देवाला जाणून घेणे हा देवाची भीती बाळगण्याचा आणि वाईटापासून दूर राहण्याचा मार्ग आहे
आयुष्यभर तू देवावर कसा विश्वास ठेवला आहेस हे तुमच्यापैकी प्रत्येकाने नव्याने तपासले पाहिजे, जेणेकरून देवाचे अनुसरण करण्याच्या प्रक्रियेत, तुला खरोखरच देव समजला आहे का, खरोखर त्याचे आकलन झाले आहे का आणि तू खरोखरच देवाला ओळखले आहेस का, हे तुझ्या लक्षात येईल. तसेच विविध प्रकारच्या मनुष्यांप्रति देव कोणता दृष्टिकोन बाळगतो, देव तुझ्यावर करत असलेले कार्य हे तुला खरोखरच समजले आहे का व देव तुझ्या प्रत्येक कृतीची व्याख्या कशी करतो, हेही तुझ्या लक्षात येईल. हा देव, जो तुझ्या पाठीशी आहे, तुला प्रगतीची दिशा दाखवतो, तुझे नशीब ठरवतो आणि तुझ्या गरजा पुरवतो—सर्व लक्षात घेता, तो देव तुला किती समजला आहे? या देवाबद्दल तुला खरोखर किती माहिती आहे? तो दररोज तुझ्यावर कोणते कार्य करतो, हे तुला माहीत आहे का? त्याच्या प्रत्येक कृतीचा आधार असलेली तत्त्वे आणि उद्देश तुला माहीत आहेत का? तो तुला कसे मार्गदर्शन करतो, हे तुला माहीत आहे का? तो तुला कोणत्या माध्यमांतून पुरवतो, हे तुला माहीत आहे का? तो तुला कोणत्या पद्धतींनी मार्गदर्शन करतो, हे तुला माहीत आहे का? तो तुझ्याकडून काय प्राप्त करू इच्छितो व तो तुझ्यामध्ये काय साध्य करू इच्छितो, हे तुला माहीत आहे का? तुझ्या विविध प्रकारच्या वर्तनाबद्दल त्याचा दृष्टिकोन काय आहे, हे तुला माहीत आहे का? तू त्याचा प्रिय व्यक्ती आहेस की नाही, हे तुला माहीत आहे का? त्याचा आनंद, क्रोध, दु:ख व आल्हाद यांचे मूळ, त्यामागील विचार आणि कल्पना व त्याचे सार तुला माहीत आहे का? आणि शेवटी, तू ज्या देवावर विश्वास ठेवतोस, तो कोणत्या प्रकारचा देव आहे, हे तुला माहीत आहे का? हे व अशा प्रकारचे इतर प्रश्न याविषयी तुला कधीच समजले नाही का किंवा त्याविषयी तू कधी विचार केला नाहीस का? देवावरील तुझा विश्वास जोपासत असताना, देवाच्या वचनांचे खरे कौतुक आणि अनुभव याद्वारे त्याच्याबद्दलचे तुझे गैरसमज तू दूर केले आहेस का? देवाची शिस्त आणि ताडण प्राप्त झाल्यानंतर तू खरी आज्ञाधारकता व काळजी साध्य केली आहे का? देवाचे ताडण आणि न्याय यांच्या दरम्यान, तुला मनुष्याची बंडखोरी व सैतानी स्वभाव यांची जाणीव झाली आहे का आणि देवाच्या पवित्रतेबद्दल थोडी तरी समज प्राप्त झाली आहे का? देवाच्या वचनांच्या मार्गदर्शनाआधारे व ज्ञानाने जीवनाबद्दल नवीन दृष्टिकोन ठेवण्यास तू सुरुवात केली आहे का? देवाने पाठवलेल्या परीक्षांदरम्यान तुला मनुष्याच्या गुन्ह्यांबद्दलची त्याची असहिष्णुता जाणवली आहे का तसेच तो तुझ्याकडून काय अपेक्षा करतो आणि तो तुला कसा वाचवतो हे जाणवले आहे का? देवाबद्दल गैरसमज म्हणजे काय किंवा हा गैरसमज कसा दूर करायचा हे जर तुला माहीत नसेल, तर कोणीही असे म्हणू शकतो, की तू कधीही देवाशी खरी सहभागिता साधलेली नाहीस व तुला देव कधीच समजलेला नाही किंवा कोणी किमान असे म्हणू शकतो, की तू कधीच त्याला समजून घेण्याची इच्छा धरलेली नाहीस. जर देवाची शिस्त आणि ताडण काय आहे हे तुला माहीत नसेल, तर आज्ञापालन व काळजी म्हणजे काय हे तुला नक्कीच माहीत नाही किंवा किमान तू कधीही खऱ्या अर्थाने देवाचे आज्ञापालन केलेले नाहीस किंवा त्याची काळजी घेतलेली नाहीस. जर तू कधीच देवाचे ताडण आणि न्याय अनुभवलेला नसेल, तर त्याची पवित्रता काय आहे हे तुला निश्चितच कळणार नाही व मनुष्याची बंडखोरी म्हणजे काय याची समज तर तुला आणखी कमी असेल. जर तुझ्याठायी खरोखरच जीवनाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन नसेल किंवा जीवनात योग्य ध्येय नसेल, उलट तू तुझ्या जीवनात भविष्यातील मार्गाबाबत अजूनही संभ्रमात आणि अनिश्चिततेच्या मनस्थितीत असशील, अगदी पुढे जाण्याविषयीदेखील