अध्याय २६

देवाने उच्चारलेल्या सर्व वचनांवरून असे दिसून येते, की देवाचा दिवस दिवसागणिक जवळ येत आहे. जणू काही हा दिवस लोकांच्या डोळ्यासमोर आहे, जणू काही तो उद्या येणार आहे. अशा प्रकारे, देवाची वचने वाचल्यानंतर, सर्व लोक भयभीत होतात आणि त्यांना जगाच्या उजाडपणाची काहीशी जाणीवदेखील होते, हलक्या पावसात वाऱ्याच्या झुळकीसोबत पाने पडत आहेत. लोक कोणताही मागमूस न ठेवता नाहीसे होतात, जणू काही ते सर्व पूर्णपणे अदृश्य झाले आहेत. प्रत्येकाला एक अशुभ भावना जाणवते व जरी सर्व लोक देवाची इच्छा पूर्ण करण्याची मनीषा बाळगत असले आणि त्यासाठी खूप प्रयत्न करत असले व प्रत्येक व्यक्ती देवाचा हेतू पूर्ण करण्यासाठी त्याची सर्व शक्ती पणाला लावत असली, जेणेकरून देवाची इच्छा सुरळीतपणे आणि निर्विघ्नपणे पुढे जावी, तरी या भावनेत नेहमीच अपशकूनाचा संकेत मिसळलेला असतो. आजचेच उच्चारण घ्या: जर ते जनतेसाठी प्रसारित केले गेले असते, संपूर्ण विश्वासाठी घोषित केले गेले, तर सर्व लोक नतमस्तक होऊन रडले असते, कारण या वचनांमध्ये “मी संपूर्ण पृथ्वीवर लक्ष ठेवेन, नीतिमत्त्व, वैभव, क्रोध आणि ताडण यांसह जगाच्या पूर्वेकडे प्रकट होईन, मी स्वतःला मानवतेच्या अनेक धारकांसमोर प्रकट करेन!” आध्यात्मिक बाबी समजून घेणारे सर्वजण हे पाहतात, की देवाच्या ताडणापासून कोणीही सुटू शकत नाही व ताडण भोगल्यानंतर सर्वजण आपापल्या प्रकारानुसार वेगळे केले जातील. खरोखर, हा देवाच्या कार्याचा टप्पा आहे आणि कोणीही ते बदलू शकत नाही. जेव्हा देवाने जगाची निर्मिती केली, जेव्हा त्याने मानवजातीचे नेतृत्व केले, तेव्हा त्याने त्याचे शहाणपण व चमत्कार दाखवले आणि जेव्हा तो या युगाचा अंत करेल, तेव्हाच लोक त्याचे खरे नीतिमत्त्व, वैभव, क्रोध व ताडण पाहतील. शिवाय, केवळ ताडणामुळेच ते त्याचे नीतिमत्त्व, वैभव आणि क्रोध पाहू शकतात; हा मार्ग स्वीकारला पाहिजे, ज्याप्रमाणे, शेवटच्या दिवसांमध्ये, देवाची देहधारणा आवश्यक आणि अपरिहार्य आहे. सर्व मानवजातीच्या अंताची घोषणा केल्यानंतर, देव आज जे कार्य करतो ते मनुष्याला दाखवतो. उदाहरणार्थ, देव म्हणतो, “जुन्या इस्रायलचे अस्तित्व संपले आहे आणि आजचे इस्रायल ताठ आणि उंच मानेने जगात उभे राहिले आहे आणि सर्व मानवजातीच्या हृदयात उभे राहिले आहे. आजचे इस्रायल माझ्या लोकांच्या माध्यमातून नक्कीच अस्तित्वाचा स्रोत प्राप्त करेल!” “हे द्वेषपूर्ण इजिप्त! असे कसे होऊ शकेल, की तू माझ्या ताडणाच्या मर्यादेत नाहीस?” देव त्याच्या हातून दोन विरोधी देशांना प्राप्त होणारे परिणाम जाणूनबुजून लोकांना दाखवतो, एका अर्थाने तो इस्रायलचा उल्लेख करतो, जे भौतिक आहे व दुसर्‍या अर्थाने देवाच्या सर्व निवडलेल्यांचा उल्लेख करतो—म्हणजेच, इस्रायल बदलत असताना देवाचे निवडलेले लोक कसे बदलतात, हे सांगतो. जेव्हा इस्रायल पूर्णपणे त्याच्या मूळ स्वरुपात परत येईल, तेव्हा सर्व निवडलेले लोक परिपूर्ण केले जातील—म्हणजेच, इस्रायल हे देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचे अर्थपूर्ण प्रतीक आहे. दरम्यान, इजिप्त हा त्यांचा प्रातिनिधिक संगम आहे ज्यांचा देव तिरस्कार करतो. याचे जितके अधिक पतन होईल, तितके देवाचा तिरस्कार करणारे अधिक भ्रष्ट होतील—आणि नंतर बाबेलचा नाश होईल. हे स्पष्ट विरोधाभास व्यक्त करते. इस्रायल व इजिप्तच्या समाप्तीची घोषणा करून, देव सर्व लोकांचे गंतव्यस्थान प्रकट करतो; अशा प्रकारे, इस्रायलचा उल्लेख करताना, देव इजिप्तबद्दलदेखील बोलतो. यावरून, हे लक्षात येते, की इजिप्तच्या विनाशाचा दिवस हा जगाच्या विनाशाचा दिवस आहे, ज्या दिवशी देव सर्व लोकांचे ताडण करतो. हे लवकरच होईल; देव ते पूर्ण करणार आहे, जे मनुष्याच्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही, तरीही ते अपरिहार्य आणि अपरिवर्तनीय आहे. देव म्हणतो, “जे माझ्याविरुद्ध उभे राहतात त्या सर्वांचे मी अनंतकाळ ताडण करेन. कारण मी ईर्ष्यापूर्ण देव आहे आणि मनुष्यांनी जे केले आहे त्यासाठी मी त्यांना सोडणार नाही.” देव अशा स्पष्ट शब्दांत का बोलतो? आणि अग्निवर्ण अजगराच्या राष्ट्रात त्याने वैयक्तिकरीत्या देह का धारण केला आहे? देवाच्या वचनांवरून, त्याचे उद्दिष्ट दिसून येते: तो लोकांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना सहानुभूती दाखवण्यासाठी अथवा त्यांची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांचे रक्षण करण्यासाठी आलेला नाही—जे त्याचा विरोध करतात त्यांचे ताडण करण्यासाठी तो आला आहे. कारण देव म्हणतो, “माझ्या ताडणापासून कोणीही सुटू शकत नाही.” देव देहात जगतो व शिवाय, तो एक सामान्य व्यक्ती आहे, तरीही त्याला व्यक्तिनिष्ठपणे ओळखू न शकल्याच्या त्यांच्या दुबळेपणाबद्दल तो लोकांना क्षमा करत नाही; त्याऐवजी, तो एक “सामान्य व्यक्ती” म्हणून मनुष्यांना त्यांच्या पापांसाठी दोषी ठरवतो, जे त्याचे देह पाहत आहेत त्यांना ताडण प्राप्त करणारे बनवतो आणि अशा प्रकारे ते अग्निवर्ण अजगराच्या राष्ट्राचे लोक नसलेल्या सर्वांसाठी बलिदान ठरतात. परंतु हे देवाच्या देहधारणेच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक नाही. देव मुख्यतः अग्निवर्ण अजगरासह युद्ध करण्यासाठी व युद्धाद्वारे त्याला लज्जित