अध्याय २०

माझ्या घरातील संपत्ती मोजण्यापलीकडे आणि अथांग आहे, तरीही मनुष्य माझ्याकडे त्यांचा उपभोग घेण्यासाठी कधीच आला नाही. मनुष्य एकट्याने स्वतः आनंद घेण्यास असमर्थ आहे किंवा स्वतःचे प्रयत्न वापरून स्वतःचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे; त्याऐवजी, त्याने नेहमी इतरांवर विश्वास ठेवला आहे. मी ज्यांच्याकडे पाहतो त्यापैकी कोणीही मला मुद्दाम व थेट शोधले नाही. ते सर्व इतरांच्या आग्रहाने माझ्यासमोर येतात, बहुसंख्य लोकांचे अनुसरण करतात आणि ते किंमत मोजण्यास अथवा त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी वेळ घालवण्यास तयार नसतात. म्हणूनच, मनुष्यांमध्ये, कोणीही वास्तविकतेत कधीही जगले नाही व सर्व लोक निरर्थक जीवन जगतात. मनुष्याच्या प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या पद्धती आणि चालीरीतींमुळे, सर्व लोकांचे शरीर पृथ्वीच्या मातीच्या गंधाने भरलेले आहेत. परिणामी, मनुष्य जगाच्या विनाशाबद्दल सुन्न, असंवेदनशील झाला आहे आणि त्याऐवजी तो या गोठलेल्या जगात स्वतःला आनंदात ठेवण्यात व्यग्र आहे. मनुष्याच्या जीवनात किंचितही प्रेमळपणा नाही व त्यात मानवतेचा किंवा प्रकाशाचा कोणताही मागमूस नाही—तरीही तो नेहमी आत्ममग्न राहिला आहे, आयुष्यभर मूल्यहीन राहिला आहे ज्यामध्ये तो काहीही साध्य न करता धावपळ करतो. काही क्षणातच, मृत्यूचा दिवस जवळ येतो आणि मनुष्य वाईट पद्धतीने मरण पावतो. या जगात, त्याने कधीही काहीही साध्य केले नाही किंवा काहीही प्राप्त केले नाही—तो घाईघाईने येथे येतो व घाईघाईने निघून जातो. माझ्या नजरेत असलेल्यांपैकी कोणीही कधीही काहीही आणले नाही अथवा काहीही घेतले नाही आणि म्हणूनच मनुष्याला वाटते, की जग अन्यायकारक आहे. तरीही कोणीही घाईघाईने निघून जायला तयार नाही. ते फक्त त्या दिवसाची वाट पाहत आहेत, जेव्हा स्वर्गातून माझी प्रतिज्ञा अचानक मनुष्यामध्ये येईल, जेव्हा ते भरकटलेले असतील, तेव्हा त्यांना पुन्हा एकदा शाश्वत जीवनाचा मार्ग पाहू देईल. अशा प्रकारे, मनुष्य माझ्या प्रत्येक कृत्यावर व कृतीवर लक्ष केंद्रित करतो, जेणेकरून मी त्याच्यासाठी केलेली प्रतिज्ञा खरेच पाळली आहे की नाही हे तो पाहू शकेल. जेव्हा तो दुःखात असतो किंवा अत्यंत वेदना सहन करतो अथवा कसोट्यांनी ग्रासलेला असतो आणि कोसळण्याच्या अवस्थेत असतो, तेव्हा मनुष्य त्याच्या जन्माच्या दिवसाला शाप देतो, जेणेकरून तो लवकरात लवकर त्याच्या त्रासातून बाहेर पडू शकेल व दुसर्‍या आदर्श ठिकाणी जाऊ शकेल. पण जेव्हा कसोट्या पूर्ण होतात, तेव्हा मनुष्य आनंदाने भरून जातो. तो पृथ्वीवर त्याचा जन्मदिवस साजरा करतो आणि त्याच्या जन्मदिनी मी त्याला आशीर्वाद द्यावा अशी त्याची इच्छा असते; यावेळी, मनुष्य त्याच्यावर दुसर्‍यांदा मृत्यू येईल या भीतीने भूतकाळातील शपथांचा उल्लेख करत नाही. जेव्हा माझे हात जग निर्माण करतात, तेव्हा लोक आनंदाने नाचतात, ते दुःखी राहत नाहीत व ते सर्व माझ्यावर अवलंबून असतात. जेव्हा मी माझ्या हातांनी माझा चेहरा झाकतो आणि लोकांना जमिनीखाली दाबतो, तेव्हा त्यांना लगेचच श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो व ते जगू शकत नाहीत. मी त्यांचा नाश करेन या भीतीने ते सर्व माझा धावा करतात, कारण मला गौरव प्राप्त झालेला दिवस पाहण्याची त्यांची इच्छा असते. मनुष्य माझा दिवस त्याच्या अस्तित्वाचे भांडवल म्हणून घेतो आणि मानवजात आजपर्यंत टिकून आहे कारण माझा गौरव कधी होईल तो दिवस पाहण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. माझ्या मुखाने दिलेला आशीर्वाद असा आहे, की जे शेवटच्या दिवसांत जन्म घेतात ते सर्व इतके भाग्यवान आहेत, की माझे सर्व वैभव पाहू शकतील.

युगानुयुगे, अनेकजण निराशेने, अनिच्छेने या जगातून निघून गेले आहेत आणि अनेकजण आशा व विश्वासाने या जगात आले आहेत. मी अनेकांच्या येण्याची व्यवस्था केली आहे आणि अनेकांना पाठवून दिले आहे. माझ्या हाताखालून असंख्य लोक गेले आहेत. पुष्कळ आत्मे नरकात टाकले गेले आहेत, पुष्कळ देहात जगले आहेत व पुष्कळ मरण पावले आहेत आणि पृथ्वीवर पुनर्जन्म घेऊन आले आहेत. तरीही त्यांच्यापैकी कोणालाही आज राज्याच्या आशीर्वादाचा आनंद घेण्याची संधी मिळाली नाही. मी मनुष्याला खूप काही दिले आहे, तरीही त्याने थोडेच प्राप्त केले आहे, कारण सैतानाच्या सैन्याच्या हल्ल्यामुळे त्याला माझ्या सर्व संपत्तीचा आनंद घेता आला नाही. त्याला केवळ त्या संपत्तीकडे पाहण्याचे भाग्य लाभले आहे, परंतु त्या संपत्तीचा पूर्ण आनंद घेता आला नाही. स्वर्गाची संपत्ती मिळवण्यासाठी मनुष्याने कधीही त्याच्या शरीरातील खजिना शोधला नाही व म्हणूनच मी त्याला दिलेले आशीर्वाद त्याने गमावले आहेत. मनुष्याचा आत्मा हीच त्याला माझ्या आत्म्याशी जोडणारी आंतरिक शक्ती नाही का? मनुष्याने मला त्याच्या आत्म्याशी का जोडले नाही? तो देहाने माझ्या जवळ येतो, तरीही आत्म्याने असे करण्यास असमर्थ का आहे? माझा खरा चेहरा देहाचा चेहरा आहे का? मनुष्याला माझे मूलतत्त्व का कळत नाही? मनुष्याच्या आत्म्यामध्ये खरोखरच माझा कोणताही अंश नव्हता का? मी मनुष्याच्या आत्म्यामधून पूर्णपणे नाहीसा झालो आहे का? जर मनुष्य आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करत नसेल, तर तो माझे हेतू कसा समजून घेईल? मनुष्याच्या दृष्टीने, आध्यात्मिक क्षेत्रात थेट प्रवेश करू शकेल असे काही आहे का? अनेक वेळा मी मनुष्याला माझ्या आत्म्याने हाक मारली आहे, तरीही मी त्याला दुसर्‍या जगात घेऊन जाईन या भीतीने मनुष्य दुरूनच मी त्याला टोचल्यासारखे वागतो. अनेक वेळा मी मनुष्याच्या आत्म्याची विचारपूस केली आहे, तरीही तो पूर्णपणे गाफील राहतो, मी त्याच्या घरात प्रवेश करेन आणि त्याचे सर्व सामान हिरावून घेईन याची तीव्र भीती बाळगतो. अशा प्रकारे, तो मला बाहेरच रोखतो, मला थंड, घट्ट बंद असलेल्या दरवाजासमोर सोडून जातो. पुष्कळ वेळा मनुष्य पडला आहे व मी त्याला वाचवले आहे, तरीही जागा झाल्यावर तो लगेच मला सोडून जातो आणि माझ्या प्रेमाचा स्पर्श न होता, माझ्यावर पहारा ठेवतो; जणू काही मी मनुष्याच्या हृदयाला कधीच प्रेमाची उब दिलेली नाही. मनुष्य हा भावनाशून्य, निर्दयी प्राणी आहे. जरी तो माझ्या मिठीने उबदार झाला असला, तरी त्याला कधीच फार काही फरक पडला नाही. मनुष्य क्रूर पर्वतासारखा आहे. मानवजातीच्या माझ्या सर्व प्रेमाची त्याने कधीच कदर केली नाही. तो माझ्याकडे यायला तयार नाही, पर्वतांमध्ये राहणे पसंत करतो, जेथे तो जंगली श्वापदांचा धोका सहन करतो—तरीही तो माझा आश्रय घेण्यास तयार नाही. मी कोणत्याही मनुष्याला सक्ती करत नाही: मी फक्त माझे कार्य करतो. तो दिवस येईल, जेव्हा मनुष्य महासागरातून पोहत माझ्या बाजूला येईल, जेणेकरून तो पृथ्वीवरील सर्व संपत्तीचा आनंद घेऊ शकेल व समुद्राकडून त्याला गिळंकृत केले जाण्याची जोखीम दूर होईल.

जसजशी माझी वचने पूर्ण होतात तसतसे पृथ्वीवर हळूहळू राज्य निर्माण होते आणि मनुष्य हळूहळू सामान्यतेकडे परत येतो व अशा प्रकारे पृथ्वीवर माझ्या हृदयातील राज्य स्थापित होते. राज्यात, देवाचे सर्व लोक सामान्य मनुष्याचे जीवन पुनर्प्राप्त करतात. अत्यंत थंड हिवाळा निघून गेला आहे, जगातील शहरांमध्ये वसंत ऋतू आला आहे, जेथे वसंत ऋतु वर्षभर टिकतो. यापुढे लोकांना मनुष्याच्या उदास, दयनीय जगाचा सामना करावा लागणार नाही आणि यापुढे ते मनुष्याच्या जगाची थंडी सहन करणार नाहीत. लोक एकमेकांशी लढत नाहीत, देश एकमेकांविरुद्ध युद्ध करत नाहीत, आता नरसंहार व नरसंहारातून वाहणारे रक्त नाही; सर्व देश आनंदाने भरलेले आहेत आणि मनुष्यांमध्ये सर्वत्र प्रेमळपणा आहे. मी जगभर फिरतो, मी माझ्या सिंहासनावरून आनंद घेतो व मी ताऱ्यांमध्ये राहतो. देवदूत मला नवीन गाणी आणि नवीन नृत्य देतात. यापुढे त्यांच्या स्वतःच्या नाजूकपणामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत नाहीत. यापुढे मला माझ्यासमोर, देवदूतांचा रडण्याचा आवाज ऐकू येत नाही व यापुढे कोणीही माझ्याकडे त्रासाची तक्रार करत नाही. आज, तुम्ही सर्व माझ्यासमोर जगता; उद्या, तुम्ही सर्व माझ्या राज्यात अस्तित्वात असाल. मी मनुष्याला दिलेला हा सर्वात मोठा आशीर्वाद नाही का? आज तुम्ही दिलेल्या किंमतीमुळे तुम्हाला भविष्यातील आशीर्वादांचा वारसा मिळेल आणि तुम्ही माझ्या गौरवात राहाल. तुम्हाला अजूनही माझ्या आत्म्याच्या मूलतत्त्वात गुंतण्याची इच्छा नाही का? तुम्हाला अजूनही स्वतःला मारायचे आहे का? लोक त्यांना दिसू शकतील अशा प्रतिज्ञांचा पाठपुरावा करण्यास तयार आहेत, मग त्या क्षणभंगूर असल्या तरी; मात्र उद्याच्या प्रतिज्ञा अनंतकाळ टिकून राहिल्या, तरीही कोणीही स्वीकारण्यास तयार नाही. मनुष्याला दिसणार्‍या गोष्टींचा मी नायनाट करेन व ज्या गोष्टी मनुष्याला अभेद्य आहेत त्या मी पूर्ण करेन. हा देव आणि मनुष्य यांच्यातील फरक आहे.

माझा दिवस केव्हा येईल हे मनुष्याने मोजले आहे, पण नेमकी तारीख कोणालाच कळली नाही आणि त्यामुळे मनुष्य केवळ स्तब्धतेतच जगू शकतो. कारण मनुष्याच्या आकांक्षा अमर्याद आकाश ओलांडतात व नंतर अदृश्य होतात, मनुष्याने पुन्हा पुन्हा आशा गमावली आहे, जसे की तो त्याच्या वर्तमान परिस्थितीनुसार खाली उतरला आहे. मनुष्याला तारखांचा पाठपुरावा करायला लावणे किंवा त्याच्या निराशेमुळे त्याला स्वतःच्या विनाशाकडे नेणे हे माझ्या वचनांचे ध्येय नाही. मी मनुष्याला माझी प्रतिज्ञा स्वीकारायला लावू इच्छितो आणि जगभरातील लोकांना माझ्या प्रतिज्ञेचा वाटा मिळावा अशी माझी इच्छा आहे. मला चैतन्याने भरलेले जिवंत प्राणी हवे आहेत, मृत्यूने ग्रासलेले मृतदेह नाही. मी राज्याच्या मेजावर बसत असल्याने, मी पृथ्वीवरील सर्व लोकांना माझी तपासणी स्वीकारण्याची आज्ञा देईन. मी माझ्यासमोर कोणतीही अशुद्ध वस्तू येऊ देत नाही. मी माझ्या कार्यात कोणालाही हस्तक्षेप करू देत नाही; जे लोक माझ्या कार्यात व्यत्यय आणतात त्यांना अंधारकोठडीत टाकण्यात आले आहे व सोडल्यानंतरही ते पृथ्वीच्या जळत्या ज्वालांनी आणि आपत्तीने वेढलेले आहेत. जेव्हा मी माझ्या देहधारणेत असतो, तेव्हा जो कोणी माझ्या देहाशी माझ्या कार्याविषयी वाद घालतो, त्याचा मी तिरस्कार करतो. अनेक वेळा मी सर्व लोकांना आठवण करून दिली आहे, की मी पृथ्वीवर माझे कोणीही नातलग नाहीत आणि जो कोणी माझ्याकडे समानतेने पाहतो व मला त्यांच्याकडे खेचतो, जेणेकरून त्यांना माझ्याबरोबरच्या भूतकाळाची आठवण व्हावी, तो विनाशाच्या अधीन होईल. ही माझी आज्ञा आहे. अशा बाबतींत मी मनुष्याप्रती किंचितही दयाळूपणा दाखवत नाही. जे लोक माझ्या कार्यात हस्तक्षेप करतात आणि मला सल्ला देतात त्यांचे मी ताडण करतो व मी त्यांना कधीही क्षमा करणार नाही. जर मी स्पष्टपणे बोललो नाही, तर मनुष्य कधीही शुद्धीवर येणार नाही आणि नकळतपणे माझ्या ताडणात पडेल—कारण मनुष्य मला माझ्या देहात ओळखत नाही.

२० मार्च १९९२

मागील:  अध्याय १२

पुढील:  लोक हो, आनंदित व्हा!

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger