देहधारी देव आणि देवाने वापरलेले लोक यांच्यातील अत्यंत महत्वाचा फरक

देवाचा आत्मा पृथ्वीवर कार्य करत असताना अनेक वर्षे शोधत आहे आणि देवाने त्याचे कार्य करण्यासाठी युगानुयुगे अनेक लोकांचा वापर केला आहे. तरीही या सर्व काळासाठी, देवाच्या आत्म्याला योग्य विश्रांतीची जागा नाही, म्हणूनच देव त्याचे कार्य वेगवेगळ्या लोकांमध्ये करत राहतो. एकंदरीतच, लोकांद्वारेच त्याचे कार्य केले जाते. याचा अर्थ असा, की इतक्या वर्षांपासून, देवाचे कार्य कधीही थांबले नाही, परंतु ते आजपर्यंत लोकांमध्ये पुढे नेले जात आहे. जरी देवाने खूप वचने उच्चारली व खूप कार्य केले, तरीही मनुष्य देवाला ओळखत नाही, कारण देव मनुष्यासमोर कधीच प्रकट झाला नाही आणि त्याचे कोणतेही मूर्त स्वरूप नाही. आणि म्हणूनच देवाने हे कार्य—सर्व लोकांना व्यावहारिक देवाचे व्यावहारिक महत्त्व माहीत करून देण्याचे कार्य—पूर्ण केले पाहिजे. हा अंत साध्य करण्यासाठी, देवाने त्याचा आत्मा मानवजातीसमोर मूर्तपणे प्रकट केला पाहिजे व त्यांच्यामध्ये त्याचे कार्य केले पाहिजे. म्हणजेच, जेव्हा देवाचा आत्मा दैहिक रूप धारण करतो, देह आणि हाडे धारण करतो व लोकांमध्ये दृश्यमानपणे फिरतो, त्यांच्या जीवनात त्यांच्यासोबत असतो, कधी स्वतःला दाखवतो व कधी लपवतो, तेव्हाच लोक त्याच्याबद्दल सखोल आकलन करू शकतात. जर देव फक्त देहात राहिला, तर तो त्याचे कार्य संपूर्णपणे पूर्ण करू शकणार नाही. आणि काही काळ देहात कार्य केल्यावर, देहधारण केलेला असताना करणे आवश्यक असलेले सेवाकार्य पूर्ण केल्यावर, देव देह सोडेल व देहाच्या प्रतिमेत आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करेल, ज्याप्रमाणे येशूने सामान्य मानवजातीमध्ये काही काळ कार्य केल्यानंतर, त्याने पूर्ण करणे आवश्यक असलेले सर्व कार्य पूर्ण केले. तुम्हाला “मार्ग … (५)” मधील हा परिच्छेद आठवत असेल: “मला आठवते, की माझ्या पित्याने मला सांगितले होते, ‘पृथ्वीवर, फक्त तुझ्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कर व त्याचे कार्य पूर्ण कर. बाकी कशाचीही तुला चिंता नाही.’” या परिच्छेदात तुला काय दिसते? जेव्हा देव पृथ्वीवर येतो, तेव्हा तो फक्त त्याचे कार्य देवत्वात करतो, जे स्वर्गीय आत्म्याने देहधारी देवाकडे सोपवले आहे. जेव्हा तो येतो, तेव्हा त्याच्या उच्चारांना वेगवेगळ्या माध्यमांनी आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आवाज देण्यासाठी तो संपूर्ण भूमीमध्ये बोलतो. मनुष्यासाठी तरतूद करणे व मनुष्याला शिकवणे हे तो त्याचे मुख्य ध्येय आणि कार्याचे तत्त्व मानतो व परस्पर संबंध किंवा लोकांच्या जीवनातील तपशील यासारख्या गोष्टींची चिंता करत नाही. त्याचे मुख्य सेवाकार्य म्हणजे आत्म्यासाठी बोलणे. म्हणजेच, जेव्हा देवाचा आत्मा देहात मूर्तपणे प्रकट होतो, तेव्हा तो केवळ मनुष्याच्या जीवनाची तरतूद करतो आणि सत्य प्रकट करतो. तो मनुष्याच्या कार्यात स्वतःला गुंतवत नाही, म्हणजेच तो मानवजातीच्या कार्यात भाग घेत नाही. मनुष्य दैवी कार्य करू शकत नाही व देव मानवी कार्यात भाग घेत नाही. देव त्याचे कार्य