संपूर्ण मानवजात आजपर्यंत कशी विकसित झाली आहे हे तुला माहीत असले पाहिजे
विविध युगे आली आणि गेली, ज्यामुळे सहा हजार वर्षे सुरू असलेल्या संपूर्ण कार्यात हळूहळू बदल होत गेला. या कार्यातील बदल जगाच्या एकूण परिस्थितीवर व संपूर्ण मानवजातीच्या विकासाच्या कलावर आधारित आहेत; त्यानुसार व्यवस्थापनाचे कार्य हळूहळू बदलले आहे. निर्मितीच्या सुरुवातीपासूनच हे सर्व नियोजित केलेले नव्हते. जगाची निर्मिती होण्याआधी किंवा त्यानंतर लगेचच, यहोवाने कार्याचा पहिला टप्पा, नियमशास्त्र; कार्याचा दुसरा टप्पा, कृपा; अथवा कार्याचा तिसरा टप्पा, विजय, या सर्व गोष्टींची अद्याप योजना आखली नव्हती, ज्यामध्ये तो प्रथम मवाबाच्या काही वंशजांपासून सुरुवात करेल आणि याद्वारे संपूर्ण विश्वावर विजय मिळवेल. जगाची निर्मिती केल्यानंतर, त्याने ही वचने कधीच उच्चारली नाहीत किंवा मवाबानंतरदेखील कधीही उच्चारली नाहीत; खरे तर, लोटाच्या आधी, त्याने ती कधीही उच्चारली नव्हती. देवाचे सर्व कार्य उत्स्फूर्तपणे केले जाते. त्याचे संपूर्ण सहा हजार वर्षांचे व्यवस्थापन कार्य असेच विकसित झाले आहे; जगाची निर्मिती करण्यापूर्वी त्याने अशी योजना “मानवजातीच्या विकासासाठी सारांश तक्ता” या स्वरूपात कधीही लिहिली नव्हती. देवाच्या कार्यात, तो जे आहे ते थेट व्यक्त करतो; योजना तयार करण्यासाठी तो त्याच्या मेंदूला त्रास देत नाही. अर्थात, काही संदेष्ट्यांनी खूप मोठ्या भविष्यवाण्या सांगितल्या आहेत, परंतु तरीही असे म्हणता येणार नाही, की देवाचे कार्य नेहमीच अचूक नियोजनाचे होते; त्या भविष्यवाण्या देवाच्या त्यावेळच्या कार्यानुसार केल्या गेल्या होत्या. तो जे कार्य करतो ते सर्वात वास्तविक कार्य आहे. तो प्रत्येक युगाच्या विकासानुसार ते पार पाडतो आणि गोष्टी कशा बदलतात यावर ते आधारित असतात. त्याच्यासाठी, कार्य पार पाडणे हे औषधाने आजाराला बरे करण्यासारखे आहे; त्याचे कार्य करत असताना, तो निरीक्षण करतो व त्याच्या निरीक्षणांनुसार त्याचे कार्य पुढे सुरू ठेवतो. त्याच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर, देव त्याचे विपुल शहाणपण आणि क्षमता व्यक्त करण्यास सक्षम आहे; तो कोणत्याही विशिष्ट युगाच्या कार्यानुसार त्याचे विपुल शहाणपण व अधिकार प्रकट करतो आणि त्या युगात त्याच्याद्वारे परत आणलेल्या सर्व लोकांना त्याची संपूर्ण प्रवृत्ती पाहण्याची अनुमती देतो. त्याने जे कार्य करायला पाहिजे ते करत, प्रत्येक युगात आवश्यक असलेल्या कार्याच्या अनुषंगाने तो लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवतो. सैतानाने त्यांना ज्या प्रमाणात भ्रष्ट केले आहे त्यानुसार तो लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवतो. हे असे आहे, की जेव्हा यहोवाने सुरुवातीला आदाम व हव्वा यांना निर्माण केले तेव्हा त्याने त्यांना पृथ्वीवर देव प्रकट करण्यासाठी आणि सृष्टीमध्ये देवाची साक्ष देण्यास सक्षम करण्यासाठी हे कार्य केले. मात्र, सापाच्या मोहात पडल्यानंतर हव्वेने पाप केले व आदामानेही तेच केले; बागेत असताना, दोघांनी बर्यावाईटाचे ज्ञान करून देणार्या झाडाचे फळ खाल्ले. अशा प्रकारे, यहोवाला त्यांच्यावर आणखी कार्य करायचे होते. त्यांची नग्नता पाहून, त्याने त्यांचे शरीर प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्त्रांनी झाकले. नंतर, तो आदामाला म्हणाला, “तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस: म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे … अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे: तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” तो स्त्रीला म्हणाला, “मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.” तेव्हापासून, त्याने त्यांना एदेन बागेतून हद्दपार केले व आधुनिक मनुष्य जसा पृथ्वीवर राहतो तसे त्यांना त्या बागेबाहेर राहायला लावले. जेव्हा देवाने मनुष्याला सुरुवातीला निर्माण केले, तेव्हा निर्माण केल्यानंतर मनुष्याला सापाच्या मोहात पडू देण्याची आणि नंतर मनुष्याला व सापाला शाप देण्याची त्याची योजना नव्हती. त्याची प्रत्यक्षात अशी योजना नव्हती; गोष्टी अशा उलगडत गेल्या ज्यामुळे त्याला त्याच्या निर्मितीमध्ये नवीन कार्य करण्यास मिळाले. पृथ्वीवर आदाम आणि हव्वा यांच्यामध्ये यहोवाने हे कार्य पार पाडल्यानंतर, मानवजातीचा अनेक हजार वर्षे विकास होत राहिला, जोपर्यंत “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे यहोवाने पाहिले; म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा यहोवाला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. … परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती.” यावेळी यहोवाला आणखी नवीन कार्य करायचे होते, कारण त्याने निर्माण केलेली मानवजात सापाच्या मोहात पडल्यानंतर खूप पापी झाली होती. ही परिस्थिती पाहता, संपूर्ण मानवजातीमध्ये, यहोवाने वाचवण्यासाठी नोहाच्या कुटुंबाला निवडले आणि मग त्याने जलप्रलयाने जगाचा नाश करण्याचे त्याचे कार्य पार पाडले. मानवजात आजपर्यंत अशा प्रकारे विकसित होत राहिली आहे, भ्रष्ट होत चालली आहे व जेव्हा मानवी विकास त्याच्या शिखरावर पोहोचण्याची वेळ येईल, तेव्हा त्याचा अर्थ मानवजातीचा अंत असेल. जगाच्या अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, त्याच्या कार्याचे आंतरिक सत्य नेहमीच असे होते आणि नेहमी असेच राहील. लोकांची त्यांच्या प्रकारानुसार वर्गवारी कशी केली जाईल हे त्याच्यासारखेच आहे; प्रत्येक व्यक्तीला एका विशिष्ट श्रेणीशी संबंधित असणे अगदी सुरुवातीलाच पूर्वनियोजित असणे यापासून हे फार दूरचे आहे; उलट, विकासाच्या प्रक्रियेनंतरच प्रत्येकाचे हळूहळू वर्गीकरण केले जाते. सरतेशेवटी, ज्याला संपूर्ण तारण मिळू शकत नाही तो त्यांच्या “पूर्वजांकडे” परत जाईल. मानवजातीमध्ये देवाचे कोणतेही कार्य जगाच्या निर्मितीच्या आधीच तयार झाले नव्हते; त्याऐवजी, गोष्टी जशा उलगडत गेल्या त्यामुळे देवाला त्याचे कार्य मानवजातीमध्ये टप्प्याटप्प्याने व अधिक वास्तववादी आणि व्यावहारिक पद्धतीने करण्यास अनुमती मिळाली आहे. उदाहरणार्थ, स्त्रीला मोहात पाडण्यासाठी यहोवा देवाने साप निर्माण केला नाही; ती त्याची विशिष्ट योजना नव्हती किंवा ती त्याने जाणूनबुजून पूर्वनियोजित केलेली गोष्टदेखील नव्हती. ही एक अनपेक्षित घटना होती असे म्हणता येईल. अशा प्रकारे, यामुळेच यहोवाने आदाम व हव्वेला एदेन बागेतून बाहेर काढले आणि पुन्हा कधीही मनुष्य निर्माण न करण्याची शपथ घेतली. तथापि, लोक फक्त या पायावर देवाचे शहाणपण शोधतात. हे मी आधी म्हटल्याप्रमाणेच आहे: “मी सैतानाच्या डावपेचांवर आधारित माझी बुद्धी वापरतो.” मानवजात कितीही भ्रष्ट झाली किंवा साप त्यांना कितीही मोहात पाडत असला, तरीही यहोवाकडे त्याचे शहाणपण आहे; जसे की, त्याने जगाची निर्मिती केल्यापासून तो नवीन कार्यात गुंतला व या कार्याच्या कोणत्याही टप्प्यांची पुनरावृत्ती झाली नाही. सैतानाने सतत षडयंत्र रचले, सैतानाने मानवजातीला सतत भ्रष्ट केले आणि यहोवा देवाने त्याचे सुज्ञ कार्य अविरतपणे पार पाडले. जगाची निर्मिती झाल्यापासून तो कधीही अयशस्वी झाला नाही अथवा त्याने कधीही कार्य करणे थांबवले नाही. सैतानाने मनुष्याला भ्रष्ट केल्यानंतर, तो त्यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्यामध्ये कार्य करत राहिला, असा शत्रू जो त्यांच्या भ्रष्टाचाराचा उगम होता. ही लढाई सुरुवातीपासूनच अत्यंत तीव्रपणे सुरू होती व जगाच्या अंतापर्यंत सुरू राहील. हे सर्व कार्य करताना, यहोवा