विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन कसा असावा

मनुष्याने देवावर विश्वास ठेवायला सुरुवात केल्यापासून त्याला काय मिळाले आहे? तुला देवाबद्दल काय समजले आहे? देवावरील तुझ्या विश्वासामुळे तू किती बदलला आहेस? आज, तुम्हा सर्वांना माहीतच आहे, की मनुष्याचा देवावरचा विश्वास आत्म्याला तारण प्राप्त व्हावे आणि देहाचे कल्याण व्हावे याच एकमेव उद्देशासाठी नाही, तसेच देवावर प्रेम करून मनुष्याचे जीवन समृद्ध करण्यासारख्या गोष्टींसाठीदेखील तो नाही. सध्या, तुझे फक्त देहाच्या पोषणासाठी आणि क्षणिक सुखासाठी देवावर प्रेम असेल आणि अखेरीस तू देवावर सर्वात जास्त प्रेम केलेस व आणखी काहीही मागितले नाहीस, तरीदेखील तुझे प्रेम हे सच्चे प्रेम नाही आणि ते देवाला संतुष्ट करणारे नाही. जे लोक आपले कळाहीन अस्तित्व समृद्ध करण्यासाठी आणि स्वत:च्या अंतःकरणातील पोकळी भरून काढण्यासाठी देवावरील प्रेमाचा उपयोग करतात, ते आरामदायी जीवनासाठी आसुसलेले लोक असतात. ते देवावर खरे प्रेम करू पाहणारे लोक नसतात. अशा प्रकारचे प्रेम मनाविरुद्ध केले जाते, हे प्रेम स्वत:साठी मानसिक समाधान कसे मिळेल याचा शोध घेत असते आणि देवाला त्याची आवश्यकता नाही. सांग, तुझे प्रेम कसे आहे? तू देवावर कशासाठी प्रीती करतोस? आज देवावर असलेल्या तुझ्या प्रेमामध्ये खरे प्रेम कितपत आहे? तुमच्यामधील बऱ्याच लोकांचे प्रेम वरील प्रकारचे आहे. असे प्रेम फक्त ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवू शकते, असे प्रेम चिरंतन राहू शकत नाही किंवा ते मनुष्यामध्ये रूजूही शकत नाही. अशा प्रकारचे प्रेम फक्त फळ न देता फुलणाऱ्या आणि काही काळाने कोमेजून जाणाऱ्या एखाद्या फुलासारखे आहे. म्हणजेच, तू देवावर अशा प्रकारचे प्रेम केले असशील व तुला पुढचा मार्ग दाखवणारे कोणीही नसेल, तर तुझे पतन होईल. तू फक्त देवावर प्रेम करत असतानाच्या काळादरम्यानच त्याच्यावर विश्वास ठेवलास, पण त्यानंतर तुझ्या जगण्याच्या प्रवृत्तीमध्ये काहीही बदल झाला नाही, तर तू अंधःकारमय जीवनच जगत राहाशील, सैतानाच्या बंधनातून आणि त्याच्या फसवणुकीतून कधीच मुक्त होऊ शकणार नाहीस. असे वागणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला देव पूर्णपणे प्राप्त करू शकणार नाही; सरतेशेवटी, अशा लोकांचे मन, आत्मा आणि शरीर अजूनही सैतानाच्याच अंमलाखाली असेल याबाबत काही शंका नाही. ज्या लोकांना देव प्राप्त करू शकत नाही, ते सर्व त्यांच्या मूळ जागी, म्हणजेच सैतानाकडे परत जातील, आणि ते देवाने दिलेल्या शिक्षेची पुढील पायरी भोगण्यासाठी अग्नी आणि गंधक यांच्या चटके देणाऱ्या कुंडात जातील. देवाने प्राप्त केलेल्या लोकांनी सैतानाचा त्याग केलेला असतो आणि ते त्याच्या स्वामित्वातून बाहेर पडलेले असतात. राज्यातील लोकांमध्ये त्यांची अधिकृतपणे गणना केली जाते. राज्याचे लोक असेच साकार होत असतात. तुला अशा प्रकारची व्यक्ती बनण्याची इच्छा आहे का? तुला देवाने प्राप्त करावे अशी इच्छा आहे का? तू सैतानाच्या अधिपत्यातून मुक्त होऊन देवाकडे परतण्यास तयार आहेस का? तू आता सैतानाचा आहेस की राज्यातील लोकांमध्ये तुझी गणना केली जाते? आपल्याला या गोष्टी आधीच स्पष्ट झाल्या पाहिजेत आणि त्याबाबत यापुढे कोणत्याही स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.

याआधी, बऱ्याच लोकांनी त्यांच्या स्वतःच्या अपेक्षांमुळे अतिप्रचंड महत्त्वाकांक्षा आणि धारणांचा आश्रय घेतला आहे. अशा काही समस्या तूर्त बाजूला ठेवू या; सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाला देवासमोर सामान्य स्थिती टिकवून ठेवण्यास आणि सैतानाच्या प्रभावाच्या बंधनातून हळूहळू मुक्त होण्यास सक्षम करेल असा आचरणाचा मार्ग शोधणे, जेणेकरून, देव तुम्हाला प्राप्त करेल आणि तुम्ही पृथ्वीतलावर देवाच्या कार्यासाठी जगाल. देवाने योजलेल्या गोष्टी तुम्ही फक्त या मार्गानेच पूर्ण करू शकता. अनेकांचा देवावर विश्वास असतो, मात्र तरीही देवाला काय हवे आहे किंवा सैतानाला काय हवे आहे हे त्यांना ठाऊक नसते. ते गोंधळलेल्या अवस्थेत विश्वास ठेवतात, फक्त प्रवाहासोबत पुढे जातात आणि त्यामुळे त्यांनी खरे ख्रिश्चन जीवन कधीही जगलेले नसते; इतकेच काय, तर त्यांनी नेहमीची वैयक्तिक नातीदेखील कधीही जपलेली नसतात, मग देवासोबतचे साहजिक नाते असणे तर दुर्मीळच. यावरून असे दिसून येते, की मनुष्याच्या अडचणी आणि उणीवा व देवाच्या इच्छेला विरोध करणारे इतर घटक बरेच आहेत. मनुष्याने देवावर विश्वास ठेवण्याचा योग्य मार्ग अद्याप अवलंबलेला नाही, असे सिद्ध करण्यासाठी हे पुरेसे आहे. तसेच त्याने मानवी जीवनाच्या साहजिक अनुभवात प्रवेशही केलेला नाही. मग देवावर विश्वास ठेवण्यासाठी योग्य मार्ग अवलंबण्याचा नेमका अर्थ कोणता? योग्य मार्ग अवलंबण्याचा अर्थ असा, की तू आपले चित्त देवासमोर नेहमी शांत ठेवू शकतोस आणि देवासोबत एका सहज प्रेमसंवादाचा आनंद प्राप्त करू शकतोस, पुढे हळूहळू मनुष्यामध्ये काय कमतरता आहेत हे जाणून घेऊ शकतोस आणि कालांतराने देवाबद्दल सखोल ज्ञानही मिळवू शकतोस. असे केल्याने, तुझा आत्मा दररोज नवीन अंतर्दृष्टी आणि नवीन ज्ञान प्राप्त करतो; तुझी आस वाढते, तू सत्यप्राप्तीचा प्रयत्न करतोस, दररोज तुला दिव्य प्रकाश आणि नवीन आकलन यांची प्राप्ती होते. या मार्गाचा अवलंब करून, तू हळूहळू सैतानाच्या प्रभावातून मुक्त होतोस आणि तुझ्या जीवनात प्रगती होते. असे लोक योग्य मार्गावर आलेले असतात. तुझ्या स्वतःच्या वास्तविक अनुभवांचे मूल्यमापन कर आणि तुझ्या श्रद्धेमध्ये तू कोणत्या मार्गाचा अवलंब केला आहेस, याचे नीट परीक्षण कर: जेव्हा तू याची पडताळणी वर वर्णन केलेल्या गोष्टींशी करतोस तेव्हा, तू योग्य मार्गावर आहेस असे तुला स्वत:ला वाटते का? तू कोणकोणत्या बाबतीत सैतानाच्या बंधनातून आणि त्याच्या प्रभावातून मुक्त झाला आहेस? तू अद्याप योग्य मार्गावर नसल्यास, तुझे सैतानासोबतचे नाते अजूनही तुटलेले नाही असे दिसते. असे असताना, देवावर प्रेम करण्याचा तुझा प्रयत्न तुला सच्च्या, एककेंद्री आणि निर्मळ प्रेमाकडे घेऊन जाईल का? तू म्हणतोस, की तुम्ही देवावर अतूट आणि मनापासून प्रेम करतोस, मात्र तरीदेखील तू सैतानाच्या बंधनातून अद्याप मुक्त झालेला नाहीस. तू देवाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत नाहीस का? जर तुझे देवावरचे प्रेम कसल्याही भेसळीविना खरेखुरे आहे अशी स्थिती मिळवण्याची तुझी इच्छा असेल, आणि देवाद्वारे तुला पूर्णपणे प्राप्त केले जावे तसेच त्याच्या राज्याच्या नागरिकांमध्ये तुझी गणना व्हावी अशी जर तुझी इच्छा असेल तर सर्वप्रथम, देवावर विश्वास ठेवण्याच्या योग्य मार्गाचा तुला अवलंब करावाच लागेल.

मागील:  अध्याय २६

पुढील:  भ्रष्ट झालेल्या मानवात देवाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता नसते

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger