शेवटच्या दिवसातील येशू ख्रिस्तच मनुष्याला चिरंतन जीवनाचा मार्ग दाखवू शकतो

जीवनाचा मार्ग ही अशी गोष्ट नाही जी कोणाकडेही असेल किंवा ती अशी गोष्ट नाही जी कोणी सहज मिळवू शकेल. याचे कारण असे, की जीवन केवळ देवाकडूनच मिळते, म्हणजे असे की फक्त स्वतः देवाकडेच जीवनाचे मूलतत्त्व आहे आणि फक्त स्वतः देवाकडेच जीवनाचा मार्ग आहे. आणि म्हणूनच फक्त देव हाच जीवनाचा स्रोत आहे आणि तो सतत वाहणारा जीवनाचा जिवंत पाण्याचा झरा आहे. जेव्हापासून त्याने जग निर्माण केले आहे, देवाने जीवनातील चैतन्याबाबत खूप कष्ट घेतले आहेत, मनुष्याला जीवन प्राप्त करून देण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत आणि मनुष्याला जीवन मिळावे म्हणून खूप मोठी किंमत मोजली आहे. याचे कारण असे, की स्वतः देव म्हणजेच चिरंतन जीवन आहे आणि स्वतः देव मानवी पुनरुत्थानाचा मार्ग आहे. देव मनुष्याच्या हृदयातून कधीच नाहीसा होत नाही आणि सदा मनुष्यमात्रामध्येच वसतो. तो मनुष्याच्या जीवनामागील प्रेरक शक्ती आहे, मनुष्याच्या अस्तित्वाचे मूळ आणि जन्मानंतर मनुष्याच्या अस्तित्वासाठी समृद्ध ठेवा आहे. तो मनुष्याचा पुनर्जन्म घडवतो आणि मनुष्याला प्रत्येक भूमिकेत निग्रहाने जीवन जगायला लावतो. त्याची शक्ती आणि अखंड जीवन चैतन्य यामुळेच मनुष्य पिढ्यान पिढ्या जीवित आहे, या काळात देवाची जीवन शक्ती हाच मनुष्याच्या अस्तित्वाचा मुख्य आधार राहिलेला आहे आणि देवाने त्यासाठी साधारण मनुष्याने कधीच मोजली नसेल इतकी किंमत मोजली आहे. देवाची जीवन चैतन्य कोणत्याही अन्य शक्तीवर मात करू शकते; त्याशिवाय, ही शक्ती इतर कोणत्याही शक्तीपेक्षा वरचढ आहे. त्याचे जीवन चिरंतन आहे, त्याची शक्ती असामान्य आहे आणि कोणताही निर्मिलेला प्राणी अथवा शत्रू शक्ती त्याच्या जीवन चैतन्याला परास्त करू शकत नाही. कोणताही काळ अथवा स्थान असो, देवाचे जीवन चैतन्य कायम अस्तित्वात असते आणि स्वतःच्या उज्वल तेजाने ती चमकत असते. स्वर्गात आणि पृथ्वीवर मोठमोठे बदल होऊ शकतात, पण देवाचे जीवन कायम आहे तसेच राहते. सर्व काही नाहीसे होईल कदाचित, परंतु देवाचे जीवन कायम राहील, कारण देवच सर्व गोष्टींच्या अस्तित्वाचा स्रोत आणि मूळ आहे. मनुष्याच्या जीवनाचा उगम देवातून होतो, देवामुळेच स्वर्गाचे अस्तित्व आहे आणि पृथ्वीचे अस्तित्व देवाच्या जीवनाच्या शक्तीतून निर्माण झाले आहे. कोणतीही चैतन्यहीन वस्तू देवाच्या सार्वभौमत्वाला पार करू शकत नाही आणि कोणतीही सामर्थ्यवान गोष्ट देवाच्या अधिकारक्षेत्राला टाळू शकत नाही. अशा प्रकारे, कुणीही असो, प्रत्येकाने देवाच्या अधिपत्याला अधीन जाणे भाग आहे, प्रत्येकाने देवाच्या आदेशाखाली राहिले पाहिजे; आणि कोणीही त्याच्या हातून सुटू शकत नाही.

कदाचित, तुला आता जीवनावर विजय मिळवण्याची इच्छा असेल; किंवा तुला सत्य प्राप्तीची इच्छा असेल. काहीही असो, तुला देव शोधायची, तू ज्यावर विसंबू शकतोस असा आणि जो तुला चिरंतन जीवन देऊ शकेल असा देव शोधण्याची इच्छा आहे. तुला चिरंतन जीवन हवे असेल, तर, तू प्रथम चिरंतन जीवनाचा स्रोत समजून घ्यायला हवास आणि देव कुठे आहे ते प्रथम जाणून घ्यायला हवेस. मी आधीच म्हटले आहे की फक्त देव म्हणजेच अपरिवर्तनीय जीवन आहे आणि फक्त देवाकडेच जीवनाचा मार्ग आहे. देव म्हणजे अपरिवर्तनीय जीवन असल्यामुळे, अशा प्रकारे तो चिरंतन जीवन आहे; फक्त देवच जीवनाचा मार्ग असल्यामुळे, तो स्वतःच चिरंतन जीवनाचा मार्ग आहे. म्हणून तू प्रथम देव कुठे आहे आणि हा चिरंतन जीवनाचा मार्ग कसा प्राप्त करावा ते समजून घेतले पाहिजेस. आता या दोन विषयांत स्वतंत्रपणे सहयोग करू या.

जर तुला खरोखर चिरंतन जीवनाचा मार्ग प्राप्त करायचा असेल आणि जर तू या शोधासाठी आतुर असशील, तर, प्रथमतः या प्रश्नाचे उत्तर दे: आज देव कुठे आहे? कदाचित तू उत्तर देशील, “अर्थात, देव स्वर्गात वसत असतो, तो तुझ्या घरात तर राहणार नाही, नाही का?” कदाचित, तू म्हणशील की देव अगदी स्पष्टपणे चराचरात वसत असतो. किंवा तू म्हणशील की देव प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात वसतो किंवा देव आध्यात्मिक जगात असतो. मी यातले काहीच नाकारत नाही, पण मला हा विषय स्पष्ट केला पाहिजे. देव मनुष्याच्या हृदयात राहतो असे म्हणणे पूर्णतः बरोबर नाही पण ते पूर्णतः चूकही नाही. त्याचे कारण असे की देवावर विश्वास असणार्‍या लोकात काही असे आहेत की ज्यांचा विश्वास खरा आहे आणि काही असे आहेत की ज्यांचा विश्वास खोटा आहे; त्यात असे काहीजण आहेत ज्यांना देवाची पसंती आहे आणि असे काही आहेत जे देवाला नापसंत आहेत; त्यात असे काही आहेत जे देवाला संतुष्ट करतात आणि असे काही आहेत ज्यांना तो वर्जित करतो; त्यात असे काही आहेत ज्यांना तो परिपूर्ण बनवतो आणि असे काही आहेत ज्यांना तो बाहेर काढून टाकतो. आणि म्हणून मी म्हणतो, देव फक्त फार मोजक्या लोकांच्या हृदयात राहतो आणि निःसंशयपणे हे असेच असतात जे देवावर खरा विश्वास ठेवतात, ज्यांना देव पसंती देतो, जे देवाला संतुष्ट करतात आणि ज्यांना देव परिपूर्ण बनवतो. अशा लोकांना देव पुढे नेतो, त्यांना देव पुढे नेत असल्याने तेच असे लोक असतात ज्यांनी आधीच देवाचा चिरंतन जीवनाचा मार्ग ऐकलेला आणि पाहिलेला आहे. ज्यांचा देवावरील विश्वास खोटा आहे, ज्यांना देवाची पसंती नाही, ज्यांना देव वर्ज्य मानतो, ज्यांना देव बाहेर काढून टाकतो—त्यांना देव नाकारणारच, ते जीवनाचा मार्गापासून वंचित राहणारच आणि देव कुठे आहे याबाबत ते अज्ञानी राहणारच. या उलट, ज्यांच्या हृदयात देव वसत असतो, त्यांना तो कुठे आहे ते ठाऊक असते. हे असे लोक असतात की ज्यांना देव चिरंतन जीवनाचा मार्ग बहाल करतो आणि ते देवाचे अनुसरण करतात. आता, तुला कळले का की देव कुठे आहे? देव मनुष्याच्या हृदयात आणि त्याच्या बाजूला, दोन्हीकडे असतो. तो केवळ आध्यात्मिक जगात आणि सर्वांच्या वरच नाही तर, अधिकतर प्रमाणात तो मनुष्यमात्र वसतो त्या पृथ्वीवर रहात असतो. आणि म्हणून शेवटच्या दिवसांच्या आगमनामुळे देवाच्या कार्याची पावले एका नव्या प्रदेशाकडे वळली आहेत. देवाचे सकळ चराचरावर सार्वभौमत्व असते आणि तो मनुष्याच्या हृदयातील मुख्य आधार असतो, आणि शिवाय तो मनुष्यमात्रातच वसतो. तो फक्त याच प्रकारे, जीवनमार्गाला मनुष्यामात्राप्रत आणू शकतो आणि मनुष्याला जीवन मार्गाप्रत नेऊ शकतो. देव पृथ्वीवर आला आहे आणि तो मनुष्यमात्रामध्ये राहत आहे ज्यायोगे मनुष्याला जीवनाचा मार्ग मिळू शकेल आणि त्याचे अस्तित्व राहील. त्याचबरोबर, मनुष्यमात्राचे व्यवस्थापन करण्यासाठी जे सहकार्य लागते त्याकरिता देव चराचरातील सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. आणि म्हणून, जर तू, देव स्वर्गात आणि मनुष्याच्या हृदयात आहे हे मानत असशील आणि तरीही, जर मनुष्यमात्रातील देवाच्या अस्तित्वाचे सत्य ओळखत नसशील तर तुला कधीच जीवन प्राप्त होणार नाही आणि कधीच जीवनाचा मार्ग मिळणार नाही.

देव स्वतःच जीवन आहे, आणि सत्य आहे, आणि त्याचे जीवन व सत्य एकाच वेळी अस्तित्वात असते. जे हे सत्य प्राप्त करू शकत नाहीत त्यांना कधीच जीवन प्राप्ती होणार नाही. सत्याचे मार्गदर्शन, पाठबळ आणि प्रबंध नसेल, तर तुला केवळ शब्द, सिद्धांत आणि मुख्य म्हणजे मृत्यूच मिळेल. देवाचे जीवन सर्वकाळ व्यापक असते आणि त्याचे सत्य अणि जीवन एकाच वेळी अस्तित्वात असते. जर तुला सत्याचे मूळ सापडत नसेल, तर, तुला जीवनातील पोषण मिळणार नाही; जर तुला जीवनातील प्रबंध मिळू शकणार नसतील, तर, तुला नकीच सत्य प्राप्ती होणार नाही आणि फक्त अनेक कल्पना आणि आभास सोडले, तर तुझे संपूर्ण शरीर दुसरे काही नाही तर मांसाचा गोळा—दुर्गंधियुक्त मांसाचा गोळा म्हणून शिल्लक राहील. लक्षात घ्या की पुस्तकातील शब्द हेच सत्य म्हणून सिद्ध होत नाहीत, इतिहासाच्या नोंदींची सत्य म्हणून पूजा होऊ शकत नाही आणि भूतकाळातील नियम आताच्या काळात देवाने उच्चारलेल्या शब्दांचे सार म्हणून उपयुक्त होऊ शकत नाही. देव पृथ्वीवर आल्यावर मनुष्यमात्रामध्ये राहिल्यावर जे व्यक्त करतो तेच सत्य, जीवन, देवाची इच्छा आणि त्याच्या विचारांची वर्तमान दिशा असते. जर तू पुरातन काळातील देवाने उच्चारलेली वचने आज लागू करत असशील, तर त्यातून तू पुराणवस्तुशास्त्रज्ञ बनतोस आणि ऐतिहासिक वारशावरील तज्ज्ञ आहेस अशीच तुझी उत्तम प्रकारची ओळख बनेल. याचे कारण असे की तुझा नेहमीच देवाने भूतकाळात केलेल्या कामाच्या काही अंशावरच विश्वास असतो, पूर्वी जेव्हा देवाने मनुष्यमात्रामध्ये कार्य केले त्या काळाच्या प्रतिमेवर विश्वास असतो आणि मागील काळात देवाने आपल्या अनुयायांना ज्या प्रकारे काही दिले त्यावर विश्वास असतो. तुझा देवाने केलेल्या आजच्या कार्याच्या मार्गावर विश्वास नसतो, देवाच्या आजच्या तेजस्वी मुद्रेवर विश्वास नसतो आणि सध्या देवाने ज्या प्रकारे सत्य व्यक्त केले आहे त्यावर विश्वास नसतो. आणि म्हणून तू निश्चितपणे, वास्तवाशी स्पर्श नसलेले, एक दिवास्वप्न पाहणारे व्यक्तिमत्व आहेस. आणि अजूनही तू मनुष्याला जीवन प्राप्त देऊ शकत नाहीत अशा शब्दांना चिकटून राहत असशील, तर, तू एक असहाय्य[अ] म्हणून शिल्लक आहेस, कारण तू अति सनातनी, अति हटवादी, अति अतर्क्य आहेस!

देह धारण केलेल्या देवाला ख्रिस्त असे म्हणतात आणि म्हणून जो ख्रिस्त लोकांना सत्य देऊ शकतो त्याला देव म्हणतात. यात काही अतिशयोक्ती नाही, कारण त्याच्याकडेच मनुष्याला अप्राप्य असा देवाचा सत्वांश आहे, देवाची विचार रचना आणि कार्यात्मक चातुर्य आहे. जे स्वतःला येशू म्हणवतात आणि तरी देवाचे कार्य करू शकत नाहीत ते अप्रामाणिक असतात. ख्रिस्त केवळ पृथ्वीवरील देवाचे प्रकटीकरणच नाही तर तो मनुष्यमात्रामध्ये आपले कार्य सुरू करून पूर्ण करणारा देवाने धारण केलेला विशिष्ट देह आहे. ह्या देहाला कुणीही मनुष्य बहिष्कृत करू शकत नाही, हा देह असा आहे की जो देवाचे पृथ्वीवरील कार्य पार पाडू शकतो, देवाची विचार रचना व्यक्त करू शकतो, देवाचे योग्य प्रतिनिधित्व करू शकतो आणि मनुष्याला जीवन देऊ शकतो. कधी ना कधी तरी, येशू ख्रिस्ताची बतावणी करणारे सारे खाली येतील, कारण जरी ते स्वतःला ख्रिस्त म्हणून घेत असले तरी त्यांच्याकडे येशू ख्रिस्ताचा जराही सत्वांश नसतो. आणि म्हणून, मी म्हणतो की येशू ख्रिस्ताची सत्यता मनुष्य ठरवू शकत नाही, तर त्याचे उत्तर स्वतः देवानेच दिले पाहिजे आणि ठरवले पाहिजे. अशा प्रकारे, जर तुला खरोखर जीवनाचा मार्ग शोधायची इच्छा असेल, तर तू प्रथमतः मान्य केले पाहिजेस की देव पृथ्वीवर येऊन मानवाला जीवनाचा मार्ग प्रदान करण्याचे कार्य करत असतो आणि तू हे मान्य करायलाच हवेस की मानवाला जीवनाचा मार्ग प्रदान करण्यासाठी तो अखेरच्या दिवसात पृथ्वीवर येत असतो. हा भूतकाळ नव्हे; हे आता आज घडते आहे.

अखेरच्या दिवसातील ख्रिस्त जीवन घेऊन येतो आणि सत्याचा टिकाऊ व चिरंतन मार्ग घेऊन येतो. सत्य हाच एक मार्ग आहे ज्यातून मनुष्याला देव समजतो आणि ज्यातून मनुष्याला देवाची पसंती मिळते. जर तू शेवटच्या दिवसातील येशू ख्रिस्ताने दिलेला जीवनाचा मार्ग धरला नाहीस, तर तुला येशूची पसंती कधीच मिळणार नाही आणि तू स्वर्गाच्या राज्याच्या द्वारात कधीच प्रवेश करण्यास पात्र ठरणार नाहीस, कारण तू इतिहासाचा कैदी आणि बाहुले, दोन्ही बनला आहेस. जे नियमांकडून, शब्दातून नियंत्रित आहेत, आणि ज्यांना इतिहासाने बेड्या घातल्या आहेत, त्यांना कधीच जीवन प्राप्त होणार नाही किंवा जीवनाचा शाश्वत मार्ग मिळणार नाही. याचे कारण असे की दिव्य सिंहासनापासून वाहणार्‍या जीवन जलाऐवजी त्यांच्यात जे काही आहे ते सर्व म्हणजे हजारो वर्षे साठलेले गढूळ पाणी आहे. ज्यांना जीवन जल मिळत नाही ते सदैव प्राणहीन बनून, सैतानाची खेळणी बनून आणि नरकाचे पुत्र बनून राहतील. तर मग त्यांना देव कसा बरे दिसेल? जर तू भूतकाळाला धरून बसण्याचाच प्रयत्न केलात, निश्चल राहून जे आहे ते तसेच ठेवण्याचा प्रयत्न केलात आणि सद्यस्थिती बदलण्याचा आणि इतिहासाला नाकारण्याचा प्रयत्न केला नाहीस, तर तू कायमच देवाच्या विरुद्ध जात नाहीस का? देवाच्या कार्याचा पल्ला उसळत्या लाटा आणि धडकणार्‍या मेघ गर्जनांसारखा खूप विस्तीर्ण आणि प्रचंड आहे—आणि तरी तू आपल्या चुकीला कवटाळून आणि काहीही न करता विनाशाची वाट पहात आहेस. अशा प्रकारे, त्या कोकराच्या पावलांचे अनुसरण करणारे म्हणून तुझा विचार कसा होऊ शकेल? तू ज्या देवाला धरून ठेवले आहेस, तो नेहमी नवलाईचा असतो आणि कधीच वृद्ध होत नसतो, हे देवाला कसे पटवून देऊ शकशील? आणि तुझ्या पिवळ्या पडलेल्या पुस्तकातील शब्द तुला नवीन युगात कसे नेऊ शकतील? ते तुला कशा प्रकारे देवाच्या कार्याचा पल्ला शोधण्याप्रत नेऊ शकतील? आणि ते तुला स्वर्गाप्रत कसे नेऊ शकतील? तू तुझ्या हातात जे धरले आहेस ते केवळ तात्पुरते समाधान देणारे शब्द आहेत; जीवन प्रदान करणारी ती सत्ये नाहीत. तू जी वचने वाचत आहेस त्यांनी फक्त तुझी जीभ समृद्ध होऊ शकते आणि ती वचने तुला मानवी जीवन समजण्यास मदत करू शकणारी नाहीत, आणि तुला परिपूर्णतेप्रत नेऊ शकणारी त्याहूनही नाहीत. ही विसंगती तुला आत्मपरीक्षण करण्याचे कारण बनत नाही का? ती वचने तुला अंतर्गत रह्स्ये लक्षात आणून देत नाहीत का? तू स्वतःच देवाला भेटण्यासाठी स्वर्गात नेण्यासाठी समर्थ आहेस का? देवाच्या आगमनाशिवाय तू देवाबरोबर कौटुंबिक आनंदाचा आस्वाद घेण्याकरता स्वतःला स्वर्गात नेऊ शकशील का? तू अजूनही स्वप्नात आहेस का? तर मग मला सुचवायचे आहे की तू स्वप्न पाहणे थांबवावेस आणि जो आता कार्यरत आहे त्याच्याकडे पाहावेस—शेवटच्या दिवसात जो आता मनुष्यमात्राला वाचवण्याचे काम करत आहे ते पाहावे. जर तू तसे केले नाहीस तर तुला सत्य कधीच मिळणार नाही आणि जीवन कधीच प्राप्त होणार नाही.

ख्रिस्ताने वदलेल्या सत्यावर विसंबून न राहता ज्यांना जीवन प्राप्त करायची इच्छा आहे ते पृथ्वीवरील सर्वात हास्यास्पद लोक होत, आणि जे ख्रिस्ताने दाखवलेला जीवन मार्ग स्वीकारत नाहीत ते एका कल्पनाविलासात हरवले आहेत. आणि म्हणून मी म्हणतो की जे शेवटच्या दिवसातील येशू ख्रिस्त मान्य करत नाहीत, त्यांना देव सदैव गर्हणीय मानील. शेवटच्या दिवसात येशू ख्रिस्त हे मनुष्याचे स्वर्गाचे द्वार आहे आणि कुणीही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. येशू ख्रिस्ताशिवाय अन्य कुणालाच देव परिपूर्ण करणार नाही. तू देवावर विश्वास ठेवतोस आणि त्यामुळे तुला त्याचे शब्द स्वीकारावे लागतील आणि त्याच्या मार्गाचे पालन करावे लागेल. सत्य आत्मसात करण्यास आणि जीवनाची व्यवस्था स्वीकारण्यास असमर्थ असताना तू फक्त कृपा मिळवण्याचाच विचार करू शकत नाहीस. येशू ख्रिस्त शेवटच्या दिवसात येतो, कारण त्याच्यावर जे खरोखर विश्वास टाकतात त्यांना जीवन प्राप्त व्हावे. जुने युग समाप्त करणे आणि नव्या युगात प्रवेश करणे यासाठी त्याचे कार्य समर्पित आहे आणि लोकांना ज्या मार्गाने नव्या युगात प्रवेश करायचा आहे, तो मार्गच त्याचे काम आहे. जर तू त्याला मान्यता द्यायला असमर्थ असशील, उलट त्याचा धिक्कार, निंदा किंवा छळ करत असशील, तर, तुला कायम जळत-पोळत राहावे लागेल आणि तू कधीच देवाच्या साम्राज्यात प्रवेश करणार नाहीस. कारण हा येशू ख्रिस्त स्वतः पवित्र आत्म्याचे व्यक्त स्वरूप आहे, देवाची अभिव्यक्ती आहे, ज्यावर देवाने पृथ्वीवर आपले काम करण्याची जबाबदारी टाकली आहे. आणि म्हणून मी म्हणतो की, जर तू देवाने शेवटच्या दिवसात जे काही सर्व केले ते स्वीकारू शकत नसशील, तर तू पवित्र आत्म्याची निंदा करत आहेस. जे कोणी पवित्र आत्म्याची निंदा करतात त्यांना मिळणारी शिक्षा सर्वाना स्पष्ट आहे. मला तुला हेही सांगायचे आहे की जर तू शेवटच्या दिवसातील येशू ख्रिस्ताला विरोध केलास, जर शेवटच्या दिवसातील येशू ख्रिस्ताला झिडकारलेस, तर तुझ्या वतीने त्याचे परिणाम भोगणारा दुसरा कोणीही असणार नाही. शिवाय, त्या दिवसापासून तुला देवाची कृपा मिळवण्याची दुसरी संधी मिळणार नाही; जरी तू स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न केलास, तरी तुला पुनः कधीही देवाची मुद्रा दिसणार नाही. कारण तू ज्याला विरोध करतोस तो एक मनुष्य नाही, तू ज्याला अव्हेरतोस तो एक क्षुद्र अस्तित्व नाही, तर तो येशू ख्रिस्त आहे. याचे परिणाम काय होतील हे तुला ठाऊक आहे का? तू केलेली ती एक लहानशी चूक नसेल, तर एक घृणास्पद गुन्हा केला असेल. म्हणून मी सर्वांना, सत्यासमोर आपले सुळे न दाखवण्याचा किंवा निष्काळजीपणे टीका न करण्याचा सल्ला देत असतो, कारण केवळ सत्यच तुला जीवन प्राप्त करून देऊ शकते, आणि सत्याशिवाय दुसर्‍या कशानेही तुला पुनर्जन्म मिळू शकत नाही आणि तू पुनः ईश्वराचा चेहरा बघू शकत नाहीस.

तळटीप:

अ. पीस ऑफ डेडवुड: एक चिनी वाक्प्रचार, अर्थ: “असहाय्य.”

मागील:  तुला माहीत होते? देवाने मनुष्यांमध्ये महान गोष्ट केलेली आहे

पुढील:  तुझ्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी पुरेशी सत्कृत्ये कर

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger