अध्याय २२ आणि २३
आज, सर्वजण देवाची इच्छा समजून घेण्यास आणि देवाची प्रवृत्ती जाणून घेण्यास इच्छुक आहेत, तरीही याचे कारण कोणालाच माहीत नाही, की ते जे करू इच्छितात ते पूर्ण करण्यास ते असमर्थ का आहेत, त्यांची अंतःकरणे नेहमीच त्यांचा विश्वासघात का करतात व त्यांना जे हवे आहे ते साध्य करू शकत नाहीत. परिणामी, ते पुन्हा एकदा निराशेने ग्रासले जातात, तसेच ते भयभीतदेखील होतात. या परस्परविरोधी भावना व्यक्त करण्यात असमर्थ ठरलेले, ते फक्त दुःखाने डोके खाली झुकवून सतत स्वतःला विचारू शकतात: “देवाने मला ज्ञान दिले नाही असे असू शकते का? देवाने गुपचूप माझा त्याग केला असावा का? कदाचित इतर सर्वजण ठीक आहेत व देवाने मला सोडून सर्वांना ज्ञान दिले आहे. जेव्हा मी देवाची वचने वाचतो, तेव्हा मला नेहमी अस्वस्थ का वाटते—मी कधीही काहीही का समजू शकत नाही?” असे विचार लोकांच्या मनात असले, तरी ते व्यक्त करण्याचे धाडस कोणी करत नाही; ते फक्त आत धडपडत राहतात. खरे तर, देवाशिवाय कोणीही त्याची वचने समजण्यास किंवा त्याची खरी इच्छा समजून घेण्यास सक्षम नाही. तरीही देव नेहमी सांगतो, की लोकांनी त्याची इच्छा समजून घ्यावी—हे बदकाला बळजबरीने फांदीवर बसवण्याचा प्रयत्न करण्यासारखे नाही का? देव मनुष्याच्या चुकांबाबत अनभिज्ञ आहे का? हा देवाच्या कार्यातील क्षण आहे, जो समजण्यास लोक अपयशी ठरतात आणि अशा प्रकारे, देव म्हणतो, “मनुष्य प्रकाशात जगतो, तरीही त्याला प्रकाशाच्या अनमोलतेची जाणीव नसते. तो प्रकाशाचे मूलतत्त्व आणि प्रकाशाचा स्त्रोत व त्याशिवाय, प्रकाश कोणाचा आहे याबद्दल अनभिज्ञ आहे.” देवाची वचने मनुष्याला काय सांगतात आणि ते त्याच्याकडून काय मागतात त्यानुसार, कोणीही वाचणार नाही, कारण मनुष्याच्या देहात असे काहीही नाही जे देवाच्या वचनांना स्वीकारेल. म्हणूनच, देवाच्या वचनांचे पालन करण्यास सक्षम असणे, देवाच्या वचनांचा आदर करणे व त्यांच्याप्रति तळमळ असणे आणि देवाच्या त्या वचनांचा वापर करणे जी मनुष्याच्या स्वतःच्या परिस्थितीनुसार त्याच्या स्थितीकडे निर्देश करतात व त्याद्वारे स्वतःला ओळखणे—हे सर्वोच्च मानक आहे. शेवटी जेव्हा राज्याची स्थापना होते, मनुष्य, जो देहात राहतो, तो अजूनही देवाची इच्छा समजून घेण्यास असमर्थ असेल आणि त्याला त्याच्या वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असेल—मात्र लोक सैतानाच्या हस्तक्षेपाशिवाय राहतील व मनुष्याचे सामान्य जीवन जगतील; सैतानाला पराभूत करण्याचे हे देवाचे उद्दिष्ट आहे, जे तो मुख्यतः देवाने निर्माण केलेल्या मनुष्याचे मूळ सार पुनर्प्राप्त करण्यासाठी करतो. देवाच्या मनात, “देह” चा हा अर्थ आहे: देवाचे सार जाणून घेण्यास असमर्थता; आध्यात्मिक क्षेत्रातील घडामोडी पाहण्यास असमर्थता; आणि शिवाय, सैतानाद्वारे भ्रष्ट होण्याची तरीही देवाच्या आत्म्याद्वारे निर्देशित केले जाण्याची क्षमता. हे देवाने निर्माण केलेल्या देहाचे मूलतत्त्व आहे. साहजिकच, सुव्यवस्थेच्या अभावामुळे मानवजातीच्या जीवनात निर्माण झालेली अराजकता टाळण्याचाही यामागील हेतू आहे. देव जितका जास्त बोलतो व तो जितक्या तीव्रतेने बोलतो तितके लोक जास्त समजतात. लोक नकळत बदलतात आणि नकळतपणे प्रकाशात राहतात व अशा प्रकारे, “प्रकाशामुळे, सर्व लोक वाढत आहेत व त्यांनी अंधार सोडला आहे.” हे राज्याचे सुंदर दृश्य आहे आणि “प्रकाशात जगणे, मृत्यूपासून दूर जाणे” आहे, ज्याबद्दल अनेकदा बोलले गेले आहे. जेव्हा सीनी पृथ्वीवर साकार होईल—जेव्हा राज्य साकार होईल—तेव्हा पृथ्वीवर त्यानंतर युद्ध होणार नाही; पुन्हा कधीही दुष्काळ, प्लेग व भूकंप होणार नाहीत; लोक शस्त्रे निर्माण करणे बंद करतील; सर्व शांततेत आणि स्थिरतेने जगतील; आणि लोकांमध्ये सामान्य व्यवहार असतील व देशांमध्ये सामान्य व्यवहार असतील. तरीही वर्तमानाची याच्याशी तुलना होऊ शकत नाही. स्वर्गाच्या खाली सर्व अनागोंदी आहे आणि प्रत्येक देशात हळूहळू सत्तापालट होऊ लागतात. देवाच्या उच्चारणांच्या अनुषंगाने, लोक हळूहळू बदलत आहेत व अंतर्गत, प्रत्येक देश हळूहळू विखुरला जात आहे. बाबेलचा स्थिर पाया वाळूच्या किल्ल्याप्रमाणे डळमळू लागतो आणि देवाच्या इच्छेनुसार बदल होत असताना, जगामध्ये अजाणतेपणी अपूर्व बदल घडतात व कोणत्याही वेळी सर्व प्रकारचे संकेत दिसतात, जे लोकांना दाखवतात, की जगाचा शेवटचा दिवस आला आहे! ही देवाची योजना आहे; हे असे टप्पे आहेत ज्याद्वारे तो कार्य करतो आणि प्रत्येक देशाचे नक्कीच तुकडे केले जातील. जुन्या सदोमाचा दुसऱ्यांदा नाश केला जाईल व अशा प्रकारे देव म्हणतो, “जगाचा नाश होत आहे! बाबेल खिळखिळे झाले आहे!” स्वतः देवाशिवाय अन्य कोणीही हे पूर्णपणे समजून घेण्यास सक्षम नाही; शेवटी, लोकांच्या जागरूकतेला मर्यादा आहे. उदाहरणार्थ, अंतर्गत घडामोडींच्या मंत्र्यांना माहीत असेल, की सध्याची परिस्थिती अस्थिर आणि गोंधळलेली आहे, परंतु ते त्यांना संबोधित करण्यास असमर्थ आहेत. ते केवळ अशा दिवसाची आशा हृदयात बाळगून, प्रवाहावर स्वार होऊ शकतात, ज्या दिवशी ते त्यांची मान ताठ ठेवू शकतील, ज्या दिवशी सूर्य पुन्हा एकदा पूर्वेला उगवेल, संपूर्ण भूमीवर चमकेल व ही दयनीय स्थिती पालटेल. तथापि, त्यांना हे माहिती नाही, की जेव्हा सूर्य दुसऱ्यांदा उगवतो, तेव्हा त्याचा उदय हा जुना क्रम पुनर्संचयित करण्यासाठी नसतो— तर ते एक पुनरुत्थान असते, संपूर्ण बदल असतो. ही संपूर्ण विश्वासाठी देवाची योजना आहे. तो नवीन जग आणेल, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो प्रथम मनुष्याचे नूतनीकरण करेल. आज, मानवजातीला देवाच्या वचनांमध्ये आणणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांना केवळ दर्जाच्या आशीर्वादांचा आनंद घेऊ देणे ही नाही. शिवाय, देव म्हणतो त्याप्रमाणे, “राज्यात, मी राजा आहे—परंतु मला त्याचा राजा मानण्याऐवजी, मनुष्य मला “स्वर्गातून अवतरलेला तारणहार” मानतो. परिणामी, तो मला भिक्षा देण्याची इच्छा करतो आणि माझ्याबद्दलच्या ज्ञानाचा पाठपुरावा करत नाही.” सर्व लोकांची अशी खरी परिस्थिती आहे. आज, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याचा अतृप्त लोभ पूर्णपणे काढून टाकणे, अशा प्रकारे लोकांनी काहीही न मागता देवाला ओळखणे. देव हे म्हणतो, यात काहीच आश्चर्य नाही, की “अनेकांनी भिकारीकाप्रमाणे माझ्यापुढे याचना केल्या; त्यामुळे अनेकांनी त्यांच्या “झोळ्या” माझ्यासमोर पसरल्या आहेत व त्यांना जगण्यासाठी अन्न देण्याची विनंती केली आहे.” अशा स्थिती लोकांचा लोभ दर्शवतात आणि ते दाखवतात, की लोक देवावर प्रेम करत नाहीत, तर त्याच्याकडे मागण्या करतात किंवा त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. लोकांचा स्वभाव भुकेल्या लांडग्यासारखा असतो; ते सर्व धूर्त व लोभी असतात आणि अशा प्रकारे देव त्यांच्याकडून वारंवार अपेक्षा ठेवतो, त्यांना लोभी हृदय सोडून देण्यास व प्रामाणिक अंतःकरणाने देवावर प्रेम करण्यास भाग पाडतो. प्रत्यक्षात, आजपर्यंत, लोकांनी त्यांचे संपूर्ण हृदय देवाला वाहिलेले नाही; ते दोन होड्यांवर पाय ठेवतात, कधी स्वतःवर, तर कधी देवावर विसंबून राहतात, मात्र पूर्णपणे त्याच्यावर विसंबून राहत नाहीत. जेव्हा देवाचे कार्य एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचते, तेव्हा सर्व लोक खरे प्रेम आणि विश्वास यांच्यामध्ये जगतील व देवाची इच्छा पूर्ण होईल; अशा प्रकारे, देवाच्या आवश्यकता जास्त नाहीत.
देवदूत सतत देवाच्या पुत्रांमध्ये आणि लोकांमध्ये फिरतात, स्वर्ग व पृथ्वीच्या दरम्यान धावपळ करतात आणि दररोज आध्यात्मिक क्षेत्रात परतल्यानंतर मानवी जगात उतरतात. हे त्यांचे कर्तव्य आहे व अशा प्रकारे, दररोज, देवाचे पुत्र आणि लोक यांचे पालनपोषण केले जाते व त्यांचे जीवन हळूहळू बदलत जाते. ज्या दिवशी देव त्याचे स्वरूप बदलेल, त्या दिवशी पृथ्वीवरील देवदूतांचे कार्य अधिकृतपणे संपेल आणि ते स्वर्गात परत येतील. आज देवाचे सर्व पुत्र व लोक समान स्थितीत आहेत. जसजशी वेळ जात आहेत तसतसे सर्व लोक बदलत आहेत आणि देवाचे पुत्र व लोक हळूहळू परिपक्व होत आहेत. त्या तुलनेत, सर्व बंडखोरदेखील अग्निवर्ण अजगरासमोर बदलत आहेत: लोक यापुढे अग्निवर्ण अजगराशी एकनिष्ठ राहणार नाहीत आणि भुते यापुढे त्याच्या व्यवस्थेचे पालन करणार नाहीत. त्याऐवजी, ते “त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे कार्य करतात आणि प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या मार्गाने जातो.” अशा प्रकारे जेव्हा देव म्हणतो, “पृथ्वीवरील देशांचा नाश कसा होणार नाही? पृथ्वीवरील देशांचे पतन कसे होणार नाही?” स्वर्ग क्षणार्धात खाली येते…. जणू काही अशुभ भावना मानवजातीचा अंत घडवून आणत आहे. येथे भविष्यवाणी केलेले विविध अशुभ संकेतच अग्निवर्ण अजगराच्या देशात घडत आहेत व पृथ्वीवरील कोणीही सुटू शकत नाही. देवाच्या सूचनांमध्ये ही भविष्यवाणी आहे. आज, सर्व लोकांना पूर्वसूचना आहे, की वेळ कमी आहे आणि त्यांना असे वाटते, की त्यांच्यावर आपत्ती येणार आहे—तरीही त्यांच्याकडे सुटका करण्याचे कोणतेही माध्यम नाही व त्यामुळे ते सर्व आशाहीन आहेत. देव म्हणतो, “मी दिवसेंदिवस माझ्या राज्याचा “अंतर्गत कक्ष” सजवत असताना, माझ्या कार्यात व्यत्यय आणण्यासाठी कोणीही अचानक माझ्या “कार्यकक्षा” मध्ये कधीही घुसले नाही.” खरे तर, देवाच्या वचनांचा अर्थ असा नाही, की लोक देवाला त्याच्या वचनांमध्ये ओळखू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते सूचित करतात, की प्रत्येक दिवशी, देव त्याच्या कार्याचा पुढील भाग पार पाडण्यासाठी संपूर्ण विश्वात सर्व प्रकारच्या विकासाची व्यवस्था करतो. तो म्हणतो, “माझ्या कार्यात व्यत्यय आणण्यासाठी कोणीही अचानक माझ्या “कार्यकक्षा” मध्ये कधीही घुसले नाही.” याचे कारण देव देवत्वात कार्य करतो आणि लोक त्याच्या कार्यात भाग घेण्यास असमर्थ आहेत, जरी त्यांची इच्छा असली तरी. मी तुला विचारू इच्छितो: तू खरोखरच संपूर्ण विश्वातील प्रत्येक विकासाची व्यवस्था करू शकतोस का? तू पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या पूर्वजांचा अवमान करायला लावू शकतोस का? देवाच्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी तू संपूर्ण विश्वातील लोकांना भाग पाडू शकतोस का? तू सैतानाला दंगा करायला लावू शकतोस का? लोकांना जग उजाड व रिकामे वाटू शकेल अशी जाणीव तू देऊ शकतोस का? लोक अशा गोष्टी करण्यास असमर्थ आहेत. भूतकाळात, जेव्हा सैतानाचे “कौशल्य” पूर्णपणे प्रकट व्हायचे होते, तेव्हा तो देवाच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यात नेहमी हस्तक्षेप करत असे; या टप्प्यावर, सैतानाच्या युक्त्या संपल्या होत्या आणि अशा प्रकारे देव त्याला त्याचे खरे रंग दाखवू देतो, जेणेकरून सर्व लोकांना ते कळेल. “माझ्या कार्यात कोणीही कधीही व्यत्यय आणला नाही” या वचनांची ही सत्यता आहे.
दररोज, चर्चचे लोक देवाची वचने वाचतात आणि दररोज, ते “शस्त्रक्रिया टेबल” वर त्यांचे विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ, “त्यांचे स्थान गमावणे,” “बडतर्फ केले जाणे,” “त्यांची भीती कमी होते व शांतता परत येते,” “त्याग,” आणि “भावना नसलेले”—असे उपहासात्मक शब्द लोकांना “पीडतात” आणि त्यांना लाजेने मूक बनवतात. जणू काही त्यांच्या संपूर्ण शरीराचा कोणताही भाग—डोक्यापासून पायापर्यंत, आतून बाहेरपर्यंत—देवाने स्वीकारलेला नाही. देव त्याच्या वचनांनी लोकांचे जीवन इतके उजाड का करतो? देव जाणूनबुजून लोकांसाठी गोष्टी कठीण करत आहे का? जणू काही सर्व लोकांचे चेहरे चिखलाने माखलेले आहेत जे धुतले जाऊ शकत नाहीत. दररोज, मस्तक झुकवून ते जणू घोटाळेबाजांप्रमाणे त्यांच्या पापांचा हिशेब देतात. सैतानाने लोकांना इतके भ्रष्ट केले आहे, की त्यांना त्यांच्या स्वतःच्या खर्या स्थितींची पूर्ण जाणीव नाही. पण देवासाठी, सैतानाचे विष त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागात आहे, अगदी त्यांच्या मज्जातंतूतही आहे; परिणामी, देवाचे प्रकटीकरण जितके अधिक प्रगल्भ होते तितके लोक अधिक भयभीत होतात व अशा प्रकारे सर्व लोकांना सैतानाचे ज्ञान दिले जाते आणि ते मनुष्यामध्ये सैतानाला ओळखू शकतात, कारण ते सैतानाला त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. आणि सर्व गोष्टींनी वास्तविकतेत प्रवेश केल्यामुळे, देव मनुष्याच्या स्वभावाचा पर्दाफाश करतो—म्हणजे, तो सैतानाची प्रतिमा उघड करतो—आणि अशा प्रकारे मनुष्याला वास्तविक, मूर्त सैतानाचे रूप दाखवतो, त्यामुळे मनुष्याला व्यावहारिक देवाला अधिक चांगल्या प्रकारे पाहता येईल. देव मनुष्याला त्याच्या देहरूपाचे ज्ञान देतो व तो सैतानाला रूप देतो, अशा प्रकारे सर्व लोकांच्या देहात असलेल्या सैतानाच्या वास्तविक, मूर्त रूपाचे ज्ञान देतो. ज्या विविध स्थितींबद्दल बोलले जाते त्या सर्व सैतानाच्या कृत्यांची अभिव्यक्ती आहेत. आणि म्हणूनच, असे म्हटले जाऊ शकते, की जे काही देहाचे आहेत ते सैतानाच्या प्रतिमेचे मूर्त स्वरूप आहे. देव त्याच्या शत्रूंशी विसंगत आहे—ते एकमेकांचे शत्रू आहेत व दोन भिन्न शक्ती आहेत; म्हणून, भुते सदैव भुते असतात आणि देव सदैव देव असतो; ते अग्नी व पाण्यासारखे विसंगत आहेत, स्वर्ग आणि पृथ्वीसारखे सदैव वेगळे आहेत. जेव्हा देवाने मनुष्याची निर्मिती केली, तेव्हा एका प्रकारच्या लोकांमध्ये देवदूतांचे आत्मे होते, तर एका प्रकारच्या लोकांमध्ये आत्मा नव्हता व अशा प्रकारे नंतरच्या लोकांना भुतांच्या आत्म्याने पछाडले होते आणि म्हणून त्यांना भुते म्हटले जाते. शेवटी, देवदूत हे देवदूत आहेत, भुते ही भुते आहेत—आणि देव हा देव आहे. प्रत्येकाचा त्याच्या प्रकारानुसार हाच अर्थ आहे व म्हणूनच, जेव्हा देवदूत पृथ्वीवर राज्य करतात आणि आशीर्वादांचा आनंद घेतात, तेव्हा देव त्याच्या निवासस्थानी परत येतो व बाकीचे—देवाचे शत्रू—राख होतात. खरे तर, सर्व लोक बाहेरून देवावर प्रेम करतात असे दिसते, परंतु मूळ त्यांच्या सारामध्ये आहे—देवदूतांचा स्वभाव असलेले ते देवाच्या हातातून कसे सुटतील आणि अथांग खड्ड्यात कसे पडतील? आणि ज्यांचा स्वभाव भुतांचा आहे ते देवावर खरे प्रेम कसे करू शकतात? अशा लोकांचे मूलतत्त्व देवावर खरे प्रेम करणारे नसते, मग त्यांना राज्यात प्रवेश करण्याची संधी कशी मिळेल? जेव्हा देवाने जगाची निर्मिती केली, तेव्हा देवाने सर्व व्यवस्था केली होती, जसे देव म्हणतो: “मी वर्षानुवर्षे मनुष्यामध्ये घालवली आहेत आणि आजच्या काळापर्यंत मी आलो आहे. माझ्या व्यवस्थापन योजनेचे हेच योग्य टप्पे नाहीत का? माझ्या योजनेमध्ये कोणी कधी भर घातली आहे का? माझ्या योजनांच्या टप्प्यांपासून कोणी कधी दूर झाले आहे का?” देह धारण केल्यानंतर, देवाने मनुष्याचे जीवन अनुभवले पाहिजे—ही व्यावहारिक देवाची व्यावहारिक बाजू नाही का? मनुष्याच्या दुर्बलतेमुळे देव मनुष्यापासून काहीही लपवत नाही; त्याऐवजी, तो मनुष्याला सत्य दाखवतो, जसे देव म्हणतो: “मी वर्षानुवर्षे मनुष्यामध्ये घालवली आहेत.” देव हा देहधारी देव आहे, म्हणूनच त्याने पृथ्वीवर वर्षानुवर्षे घालवली आहेत; सर्व प्रकारच्या प्रक्रिया पार पाडल्यानंतरच तो देहधारी देव मानला जाऊ शकतो व त्यानंतरच तो देहातील देवत्वात कार्य करू शकतो. मग, सर्व रहस्ये उघड केल्यानंतर, तो त्याचे स्वरूप बदलण्यास मोकळा होईल. बिगर-अलौकिकतेच्या स्पष्टीकरणाचा हा आणखी एक पैलू आहे, जो देवाने थेट सूचित केला आहे.
कोणताही निष्काळजीपणा न करता देवाच्या सर्व वचनांच्या कसोटीवर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, हा देवाचा आदेश आहे!