करण्यासाठी देह धारण करतो. कारण आत्म्यापेक्षा देह धारण करून अग्निवर्ण अजगराशी लढण्याद्वारे देवाची महान शक्ती अधिक सिद्ध होते, देव त्याची कृत्ये आणि सर्वशक्तिमानता दर्शवण्यासाठी देहात लढतो. देवाच्या देहधारणेमुळे असंख्य “निर्दोष” लोकांना शिक्षा फर्मावण्यात आली आहे व त्याद्वारे असंख्य लोकांना नरकात टाकण्यात आले आहे आणि ताडण भोगावे लागले आहे व देहामध्ये त्रास सहन करावा लागला आहे. हे देवाच्या नीतिमान प्रवृत्तीचे प्रदर्शन आहे व आज देवाला विरोध करणारे कितीही बदलत असले, तरी देवाची सरळ प्रवृत्ती कधीही बदलणार नाही. शिक्षा फर्मावल्यानंतर, लोक कायमचे दोषी ठरतात, पुन्हा कधीही उठू शकत नाहीत. मनुष्याची प्रवृत्ती देवासारखी असू शकत नाही. जे देवाला विरोध करतात त्यांच्यासाठी लोक चांगले आणि वाईट असतात; ते डावीकडे व उजवीकडे, कधी वर, कधी खाली डगमगतात; ते स्थिर राहण्यास असमर्थ असतात, कधीकधी देवाला विरोध करणार्‍यांचा अतिशय द्वेष करतात, कधीकधी त्यांना जवळ ठेवतात. लोकांना देवाचे कार्य माहीत नसल्यामुळे आजची परिस्थिती उद्भवली आहे. देव अशी वचने का उच्चारतो, “देवदूत तर देवदूतच आहेत; देव शेवटी देवच आहे; भुते शेवटी भुतेच आहेत; अनीतिमान अजूनही अनीतिमान आहेत; आणि पवित्र अजूनही पवित्र आहेत”? तुम्हाला ते समजू शकत नाही का? देवाचे स्मरण चुकले असते का? म्हणून देव म्हणतो, “प्रत्येक व्यक्ती आपापल्या प्रकारानुसार वेगळी केली जाते आणि नकळत त्यांच्या कुटुंबांच्या आलिंगनात परतण्याचा मार्ग शोधते.” यावरून असे दिसून येते, की आज देवाने सर्व गोष्टींचे त्यांच्या कुटुंबात वर्गीकरण केले आहे, जेणेकरून ते आता “अनंत जग” राहणार नाही व लोक यापुढे एकाच मोठ्या भांड्यातून खाणार नाहीत, तर त्यांच्या स्वतःच्या घरी त्यांचे स्वतःचे कर्तव्य पार पाडतील, स्वतःची भूमिका बजावतील. जगाची निर्मिती करताना ही देवाची मूळ योजना होती; प्रकारानुसार विभक्त झाल्यानंतर, “प्रत्येक जण आपापले जेवण जेवेल,” याचा अर्थ देव न्याय सुरू करेल. परिणामी, देवाच्या मुखातून ही वचने आली: “तशी मी सृष्टीची पूर्वीची स्थिती पुनर्संचयित करेन; सर्व काही जसे मूलतः होते, तसेच करेन, सर्व काही आमूलाग्र बदलेन, जेणेकरून सर्व काही माझ्या योजनेच्या आलिंगनात परतेल.” देवाच्या संपूर्ण कार्याचे हेच उद्दिष्ट आहे आणि ते समजणे कठीण नाही. देव त्याचे कार्य पूर्ण करेल—मनुष्य त्याच्या कार्याच्या मार्गात उभा राहू शकतो का? आणि देव त्याच्या व मनुष्यामध्ये स्थापित केलेला करार मोडू शकतो का? देवाच्या आत्म्याने जे केले आहे ते कोण बदलू शकेल? कोणी मनुष्य असे करू शकतो का?

भूतकाळात, लोकांनी देवाच्या वचनांमध्ये एक नियम समजून घेतला: जेव्हा देवाची वचने बोलली जातात, तेव्हा ती लवकरच सत्य बनतात. यात खोटेपणा नाही. देवाने म्हटले आहे, त्यामुळे तो सर्व लोकांचे ताडण करेल आणि शिवाय, त्याने त्याचे प्रशासकीय आदेश जारी केले आहेत त्यामुळे, हे दिसून येते, की देवाचे कार्य एका विशिष्ट टप्प्यावर पार पाडले गेले आहे. सर्व लोकांसाठी जारी केलेल्या संविधानात त्यांचे जीवन व देवाप्रति त्यांच्या वृत्तीला संबोधित केले. ते मुळापर्यंत पोहोचले नाही; हे देवाच्या पूर्वनियोजनेवर आधारित आहे असे म्हटलेले नाही, तर त्यावेळच्या मनुष्याच्या वर्तनावर आधारित आहे. आजचे प्रशासकीय आदेश विलक्षण आहेत आणि ते याबद्दल बोलतात “आपापल्या प्रकारानुसार सर्व लोक वेगवेगळे होतील आणि त्यांना त्यांच्या कृत्यांच्या प्रमाणात ताडण मिळेल.” बारकाईने न वाचल्यास, यात कोणतीही अडचण आढळत नाही. कारण अंतिम युगातच देव सर्व गोष्टी त्यांच्या प्रकारानुसार वेगळे करतो, हे वाचल्यानंतर बहुतेक लोक गोंधळलेले व हडबडलेले राहतात; काळाची निकड लक्षात न घेता ते अजूनही उदासीन वृत्ती अंगीकारतात आणि म्हणून ते याला इशारा मानत नाहीत. या टप्प्यावर, देवाचे प्रशासकीय आदेश, जे संपूर्ण विश्वाला घोषित केले जातात, मनुष्याला का दाखवले जातात? हे लोक संपूर्ण विश्वातील सर्वांचे प्रतिनिधित्व करतात का? देव नंतर या लोकांवर अधिक दया करू शकेल का? या लोकांची दोन डोकी आहेत का? जेव्हा देव संपूर्ण विश्वातील लोकांचे ताडण करतो, जेव्हा सर्व प्रकारच्या आपत्तींचा सामना करावा लागतो, तेव्हा या आपत्तींचा परिणाम म्हणून सूर्य व चंद्रामध्ये बदल घडून येतात आणि जेव्हा या आपत्तींचा अंत होईल, तेव्हा सूर्य व चंद्र बदललेले असतील—आणि त्याला “संक्रमण” म्हणतात. असे म्हणणे पुरेसे आहे, की भविष्यातील संकटे भयानक असतील. दिवसाच्या जागी रात्र येऊ शकते, सूर्य वर्षभर उगवणारच नाही, अनेक महिने तीव्र उष्णता असू शकते, अस्त होणारा चंद्र नेहमी मानवजातीच्या समोर असू शकतो, सूर्य व चंद्र एकत्र उगवताना विचित्र स्थिती दिसू शकते इत्यादी. अनेक चक्रीय बदलांनंतर, शेवटी, कालांतराने, त्यांचे नूतनीकरण केले जाईल. जे सैतानाचे आहेत त्यांच्यासाठी देव त्याच्या व्यवस्थांवर विशेष लक्ष देतो. म्हणून तो मुद्दाम म्हणतो, “विश्वातील मनुष्यांमध्ये, सैतानाचे असणारे लोक नष्ट केले जातील” या “लोकांनी” त्यांचे खरे रंग दाखवण्याआधी, देव त्यांचा सेवा करण्यासाठी नेहमी वापर करतो; परिणामी, तो त्यांच्या कृत्यांकडे लक्ष देत नाही, जेव्हा ते चांगले काम करतात तेव्हा तो त्यांना “बक्षीस” देत नाही किंवा जेव्हा ते वाईट करतात तेव्हा तो त्यांची “मजुरी” कापत नाही. म्हणूनच, तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यांच्याशी रुक्षपणे वागतो. त्यांच्या “चांगुलपणामुळे” तो अचानक बदलत नाही, कारण वेळ किंवा स्थळ काहीही असो, मनुष्याचे सार बदलत नाही, जसे देव व मनुष्य यांच्यात स्थापित केलेल्या कराराप्रमाणे आणि जसे मनुष्य म्हणतो, “समुद्र कोरडे पडले व खडक कोसळले तरीही काहीही बदल होणार नाही.” अशा प्रकारे, देव त्या लोकांना त्यांच्या प्रकारानुसार वेगळे करतो आणि त्यांच्याकडे लक्ष देत नाही. निर्मितीच्या काळापासून आजपर्यंत, सैतानाने स्वतःहून कधीही चांगले वर्तन केले नाही. यामुळे नेहमीच व्यत्यय, गडबड व मतभेद निर्माण झाले आहेत. जेव्हा देव कृती करतो किंवा बोलतो, तेव्हा भूत नेहमी सहभागी होण्याचा प्रयत्न करते, परंतु देव त्याची दखल घेत नाही. सैतानाचा उल्लेख केल्यावर, देवाचा क्रोध अनिर्बंधपणे येतो; कारण ते एका आत्म्याचे नाहीत, म्हणून त्यांच्यात कोणताही संबंध नाही, त्यांच्यात फक्त अंतर आणि फरक आहे. सात शिक्क्यांच्या प्रकटीकरणानंतर, पृथ्वीची स्थिती नेहमीच वाईट होत जाते व सर्व गोष्टी “सात शिक्क्यांच्या सोबतच पुढे जातात”, थोड्याही मागे पडत नाहीत. देवाच्या संपूर्ण वचनांमध्ये, लोक देवाने स्तब्ध झालेले दिसतात, तरीही ते अजिबात जागृत होत नाहीत. उच्च ठिकाणी पोहोचण्यासाठी, सर्व लोकांचे सामर्थ्य पुढे आणण्यासाठी आणि त्याशिवाय, देवाचे कार्य त्याच्या कळसापर्यंत नेऊन पूर्ण करण्यासाठी, देव लोकांना प्रश्न विचारतो, जणू काही त्यांचे पोट फुगवले जाते व अशा प्रकारे तो सर्व लोकांना भरून काढतो. या लोकांची खरी पातळी नसल्यामुळे, वास्तविक परिस्थितीनुसार, जे फुगवलेले आहेत ते मानके पूर्ण करणारे आहेत, तर जे नाहीत ते निरुपयोगी कचरा आहेत. ही देवाची मनुष्याकडून अपेक्षा आहे आणि तो ज्या पद्धतीने बोलतो त्याचे उद्दिष्ट आहे. विशेषतः, जेव्हा देव म्हणतो, “पृथ्वीवर असताना मी स्वर्गापेक्षा वेगळा असतो असे असेल का? मी स्वर्गात असताना पृथ्वीवर येऊ शकत नाही असे असेल का? पृथ्वीवर असताना मी स्वर्गात घेऊन जाण्यास अपात्र आहे असे असेल का?” हे प्रश्न स्पष्ट मार्ग म्हणून काम करतात ज्याद्वारे मनुष्य देवाला ओळखू शकतो. देवाच्या वचनांमधून, देवाची तातडीची इच्छा दिसून येते; लोक ती साध्य करण्यास असमर्थ आहेत व देव वारंवार अटींमध्ये भर घालतो, अशा प्रकारे सर्व लोकांना पृथ्वीवरील स्वर्गीय देव जाणून घेण्याची आणि स्वर्गात असलेला परंतु पृथ्वीवर राहणारा देव जाणून घेण्याची आठवण करून देतो.

देवाच्या वचनांवरून मनुष्याच्या स्थिती पाहिल्या जाऊ शकतात: “सर्व मानवजात माझ्या वचनांवर ताकद खर्च करते, माझ्या बाह्य साधर्म्यावर स्वतःच तपास हाती घेते, पण ते सर्व अपयशी ठरतात, त्यांच्या प्रयत्नांना काहीही फळ येत नाही आणि त्याऐवजी ते माझ्या वचनांनी खाली कोसळतात आणि पुन्हा उठण्याचे त्यांना धाडस होत नाही.” देवाचे दुःख कोण समजू शकेल? देवाच्या हृदयाला कोण सांत्वन देऊ शकेल? देव जे मागतो ते त्याच्या हृदयाशी कोण मान्य करतो? जेव्हा लोक फळ देत नाहीत, तेव्हा ते स्वतःला नाकारतात व खरोखरच देवाच्या योजनांच्या अधीन होतात. हळूहळू, जसे ते त्यांचे खरे हृदय दाखवतात, प्रत्येकाला त्यांच्या प्रकारानुसार वेगळे केले जाते आणि अशा प्रकारे हे दिसून येते, की देवदूतांचे सार म्हणजे देवाची शुद्ध आज्ञाधारकता आहे. व म्हणून देव म्हणतो, “मानवजात आपल्या मूळ रूपात उघड होते.” जेव्हा देवाचे कार्य या टप्प्यावर पोहोचेल, तेव्हा ते सर्व पूर्ण होईल. देव त्याच्या पुत्रांसाठी आणि लोकांसाठी आदर्श असण्याबद्दल काहीही बोलत नाही असे दिसते, त्याऐवजी सर्व लोकांनी त्यांचे मूळ स्वरूप प्रदर्शित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. तुम्हाला या वचनांचा खरा अर्थ समजला आहे का?

मागील:  अध्याय २२ आणि २३

पुढील:  अध्याय २६

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger