देवाच्या कार्यामागची दृष्टी (१)
योहानाने सात वर्षे येशूसाठी कार्य केले आणि येशूचे आगमन झाले तेव्हा योहानाने त्याच्यासाठी अगोदरच मार्ग आखून ठेवला होता. त्यापूर्वी योहानाद्वारे प्रचार केलेली स्वर्गीय राज्याची सुवार्ता संपूर्ण प्रदेशात ऐकली गेली होती, त्यामुळे यहूदीयामध्ये ती पसरली आणि सर्वजण योहानाला संदेष्टा म्हणू लागले. त्याच सुमारास हेरोद नावाच्या राजाची योहानाला मारून टाकायची इच्छा होती, मात्र लोकांच्या मनात योहानाबद्दल प्रचंड आदर असल्याने असे करण्याची त्याची हिंमत झाली नाही आणि जर आपण योहानाला मारले तर लोक आपल्या विरोधात बंड करतील, अशी हेरोदला भीती वाटत होती. योहानाने केलेले कार्य सामान्य लोकांमध्ये रुजले होते आणि त्याने यहूद्यांना विश्वासणारे बनवले होते. येशूने त्याची सेवा सुरू करण्यास घेईपर्यंतची सात वर्षे त्याने येशूसाठीचा मार्ग आखला होता. म्हणूनच योहान सर्व संदेष्ट्यांमध्ये श्रेष्ठ ठरला. योहानाला कैद झाल्यानंतरच येशूने आपले अधिकृत कार्य सुरू केले. योहानाच्या आधी देवासाठी मार्ग आखणारा कोणीही संदेष्टा झाला नव्हता, कारण येशूच्या आधी, देवाने प्रत्यक्ष देहरूप धारणच केले नव्हते. त्यामुळे योहानाच्या आधीपासून झालेल्या सर्व संदेष्ट्यांमध्ये देहधारी देवासाठी मार्ग आखणारा योहान एकटाच होता. अशाप्रकारे योहान हा जुन्या आणि नवीन करारामधील सर्वात महान संदेष्टा झाला. येशूचा बाप्तिस्मा होण्यापूर्वी सात वर्षे योहानाने स्वर्गाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करण्यास सुरुवात केली. लोकांच्या दृष्टीने, त्याने केलेले कार्य हे त्यानंतर येशूने केलेल्या कार्यापेक्षाही उच्च वाटत होते, मात्र असे असले तरीही तो केवळ संदेष्टाच होता. त्याने मंदिरात बसून उपदेश केला नाही, तर बाहेर पडून गावोगावी आणि खेड्यांमध्ये फिरून कार्य केले. हे कार्य त्याने अर्थातच यहूद्यांच्या राष्ट्रातील लोकांमध्ये आणि त्यातही विशेषतः गरीब लोकांमध्ये केले होते. समाजातील उच्च स्तरातील लोकांशी योहानाचा क्वचितच संपर्क असे आणि तो यहूदीयातील केवळ सामान्य माणसांमध्येच सुवार्तेचा प्रसार करत असे. यामागचा उद्देश हा प्रभू येशूसाठी योग्य माणसे तयार करणे आणि त्याच्या कार्यासाठी योग्य अशा जागा तयार करणे हा होता. योहानासारख्या संदेष्ट्याने अगोदरच मार्ग आखून ठेवलेला असल्याने, प्रभू येशूचे आगमन झाल्या-झाल्या त्याला आपल्या वधस्तंभाच्या मार्गावर चालणे शक्य झाले. जेव्हा देवाने आपले कार्य करण्यासाठी देह धारण केला, तेव्हा त्याला स्वतःसाठी माणसे निवडत बसण्याचे कार्य करावे लागले नाही, तसेच त्याला स्वतःला माणसे शोधायला किंवा आपल्या कार्यासाठी जागा शोधायला जावे लागले नाही. त्याने येथे अवतरल्यावर असली कार्ये केली नाहीत, तो येण्याअगोदर योग्य माणसाने आधीच या सर्व गोष्टी करून ठेवल्या होत्या. म्हणजे येशूने आपले कार्य सुरू करण्याआधी योहानाने हे कार्य पूर्ण करून ठेवले होते कारण जेव्हा देवाने देहधारण केले, तेव्हा त्याने दीर्घकाळ त्याची प्रतीक्षा करत असलेल्या माणसांबरोबर कार्य करायला थेट सुरुवात केली. येशू मनुष्याच्या सुधारणेचे कार्य करण्यासाठी आला नव्हता. तो फक्त त्याचेच सेवाकार्य पार पाडण्यासाठी आला होता; इतर सर्व गोष्टींचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. योहान आला तेव्हा, त्याने मंदिरांच्या बाहेर आणि यहूद्यांमध्ये स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता स्वीकारणाऱ्या लोकांचा एक गट सामील करून घेतला, कारण हे लोक प्रभू येशूच्या कार्याचे एक साधन बनू शकले असते. योहानाने सात वर्षे असे कार्य केले, म्हणजेच त्याने सात वर्षे सुवार्तेचा प्रसार केला. हे कार्य करत असताना, योहानाने फारसे चमत्कार केले नाहीत, कारण त्याचे कार्य हे मार्ग आखण्याचे होते; त्याचे कार्य तयारी करण्याचे होते. त्याचा अन्य सर्व कार्याशी आणि येशूच्या कार्याशी संबंध नव्हता; त्याने केवळ मनुष्याला आपली पापे कबूल करण्यास आणि पश्चात्ताप करण्यास सांगितले, तसेच लोकांना वाचवता यावे म्हणून त्यांचा बाप्तिस्मा केला. त्याने केलेले कार्य नवीन असले आणि मनुष्य आधी कधीही चालला नव्हता असा मार्ग त्याने खुला करून दिलेला असला, तरी त्याने केवळ येशूसाठी मार्ग तयार करून ठेवण्याचे कार्य केलेले होते. तो केवळ एक संदेष्टा होता ज्याने तयारीचे कार्य केले होते आणि तो येशूचे कार्य करण्यास तो असमर्थ होता. स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता देणारा येशू हा काही पहिला व्यक्ती नव्हता आणि योहानाने आखलेल्या मार्गावरूनच येशू चालत गेला, तरीही येशूचे कार्य करू शकेल असे दुसरे कोणीच नव्हते आणि येशूचे कार्य योहानाच्या कार्यापेक्षाही श्रेष्ठ होते. येशूला स्वतःचा मार्ग तयार करणे शक्य नव्हते; त्याचे कार्य हे थेट देवाच्या वतीने पार पाडले जाणार होते. आणि म्हणूनच, योहानाने कितीही वर्षे कार्य केले असले तरीही तो केवळ संदेष्टाच राहिला आणि त्याने केवळ मार्ग तयार केला. येशूने केलेले तीन वर्षांचे कार्य हे योहानाच्या सात वर्षांच्या कार्यापेक्षाही श्रेष्ठ ठरले, कारण मुळात त्याच्या कार्याचे सार वेगळे होते. येशूने जेव्हा त्याचे सेवाकार्य सुरू केले, म्हणजेच जेव्हा योहानाचे कार्य संपले, तेव्हा योहानाने प्रभू येशूच्या वापरासाठी पुरेशी माणसे आणि योग्य स्थळे तयार करून ठेवलेली होती आणि पुढे तीन वर्षे चालणारे आपले कार्य सुरू करण्यासाठी प्रभू येशूला या गोष्टी पुरेशा होत्या. आणि म्हणूनच, योहानाचे कार्य संपल्या-संपल्या प्रभू येशूने त्याच्या स्वतःच्या कार्याला अधिकृतपणे प्रारंभ केला आणि तेव्हा योहानाची वचने बाजूला ठेवली गेली. याचे कारण योहानाने केलेले कार्य हे केवळ बदलासाठी केलेले कार्य होते आणि त्याची वचने ही मनुष्याला नवीन प्रगतीच्या दिशेने नेणारी जीवनाची वचने नव्हती; अखेर, योहानाची वचने ही केवळ तात्पुरत्या वापरासाठीच तर होती.
येशूने जे कार्य केले ते अलौकिक स्वरुपाचे नव्हते; त्याची एक विशिष्ट प्रक्रिया होती आणि कोणत्याही गोष्टींना लागू असलेल्या सामान्य नियमाप्रमाणेच त्याचे कार्य पुढे होत गेले. येशूच्या आयुष्यातले शेवटचे सहा महिने राहिले असताना, आपण हेच कार्य करण्यासाठी आलो होतो, हे येशूला खात्रीशीर माहीत होते आणि आपण वधस्तंभावर खिळण्यासाठी आलो आहोत हेही त्याला माहीत होते. वधस्तंभावर जाण्यापूर्वी, गेथशेमाने बागेत तीन वेळा प्रार्थना केल्याप्रमाणे येशूने आपल्या पित्याची, देवाची अखंड प्रार्थना केली. येशूने बाप्तिस्मा घेतल्यावर, त्याने साडेतीन वर्षे त्याचे सेवाकार्य केले आणि त्याचे अधिकृत कार्य अडीच वर्षे चालले. पहिल्या वर्षी, सैतानाने त्याच्यावर आरोप केले, मनुष्याने त्याला छळले आणि मानवी मोहाला तो बळी पडला. त्याचे कार्य करत असताना त्याने अनेक मोहांवर मात केली. शेवटच्या सहा महिन्यांमध्ये जेव्हा येशूला वधस्तंभावर खिळले जाणार होते, तेव्हा पेत्राच्या तोंडून शब्द बाहेर पडले की येशू हा जित्याजागत्या देवाचा पुत्र आहे, तो ख्रिस्त आहे. तेव्हाच त्याचे कार्य सर्वांना माहीत झाले आणि तेव्हाच जनतेला त्याची ओळख पटली. त्यानंतरच, त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले, की मनुष्याच्या भल्यासाठी त्याला वधस्तंभावर खिळले जाणार आहे आणि तीन दिवसांनी तो पुन्हा जन्म घेईल; तो मुक्तीचे कार्य करण्यासाठी आला आहे आणि तोच तारणहार आहे. केवळ शेवटच्या सहा महिन्यात, त्याने त्याचे रूप उघड केले आणि त्याला जे कार्य करायचे होते त्याबद्दलही सांगितले. हाच काळ देवाचाही काळ होता आणि हे कार्य अशाच प्रकारे पार पाडायचे होते. त्यावेळी, येशूचे अंशतः कार्य जुन्या कराराशी सुसंगत होते, तसेच ते मोशेच्या नियमांशी आणि कायद्याच्या युगातील यहोवाच्या वचनांशीदेखील सुसंगत होते. येशू करत असलेल्या या सर्व गोष्टी त्याच्या कार्याचाच एक भाग होत्या. तो लोकांना उपदेश करत असे आणि त्यांना सभास्थानांत जाऊन शिकवत असे आणि जुन्या करारातील संदेष्ट्यांची भविष्यवाणी वापरुन तो त्याच्याशी शत्रुत्व करणाऱ्या परुश्यांना फटकारत असे आणि धर्मग्रंथातील वचने वापरुन ते करत असलेल्या अवज्ञा उघडकीस आणत असे आणि त्याबद्दल त्यांची निर्भत्सना करत असे. याचे कारण म्हणजे त्यांना येशूच्या कार्याविषयी तिरस्कार वाटत असे; विशेष म्हणजे, येशूचे बरेचसे कार्य हे धर्मग्रंथातील नियमांप्रमाणे केलेले नसे आणि शिवाय तो जी शिकवण देत असे ती परुश्यांच्या वचनांपेक्षा वरच्या दर्जाची होती आणि धर्मग्रंथातील संदेष्ट्यांच्या वचनांपेक्षाही अधिक उच्च दर्जाची होती. येशूचे कार्य केवळ मनुष्याच्या मुक्तीकरिता आणि वधस्तंभावर खिळले जाण्याकरिता होते आणि म्हणूनच कोणत्याही मनुष्याला जिंकून घेण्यासाठी त्याला अधिक काही बोलण्याची गरज नव्हती. त्याने मनुष्याला जे काही शिकवले त्यातले बरेचसे धर्मग्रंथातील वचनांमधून घेतलेले होते आणि जरी त्याच्या कार्याने धर्मग्रंथांना मागे टाकले नसले, तरी वधस्तंभावर खिळण्याचे कार्य त्याला साध्य करता आले. त्याचे कार्य केवळ वचनाचे नव्हते, तसेच ते काही मानवजातीवर विजय मिळवण्यासाठी केलेले कार्यदेखील नव्हते, तर ते मानवजातीच्या मुक्तीसाठी केलेले कार्य होते. त्याने मानवजातीला केवळ पापार्पण म्हणून कार्य केले केले आणि त्याने मानवजातीला कोणतीही वचने ऐकवली नाहीत. त्याने परराष्ट्रांचे कार्य केले नाही. जे मानवजातीवर विजय मिळवण्याचे कार्य होते, पण त्याने वधस्तंभावर खिळण्याचे कार्य केले, हे कार्य देवावर विश्वास असणाऱ्यांमध्ये केले गेले होते. जरी त्याने त्याचे कार्य धर्मग्रंथांच्या आधाराने केले होते आणि जरी परुश्यांचा धिक्कार करताना आधीच्या संदेष्ट्यांनी जे भविष्य वर्तवून ठेवले होते त्याचा त्याने उपयोग करून घेतला होता तरीही वधस्तंभावर खिळण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी हे पुरेसे होते. धर्मग्रंथातील आधीच्या संदेष्ट्यांनी वर्तवलेल्या भविष्याच्या आधारावरच जर आजचे कार्यदेखील केले तर तुमच्यावर विजय मिळवणे अशक्य होऊन बसेल, कारण हे चिनी लोकांनो, जुन्या करारात तुम्ही केलेल्या अवज्ञेची आणि पापांची कोणतीही नोंद नाही आणि तुमच्या पापांचा कसलाही इतिहास नाही. तेव्हा हे कार्य अजूनही बायबलमध्ये शिल्लक असेल, तर तुम्हाला कधीही लाभ होणार नाही. बायबलमध्ये इस्रायली लोकांच्या केवळ मर्यादित इतिहासाचीच नोंद आहे, त्यातून तुम्ही दुष्ट आहात का चांगले आहात ते कळून येत नाही आणि तुमचा न्यायही करता येणार नाही. इस्रायली लोकांच्या इतिहासावरून मी तुमचा न्याय करायचा म्हटले तर काय होईल याची कल्पना करा—तरीही तुम्ही माझे आजच्याप्रमाणेच अनुसरण कराल का? तुम्हाला जाणणे किती कठीण आहे ते तुम्हाला माहीत आहे का? आत्ता या टप्प्यावर जर याबद्दल काही बोलले गेले नाही तर विजय मिळवण्याचे कार्य पूर्ण करणे अशक्य होईल. मी वधस्तंभावर खिळण्यासाठी आलेलो नसल्याने मी बायबलपेक्षा वेगळी वचने उच्चारली पाहिजेत जेणेकरून मला तुमच्यावर विजय मिळवता येईल. येशूने केलेले कार्य हे जुन्या करारापेक्षा केवळ एक पायरी वर असलेले कार्य होते; त्याचा उपयोग एक युग सुरू करण्यासाठी आणि त्या युगाचे नेतृत्व करण्यासाठी झाला. तो असे का म्हणाला होता, “मी काही कायदा मोडायला आलेलो नाही, तर कायद्याची पूर्ती करायला आलो आहे.”? असे असूनही इस्रायली लोक पाळत असलेल्या जुन्या करारातील नियमांपेक्षा आणि आज्ञांपेक्षा वेगळे असे बरेच काही त्याच्या कार्यात होते, याचे कारण म्हणजे तो कायद्याचे पालन करायला नव्हे, तर तो त्याची पूर्तता करायला आला होता. त्याची पूर्तता करण्यात अनेक व्यावहारिक गोष्टींचा समावेश होता: त्याचे कार्य अधिक व्यवहारी आणि वास्तविक होते. तसेच ते अधिक जिवंतही होते आणि ते आंधळेपणाने नियमांचे पालन करणारे नव्हते. इस्रायली लोकांनी शब्बाथ पाळला नाही का? येशू आला तेव्हा त्याने शब्बाथ पाळला नाही कारण तो असे म्हणाला होता, की मनुष्याचा पुत्र हाच शब्बाथचा देव आहे आणि जेव्हा शब्बाथचा देव अवतीर्ण होईल, तेव्हा तो स्वतःच्या इच्छेनुसार वागेल. तो जुन्या कराराच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी आणि नियम बदलण्यासाठी आला होता. आज जे काही केले जाते ते वर्तमानावर आधारित असते, तरीही ते नियमशास्त्राच्या युगात यहोवाने केलेल्या कार्यावर आधारित असते. ते या मर्यादेचे उल्लंघन करत नाही. उदाहरणार्थ—तुमच्या जीभेवर ताबा ठेवणे आणि व्यभिचार न करणे हे जुन्या करारातले नियम नाहीत का? आज तुमच्याकडून जे अपेक्षित आहे, ते केवळ या दहा आज्ञांपुरते मर्यादित नाही पण याआधी येऊन गेलेल्या आज्ञा आणि नियम यांच्यापेक्षा वरच्या दर्जाच्या आज्ञा आणि नियमांचाही त्यात समावेश आहे. अर्थात म्हणून याआधी येऊन गेलेले नष्ट झाले असा त्याचा अर्थ होत नाही, कारण देवाच्या कार्याचा प्रत्येक टप्पा हा आधीच्या टप्प्यावर आधारित असतो. त्याग करणे, आईवडिलांचा आदर करणे, मूर्तिपूजा न करणे, इतरांवर हल्ला न करणे किंवा त्यांना अपशब्द न बोलणे, व्यभिचार न करणे, धूम्रपान न करणे, दारू न पिणे तसेच मृत जीवांचे सेवन न करणे किंवा रक्त न पिणे यहोवाने इस्रायलमध्ये केलेल्या या कार्यावर आजही तुमचे आचरण अवलंबून नाही का? आजवर भूतकाळाच्या आधारावरच पुढचे कार्य घडून आले आहे. जरी भूतकाळातल्या नियमांचा उल्लेख आता होत नसला व तुझ्याकडून नवीन अपेक्षा असल्या, तरी हे नियम मुळीच टाकून दिलेले नाहीत. उलट ते अधिकच कडक करण्यात आले आहेत. ते टाकून दिले आहेत असे म्हणणे म्हणजे याआधीचे युग आता कालबाह्य झाले असे म्हणण्यासारखे आहे, मात्र काही आज्ञा शाश्वत पाळाव्यात अशा आहेत. भूतकाळातल्या आज्ञा अगोदरच आचरणात आल्या आहेत, त्या या अगोदरच मानवाचा एक अंश झाल्या आहेत आणि त्यामुळे “धूम्रपान करू नये” आणि “दारू पिऊ नये” इत्यादी आज्ञा आता विशेष जोर देऊन सांगण्याची आवश्यकता नाही. याच आधारावर, आता तुमच्या आजच्या गरजेनुसार, तुमच्या परिस्थितीनुसार आणि आजच्या कार्यानुसार नवीन आज्ञा तयार केल्या जात आहेत. नवीन युगासाठीच्या आज्ञा काढणे म्हणजे जुन्या युगाच्या आज्ञा टाकून देणे नव्हे, तर त्यांना अधिक उचलून धरणे आहे. त्यामुळे मनुष्याच्या कृती अधिक परिपूर्ण आणि वास्तविकतेशी अधिक सुसंगत अशा होतील. आज जर तुमच्याकडून इस्रायली लोकांप्रमाणेच केवळ आज्ञा पाळणे, जुन्या करारातील नियमांचे पालन करणे, तसेच यहोवाने घालून दिलेले नियम लक्षात ठेवणे एवढेच अपेक्षित असते, तर तुमच्यात बदल घडून येण्याची कसलीही शक्यता नव्हती. जर तेवढ्या मर्यादित आज्ञाच तुम्हाला पाळायच्या असत्या किंवा असंख्य नियम लक्षात ठेवायचे असते, तर तुमची जुनी प्रवृत्तीही तशीच राहिली असती. ती उखडून टाकण्याचा कोणताही मार्ग नसता. अशा प्रकारे तुम्ही मग अधिकाधिक भ्रष्ट होत गेला असता, तुमच्यापैकी एकही जण आज्ञापालन करू शकला नसता. तेव्हा यावरून असे दिसते, की यहोवाची कामगिरी जाणून घ्यायला काही साध्यासुध्या आज्ञा किंवा असंख्य नियम तुम्हाला उपयोगी पडणार नाहीत. तुम्ही इस्रायली लोकांसारखे नाही: नियमांचे पालन करून आणि आज्ञा लक्षात ठेवून त्यांना यहोवाची कामगिरी पाहता आली आणि केवळ त्यालाच शरण जाणे त्यांना शक्य झाले. तुम्हाला मात्र हे साध्य करणे शक्य नाही आणि जुन्या करारातील युगाच्या आज्ञा थोड्याफार प्रमाणात पाळून तुम्ही तुमचे अंतःकरण अर्पण करू शकत नाही किंवा त्या आज्ञा तुमचे संरक्षण करण्यासदेखील असमर्थ आहेत, उलट त्यामुळे तुम्ही अधिकच ढिसाळ व्हाल आणि नरकात जाऊन पडाल. कारण माझे कार्य विजय मिळवण्याचे असल्यामुळे तुम्ही करत असलेली अवज्ञा आणि तुमची जुनी प्रवृत्ती माझ्या कार्याचे लक्ष्य आहे. आजच्या न्यायाच्या कठोर वचनांपुढे यहोवा आणि येशूची दयाळू वचने फिकी पडतात. अशा कठोर वचनांशिवाय तुमच्यासारख्या “तज्ज्ञ” लोकांवर विजय मिळवणे अशक्य झाले असते, जे हजारो वर्षे अवज्ञा करणारे झाले आहेत. जुन्या करारातील नियमांची सत्ता तुमच्यावर पूर्वीच चालेनाशी झाली आहे आणि आजचा न्याय हा पूर्वीच्या नियमांपेक्षा कितीतरी जास्त भयंकर आहे. तुम्हाला सर्वात जास्त सोयीचे काय असेल, तर ते नियमांचे क्षुल्लक बंधन नव्हे, तर हा न्याय आहे. त्याचे कारण म्हणजे तुमची मानव जमात आदिकाळातली नाही. ती हजारो वर्षांपासून भ्रष्ट जीवन जगलेली एक जमात आहे. मनुष्याने आज जे साध्य करायला हवे, ते त्याच्या आजच्या खऱ्याखुऱ्या परिस्थितीशी मिळते जुळते आहे आणि आजच्या मनुष्याच्या कुवतीला आणि प्रत्यक्ष परिस्थितीला ते साजेसे आहे. त्यात तू नियमांचे पालन करणे अपेक्षित नाही. तुझ्या जुन्या प्रवृत्तीत बदल घडावेत आणि तू तुझ्या धारणा बाजूला साराव्यात यासाठी ते आहे. या आज्ञा म्हणजेच नियम आहेत, असे तुला वाटते का? त्या मनुष्याच्या सर्वसाधारण गरजा आहेत असेच म्हणता येईल. तू पाळलेच पाहिजेस असे ते नियम नाहीत. उदाहरणार्थ, धूम्रपान करू नये ही आज्ञा—आता हा नियम आहे का? हा काही नियम नव्हे! ती सर्वसामान्य मानवजातीची एक गरज आहे; तो नियम नसून सबंध मानवजातीसाठी आवश्यक अशी गोष्ट आहे. आज घालून दिलेल्या सुमारे डझनभर आज्ञा यादेखील नियम नव्हेत सामान्य मानवता साध्य करायची असेल तर त्यांची गरज आहे. पूर्वी लोकांना अशा गोष्टींची माहिती नव्हती. म्हणून आज लोकांनी ते साध्य करणे आवश्यक आहे. अशा गोष्टी नियमांमध्ये मोडत नाहीत. कायदा आणि नियम ही एकच गोष्ट नाही. मी ज्या नियमांविषयी बोलतो आहे ते उत्सव, औपचारिकता किंवा मनुष्याच्या चुकीच्या, भ्रष्ट वागणुकीशी निगडित आहेत; ते नियम मनुष्याच्या कसलाही उपयोग नसलेले, त्याच्या कसल्याही फायद्याचे नसलेले आहेत; त्यांच्यामुळे कृतींची जी मालिका तयार होते तिला काहीही अर्थ नाही. नियमांचा मतितार्थ एवढाच आहे आणि म्हणून ज्यापासून मनुष्याला कसलाही फायदा नाही, असे नियम टाकून दिले पाहिजेत. मनुष्याला ज्यापासून लाभ होणार आहे तेच नियम आचरणात आणले पाहिजेत.