देवाच्या हाती सर्व मानवजातीच्या भवितव्याची सूत्रे आहेत
मानवी वंशाचे सदस्य आणि भक्तिपरायण ख्रिस्ती या नात्याने देवाने नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी तुमचे मन व शरीर अर्पण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी व बंधन आहे. कारण आपले संपूर्ण अस्तित्व देवातूनच निर्माण झाले आहे आणि त्याच्या सार्वभौमत्वामुळेच हे अस्तित्व टिकून आहे. जर आपले मन व शरीर देवाने नेमून दिलेल्या कार्यासाठी आणि मनुष्यमात्राच्या सन्मार्गी हेतूसाठी उद्युक्त नसेल तर देवाने नेमून दिलेल्या कार्यासाठी हुतात्मा झालेल्यांपुढे व मुख्य म्हणजे ज्याने आपल्याला सर्व काही दिले आहे अशा देवापुढे अपात्र असल्याचे आपल्या आत्म्यास वाटेल.
हे जग देवाने निर्माण केले आहे, त्याने या मानवजातीची निर्मिती केली आहे, प्राचीन ग्रीक संस्कृती आणि मानवी सभ्यतेचा तोच शिल्पकार होता. फक्त देवच मानवजातीला समजावू शकतो व फक्त देवच मानवजातीबद्दल रात्रंदिवस आस्था बाळगतो. मानवी विकास आणि प्रगती देवाच्य सर्वभौमत्वापासून वेगळी करता येत नाही व मानवजातीचा इतिहास व भविष्य देवाच्या रचनेपासून विभक्त करता येत नाही. जर तू खराखुरा ख्रिस्ती असशील तर तुला नक्की पटेल, की कुठल्याही देशाचा अथवा प्रदेशाचा उदयास्त देवाच्या रचनेनुसार होत असतो. फक्त देवालाच एखाद्या देशाचे किंवा प्रदेशाचे भवितव्य माहीत असते आणि फक्त देवच मानवजातीच्या जीवनक्रमावर नियंत्रण ठेवतो. जर मानवजातीला पुढील काळ चांगला जायला हवा असेल, एखाद्या देशाला चांगले भवितव्य हवे असेल, तर मनुष्याने नतमस्तक होऊन देवाची उपासना केली पाहिजे, देवापुढे कबुली दिली पाहिजे व पश्चात्ताप दर्शवला पाहिजे, नाही तर मनुष्याचे भविष्य व अंतिम लक्ष्य यांचा विनाश अटळ असेल.
नोहाने जेव्हा ते जहाज बांधले त्या काळाकडे वळून पहा: मनुष्य अतिशय भ्रष्ट होता, लोक देवाच्या अनुग्रहापासून दूर भरकटले होते, देवाला आता त्यांची आस्था उरली नव्हती आणि देवाने दिलेली वचने लोक विसरले होते. ते देवाच्या प्रकाशाविना अंधारात राहत होते. नंतर ते स्वभावतः स्वैराचारी बनले व त्यांनी स्वतःला हिडीस व दुष्ट आचरणात झोकून दिले होते. अशा लोकांना आता देवाचे वरदान मिळू शकत नव्हते; ते देवाचे दर्शन घेण्यास अथवा त्याची वाणी ऐकण्यास अपात्र ठरले होते, कारण त्यांनी देवाला सोडून दिले होते, त्यांना देवाने जे काही बहाल केले होते ते बाजूला सारले होते आणि ते देवाची शिकवण विसरले होते. त्यांचे हृदय देवापासून दूर भरकटले होते व असे होत असताना ते सर्व तर्कशक्ती आणि माणुसकीच्या पलीकडे जाऊन दुष्ट व दुर्गुणी होत गेले. नंतर ते विनाशाच्या आणखीच जवळ जाऊ लागले व त्यांचे देवाच्या कोपामुळे आणि त्याने दिलेल्या ताडणामुळे पतन झाले. फक्त नोहाने देवाची उपासना केली व वाईटाचा त्याग केला आणि म्हणून तो देवाचा आवाज ऐकू शकत होता व देवाच्या सूचना ऐकू शकत होता. त्याने देवाच्या सूचनांमधून व्यक्त झालेल्या वचनांनुसार जहाजाची बांधणी केली व तिथे सर्व प्रकारचे सजीव प्राणीमात्र जमा झाले होते. आणि अशा प्रकारे, सर्व काही तयारी झाल्यावर देवाने त्याचे विनाशाचे अस्त्र जगावर सोडले. फक्त नोहा व त्याच्या कुटुंबातील सात सदस्य या विनाशातून वाचले, कारण नोहा यहोवाची उपासना करायचा आणि त्याने वाईट गोष्टींचा त्याग केला होता.
आता सध्याच्या युगाकडे पहा: देवाची उपासना करणारे आणि वाईटाचा त्याग करणारे नोहासारखे, लोक आता राहिले नाहीत. तरीही देव अजूनही या मानवजातीबद्दल कृपावंत आहे व या शेवटच्या युगात तो त्यांना मुक्ती देत आहे. देवाने प्रकट व्हावे अशी कामना असणार्यांचा देव वेध घेतो. जे त्याची वचने ऐकू शकतात, जे त्याने नेमून दिलेले कार्य विसरत नाहीत आणि जे त्यांचे हृदय व शरीर त्याला अर्पण करतात, देव त्यांचा वेध घेतो. त्याच्यापुढे जे लहान मुलांप्रमाणे आज्ञाधारक असतात आणि त्याला विरोध करत नाहीत त्यांचा देव वेध घेतो. जर तू कुठल्याही शक्ती किंवा ताकदीचा अडथळा न होता देवाला समर्पित झालास, तर देव तुझ्यावर मेहेरनजर ठेवेल व तुला आशीर्वाद देईल. जर तू उच्च पदावर असशील, कीर्तीमान असशील, तुझ्याकडे भरपूर ज्ञान असेल, विपुल संपत्ती असेल आणि अनेक लोकांचे तुला पाठबळ असेल व तरीही या सर्व गोष्टी तुला देवापुढे येऊन त्याचे आदेश आणि नेमून दिलेले कार्य स्वीकारायला व देव तुला जे सांगतो ते करायला प्रतिबंध करत नसतील, तर तू या पृथ्वीतलावर जे काही करतोस ते अतिशय अर्थपूर्ण आणि मानवजातीसाठी सर्वाधिक सदाचारी उपक्रम ठरेल. जर तू तुझ्या प्रतिष्ठेपायी व स्वतःच्या उद्दिष्टांसाठी देवाचा आवाज अव्हेरलास, तर तू जे काही करतोस, देव त्यांच्याबद्दल अनिष्ट चिंतन करेल आणि त्यांना तिरस्करणीय समजेल. कदाचित तू अध्यक्ष असशील, शास्त्रज्ञ असशील, एक पाद्री असशील, एक ज्येष्ठ व्यक्ती असशील, परंतु तुझे पद कितीही उच्च असो, जर तू तुझ्या कार्यातील ज्ञान व क्षमतेवर अवलंबून रहाशील, तर तू नेहमी अपयशी ठरशील आणि नेहमी देवाच्या आशीर्वादांच्या लाभापासून वंचित रहाशील, कारण तू जे करतोस ते देव स्वीकारत नाही व तुझे काम एक सदाचार आहे असे मानत नाही किंवा तू मानवजातीच्या भल्यासाठी काम करत आहेस असे मानत नाही. तो म्हणेल, की त्याने मानवाप्रती दिलेले संरक्षण दूर झुगारण्यासाठी आणि केवळ मानवजातीचे ज्ञान व ताकद यांचा वापर करण्यासाठी तू ते सर्व काही करत आहेस आणि देवाची कृपा नाकारण्यासाठी असे केले जात आहे. तो म्हणेल, की तू मानवजातीला अंधाराकडे नेत आहेस, अंताकडे नेत आहेस व मनुष्याने ज्या ठिकाणी देव आणि त्याचा आशीर्वाद गमावला आहे अशा एका अमर्यादित अस्तित्वाच्या दिशेने नेत आहेस.
सामाजिक शास्त्रांची योजना मानवजातीच्या लक्षात आल्यापासून मनुष्याचे मन शास्त्र आणि ज्ञानाने व्यापले आहे. मग, शास्त्र व ज्ञान हीच मनुष्यावर स्वामित्व गाजवण्याची साधने झाली आहेत आणि मनुष्याकडे आता देवाची उपासना करण्यासाठी पुरेसा अवकाश राहिलेला नाही व देवाच्या उपासनेसाठी आता अनुकूल स्थिती राहिली नाही. मनुष्याच्या हृदयात देवाचे स्थान अजून खाली गेले आहे. हृदयात देव नसताना, मनुष्याचे अंतर्विश्व काळोखात गेले आहे, आशाहीन आणि रिक्त झाले आहे. नंतरच्या काळात, देवाने मानवाची निर्मिती केली या सत्याला विरोध करणारी सामाजिक शास्त्रांची, मानवी उत्क्रांतीची व इतर तत्वज्ञाने सांगण्यासाठी अनेक समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि राजकारणी व्यक्ती पुढे आल्या व त्यांनी मनुष्याच्या मनात आणि हृदयात ते विचार भरवले. आणि अशा प्रकारे ज्यांना देवाने प्रत्येकच गोष्टीची निर्मिती केली हे मान्य आहे असे लोक कमी झाले व ज्यांचा उत्क्रांतीच्या सिद्धांतावर विश्वास आहे अशा लोकांची संख्या वाढली. अधिकाधिक लोक जुन्या कराराच्या युगातील देवाचे कार्य आणि त्याची वचने यांच्या नोंदींना दंतकथा व पुराणकथा मानू लागले आहेत. देवाची महानता आणि थोरवी याबाबत तसेच, देव आहे व सर्व वस्तुमात्रावर त्याचा अंमल आहे या तत्वाबाबत लोक आता उदासीन झाले आहेत. त्यांना आता मानवजातीचे अस्तित्व आणि देशाच्या किंवा राष्ट्रांच्या भवितव्याचे काही महत्व वाटत नाही व मनुष्य फक्त खाणे, पिणे आणि चैनीचा पाठपुरावा करणे या एका पोकळ विश्वात जगत आहे. … फारच थोडे लोक स्वतःची जबाबदारी म्हणून देव आज त्याचे कार्य कुठे करत आहे याचा शोध घेत असतात अथवा तो कशा प्रकारे मनुष्याच्या गंतव्यस्थानावर नजर ठेवतो किंवा त्याची तजवीज करतो हे पाहत असतात. आणि अशा प्रकारे, मनुष्याला नकळत, मानवजातीच्या इच्छा पूर्ण करण्यास हळू हळू मानवी संस्कृती कमी समर्थ होऊ लागली व असे अनेक लोकही आहेत ज्यांना अशा जगात वावरताना वाटते, की ते जे या जगातून निघून गेलेले आहेत त्यांच्यापेक्षा कमी सुखी आहेत. अत्यंत प्रगत संस्कृती असलेल्या देशातील लोकही अशा तक्रारी सांगत असतात. कारण, राज्यकर्ते किंवा समाजशास्त्रज्ञांनी मानवी संस्कृतीच्या जतनासाठी कितीही डोकेफोड केली तरी देवाच्या मार्गदर्शनाशिवाय त्याचा काही उपयोग नाही. कुणीच मनुष्याच्या हृदयातील पोकळी भरून काढू शकत नाही, कारण कुणीच मनुष्याचे आयुष्य बनू शकत नाही आणि कुठलाही सामाजिक सिद्धांत मनुष्याला त्रास देणार्या पोकळीपासून त्याला मुक्त करू शकत नाही. शास्त्र, ज्ञान, स्वातंत्र्य, लोकशाही, फावला वेळ, सुखसोई: या गोष्टी मनुष्याला तात्पुरते समाधान देतात. या गोष्टी असल्या, तरीही मनुष्य अपरिहार्यपणे पाप करत असतो व समाजातील अन्यायाचे दुःख सोसतोच. या गोष्टी मनुष्याच्या शोध घेण्याची इच्छा आणि लालसा यांना प्रतिबंध घालू शकत नाहीत. याचे कारण असे, की मनुष्य ही देवाची निर्मिती आहे व मनुष्याने निरर्थकपणे केलेले त्याग आणि शोध यामुळे फक्त अधिक दुःखच होऊ शकते व मानवजातीने भवितव्याला कसे सामोरे जावे किंवा पुढचा मार्ग कसा आक्रमावा हे समजत नसताना, मनुष्याला सतत एका भीतीयुक्त स्थितीत रहायला भाग पाडू शकते. मनुष्याला शास्त्र आणि ज्ञानाची भीतीही वाटू लागते व रिकामपणाच्या पोकळीची तर अजून भीती वाटू लागते. या जगात, तू एखाद्या स्वतंत्र देशात राहत असलास की मानवी हक्क नसलेल्या देशात राहत असलास, तरी मानवजातीच्या नशिबात जे आहे त्यातून सुटका करून घेणे तुला अजिबात शक्य नाही. तू राज्यकर्ता असो की प्रजा, मानवजातीचे नशीब, गूढ बाबी आणि गंतव्यस्थान यांचा शोध घेण्याच्या इच्छेतून सुटका करून घेणे तुला अजिबात शक्य नाही, रिकामपणाची घाबरवून सोडणारी भीती टाळणे तर त्याहूनही कमी शक्य. सर्व मानवजातीपुढे असणार्या या घटनांना समाजशास्त्रज्ञ, सामाजिक घटना असे संबोधतात, तरी कुणीही थोर पुरूष असे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आलेला नाही. मनुष्य शेवटी मनुष्यच असतो व कुणीही मनुष्य देवाचे स्थान व जीवन यांची जागा घेऊ शकत नाही. मानवजातीला, केवळ जिथे प्रत्येकाला व्यवस्थित खायला-प्यायला मिळते, प्रत्येकजण समान आणि स्वतंत्र आहे असा न्याय्य समाज असण्याचीच गरज असते असे नाही, तर मानवजातीला देवाचा अनुग्रह् व त्याच्याद्वारे झालेली जीवनाची व्यवस्था हवी असते. फक्त जेव्हा मनुष्याला देवाने केलेली जीवनाची तरतूद आणि त्याला हवे असलेले तारण प्राप्त होते तेव्हाच मनुष्याची शोध घेण्याची कामना व आध्यात्मिक पोकळी या समस्या दूर होऊ शकतील. जर एखाद्या देशाच्या किंवा राष्ट्राच्या लोकांना देवाचे तारण आणि संगोपन प्राप्त करणे शक्य नसेल तर तो देश किंवा राष्ट्र अधोगतीच्या मार्गावर, अंधःकाराच्या दिशेने मार्गक्रमण करेल व त्यांचा देवाकडून निःपात होईल.
कदाचित तुझा देश सध्या समृद्ध होत असेल पण, जर तू तुझ्या लोकांना देवापासून दूर भरकटू दिलेस तर तो देश देवाच्या आशीर्वादापासून अधिकाधिक वंचित झाल्याचे दिसू लागेल. तुमच्या देशाची संस्कृती अधिक प्रमाणात पायाखाली चिरडली जाईल आणि लवकरच, लोक देवाविरुद्ध उठतील व स्वर्गाला शिव्याशाप देऊ लागतील. आणि म्हणून, मनुष्याच्या नकळत एखाद्या देशाच्या भवितव्याला सुरुंग लागू शकतो. शाप दिलेल्या अशा देशांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी देव अधिक ताकदवान देश उभे करेल व कदाचित त्यांना पृथ्वीतलावरून पुसूनही टाकेल. एखाद्या देशाचा किंवा राष्ट्राचा उदय अथवा अस्त कधी होईल ते, तेथील राज्यकर्ते देवाची उपासना करतात की नाही आणि ते त्यांच्या लोकांना देवाच्या जवळ जाण्यास व देवाची उपासना करण्यास उद्युक्त करतात की नाही यावरून सांगता येते. आणि तरीही, या शेवटच्या युगात, देवाचा खरोखर शोध घेणारे व देवाची उपासना करणारे लोक अधिकाधिक दुर्मिळ होत आहेत. ज्या देशात ख्रिस्तीधर्म हा राष्ट्रीय धर्म असतो त्या देशांवर देव खास कृपा करतो. तो या देशांना एकत्र आणून जगात तुलनेने अधिक नीतिमान असा एक समुदाय निर्माण करतो आणि नास्तिक देश व जे खर्याखुर्या देवाची उपासना करत नाहीत ते या नीतिमान गटाचे विरोधक बनतात. अशा प्रकारे, देवाला त्याचे कार्य करण्यासाठी मानवजातीमध्ये एक स्थान मिळते केवळ एव्हढेच नव्हे, तर देवाला विरोध करणार्या देशांवर बंधने आणि दंडात्मक कारवाई लादून नीतिमान अधिकार चालवू शकणारी राष्ट्रेही त्याच्याकडे येतात. असे असले तरी, अजूनही देवाची उपासना करण्यासाठी अधिक लोक पुढे येत नाहीत, कारण मनुष्य देवापासून खूप दूर भरकटला आहे व त्याला दीर्घ काळ देवाचा विसर पडला आहे. पृथ्वीवर फक्त नीतिमत्त्व बाळगणारे आणि अधर्माचरणाला विरोध करणारे देश उरतील. परंतु, देवाच्या इच्छेपसून ही गोष्ट फार दूरची आहे, कारण कुठ्ल्याही देशाचे शासक देवाला त्यांच्या लोकांवर राज्य करू देणार नाहीत व कुठलाही राजकीय पक्ष लोकांना देवाची उपासना करायला एकत्र आणणार नाही; देवाने प्रत्येक देशाच्या, राज्याच्या, राज्यकर्त्या पक्षाच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातही त्याचे हक्काचे स्थान गमावलेले आहे. या जगात सदाचारी शक्ती अजूनही वास्तव्य करत आहेत, पण जिथे मनुष्याच्या हृदयात देवाला स्थान नाही असे शासन कमकुवत असते. देवाच्या आशीर्वादाशिवाय, असे राजकीय क्षेत्र सैरभैर होऊ लागेल व ते एकही प्रहार झेलू शकणार नाही. मानवजातीसाठी देवाचा आशीर्वाद नसणे म्हणजे सूर्याशिवाय अस्तित्वात राहणे आहे. शासनकर्ते लोकांना कितीही दक्षतेने योगदान देत असोत, मानवजात एकत्रितरीत्या कितीही योग्य प्रकारच्या परिषदा घेऊ देत असो, यातील काहीही ती लाट परतवणार नाही की मानवजातीचे भवितव्य बदलणार नाही. मनुष्याला वाटते, की ज्या देशात लोकांना अन्न आणि वस्त्रे मिळत आहेत, ज्या देशात ते शांततेने एकमेकांबरोबर जगत आहेत तो देश चांगला व तेथे चांगले नेतृत्व आहे. परंतु, देवाला तसे वाटत नाही. त्याला वाटते, की ज्या देशात कुणीही त्याची उपासना करत नाही त्या देशाचा त्याच्या हातून निःपात व्हावा. मानवजातीची विचार करण्याची पद्धत देवाच्या पद्धतीच्या विपरीत आहे. म्हणून, एखाद्या देशाचा प्रमुख देवाची उपासना करत नसेल, तर त्या देशाचे भवितव्य शोकांतीक असेल आणि तो देश गंतव्यस्थानाशिवाय असेल.
देव मानवी राजकारणात भाग घेत नाही, परंतु, एखाद्या देशाचे अथवा राष्ट्राचे भवितव्य देवाच्या नियंत्रणात असते. देव या जगावर आणि संपूर्ण विश्वावर नियंत्रण ठेवतो. मनुष्याचे भवितव्य व देवाची योजना यांचे घट्ट नाते असते आणि कुठलीही व्यक्ती, देश किंवा राष्ट्र देवाच्या सार्वभौमत्वापासून मुक्त नसते. जर मनुष्याला त्याचे भवितव्य जाणून घ्यायचे असेल, तर त्याने देवासमोर यायला हवे. जे देवाचे अनुसरण करतात व त्याची उपासना करतात, त्यांना तो समृद्ध करेल आणि जे त्याला विरोध करतात व नाकारतात त्यांना तो अधःपात आणि विनाशाप्रत आणेल.
बायबलमधील तो प्रसंग आठवा जेव्हा देवाने सदोमाचा विनाश केला व लोटाची पत्नी एक मिठाचा स्तंभ कशी बनली तेही मनात आणा. विचार करा, कशा प्रकारे निनवेच्या लोकांनी गोणपाटात आणि राखेमध्ये जाऊन त्यांच्या पापांबद्दल पश्चात्ताप केला व ते आठवा की २,००० वर्षांपूर्वी यहूदी लोकांनी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले त्यानंतर काय झाले. यहूदी लोकांना इस्रायलमधून घालवण्यात आले आणि ते जगातील अनेक देशात पळून गेले. अनेकजण मृत्युमुखी पडले व संपूर्ण यहूदी समाजाला स्वतःच्या देशाच्या विनाशाचे अभूतपूर्व दुःख भोगायला लागले. त्यांनी देवाला एका वधस्तंभावर खिळले—एक भयंकर दुष्ट पाप केले—आणि देवाच्या व्यवस्थेला चिथावले. त्यांनी जे केले त्याची किंमत त्यांना मोजावी लागली व त्यांच्या कृत्यांचे परिणाम भोगणे त्यांना भाग पडले. त्यांनी देवाचा धिःकार केला, देवाला नाकारले आणि म्हणून त्यांच्यासमोर एकच भविष्य उरले: देवाकडून शिक्षा होणे. त्यांच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या देशावर व राष्ट्रावर आणलेल्या आपत्तीचा व संकटाचा हा कटु परिणाम होता.
आज देव त्याचे कार्य करण्यासाठी जगात परत आलेला आहे. त्याने प्रथमतः जे थांबवले ते म्हणजे हुकूमशाही राजवट: चीन—नास्तिकतेचा कट्टर बालेकिल्ला. देवाने त्याच्या शहाणपणाच्या आणि शक्तीच्या बळावर देवाने एका समुदायाला स्वतःकडे वळवलेले आहे. या काळात, चीनमधील राज्यकर्त्या पक्षाने हर प्रकारे देवाचा पिच्छा पुरवला व त्याला अपार दुःख दिले, त्याला त्याचा माथा टेकवायला जागा उरली नाही की कुठे आसरा मिळाला नाही. असे असूनही, देवाने त्याला स्वतः करायचे ते कार्य अजूनही चालू ठेवल्रे आहे. तो बोलू लागतो आणि सुवार्तेचा प्रसार करतो. कुणीच देवाच्या सर्वशक्तिमानतेची खोली मोजू शकत नाही. जिथे देवाला एक शत्रू मानतात त्या चीनमध्ये, देवाने त्याचे कार्य कधीच थांबवले नाही. उलट अजून अधिक लोकांनी त्याचे कार्य व वचनांचा स्वीकार केला आहे, कारण देव मानवजातीच्या प्रत्येक सदस्याचे जास्तीत जास्त संरक्षण करत असतो. आमचा विश्वास आहे, की देवाला जे साध्य करायचे आहे त्याच्या मार्गात कुठलाही देश किंवा सत्ता येऊ शकत नाही. जे देवाच्या कार्यात अडथळा आणतात, देवाच्या वचनाला विरोध करतात आणि देवाच्या योजनेला बाधा आणून त्यात बिघाड घडवतात, त्यांना देव शेवटी नक्कीच शिक्षा देतो. जो देवाच्या कार्याला आव्हान देतो त्याला नरकात पाठवले जाईल; जो कोणता देश देवाच्या कार्याला आव्हान देतो, त्याला नष्ट केले जाईल; जो देश देवाच्या कार्याला विरोध करण्यासाठी उभा राहील त्याला या पृथ्वीतलावरून नाहीसे केले जाईल व तो अस्तित्वात उरणार नाही. देवाचे काम पाहण्यासाठी आणि मानवजातीच्या भवितव्याकडे लक्ष देण्यासाठी, मी सर्व देशांतील, सर्व राष्ट्रांमधील व सर्व उद्योगांमधल्याही लोकांना देवाचा आवाज ऐकण्याचे आवाहन करतो. हे यादृष्टीने करावयाचे आहे की मानवजातीमध्ये देव हा सर्वाधिक पवित्र, सर्वाधिक सन्माननीय, सर्वोच्च, आणि केवळ एकमेव उपासनास्थान राहावा तसेच, सर्व मानवजातीला देवाच्या तशा आशीर्वादाखाली राहू द्यावे की जसे अब्राहमाचे वंशज यहोवाच्या अभिवचनाखाली जगले, आणि जसे, देवाची आद्य निर्मिती असलेले आदाम आणि हव्वा, एदेनच्या बगीचात राहिले.
देवाचे कार्य एखाद्या महाकाय लाटेप्रमाणे पुढे सरसावत असते. कुणीच त्याला थांबवू शकत नाही आणि कुणीच त्याची यात्रा थोपवू शकत नाही. त्याची वचने आस्थापूर्वक ऐकणारे व त्याचा शोध घेणारे व त्याच्यासाठी तहानलेले लोकच फक्त त्याच्या पावलावर पाऊल टाकू शकतात आणि त्याचा अनुग्रह स्वीकारू शकतात. जे असे करत नाहीत त्यांना प्रचंड संकटाचा व यथार्थ शिक्षेचा सामना करावा लागेल.