डळमळीत असशील, तर मग हे निश्चित आहे की तुला कधीही देवाचे ज्ञान व मार्गदर्शन मिळालेले नाही; कोणी असेही म्हणू शकतो, की तुला देवाच्या वचनांचा कधीच खऱ्या अर्थाने पुरवठा झालेला नाही. जर तू अद्याप देवाच्या कसोट्यांना सामोरे गेला नसशील, तर हे वेगळे सांगण्याची गरजच नाही, की मनुष्याच्या गुन्ह्यांबद्दल देवाची असहिष्णुता काय आहे हे तुला नक्कीच कळणार नाही किंवा देवाला तुझ्याकडून शेवटी काय अपेक्षित आहे हेही तुला समजणार नाही आणि अगदी शेवटी, मनुष्याच्या व्यवस्थापनाचे व त्याला वाचवण्याचे त्याचे कार्य आहे, हे तर बिलकुलच कळणार नाही. एखाद्या व्यक्तीने कितीही वर्षे देवावर विश्वास ठेवला असला, तरीही जर त्यांनी कधीही देवाच्या वचनांमध्ये काहीही अनुभवले नाही किंवा त्यांना काहीही जाणवले नाही, तर निश्चितच ते तारणाच्या मार्गावर चाललेले नाहीत, त्यांची देवावरील श्रद्धा निश्चितच वास्तविक आशयाविना आहे, त्यांचे देवाबद्दलचे ज्ञानदेखील निःसंशयपणे शून्य आहे आणि हे सांगण्याची गरज नाही की त्यांना देवाचा आदर करणे म्हणजे काय या सगळ्याचीच अजिबात कल्पना नाही.
देवाच्या ताब्यातील सर्व काही आणि त्याचे अस्तित्व, देवाचे मूलतत्त्व, देवाची प्रवृत्ती—हे सर्व त्याने मानवजातीला सांगितलेल्या वचनांमध्ये कळवले आहे. जेव्हा मनुष्य देवाच्या वचनांचा अनुभव घेतो, तेव्हा ती आचरणात आणण्याच्या प्रक्रियेत देव उच्चारत असलेल्या वचनांमागील हेतू मनुष्याला समजेल आणि देवाच्या वचनांचा स्रोत व पार्श्वभूमी समजेल आणि देवाच्या वचनांचा इच्छित परिणाम समजेल व त्याचे आकलन होईल. मानवजातीसाठी, सत्य आणि जीवन साध्य करण्यासाठी, देवाचे हेतू समजून घेण्यासाठी, त्याच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणण्यासाठी व देवाच्या सार्वभौमत्वाचे आणि व्यवस्थांचे पालन करण्यास सक्षम होण्यासाठी या सर्व गोष्टी मनुष्याने अनुभवल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत व साध्य केल्या पाहिजेत. ज्या वेळी मनुष्याला या गोष्टींचा अनुभव येतो, त्याचे आकलन होते आणि त्या साध्य होतात, त्याच वेळी त्याला हळुहळू देवाची जाणही प्राप्त झालेली असते व त्याच वेळी त्याला त्याच्याविषयी विविध स्तरांचे ज्ञानही प्राप्त झालेले असते. ही समज आणि ज्ञान मनुष्याने कल्पना केलेल्या किंवा रचलेल्या गोष्टीतून निर्माण होत नाही, तर तो ज्या गोष्टींची प्रशंसा करतो, अनुभवतो, स्वतः अनुभूती घेतो व पुष्टी करतो त्यातून निर्माण होते. या गोष्टींची प्रशंसा, अनुभव, अनुभूती आणि पुष्टी केल्यानंतरच मनुष्याचे देवाविषयीचे ज्ञान आशयसंपन्न होते; या वेळी मनुष्याला जे ज्ञान प्राप्त होते तेच प्रत्यक्ष, वास्तविक व अचूक असते आणि ही प्रक्रिया—म्हणजेच, त्याच्या वचनांची प्रशंसा, अनुभव, अनुभूती व पुष्टी करून त्याद्वारे खरी समज आणि ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया—म्हणजे मनुष्य व देव यांच्यातील खऱ्या सहभागितेखेरीज अन्य काहीही नाही. या प्रकारच्या सहभागितेमध्ये, मनुष्याला खरोखरच देवाचे हेतू समजतात आणि त्यांचे आकलन होते, देवाची संपत्ती व अस्तित्व खरोखर समजून येते आणि कळते, खऱ्या अर्थाने देवाचे मूलतत्त्व समजते व कळते, हळुहळू देवाची प्रवृत्ती समजते, सर्व सृष्टीवर देवाच्या वर्चस्वाच्या वस्तुस्थितीची खरी खात्री पटते व तिची अचूक व्याख्या सापडते आणि देवाची ओळख व स्थान याविषयीचा आवश्यक ठाव आणि ज्ञान त्याला प्राप्त होते. या प्रकारच्या सहभागितेमध्ये, मनुष्य टप्प्याटप्प्याने देवाबद्दलच्या त्याच्या कल्पनांमध्ये बदल करतो, आता तो त्याच्या अचानक येण्याची कल्पना करत नाही किंवा देवाबद्दलच्या त्याच्या स्वतःच्या शंकांना मुक्तपणे भरकटू देत नाही किंवा त्याच्याबद्दल गैरसमज करून घेत नाही किंवा त्याची निंदा किंवा त्याचा न्याय करत नाही किंवा त्याच्यावर संशयही घेत नाही. त्यामुळे, मनुष्याचे देवाशी कमी वाद होतील, त्याचे देवासोबत संघर्ष कमी होतील व देवाविरुद्ध बंड करण्याचे प्रसंग कमी होतील. याउलट, मनुष्याकडून देवाची काळजी घेणे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे अधिकाधिक वाढेल व देवाबद्दलचा त्याचा आदर अधिक वास्तविक आणि सखोल होईल. अशा भावैक्यामध्ये, मनुष्य सत्याची तरतूद व जीवनाचा बाप्तिस्मा साध्य करेल, एवढेच नव्हे तर त्याच वेळी त्याला देवाचे खरे ज्ञानदेखील प्राप्त होईल. अशा भावैक्यामध्ये, मनुष्य त्याच्या प्रवृत्तीत परिवर्तन घडवून तारण प्राप्त करेल, एवढेच नव्हे, तर त्याच वेळी तो निर्माण केलेल्या व्यक्तीच्या ठायी देवाविषयीचा खरा आदर आणि उपासनादेखील प्राप्त करेल. अशा प्रकारची सहभागिता प्राप्त केल्यानंतर, मनुष्याची देवावरील श्रद्धा ही यापुढे कोऱ्या कागदासारखी राहणार नाही किंवा ती केवळ तोंडदेखले वचन किंवा अंधपणे केलेले अनुसरण व व्यक्तिपूजाही उरणार नाही; केवळ अशा प्रकारच्या सहभागितेमुळे मनुष्याचे जीवन दिवसेंदिवस परिपक्वतेकडे झुकेल आणि केवळ आताच त्याच्या प्रवृत्तीत हळुहळू परिवर्तन होईल व देवावरील त्याची श्रद्धा ही अस्पष्ट आणि अनिश्चित विश्वासाकडून टप्प्याटप्प्याने खऱ्या आज्ञाधारकतेमध्ये व काळजीमध्ये, खऱ्या आदरामध्ये परिवर्तित होईल आणि देवाचे अनुसरण करण्याच्या प्रक्रियेत मनुष्य हळुहळू निष्क्रियतेपासून सक्रियतेकडे, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे प्रगती करेल; अशा प्रकारच्या सहभागितेमुळेच मनुष्याला देवाची खरी समज व आकलन प्राप्त होईल, देवाचे खरे ज्ञान प्राप्त होईल. बहुसंख्य लोकांची देवाशी खरी सहभागिता साधली गेली नसल्यामुळे, त्यांचे देवाबद्दलचे ज्ञान सिद्धांताच्या पातळीवर, शाब्दिक आणि तत्त्वांच्या पातळीवर थांबते. म्हणजेच, बहुसंख्य लोक, त्यांनी कितीही वर्षे देवावर विश्वास ठेवला असला तरीही, देवाला जाणण्याच्या बाबतीत अजूनही सुरुवातीच्या ठिकाणीच आहेत, ते त्यांच्या सरंजामी अंधश्रद्धा व कल्पनारम्य आदरांजलीच्या पारंपरिक स्वरूपाच्या पायावर अडकले आहेत. मनुष्याचे देवाविषयीचे ज्ञान त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर थांबले, याचा अर्थ ते व्यावहारिकदृष्ट्या अस्तित्वात नाही. देवाच्या स्थानाची आणि ओळखीची मनुष्याने पुष्टी करण्याखेरीज, मनुष्याची देवावरील श्रद्धा अजूनही अस्पष्ट अनिश्चिततेच्या स्थितीत आहे. असे असताना, मनुष्य देवाबद्दल कितपत खरा आदर ठेवू शकतो?
तुझा देवाच्या अस्तित्वावर कितीही दृढ विश्वास असला, तरीही यामुळे तुझे देवाबद्दलचे ज्ञान किंवा देवाबद्दलचा आदर बदलत नाही. तू त्याच्या आशीर्वादाचा व त्याच्या कृपेचा कितीही आनंद घेतला असलास, तरीही यामुळे तुझे देवाबद्दलचे ज्ञान बदलत नाही. तू तुझ्या सर्व गोष्टी पवित्र करण्यासाठी आणि तुझे सर्व काही त्याच्यासाठी वाहण्यासाठी कितीही इच्छुक असलास, तरीही यामुळे तुझे देवाविषयीचे ज्ञान बदलू शकत नाही. कदाचित देवाने उच्चारलेल्या वचनांशी तू इतका परिचित झालेला असशील किंवा तू ते मुखोद्गद करून उच्चारत असशील, तरी यामुळे तुझे देवाबद्दलचे ज्ञान बदलू शकत नाही. देवाचे अनुसरण करण्याचा मनुष्याचा कितीही हेतू असला, तरी जर त्याने कधीच देवाशी खरी सहभागिता साधली नसेल किंवा देवाच्या वचनांचा खऱ्या अर्थाने अनुभव घेतला नसेल, तर त्याचे देवाबद्दलचे ज्ञान केवळ रिक्त जागा किंवा अंतहीन दिवास्वप्न ठरेल; जरी तू देवाच्या खांद्याला खांदा लावला असशील किंवा त्याला समोरासमोर प्रत्यक्ष भेटला असशील, तरीही तुझे देवाबद्दलचे ज्ञान शून्य असेल व तुझा देवाबद्दलचा आदर हा पोकळ शब्दांपेक्षा किंवा आदर्श संकल्पनांपेक्षा अधिक नसेल.
पुष्कळ लोक देवाची वचने दिवसेंदिवस वाचण्यासाठी, अगदी त्यातील सर्व श्रेष्ठ उतारे हे सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणून काळजीपूर्वक स्मरणात ठेवण्यापर्यंत धरून ठेवतात, एवढेच नव्हे तर, देवाच्या वचनांचा सर्वत्र उपदेश करतात, इतरांना देवाची वचने प्रदान करतात आणि पुरवतात. त्यांना असे वाटते, की असे करणे म्हणजे देवाची साक्ष देणे, असे करणे म्हणजे देवाच्या खऱ्या मार्गाचे अनुसरण करणे; त्यांना असे वाटते, की असे करणे म्हणजे देवाच्या वचनांनुसार जगणे आहे, असे करणे म्हणजे त्याची वचने त्यांच्या वास्तविक जीवनात आणणे आहे, असे केल्याने त्यांना देवाची प्रशंसा प्राप्त होईल व त्यांचे तारण होईल आणि ते परिपूर्ण होतील. परंतु, ते देवाच्या वचनांचा उपदेश करत असतानाही, व्यवहारात कधीही देवाच्या वचनांचे पालन करत नाहीत किंवा देवाच्या वचनांमध्ये जे प्रकट झाले आहे त्याच्याशी स्वतःची तुलना करण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याउलट, ते फसवणूक करून इतरांकडून खुशामत व विश्वास प्राप्त करण्यासाठी, स्वतःच व्यवस्थापनात प्रवेश करण्यासाठी आणि देवाचा गौरव लुटण्यासाठी व चोरण्यासाठी देवाची वचने वापरतात. देवाच्या वचनांचा प्रसार करून मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याची त्यांना उगाचच आशा असते, जेणेकरून देवाचे कार्य आणि त्याची प्रशंसा यांचा लाभ व्हावा. किती वर्षे लोटली, परंतु हे लोक केवळ देवाची वचने सांगण्याच्या प्रक्रियेत देवाची प्रशंसा मिळवण्यास असमर्थ ठरले आहेत, देवाच्या वचनांची साक्ष देण्याच्या प्रक्रियेत त्यांनी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा हे शोधण्यात ते असमर्थ ठरले आहेत, इतरांना देवाची वचने पुरवण्याच्या व सहाय्य करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी स्वतःला सहाय्य केले नाही किंवा प्रदान केले नाही, हे सर्व करत असताना ते देवाला जाणून घेण्यास किंवा स्वतःमध्ये देवाबद्दल खरा आदर जागृत करण्यास असमर्थ आहेत; एवढेच नव्हे, तर उलट, देवाबद्दलचे त्यांचे गैरसमज दिवसेंदिवस खोलवर वाढत जातात, त्यांचा त्याच्याबद्दलचा अविश्वास अधिकाधिक गंभीर होत जातो आणि त्याच्याबद्दलच्या त्याच्या कल्पना अधिकाधिक अतिशयोक्त होत जातात. देवाच्या वचनांविषयीच्या त्यांच्या सिद्धांतांद्वारे पुरवलेले व मार्गदर्शन केले गेलेले, ते आरामदायी असल्याचे भासवतात, जणू काही सहजतेने त्यांची कौशल्ये वापरत आहेत, जणू त्यांना जीवनाचा उद्देश, त्यांचे ध्येय सापडले आहे आणि जणू त्यांनी नवीन जीवन जिंकले आहे व ते वाचवले गेले आहेत, जणू काही देवाच्या वचनांचे त्यांच्या मुखातून पठण होत आहे, त्यांनी सत्य प्राप्त केले आहे, देवाचे हेतू त्यांना समजले आहेत आणि देवाला जाणून घेण्याचा मार्ग त्यांना सापडला आहे, जणू काही देवाच्या वचनांचा उपदेश करण्याच्या प्रक्रियेत, ते अनेकदा देवासोबत समोरासमोर “आले” आहेत. तसेच, ते वारंवार रडत असतात व अनेकदा देवाच्या वचनांत “देवा” च्या नेतृत्वात असतात, ते अथकपणे त्याच्या कळकळीच्या आणि दयाळू हेतूकडे लक्ष देत असल्याचे दिसून येते व त्याच वेळी त्यांनी देवाकडून मनुष्याचे तारण आणि त्याचे व्यवस्थापन समजून घेतले आहे, त्याचे मूलतत्त्व जाणून घेतले आहे व त्याची नीतिमान प्रवृत्ती समजून घेतली आहे. या पायाआधारे, ते देवाच्या अस्तित्वावर अधिक दृढ विश्वास ठेवतात, त्याच्या उच्च स्थितीबद्दल अधिक जाणतात आणि त्याची भव्यता व श्रेष्ठता अधिक खोलवर अनुभवतात, असे दिसून येते. देवाच्या वचनांच्या वरवरच्या ज्ञानामुळे असे दिसते, की त्यांचा विश्वास वाढला आहे, दुःख सहन करण्याचा त्यांचा संकल्प बळकट झाला आहे आणि त्यांचे देवाबद्दलचे ज्ञान अधिक गहन झाले आहे. मात्र त्यांना हे कळत नाही, की जोपर्यंत त्यांना देवाच्या वचनांचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही, तोपर्यंत त्यांचे देवाविषयीचे सर्व ज्ञान व त्याच्याविषयीच्या कल्पना या त्यांचे स्वतःचे मनोराज्य आणि अटकळी यातूनच येतात. त्यांची श्रद्धा देवाच्या कोणत्याही परीक्षेत टिकून राहणार नाही, त्यांचे तथाकथित अध्यात्म आणि पातळी देवाने घेतलेल्या परीक्षेत किंवा तपासणीत अजिबातच टिकणार नाही, त्यांचा संकल्प म्हणजे केवळ वाळूचा किल्ला आहे व देवाविषयी त्यांचे तथाकथित ज्ञान हे त्यांच्या कल्पनेच्या चित्रापेक्षा अधिक काही नाही. किंबहुना, या लोकांनी, ज्यांनी देवाच्या वचनांसाठी खूप प्रयत्न केले आहेत, त्यांना कधीच कळले नाही की खरी श्रद्धा काय आहे, खरी आज्ञाधारकता काय आहे, खरी काळजी काय आहे किंवा देवाचे खरे ज्ञान काय आहे. ते सिद्धांत, कल्पनाशक्ती, ज्ञान, देणगी, परंपरा, अंधश्रद्धा आणि मानवजातीची नैतिक मूल्येदेखील घेतात व त्यांना देवावर विश्वास ठेवण्यासाठी आणि त्याचे अनुसरण करण्यासाठी “भांडवल” व “शस्त्र” बनवतात, त्यांना अगदी देवावर त्यांच्या विश्वासाचा आणि त्याच्या अनुसरणाचा पाया बनवतात. त्याच वेळी, ते हे भांडवल व शस्त्रेदेखील घेतात आणि त्यांना जादूचे तावीज बनवतात ज्याद्वारे ते देवाला ओळखतात व देवाच्या तपासण्या, परीक्षा, ताडण आणि न्याय यांचा सामना करतात व त्यांना सामोरे जातात. सरतेशेवटी, ते जे मिळवतात त्यामध्ये धार्मिक अर्थ, सरंजामशाही अंधश्रद्धा आणि कल्पनारम्य, विचित्र व गूढ असलेल्या देवाबद्दलच्या निष्कर्षांखेरीज दुसरे काहीही नसते. देवाला जाणून घेण्याचा आणि परिभाषित करण्याचा त्यांचा मार्ग केवळ वरच्या स्वर्गावर किंवा आकाशातील वृद्ध मनुष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांप्रमाणेच आहे, तर देवाची वास्तविकता, त्याचे सार, त्याची प्रवृत्ती, त्याची मालमत्ता व अस्तित्व इत्यादी—त्या सर्व गोष्टी ज्या प्रत्यक्ष देवाशी संबंधित आहेत—त्या गोष्टी समजण्यास त्यांचे ज्ञान अयशस्वी झाले आहे, ज्यापासून त्यांचे ज्ञान पूर्णपणे अगदी उत्तर आणि दक्षिण ध्रुवासारखे विभक्त झाले आहे. अशाप्रकारे, जरी हे लोक देवाच्या वचनांच्या तरतूदी व पोषणाखाली जगत असले तरी, तरीही ते खरोखर देवाची भीती बाळगण्याच्या आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्याच्या मार्गावर चालण्यास असमर्थ आहेत. याचे खरे कारण हे आहे, की ते कधीही देवाशी परिचित झाले नाहीत, त्यांचा त्याच्याशी कधीही खरा संपर्क किंवा सहभागिता झालेली नाही व म्हणून देवाशी परस्पर सामंजस्य प्राप्त करणे किंवा स्वतःमध्ये देवाचे अनुसरण करण्याचा किंवा त्याची उपासना करण्याचा खरा विश्वास जागृत करणे त्यांना अशक्य आहे. त्यांनी अशाप्रकारे देवाच्या वचनांचा विचार केला पाहिजे, त्यांनी अशा प्रकारे देवाचा आदर केला पाहिजे—हा दृष्टिकोन आणि ही वृत्ती यामुळे त्यांना त्यांच्या प्रयत्नांपासून रिकाम्या हाताने परत येणे नशिबी आले आहे, तसेच त्यांना अनंतकाळपर्यंत देवाची भीती वाटण्याच्या व वाईटापासून दूर राहण्याच्या मार्गावर कधीही न जाणे नशिबी आले आहे. ते ज्या ध्येयाचा पाठलाग करत आहेत आणि ज्या दिशेने ते जात आहेत ते हे दर्शवते, की ते अनंतकाळपर्यंत देवाचे शत्रू आहेत व अनंतकाळपर्यंत ते कधीही तारण प्राप्त करू शकणार नाहीत.
ज्याने बरीच वर्षे देवाचे अनुसरण केले आहे आणि अनेक वर्षे त्याच्या वचनांच्या तरतुदीचा आनंद घेतला आहे, त्यांची देवाची व्याख्या मूलत: मूर्तीसमोर नतमस्तक झालेल्या व्यक्तीसारखीच असेल, तर या व्यक्तीला देवाच्या वचनांची वास्तविकता प्राप्त झालेली नाही, असा याचा अर्थ होईल. याचे कारण असे आहे, की त्यांनी देवाच्या वचनांच्या वास्तविकतेत प्रवेश केलेला नाही व या कारणामुळेच मानवजातीची वास्तविकता, सत्य, हेतू आणि मागण्या, म्हणजेच देवाच्या वचनांमध्ये अंतर्भूत असलेले सर्व काही, या सर्वांचा त्या व्यक्तीशी काहीही संबंध नाही. म्हणजेच असे म्हणायचे आहे, की अशा व्यक्तीने देवाच्या वचनांच्या वरवरच्या अर्थावर कितीही कठोर परिश्रम केले, तरीही ते सर्व व्यर्थ आहे: कारण ते ज्याचा पाठलाग करतात ती केवळ वचने आहेत, त्यांना जे मिळेल तीही केवळ वचनेच असतील. देवाने उच्चारलेली वचने बाह्य स्वरूपात सरळ असोत किंवा त्यात गहन अर्थ दडलेला असो, ती सर्व सत्ये आहेत जी मनुष्य आपल्या जीवनात प्रवेश करत असताना अपरिहार्य आहेत; ते जिवंत पाण्याचे झरे आहेत जे मनुष्याला आत्मा व देह दोन्हींमध्ये जगण्यास सक्षम करतात. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व; म्हणजेच त्याचे दैनंदिन जीवन चालवण्यासाठी तत्त्वे आणि पंथ; त्याने तारणासाठी स्वीकारणे आवश्यक असलेला मार्ग, त्याचे ध्येय व दिशा; देवासमोर निर्मिलेला जीव म्हणून त्याने आत्मसात करावयाचे सत्य; आणि मनुष्य देवाची आज्ञा पाळतो व त्याची उपासना करतो याबद्दलचे प्रत्येक सत्य हे सर्व ते पुरवतात. ते मनुष्याच्या जगण्याची हमी आहेत, ते मनुष्याची रोजीरोटी आहेत आणि ते मनुष्याला मजबूत करणारा व उभे राहण्यास समर्थ बनवणारा बळकट आधारदेखील आहेत. ते सत्याच्या वास्तविकतेने समृद्ध आहेत ज्याद्वारे मानवजात सामान्य मानवतेचे जीवन जगते, सत्याने समृद्ध आहेत ज्याद्वारे मानवजात भ्रष्टाचारापासून मुक्ती प्राप्त करते आणि सैतानाच्या सापळ्यांपासून मुक्त होते, ती अथक शिकवणी, उपदेश, प्रोत्साहन व सांत्वन यांनी समृद्ध आहे, जी निर्माणकर्ता त्याने निर्मिलेल्या मानवजातीला देत असतो. ते सर्व दीप आहेत जे सर्व सकारात्मक गोष्टी समजून घेण्यासाठी मनुष्यांना मार्गदर्शन आणि प्रबोधन करतात, ते हमी आहेत जी खात्री देते, की मनुष्यमात्र जगतील व जे काही नीतिमान आणि चांगले आहे ते सर्व त्यांना प्राप्त होईल, ते निकष आहेत, ज्याआधारे सर्व लोक, घटना व वस्तू जोखल्या जातात आणि मार्गक्रमणाचे दिशादर्शक आहेत जे लोकांना तारण व प्रकाशाच्या मार्गाकडे नेतात. केवळ येथेच देवाच्या वचनांच्या व्यावहारिक अनुभवानेच मनुष्याला सत्य आणि जीवन प्राप्त होऊ शकते; केवळ इथेच मनुष्याला समजू शकते, की सामान्य मानवता म्हणजे काय, अर्थपूर्ण जीवन म्हणजे काय, अस्सल निर्मित जीव म्हणजे काय, देवाची खरी आज्ञाधारकता म्हणजे काय; केवळ येथेच मनुष्याला समजू शकते, की त्याने देवाची काळजी कशी घ्यावी, निर्मिलेला जीव म्हणून कर्तव्य कसे पार पाडावे व वास्तविक मनुष्याचे स्वरूप कसे प्राप्त करावे; केवळ इथेच मनुष्याला समजू शकते, की खरी श्रद्धा आणि खरी उपासना म्हणजे काय; केवळ इथेच मनुष्याला समजू शकते, की आकाश व पृथ्वी आणि सर्व गोष्टींचा शासक कोण आहे; केवळ इथेच मनुष्याला समजू शकते, की सर्व सृष्टीचा स्वामी कोणत्या माध्यमांद्वारे सृष्टीवर राज्य करतो, सृष्टीचे नेतृत्व करतो आणि सृष्टीला सर्व पुरवतो; आणि केवळ येथेच मनुष्याला ते साधन समजू शकते ज्याद्वारे सर्व सृष्टीचा स्वामी अस्तित्वात आहे, प्रकट होतो व कार्य करतो. देवाच्या वचनांच्या वास्तविक अनुभवापासून वेगळे, असे देवाच्या वचनांचे आणि सत्याचे खरे ज्ञान किंवा अंतर्दृष्टी मनुष्याला नसते. असा मनुष्य केवळ जिवंत शव आहे, एक परिपूर्ण कवच आहे व निर्माणकर्त्याशी संबंधित सर्व ज्ञानाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. देवाच्या दृष्टीने, अशा मनुष्याने कधीही त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही किंवा त्याने कधीही त्याचे अनुसरण केलेले नाही आणि म्हणून देव त्याला त्याचा विश्वासणारा किंवा त्याचा अनुयायी म्हणून ओळखत नाही, एक अस्सल निर्मित जीव म्हणून तर बिलकुलच नाही.
निर्माणकर्ता कोण आहे, मनुष्याची निर्मिती कशासाठी केली गेली आहे, निर्मिलेला जीव म्हणून जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात व सर्व सृष्टीच्या परमेश्वराची उपासना कशी करावी, हे निर्मिलेल्या जीवाने समजून घेणे गरजेचे आहे, त्याने निर्माणकर्त्याचे हेतू, इच्छा आणि मागण्या समजून घेणे, जाणून घेणे व त्याची कदर करणे आवश्यक आहे आणि निर्माणकर्त्याच्या खऱ्या मार्गानुसार—म्हणजेच देवाची भीती बाळगून व वाईटापासून दूर राहून—कार्य करणे आवश्यक आहे.
देवाची भीती बाळगणे म्हणजे काय? आणि वाईट कसे टाळता येईल?
“देवाची भीती बाळगणे” याचा अर्थ अनाम भीती वा दहशत नव्हे, त्याला टाळणे किंवा दूर ठेवणेही नव्हे किंवा ती मूर्तिपूजा किंवा अंधश्रद्धाही नव्हे. तर, ती प्रशंसा, आदर, विश्वास, समज, काळजी, आज्ञापालन, अभिषेक, प्रेम, तसेच बिनशर्त व बिनतक्रार उपासना, परतफेड आणि अधीनता आहे. देवाच्या खऱ्या ज्ञानाखेरीज, मानवजातीला खरी प्रशंसा, खरा विश्वास, खरी समज, खरी काळजी किंवा आज्ञापालन मिळणार नाही, तर केवळ भीती व अस्वस्थता, केवळ शंका, गैरसमज, चुकणे आणि टाळणे मिळेल; देवाच्या खऱ्या ज्ञानाखेरीज, मानवजातीला खरा अभिषेक व परतफेड मिळणार नाही; देवाच्या खऱ्या ज्ञानाखेरीज, मानवजातीला खरी उपासना आणि अधीनता मिळणार नाही, तर केवळ अंध मूर्तिपूजा व अंधश्रद्धा असेल; देवाच्या खऱ्या ज्ञानाखेरीज, मानवजाती देवाच्या खऱ्या मार्गानुसार कार्य करू शकत नाही किंवा देवाची भीती बाळगू शकत नाही किंवा वाईट गोष्टींपासून दूर राहू शकत नाही. याउलट, मनुष्य करतो ती प्रत्येक कृती आणि वर्तन हे बंडखोरी व अवहेलनेने, त्याच्याबद्दलचे निंदनीय आरोप आणि अपमानकारक निर्णयांनी व सत्याच्या आणि देवाच्या वचनांच्या खऱ्या अर्थाच्या विरुद्ध चालणाऱ्या वाईट वर्तनाने भरलेले असेल.
एकदा का मानवजातीने देवावर खरा विश्वास ठेवला, की ते त्याचे मनापासून अनुसरण करतील व त्याच्यावर अवलंबून राहतील; केवळ देवावरचा खरा विश्वास आणि अवलंबित्वानेच मानवजातीला खरी समज व आकलन प्राप्त होऊ शकते; देवाच्या वास्तविक आकलनाबरोबरच त्याच्याविषयीची खरी काळजी येते; केवळ देवाविषयीची खरी काळजी असेल तरच मानवजातीला खरी आज्ञाधारकता प्राप्त होऊ शकते; केवळ देवाविषयी प्रामाणिक आज्ञाधारकतेनेच मानवजातीला खरी पवित्रता प्राप्त होऊ शकते; केवळ देवाप्रति खऱ्या पवित्रतेमुळेच मानवजातीला बिनशर्त आणि बिनतक्रार परतफेड प्राप्त होऊ शकते; केवळ खरा विश्वास आणि अवलंबित्व, खरी समज व काळजी, खरे आज्ञापालन, खरी पवित्रता आणि परतफेड याद्वारेच मानवजातीला खऱ्या अर्थाने देवाची प्रवृत्ती व मूलतत्त्व जाणून घेता येईल आणि निर्माणकर्त्याची ओळख जाणून घेता येईल; जेव्हा ते खरोखरच निर्माणकर्त्याला ओळखू लागतात तेव्हाच मानवजातीमध्ये खरी उपासना व अधीनता जागृत होऊ शकते; जेव्हा त्यांच्या ठायी खरी उपासना आणि निर्माणकर्त्याप्रति अधीनता असेल तेव्हाच मानवजातीला त्यांचे वाईट मार्ग बाजूला ठेवता येतील, म्हणजेच वाईटापासून दूर राहता येईल.
ही “देवाची भीती बाळगण्याची व वाईटापासून दूर राहण्याची” संपूर्ण प्रक्रिया आहे आणि देवाची भीती बाळगण्याची व वाईटापासून दूर राहण्याची ही संपूर्ण सामग्रीदेखील आहे. देवाची भीती प्राप्त करण्यासाठी आणि वाईटापासून दूर राहण्यासाठी हाच मार्ग आहे.
“देवाची भीती बाळगणे व वाईटापासून दूर राहणे” आणि देवाला जाणणे हे असंख्य धाग्यांनी अविभाज्यपणे जोडलेले आहेत व त्यांच्यातील संबंध स्वयंस्पष्ट आहेत. जर एखाद्याला वाईटापासून दूर राहायचे असेल तर प्रथम त्याने देवाचे खरे भय बाळगले पाहिजे; जर एखाद्याला देवाचे खरे भय बाळगायचे असेल तर प्रथम देवाचे खरे ज्ञान असणे आवश्यक आहे; जर एखाद्याला देवाचे ज्ञान मिळवायचे असेल तर प्रथम देवाची वचने अनुभवली पाहिजेत, देवाच्या वचनांच्या वास्तवात प्रवेश केला पाहिजे, देवाचे ताडण आणि शिस्त, त्याचे ताडण व न्याय अनुभवला पाहिजे; जर एखाद्याला देवाच्या वचनांचा अनुभव घ्यायचा असेल, तर त्याने प्रथम देवाच्या वचनांना सामोरे जावे, देवाला सामोरे जावे आणि लोक, घटना व वस्तूंचा समावेश असलेल्या सर्व प्रकारच्या वातावरणात देवाची वचने अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देण्याची देवाला विनंती करावी; जर एखाद्याला देवाला आणि देवाच्या वचनांना सामोरे जायचे असेल तर प्रथम साधे व प्रामाणिक हृदय, सत्य स्वीकारण्याची तयारी, दुःख सहन करण्याची इच्छा, वाईटापासून दूर राहण्याचा संकल्प आणि धैर्य व एक अस्सल निर्मित जीव बनण्याची आकांक्षा बाळगणे आवश्यक आहे…. अशाप्रकारे, टप्प्याटप्प्याने पुढे जात तू देवाच्या अधिक जवळ जाशील, तुझे अंतःकरण अधिकाधिक शुद्ध होत जाईल आणि तू देवाला ओळखण्याची परिणती म्हणून तुझे जीवन व जिवंत असण्याचे मोल अधिक अर्थपूर्ण आणि तेजस्वी होईल. तुला असे वाटेपर्यंत की निर्माणकर्ता आता एक कोडे राहिलेला नाही, निर्माणकर्ता तुझ्यापासून कधीही लपून राहिलेला नाही, निर्माणकर्त्याने कधीही त्याचा चेहरा तुझ्यापासून लपवलेला नाही, निर्माणकर्ता तुझ्यापासून अजिबात दूर नाही, निर्माणकर्ता आता तो नाही ज्याची तू तुझ्या विचारांमध्ये सतत आकांक्षा बाळगतोस, पण तुझ्या भावना तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, तो खरोखर तुझ्या डावीकडे व उजवीकडे उभा आहे, तुला जीवन देत आहे आणि तुझे प्राक्तन नियंत्रित करत आहे. तो दूर क्षितिजावर नाही किंवा त्याने स्वतःला ढगांमध्ये लपवलेलेही नाही. तो तुझ्या बाजूलाच आहे, तुझ्या सर्वार्थाचे नियंत्रण करत आहे, तुझ्याकडे असलेले जे काही आहे, ते तोच आहे व तुझ्याकडे जे आहे ते केवळ तोच आहे. असा देव तुला त्याच्यावर अंतःकरणापासून प्रेम करण्याची, त्याला चिकटून राहण्याची, त्याला जवळ धरण्याची, त्याची प्रशंसा करण्याची, त्याला गमावण्याची भीती बाळगण्याची परवानगी देतो आणि यापुढे त्याचा त्याग करण्यास, त्याची अवज्ञा करण्यास किंवा यापुढे त्याला टाळण्यास वा दूर ठेवण्यास नाखुश असण्याची परवानगी देतो. त्याची काळजी घेणे, त्याची आज्ञा पाळणे, तो तुला देतो त्या सर्व गोष्टींची परतफेड करणे व त्याच्या अधिपत्याला अधीन राहणे केवळ एवढीच तुझी इच्छा आहे. तू त्याच्याकडून मार्गदर्शन घेण्यास, प्रदान करण्यास, देखरेख करण्यास आणि पाळण्यास यापुढे नकार देणार नाहीस, तो तुझ्यासाठी जे हुकूम देतो व आदेश देतो ते यापुढे नाकारणार नाहीस. तुला केवळ त्याचे अनुसरण करायचे आहे, त्याच्या सहवासात त्याच्या सभोवताली राहायचे आहे; तुला केवळ तुझे एकमेव जीवन म्हणून तुझा एकमेव प्रभू म्हणून, एकमेव देव म्हणून त्याचा स्वीकार करण्याची इच्छा आहे.
१८ ऑगस्ट २०१४