समजून घेण्यासाठी सक्षम नसणे, कितीही स्पष्टीकरण मिळाले तरीदेखील तुमची मते बाजूला ठेवतांना णे त्रस्त होणे आणि बरेच काही—हे असे काही अविश्वासाचे घटक आहेत जे तुमच्या अंतःकरणात मिसळले आहेत. जरी तुम्ही ख्रिस्ताच्या कार्याचे अनुसरण करत असलात आणि कधीही मागे पडणार नाही, तरीदेखील तुमच्या अंतःकरणात खूपच बंडखोरी मिसळली आहे. ही बंडखोरी म्हणजे तुमच्या देवावरील विश्वासातील अशुद्धता आहे. कदाचित तुम्हाला असे वाटत नसेल, परंतु जर तू यातूनही तुझा हेतू ओळखण्यास असमर्थ असशील, तर तू नक्कीच नाश पावणार्यांपैकी आहेस, कारण देव केवळ त्यांनाच परिपूर्ण करतो जे त्याच्यावर खरा विश्वास ठेवतात, त्याच्याबद्दल संशय बाळगणाऱ्यांना नाही आणि तो देव आहे यावर कधीही विश्वास नसतानाही जे अनिच्छेने त्याचे अनुसरण करतात त्यांना तर कधीच नाही.
काही लोक सत्यात आनंद मानत नाहीत, न्यायामध्ये तर त्याहून कमी. त्याऐवजी, ते सामर्थ्य आणि संपत्तीमध्ये आनंदित राहतात; अशा लोकांना सत्तेचा हव्यास असणारे म्हणतात. ते फक्त जगातील प्रभाव असलेल्या संप्रदायांना शोधतात, आणि अशा सेमिनरीमधून आलेल्या पाळक आणि शिक्षकांचा शोध घेतात. त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला असला तरीदेखील, त्यांचा विश्वास अर्धवटच आहे; ते त्यांचे संपूर्ण अंतःकरण आणि मन वाहण्यास देऊन टाकण्यास असमर्थ आहेत, ते देवासाठी स्वतःला फक्तखर्च करण्याबद्दल बोलतात, पण त्यांचे लक्ष महान पाळक आणि शिक्षकांवर केंद्रित आहे आणि ते ख्रिस्ताकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यांची अंतःकरणे कीर्ती, दैव आणि वैभव यावरच खिळलेली आहेत. ते या प्रश्नाचा विचार करत राहतात, की इतका क्षुल्लक मनुष्य अनेकांवर विजय मिळवण्यास सक्षम कसा असू शकतो, इतका सर्वसाधारण मनुष्य मानवाला परिपूर्ण करु शकतो. ते या प्रश्नाचा विचार करत राहतात, की देवाने धूळ आणि कचराकुंड्यांमधील काहीही ओळख नसलेल्या लोकांना निवडले आहे. त्यांचा असा विश्वास आहे, की जर असे लोक तारणासाठी देवाची कारक पात्रे असतील, तर स्वर्ग आणि पृथ्वीची उलथापालथ होईल व सर्व लोक स्वतःच्या मूर्खपणावर हसतील. त्यांना वाटते, की जर देवाने अशा साध्यासुध्या लोकांना परिपूर्ण होण्यासाठी निवडले असेल, तर ते महापुरुष तर स्वतःच देव होऊ शकतील. त्यांचा दृष्टिकोन अविश्वासाने दूषित आहे; अविश्वासापेक्षाही अधिक म्हणजे, ती फक्त हास्यास्पद जनावरे आहेत. कारण ते फक्त दर्जा, प्रतिष्ठा आणि शक्ती यांना महत्त्व देतात व ते फक्त बड्या समुदायांचा आणि संप्रदायांचा आदर करतात. ख्रिस्ताचे अनुसरण करणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्या मनात किंचितही आदर नाही; ते फक्त द्रोही आहेत ज्यांनी ख्रिस्त, सत्य आणि जीवन यांच्याकडे पाठ फिरवली आहे असे ते केवळ द्रोही आहेत.
तू ख्रिस्ताच्या विनम्रतेची नाही, तर प्रमुख स्थान असलेल्या खोट्या मेंढपाळांची प्रशंसा करतोस. तू ख्रिस्ताच्या प्रेमळपणाची किंवा शहाणपणाची आराधना करत नाहीस, तर जगाच्या घाणीमध्ये लोळणाऱ्या त्या स्वैरवर्तनी लोकांची आराधना करतोस. ज्याला आपले डोकं टेकावायला देखील जागा नाही अशा ख्रिस्ताच्या वेदनांवर तू हसतोस, पण जे अर्पणांचा शोध घेतात आणि भ्रष्ट जीवन जगतात त्या प्रेतांचे तू कौतुक करतोस. तू ख्रिस्तासोबत दुःख सहन करण्यास तयार नाहीस, परंतु जे बेपर्वा ख्रिस्तविरोध तुला केवळ देह, शब्द आणि नियंत्रण देतात, असे असले तरीही तू आनंदाने स्वतःला त्यांच्या हाती झोकून देतोस. आत्ता सुद्धा, तुझे अंतःकरण अजूनही त्यांच्याकडे, त्यांच्या प्रतिष्ठेकडे, त्यांच्या स्थितीकडे, त्यांच्या प्रभावाकडे वळते. आणि तरीही तू अशी वृत्ती धारण करतोस ज्यामुळे तुला ख्रिस्ताचे कार्य मान्य करणे कठीण वाटते आणि तू ते स्वीकारण्यास तयार नाहीस. म्हणूनच माझे असे म्हणणे आहे, की तुझ्यामध्ये ख्रिस्ताला मानण्यासाठी श्रद्धेची कमतरता आहे. आजपर्यंत तू त्याचे अनुसरण करण्याचे कारण एवढेच आहे, की तुझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. उदात्त प्रतिमांची मालिका कायमस्वरूपी तुझ्या अंतःकरणात विराजमान आहे; तू त्यांचा प्रत्येक शब्द आणि कृती किंवा त्यांचे प्रभावी शब्द व हात विसरू शकत नाहीस. ते, तुमच्या हृदयात, कायमचे सर्वोच्च आणि कायमचे महापुरुष आहेत. पण आजच्या ख्रिस्तासाठी असे नाही. तो तुझ्या अंतःकरणात सदैव नगण्य आहे आणि कायमच आदरास पात्र नाही. कारण तो खूपच सामान्य आहे, त्याचा प्रभाव फारच कमी आहे आणि तो उदात्ततेपासून दूर आहे.
कोणत्याही परिस्थितीत, माझे असे म्हणणे आहे, की जे सत्याला महत्त्व न देणारे सर्व सत्याप्रती अविश्वास दाखवणारे आणि सत्याची फसवणूक करणारे आहेत. अशा लोकांना ख्रिस्ताची मान्यता कधीच मिळणार नाही. तुझ्यामध्ये किती अविश्वास आहे आणि तू ख्रिस्ताचा किती विश्वासघात करत आहेस हे तू आता ओळखले आहेस का? मी तुला आग्रहाने अशी विनंती करत आहे: जर तू सत्याचा मार्ग निवडला आहेस, तर तू संपूर्ण अंतःकरणाने स्वतःला समर्पित केले पाहिजेस; द्विधा मनाने किंवा अर्धवट अंतःकरणाने नाही. तू हे समजून घेतले पाहिजेस, की देव जगाचा किंवा कोणा एका व्यक्तीचा नाही, तर त्या सर्वांचा आहे जे त्याच्यावर सच्चा विश्वास ठेवतात, जे त्याची उपासना करतात आणि जे त्याच्याशी एकनिष्ठ आहेत व ज्यांची त्याच्यावर श्रद्धा आहे.
आज, तुमच्यात खूप अविश्वास आहे. स्वतःमध्ये खोलवर पहा आणि तुम्हाला तुमचे उत्तर नक्कीच सापडेल. जेव्हा तुला खरे उत्तर सापडेल, तेव्हा तू कबूल करशील, की तू देवावर विश्वास ठेवणारा नाहीस, परंतु त्याऐवजी तू अशी व्यक्ती आहेस जी त्याची फसवणूक, निंदा आणि विश्वासघात करते व जी त्याच्याशी बेइमानी करते. मग तुला जाणवेल, की ख्रिस्त हा मनुष्य नसून देव आहे. जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तू ख्रिस्ताचा आदर करशील, त्याच्याबद्दल भीती बाळगशील आणि त्याच्यावर खरे प्रेम करशील. सध्या तुमचे फक्त तीस टक्के अंतःकरण श्रद्धेने भरलेले आहे, तर उर्वरित सत्तर टक्के शंकेने भरलेले आहे. ख्रिस्त जे काही करतो आणि म्हणतो त्या सर्व गोष्टीं, तुमच्या मनात त्याच्याबद्दलची मते आणि अभिप्राय निर्माण करण्यास जबाबदार आहे, अशी मते आणि अभिप्राय जे केवळ तुमच्या पुर्ण अविश्वासामुळे निर्माण झाले आहेत. तुम्ही फक्त स्वर्गातील न दिसणार्या देवाची प्रशंसा करता आणि त्याला घाबरता, पण तुम्हाला पृथ्वीवरील जिवंत ख्रिस्ताची पर्वा नाही. हा देखील तुमचा अविश्वास नाही का? तुम्हाला फक्त ज्या देवाने भूतकाळात काम केले, त्या देवाची ओढ आहे, परंतु आजच्या ख्रिस्ताला तुम्ही सामोरे जात नाही. ही सर्व “श्रद्धा” आहे, जी तुमच्या अंतःकरणात कायमची मिसळलेली आहे, ती श्रद्धा जी आजच्या ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे कमी लेखत नाही, कारण तुमच्यामध्ये खूप अविश्वास आहे, तुमच्यामधील बराच भाग अशुद्ध आहे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. या अशुद्धता या गोष्टीचे लक्षण आहे, की तुमची अजिबात श्रद्धा नाही; त्या तुमच्या ख्रिस्ताचा त्याग केलेल्याच्या खुणा आहेत आणि ते तुम्हाला ख्रिस्ताचा विश्वासघात करणारा म्हणून चिन्हांकित करतात. त्या गोष्टी ख्रिस्ताविषयीच्या तुमच्या ज्ञानावरील पडदा आहेत, ख्रिस्ताद्वारे तुम्हाला प्राप्त होण्यात अडथळा आहे, ख्रिस्तासोबत तुमच्या सुसंगततेमध्ये अडथळा आहे आणि ख्रिस्त तुम्हाला मंजूर करत नाही याचा पुरावा आहे. आता तुम्ही ज्या प्रकारे आयुष्य जगता त्याचे परीक्षण करण्याची वेळ आली आहे! असे केल्याने तुम्ही कल्पना करू शकाल अशा प्रत्येक प्रकारे तुम्हाला फायदा होईल!