देवाने सैतानामुळे भ्रष्ट झालेल्या मनुष्याला त्याचे महान तारण प्राप्त करू दिले तसेच त्यांना त्याचे शहाणपण, सर्वशक्तिमानता आणि अधिकार पाहण्याची अनुमती दिली. याशिवाय, शेवटी, तो त्यांना त्याची नीतिमान प्रवृत्ती पाहू देईल—दुष्टांना शिक्षा व चांगल्यांना प्रतिफळ देईल. त्याने आजपर्यंत सैतानाशी लढा दिला आहे आणि तो कधीही पराभूत झालेला नाही. याचे कारण म्हणजे, तो एक सुज्ञ देव आहे व तो सैतानाच्या डावपेचांनुसार त्याचे शहाणपण वापरतो. म्हणून, देव स्वर्गातील प्रत्येक गोष्ट त्याच्या अधिकाराच्या अधीन करतो तसेच त्याने पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट त्याच्या पायाखाली विसावलेली आहे आणि अगदीच काही नाही तर मानवजातीवर आक्रमण करणाऱ्या व त्रास देणाऱ्या दुष्टांना तो त्याच्या ताडणाच्या कक्षेत आणतो. या सर्व कार्याचे परिणाम त्याच्या शहाणपणामुळे घडतात. मानवजातीच्या अस्तित्वापूर्वी त्याने कधीही त्याचे ज्ञान प्रकट केले नव्हते, कारण स्वर्गात, पृथ्वीवर किंवा संपूर्ण विश्वात कोठेही त्याला शत्रू नव्हता आणि निसर्गातील कोणत्याही गोष्टीवर आक्रमण करणारी कोणतीही काळी शक्ती नव्हती. आद्य देवदूताने त्याचा विश्वासघात केल्यानंतर, त्याने पृथ्वीवर मानवजातीची निर्मिती केली व मानवजातीमुळेच त्याने सैतान, आद्य देवदूताशी त्याचे सहस्र वर्षांसाठी चालणारे युद्ध औपचारिकपणे सुरू केले—एक असे युद्ध जे प्रत्येक टप्प्यावर अधिक तीव्र होत जाते. त्याची सर्वशक्तिमानता आणि शहाणपण या प्रत्येक टप्प्यात उपस्थित असते. तेव्हाच स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीने देवाचे शहाणपण, सर्वशक्तिमानता व विशेषतः देवाची वास्तविकता पाहिली आहे. आजही तो त्याच वास्तववादी पद्धतीने त्याचे कार्य पार पाडतो; याव्यतिरिक्त, तो त्याचे कार्य पार पाडत असताना, तो त्याचे शहाणपण आणि सर्वशक्तिमानतादेखील प्रकट करतो. देवाच्या सर्वशक्तिमानतेचे स्पष्टीकरण कसे करावे हे पाहण्यासाठी व त्याशिवाय, देवाच्या वास्तविकतेचे निश्चित स्पष्टीकरण पाहण्यासाठी, तो तुम्हाला कार्याच्या प्रत्येक टप्प्यातील आंतरिक सत्य पाहण्याची अनुमती देतो.
यहूदाने येशूचा विश्वासघात केल्याबद्दल, काही लोक आश्चर्य व्यक्त करतात: जगाच्या निर्मितीपूर्वी हे आधीच ठरवले गेले नव्हते का? खरे तर, पवित्र आत्म्याने त्यावेळच्या वास्तविकतेवर आधारित हे नियोजन केले. असे घडले, की यहूदा नावाचा कोणीतरी होता जो नेहमी निधीची उधळपट्टी करत होता, म्हणून ही भूमिका निभावण्यासाठी आणि अशा प्रकारे सेवा करण्यासाठी या व्यक्तीची निवड करण्यात आली. स्थानिक संसाधनांचा वापर करण्याचे हे खरे उदाहरण होते. येशूला सुरुवातीला याची कल्पना नव्हती; यहूदाचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याला त्याबद्दल नंतरच कळले. ही भूमिका साकारण्यास इतर कोणी सक्षम असते तर त्या व्यक्तीने यहूदाऐवजी ही भूमिका साकारली असती. जे पूर्वनियोजित होते ते खरे तर पवित्र आत्म्याने त्या क्षणी केले होते. पवित्र आत्म्याचे कार्य नेहमी उत्स्फूर्तपणे केले जाते; तो त्याच्या कार्याची आखणी कधीही करू शकतो व ते कधीही पार पाडू शकतो. मी नेहमी असे का म्हणतो, की पवित्र आत्म्याचे कार्य वास्तववादी असते आणि ते नेहमीच नवीन असते, कधीही जुने नसते व नेहमी उच्च स्तरावर असण्याइतके नवीनतम असते? जगाची निर्मिती झाली तेव्हा त्याच्या कार्याचे आधीच नियोजन केले गेले नव्हते; असे कधीच घडले नाही! कार्याचा प्रत्येक टप्पा आपापल्या वेळेसाठी योग्य परिणाम साधतो आणि टप्पे एकमेकांमध्ये व्यत्यय आणत नाहीत. बर्याच वेळा, तुझ्या मनात असलेल्या योजना पवित्र आत्म्याच्या नवीनतम कार्याशी जुळत नाहीत. त्याचे कार्य मनुष्याला वाटते तितके सोपे नाही किंवा मनुष्याच्या कल्पनेइतके ते गुंतागुंतीचेही नाही—त्यामध्ये कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी लोकांना त्यांच्या आवश्यकतांनुसार पुरवठा करणे समाविष्ट आहे. मनुष्याच्या मूलतत्त्वाबद्दल त्याच्यापेक्षा स्पष्ट ज्ञान कोणालाही नाही आणि नेमके याच कारणास्तव लोकांच्या वास्तववादी गरजा तसेच त्याचे कार्य पूर्ण करू शकत नाही. म्हणून, मानवी दृष्टिकोनातून, त्याचे कार्य अनेक सहस्र वर्षांपूर्वीच नियोजित केलेले दिसते. तो आता तुमच्यामध्ये कार्य करत असताना व बोलत असताना तुम्ही ज्या स्थितीत आहात ते पाहत असताना, प्रत्येक प्रकारच्या स्थितीला तोंड देताना, लोकांना आवश्यक असलेली वचने उच्चारण्यासाठी त्याच्याकडे योग्य वचने आहेत. त्याच्या कार्याच्या पहिल्या टप्प्याबद्दल बोलू या: ताडणाची वेळ. त्यानंतर, लोकांनी व्यक्त केलेल्या गोष्टी, त्यांची बंडखोरी, त्यांच्यातून निर्माण झालेल्या सकारात्मक आणि नकारात्मक अवस्था, तसेच त्या नकारात्मक अवस्था एका विशिष्ट टप्प्यावर आल्यावर लोक ज्या सर्वात खालच्या मर्यादा गाठू शकतात, त्या आधारे देवाने त्याचे कार्य केले; व त्याच्या कार्यातून अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्याने या गोष्टींवर ताबा मिळवला. म्हणजेच, कोणत्याही वेळी लोकांची सद्यस्थिती जी काही असेल त्यावर आधारित तो लोकांमध्ये टिकून राहण्याचे कार्य करतो; तो त्याच्या कार्याचा प्रत्येक टप्पा लोकांच्या वास्तविक स्थितीनुसार पार पाडतो. सर्व सृष्टी त्याच्या हातात आहे; तो त्यांना कसा ओळखू शकणार नाही? लोकांच्या स्थितीनुसार केव्हाही आणि कुठेही केले जावे अशा कार्याचा पुढचा टप्पा देव पार पाडतो. कोणत्याही अर्थाने हे कार्य हजारो वर्षे आधीच नियोजित केलेले नव्हते; ही मानवी धारणा आहे! तो त्याच्या कार्याचे परिणाम पाहून कार्य करतो व त्याचे कार्य सतत गहन व विकसित होत जाते; प्रत्येक वेळी, त्याच्या कार्याचे परिणाम पाहिल्यानंतर, तो त्याच्या कार्याची पुढील पायरी अमलात आणतो. हळूहळू स्थित्यंतर करण्यासाठी आणि कालांतराने त्याचे नवीन कार्य लोकांना दाखवण्यासाठी तो अनेक गोष्टी वापरतो. या पद्धतीने कार्य केल्याने लोकांच्या गरजा भागवता येतात, कारण देव लोकांना चांगल्या प्रकारे ओळखतो. अशा प्रकारे तो स्वर्गातून त्याचे कार्य पार पाडतो. त्याचप्रमाणे, देहधारी देव त्याचे कार्य त्याच प्रकारे करतो, व्यवस्था करतो व वास्तविक परिस्थितींनुसार मनुष्यामध्ये कार्य करतो. जग निर्माण होण्यापूर्वी त्याच्या कोणत्याही कार्याची आखणी केली गेली नव्हती किंवा त्याची काटेकोरपणे योजना अगोदर केली गेली नव्हती. जगाच्या निर्मितीच्या दोन हजार वर्षांनंतर, यहोवाने पाहिले की मानवजात इतकी भ्रष्ट झाली आहे आणि त्याने यशया संदेष्ट्याच्या मुखाचा उपयोग केला आणि हे भविष्य सांगितले, की नियमशास्त्राचे युग संपल्यानंतर, यहोवा कृपेच्या युगात मानवजातीची सुटका करण्याचे त्याचे कार्य पार पाडेल. अर्थात ही यहोवाची योजना होती, पण ही योजनादेखील तो त्यावेळेस पाहत असलेल्या परिस्थितीनुसार आखत होता; आदामाला निर्माण केल्यानंतर लगेचच त्याने याचा विचार नक्कीच केला नव्हता. यशयाने केवळ एक भविष्यवाणी केली होती, परंतु यहोवाने नियमशास्त्राच्या युगात या कार्यासाठी आगाऊ तयारी केली नव्हती; त्याऐवजी, त्याने कृपेच्या युगाच्या सुरूवातीस ते कार्य सुरू केले, जेव्हा योसेफच्या स्वप्नात त्याला संदेष्टा दिसला आणि त्याने देव देह धारण करेल या संदेशासह त्याला प्रबुद्ध केले आणि तेव्हाच त्याच्या देहधारणेचे कार्य सुरू झाले. देवाने जगाची निर्मिती केल्यानंतर त्याच्या देहधारणेच्या कार्याची तयारी केली नव्हती असे लोकांना वाटते; हे केवळ मानवजातीचा विकास कोणत्या प्रमाणात झाला आहे आणि सैतानाविरुद्धच्या त्याच्या युद्धाची स्थिती याआधारे निश्चित केले होते.
जेव्हा देव देह धारण करतो तेव्हा त्याचा आत्मा मनुष्यामध्ये उतरतो; दुसऱ्या शब्दांत, देवाचा आत्मा स्वतः भौतिक शरीराचे वस्त्र परिधान करतो. तो पृथ्वीवर त्याचे कार्य करण्यासाठी येतो आणि त्याच्यासोबत काही मर्यादित टप्पे आणण्यासाठी येत नाही; त्याचे कार्य पूर्णपणे अमर्यादित आहे. पवित्र आत्मा देहात जे कार्य करतो ते अजूनही त्याच्या कार्याच्या परिणामांवरून निश्चित केले जाते व देहात असताना तो किती काळ कार्य करेल हे निर्धारित करण्यासाठी तो अशा गोष्टींचा वापर करतो. पवित्र आत्मा त्याच्या कार्याचा प्रत्येक टप्पा थेट प्रकट करतो, त्याच्या कार्याचे परीक्षण करत असताना तो पुढे जातो; हे कार्य मानवी कल्पनेच्या मर्यादा वाढवण्याइतके अलौकिक असे काहीही नाही. हे आकाश आणि पृथ्वी व सर्व गोष्टी निर्माण करण्याच्या यहोवाच्या कार्यासारखे आहे; त्याने एकाच वेळी नियोजन आणि कार्य केले. त्याने अंधारापासून प्रकाश वेगळा केला व सकाळ आणि संध्याकाळ अस्तित्वात आली—याला एक दिवस लागला. दुसऱ्या दिवशी, त्याने आकाश निर्माण केले व त्यालाही एक दिवस लागला; त्यानंतर त्याने पृथ्वी, समुद्र आणि त्यांच्यात वास्तव्य करणारे सर्व प्राणी निर्माण केले, ज्यासाठी आणखी एक दिवस लागला. हे सहाव्या दिवसापर्यंत चालू राहिले, जेव्हा देवाने मनुष्य निर्माण केला व त्याला पृथ्वीवरील सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करू दिले. मग, सातव्या दिवशी, जेव्हा त्याने सर्व काही निर्माण करणे पूर्ण केले तेव्हा त्याने विश्रांती घेतली. देवाने सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि तो पवित्र दिवस म्हणून नियुक्त केला. त्याने सर्व गोष्टी निर्माण केल्यानंतरच या पवित्र दिवसाची स्थापना करण्याचे ठरवले, त्या गोष्टी निर्माण करण्यापूर्वी हे केले नाही. हे कार्यही उत्स्फूर्तपणे पार पडले; सर्व गोष्टी निर्माण करण्यापूर्वी, सहा दिवसांत जग निर्माण करून सातव्या दिवशी विश्रांती घेण्याचे त्याने ठरवले नव्हते; हे तथ्यांशी सुसंगत नाही. त्याने असे काही बोलून दाखवले नव्हते किंवा त्याने तसे नियोजनही केले नव्हते. सर्व गोष्टींची निर्मिती सहाव्या दिवशी पूर्ण होईल आणि सातव्या दिवशी तो विश्रांती घेईल असे त्याने कधीही म्हटले नव्हते; उलट, त्या वेळी त्याला जे चांगले वाटले त्यानुसार त्याने निर्माण केले. त्याने सर्वकाही निर्माण केले तेव्हा तो आधीच सहावा दिवस होता. त्याने सर्व काही निर्माण केल्यानंतरचा दिवस पाचवा दिवस असता, तर त्याने सहाव्या दिवसाला पवित्र दिवस म्हणून नियुक्त केले असते. मात्र, त्याने खरेतर सहाव्या दिवशी सर्व निर्मिती पूर्ण केली व अशा प्रकारे सातवा दिवस एक पवित्र दिवस झाला, जो आजपर्यंत तसाच मानला जातो. त्यामुळे त्याचे सध्याचे कार्यही याच पद्धतीने सुरू आहे. तो तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या आवश्यक गोष्टींबद्दल बोलतो आणि त्या पुरवतो. म्हणजेच, आत्मा लोकांच्या परिस्थितीनुसार बोलतो व कार्य करतो; तो सर्वांवर लक्ष ठेवतो आणि कधीही व कोणत्याही ठिकाणी कार्य करतो. मी जे करतो, म्हणतो, तुमच्यावर ठेवतो व तुम्हाला देतो, त्याची तुम्हाला कोणत्याही अपवादाशिवाय गरज आहे. अशा प्रकारे, माझे कोणतेही कार्य वास्तविकतेपासून वेगळे नाही; हे सर्व खरे आहे, कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे की “वाचा आत्मा सर्वांवर लक्ष ठेवतो.” हे सर्व वेळेआधीच ठरवले असते तर ते योजनेनुसार केलेले नसते का? तुला असे वाटते, की देवाने संपूर्ण सहा सहस्र वर्षांच्या योजना तयार केल्या आणि नंतर मानवजातीला बंडखोर, प्रतिकारक, कुटिल व कपटी होण्यासाठी आणि देहाचा भ्रष्टाचार, सैतानी प्रवृत्ती, डोळ्यांतील लालसा व वैयक्तिक भोग धारण करण्यासाठी पूर्वनियोजित केले. यापैकी काहीही देवाने पूर्वनियोजित केले नव्हते, परंतु हे सर्व सैतानाच्या भ्रष्टतेमुळे घडले. काही जण म्हणतील, “सैतानही देवाच्या मुठीत नव्हता का? सैतान मनुष्याला अशा प्रकारे भ्रष्ट करेल हे देवाने पूर्वनियोजित केले होते आणि त्यानंतर देवाने त्याचे कार्य मनुष्यांमध्ये पार पाडले.” मानवजातीला भ्रष्ट करण्यासाठी देव खरोखर सैतानाला पूर्वनिश्चित करेल का? देव मानवजातीला सामान्यपणे जगू देण्यास खूप उत्सुक आहे, तर तो खरोखर त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करेल का? तसे असल्यास, सैतानाला पराभूत करणे व मानवजातीला वाचवणे हा व्यर्थ प्रयत्न ठरणार नाही का? मानवजातीची बंडखोरी पूर्वनियोजित कशी असेल? हे सैतानाच्या हस्तक्षेपामुळे घडले आहे, मग ते देवाने पूर्वनियोजित कसे केले असेल? ज्याची तुम्ही कल्पना करता तो देवाच्या मुठीत असलेला सैतान आणि ज्याबद्दल मी बोलतो त्या देवाच्या मुठीमधील सैतानापेक्षा खूप वेगळा आहे. “देव सर्वशक्तिमान आहे आणि सैतान त्याच्या हातात आहे” या तुमच्या विधानानुसार सैतान कधीही त्याचा विश्वासघात करू शकत नाही. देव सर्वशक्तिमान आहे असे तू म्हटले नाहीस का? तुमचे ज्ञान खूप अस्पष्ट आहे व ते वास्तविकतेशी सुसंगत नाही; मनुष्य कधीच देवाचे विचार जाणू शकत नाही किंवा मनुष्य कधीही त्याचे शहाणपण समजू शकत नाही! देव सर्वशक्तिमान आहे; हे अजिबात खोटे नाही. आद्य देवदूताने देवाचा विश्वासघात केला कारण देवाने सुरुवातीला त्याला अधिकाराचा वाटा दिला. अर्थात, ही एक अनपेक्षित घटना होती, जशी हव्वा सापाच्या मोहाला बळी पडली. तथापि, सैतानाने कितीही विश्वासघात केला तरीही तो देवासारखा सर्वशक्तिमान नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, सैतान केवळ शक्तिमान आहे; त्याने काहीही केले, तरी देवाचा अधिकार नेहमीच त्याचा पराभव करेल. “देव सर्वशक्तिमान आहे आणि सैतान त्याच्या हातात आहे” या म्हणीचा खरा अर्थ हाच आहे. म्हणून, सैतानाशी युद्ध करताना एका वेळी एक पाऊल उचलले पाहिजे. शिवाय, सैतानाच्या डावपेचांना प्रतिसाद म्हणून देव त्याच्या कार्याची योजना करतो—म्हणजेच, तो मानवजातीला तारण देतो व त्याच्या सर्वशक्तिमानता आणि शहाणपणाला युगानुसार योग्य पद्धतीने प्रकट करतो. त्याचप्रमाणे, शेवटच्या दिवसांचे कार्य कृपेच्या युगापूर्वी, पूर्वनियोजित नव्हते; पूर्वनियोजित गोष्टी अशा व्यवस्थितपणे केल्या जात नाहीत: प्रथम, मनुष्याच्या बाह्य प्रवृत्तीत बदल घडवून आणणे; दुसरे, मनुष्याला त्याच्या ताडणाच्या आणि कसोट्यांच्या अधीन करणे; तिसरे, मनुष्याला मृत्यूच्या कसोटीला सामोरे जायला लावणे; चौथे, मनुष्याला देवावर प्रेम करण्याची वेळ अनुभवू देणे व सृष्टीतील संकल्प व्यक्त करणे; पाचवे, मनुष्याला देवाची इच्छा पाहण्याची आणि त्याला पूर्णपणे जाणून घेण्याची अनुमती देणे व शेवटी मनुष्याला परिपूर्ण करणे. कृपेच्या युगात त्याने या सर्व गोष्टींचे नियोजन केले नव्हते; उलट, त्याने सध्याच्या युगात या गोष्टींचे नियोजन करण्यास सुरुवात केली. देवाप्रमाणे सैतानही कार्य करत आहे. सैतान त्याची भ्रष्ट प्रवृत्ती व्यक्त करतो, तर देव स्पष्ट बोलतो आणि काही अत्यावश्यक गोष्टी प्रकट करतो. आज हेच कार्य केले जात आहे व जगाच्या निर्मितीनंतर फार पूर्वी वापरण्यात आलेले कार्याचे तत्त्व आहे.
प्रथम देवाने आदाम आणि हव्वा यांना निर्माण केले व त्याने एक सापदेखील निर्माण केला. हा साप सर्वाधिक विषारी होता; त्याच्या शरीरात विष होते, ज्याचा सैतानाने फायदा घेण्यासाठी उपयोग केला. या सापाने हव्वेला पाप करण्यास प्रवृत्त केले. हव्वेनंतर आदामाने पाप केले आणि नंतर ते दोघे चांगले व वाईट यात फरक करू शकले. साप हव्वेला मोहात पाडेल व हव्वा आदामाला मोहात पाडेल हे यहोवाला माहीत असते, तर मग त्याने त्या सर्वांना एदेनच्या बागेत का ठेवले असते? जर तो या गोष्टींचा अंदाज लावू शकला असता, तर मग त्याने साप निर्माण करून त्याला एदेनच्या बागेत का ठेवले असते? एदेनच्या बागेमध्ये बर्यावाईटाचे ज्ञान करून देणार्या झाडाचे फळ का होते? त्यांनी ते फळ खावे असे त्याने ठरवले होते का? जेव्हा यहोवा आला, तेव्हा आदाम किंवा हव्वा या दोघांनीही त्याला सामोरे जाण्याची हिंमत केली नाही आणि तेव्हाच यहोवाला कळले, की त्यांनी बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाल्ले आहे व सापाच्या फसवणुकीला बळी पडले आहेत. शेवटी, त्याने सापाला शाप दिला आणि त्याने आदाम व हव्वा यांनाही शाप दिला. त्या दोघांनी झाडाचे फळ खाल्ले, तेव्हा ते फळ खात असल्याची यहोवाला अजिबात जाणीव नव्हती. मानवजात दुष्ट आणि लैंगिक नातेसंबंध बनवण्याइतकी भ्रष्ट झाली, इतकी पुढे गेली आहे की त्यांनी त्यांच्या अंतःकरणात जे काही राखून ठेवले ते सर्व दुष्ट व अनीतिमान होते; ते सर्व मलीन होते. त्यामुळे मानवजात निर्माण केल्याबद्दल यहोवाला पश्चाताप झाला. त्यानंतर, त्याने जलप्रलयाने जगाचा नाश करण्याचे कार्य केले, ज्यातून नोहा आणि त्याचे पुत्र वाचले. काही गोष्टी प्रत्यक्षात तितक्या प्रगत व अलौकिक नसतात जितक्या लोक कल्पना करतात. काहीजण विचारतात, “जर देवाला माहीत होते की आद्य देवदूत त्याचा विश्वासघात करेल, तर त्याने त्याला निर्माणच का केले?” ही वस्तुस्थिती आहे: पृथ्वी अस्तित्वात येण्यापूर्वी, आद्य देवदूत स्वर्गातील देवदूतांपैकी सर्वात महान होता. स्वर्गातील सर्व देवदूतांवर त्याचा अधिकार होता; हा देवाने दिलेला अधिकार होता. देवाचा अपवाद वगळता, तो स्वर्गातील देवदूतांपैकी सर्वात महान होता. कालांतराने, देवाने मानवजातीची निर्मिती केल्यानंतर, आद्य देवदूताने पृथ्वीवर देवाचा आणखी मोठा विश्वासघात केला. माझे असे म्हणणे आहे, की त्याने देवाचा विश्वासघात केला कारण त्याला मानवजातीचे व्यवस्थापन करायचे होते आणि देवाच्या अधिकाराला मागे टाकायचे होते. आद्य देवदूतानेच हव्वेला पाप करण्यास प्रवृत्त केले व त्याने तसे केले कारण पृथ्वीवर त्याचे राज्य स्थापन करावे आणि मनुष्यांनी देवाकडे पाठ फिरवावी व त्याऐवजी आद्य देवदूताची आज्ञा पाळावी अशी त्याची इच्छा होती. आद्य देवदूताने पाहिले, की बऱ्याच गोष्टी त्याचे आज्ञापालन करू शकतात—पृथ्वीवरील लोकांप्रमाणे देवदूतही ते करू शकतात. पक्षी आणि पशू, झाडे, जंगले, पर्वत, नद्या व पृथ्वीवरील सर्व गोष्टी मनुष्यांच्या—म्हणजेच, आदाम आणि हव्वा—यांच्या देखरेखीखाली होत्या, तर आदाम व हव्वेने आद्य देवदूताची आज्ञा पाळली. म्हणूनच, आद्य देवदूताला देवाच्या अधिकाराला मागे टाकण्याची आणि देवाचा विश्वासघात करण्याची इच्छा झाली. त्यानंतर, अनेक देवदूतांनी देवाविरुद्ध बंड केले, जे नंतर विविध प्रकारचे अशुद्ध आत्मे बनले. आद्य देवदूताच्या भ्रष्टाचारामुळे आजपर्यंत मानवजातीचा विकास झाला नाही का? मनुष्य आज जसा आहे त्याचे एकच कारण म्हणजे आद्य देवदूताने देवाचा विश्वासघात केला व मानवजातीला भ्रष्ट केले. हे टप्प्याटप्प्याने केलेले कार्य लोकांच्या कल्पनेइतके अस्पष्ट आणि सोपे मुळीच नाही. सैतानाने काही कारणास्तव विश्वासघात केला, तरीही लोक इतके साधे तथ्य समजू शकत नाहीत. ज्या देवाने आकाश, पृथ्वी व सर्व गोष्टी निर्माण केल्या, त्याने सैतानालाही का निर्माण केले? देव सैतानाला खूप तुच्छ मानतो आणि सैतान त्याचा शत्रू आहे, तर मग त्याने सैतानाला का निर्माण केले? सैतानाला निर्माण करून, त्याने शत्रूच निर्माण केला नाही का? देवाने प्रत्यक्षात शत्रू निर्माण केला नाही; उलट, त्याने एक देवदूत निर्माण केला व नंतर त्या देवदूताने त्याचा विश्वासघात केला. त्याचा दर्जा इतका वाढला होता, की त्याला देवाचा विश्वासघात करण्याची इच्छा निर्माण झाली. कोणी म्हणू शकतो, की हा योगायोग होता, परंतु ती अपरिहार्यतादेखील होती. एखाद्या विशिष्ट टोकापर्यंत परिपक्व झाल्यानंतर एखादी व्यक्ती अपरिहार्यपणे मरण पावते हे तसेच आहे; गोष्टी नुकत्याच त्या टप्प्यापर्यंत विकसित झाल्या आहेत. काही असमंजस मूर्ख म्हणतात, “सैतान तुझा शत्रू आहे, तर मग तू त्याला का निर्माण केलेस? आद्य देवदूत तुझा विश्वासघात करेल हे तुला माहीत नव्हते का? तू अनंतकाळपासून अनंतकाळापर्यंत पाहू शकत नाही का? तुला आद्य देवदूताचा स्वभाव माहीत नव्हता का? तो तुझा विश्वासघात करेल हे तुला स्पष्टपणे माहीत होते, तर तू त्याला आद्य देवदूत का बनवले? त्याने तुझा विश्वासघात तर केलाच, शिवाय तो इतर अनेक देवदूतांना सोबत घेऊन मानवजातीला भ्रष्ट करण्यासाठी नश्वरांच्या जगात उतरला, तरीही आजपर्यंत, तू तुझी सहा हजार वर्षांची व्यवस्थापन योजना पूर्ण करू शकला नाही.” ते शब्द बरोबर आहेत का? जेव्हा तू असा विचार करतोस, तेव्हा तू स्वतःला गरजेपेक्षा जास्त त्रास देत नाहीस का? असे काही लोक आहेत जे म्हणतात, “सैतानाने आजपर्यंत मानवजातीला भ्रष्ट केले नसते, तर देवाने मानवजातीचे असे तारण केले नसते. अशा प्रकारे, देवाचे शहाणपण व सर्वशक्तिमानता अदृश्य राहिली असती; त्याचे शहाणपण कोठे प्रकट झाले असते? म्हणून देवाने सैतानासाठी मानवजातीची निर्मिती केली जेणेकरून, तो नंतर त्याची सर्वशक्तिमानता प्रकट करू शकेल—अन्यथा, मनुष्याला देवाचे शहाणपण कसे सापडू शकेल? जर मनुष्याने देवाचा प्रतिकार केला नसता किंवा त्याच्याविरुद्ध बंड केले नसते, तर त्याच्या कृती प्रकट होणे अनावश्यक ठरले असते. जर सर्व सृष्टीने त्याची उपासना केली आणि त्याच्या अधीन झाली तर देवाला काही कार्य करायचे उरणार नाही.” हे वास्तविकतेपासून आणखी दूर आहे, कारण देवामध्ये काहीही मलीन नाही, म्हणून तो मलीनता निर्माण करू शकत नाही. तो आता फक्त त्याच्या शत्रूचा पराभव करण्यासाठी, त्याने निर्माण केलेल्या मनुष्यांना वाचवण्यासाठी व देवाचा द्वेष, विश्वासघात आणि विरोध करणाऱ्या व अगदी सुरुवातीला त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या आणि त्याच्या मालकीच्या राक्षसांचा व सैतानाचा पराभव करण्यासाठी त्याच्या कृती प्रकट करतो. देवाला या राक्षसांचा पराभव करायचा आहे आणि असे करताना, सर्व गोष्टींसमोर त्याची सर्वशक्तिमानता प्रकट करायची आहे. मानवजात व पृथ्वीवरील सर्व काही आता सैतानाच्या अधिपत्याखाली आहे आणि दुष्टांच्या अधिपत्याखाली आहे. देवाला त्याच्या कृती सर्व गोष्टींसमोर प्रकट करायच्या आहेत जेणेकरून, लोकांनी त्याला ओळखावे व त्याद्वारे सैतानाला पराभूत करावे आणि त्याच्या शत्रूंना पूर्णपणे नेस्तनाबूत करावे. या कार्याची संपूर्णता त्याच्या कृतींचे प्रकटीकरण करून पूर्ण होते. त्याची सर्व सृष्टी सैतानाच्या अधिपत्याखाली आहे, म्हणून देव त्यांच्यासमोर त्याची सर्वशक्तिमानता प्रकट करू इच्छितो, ज्यामुळे सैतानाचा पराभव होतो. जर सैतान नसता, तर त्याला त्याची कृत्ये प्रकट करण्याची गरज नसते. सैतानाने छळ केला नसता तर, देवाने मानवजातीची निर्मिती केली असती व त्यांना एदेनच्या बागेत राहण्यास प्रवृत्त केले असते. सैतानाच्या विश्वासघातापूर्वी देवाने त्याची सर्व कृत्ये देवदूतांसमोर किंवा आद्य देवदूतासमोर प्रकट का केली नाहीत? जर सुरुवातीला सर्व देवदूतांनी आणि आद्य देवदूताने देवाला ओळखले असते व ते त्याच्या अधीन गेले असते, तर देवाने त्या निरर्थक कृती केल्या नसत्या. सैतान व राक्षसांच्या अस्तित्वामुळे, मनुष्यांनीदेखील देवाचा प्रतिकार केला आहे आणि ते बंडखोर प्रवृत्तीने काठोकाठ भरले. म्हणून देवाला त्याच्या कृती प्रकट करायच्या आहेत. त्याला सैतानाशी युद्ध करायचे आहे, त्यामुळे त्याने त्याचा पराभव करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या अधिकाराचा व त्याच्या सर्व कृतींचा वापर केला पाहिजे; अशा प्रकारे, तो मनुष्यांमध्ये करत असलेले तारणाचे कार्य त्यांना त्याचे शहाणपण आणि सर्वशक्तिमानता पाहण्यास अनुमती देईल. आज देव करत असलेले कार्य अर्थपूर्ण आहे व काही लोक जे म्हणतात त्याच्याशी ते मुळीसुद्धा सुसंगत नाही “तू जे कार्य करतोस ते विरोधाभासी नाही का? हे एकापाठोपाठ कार्य करत राहणे म्हणजे केवळ स्वतःला त्रास देण्याची कसरत नाही का? तू सैतान निर्माण केलास आणि मग त्याला तुझा विश्वासघात व प्रतिकार करण्याची अनुमती दिलीस. तू मनुष्यांना निर्माण केलेस आणि नंतर त्यांना सैतानाच्या स्वाधीन केलेस, आदाम व हव्वा यांना मोहात पडू दिले. तू या सर्व गोष्टी जाणूनबुजून केल्या आहेत, तरीही तुला मानवजातीचा तिरस्कार का आहे? तू सैतानाचा तिरस्कार का करतोस? हे सर्व तूच निर्माण केलेले नाही का? तुझ्याकडे द्वेष करण्यासारखे काय आहे?” बरेच मूर्ख लोक अशा गोष्टी बोलतात. त्यांना देवावर प्रेम करण्याची इच्छा आहे, परंतु खोलवर ते देवाबद्दल तक्रार करतात. किती तो विरोधाभास! तुला सत्य समजत नाही, तुझ्याकडे खूप अलौकिक विचार आहेत आणि तू असा दावाही करतोस, की देवाने चूक केली आहे—तू किती मूर्ख आहेस! तूच सत्याशी खेळ करत आहेस; ही काही देवाची चूक नाही! काही लोक तर वारंवार तक्रार करतात, “तूच सैतानाला निर्माण केलेस आणि सैतानाला मनुष्यांमध्ये आणून त्यांना त्याच्या हाती सोपवलेस. मनुष्यांना सैतानी प्रवृत्ती प्राप्त झाल्यानंतर तू त्यांना क्षमा केली नाहीस; उलट, तू त्यांचा एका विशिष्ट प्रमाणात द्वेष केला. प्रथम तुझे त्यांच्यावर एका विशिष्ट प्रमाणात प्रेम होते, परंतु आता तू त्यांचा तिरस्कार करतोस. तूच मानवजातीचा द्वेष केला आहेस, तरीही तूच मानवजातीवर प्रेम केले आहेस. इथे नक्की काय सुरू आहे? हा विरोधाभास नाही का?” याकडे तुम्ही कसेही पहा, स्वर्गात हेच घडले; अशाच प्रकारे आद्य देवदूताने देवाचा विश्वासघात केला व मानवजात भ्रष्ट झाली आणि आजपर्यंत मनुष्यांनी हेच पुढे सुरू ठेवले आहे. तुम्ही शब्दांत हे कसेही मांडा, हीच संपूर्ण कथा आहे. तथापि, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, देव आज करत असलेल्या या कार्यामागील संपूर्ण उद्देश तुम्हाला वाचवणे व सैतानाचा पराभव करणे हा आहे.
देवदूत विशेषतः कमकुवत होते आणि त्यांच्याकडे सांगण्यासारखी कोणतीही क्षमता नव्हती, त्यामुळे त्यांना अधिकार मिळताच ते गर्विष्ठ झाले. हे आद्य देवदूताच्या बाबतीत विशेषतः खरे होते, ज्याचा दर्जा इतर कोणत्याही देवदूतापेक्षा जास्त होता. देवदूतांमधील एक राजा, त्याने यहोवाच्या अधिपत्याखाली लाखो लोकांचे नेतृत्व केले, त्याचा अधिकार इतर कोणत्याही देवदूतापेक्षा जास्त होता. तो बरेच काही करू इच्छित होता आणि जगावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला देवदूतांना मनुष्यांमध्ये खाली आणायचे होते. देव म्हणाला, की तो स्वतः विश्वाचा प्रभारी आहे; परंतु आद्य देवदूताने असा दावा केला, की तो विश्वाचा प्रभारी आहे—त्यानंतर, आद्य देवदूताने देवाचा विश्वासघात केला. देवाने स्वर्गात दुसरे जग निर्माण केले होते व आद्य देवदूताने या जगावर नियंत्रण ठेवण्याची आणि नश्वर क्षेत्रात उतरण्याची इच्छा धरली. देव त्याला तसे करू देईल का? त्यामुळे, त्याने आद्य देवदूताला फटकारले व त्याला हवेत खाली फेकले. जेव्हा त्याने मनुष्यांना भ्रष्ट केले, तेव्हापासून देवाने त्यांना वाचवण्यासाठी आद्य देवदूताशी युद्ध पुकारले आहे; या सहा सहस्र वर्षांचा उपयोग त्याने त्याचा पराभव करण्यासाठी केला आहे. तुमची सर्वशक्तिमान देवाची संकल्पना देव सध्या करत असलेल्या कार्याशी सुसंगत नाही; ती पूर्णपणे अव्यवहार्य आहे आणि खूपच खोटी आहे! वास्तविक, आद्य देवदूताच्या विश्वासघातानंतरच देवाने त्याला त्याचा शत्रू असल्याचे घोषित केले. केवळ त्याच्या विश्वासघातामुळेच आद्य देवदूताने नश्वर क्षेत्रात आल्यानंतर मानवजातीला पायदळी तुडवले व म्हणूनच मानवजातीचा विकास या टप्प्यापर्यंत झाला आहे. ते घडल्यानंतर, देवाने सैतानासमोर शपथ घेतली, “मी तुला पराभूत करेन आणि मी निर्माण केलेल्या सर्व मनुष्यांचे तारण करेन.” सुरुवातीला खात्री न पटल्याने सैतानाने उत्तर दिले, “तू मला खरच काही करू शकतोस का? तू मला खरच हवेत खाली पाडू शकतोस का? तू मला खरच पराभूत करू शकतोस का?” देवाने त्याला हवेत खाली टाकल्यानंतर, त्याने आद्य देवदूताकडे आणखी लक्ष दिले नाही व नंतर मानवजातीचे रक्षण करण्यास आणि सैतानाच्या सततच्या त्रासांना न जुमानता स्वतःचे कार्य पार पाडण्यास सुरुवात केली. सैतान बरेच काही करण्यास सक्षम होता, परंतु हे सर्व देवाने पूर्वी दिलेल्या शक्तींमुळे शक्य होते; तो त्या सर्व हवेत घेऊन गेला व आजतागायत त्याने ते तसेच ठेवले आहे. आद्य देवदूताला हवेत मारताना, देवाने त्याचा अधिकार मागे घेतला नाही आणि त्यामुळे सैतानाने मानवजातीला भ्रष्ट करणे पुढे सुरूच ठेवले. दुसरीकडे, देवाने मानवजातीचे रक्षण करण्यास सुरुवात केली, ज्यांना सैतानाने त्यांच्या निर्मितीनंतर लगेचच भ्रष्ट केले होते. देवाने स्वर्गात असताना त्याच्या कृती प्रकट केल्या नाहीत; तथापि, पृथ्वीची निर्मिती करण्यापूर्वी, त्याने स्वर्गात निर्माण केलेल्या जगातील लोकांना त्याच्या कृती पाहण्याची अनुमती दिली, अशा प्रकारे त्या लोकांना स्वर्गाच्या वर मार्गदर्शन केले. त्याने त्यांना शहाणपण व बुद्धी दिली आणि त्या लोकांना त्या जगात राहण्यास प्रवृत्त केले. साहजिकच, तुमच्यापैकी कोणीही यापूर्वी हे ऐकले नसेल. नंतर, देवाने मनुष्यांची निर्मिती केल्यानंतर, आद्य देवदूताने त्यांना भ्रष्ट करण्यास सुरुवात केली; पृथ्वीवरील संपूर्ण मानवजात अराजकतेत सापडली. तेव्हाच देवाने सैतानाविरुद्ध त्याचे युद्ध सुरू केले व त्याच वेळी मनुष्यांना त्याची कृत्ये दिसू लागली. सुरुवातीला अशी कृत्ये मानवजातीपासून लपवून ठेवण्यात आली होती. सैतानाला हवेत खाली टाकल्यानंतर, त्याने स्वतःच्या गोष्टी केल्या आणि देवाने त्याचे स्वतःचे कार्य पुढे सुरू ठेवले, शेवटच्या दिवसापर्यंत सतत सैतानाविरुद्ध युद्ध सुरू ठेवले. आता सैतानाचा नाश करण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला, देवाने त्याला अधिकार दिला व नंतर त्याने त्याला हवेत खाली पाडले, तरीही तो विरोधात राहिला. त्यानंतर, त्याने पृथ्वीवरील मानवजातीला भ्रष्ट केले, परंतु देव तेथे मानवजातीचे व्यवस्थापन करत होता. सैतानाचा पराभव करण्यासाठी देव त्याच्या मनुष्यांच्या व्यवस्थापनाचा वापर करतो. लोकांना भ्रष्ट करून, सैतान त्यांचे नशीब उध्वस्त करतो आणि देवाच्या कार्यात व्यत्यय आणतो. दुसरीकडे, देवाचे कार्य म्हणजे मानवजातीचे तारण आहे. देवाच्या कार्याचा कोणता टप्पा मानवजातीला वाचवण्यासाठी केला नव्हता? कोणता टप्पा लोकांना शुद्ध करण्यासाठी व त्यांना नीतिमान वर्तन करण्यास आणि ज्यांच्यावर प्रेम केले जाऊ शकते अशा लोकांची प्रतिमा जगण्यास भाग पाडण्यासाठी नव्हता? सैतान मात्र असे करत नाही. तो मानवजातीला भ्रष्ट करतो; तो सतत संपूर्ण विश्वात मानवजातीला भ्रष्ट करण्याचे कार्य करत असतो. अर्थात, देवदेखील सैतानाकडे लक्ष न देता स्वतःचे कार्य करतो. सैतानाला कितीही अधिकार असला तरी तो अधिकार देवाने त्याला दिला होता; देवाने त्याचे सर्व अधिकार सैतानाला दिलेले नाहीत आणि म्हणूनच सैतान काहीही करत असला तरी, तो कधीही देवाला मागे टाकू शकत नाही व नेहमी देवाच्या मुठीत राहील. स्वर्गात असताना देवाने त्याच्या कोणत्याही कृती प्रकट केल्या नाहीत. त्याने सैतानाला केवळ अधिकाराचा एक छोटासा भाग दिला आणि त्याला इतर देवदूतांवर नियंत्रण ठेवण्याची अनुमती दिली. म्हणून, सैतान काहीही करत असला, तरी तो देवाच्या अधिकाराच्या पुढे जाऊ शकत नाही, कारण देवाने मुळात त्याला दिलेला अधिकार मर्यादित आहे. देव कार्य करत असताना, सैतान व्यत्यय आणतो. शेवटच्या दिवसांत, त्याचे व्यत्यय संपतील; त्याचप्रमाणे, देवाचे कार्यदेखील पूर्ण होईल व देव ज्या प्रकारच्या मनुष्यांना पूर्ण करू इच्छितो ते पूर्ण होतील. देव लोकांना सकारात्मक मार्गदर्शन करतो; त्याचे जीवन जिवंत पाणी आहे, अथांग व अमर्याद आहे. सैतानाने मनुष्याला काही प्रमाणात भ्रष्ट केले आहे; शेवटी, जीवनाचे जिवंत पाणी मनुष्याला परिपूर्ण करेल आणि सैतानाला हस्तक्षेप करणे व त्याचे कार्य पार पाडणे अशक्य होईल. अशा प्रकारे, देव या लोकांना पूर्णपणे प्राप्त करू शकेल. आताही सैतान हे मान्य करण्यास नकार देतो; तो सतत देवाच्या विरोधात उभा राहतो, पण तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. देवाने म्हटले आहे, “मी सैतानाच्या सर्व अंधकारमय शक्तींवर आणि सर्व गडद प्रभावांवर विजय प्राप्त करेन” हेच देहात करायचे कार्य आहे व यामुळेच देह धारण करणेदेखील महत्त्वपूर्ण बनते: म्हणजेच, शेवटच्या दिवसांत सैतानाला पराभूत करण्याच्या कार्याचा टप्पा पूर्ण करणे आणि सैतानाच्या सर्व गोष्टी पुसून टाकणे. सैतानावर देवाचा विजय अपरिहार्य आहे! खरेतर, सैतान खूप पूर्वीच अपयशी ठरला आहे. जेव्हा अग्निवर्ण अजगराच्या संपूर्ण देशात सुवार्तेचा प्रसार होऊ लागला—म्हणजेच, जेव्हा देहधारी देवाने त्याचे कार्य सुरू केले व हे कार्य गतीमान झाले—तेव्हा सैतानाचा पूर्णपणे पराभव झाला, कारण देहधारणेचा उद्देश सैतानाचा पराभव करणे हा होता. जेव्हा सैतानाने पाहिले, की देव पुन्हा देहधारी झाला आहे आणि त्याचे कार्य करू लागला आहे, त्याला कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही, तेव्हा हे कार्य पाहून सैतान स्तब्ध झाला व त्याने आणखी दुष्टपणा करण्याचे धाडस केले नाही. सुरुवातीला सैतानाला वाटले, की तोदेखील भरपूर शहाणपणाने संपन्न आहे आणि त्याने देवाच्या कार्यात व्यत्यय आणला व त्रास दिला; तथापि, त्याने अशी अपेक्षा केली नव्हती, की देव पुन्हा एकदा देह धारण करेल किंवा देव त्याच्या कार्यात सैतानाच्या बंडखोरीचा उपयोग मानवजातीसाठी प्रकटीकरण आणि न्याय म्हणून करेल, त्याद्वारे मनुष्यांवर विजय मिळवेल व सैतानाचा पराभव करेल. देव सैतानापेक्षा सुज्ञ आहे आणि त्याचे कार्य त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणून, मी आधी म्हटल्याप्रमाणे, “मी जे कार्य करतो ते सैतानाच्या डावपेचांना प्रतिसाद म्हणून केले जाते; शेवटी, मी माझी सर्वशक्तिमानता व सैतानाची शक्तीहीनता प्रकट करेन.” देव त्याचे कार्य अग्रस्थानी करेल, तर सैतान मागे राहील, शेवटी त्याचा नाश होईपर्यंत—त्याला काय झाले आहे हेदेखील कळणार नाही! जेव्हा त्याचा पराभव केला जाईल आणि चिरडले जाईल तेव्हाच त्याला ते सत्य समजेल व तोपर्यंत त्याला अग्नीच्या तळ्यात भस्मसात झालेला असेल. तेव्हा त्याला पूर्णपणे पटणार नाही का? कारण मग सैतानाकडे आणखी डावपेच उरणार नाहीत!
हे टप्प्याटप्याने होणारे, वास्तववादी कार्य आहे जे बऱ्याचदा मानवजातीविषयीच्या दुःखाचा भार देवाच्या हृदयावर टाकते, म्हणून सैतानाशी त्याचे युद्ध सहा हजार वर्षे चालले आहे आणि देवाने म्हटले आहे, की “मी पुन्हा कधीही मानवजात निर्माण करणार नाही व मी कधीही देवदूतांना पुन्हा अधिकार देणार नाही.” तेव्हापासून, जेव्हा देवदूत पृथ्वीवर कार्य करण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी केवळ काही कार्य करण्यासाठी देवाचे अनुसरण केले; त्याने त्यांना पुन्हा कधीही अधिकार दिलेला नाही. इस्रायली लोकांनी पाहिलेल्या देवदूतांनी त्यांचे कार्य कसे केले? त्यांनी स्वतःला स्वप्नात प्रकट केले आणि यहोवाची वचने सांगितली. वधस्तंभावर खिळल्यानंतर तीन दिवसांनी येशूचे पुनरुत्थान झाले तेव्हा देवदूतांनीच दगड बाजूला ढकलला होता; देवाच्या आत्म्याने हे कार्य स्वतः केले नाही. देवदूतांनी फक्त या प्रकारचे कार्य केले; त्यांनी सहाय्यक भूमिका बजावल्या, परंतु त्यांना अधिकार नव्हता, कारण देव त्यांना पुन्हा कधीही अधिकार देणार नव्हता. काही काळ कार्य केल्यावर, देवाने पृथ्वीवर ज्या लोकांचा वापर केला त्यांनी देवाची जागा घेतली व म्हणाले, “मला विश्वाला मागे टाकायचे आहे! मला तिसऱ्या स्वर्गात उभे राहायचे आहे! आम्हाला सार्वभौम सत्ता सांभाळायची आहे!” अनेक दिवसांच्या कार्यानंतर ते गर्विष्ठ व्हायचे; त्यांना पृथ्वीवर सार्वभौम अधिकार मिळावा, दुसरे राष्ट्र स्थापन करावे, सर्व काही त्यांच्या चरणी असावे आणि तिसऱ्या स्वर्गात उभे राहावे अशी त्यांची इच्छा होती. तुला माहीत नाही का, की तू फक्त देवाने वापरलेला मनुष्य आहेस? तू तिसऱ्या स्वर्गात कसा जाऊ शकतोस? देव कार्य करण्यासाठी शांतपणे आणि आरडाओरड न करता पृथ्वीवर येतो, व नंतर त्याचे कार्य पूर्ण करून हळूच निघून जातो. तो मनुष्यांप्रमाणे कधीच ओरडत नाही, उलट त्याचे कार्य पार पाडण्यात तो व्यावहारिक असतो. शिवाय तो कधीही चर्चमध्ये प्रवेश करत नाही आणि ओरडत नाही, “मी तुम्हा सर्वांचा नाश करेन! मी तुम्हाला शाप देईन व तुमचे ताडण करेन!” तो फक्त त्याचे स्वतःचे कार्य करत राहतो आणि ते पूर्ण झाल्यावर निघून जातो. जे धार्मिक पाद्री आजारी लोकांना बरे करतात व भुते काढतात, व्यासपीठावरून इतरांना व्याख्यान देतात, मोठी आणि भडक भाषणे देतात व अवास्तव गोष्टींवर चर्चा करतात ते सर्वच मुळात अहंकारी आहेत! ते आद्य देवदूताचे वंशज आहेत!
आजच्या काळात देवाने त्याचे सहा हजार वर्षांचे कार्य पार पाडल्यानंतर, त्याच्या अनेक कृती आधीच प्रकट केल्या आहेत, ज्याचा मुख्य उद्देश सैतानाला पराभूत करणे आणि संपूर्ण मानवतेचे तारण करणे हा आहे. तो या संधीचा उपयोग स्वर्गातील सर्व गोष्टींना, पृथ्वीवरील सर्व गोष्टींना, समुद्रातील प्रत्येक गोष्टीला व पृथ्वीवरील देवाच्या निर्मितीच्या प्रत्येक शेवटच्या वस्तूला त्याची सर्वशक्तिमानता पाहण्यासाठी आणि त्याच्या सर्व कृत्यांचे साक्षीदार होण्यासाठी करत आहे. तो सैतानाच्या पराभवामुळे मिळालेल्या संधीचा उपयोग करून त्याची सर्व कृत्ये मनुष्यांसमोर प्रकट करतो व त्यांना त्याची स्तुती करण्यास आणि सैतानाला पराभूत करण्यातील त्याच्या शहाणपणाचे उदात्तीकरण करण्यास सक्षम करतो. पृथ्वीवरील, स्वर्गातील व समुद्रातील प्रत्येक गोष्ट देवाचा गौरव करते, त्याच्या सर्वशक्तिमानतेची स्तुती करते, त्याच्या प्रत्येक कृत्याची स्तुती करते आणि त्याच्या पवित्र नावाचा जयघोष करते. हा त्याने सैतानाच्या केलेल्या पराभवाचा पुरावा आहे; तो सैतानाला नेस्तनाबूत केल्याचा पुरावा आहे. महत्त्वाचे म्हणजे, तो त्याच्या मानवजातीच्या तारणाचा पुरावा आहे. देवाची संपूर्ण सृष्टी त्याला गौरव देते, त्याच्या शत्रूचा पराभव करून विजयी होऊन परतल्याबद्दल त्याची स्तुती करते व महान विजयी राजा म्हणून त्याची प्रशंसा करते. त्याचा उद्देश केवळ सैतानाचा पराभव करणे हा नाही, म्हणूनच त्याचे कार्य सहा हजार वर्षांपासून सुरू आहे. तो मानवजातीला वाचवण्यासाठी सैतानाच्या पराभवाचा वापर करतो; तो सैतानाच्या पराभवाचा उपयोग त्याच्या सर्व कृती आणि त्याचे सर्व वैभव प्रकट करण्यासाठी करतो. त्याला वैभव प्राप्त होईल व देवदूतांचा सर्व समुदाय त्याचे सर्व वैभव पाहील. स्वर्गातील संदेशवाहक, पृथ्वीवरील मनुष्य आणि पृथ्वीवरील सृष्टीतील सर्व वस्तू निर्माणकर्त्याचे वैभव पाहतील. हे कार्य तो करतो. स्वर्गातील व पृथ्वीवरील त्याच्या सर्व निर्मिती त्याच्या गौरवाची साक्ष देतील आणि सैतानाला पूर्णपणे पराभूत केल्यानंतर देव विजयी होऊन परत येईल व मानवजातीला त्याची स्तुती करण्याची अनुमती देईल, अशा प्रकारे त्याच्या कार्यात दुहेरी विजय प्राप्त होईल. सरतेशेवटी, तो संपूर्ण मानवजातीवर विजय मिळवेल आणि जो कोणी प्रतिकार करेल किंवा बंड करेल त्याला तो नष्ट करेल; दुसऱ्या शब्दांत, तो सैतानाच्या अधिपत्याखालील सर्वांचा नाश करेल. तू सध्या देवाच्या अनेक कृतींचा साक्षीदार आहेस, तरीही तू विरोध करतोसता, बंडखोरी करतोस व तू देवाच्या अधीन नाहीस; तू तुझ्यात अनेक गोष्टी ठेवतोस आणि तुला वाटेल ते करतोस. तू तुझ्या स्वतःच्या वासना व आवडीनिवडींचे अनुसरण करतोस; हे सर्व बंडखोरी आणि प्रतिकार आहे. देह व वासना, तसेच स्वतःच्या आवडीनिवडी, जग आणि सैतान यांच्यासाठी देवावर विश्वास ठेवणे म्हणजे मलीनता आहे; ते स्वाभाविकच प्रतिकारक व बंडखोरी आहे. आजकाल, वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धा आहेत: काही लोक आपत्तीपासून बचावासाठी आश्रय शोधतात आणि इतर लोक आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात; काहींना गूढ समजून घ्यायचे असते, तर काही लोक पैशांचा पाठपुरावा करतात. हे सर्व प्रतिकाराचे प्रकार आहेत व त्या सर्व ईश्वरनिंदा आहेत! कोणी प्रतिकार करतो किंवा बंड करतो असे म्हणणे—याचा अर्थ अशा वर्तणुकीचा संदर्भ नाही का? आजकाल बरेच लोक कुरकुर करतात, तक्रार करतात किंवा एखाद्याबद्दल मत देतात. त्या सर्व गोष्टी दुष्टांनी केल्या आहेत; ही मानवी प्रतिकार आणि बंडखोरीची उदाहरणे आहेत. अशा लोकांना सैतानाने पछाडलेले व व्यापलेले आहे. देव ज्यांना प्राप्त करतो ते पूर्णपणे त्याच्या अधीन असतात; ते असे लोक आहेत ज्यांना सैतानाने भ्रष्ट केलेले असते परंतु देवाच्या सध्याच्या कार्यामुळे त्यांचे तारण झाले आहे आणि त्यांच्यावर विजय मिळवला आहे, ज्यांनी संकटे सहन केली आहेत व ज्यांना शेवटी, देवाने पूर्णपणे प्राप्त केले आहे, जे यापुढे सैतानाच्या अधिपत्याखाली राहत नाहीत, ज्यांनी अनीतिमत्वापासून स्वतःला मुक्त केले आहे आणि जे पवित्रतेने जगण्यास तयार आहेत—असे लोक सर्वात पवित्र आहेत; ते खरोखरच पवित्र आहेत. जर तुझ्या सध्याच्या कृती देवाच्या आवश्यकतांच्या एका भागाशी सुसंगत नसतील, तर तुला काढून बाहेर टाकले जाईल. हे वादातीत आहे. आता काय होईल यावर सर्व काही अवलंबून आहे; जरी तुला पूर्वनियोजित केले असेल व निवडले गेले असेल तरीही, तुझी आजची कृती तुझा परिणाम निश्चित करेल. तू आता टिकू शकत नसशील, तर तुला बाहेर काढून टाकले जाईल. जर तू आता प्रवाहामध्ये येऊ शकत नसशील, तर तू नंतर कसा पुढे जाऊ शकतोस? एवढा मोठा चमत्कार तुझ्यासमोर झाला, तरीही तुझा विश्वास बसत नाही. मग, नंतर जेव्हा त्याने त्याचे कार्य पूर्ण केले असेल आणि यापुढे असे कार्य करणार नाही तेव्हा तू देवावर विश्वास कसा ठेवशील? तोपर्यंत, त्याचे अनुसरण करणे तुझ्यासाठी आणखी अशक्य होईल! पुढे, तू पापी किंवा नीतिमान आहेस की नाही हे ठरवण्यासाठी किंवा तू परिपूर्ण आहेस की नाहीसा झाला आहेस हे ठरवण्यासाठी देव तुझ्या वृत्तीवर, देवाच्या अवताराच्या कार्याबद्दलचे तुझे ज्ञान व तुझ्या अनुभवावर अवलंबून असेल. तू आता स्पष्टपणे पाहिले पाहिजेस. पवित्र आत्मा अशा प्रकारे कार्य करतो: तो आज तुझ्या वर्तणुकीनुसार तुझा परिणाम ठरवतो. आजची वचने कोण उच्चारतो? आजचे कार्य कोण करतो? आज तुला बाहेर काढून टाकले जाईल हे कोण ठरवतो? तुला परिपूर्ण करण्याचा निर्णय कोण घेतो? हे मी स्वतः करत नाही का? ही वचने उच्चारणारा मीच आहे; असे कार्य करणारा मीच आहे. लोकांना शाप देणे, त्यांचे ताडण करणे आणि त्यांचा न्याय करणे हे सर्व माझ्या कार्याचे भाग आहेत. शेवटी, तुला बाहेर काढून टाकणेदेखील माझ्यावर अवलंबून असेल. या सर्व गोष्टी माझे कार्य आहेत! तुला परिपूर्ण बनवणे हे माझे कार्य आहे व तुला आशीर्वादांचा आनंद लुटण्याची अनुमती देणे हेदेखील माझे कार्य आहे. हे सर्व कार्य मी करतो. तुझा निकाल यहोवाने आधीच ठरवलेला नव्हता; तो आजच्या देवाने ठरवला आहे. ते सध्या ठरवले जात आहे; जगाची निर्मिती होण्यापूर्वी फार आधी ते ठरवलेले नव्हते. काही मूर्ख लोक म्हणतात, “कदाचित तुझ्या पाहण्यात काहीतरी चूक झाली आहे आणि तू मला जसे पाहिले पाहिजे तसे पाहत नाहीस. शेवटी, आत्मा काय प्रकट करतो तेच तुला दिसेल!” येशूने मूलतः यहूदाला त्याचा शिष्य म्हणून निवडले. लोक विचारतात: “तो असा शिष्य कसा निवडू शकतो जो त्याचा विश्वासघात करेल?” सुरुवातीला, येशूचा विश्वासघात करण्याचा यहूदाचा कोणताही हेतू नव्हता; हे नंतरच घडले. त्या वेळी, येशूने यहूदाला पसंती दर्शवली होती; त्याने त्या मनुष्याला त्याचे अनुसरण करण्यास प्रवृत्त केले होते आणि त्याच्या आर्थिक बाबींची जबाबदारी त्याला दिली होती. यहूदा पैशांची उधळपट्टी करेल हे येशूला माहीत असते, तर त्याने त्याला अशा प्रकरणांची जबाबदारी दिली नसती. असे म्हणता येईल, की हा मनुष्य कुटिल व कपटी आहे किंवा तो त्याच्या बंधुभगिनींना फसवेल हे येशूला मुळात माहीत नव्हते. नंतर, काही काळ यहूदाने येशूचे अनुसरण केल्यानंतर, येशूने त्याला त्याच्या बंधुभगिनींशी आणि देवाशी धूर्तपणे वागताना पाहिले. यहूदाला पैशाच्या पिशवीतून पैसे घेण्याची सवय असल्याचेही लोकांना आढळून आले व त्यांनी येशूला त्याबद्दल सांगितले. तेव्हाच येशूला जे काही चालले होते त्याची जाणीव झाली. कारण येशूला वधस्तंभावर खिळण्याचे कार्य करायचे होते आणि कोणी तरी त्याचा विश्वासघात करण्याची आवश्यकता होती आणि ही भूमिका पार पाडण्यासाठी यहूदा हा योग्य मनुष्य होता, म्हणूनच, येशू म्हणाला, “आपल्यापैकी एक असा असेल जो माझा विश्वासघात करेल. मनुष्याचा पुत्र या विश्वासघाताचा उपयोग वधस्तंभावर खिळण्यासाठी करेल व तीन दिवसांनंतर त्याचे पुनरुत्थान होईल.” त्यावेळी, येशूने खरेतर यहूदाची निवड केली नव्हती जेणेकरून, तो त्याचा विश्वासघात करेल; उलटपक्षी, त्याला आशा होती की यहूदा एक निष्ठावान शिष्य असेल. अनपेक्षितपणे, यहूदा एक लालसा असलेला भ्रष्ट व्यक्ती ठरला ज्याने प्रभूचा विश्वासघात केला, म्हणून येशूने या परिस्थितीचा उपयोग करून या कार्यासाठी यहूदाची निवड केली. जर येशूचे सर्व बारा शिष्य एकनिष्ठ राहिले असते आणि यहूदासारखा कोणीही त्यांच्यामध्ये नसता, तर येशूचा विश्वासघात करणारी व्यक्ती त्याच्या शिष्यांपैकी एक नसती. मात्र, त्या वेळी, असे घडले की त्याच्या शिष्यांपैकी एका व्यक्तीनेच—यहुदानेच लाच घेण्याचा आनंद घेतलाम्हणून येशूने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी या मनुष्याचा उपयोग केला. हे किती साधे होते! येशूने त्याच्या कार्याच्या सुरूवातीस ते पूर्वनियोजित केले नव्हते; जेव्हा गोष्टी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत गेल्या तेव्हाच त्याने हा निर्णय घेतला. हा येशूचा निर्णय होता, ज्याचा अर्थ असा आहे, की तो स्वतः देवाच्या आत्म्याचा निर्णय होता. मूलतः, येशूने यहूदाची निवड केली होती; जेव्हा यहूदाने नंतर येशूचा विश्वासघात केला, तेव्हा पवित्र आत्म्याने त्याच्या स्वतःच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हे केले होते. त्या वेळी पवित्र आत्म्याने केलेले हे कार्य होते. जेव्हा येशूने यहूदाची निवड केली तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की यहूदा त्याचा विश्वासघात करेल. त्याला फक्त एवढेच माहीत होते की तो मनुष्य यहूदा इस्कर्योत होता. तुमचे परिणामदेखील तुमच्या आजच्या अधीनतेच्या पातळीनुसार व तुमच्या जीवनाच्या वाढीच्या पातळीनुसार निर्धारित केले जातात, तुझे परिणाम जगाच्या निर्मितीवेळीच पूर्वनियोजित होते अशा कोणत्याही मानवी धारणेनुसार नाही. या गोष्टी तुला स्पष्टपणे जाणवल्या पाहिजेत. यापैकी कोणतेही कार्य तुझ्या कल्पनेप्रमाणे केले जात नाही.