करण्यासाठी या पृथ्वीवर आला तेव्हापासूनच्या सर्व वर्षांत, त्याने नेहमीच लोकांद्वारे कार्य केले आहे. तथापि, या लोकांना देहधारी देव मानले जाऊ शकत नाही—त्यांना फक्त देवाकडून वापरलेले लोक म्हणता येईल. दरम्यान, आजचा देव देवत्वाच्या दृष्टिकोनातून थेट बोलू शकतो, आत्म्याचा आवाज पाठवू शकतो व आत्म्याच्या वतीने कार्य करू शकतो. त्याप्रमाणेच, देवाने युगानुयुगे ज्यांचा वापर केला आहे ते सर्व देवाच्या आत्म्याने दैहिक शरीरात कार्य केल्याची उदाहरणे आहेत—मग त्यांना देव का म्हणता येणार नाही? परंतु आजचा देव हादेखील देहात प्रत्यक्ष कार्य करणारा देवाचा आत्मा होता आणि येशूदेखील देहात कार्य करणारा देवाचा आत्मा होता; दोघांनाही देव म्हणतात. तर फरक काय आहे? देवाने युगानुयुगे वापरलेले लोक सर्व सामान्य विचार व तर्क करण्यास सक्षम आहेत. त्यांना मानवी आचरणाची सर्व तत्त्वे समजली आहेत. त्यांच्याकडे सामान्य मानवी कल्पना आहेत आणि सामान्य लोकांकडे असायला पाहिजे अशा सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यांच्यापैकी बहुतेकांकडे असाधारण प्रतिभा व जन्मजात बुद्धिमत्ता आहे. या लोकांमध्ये कार्य करताना, देवाचा आत्मा त्यांच्या प्रतिभेचा उपयोग करतो, जी त्यांना देवाने दिलेली भेट आहे. देवाचा आत्मा देवाच्या सेवेत त्यांची शक्ती वापरून त्यांच्या प्रतिभेचा उपयोग करतो. तरीही देवाचे मूलतत्त्व कल्पना किंवा विचारांशिवाय आहे, ते मानवी हेतूंनी अशुद्ध झालेले नाही व सामान्य मनुष्यांकडे असलेल्या गोष्टींचाही त्यामध्ये अभाव आहे. याचा अर्थ असा, की तो मानवी आचरणाच्या तत्त्वांशीही परिचित नाही. आजचा देव पृथ्वीवर येतो तेव्हा असेच होते. त्याचे कार्य आणि त्याची वचने मानवी हेतूने अथवा मानवी विचारांनी अशुद्ध केलेली नाहीत, तर ते आत्म्याच्या हेतूचे थेट प्रकटीकरण आहेत व तो थेट देवाच्या वतीने कार्य करतो. याचा अर्थ असा आहे, की आत्मा थेट बोलतो, म्हणजेच मनुष्याच्या हेतूंमध्ये कोणतेही मिश्रण न करता देवत्व थेट कार्य करते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, देहधारी देव हे देवत्वाचे प्रत्यक्ष, मूर्त रूप आहे, त्याच्या ठायी मानवी विचार किंवा कल्पना नसते आणि त्याला मानवी आचरणाच्या तत्त्वांची समज नसते. जर फक्त देवत्व कार्य करत असेल (म्हणजे फक्त स्वतः देव कार्य करत असेल तर), तर पृथ्वीवर देवाचे कार्य पूर्ण होण्याचा कोणताही मार्ग नसता. म्हणूनच जेव्हा देव पृथ्वीवर येतो तेव्हा त्याच्याकडे असे काही लोक असले पाहिजेत, ज्यांचा वापर देव देवत्वामध्ये करत असलेल्या कार्याबरोबरच मानवजातीमध्ये कार्य करण्यासाठी करू शकेल. दुसऱ्या शब्दात, तो त्याच्या दैवी कार्याचे समर्थन करण्यासाठी मानवी कार्य वापरतो. तसे न केल्यास, मनुष्याला दैवी कार्याशी थेट संलग्न होण्याचा कोणताही मार्ग नसेल. येशू आणि त्याच्या शिष्यांसोबत असेच होते. या जगातील त्याच्या काळात, येशूने जुनी नियमशास्त्रे रद्द केली व नवीन आज्ञा प्रस्थापित केल्या. तसेच अनेक वचने उच्चारली. हे सर्व कार्य देवत्वात केले गेले. इतर, जसे की पेत्र, पौल आणि योहान, सर्वांनी