देवाच्या कार्यामागची दृष्टी (२)
पश्चात्तापाच्या शिकवणुकीचा उपदेश देवकृपेच्या युगात केला गेला होता आणि माणसाने जर देवावर श्रद्धा ठेवली, तर तो वाचेल असे त्यात सांगितले होते. आज मात्र मुक्तीऐवजी केवळ विजयाचा व परिपूर्णतेचा अधिक बोलबाला आहे. एका माणसाने श्रद्धा ठेवली, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे भाग्य उजळेल किंवा एकदा देवाने रक्षण केले म्हणजे तो आपला कायमचा पाठीराखा असतो, असे आज कधीही म्हटले जात नाही. आजकाल कोणीही असे बोलत नाही आणि अशा गोष्टी आता जणू कालबाह्यच झाल्या आहेत. त्यावेळी, येशूचे कार्य हे सर्व मानवजातीच्या मुक्तीचे कार्य होते. त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांची पापे माफ करण्यात आली; जोवर तुझी त्याच्यावर श्रद्धा आहे तोवर तो तुला मुक्त करेल, तू त्याच्यावर श्रद्धा ठेवलीस, तर तू पापी राहत नाहीस, तू त्या पापांमधून मुक्त होतोस. रक्षण करण्याचा आणि श्रद्धेने दोषनिवारण करण्याचा हाच अर्थ आहे. मात्र असे असले, तरीही या विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्येदेखील जे बंडखोर प्रवृत्तीचे व देवाला विरोध करणारे असे काही शिल्लक होते आणि ते सावकाश काढून टाकणे आवश्यक होते. येशूने मनुष्याचा पूर्णपणे स्वीकार केला आहे, असा असा तारणाचा अर्थ नव्हता, तर मनुष्य आता पापी राहिला नाही, त्याच्या पापांबद्दल त्याला क्षमा करण्यात आली आहे असा त्याचा अर्थ होत होता. तू श्रद्धा ठेवली असशील, तर तू पापी राहणारच नाहीस. त्यावेळी येशूने केलेले बरेचसे कार्य त्याच्या शिष्यांना समजून घेता आले नाही आणि त्याची बरीच वचने लोकांना कळली नाहीत. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळी त्याने कसलेही स्पष्टीकरण दिले नाही. मग तो निघून गेल्यावर अनेक वर्षांनी मत्तयाने येशूसाठी वंशावळ तयार केली व इतरांनीदेखील मनुष्याच्या इच्छेनुसार बरेच कार्य केले. येशू मनुष्याला परिपूर्ण करण्यासाठी आणि त्याला प्राप्त करण्यासाठी आलेला नव्हता, तो केवळ कार्याचा एक टप्पा पूर्ण करायला आला होता: स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता द्यायला व त्याचे वधस्तंभावर जाण्याचे कार्य पूर्ण करायला तो आला होता. आणि म्हणूनच, येशू वधस्तंभावर खिळल्यानंतर, त्याचे कार्य पूर्णपणे संपले होते. परंतु सध्याच्या टप्प्यात—विजयाच्या कार्याच्या टप्प्यात—अधिक वचने उच्चारली पाहिजेत, अधिक कार्य केले पाहिजे आणि अनेक प्रक्रिया असल्या पाहिजेत. तसेच येशू व यहोवाच्या कार्याचे गूढ उकलले पाहिजे जेणेकरून, सर्व लोकांना त्यांच्या श्रद्धेविषयी समज आणि स्पष्टता येईल, कारण हे शेवटच्या काही दिवसांमधील कार्य आहे हे शेवटचे दिवस म्हणजे देवाच्या कार्याच्या समाप्तीचे दिवस आहेत, त्याच्या कार्याच्या फलनिष्पत्तीचे दिवस आहेत. कार्याचा हा टप्पा तुझ्यासाठी यहोवाचे नियमशास्त्र आणि येशूची सुटका स्पष्ट करेल आणि त्यामुळे तत्वतः तुला देवाच्या सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेमधील संपूर्ण कार्य समजेल व सहा हजार वर्षांच्या त्या व्यवस्थापन योजनेचे महत्त्व आणि त्यातील मूलतत्व तुला समजून येईल तसेच येशूने केलेल्या सर्व कार्यामागचा उद्देश व त्याने उच्चारलेली वचने समजतील आणि तुझी स्वतःची बायबलविषयीची आंधळी श्रद्धा आणि कौतुकही तुला यात प्रतिबिंबित झालेले दिसेल. या सर्व गोष्टींवरून तुला संपूर्णपणे आकलन होईल. येशूने केलेले कार्य व आजचे देवाचे कार्य या दोन्हीही गोष्टी तुला समजून येतील; तुला संपूर्ण सत्य, जीवन आणि मार्ग उमगेल व ते सारे समोर दिसेल. येशूने ज्या टप्प्यात कार्य केले त्या टप्प्यात तो आपले कार्य पूर्ण न करताच का निघून गेला असेल? कारण येशूच्या कार्याचा टप्पा हे फलनिष्पत्तीचे कार्य नव्हते. जेव्हा त्याला वधस्तंभावर खिळले गेले, तेव्हाच त्याची वचनेदेखील संपली; त्याला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कार्य पूर्णपणे संपले. सध्याचा टप्पा वेगळा आहे: जेव्हा शेवटपर्यंत सर्व वचने बोलली जातील आणि देवाच्या संपूर्ण कार्याची निष्पत्ती होईल तेव्हाच त्याचे कार्य संपेल. येशूच्या कार्याच्या टप्प्यात अनेक वचने बोलली गेलेली नाहीत किंवा अनेक वचने पूर्णपणे व्यक्त झालेली नाहीत. तरीही आपण काय बोललो किंवा बोललो नाही याची येशूला पर्वा नव्हती, कारण त्याचे सेवाकार्य हे वचनांचे सेवाकार्य नव्हते व म्हणूनच एकदा वधस्तंभावर खिळल्यानंतर तो निघून गेला. कार्याचा तो विशिष्ट टप्पा केवळ वधस्तंभावर खिळण्यासाठी होता आणि तो आत्ताच्या टप्प्यासारखा नव्हता. कार्याचा आत्ताचा टप्पा हा मुख्यतः पूर्णत्वासाठीचा टप्पा आहे, कार्याच्या निरवानीरवीचा आहे व सर्व कार्याची फलनिष्पत्ती साधण्याचा आहे. त्यात शेवटपर्यंत जर काही वचने बोलली गेली नाहीत, तर हे कार्य पूर्णत्वास नेण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही, कारण कार्याच्या या टप्प्यात सर्व कार्याची फलनिष्पती आणि त्याचे पूर्णत्वास जाणे हे वचनांद्वारे साध्य होते. त्या काळी येशूने असे बरेच कार्य केले, जे मनुष्याला समजलेच नाही. येशू शांतपणे निघून गेला व आजही कित्येकांना त्याची वचने समजत नाहीत, त्यांची समजूत चुकीची आहे, मात्र तरीही तीच बरोबर असल्याचे त्यांना वाटते आहे, आपण चुकतो आहोत हे त्यांना समजत नाही. अखेरच्या टप्प्यात देवाचे कार्य पूर्णत्वास जाईल आणि त्याची फलनिष्पत्ती दिसून येईल. देवाची व्यवस्थापन योजना सर्वांना समजेल, ज्ञात होईल. मनुष्याच्या मनातल्या धारणा, त्याचे हेतू, त्याची चुकीची व खुळचट समज, यहोवा आणि येशूच्या कार्याबद्दलच्या त्याच्या धारणा, परराष्ट्रीयांबद्दलचे त्याचे दृष्टिकोन तसेच त्याची इतर मार्गच्युती व चुका हे सर्व काही दुरुस्त होईल. मनुष्याला जीवनाचे सर्व योग्य मार्ग, देवाने केलेले सर्व कार्य व संपूर्ण सत्य समजून येईल. जेव्हा ते होईल, तेव्हा कार्याचा हा टप्पा समाप्त होईल. जगाची निर्मिती करणे हे यहोवाचे कार्य होते, ती सुरुवात होती. कार्याचा हा टप्पा म्हणजे शेवट आहे, त्या कार्याची फलनिष्पत्ती आहे. सुरुवातीला, इस्रायलमधल्या निवडक लोकांमध्ये देवाचे कार्य घडून आले, सर्वात पवित्र अशा या स्थळी एका नव्या युगाची पहाट उजाडली. कार्याचा शेवटचा टप्पा हा सर्वात अपवित्र देशात पार पार पाडला जात आहे, तेव्हा जगाचा न्याय होईल आणि हे युग समाप्त होईल. पहिल्या टप्प्यात देवाचे कार्य सर्वात उज्ज्वल ठिकाणी घडून आले, आता शेवटचा टप्पा सर्वात अंधकारमय ठिकाणी पार पडेल. त्यानंतर हा अंधकार दूर होईल, सर्वत्र उजेड पसरेल व सर्व लोकांवर विजय प्राप्त होईल. जेव्हा या सर्वात अपवित्र आणि अंधकारमय ठिकाणच्या लोकांवर विजय प्राप्त होईल, जेव्हा सर्व जनता देव आहे असे मान्य करेल, खरा देव कोण आहे ते मान्य करेल व प्रत्येक मनुष्याला ते मनापासून पटेल, तेव्हा सबंध विश्वात विजयाचे कार्य करण्यासाठी त्याचा वापर होईल. कार्याचा हा टप्पा प्रतीकात्मक आहे: या युगातले कार्य संपल्यानंतर, सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापनाचे कार्य पूर्णपणे शेवटास जाईल. सर्वाधिक अंधकारमय ठिकाणावर विजय प्राप्त झाल्यानंतर, इतरत्र सगळीकडे तेच होईल हे वेगळे सांगायला नको. केवळ चीनमधल्या विजय कार्याला विशेष प्रतीकात्मक अर्थ आहे. चीन हे सर्व अंधकारमय शक्तींचे रूप आहे. तसेच जे काही मूर्तस्वरूप आहे, जे सैतानाचे आहे, जे रक्तामांसाने बनलेले आहे त्या सर्वांचे प्रतिनिधित्व चीनमधले लोक करतात. अग्निवर्ण अजगरामुळे चिनी लोक सर्वाधिक भ्रष्ट झाले आहेत, त्यांनी देवाला सर्वात निकराचा विरोध केला आहे, त्यांची माणुसकी सर्वाधिक तळाला गेलेली आणि अपवित्र आहे व म्हणूनच सर्व भ्रष्ट मानवजातीचे ते प्रतिनिधी आहेत. याचा अर्थ इतर देशांमध्ये काही अडचण नाही असा होत नाही; मनुष्याच्या धारणा सगळीकडे सारख्याच असतात आणि जरी या इतर देशांमधले लोक उत्तम क्षमतेचे असतील व तरीही जर ते देव जाणत नसतील, तर याचा अर्थ त्यांचा देवाला विरोध आहे असाच होतो. यहूद्यांनीदेखील देवाला विरोध का केला? देवाला आव्हान का दिले? परूशीदेखील देवाला विरोध का करत होते? यहूद्यांनी येशूचा विश्वासघात का केला? त्यावेळेस कित्येक शिष्यांना येशू ठाऊक नव्हता. येशू वधस्तंभावर जाऊन पुन्हा अवतरल्यानंतरसुद्धा लोकांनी त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? यातून मनुष्याची अवज्ञा सर्वत्र सारखीच असल्याचे दिसून येत नाही का? येथे चीनमधील लोकांचे निव्वळ उदाहरण दिले आहे आणि जेव्हा त्यांच्यावर विजय प्राप्त होईल, तेव्हा त्यांच्याकडे आदर्श उदाहरण म्हणून बघितले जाईल व इतर लोक त्यांचा कित्ता गिरवतील. तुम्ही माझ्या व्यवस्थापन योजनेतले साहाय्यक आहात असे मी सतत का म्हणत आलो आहे? चीनमधल्या लोकांमध्ये भ्रष्टाचार, अपवित्रता, अनीतिमत्त्व, विरोध व बंडखोरी सर्वाधिक आणि विविध रूपांमध्ये दिसून येते. एकतर त्यांची क्षमता अतिशय कमी आहे व दुसरे म्हणजे त्यांची आयुष्ये आणि मनोभूमिका मागासलेली आहे. त्यांच्या सवयी, त्यांचे सामाजिक वातावरण, कूळ हे सर्व गरीब व सर्वात मागासलेले आहे. त्यांची पातळीदेखील खालची आहे. या ठिकाणी करायचे कार्य हे प्रतीकात्मक आहे आणि एक चाचणी म्हणून करायचे हे कार्य संपूर्ण झाले, की देवाचे पुढचे कार्य बरेच सोपे होईल. कार्याचा हा टप्पा पूर्ण झाला, तर त्यापुढील कार्य न बोलताच होणार आहे. एकदा या कार्याचा हा टप्पा सफल झाला, की उत्तम यश पूर्णपणे साध्य झालेले असेल आणि सबंध विश्वातील विजयाचे कार्य अगदी शेवटाला आले असेल. खरे सांगायचे, तर एकदा का तुमच्याबरोबरचे कार्य यशस्वी झाले, की सबंध विश्वातील कार्य यशस्वी झाल्यासारखेच आहे. मी तुम्हाला एक आदर्श उदाहरण म्हणून जगाला सामोरे जा असे म्हणत आहे, त्यामागचे हे कारण आहे. बंडखोरी, विरोध, अपवित्रता, अनीतिमत्त्व—हे सर्व या लोकांमध्ये दिसून येते. त्यांच्यात मानवजातीची सर्व बंडखोरी दिसून येते. ही माणसे खरोखरच विशेष आहेत. म्हणून त्यांना या विजयाचा मेरुमणी समजले गेले आहे. एकदा का त्यांच्यावर विजय प्राप्त झाला, की ते सहजच इतरांसाठी आदर्श उदाहरण होतील. इस्रायलमध्ये पार पडलेल्या पहिल्या टप्प्याइतके प्रतीकात्मक दुसरे काहीच नसेल: इस्रायली लोक हे सर्व लोकांमध्ये सर्वाधिक पवित्र आणि सर्वात कमी भ्रष्ट होते. म्हणूनच त्यांच्या भूमीत नवीन युगाची पहाट व्हावी याला खूपच महत्त्व होते. मानवजातीचे पूर्वज इस्रायलमधून आले होते व इस्रायल ही देवाच्या कार्याची जन्मभूमी होती, असे म्हणता येईल. सुरुवातीला, हे लोक सर्वात पवित्र होते. ते यहोवाची आराधना करत. देवाने त्यांच्यात घडवून आणलेल्या कार्याचे थोर परिणाम दिसून येत होते. सबंध बायबलमध्ये दोन युगांमधल्या कार्याची नोंद आहे: एक म्हणजे नियमशास्त्राच्या युगातील कार्य आणि दुसरे म्हणजे कृपेच्या युगातील कार्य. जुन्या करारात यहोवाने इस्रायली लोकांना उद्देशून बोललेल्या वचनांची व त्याने इस्रायलमध्ये केलेल्या कार्याची नोंद आहे; नवीन करारात येशूने यहूदीयामध्ये केलेल्या कार्याची नोंद आहे. मात्र बायबलमध्ये एकही चिनी नाव का बरे नाही? कारण देवाच्या कार्याचे पहिले दोन टप्पे इस्रायलमध्ये पार पडले, इस्रायलमधली माणसे देवाने निवडलेली होती—त्यांनी यहोवाचे कार्य सर्वप्रथम स्वीकारले होते. सर्व मानवजातीपैकी ते सर्वात कमी भ्रष्ट होते आणि सुरुवातीला देवाकडे आधारासाठी बघावे, त्याला पूजावे अशा विचारांचे ते होते. त्यांनी यहोवाच्या वचनांचे पालन केले, मंदिरांमधून कायम सेवा केली आणि धर्मगुरूंसारखे अंगरखे किंवा मुकुट परिधान केले. देवाची उपासना करणाऱ्या सुरुवातीच्या लोकांपैकी ते होते. तसेच ते देवाच्या कार्याचे सुरुवातीचे साधन होते. हे लोक म्हणजे सबंध मानवजातीसाठी आदर्श उदाहरण होते, ते पावित्र्याचे, प्रामाणिक मनुष्याचे आदर्श उदाहरण होते. ईयोब, अब्राहाम, लोट किंवा पेत्र व तीमथ्य—हे सर्वजण इस्रायली होते. ते सर्वाधिक पवित्र होते आणि आदर्श उदाहरण होते. मानवजातीपैकी देवाची पूजा करणाऱ्यांत इस्रायल हा अगदी सुरुवातीचा देश होता आणि इतर कोणत्याही देशापेक्षा इथले लोक अधिक नीतिमान होते. भविष्यात या भूमीतील मानवजातीची अधिक चांगली व्यवस्था लावता यावी यादृष्टीने देवाने त्यांच्यावर कार्य केले. त्या लोकांनी प्राप्त केलेले यश आणि यहोवाची उपासना करण्यातले त्यांचे नीतिमत्त्व याची नोंद करण्यात आली, जेणेकरून कृपेच्या युगात इस्रायलबाहेर असलेल्या लोकांसमोर त्यांच्या रूपात एक आदर्श उदाहरण ठेवता आले; त्यांच्या कृतीने अगदी आजपर्यंत हजारो वर्षांच्या कामाची बूज राखली गेली आहे.
जगाची पायाभरणी झाल्यावर देवाच्या कार्याचा पहिला टप्पा इस्रायलमध्ये पार पडला. अशारितीने इस्रायल ही देवाच्या पृथ्वीवरील कार्याची जन्मभूमी ठरली, तसेच ती देवाच्या पृथ्वीवरील कार्याची कर्मभूमीदेखील ठरली. येशूच्या कामाची व्याप्ती सबंध यहूदीयामध्ये पसरली होती. त्याचे कार्य चालू असताना यहूदीयाच्या बाहेर फार थोड्या लोकांना त्याविषयी माहिती होती, कारण यहूदीयाच्या बाहेर त्याने कधी काही कार्य केलेच नव्हते. आज देवाचे कार्य चीनमध्ये आले आहे व ते केवळ याच कक्षेत पार पाडले जाईल. या टप्प्यात चीनच्या बाहेर कोणतेही कार्य सुरू होणार नाही. त्याचा चीनच्या बाहेर प्रसार करणे हे नंतर करण्याचे कार्य आहे. कार्याचा हा टप्पा येशूच्या कार्याच्या पुढचा टप्पा आहे. येशूने सुटकेचे कार्य केले आणि या टप्प्यातील कार्य हे त्यापुढचे कार्य आहे; सुटकेचे कार्य पूर्ण झाले आहे व आता या टप्प्यात पवित्र आत्म्याला जन्म घेण्याची गरज नाही. या टप्प्यातील कार्य हे मागील टप्प्यातील कार्यापेक्षा वेगळे आहे. एवढेच नव्हे, तर चीन हे इस्रायलपेक्षा वेगळे राष्ट्र आहे. येशूने सुटकेच्या कार्याचा एक टप्पा पूर्ण केला. मनुष्याने येशूला पाहिले आणि त्यानंतर लवकरच त्याचे कार्य परराष्ट्रीयांमध्ये पसरू लागले. आज अमेरिका, यूके व रशियातील कित्येकांचा देवावर विश्वास आहे. मग चीनमध्येच देवावर विश्वास असणारे कमी लोक का आहेत? कारण चीन हे सर्वात जास्त बंदिस्त प्रवृत्तीचे राष्ट्र आहे. तसे पाहिले, तर देवाचा मार्ग स्वीकारणारे चीन हे सर्वात अखेरचे राष्ट्र होते. आजदेखील त्यांना तो मार्ग स्वीकारून शंभराहूनही कमीच वर्षे झालेली आहेत—अमेरिका आणि युकेनंतर खूप काळाने त्यांनी तो मार्ग स्वीकारला. देवाच्या कार्याचा शेवटचा टप्पा चीनच्या भूमीत पार पडत आहे, त्याचे कार्य शेवटास जावे व त्याचे सर्व कार्य साध्य व्हावे या उद्देशानेच हे कार्य घडत आहे. इस्रायलमधील सर्व लोक यहोवाला त्यांचा प्रभू मानत. त्याकाळी ते त्यालाच कुटुंबप्रमुख मानत, अशारितीने संपूर्ण इस्रायल हे एकच मोठे कुटुंब बनले, त्या कुटुंबातील प्रत्येकजण त्यांचा प्रभू यहोवाची उपासना करत होता. यहोवाचा आत्मा कायम त्यांच्यासमोर प्रकट होत असे, वचने उच्चारून त्याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवत असे. तसेच ढगांचा आणि आवाजाचा आधार घेऊन त्यांना आयुष्याविषयी मार्गदर्शन करत असे. तेव्हा पवित्र आत्मा इस्रायलला थेट मार्ग दाखवत असे, त्याचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवत असे आणि लोक ढगांकडे बघत असत, विजेचा कडकडाट ऐकत असत व अशाप्रकारे तो हजारो वर्षे त्यांच्या आयुष्याला दिशा देत राहिला. अशाप्रकारे केवळ इस्रायलच्या लोकांनीच यहोवाची कायम आराधना केली आहे. यहोवा आपला देव आहे, तो परराष्ट्रीयांचा देव नाही असे ते मानत. त्यात विशेष आश्चर्य नाही: कारण यहोवाने सुमारे चार हजार वर्षे त्यांच्यात राहून कार्य केले. स्वर्ग, पृथ्वी आणि इतर सर्व गोष्टी या नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या नव्हत्या, तर निर्माणकर्त्याने तयार केल्या होत्या ही गोष्ट चीनच्या भूमीत हजारो वर्षांच्या सुस्त निद्रेनंतर त्या अधःपतनांना आता कुठे लक्षात आलेली आहे. ही शिकवण परदेशातून आलेली असल्यामुळे काही सरंजामी, प्रतिगामी लोकांची अशी समजूत झाली आहे, की जे कोणी ही सुवार्ता स्वीकारतील ते द्रोही आहेत, आपल्या पूर्वजाशी—बुद्धाशी दगाबाजी करणारे अधम आहेत. शिवाय यातील कित्येक सरंजामी लोक विचारतात, “चिनी लोकांनी परदेशी लोकांच्या देवावर विश्वास कसा बरे ठेवावा? तसे केल्याने ते आपल्या पूर्वजांचा विश्वासघात करत नाहीत काय? हे त्यांचे वाईट कृत्य होत नाही का?” यहोवा हाच आपला देव आहे हे आज लोक विसरून गेले आहेत. आपल्या निर्माणकर्त्याला ते केव्हाच विसरले आहेत, त्याऐवजी ते आता उत्क्रांतीवर विश्वास ठेवू लागले आहेत, म्हणजे मनुष्य हा वानरापासून उत्क्रांत झाला व नैसर्गिक जग हे असे सहजच उत्पन्न झाले असे त्यांना वाटते. मानवजातीला आनंद देणारे सगळे उत्कृष्ट अन्न हा निसर्ग देतो, मनुष्याच्या जन्म-मृत्यूला काही एक विशिष्ट मांडणी आहे आणि या सर्वावर सत्ता गाजवणारा असा एक देव अस्तित्त्वातच नाही असे ते मानतात. त्याखेरीज, अनेक नास्तिकांचा असा समज असतो, की देवाची सगळ्या गोष्टींवर सत्ता असते असे मानणे म्हणजे अंधश्रद्धा असून ते शास्त्रीय दृष्टिकोनाला धरून नाही. पण देवाच्या कार्याची जागा विज्ञान घेऊ शकते का? विज्ञान मानवजातीवर अधिराज्य गाजवू शकते का? ज्या देशात नास्तिकतेचे राज्य आहे तिथे देवाच्या सुवार्तेचा प्रसार करणे हे सोपे कार्य नव्हे, त्यात फार मोठे अडथळे आहेत. आज देवाला अशा पद्धतीने विरोध करणारे कित्येक लोक नाहीत का?
जेव्हा येशू त्याचे कार्य करण्यासाठी आला, तेव्हा खूप लोकांनी त्याच्या कार्याची तुलना यहोवाच्या कार्याशी केली. ती कार्ये एकमेकांशी मिळती-जुळती नाहीत हे बघून त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळले. त्यांना या दोघांची कार्ये एकमेकांशी सुसंगत का वाटली नाहीत? त्याचे अंशतः कारण असे, की येशूचे कार्य नवीन होते, त्याचप्रमाणे येशूने त्याचे कार्य सुरू करण्याआधी त्याची वंशावळ कोणीही लिहिली नव्हती. तशी कोणी लिहिली असती, तर बरे झाले असते—पण मग येशूला वधस्तंभावर कोणी खिळले असते? जर कित्येक दशके आधी मत्तयाने येशूची वंशावळ लिहिली असती, तर येशूला एवढा छळ सोसावाच लागला नसता, हो ना? लोकांनी जर येशूची वंशावळ वाचली असती—तो अब्राहामचा मुलगा असून दाविदाचा वंशज आहे हे त्यांना समजले असते—तर त्यांनी त्याचा असा छळ केलाच नसता. त्याची वंशावळ एवढ्या उशिरा लिहिली गेली, हे दुर्दैवच नव्हे का? तसेच हेही केवढे दुर्दैव, की बायबलमध्ये देवाच्या कार्याचे केवळ दोनच टप्पे नोंदले गेले आहेत: पहिला टप्पा म्हणजे नियमशास्त्राच्या युगातले कार्य होते, तर दुसरा टप्पा म्हणजे कृपेच्या युगातले कार्य होते; पहिला टप्पा म्हणजे यहोवाचे कार्य होते, तर दुसरा टप्पा म्हणजे येशूचे कार्य होते. एखाद्या थोर प्रेषिताने आजचे कार्य काय असेल याची भविष्यवाणी वर्तवली असती, तर किती चांगले झाले असते. तर मग बायबलमध्ये “शेवटच्या दिवसांतील कार्य” असा अतिरिक्त विभाग असता. ते अधिक बरे झाले नसते का? मनुष्याला आज इतक्या अडचणींना तोंड का द्यायला लागावे? तुम्हाला किती कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले! जर कोणी तिरस्कार करण्याच्या लायकीचे असतील, तर ते यशया आणि दानीएल आहेत कारण त्यांनी शेवटच्या दिवसांतील कार्याबद्दल अगोदर सांगितले नाही. जर कोणाला दोषी धरायचेच असेल, तर ते नवीन कराराच्या प्रेषितांना धरायला हवे, त्यांनी देवाच्या दुसऱ्या देहधारणेची वंशावळ आधीच लिहून ठेवली नाही. किती शरमेची बाब आहे! आपल्याला पुराव्यासाठी सर्वत्र शोधावे लागते व लहानसहान वचनांचे थोडेफार तुकडे सापडूनही त्यांना पुरावा म्हणता येत नाही. किती लाजिरवाणी गोष्ट आहे! देव त्याच्या कार्याबाबत एवढी गुप्तता का बाळगत आहे? आज कित्येक लोकांना अजून ठाम पुरावा मिळालेला नाही, तरीदेखील त्यांना तो नाकारता येत नाही. मग त्यांनी काय करावे? ते ठामपणे देवाचे अनुसरण करू शकत नाहीत आणि तरीही अशी शंका मनात घेऊन त्यांना पुढेही जाता येत नाही. म्हणूनच कित्येक “हुशार व प्रतिभासंपन्न विद्वान” देवाचे अनुसरण करताना “प्रयत्न करून बघू” असा दृष्टिकोन अंगिकारताना दिसतात. हे मोठेच संकट आहे! मत्तय, मार्क, लूक आणि योहान यांना जर भविष्य वर्तवता आले असते, तर सगळे अधिक सोपे झाले नसते का? राज्यातील जीवनाबद्दलचे अंतर्गत सत्य योहानला दिसले असते, तर बरे झाले असते—त्याला केवळ दृष्टांत झाला व पृथ्वीतलावर होणारे प्रत्यक्ष कार्य बघता आले नाही हे दुर्दैव नव्हे का? ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे! देवाच्या बाबतीत नक्की काय झाले आहे? इस्रायलमधील कार्य एवढे चांगले पार पडल्यावर आता तो चीनमध्ये का बरे आला आहे? त्याला देहधारण करून लोकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कार्य करण्याची आणि राहण्याची गरज का बरे भासते आहे? देव मनुष्याची जराही पर्वा करत नाही! त्याने लोकांना आधीपासून काही सांगितलेले तर नाहीच, शिवाय अचानक तो ताडण व न्याय करू लागला आहे. याचा खरोखरच काही अर्थ लागत नाही! सर्वप्रथम जेव्हा देवाने देह धारण केला, तेव्हा सर्व सत्य मनुष्याला आधीच न सांगितल्याने त्याला खूप त्रास सहन करावा लागला होता. ते देव नक्कीच विसरला नसणार ना? मग, तरीही यावेळेस अजूनही त्याने मनुष्याला सांगितले का नाही? आज बायबलमध्ये केवळ सहासष्ट पुस्तके आहेत ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. अखेरच्या दिवसातल्या कार्याविषयी भविष्यवाणी वर्तवणारे केवळ एक पुस्तक आता आवश्यक आहे! तुला असे वाटत नाही का? यहोवा, यशया आणि दाविदानेदेखील आजच्या कार्याचा उल्लेख केलेला नाही. ते वर्तमानकाळापासून अधिकच लांब होते. सुमारे चार हजार वर्षांहून आधीच्या काळातले होते. येशूनेदेखील आजच्या कार्याविषयी आधीच पूर्णपणे सांगितले नव्हते, त्याविषयी तो अगदी थोडेसेच बोलला होता, तरीही मनुष्याला त्याचा पुरेसा पुरावा मिळत नाही. तू आजच्या कार्याची तुलना पूर्वीच्या कार्याशी केलीस, तर त्यांचा एकमेकांशी ताळमेळ कसा लागेल? यहोवाच्या कार्याचा टप्पा इस्रायलकडे निर्देशित होता, तेव्हा आजच्या कार्याची तुलना त्याच्या कार्याशी केली, तर त्यात अधिकच भिन्नता दिसून येईल. त्या दोन्हीची तुलना होऊच शकत नाही. तू इस्रायलचा नाहीस किंवा यहूदीदेखील नाहीस. तुझी क्षमता व तुझ्याकडच्या सर्वच गोष्टी यांमध्ये कमतरता आहे—तू स्वतःची तुलना त्यांच्याशी कशी काय करू शकतोस? ते शक्य, तरी आहे काय? सध्याचे युग हे राज्याचे युग आहे हे जाणून घे. नियमशास्त्राच्या युगापेक्षा आणि कृपेच्या युगापेक्षा ते वेगळे आहे. काही झाले, तरी सगळ्याला एकाच साच्यात बांधण्याचा प्रयत्न करू नकोस. देव अशा कोणत्याही तयार साच्यांमध्ये हाती गवसत नाही.
जन्मानंतर २९ वर्षे येशू कसा राहिला? बायबलमध्ये त्याच्या लहानपणाबद्दल व तारुण्याबद्दल कसलीही नोंद आढळत नाही. तो काळ कसा होता तुला ठाऊक आहे का? त्याला लहानपण किंवा तारुण्य असे काही लाभलेच नाही आणि जेव्हा तो जन्मला तेव्हाच तो ३० वर्षांचा होता असे असेल का? तुला याबाबत अगदी कमी माहिती आहे, तेव्हा इतक्या निष्काळजीपणे तुझी मते व्यक्त करू नकोस. त्याने तुझे काहीही भले होणार नाही! येशूच्या ३०व्या वाढदिवसाआधी त्याचा बाप्तिस्मा झाला, सैतानाच्या मोहाला बळी पडण्यासाठी पवित्र आत्मा त्याला रानावनात घेऊन गेला, एवढीच नोंद बायबलमध्ये आहे. तसेच चार सुवार्तांमध्ये त्याच्या साडेतीन वर्षांच्या कार्याची नोंद झालेली आहे. त्याच्या लहानपणाची व तारुण्याची कसलीही नोंद आढळत नसली, तरी त्यावरून त्याच्या वाट्याला लहानपण आणि तरुणपण आलेच नाही, असेही सिद्ध होत नाही. आयुष्याच्या सुरुवातीला त्याने काही कार्य केले नाही, तो एक सामान्य मनुष्य होता एवढाच त्याचा अर्थ लागतो. मग येशू लहानपणाचा किंवा तारुण्याचा उपभोग न घेता ३३ वर्षे जगला असे म्हणता येईल का? तो अचानक साडेतेहेतीस वर्षांचा झाला असेल का? आपण मनुष्य त्याच्याबद्दल जो काही विचार करतो तो सगळा अमानवी व अवास्तव आहे. खुद्द देहधारी देवाकडेही एरवी सामान्य आणि साधारण मानवतेची भावना असते याबद्दल शंका नाही. मात्र तो जेव्हा त्याचे कार्य करत असतो, तेव्हा ते त्याच्यात असलेल्या अपूर्ण मानवी भावनेसह व संपूर्ण देवत्वासकट असते. यामुळेच लोकांना सध्याच्या कार्याबद्दल आणि अगदी येशूच्या कार्याबद्दलही शंका असतात. देवाने जेव्हा दोनदा देह धारण केला, तेव्हाच्या त्याच्या कार्यात फरक असला, तरी त्याच्या गाभ्यात फरक नाही. अर्थात तू त्या चार सुवार्तांच्या नोंदी वाचल्या, तर त्यात पुष्कळच फरक आहेत. येशूच्या लहानपणच्या व तारुण्यातल्या आयुष्याकडे तू पुन्हा कसे जाणार? येशूमधल्या सामान्य मानवतेच्या भावनेचा अर्थ कसा लावणार? कदाचित तुला आजच्या देवाच्या मानवी भावनेची चांगली समज असेल पण, तरीही येशूमधल्या मानवी भावनेचा तुला नीटसा अंदाज नाही आणि त्याविषयीची समज, तर त्याहून नाही. मत्तयाने जर नोंद करून ठेवली नसती, तर येशूमधल्या मानवी भावनेचा तुला थांगपत्ताही लागला नसता. समज मी तुला येशूच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगितल्या, येशूच्या लहानपणची व तारुण्यातली सत्ये सांगितली, तर कदाचित तू मान हलवत म्हणशील, “छे! तो असा असूच शकत नाही. त्याच्यात कसलीही कमतरता असू शकत नाही आणि, तर त्याच्यात कसलीही मानवी भावना असणे दूरच!” तू कदाचित ओरडशील किंवा किंचाळशीलही. तुला येशू कळत नाही म्हणून तुझ्या माझ्याविषयी देखील विशिष्ट धारणा आहेत. येशू खूप दैवी होता अशी तुझी समजूत आहे. त्याच्यात काहीही मानवी नव्हते असे तुला वाटते. मात्र वस्तुस्थिती ही वस्तुस्थितीच आहे. वस्तुस्थिती दर्शवणाऱ्या सत्याविरुद्ध बोलायची कोणाचीच इच्छा नसते. म्हणून मी जेव्हा बोलतो, तेव्हा ते सत्याशीच निगडित असते. ते केवळ अंदाजपंचे केलेले बोलणे नसते किंवा ती भविष्यवाणीदेखील नसते. देव मोठमोठ्या उंचीपर्यंत जाऊ शकतो हे जाणून घ्या, तसेच तो अगदी खोलवर दडून राहू शकतो हेही तुम्ही जाणा. देव म्हणजे तू स्वतःच्या मनानेच तयार करावी अशी एखादी गोष्ट नव्हे—तो सर्व प्राणिमात्रांचा देव आहे. केवळ एका विशिष्ट व्यक्तीने तयार केलेला तो एखादा वैयक्तिक देव नाही.