त्यांचे पुढील कार्य येशूच्या वचनांच्या आधारावर केले. याचा अर्थ असा आहे, की देवाने त्याचे कार्य त्या युगात सुरू केले, कृपेच्या युगाची सुरुवात केली; म्हणजेच, त्याने नवीन युग सुरू केले, जुने नाहीसे केले आणि “देव हा प्रारंभ व शेवट आहे” या वचनांची पूर्तता केली. दुसऱ्या शब्दात, मनुष्याने दैवी कार्याच्या पायावरच मानवी कार्य केले पाहिजे. एकदा येशूने त्याला जे काही सांगायचे होते ते सांगितले आणि पृथ्वीवरील त्याचे कार्य पूर्ण केल्यावर, त्याने मनुष्याला सोडले. यानंतर, सर्व लोकांनी, कार्य करताना, त्याच्या वचनांमध्ये व्यक्त केलेल्या तत्त्वांनुसार कार्य केले व त्याने सांगितलेल्या सत्यांनुसार आचरण केले. या सर्व लोकांनी येशूसाठी कार्य केले. जर येशू एकटाच कार्य करत असता, तर त्याने कितीही वचने उच्चारली असती तरी लोकांना त्याच्या वचनांमध्ये गुंतण्याचे कोणतेही माध्यम मिळाले नसते, कारण तो देवत्वात कार्य करत होता आणि केवळ देवत्वाची वचने उच्चारू शकत होता व सामान्य लोकांना त्याची वचने समजू शकतील अशा गोष्टी तो स्पष्ट करू शकला नसता. आणि म्हणून त्याच्या नंतर आलेले प्रेषित व संदेष्टे त्याच्या कार्याला पूरक असणे त्याच्यासाठी आवश्यक होते. देहधारी देव त्याचे कार्य कसे करतो याचे हे तत्व आहे—देवत्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी देहधारी देहाचा वापर करून बोलणे आणि कार्य करणे व नंतर, देवाच्या स्वतःच्या हृदयानुसार काही किंवा कदाचित अधिक लोकांचा वापर करणे हे त्याच्या कार्याला पूरक आहे. म्हणजेच, देव मानवजातीमध्ये मेंढपाळ व सिंचनाचे कार्य करण्यासाठी त्याच्या हृदयानुसार लोकांचा वापर करतो जेणेकरून, देवाने निवडलेल्या लोकांना सत्याच्या वास्तविकतेत प्रवेश करता येईल.

जेव्हा त्याने देह धारण केला, तेव्हा जर देवाने केवळ देवत्वाचे कार्य केले असते आणि त्याच्याशी एकरूप होऊन कार्य करण्यासाठी त्याच्या हृदयात कोणतेही लोक नसते, तर मनुष्य देवाची इच्छा समजून घेण्यास किंवा देवाशी संलग्न होण्यास असमर्थ असता. देवाने हे कार्य पूर्ण करण्यासाठी, चर्चवर लक्ष ठेवण्यासाठी आणि चर्चची काळजी घेण्यासाठी, त्याच्या हृदयानुसार सामान्य लोकांचा वापर केला पाहिजे, जेणेकरून मनुष्याच्या संज्ञानात्मक प्रक्रिया, त्याचा मेंदू, ज्या पातळीवरील कल्पना करण्यास सक्षम आहेत, ती पातळी गाठू शकेल. दुसऱ्या शब्दात, देव त्याच्या देवत्वात करत असलेल्या कार्याचा “अनुवाद” करण्यासाठी त्याच्या हृदयानुसार काही लोकांचा वापर करतो, जेणेकरून ते उघडता येईल—दैवी भाषेचे मानवी भाषेत रूपांतर करता येईल, जेणेकरून लोकांना त्याचे आकलन होईल व लोक ते समजू शकतील. जर देवाने तसे केले नसते तर, देवाची दैवी भाषा कोणालाही समजली नसती, कारण देवाच्या हृदयानुसार असलेले लोक अल्पसंख्याक आहेत आणि मनुष्याची समजण्याची क्षमता कमकुवत आहे. म्हणूनच देव देह धारण केलेला असताना कार्य करतानाच ही पद्धत निवडतो. जर केवळ दैवी कार्य असते, तर देवाला जाणून घेण्याचा किंवा त्याच्याशी संलग्न होण्याचा मनुष्याकडे कोणताही मार्ग नसता, कारण मनुष्याला देवाची भाषा समजत नाही. मनुष्याला ही भाषा केवळ देवाच्या हृदयानुसार असलेल्या लोकांच्या माध्यमातून समजू शकते, जे त्याची वचने स्पष्ट करतात. तथापि, जर असे लोक मानवजातीमध्ये कार्यरत असतील तर ते केवळ मनुष्याचे सामान्य जीवन टिकवून ठेवू शकतील; ते मनुष्याच्या प्रवृत्तीत बदल करू शकत नाहीत. देवाच्या कार्याला नवीन प्रारंभ बिंदू असू शकत नाही; फक्त तीच जुनी गाणी असतील, तशाच अगदी निरस गोष्टी असतील. केवळ देहधारी देवाच्या माध्यमातून, जे देहधारी काळात सांगायला हवे ते सर्व सांगतो आणि करायला हवे ते करतो, त्यानंतर लोक त्याच्या वचनांनुसार कार्य करतात व अनुभव घेतात, केवळ अशा प्रकारेच त्यांची जीवन प्रवृत्ती बदलणे शक्य होईल आणि केवळ अशा प्रकारेच ते काळाबरोबर वाहू शकतील. जो देवत्वामध्ये कार्य करतो तो देवाचे प्रतिनिधित्व करतो, तर जे मानवजातीमध्ये कार्य करतात ते देवाने वापरलेले लोक आहेत. म्हणजेच, देहधारी देव हा मूलतः देवाने वापरलेल्या लोकांपेक्षा वेगळा असतो. देहधारी देव देवत्वाचे कार्य करण्यास सक्षम आहे, तर देवाने वापरलेले लोक त्यासाठी सक्षम नाहीत. प्रत्येक युगाच्या सुरुवातीला, देवाचा आत्मा वैयक्तिकरीत्या बोलतो आणि मनुष्याला नवीन सुरुवात करून देण्यासाठी नवीन युग सुरू करतो. जेव्हा त्याचे बोलणे संपते, तेव्हा देवाचे त्याच्या देवत्वामधील कार्य पूर्ण झाले आहे, हे सूचित होते. त्यानंतर, सर्व लोक त्यांच्या जीवनातील अनुभवात प्रवेश करण्यासाठी देवाने वापरलेल्या लोकांच्या नेतृत्वाचे अनुसरण करतात. त्याच संकेतानुसार, हादेखील एक टप्पा आहे ज्यामध्ये देव मनुष्याला नवीन युगात आणतो व लोकांना एक नवीन प्रारंभ बिंदू देतो—ज्या वेळी देवाचे देहातील कार्य समाप्त होते.

देव त्याच्या सामान्य मानवतेला परिपूर्ण करण्यासाठी किंवा सामान्य मानवतेचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर येत नाही. तो फक्त सामान्य मानवतेमध्ये देवत्वाचे कार्य करण्यासाठी येतो. देव सामान्य मानवतेबद्दल जे बोलतो ते लोकांच्या कल्पनेप्रमाणे नाही. मनुष्य “सामान्य मानवता” याची व्याख्या पत्नी किंवा पती आणि मुलगे व मुली अशी करतो, जो एक सामान्य व्यक्ती असल्याचा पुरावा आहे; देव मात्र याकडे असे पाहत नाही. तो सामान्य मानवतेकडे सामान्य मानवी विचार, सामान्य मानवी जीवन आणि सामान्य मनुष्यांपासून जन्माला आलेला म्हणून पाहतो. परंतु त्याच्या सामान्यतेमध्ये मनुष्याच्या कल्पनेप्रमाणे पत्नी अथवा पती व मुले समाविष्ट नाहीत. म्हणजेच, मनुष्यासाठी, देव ज्या सामान्य मानवतेबद्दल बोलतो त्याला मनुष्य मानवतेची अनुपस्थिती मानतो, ज्यामध्ये भावनांचा आणि दैहिक आवश्यकतांचा अभाव असतो, हे येशूप्रमाणे असते, जो सामान्य व्यक्तीचे फक्त बाह्य रूप होता आणि ज्याने सामान्य व्यक्तीचे स्वरूप घेतले, परंतु सामान्य व्यक्तीकडे असले पाहिजे ते सर्व त्याच्याकडे नव्हते. यावरून असे दिसून येते, की देहधारी देवाच्या मूलतत्वात सामान्य मानवतेची संपूर्णता समाविष्ट नाही, परंतु सामान्य मानवी जीवनाच्या नित्यक्रमांना समर्थन देण्यासाठी व सामान्य मानवी तर्कशक्ती टिकवून ठेवण्यासाठी लोकांकडे असणे आवश्यक असलेल्या गोष्टींचा फक्त एक भाग त्यात समाविष्ट आहे. पण मनुष्य ज्या गोष्टींना सामान्य मानवता मानतो त्याच्याशी याचा काहीही संबंध नाही. त्या गोष्टी देहधारी देवाकडे असायला हव्यात. तथापि, असे काही लोक आहेत जे मानतात, की देहधारी देवाच्या ठायी सामान्य मानवता आहे असे तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा त्याला पत्नी, मुले आणि मुली, कुटुंब असेल; या गोष्टींशिवाय तो सामान्य मनुष्य ठरणार नाही, असे ते म्हणतात. मग मी तुला विचारतो, “देवाला पत्नी आहे का? देवाला नवरा मिळणे शक्य आहे का? देवाला मुले होऊ शकतात का?” हा खोटेपणा नाही का? तरीही देहधारी देव खडकांच्या मधोमध उगवू शकत नाही किंवा आकाशातून खाली पडू शकत नाही. तो फक्त सामान्य मानवी कुटुंबात जन्माला येऊ शकतो. म्हणूनच त्याला आई-वडील आणि बहिणी आहेत. देहधारी देवाच्या सामान्य मानवतेकडे या गोष्टी असल्या पाहिजेत. येशूच्या बाबतीतही असेच होते; येशूचे वडील व आई, बहिणी आणि भाऊ होते व हे सर्व सामान्य होते. पण जर त्याला पत्नी आणि मुलगे व मुली असत्या, तर देहधारी देवाला मिळावी अशी ती सामान्य मानवता नसती. असे असते तर, तो देवत्वाच्या वतीने कार्य करू शकला नसता. याचे मुख्य कारण म्हणजे, त्याला पत्नी किंवा मुले नव्हती आणि तरीही तो सामान्य कुटुंबात सामान्य लोकांत जन्माला आला होता, तो देवत्वाचे कार्य करण्यास सक्षम होता. हे आणखी स्पष्ट करण्यासाठी, देव, सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला सामान्य व्यक्ती मानतो. फक्त अशी व्यक्तीच दैवी कार्य करण्यास पात्र आहे. दुसरीकडे, जर त्या व्यक्तीला पत्नी, मुले किंवा पती असेल, तर ती व्यक्ती दैवी कार्य करू शकणार नाही, कारण त्यांच्याकडे फक्त मनुष्यांना आवश्यक असलेली सामान्य मानवता असेल, परंतु देवाला आवश्यक असलेली सामान्य मानवता नाही. जे देवाने मानले आहे आणि जे लोक समजतात ते बरेचदा खूप वेगळे असते. देवाच्या कार्याच्या या टप्प्यात असे बरेच काही आहे जे लोकांच्या धारणांच्या विरुद्ध आहे व त्यापेक्षा बरेच वेगळे आहे. कोणीही असे म्हणू शकतो, की देवाच्या कार्याच्या या टप्प्यात संपूर्णपणे देवत्वाचा समावेश आहे, ज्यामध्ये मानवजात सहाय्यक भूमिका बजावते. देव पृथ्वीवर त्याचे कार्य स्वतः करण्यासाठी येतो, मनुष्याला हस्तक्षेप करण्याची अनुमती देत नाही, त्यामुळे तो त्याचे कार्य करण्यासाठी देहधारण (अपूर्ण, सामान्य व्यक्तीमध्ये) करतो. तो या देहधारणेचा उपयोग मानवजातीला नवीन युग सादर करण्यासाठी, त्याच्या कार्यातील पुढील पायरी मानवजातीला सांगण्यासाठी आणि लोकांना त्याच्या वचनांमध्ये वर्णन केलेल्या मार्गानुसार आचरण करण्यास सांगण्यासाठी करतो. अशा प्रकारे देहात देवाचे कार्य संपुष्टात येते; तो मानवजातीचा निरोप घेणार आहे, यापुढे सामान्य मानवतेच्या देहात राहणार नाही, तर त्याच्या कार्याच्या दुसर्‍या भागात पुढे जाण्यासाठी मनुष्यापासून दूर जात आहे. मग, त्याच्या स्वतःच्या हृदयानुसार लोकांचा वापर करून, तो पृथ्वीवर लोकांच्या या समूहामध्ये परंतु त्यांच्या मानवतेमध्ये त्याचे कार्य सुरू ठेवतो.

देहधारी देव मनुष्यासोबत कायमचा राहू शकत नाही कारण देवाला अजून बरीच कार्ये करायची आहेत. त्याला देहासोबत बांधले जाऊ शकत नाही; त्याने जे कार्य केले पाहिजे ते तो देहाच्या प्रतिमेत करत असला तरी ते करण्यासाठी त्याला देह सोडावा लागतो. जेव्हा देव पृथ्वीवर येतो, तेव्हा सामान्य मनुष्याने मरण्यापूर्वी आणि सोडण्यापूर्वी प्राप्त करायला हवे, त्या स्वरूपापर्यंत पोहोचेपर्यंत तो थांबत नाही. त्याचा देह कितीही जुना असला तरी, त्याचे कार्य संपल्यावर तो मनुष्याला सोडून जातो. त्याच्यासाठी वय असे काही नाही, तो मानवी आयुर्मानानुसार त्याचे दिवस मोजत नाही; त्याऐवजी, तो त्याच्या कार्याच्या टप्प्यांनुसार देहातील त्याचे जीवन संपवतो. काही लोकांना असे वाटू शकते, की देवाने देहात येण्यासाठी विशिष्ट मर्यादेपर्यंत म्हातारे झाले पाहिजे, प्रौढ झाले पाहिजे, वृद्धापकाळापर्यंत पोहोचले पाहिजे आणि ते शरीर निकामी झाल्यावरच निघून गेले पाहिजे. ही मनुष्याची कल्पना आहे; देव असे कार्य करत नाही. तो देहात फक्त त्याला करावयाचे असलेले कार्य करण्यासाठी येतो आणि सामान्य मनुष्याचे आयुष्य जगण्यासाठी येत नाही, जसे की आई—वडिलांच्या पोटी जन्म घेणे, मोठे होणे, कुटुंब बनवणे व व्यवसाय सुरू करणे, मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे किंवा जीवनातील चढ—उतार अनुभवणे यांसारख्या सामान्य मनुष्याच्या सर्व क्रियाकलापांसाठी येत नाही. जेव्हा देव पृथ्वीवर येतो, तेव्हा देवाचा आत्मा देह धारण करतो, देहात येतो, परंतु देव सामान्य व्यक्तीचे जीवन जगत नाही. तो त्याच्या व्यवस्थापन योजनेतील फक्त एक भाग पूर्ण करण्यासाठी येतो. त्यानंतर तो मानवजातीला सोडून देईल. जेव्हा तो देह धारण करतो, तेव्हा देवाचा आत्मा देहाच्या सामान्य मानवतेला परिपूर्ण करत नाही. उलट, देवाने पूर्वनिश्चित केलेल्या वेळी, देवत्व थेट कार्य करते. मग, त्याला आवश्यक असलेले सर्व केल्यानंतर आणि त्याचे सेवाकार्य पूर्णपणे पूर्ण केल्यानंतर, या टप्प्यावर देवाच्या आत्म्याचे कार्य पूर्ण होते, ज्या टप्प्यावर देहधारी देवाचे जीवनदेखील संपते, मग त्याचे देहधारी शरीर त्याचे आयुर्मान जगलेले असो वा नसो. म्हणजेच, देहधारी शरीर जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर पोहोचले, ते पृथ्वीवर कितीही काळ जगले, तरी सर्व काही आत्म्याच्या कार्याद्वारे ठरवले जाते. मनुष्य ज्याला सामान्य मानवता मानतो त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. येशूचे उदाहरण घ्या. तो साडे तेहतीस वर्षे देहामध्ये राहिला. मानवी शरीराच्या आयुर्मानानुसार, त्याला त्या वयात मृत्यू यायला नको होता आणि त्याने निघून जायलाही नको होते. परंतु देवाच्या आत्म्याला त्याची पर्वा नव्हती. त्याचे कार्य पूर्ण झाले, त्या क्षणी शरीर काढून घेतले गेले, ते आत्म्यासह अदृश्य झाले. हे तत्त्व आहे ज्याद्वारे देव देहात कार्य करतो. आणि म्हणूनच, काटेकोरपणे सांगायचे तर, देहधारी देवाच्या मानवतेला फार महत्त्व नाही. पुन्हा वेगळ्या पद्धतीने सांगायचे तर, तो सामान्य मनुष्याचे जीवन जगण्यासाठी पृथ्वीवर येत नाही. तो प्रथम एक सामान्य मानवी जीवन स्थापित करून नंतर कार्य करण्यास सुरुवात करत नाही. उलट, जोपर्यंत तो एका सामान्य मानवी कुटुंबात जन्म घेतो तोपर्यंत तो दैवी कार्य करण्यास समर्थ असतो, मनुष्याच्या हेतूने निष्कलंक असलेले कार्य, जे दैहिक नाही, जे समाजाच्या मार्गांचा अवलंब करत नाही किंवा ज्यामध्ये मनुष्याच्या विचारांचा अथवा धारणांचा समावेश नाही आणि शिवाय, त्यात जगण्यासाठी मनुष्याच्या तत्त्वज्ञानाचा समावेश नाही. देहधारी देवाला हेच कार्य करायचे आहे आणि हेच त्याच्या देहधारणेचे व्यावहारिक महत्त्वही आहे. इतर क्षुल्लक प्रक्रियांना न जुमानता देहात करण्‍याची आवश्‍यकता असलेल्या कार्याचा एक टप्पा पूर्ण करण्यासाठी देव देह धारण करतो आणि सामान्य मनुष्याचे अनुभव त्याच्याकडे नाहीत. देहधारी देवाने करावयाच्या कार्यामध्ये सामान्य मानवी अनुभवांचा समावेश नाही. म्हणून देहात जे कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे ते पूर्ण करण्यासाठी देव देह धारण करतो. बाकीच्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही; तो इतक्या क्षुल्लक प्रक्रियेतून जात नाही. त्याचे कार्य पूर्ण झाले की त्याच्या देहधारणेचे महत्त्वही संपते. हा टप्पा पूर्ण करणे याचा अर्थ त्याला देहात जे कार्य करायचे आहे ते पूर्ण झाले आहे आणि त्याच्या देहाचे सेवाकार्य पूर्ण झाले आहे. पण तो देहात अनिश्चित काळासाठी कार्य करत राहू शकत नाही. कार्य करण्यासाठी त्याला दुसऱ्या ठिकाणी, देहाच्या बाहेर जावे लागते. केवळ अशा प्रकारे त्याचे कार्य पूर्ण केले जाऊ शकते आणि अधिक परिणामकारकतेसाठी पुढे जाऊ शकते. देव त्याच्या मूळ योजनेनुसार कार्य करतो. त्याला कोणते कार्य करायचे आहे आणि त्याने कोणते कार्य पूर्ण केले आहे, हे त्याला त्याच्या हाताच्या तळव्यासारखे स्पष्टपणे माहीत आहे. देव प्रत्येक व्यक्तीला त्याने आधीच ठरवलेल्या मार्गावर चालण्यासाठी नेतो. यातून कोणीही सुटू शकत नाही. जे देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करतात तेच विश्रांतीमध्ये प्रवेश करू शकतात. असे होऊ शकते, की नंतरच्या कार्यात, मनुष्याला मार्गदर्शन करण्यासाठी देहात बोलणारा देव नसेल, तर मूर्त स्वरूप असलेला आत्मा मनुष्याच्या जीवनाला मार्गदर्शन करेल. तरच मनुष्य देवाला स्पर्श करू शकेल, देवाकडे पाहू शकेल आणि देवाला आवश्यक असलेल्या वास्तविकतेत अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश करू शकेल, जेणेकरून तो व्यावहारिक देवाकडून परिपूर्ण केला जाईल. हे असे कार्य आहे जे पूर्ण करण्याचा देवाचा इरादा आहे आणि त्याने खूप पूर्वीपासून त्यासाठी योजना आखली होती. यातून, तुम्ही कोणता मार्ग घ्यावा ते तुम्ही सर्वांनी ठरवले पाहिजे!

मागील:  सात मेघगर्जनांचा घंटानाद—राज्याची सुवार्ता विश्वात सर्वत्र प्रसारित होईल अशी भविष्यवाणी करणे

पुढील:  अंधाराच्या प्रभावातून मुक्त व्हा आणि देव तुम्हाला प्राप्त करेल

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger