देवाच्या कार्यामागची दृष्टी (३)
पवित्र आत्म्याच्या जन्माद्वारे देवाने सर्वप्रथम मनुष्यस्वरूप धारण केले. ज्या कामाच्या उद्देशाने तो इथे आला होता, त्याच्याशी जुळणारे हे रूप होते. येशूच्या नावाने कृपेच्या युगाची सुरुवात झाली. येशूने जेव्हा आपले सेवाकार्य सुरू केले, तेव्हा पवित्र आत्मा येशूच्या नावाची साक्ष देऊ लागला आणि यहोवाचे नाव ऐकू येईनासे झाले. त्याऐवजी पवित्र आत्म्याने मुख्यतः येशूच्या नावाने नवीन कार्य हाती घेतले. त्याच्यावर विश्वास असणाऱ्यांची साक्ष येशू ख्रिस्तासाठीच होती आणि त्यांनी जे कार्य केले तेदेखील येशू ख्रिस्तासाठीच होते. जुन्या करारातील नियमशास्त्राच्या युगाचा अंत म्हणजेच मुख्यतः यहोवाच्या नावाने केले जाणारे कार्य आता संपुष्टात आले होते. इथून पुढे देवाचे नाव यहोवा नसून त्याऐवजी त्याला येशू या नावाने ओळखले गेले. इथून पुढे पवित्र आत्म्याने मुख्यतः येशूच्या नावाने कार्य केले. तेव्हा जे लोक आजही यहोवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करतात आणि आजही नियमशास्त्राच्या युगातील कार्याप्रमाणेच वर्तन करतात—तू आंधळेपणाने नियम पाळत आहेस असे नाही काय? तुम्ही भूतकाळात अडकलेले नाही काय? आता शेवटचे दिवस आले आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे. जेव्हा येशू येईल, तेव्हा त्याला येशू याच नावाने ओळखता येईल काय? यहोवाने इस्रायलच्या लोकांना सांगितले की, मशीहा येत आहे. मात्र जेव्हा तो प्रत्यक्षात आला, तेव्हा त्याला मशीहा न म्हणता येशू म्हणू लागले. जाताना येशू म्हणाला की, मी पुन्हा अवतार घेईन, मी जसा गेलो, तसा परत येईन. हे येशूचे शब्द होते खरे, पण तो कसा निघून गेला ते तू पाहिले आहेस काय? एका पांढऱ्या मेघावर बसून विहरत येशू निघून गेला, पण तो माणसात परत येईल, तेव्हा शुभ्र ढगावरच बसून येईल का? तसे असेल तर त्याला येशूच म्हटले जाणार नाही का? येशू जेव्हा पुन्हा येईल, तेव्हा युग अगोदरच बदललेले असेल, मग तरीही त्याला येशू म्हणता येईल का? देव फक्त येशू या नावानेच ओळखला जाऊ शकतो का? नवीन युगात त्याला नवीन नावाने ओळखले जाणार नाही काय? एका माणसाची प्रतिमा आणि एकच नाव देवाचे संपूर्ण प्रतिनिधित्व करू शकते काय? प्रत्येक युगात देव नवीन कार्य करतो आणि नवीन नावाने ओळखला जातो, तो विविध युगांमध्ये एकच कार्य कसे करेल? तो जुन्याच गोष्टींना कसा काय धरून राहील? सुटकेच्या कार्यासाठी त्याने येशू हे नाव धारण केले होते, मग आता शेवटच्या दिवसांत तो परत येईल, तेव्हा त्याच नावाने ओळखला जाईल काय? तो अजूनही सुटकेचेच कार्य करणार आहे का? यहोवा आणि येशू एकच असले, तरी विविध युगांमध्ये त्यांना विविध नावांनी ओळखले जाते, असे का? त्यांनी वेगवेगळ्या युगात आपले कार्य केले म्हणूनच ना? केवळ एखादे नाव हे संपूर्ण देवाचे प्रतिनिधित्व करू शकते काय? त्यामुळे देवाला वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले पाहिजे. तो आपल्या नावाचा उपयोग युग बदलण्यासाठी आणि त्या युगाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी करणारच. कारण एकच एक नाव देवाचे संपूर्ण प्रतिनिधित्व करूच शकत नाही आणि देवाचे प्रत्येक नाव त्या त्या युगातील त्याच्या तात्पुरत्या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करू शकते. त्याने केवळ देवाच्या कार्याचे प्रतिनिधित्व केलेले पुरेसे असते. म्हणून तर देव त्या संपूर्ण युगाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या प्रवृत्तीला साजेसे नाव निवडू शकतो. ते युग यहोवाचे असो किंवा येशूचे असो, प्रत्येक युगाचे प्रतिनिधित्व एक नाव करते. कृपेचे युग संपल्यावर आता अंतिम युग येऊन ठेपले आहे आणि येशू अगोदरच अवतरला आहे. त्याला अजूनही येशू कसे म्हणता येईल? अजूनही तो मनुष्यजातीत येशूच्या रूपात कसा वावरेल? येशू म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून नाझरीनचीच एक प्रतिमा होता, हे तू विसरलास काय? येशू केवळ मनुष्यजातीचा मुक्तिदाता होता, हे तू विसरलास काय? शेवटच्या दिवसांमध्ये मनुष्यावर विजय मिळवण्याचे, त्याला परिपूर्ण करण्याचे कार्य तो कसा काय हाती घेईल? येशू एका पांढऱ्या मेघावर स्वार होऊन निघून गेला—ही वस्तुस्थिती आहे—मात्र तो पुन्हा पांढऱ्या मेघावर आरूढ होऊनच मनुष्यजातीकडे परत येईल आणि येशू म्हणूनच ओळखला जाईल, हे कसे शक्य आहे? जर तो खरोखरच मेघावर बसून आला असेल, तर माणूस त्याला ओळखू कसे शकला नाही? सबंध जगातील लोक त्याला ओळखणार नाहीत काय? असे असेल तर येशू हाच एकटा देव नाही काय? तसे असेल तर देवाची प्रतिमा म्हणजे ज्यूचा अवतार असेल आणि ती कायम एकच प्रतिमा असेल. मी जसा गेलो, तसा परत येणार आहे असं येशू म्हणाला होता, परंतु त्याच्या या बोलण्याचा खरा अर्थ तुला ठाऊक आहे काय? त्याने तुझ्या या गटाला तसे सांगितले असण्याची शक्यता आहे काय? तो जसा मेघावर आरूढ होऊन गेला, तसाच परत येईल एवढेच तुला ठाऊक आहे, पण देव आपले कार्य नक्की कसे करतो, ते तुम्हाला माहीत आहे काय? जर तुम्हाला खरोखरच तसे दिसले असेल, तर येशूच्या बोलण्याचा अर्थ कसा लावणार? तो म्हणाला होता: मनुष्याचा पुत्र जेव्हा शेवटच्या दिवसांमध्ये येईल, तेव्हा त्याला स्वतःलाच ते ठाऊक नसेल, देवदूतांनाही ठाऊक नसेल, स्वर्गातील संदेशवाहकांनादेखील माहीत नसेल आणि सर्व मनुष्यजातीलाच त्याची कल्पना नसेल. ते केवळ पित्याला म्हणजे पवित्र आत्म्याला ठाऊक असेल. खुद्द मनुष्याच्या पुत्रालाही ठाऊक नसताना तुला तो दिसू शकेल काय आणि तुला हे ठाऊक असेल काय? जर तुला स्वतःच्या डोळ्यांनी ते बघता आणि जाणता येणार असेल, तर येशूने बोललेले हे शब्द निरर्थक नव्हेत काय? आणि येशू तेव्हा काय म्हणाला होता? “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांना नाही, पुत्रालाही नाही. नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. … म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा मनुष्याच्या पुत्राला स्वतःलाच ते ठाऊक नसेल. मनुष्याचा पुत्र म्हणजे देवाचा मानवी अवतार होय, तो एक सामान्य, साधासुधा माणूस असेल. मात्र खुद्द मनुष्याच्या पुत्राला स्वतःलाही ते ठाऊक नसेल, तर तुला कुठून समजणार आहे? मी जसा गेलो, तसा परत येईन असे येशू सांगून गेला. जेव्हा तो येईल, तेव्हा त्याला स्वतःलाच ते ठाऊक नसेल, मग तो तुला पूर्वकल्पना कशी देऊ शकेल? तुला तो येताना दिसणे शक्य आहे काय? हा केवढा मोठा विनोद आहे, नाही का? दरवेळेस देव पृथ्वीवर आला की तो त्याचे नाव, त्याचे लिंग, त्याची प्रतिमा आणि कार्य सर्व काही बदलतो. तो आपल्या कार्याची पुनरावृत्ती करत नाही. तो असा देव आहे, जो कायम नवीन असतो, तो कधीही जुना होत नाही. यापूर्वी जेव्हा तो आला तेव्हा येशू म्हणून ओळखला जात होता; यावेळेस जेव्हा तो पुन्हा येईल, तेव्हादेखील त्याला येशू म्हणता येईल काय? यापूर्वी जेव्हा तो आला तेव्हा पुरुष होता, पण या वेळेसही तो परत पुरुषच असेल काय? कृपेच्या युगात जेव्हा तो आला, तेव्हा त्याचे कार्य वधस्तंभावर खिळण्याचे होते; जेव्हा या वेळेस तो परतून येईल, तेव्हादेखील तो मनुष्यजातीला पापातून मुक्त करेल काय? त्याला पुन्हा वधस्तंभावर खिळता येईल काय? तसे झाले तर त्याच्या कार्याची पुनरावृत्ती होणार नाही काय? देव कायम नवीन असतो, कधीही जुना नसतो हे तुला ठाऊक नव्हते काय? देव अपरिवर्तनीय असतो असे काहीजण म्हणतात. ते बरोबरच आहे, पण त्याचा अर्थ देवाची प्रवृत्ती आणि त्याचे मूलतत्त्व अपरिवर्तनीय असते असा आहे. त्याचे नाव आणि कार्य बदलले, यावरून त्याचे मूलतत्त्व बदलले असे सिद्ध होत नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर देव नेहमीच देव राहणार आहे. ते कधीही बदलणार नाही. देवाचे कार्य कधीही बदलत नाही, असे जर तू म्हणत असशील, तर तो आपली सहा हजार वर्षांची व्यवस्थापन योजना पूर्णत्वास कसा नेऊ शकेल? देवात कधीही परिवर्तन घडून येत नाही एवढे तुला माहीत आहे, पण देव कायम नवीन असतो, तो कधीही जुना नसतो हे तुला ठाऊक आहे काय? जर देवाचे कार्य कधीही बदलणारे नसते, तर तो मनुष्यजातीला आज इथवर घेऊन आला असता काय? जर देव अपरिवर्तनीय असेल, तर त्याने अगोदरच दोन युगांचे कार्य करून ठेवले आहे हे कसे? त्याचे कार्य कधीही पुढे गेल्यावाचून राहात नाही, म्हणजेच त्याची प्रवृत्ती हळूहळू मनुष्यासमोर उघड होत जाते आणि ही उघड होत जाणारी प्रवृत्ती ही त्याची अंगभूत प्रवृत्ती असते. सुरुवातीला देवाची प्रवृत्ती मनुष्यापासून लपलेली होती, त्याने आपली प्रवृत्ती उघडपणे मनुष्यासमोर कधीच व्यक्त केली नव्हती. तसेच मनुष्याला त्याच्याविषयी काहीही माहिती नव्हती. त्यामुळे देव आपल्या कार्याचा वापर आपली प्रवृत्ती हळूहळू मनुष्यासमोर उघड करायला करतो. मात्र देव अशाप्रकारे कार्य करतो, म्हणजे त्याची प्रवृत्ती प्रत्येक युगात बदलत जाते असे नाही. देवाची इच्छा सतत बदलत राहते म्हणून त्याची प्रवृत्तीही सतत बदलत राहते अशातला तो प्रकार नाही. उलट त्याच्या कार्याची युगे वेगळी असल्यामुळे देव संपूर्णपणे आपली अंगभूत प्रवृत्ती अंगीकारतो आणि हळूहळू ती मनुष्यासमोरउघड करतो असे म्हणता येईल. त्यामुळे माणूस त्याला जाणून घेऊ शकतो. मात्र मुळात देवाकडे अशी एखादी विशिष्ट प्रवृत्ती नव्हतीच किंवा जसजशी युगे लोटली तसतशी त्याची प्रवृत्ती हळूहळू बदलत गेली याचा हा पुरावा नव्हे. असे समजणे चुकीचे होईल. देव आपली विशिष्ट अंगभूत प्रवृत्ती माणसासमोर उघड करतो. लोटत्या युगांनुसार आपण काय आहोत ते तो माणसाला दाखवून देतो. एखाद्या युगातील कार्यातून देवाची संपूर्ण प्रवृत्ती दिसून येऊ शकत नाही. म्हणून “देव कायमच नवीन असतो, कधीही जुना होत नाही” ही उक्ती त्याच्या कार्याला उद्देशून आहे. तसेच “देव अपरिवर्तनीय आहे” ही उक्ती देवाकडे अंगभूत कोणत्या गोष्टी आहेत आणि तो काय आहे याबद्दल आहे. काही झाले, तरी सहा हजार वर्षांचे कार्य तू एका मुद्द्यावर तोलून धरू शकत नाहीस किंवा त्याला मृतवत शब्दांची मर्यादाही घालू शकत नाहीस. हा मनुष्याचा मूर्खपणा आहे. मनुष्याला वाटते तेवढा देव सोपा नाही आणि त्याचे कार्य कोणत्याही एका युगात रेंगाळत राहू शकत नाही. उदाहरणार्थ, देवाचे नाव नेहमीच यहोवा असेल असे नाही. येशू हे नाव घेऊनदेखील देव आपले कार्य करू शकतो. देवाच्या कार्याची नेहमीच पुढच्या दिशेला प्रगती होत असते याची ही खूण आहे.
देव नेहमीच देव असतो, तो कधीही सैतान होणार नाही. सैतान हा कायमच सैतान असतो आणि तो कधीही देव होणार नाही. देवाचे शहाणपण, देवाची अद्भूतता, देवाची नीतिमत्ता आणि देवाचा महिमा कधीही बदलणार नाही. त्याचा गाभा, त्याच्याकडे जे आहे, तो जे काही आहे ते कधीही बदलणार नाही. त्याच्या कार्याविषयी म्हणाल, तर ते कायम पुढेच जात असते, ते अधिक सखोल होत जात असते, कारण देव हा नेहमीच नवीन असतो आणि तो कधीही जुना होत नाही. प्रत्येक युगात देव एक नवीन नाव धारण करतो, प्रत्येक युगात तो नवीन कार्य करतो आणि प्रत्येक युगात तो आपण निर्माण केलेल्यांना स्वतःची नवीन इच्छा आणि नवीन प्रवृत्ती दाखवून देतो. नवीन युगात जर लोकांना देवाच्या नवीन प्रवृत्तीचा आविष्कार बघता आला नाही, तर ते त्याला कायमचे वधस्तंभावर खिळणार नाहीत का? तसेच असे केल्याने ते देवाची व्याख्या ठरवून टाकणार नाहीत का? जर देवाने मानवी अवतारात केवळ पुरुषाचेच रूप धारण केले, तर लोक तो पुरुषच असतो असे समजून चालतील, त्याला पुरुषांचाच देव मानतील आणि त्याला ते कधीही स्त्रियांचा देव मानणार नाहीत. देव हा पुरुषच असतो, तो पुरुषांचा प्रमुख असतो, असेच सगळे पुरुष धरून चालतील—मग स्त्रियांचे काय? हे अन्यायाचे आहे; ही भेदभावाची वागणूक नव्हे का? तसे असते तर देवाने ज्यांना वाचवले ते सर्वजण त्याच्याचसारखे पुरुष असते आणि त्याने एकाही स्त्रीला वाचवले नसते. देवाने जेव्हा मनुष्यजात निर्माण केली, तेव्हा त्याने आदाम आणि हव्वा अशा दोघांची निर्मिती केली. त्याने केवळ आदाम निर्माण केला नाही, तर त्याने स्त्री आणि पुरुष दोन्ही निर्माण केले. देव हा केवळ पुरुषांचा देव नाही—तो स्त्रियांचादेखील देव आहे. शेवटच्या दिवसांमध्ये देव कार्याच्या नवीन टप्प्यात प्रवेश करतो आहे. तो आपल्या प्रवृत्तीबद्दलच्या अधिक गोष्टी उघड करेल आणि त्या गोष्टी म्हणजे येशूच्या काळातली करुणा आणि प्रेम या नसतील. या वेळेस त्याने नवीन कार्य हाती घेतलेले असल्याने त्याच्या जोडीला आता प्रवृत्तीही नवीन असेल. जर हे कार्य पवित्र आत्म्याने केले असते—जर देवाने देह धारण केला नसता आणि त्याऐवजी थेट विजेच्या कडकडाटाद्वारे आत्म्याने आपल्याशी संवाद साधला असता, तर मनुष्याचा त्याच्याशी संपर्क येण्याचा काहीच मार्ग नव्हता. मग अशावेळेस मनुष्याला त्याची प्रवृत्ती कळून आली असती का? केवळ आत्म्यानेच सर्व कार्य केले असते, तर मनुष्याला देवाची प्रवृत्ती समजण्याचा काहीच मार्ग नव्हता. देव जेव्हा देह धारण करतो, जेव्हा त्याचे शब्द मूर्तस्वरूप घेतात आणि देव आपल्या अवताराद्वारे आपल्या संपूर्ण प्रवृत्तीचा आविष्कार करतो, तेव्हाच लोकांना स्वतःच्या डोळ्यांनी त्याची प्रवृत्ती बघता येते. देव खरोखरच माणसांमध्ये राहतो. तो मूर्त आहे; मनुष्य त्याच्या प्रवृत्तीमध्ये प्रत्यक्षपणे गुंतू शकतो, देवामध्ये जे आहे, देव म्हणून जे काही आहे त्यात मनुष्य गुंतून जाऊ शकतो आणि याच मार्गाने मनुष्य त्याची खरी ओळख करून घेऊ शकतो. त्याचबरोबर “देव हा पुरुषांचा देव आहे, तसेच तो स्त्रियांचाही देव आहे” अशा पद्धतीचे कार्य देवाने पार पाडले आहे आणि त्याने आपले संपूर्ण कार्य मानवी अवतारात पार पाडले आहे. तो कोणत्याही युगात आपल्या कार्याची पुनरावृत्ती करत नाही. शेवटचे दिवस आले असल्यामुळे तो अखेरच्या दिवसात करायचे कार्य पार पाडेल आणि आपली अखंड प्रवृत्ती त्या शेवटच्या दिवसांमध्ये उघड करेल. शेवटच्या दिवसांबद्दल बोलायचे, तर हे वेगळ्या युगाविषयी आहे. या युगात नक्कीच मोठे अरिष्ट ओढवेल, तसेच भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि प्लेग पसरेल, असे येशू म्हणाला होता. त्यावरून हे आता कृपेचे युग राहिले नसून नवीन युग सुरू झाले आहे असे दिसून येईल. समजा, सगळे लोक म्हणतात त्याप्रमाणे देव कधीही बदलत नाही, त्याची प्रवृत्ती ही कायम प्रेमळ आणि करुणामय असते, त्याचे माणसावर प्रेम असते आणि प्रत्येक मनुष्याला तो मुक्ती देऊ करतो, कोणाही माणसाचा तो कधी तिरस्कार करत नाही. असे असेल तर, त्याचे कार्य कधी शेवटास जाऊ शकेल का? जेव्हा येशू आला आणि त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले, तेव्हा सर्व पापी लोकांसाठी त्याने हे बलिदान दिले, त्याने स्वतःला त्या बलिदानाच्या वेदीवर अर्पण केले, तेव्हा त्याने अगोदरच मुक्तीचे कार्य साधले होते आणि कृपेचे युग संपुष्टात आणले होते. मग त्या युगातल्या कार्याची आता शेवटच्या दिवसांमध्ये पुनरावृत्ती करण्यात काय मतलब आहे? पुन्हा त्याच गोष्टी केल्याने येशूचे कार्य नाकारल्यासारखे होणार नाही काय? जर देवाने या टप्प्यावर येऊन वधस्तंभावर खिळण्याचे कार्य केले नसते आणि नुसतेच प्रेमळ आणि करुणामय वागणे ठेवले असते, तर त्याला ते युग समाप्त करता आले असते का? प्रेमळ आणि करुणामय देवाला एखादे युग संपुष्टात आणणे शक्य होते का? युगाच्या समाप्तीच्या वेळच्या त्याच्या शेवटच्या कार्यात देवाची प्रवृत्ती ही ताडण करण्याची आणि न्याय करण्याची आहे. त्यामध्ये तो लोकांचा जाहीर न्याय करण्याच्या दृष्टीने, तसेच त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्यांना परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने जे काही अनीतिमान आहे ते सर्व उघड करतो. केवळ अशा प्रवृत्तीमुळेच एखाद्या युगाची समाप्ती होऊ शकते. शेवटचे दिवस कधीच येऊन ठेपले आहेत. निर्माण झालेले सर्व जीव त्यांच्या प्रकारानुसार अलग केले जातील तसेच त्यांच्या स्वभावावर आधारित असलेल्या वेगवेगळ्या वर्गात ते विभागले जातील. देव जेव्हा मनुष्यजातीचे फलित आणि त्यांचे गंतव्य उघड करेल तोच हा क्षण आहे. जर लोकांचा न्याय आणि ताडण केले नाही, तर त्यांची अवज्ञा आणि अप्रामाणिकपणा उघडा उघडी पाडायचा कोणताही मार्ग नाही. केवळ ताडण आणि न्याय याच मार्गांनी सर्व निर्मितीचे फलित दिसून येईल. मनुष्याचा जेव्हा न्याय होतो आणि ताडण होते, तेव्हाच तो आपले खरे रंग दाखवतो. दुष्ट प्रवृत्तीना दुष्टांबरोबर आणि चांगल्या प्रवृत्तीना चांगल्या प्रवृत्तीच्या जोडीने ठेवले, तर सर्व मनुष्यजात आपापल्या वर्गातील लोकांमध्ये विभागली जाईल. ताडण आणि न्याय याद्वारे सर्व निर्मितीची फलनिष्पत्ती सामोरी येईल, त्यामुळे दुष्टांना शिक्षा होईल आणि चांगल्याला बक्षीस मिळेल, तसेच सर्व लोक देवाच्या अधिपत्याखाली येतील. हे सर्व कार्य प्रामाणिक ताडण आणि न्याय या मार्फत साध्य केले पाहिजे. मनुष्याच्या भ्रष्टाचाराने आता टोक गाठले आहे आणि त्याची अवज्ञा करण्याची प्रवृत्ती वाढतच चालली आहे. म्हणूनच देवाची नीतिमान प्रवृत्ती, जी ताडण आणि न्याय यावर आधारित आहे आणि जी शेवटच्या दिवसांमध्ये दिसून येणार आहे, केवळ अशीच प्रवृत्ती मनुष्यात संपूर्ण परिवर्तन घडवून आणून त्याला परिपूर्ण बनवू शकते. केवळ हीच प्रवृत्ती दुष्ट शक्तींना उघडे पाडून अनीतिमान लोकांना कडक शासन करू शकते. म्हणून अशा प्रवृत्तीमागे त्या युगाच्या महतीची प्रेरणा असते. प्रत्येक नवीन युगातील कार्यासाठी या प्रवृत्तीचे प्रकट होणे, तिचे प्रदर्शन होत असते. देव आपली प्रवृत्ती अहेतुकपणे, कसल्याही कारणाशिवाय उघड करत नाही. समजा, शेवटच्या दिवसातील मनुष्याची फलनिष्पत्ती स्पष्ट होताना देवाने मनुष्यावर अपार करुणेचा आणि प्रेमाचा वर्षाव केला आणि तो मनुष्यावर प्रेम करतच राहिला, मनुष्याचा प्रामाणिक न्याय न करता त्याच्याशी समजुतीने, धीराने आणि क्षमेच्या भावनेने वागत राहिला, मनुष्याची पापे कितीही भयंकर असली, तरी कसलाही प्रामाणिक निवाडा न करता त्याला माफ करत राहिला: तर देवाचे व्यवस्थापन शेवटाला कधी जाऊ शकेल? अशा प्रकारची प्रवृत्ती मानवांना मनुष्यजातीला योग्य त्या मुक्कामाला कशी घेऊन जाऊ शकेल? उदाहरणार्थ असा विचार करा की, एखादा न्यायाधीश आहे, जो नेहमीच प्रेमळ असतो, ममताळू चेहऱ्याचा आणि मृदू हृदयाचा असा तो न्यायाधीश आहे. लोकांनी कितीही गुन्हे केले असतील तरी तो त्यांच्यावर प्रेमच करतो. ते कसेही असले तो त्यांच्याशी प्रेमाने आणि सहनशीलतेने वागतो. असे असेल तर तो न्याय्य निकाल देऊ शकेल का? शेवटच्या दिवसांमध्ये केवळ प्रामाणिक न्यायच माणसाला त्याच्यासारख्या लोकांबरोबर एकत्र आणू शकेल आणि मनुष्यजात एका नवीन कक्षेत पदार्पण करेल. अशाप्रकारे, हे सबंध युग देवाच्या न्याय आणि ताडण करण्याच्या प्रामाणिक प्रवृत्तीमुळे समाप्त होईल.
या सर्व व्यवस्थापनातील देवाचे कार्य अगदी स्पष्ट आहे. कृपेचे युग हे कृपेचे युग आहे आणि शेवटचे दिवस हे शेवटचे दिवस आहेत. प्रत्येक दोन युगांमध्ये ठळक फरक आहेत. प्रत्येक युगातील देव त्या युगाचे प्रतिनिधित्व करणारे कार्य करतो. शेवटच्या दिवसात करायच्या कार्यामध्ये ज्वलन, न्याय, ताडण, संताप आणि विध्वंस या गोष्टी युग संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक आहेत. शेवटचे दिवस म्हणजेच अंतिम युग होय. अंतिम युगात देव हे युग संपुष्टात आणणार नाही काय? युग संपुष्टात आणण्यासाठी देवाला ताडण आणि न्याय या दोन गोष्टी जवळ बाळगाव्या लागणार आहेत. केवळ याच मार्गाने तो युग समाप्त करू शकतो. मनुष्याने तगून राहावे, जगावे आणि त्याचे अस्तित्व अधिक चांगले असावे असा येशूचा हेतू होता. त्याने मनुष्याला पापापासून वाचवले, जेणेकरून मनुष्य रसातळाला जाणार नाही, पाताळात आणि नरकात जाण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही. मनुष्याला पाताळ आणि नरकापासून वाचवून येशूने त्याला जगण्याची मुभा दिली. आता शेवटचे दिवस आले आहेत. देव मनुष्याला पूर्णपणे नष्ट करेल, सबंध मनुष्यजात तो संपवून टाकेल, मनुष्यजातीच्या क्रांतीत तो परिवर्तन घडवून आणेल. म्हणूनच भूतकाळातील करुणामय आणि प्रेमळ प्रवृत्ती घेऊन हे युग समाप्त करणे किंवा सहा हजार वर्षांचे आपले व्यवस्थापन फलद्रूप करणे देवाला अशक्य होईल. प्रत्येक युग देवाच्या विशिष्ट प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करत असते आणि प्रत्येक युगात देवाने करायला हवे असे काम असते. तेव्हा खुद्द देवाने प्रत्येक युगात पार पाडलेले कार्य हा त्याच्या खऱ्या प्रवृत्तीचा आविष्कार असतो. त्याचे नाव आणि तो करत असलेले कार्य युगाप्रमाणे बदलत राहते—या सर्व गोष्टी नवीन असतात. नियमशास्त्राच्या युगात मनुष्यजातीला मार्गदर्शन करण्याचे कार्य यहोवा या नावाने केले गेले व कार्याच्या पहिल्या टप्प्याची पृथ्वीवर सुरुवात झाली. या टप्प्यातले कार्य मंदिर आणि पवित्र वेदीच्या बांधकामाचे होते. तसेच कायद्याचा वापर करून इस्रायलच्या लोकांना मार्गदर्शन करण्याचे व त्यांच्यामध्ये काम करण्याचे ते कार्य होते. इस्रायलच्या लोकांना मार्गदर्शन करून त्याने पृथ्वीवरील आपल्या कार्याची पायाभरणी केली. या तळावरून त्याने आपली व्याप्ती इस्रायलच्या पलीकडे वाढवली. म्हणजेच इस्रायलपासून सुरुवात करून त्याने आपले कार्य बाहेर पसरवले. त्यामुळे यहोवा हाच देव होता असे हळूहळू नंतरच्या पिढ्यांना समजून आले, तसेच यहोवानेच स्वर्गाची, पृथ्वीची आणि इतर सर्व गोष्टींची निर्मिती केली आणि यहोवानेच सर्व प्राणिमात्र उत्पन्न केले हे त्यांना समजले. त्याने आपले कार्य इस्रायलच्या लोकांमार्फत अधिक विस्तारले. इस्रायलची भूमी ही यहोवाच्या पृथ्वीवरील कार्याची पहिली पवित्र जागा होती आणि इस्रायलच्या भूमीतच देवाने पृथ्वीवर सर्वप्रथम कार्य सुरू केले. ते नियमशास्त्राच्या युगातील कार्य होते. कृपेच्या युगात मनुष्याला वाचवणाऱ्या देवाचे नाव येशू होते. तो जे होता आणि त्याच्याकडे जे होते ते म्हणजे कृपादृष्टी, प्रेम, करुणा, सहनशीलता, धीर, नम्रता, काळजी आणि संयम. त्याने केलेले कितीतरी कार्य हे मनुष्याच्या मुक्तीसाठी होते. त्याची प्रवृत्ती करुणामयी आणि प्रेमळ होती, कारण तो प्रेमळ आणि करुणामय होता. मनुष्यजातीसाठी त्याला वधस्तंभावर खिळणे आवश्यक होते. देवाचे मनुष्यावर प्रेम आहे इतके की त्यासाठी त्याने स्वतःचे संपूर्ण बलिदान दिले, हे दाखवून देण्यासाठीही ते आवश्यक होते कृपेच्या युगात देवाचे नाव येशू होते. म्हणजेच, देव हा मनुष्याला वाचवणारा देव होता. तो करुणामय आणि प्रेमळ देव होता. देव मनुष्याच्या सोबतीला होता. त्याचे प्रेम, त्याची करुणा आणि त्याची मुक्ती प्रत्येक माणसाची सोबत करत होते. येशूचे नाव आणि त्याचे अस्तित्व मान्य केल्यामुळेच मनुष्याला शांतता आणि आनंद मिळत होता, त्याचा आशीर्वाद मिळत होता, त्याची अमाप कृपा माणसाच्या पदरात पडत होती आणि मनुष्याला मुक्ती मिळत होती. येशू वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे अनुसरण करणाऱ्या सर्वांना मुक्ती मिळाली आणि त्यांच्या पापांना क्षमा करण्यात आली. कृपेच्या युगात येशू हेच देवाचे नाव होते. वेगळ्या शब्दात सांगायचे, तर कृपेच्या युगातील कार्य हे मुख्यत्वे येशूच्या नावाने करण्यात आले. कृपेच्या युगात देवाचे नाव येशू होते. त्याने जुन्या कराराच्या पलीकडे जाऊन नवीन कार्याचा एक टप्पा हाती घेतला आणि त्याच्या कार्याचा शेवट वधस्तंभावर खिळण्याने झाला. तेच त्याच्या कार्याचे साफल्य होते. म्हणून नियमशास्त्राच्या युगात यहोवा हे देवाचे नाव होते आणि कृपेच्या युगात येशूचे नाव देवाचे प्रतिनिधित्व करत होते. शेवटच्या दिवसांमध्ये त्याचे नाव सर्वशक्तिमान देव असे आहे—हा सर्वशक्तिमान देव आपल्या सामर्थ्याचा उपयोग मनुष्याला दिशा दाखवण्यासाठी, त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी, मनुष्याला प्राप्त करण्यासाठी आणि अखेर हे युग संपुष्टात आणण्यासाठी करतो. प्रत्येक युगात, देवाच्या कार्याच्या प्रत्येक टप्यावर त्याची प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून येते.
सुरुवातीला जुन्या करारातील नियमशास्त्राच्या युगात मनुष्याला मार्गदर्शन करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाला मार्गदर्शन करण्यासारखे होते. अगदी सुरुवातीची मनुष्यजात यहोवापासून नव्यानेच उत्पन्न झाली; तेच इस्रायली लोक होय. देवाची आराधना कशी करावी किंवा या पृथ्वीतलावर कसे राहावे याविषयी त्यांना काहीही समज नव्हती. यहोवाने मनुष्यजात उत्पन्न केली, म्हणजेच त्याने आदाम आणि हव्वेला निर्मिले, पण यहोवाची आराधना कशी करावी किंवा यहोवाच्या पृथ्वीवरील नियमांचे पालन कसे करावे हे जाणून घेण्याइतकी कार्यक्षमता त्याने त्यांना बहाल केली नाही. यहोवाच्या थेट मार्गदर्शनाशिवाय हे कोणालाच समजू शकत नाही, कारण सुरुवातीला मनुष्याकडे अशा क्षमताच नव्हत्या. यहोवा हा देव आहे एवढेच मनुष्याला ठाऊक होते. मात्र त्याची आराधना कशी करावी, काय केल्याने त्याला आराधना करणे असे म्हणता येईल, त्याची आराधना करताना मन कसे असावे किंवा त्याची आराधना करताना त्याला काय अर्पण करावे याविषयी मनुष्याला बिलकुल कल्पना नव्हती. यहोवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींपैकी जे काही आनंद देणारे असेल त्याचा आनंद कसा घ्यावा एवढेच मनुष्याला ठाऊक होते. मात्र देवाने निर्माण केलेल्या प्राणिमात्राला साजेसे पृथ्वीवरील आयुष्य कोणते याविषयी मनुष्याला किंचितही कल्पना नव्हती. त्यांना कोणी सूचना दिल्या नसत्या, कोणी वैयक्तिक मार्गदर्शन केले नसते, तर मनुष्यजातीला माणुसकीला साजेसे आयुष्य व्यतीत करताच आले नसते, तर त्यांच्यावर सैतानाने व्यर्थ ताबा मिळवला असता. यहोवाने मनुष्यजात निर्माण केली किंवा असे म्हणता येईल की, त्याने मनुष्यजातीचे पूर्वज म्हणजे आदाम आणि हव्वा यांना निर्माण केले. मात्र त्यांना त्याने अधिक काही हुशारी किंवा शहाणपण देऊ केले नाही. जरी ते अगोदरपासून पृथ्वीवर राहत असले, तरी त्यांना जवळपास काहीही कळत नव्हते. म्हणूनच, मनुष्यजात निर्माण करण्याचे यहोवाचे कार्य अर्धवटच पूर्ण झाले आणि पूर्णत्वाला जाण्यापासून ते कार्य कितीतरी लांब होते. त्याने केवळ मातीपासून पुरुषाची एक आकृती तयार केली आणि त्यात प्राण फुंकले. मात्र त्या माणसात त्याने आपल्या आराधनेसाठी पुरेशी इच्छाशक्ती घातली नाही. सुरुवातीला मनुष्याला त्याची आराधना करण्याची किंवा त्याला घाबरण्याची गरज वाटत नव्हती. देवाचे शब्द कसे ऐकावे एवढे माणसाला ठाऊक होते, पण पृथ्वीवरील आयुष्याच्या मूलभूत ज्ञानाबद्दल तसेच मानवी आयुष्याच्या सर्वसाधारण नियमांविषयी तो अडाणी होता. म्हणून जरी यहोवाने पुरुषाची आणि स्त्रीची निर्मिती केली असली आणि हे कार्य त्याने सात दिवसात पूर्ण केले असले, तरी त्याने मनुष्याची निर्मिती काही पूर्ण केली नाही. कारण मनुष्य हा केवळ एखाद्या फोलपटासारखा होता आणि माणूस म्हणून लागणारे गुण त्याच्यात नव्हते. यहोवाने मनुष्यजातीची निर्मिती केली एवढेच मनुष्याला ठाऊक होते, पण यहोवाच्या शब्दांचे किंवा नियमांचे पालन कसे करावे याविषयी त्याला काहीच ठाऊक नव्हते. म्हणूनच मनुष्यजात अस्तित्वात आल्यानंतरही यहोवाचे कार्य अजिबात संपले नव्हते. मनुष्यजातीने अस्तित्वात यावे यासाठी त्याला अजूनही त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करायचे होते. त्यामुळे ते पृथ्वीवर एकत्र राहून त्याची आराधना करू शकले असते. तसेच त्याच्या मार्गदर्शनाखाली ते पृथ्वीवरील सामान्य मानवी आयुष्यासाठी योग्य अशा मार्गावर प्रवेश करू शकले असते. यहोवाच्या नावाने हाती घेतलेले कार्य तत्त्वतः केवळ याच मार्गाने पूर्णत्वास गेले असते. म्हणजेच जग निर्माण करायचे यहोवाचे कार्य केवळ याच मार्गाने सुफळ संपूर्ण झाले असते. आणि म्हणूनच, मनुष्यजात निर्माण केल्यावर पुढील हजारो वर्षे त्याला त्यांना पृथ्वीवरील आयुष्यासाठी मार्गदर्शन करायचे होते. जेणेकरून मनुष्यजात त्याचे आदेश आणि नियम पाळू शकेल आणि पृथ्वीवरील सर्वसामान्य मानवी जीवनात सहभागी होऊ शकेल. त्यानंतरच यहोवाचे कार्य पूर्णपणे संपले असते. मनुष्यजात निर्माण केल्यावर त्याने हे कार्य हाती घेतले आणि जेकबच्या युगापर्यंत ते चालू ठेवले. जेकबचे युग सुरू झाल्यावर त्याने जेकबच्या बारा पुत्रांच्या अनुसार इस्रायलमधील बारा जमाती तयार केल्या. तेव्हापासून इस्रायलचे सर्व लोक म्हणजे अधिकृतरीत्या पृथ्वीवर त्याच्या नेतृत्वाखाली वावरणारे मानवी वंश बनले. तसेच इस्रायल हे पृथ्वीवरील त्याच्या कामाचे विशिष्ट ठिकाण झाले. आपले पृथ्वीवरील कार्य अधिकृतपणे पार पाडण्यासाठीचा पहिला गट म्हणून यहोवाने या लोकांचा वापर केला. तसेच त्याने इस्रायलची सबंध भूमी आपल्या कार्याचे उगमस्थान म्हणून वापरली. अधिक मोठ्या कार्याची सुरुवात म्हणून त्याने त्यांचा वापर केला, जेणेकरून पृथ्वीवर त्याच्यापासून उत्पन्न झालेले सर्व लोक त्याची आराधना कशी करायची आणि पृथ्वीवर कसे राहायचे ते जाणतील. अशा रितीने इस्रायली लोकांची कृत्ये म्हणजे परराष्ट्रातील लोकांसाठी आदर्श उदाहरण ठरली. तसेच इस्रायलच्या लोकांसमोर उच्चारली गेलेली वचने ही परराष्ट्रातील लोकांनी ऐकावी अशी वचने ठरली. यहोवाने सर्वप्रथम त्यांनाच आपले नियम आणि आदेश सांगितले. त्यामुळे यहोवाच्या पद्धतीचा आदर कसा ठेवावा हे जाणणारे तेच पहिले लोक होते. यहोवाची पद्धत जाणणाऱ्या मानवी वंशाचे ते पूर्वज होते. तसेच यहोवाने निवडलेल्या मानवी वंशाचे ते प्रतिनिधी होते. जेव्हा कृपेचे युग अवतरले, तेव्हा यहोवाने मनुष्याला अशा पद्धतीने मार्गदर्शन करणे सोडून दिले. मनुष्याने पापे केली होती आणि स्वतःला पापांच्या अधीन केले होते. म्हणून त्याने मनुष्याला पापातून मुक्त करायला सुरुवात केली. अशाप्रकारे माणूस पापातून पूर्णपणे मुक्त होईपर्यंत त्याने मनुष्याची निर्भर्त्सना केली. शेवटच्या दिवसांमध्ये मनुष्य दुराचरणाच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे, की या टप्प्यावरील कार्य केवळ न्याय करून आणि ताडण करूनच तडीस नेता येईल. केवळ याच मार्गाने ते कार्य पूर्ण होऊ शकते. हे कार्य अनेक युगांचे आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे, तर देव आपल्या नावाचा, आपल्या कार्याचा आणि देवाच्या विविध प्रतिमांचा वापर करून विविध युगांमध्ये फरक करतो आणि एका युगातून दुसऱ्या युगात प्रवेश करतो; देवाचे नाव आणि त्याचे कार्य हे त्याच्या विशिष्ट युगाचे तसेच प्रत्येक युगातील त्याच्या कार्याचे प्रतिनिधित्व करतात. समजा प्रत्येक युगातील देवाचे कार्य कायम सारखेच असेल आणि देव कायम एकाच नावाने ओळखला जात असेल, तर माणूस त्याला कसा ओळखेल? देवाचे नाव यहोवाच असले पाहिजे, तसेच यहोवा या नावाव्यतिरिक्त इतर कोणत्याही नावाने ओळखले जाणारे इतर कोणीही देव असू शकत नाही. नाहीतर, केवळ येशू हाच देव असू शकतो. येशू व्यतिरिक्त इतर कोणत्याही नावाने देवाला ओळखता येणार नाही. येशू सोडून बाकी यहोवा हा देव नाही, तसेच सर्वशक्तिमान देव हादेखील देव नाही. देव सर्वशक्तिमान आहे यावर माणसाचा विश्वास आहे, पण जो देव माणसाबरोबर आहे तोच खरा देव होय आणि त्याला येशूच म्हटले पाहिजे, कारण देव मनुष्याच्या सोबतीला आहे. असे करणे म्हणजेच ती विशिष्ट तत्त्वप्रणाली स्वीकारणे आणि देवाला एका विशिष्ट भूमिकेत बांधणे आहे. म्हणून प्रत्येक युगात देव जे कार्य करतो, तो ज्या नावाने ओळखला जातो आणि तो जी प्रतिमा धारण करतो—तसेच आजवर प्रत्येक टप्प्यात तो जे कार्य करत आला आहे—ते सर्व एकाच नियमात बसत नाही, तसेच त्यावर कसली मर्यादादेखील नाही. तो यहोवा आहे, पण तो येशूदेखील आहे, तसेच मशीहा आहे आणि सर्वशक्तिमान देवदेखील आहे. त्याच्या कार्यात हळूहळू परिवर्तन घडून येऊ शकते आणि त्या जोडीला त्याच्या नावातदेखील बदल घडून येतात. कोणतेही एक नाव त्याचे संपूर्ण प्रतिनिधित्व करू शकत नाही, मात्र ज्या नावांनी तो ओळखला जातो ती सर्व नावे त्याचे प्रतिनिधित्व करू शकतात. तसेच प्रत्येक युगात तो जे कार्य करतो ते त्याच्या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करणारे असते. समजा, शेवटचे दिवस येतील तेव्हा तुला समोर दिसणारा देव हा अजूनही येशूच असेल, शिवाय तो एका पांढऱ्या मेघावर आरूढ होऊन येत असेल आणि त्याचे एकंदर दिसणे येशूसारखेच असेल, तो उच्चारत असलेली वचने ही अजूनही येशूचीच वचने असतील: “आपल्या शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करा, उपवास करा, प्रार्थना करा, एकीकडे स्वतःच्या आयुष्याची काळजी घेताना तुमच्या शत्रूंवर प्रेम करा, इतरांशी सहनशीलतेने वागा, धीर धरा आणि नम्र राहा. माझे शिष्य होण्यापूर्वी तुम्ही या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी करूनच तुम्ही माझ्या राज्यात प्रवेश करू शकाल.” हे सर्व कृपेच्या युगातील कार्याशी निगडित नाही का? तो जे काही बोलतो आहे ती कृपेच्या युगाची पद्धत नव्हे का? जर तुम्हाला हे शब्द ऐकू आले असते तर कसे वाटले असते? हे अजूनही येशूचेच कार्य आहे असे तुम्हाला वाटणार नाही का? ही त्याचीच पुनरावृत्ती होणार नाही का? माणसाला यात काही आनंद मिळू शकेल का? देवाचे कार्य आता एवढेच राहू शकते आणि यापुढे त्यात काहीही प्रगती होणार नाही असे तुम्हाला वाटेल. त्याच्याकडे एवढीच ताकद आहे आणि करण्यासाठी आता आणखी नवीन काहीही कार्य उरलेले नाही, तसेच त्याच्या ताकदीने आता मर्यादा गाठली आहे असेच तुम्हाला वाटेल. आजपासून दोन हजार वर्षांपूर्वी कृपेचे युग होते आणि त्यानंतर दोन हजार वर्षे उलटून गेली तरीही तो अजून कृपेच्या युगातील पद्धतीचाच उपदेश करत आहे आणि अजूनही लोकांना पश्चात्ताप करायला लावत आहे. लोक म्हणू लागतील, “देवा, तुझ्याकडे एवढीच ताकद आहे. मला तू शहाणा वाटत होतास, पण तुला तर फक्त सहनशीलता ठाऊक आहे आणि तुला फक्त धीर धरण्याशीच कर्तव्य आहे. केवळ आपल्या शत्रूवर प्रेम कसे करावे एवढेच तुला ठाऊक आहे, त्याहून अधिक काहीही माहीत नाही.” माणसाच्या मनात देवाची प्रतिमा कायमच त्याच्या कृपेच्या युगातल्या प्रतिमेप्रमाणे असेल आणि देव प्रेमळ, करुणामय आहे असेच मनुष्याला कायम वाटत राहील. देवाचे कार्य कायम त्याच जुन्या मार्गाने जाईल असे तुला वाटते का? म्हणून त्याच्या कार्याच्या या टप्प्यावर त्याला वधस्तंभावर खिळले जाणार नाही. तुम्ही जे बघाल आणि ज्याला स्पर्श कराल, ते सर्व तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या कल्पनेहून किंवा तुमच्या कानावर आलेल्या वार्तेहून वेगळे असेल. आज देवाचा परूश्यांशी विशेष संबंध नाही. तसेच तो जगालाही फारसा पत्ता लागू देत नाही आणि त्याचे अनुसरण करणारे तुम्ही लोकच त्याला ओळखता. कारण त्याला पुन्हा वधस्तंभावर खिळले जाणार नाही. कृपेच्या युगात येशूने सबंध भूमीत उघडपणे आपल्या सुवार्तेचा प्रचार केला. वधस्तंभावर खिळण्याच्या कार्यासाठी तो परूश्यांच्या संबंधात आला. जर त्याचा परूश्यांशी संबंध आला नसता आणि सामर्थ्यशाली लोक त्याला कधीही ओळखत नसते, तर त्याचा धिक्कार कसा झाला असता आणि मग त्याचा विश्वासघात होऊन त्याला वधस्तंभावर कसे खिळले असते? म्हणून वधस्तंभावर खिळले जाण्याकरता त्याचा संबंध परूश्यांशी आला. आज मोह टाळण्यासाठी म्हणून तो आपले कार्य गुप्तपणे करत आहे. देवाच्या दोन अवतारांमध्ये त्याचे कार्य आणि त्याचे महत्त्व वेगवेगळे आहे, तसेच एकंदर परिस्थितीही वेगळी आहे. मग तो करत असलेले कार्य पूर्णपणे तसेच कसे असेल?
येशूचे नाव म्हणजेच “देव आमच्या सोबत आहे.” ते नाव देवाच्या प्रवृत्तीचे संपूर्ण प्रतिनिधित्व करू शकते का? देव म्हणजे काय हे ते पूर्णपणे सांगू शकते काय? जर माणूस असे म्हणत असेल की, देवाला केवळ येशू या नावाने हाक मारता येईल आणि त्याचे दुसरे कुठलेही नाव असू शकत नाही, कारण देव त्याची प्रवृत्ती बदलू शकत नाही, तर हे निव्वळ पाखंडी बोलणे आहे! येशू म्हणजेच देव आमच्या सोबत आहे हे नाव देवाचे संपूर्ण प्रतिनिधित्व करू शकते असे तुला वाटते का? देवाला अनेक नावांनी ओळखता येईल, पण त्या अनेक नावांपैकी एकही नाव असे नाही जे देवाची संपूर्ण व्याप्ती सांगू शकेल. त्यापैकी एकही नाव देवाचे संपूर्ण प्रतिनिधित्व करू शकत नाही. म्हणूनच देवाची अनेक नावे आहेत, पण एवढी सगळी नावेदेखील देवाची प्रवृत्ती पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत, कारण देवाची प्रवृत्ती एवढी समृद्ध आहे की, ती मनुष्याच्या देवाला जाणून घ्यायच्या क्षमतेबाहेर आहे. मनुष्यजातीची भाषा वापरून देवाला पूर्णपणे सामावून घेण्याचा मनुष्याकडे कोणताही मार्ग नाही. थोर, सन्माननीय, अद्भूत, अनाकलनीय, श्रेष्ठ, पवित्र, नीतिमान, ज्ञानी आणि असे बरेच काही जे देवाच्या प्रवृत्तीबद्दल माहीत आहे ते सामावून घ्यायला मानवांची शब्दसंपत्ती मर्यादित आहे. किती ते शब्द! देवाच्या प्रवृत्तीविषयी मनुष्याने जे काही थोडेफार अनुभवले आहे त्याचे वर्णन करायला ही मर्यादित शब्दसंपत्ती असमर्थ आहे. कालानुरूप, इतर अनेकांनी आपल्या मनातील उत्कट भाव व्यक्त करायला योग्य वाटतील अशा शब्दांची भर घातली आहे: देव किती थोर आहे! देव किती पवित्र आहे! देव किती सुंदर आहे! आज मानवांची ही अशी वाक्ये अगदी टिपेला पोहोचली आहेत आणि तरीही मनुष्य स्वतःला काय म्हणायचे आहे ते स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही. म्हणूनच मनुष्याच्या दृष्टीने देवाला अनेक नावे आहेत आणि तरीही त्याचे एकच एक असे नाव नाही. देवाचे अस्तित्त्व इतके समृद्ध आहे आणि मनुष्याची भाषा इतकी दरिद्री आहे म्हणून असे घडते. एकाच विशिष्ट शब्दात किंवा नावात देवाचे संपूर्ण प्रतिनिधित्व करण्याची क्षमता नाही. मग त्याचे एकच नाव ठरवून ठेवता येईल असे तुला वाटते का? देव इतका थोर आणि पवित्र असूनही तू त्याला प्रत्येक नव्या युगात नाव बदलू देणार नाहीस का? म्हणून ज्या युगात देव स्वतः आपले कार्य करतो, त्या प्रत्येक युगात त्यात तो त्या युगाला साजेसे नाव वापरतो. जेणेकरून त्या युगात जे कार्य करण्याचा त्याचा बेत आहे त्याला सामावून घेणारे असे ते नाव असेल. क्षणिक महत्त्व असणारे हे विशिष्ट नाव तो त्या युगातील आपल्या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरतो. याचा अर्थ आपल्या स्वतःच्या प्रवृत्तीविषयी सांगण्यासाठी देव मनुष्यजातीची भाषा वापरतो. असे असूनही आध्यात्मिक अनुभव आलेल्या आणि ज्यांना स्वतःला देव दिसला आहे अशा अनेक लोकांना असे वाटते की, एक विशिष्ट नाव देवाचे संपूर्ण प्रतिनिधित्व करायला असमर्थ आहे—दुर्दैवाने यावर काहीच उपाय नाही—म्हणून मनुष्य देवाला कोणत्याही नावाने हाक न मारता केवळ “देव” असे संबोधतो. जणू काही मनुष्याचे हृदय प्रेमाने काठोकाठ भरलेले आहे आणि तरीही विरोधाभासांनी घेरलेले आहे; कारण देवाचे स्पष्टीकरण कसे द्यायचे हे मनुष्याला ठाऊक नाही. देव म्हणजे जे काही आहे ते इतके समृद्ध आहे की त्याचे वर्णन करण्याचा कोणताही मार्ग नाही. देवाच्या प्रवृत्तीचा सारांश सांगू शकेल असे एकही नाव नाही आणि देवाकडे जे काही आहे आणि देव म्हणजे जो काही आहे त्याचे वर्णन करू शकेल असे एकही नाव नाही. मला जर कोणी विचारले, “तू नक्की कोणते नाव वापरतोस?” तर मी त्यांना सांगेन, “देव हा देव आहे!” देवासाठी हेच सर्वात उत्तम नाव नव्हे का? देवाच्या प्रवृत्तीचे हेच सर्वोत्तम वर्णन नव्हे का? असे असेल तर, देवाचे नाव शोधण्याचे तुम्ही एवढे प्रयत्न का करत आहात? केवळ एका नावासाठी तुम्ही एवढी डोकेफोड का करावी? अन्न-पाणी का विसरावे? एक दिवस असा येईल जेव्हा देवाला यहोवा, येशू किंवा मशीहा असे काहीही न म्हणता केवळ निर्माता असे म्हटले जाईल. त्या वेळेस त्याने धरतीवर येऊन धारण केलेली सर्व नावे नष्ट होतील, कारण त्याचे पृथ्वीवरील कार्य संपुष्टात आले असेल. त्यानंतर त्याची नावे अस्तित्वात राहणार नाहीत. जेव्हा सगळ्याच गोष्टी त्या निर्मात्याच्या अधिपत्याखाली आहेत, तेव्हा अतिशय योग्य पण अपूर्ण नावाची त्याला काय गरज? आता अजूनही तू देवाचे नाव शोधत आहेस का? देवाला केवळ यहोवा याच नावाने हाक मारता येईल असेच अजूनही तू म्हणत आहेस का? देवाला केवळ येशू याच नावाने हाक मारायची असे म्हणायची अजूनही तू हिंमत करत आहेस का? देवाविरुद्ध पाखंडीपणा करण्याचे पाप तू सहन करू शकशील का? देवाला मुळात काही नावच नव्हते हे जाणून घ्यायला हवे. त्याने एखाद-दोन किंवा बरीच नावे घेतली, कारण त्याला कार्य करायचे होते आणि मनुष्यजातीचे व्यवस्थापन करायचे होते. त्याला ज्या कोणत्या नावाने हाक मारली जाते—ते त्याने स्वतःच मुक्तपणे निवडलेले नाही का? त्याच्या निर्मितीपैकीच कोणीतरी म्हणजे तू ते ठरवावे याची गरज त्याला भासेल का? मनुष्याची जे समजून घेण्याची क्षमता आहे त्यानुसार, मनुष्यजातीच्या भाषेनुसार देवाचे नाव ठरते. मात्र असे नाव म्हणजे मनुष्याच्या कवेत येईल अशी साधी गोष्ट नव्हे. देव स्वर्गात आहे, त्याला देव असे म्हणतात, तो स्वतः महान शक्ती असलेला एक देव आहे, तो अतिशय ज्ञानी आहे, उदात्त आहे, अद्भूत आहे, गूढ आहे आणि सर्वशक्तिमान आहे एवढेच तू म्हणू शकता. त्यापुढे काहीही बोलू शकत नाही; तुम्ही हे एवढेसेच जाणू शकता. असे असताना केवळ येशूचे नाव खुद्द देवाचे प्रतिनिधित्व करू शकते का? जेव्हा शेवटचे दिवस येतील, तेव्हा जरी देवच स्वतःचे कार्य करत असला तरी त्याचे नाव बदलले गेले पाहिजे, कारण ते युग वेगळे असेल.
सबंध विश्वात आणि विश्वाच्या वरच्या कक्षेतदेखील देव हाच सर्वात थोर आहे. मग एखाद्या अवतारातून तो स्वतःला पूर्णपणे व्यक्त करू शकतो का? देव स्वतःला या अवताराचे कपडे चढवतो ते त्याच्या कार्याचा एक टप्पा पूर्ण करण्यासाठी. या देहधारण प्रतिमेचे काही ठरावीक वैशिष्ट्य नाही. सरत जाणाऱ्या युगांशी तिचा काहीही संबंध नाही किंवा देवाच्या प्रवृत्तीशीही ती निगडित नाही. येशूने आपली प्रतिमा तशीच का राहू दिली नाही? मनुष्याने आपली प्रतिमा रंगवावी म्हणजे ती भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवता येईल अशी तजवीज त्याने का केली नाही? आपली प्रतिमा हीच देवाची प्रतिमा आहे हे त्याने लोकांना मान्य का करू दिले नाही? जरी देवाच्या प्रतिमेत मनुष्याची प्रतिमा निर्माण करण्यात आली असली, तरी मानवी अवताराला देवाच्या उत्तुंग प्रतिमेचे प्रतिनिधित्व करणे जमले असते का? जेव्हा देव देह धारण घेतो, तेव्हा तो केवळ त्या विशिष्ट देहात स्वर्गातून खाली उतरतो. त्याचा आत्मा त्या देहात शिरतो आणि त्याद्वारे तो आत्म्याचेच कार्य करतो. हा आत्माच देह धारण करत असतो आणि देह धारण करून आत्माच त्याचे कार्य पार पाडत असतो. देहात केलेले कार्य आत्म्याचे संपूर्ण प्रतिनिधित्व करते आणि हा देह कार्य करण्यासाठीच असतो. मात्र देहधारणेची प्रतिमा ही खुद्द देवाच्या खऱ्याखुऱ्या प्रतिमेची जागा घेऊ शकेल असा याचा अर्थ नव्हे. देह धारण करण्यामागे देवाचा हा हेतू कधीही नसतो. आत्म्याला राहण्यासाठी आपल्या कार्याला साजेशी जागा मिळावी एवढ्यासाठीच तो देह धारण करतो. लोकांना त्याची कृत्ये दिसावीत, त्याची प्रवृत्ती समजून यावी, त्याचे शब्द ऐकू यावेत आणि त्याच्या कार्याची अद्भूतता कळावी म्हणून अवतार घेऊन त्याचे कार्य पार पाडणे अधिक चांगले होय. त्याचे नाव हे त्याच्या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करते, त्याचे कार्य त्याची ओळख दर्शवते, पण त्याचे देहधारण हे त्याच्या प्रतिमेचे प्रतिनिधित्व करते असे तो कधीही म्हणालेला नाही; ती केवळ मानवी धारणा आहे. म्हणूनच देवाच्या देहधारणेचे महत्त्वाचे पैलू म्हणजे त्याचे नाव, त्याचे कार्य, त्याची प्रवृत्ती आणि त्याचे लिंग होय. या युगातील त्याच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करायला ते वापरले जातात. त्याच्या प्रत्यक्ष देहधारणेचा त्याच्या व्यवस्थापनाशी काहीही संबंध नाही, ते केवळ त्याच्या त्या वेळच्या कार्यासाठी आहे. असे असले तरीही देहधारी देवाचे एखादे विशिष्ट रंगरूप नसणे शक्य नाही, म्हणून आपले रंगरूप ठरवण्यासाठी तो योग्य अशा कुटुंबाची निवड करतो. देवाच्या रंगरूपाला काही प्रातिनिधिक महत्त्व असते, तर त्याच्यासारखी चेहरेपट्टी असणारे सर्वच जण देवाचे प्रतिनिधित्व करणारे असते. ही अगदी गंभीर चूक ठरणार नाही का? येशूची पूजा करता यावी म्हणून मनुष्याने त्याचे चित्र काढले. त्या वेळेस पवित्र आत्म्याने कोणत्याही विशेष सूचना दिल्या नाहीत, त्यामुळे ते काल्पनिक चित्र मनुष्य आजपर्यंत तसेच पुढे वापरत आला आहे. वास्तविक देवाच्या मूळ उद्देशानुसार मनुष्याने असे करायलाच नको होते. केवळ मनुष्याच्या उत्साहामुळेच येशूचे चित्र आजही राहिले आहे. देव हा आत्मा आहे आणि अंतिम विश्लेषणात त्याची प्रतिमा पकडून ठेवणे मनुष्याला कधीही जमणार नाही. त्याची प्रतिमा केवळ त्याच्या प्रवृत्तीतूनच दिसून येऊ शकते. त्याचे नाक, त्याचे तोंड, त्याचे डोळे, त्याचे केस या रंगरूपाविषयी बोलायचे, तर ते तुझ्या पकडून ठेवण्याच्या क्षमतेबाहेर आहे. जॉनला जेव्हा साक्षात्कार झाला, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर मनुष्याच्या पुत्राची प्रतिमा दिसली: त्याच्या तोंडातून एक धारदार दुधारी तलवार बाहेर आलेली होती, त्याचे डोळे आगीच्या ज्वाळांसारखे होते, त्याचे डोके आणि केस पांढऱ्याशुभ्र लोकरीप्रमाणे दिसत होते, त्याचे पाय तकाकणाऱ्या तांब्याप्रमाणे होते आणि त्याच्या छातीभोवती एक सोनेरी पट्टा होता. त्याचे शब्द जरी असे जिवंत असले, तरी त्याने वर्णन केलेली देवाची प्रतिमा त्याने निर्मिलेल्या एखाद्या प्राणिमात्राची नव्हती. त्याला जे काही दिसले ते केवळ एक दृश्य होते, या भौतिक जगातल्या एखाद्या माणसाची ती प्रतिमा नव्हती. जॉनला एक दृश्य दिसले होते, पण देवाचे खरे रंगरूप त्याने पाहिले नव्हते. देहधारी देवाची प्रतिमा ही एखाद्या प्रत्यक्ष निर्माण झालेल्या प्राणिमात्राची प्रतिमा असल्याने देवाच्या प्रवृत्तीचे संपूर्ण प्रतिनिधित्व करण्यास ती असमर्थ ठरते. यहोवाने जेव्हा मनुष्यजातीची निर्मिती केली, तेव्हा ती आपण स्वतःच्या प्रतिमेनुसार केली आहे असे तो म्हणाला. त्याने पुरुष आणि स्त्री या दोघांना निर्माण केले. तेव्हा आपण देवाच्या प्रतिमेतून स्त्री आणि पुरुष तयार केले आहेत असे तो म्हणाला. जरी मनुष्याची प्रतिमा देवाच्या प्रतिमेशी मिळतीजुळती असली, तरी मनुष्याच्या रंगरूपातच देवाची प्रतिमा दिसते असा त्याचा अर्थ होत नाही. तसेच मानवी भाषा वापरून तू देवाची प्रतिमादेखील पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही; कारण देव अतिशय उत्तुंग आहे, अतिशय थोर आहे, अतिशय अद्भूत आहे आणि अनाकलनीय आहे!
येशू जेव्हा आपले कार्य करण्यासाठी आला, तेव्हा ते कार्य पवित्र आत्म्याने दाखविलेल्या दिशेने होते. पवित्र आत्म्याला जसे हवे होते तसे त्याने केले; जुन्या करारातील नियमशास्त्राच्या युगानुसार किंवा यहोवाच्या कार्यानुसार नव्हे. येशू जे कार्य करायला आला होता ते यहोवाच्या नियमांचे किंवा आदेशांचे पालन करण्याचे कार्य नव्हते. त्यांचा स्रोत एकच होता. येशूने जे कार्य केले ते येशूच्या नावाचे प्रतिनिधित्व करणारे होते आणि ते कृपेच्या युगाचे प्रतिनिधित्व करत होते. यहोवाने केलेल्या कार्याविषयी बोलायचे तर ते यहोवाचे प्रतिनिधित्व करणारे होते; ते नियमशास्त्राच्या युगाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांचे कार्य म्हणजे एकाच आत्म्याने दोन वेगवेगळ्या युगात केलेले कार्य होते. येशूने केलेले कार्य हे केवळ कृपेच्या युगाचेच प्रतिनिधित्व करू शकते आणि यहोवाने केलेले कार्य केवळ जुन्या करारातील नियमशास्त्राच्या युगाचेच प्रतिनिधित्व करू शकते. यहोवाने केवळ इस्रायल आणि इजिप्तमधल्या लोकांना, तसेच इस्रायल पलीकडे असलेल्या राष्ट्रांमधील लोकांना मार्गदर्शन केले. नवीन करारातील कृपेच्या युगात येशूने केलेले कार्य हे येशूच्या नावाने देवाने केलेले कार्य होते, त्याने त्या युगात मार्गदर्शन केले. येशूचे कार्य यहोवाच्या कार्यावर आधारित होते, त्याने कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली नाही, त्याने जे काही केले ते सर्व यहोवाच्या बोलण्याप्रमाणे, त्याच्या कार्याला अनुसरून आणि यशयाच्या भविष्यवाणीनुसार केले असे जर तू म्हणत असाल, तर येशू हा देहधारी देव ठरणार नाही. जर त्याने अशाप्रकारे आपले कार्य केले असते, तर तो नियमशास्त्राच्या युगाचा प्रेषित किंवा सांगकाम्या ठरला असता. जर तू म्हणतोस त्याप्रमाणे असेल, तर येशूने एक युग सुरू केले नसते तसेच तो आणखी कोणतेही कार्य करू शकला नसता. त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याने तत्वतः यहोवामार्फत आपले कार्य पार पाडले असले पाहिजे. तसेच यहोवामार्फत केलेल्या कार्याव्यतिरिक्त पवित्र आत्म्याने आणखी कोणतेही नवीन कार्य केले नसते. येशूचे कार्य अशाप्रमाणे समजून घेणे ही मनुष्याची चूक आहे. येशूने केलेले कार्य हे यहोवाच्या बोलण्यानुसार आणि यशयाच्या भविष्यवाणीनुसार केले गेले होते असे जर मनुष्य समजत असेल, तर येशू हा देहधारी देव होता का? की तो प्रेषितांपैकीच एक होता? या दृष्टीने पाहिले, तर कृपेचे युगच असणार नाही आणि येशू हा काही देहधारी देव असणार नाही. त्याचे कारण म्हणजे त्याने केलेले कार्य हे कृपेच्या युगाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, ते केवळ जुन्या करारातील नियमशास्त्राच्या युगाचे प्रतिनिधित्व करू शकते. येशू जर नवीन कार्य करण्यासाठी आला असेल तरच नवीन युग असणे शक्य आहे, नवीन युगाची सुरुवात करणे शक्य आहे, इस्रायलमध्ये पूर्वी केलेल्या कार्यातून बाहेर पडणे शक्य आहे. तसेच इस्रायलमध्ये यहोवाने केलेल्या कार्यानुसार किंवा त्याच्या जुन्या नियमांनुसार किंवा इतर कोणत्या नियमांना धरून आपले कार्य न करता त्याला जे करणे आवश्यक आहे ते कार्य करणे शक्य आहे. नवीन युग सुरू करण्यासाठी देव स्वतःच येतो आणि एखादे युग समाप्त करण्यासाठीही देवच येतो. युग सुरू करण्याचे आणि युगाची सांगता करण्याचे कार्य करण्यास मनुष्य असमर्थ आहे. जर इथे आल्यावर येशूने यहोवाचे कार्य संपुष्टात आणले नसते, तर तो निव्वळ एक मनुष्य असून देवाचे प्रतिनिधित्व करण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध झाले असते. येशूने येऊन यहोवाचे कार्य तडीस नेल्यामुळे, यहोवाचे कार्य पुढे नेल्यामुळे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वतःचे नवीन कार्य पार पाडल्यामुळे असे सिद्ध होते की, हे नवीन युग होते; आणि येशू स्वतः देव होता. त्यांनी कार्याचे दोन पूर्णपणे वेगळे टप्पे केले. पहिला टप्पा मंदिरात पार पडला आणि दुसरा मंदिराबाहेर पार पडला. पहिला टप्पा होता तो नियमशास्त्राप्रमाणे मानवी आयुष्य जगण्याचा आणि दुसरा टप्पा होता तो पापमुक्तीसाठी काही अर्पण करण्याचा. कार्याचे हे दोन्ही टप्पे जाणवण्याइतके वेगळे होते आणि त्यांनी नवीन युगाला जुन्या युगापासून अलग केले. तसेच ही दोन युगे वेगळी आहेत असे म्हणणे अगदी बरोबर ठरेल. त्यांच्या कार्याचे ठिकाण वेगळे होते, त्यांच्या कार्याचे स्वरूप वेगळे होते आणि त्यांच्या कार्याचा उद्देशही वेगळा होता. तसे पाहिले तर त्यांना दोन युगांमध्ये विभागता येईल: नवीन आणि जुना करार; म्हणजेच नवीन आणि जुने युग. येशू आला तेव्हा तो मंदिरात गेला नाही. त्यावरून यहोवाचे युग समाप्त झाले होते हे लक्षात येईल. त्याने मंदिरात प्रवेश केला नाही कारण यहोवाचे मंदिरातील कार्य संपुष्टात आले होते आणि ते पुन्हा करण्याची गरज नव्हती. ते कार्य पुन्हा करणे म्हणजे त्याची पुनरावृत्ती करण्यासारखे होते. मंदिरातून बाहेर पडून, नवीन कार्याला सुरुवात करून आणि मंदिराबाहेर नवीन मार्ग आखून मगच तो देवाचे कार्य शिखरावर नेऊ शकला. जर तो आपले कार्य करण्यासाठी मंदिराबाहेर पडला नसता, तर देवाचे कार्य मंदिराच्या पायाशीच साचून राहिले असते. मग कोणतेही नवीन बदल घडून आले नसते. म्हणूनच जेव्हा येशू आला तेव्हा त्याने मंदिरात प्रवेश केला नाही आणि आपले कार्य मंदिरात पार पाडले नाही. त्याने आपले कार्य मंदिराबाहेर पार पाडले आणि आपल्या शिष्यांचे नेतृत्व करत मुक्तपणे कार्य केले. आपले कार्य करण्यासाठी देव मंदिरातून बाहेर पडला, याचा अर्थ देवाची काहीतरी नवीन योजना होती. त्याचे कार्य मंदिराबाहेर पार पाडणे आवश्यक होते. ज्या कार्याच्या अंमलबजावणीत कोणतेही निर्बंध असून चालणार नव्हते, असे ते नवीन कार्य होते. येशूने आल्या-आल्या जुन्या कराराच्या युगातील यहोवाचे कार्य संपुष्टात आणले. जरी त्या दोघांची नावे वेगवेगळी असली, तरी कार्याचे हे दोन्ही टप्पे पार पाडणारा आत्माच होता आणि हे कार्य सलगच होते. जसे देवाचे नाव वेगळे होते आणि कार्याचे स्वरूप वेगळे होते, तसेच युगदेखील वेगळे होते. यहोवा आला तेव्हा ते यहोवाचे युग होते आणि येशू आला तेव्हा ते येशूचे युग होते. म्हणून प्रत्येक आगमनाबरोबर देवाला एका नावाने ओळखले जाते, तो एका युगाचे प्रतिनिधित्व करतो, तो नवीन मार्ग आखतो आणि प्रत्येक नवीन मार्गावर तो नवीन नाव धारण करतो. त्यावरून असे दिसते की, देव हा नेहमी नवीन असतो, तो कधीही जुना होत नाही आणि त्याचे कार्य पुढे गेल्यावाचून कधीही राहत नाही. इतिहास नेहमी पुढे जात असतो आणि देवाचे कार्यही नेहमी पुढे जात असते. त्याची सहा हजार वर्षांची व्यवस्थापन योजना संपुष्टात येण्यासाठी ती पुढे जात राहिली पाहिजे. दर दिवशी त्याने नवीन कार्य केले पाहिजे, दर वर्षी त्याने नवीन कार्य केले पाहिजे; त्याने नवीन मार्ग सुरू केले पाहिजेत, नवीन युगे सुरू केली पाहिजेत, नवीन आणि अधिक थोर कार्याला सुरुवात केली पाहिजे आणि त्या जोडीला नवीन नावे आणि नवीन कार्य पुढे आणले पाहिजे. क्षणाक्षणाला देवाचा आत्मा नवीन कार्य करत आहे, जुन्या पद्धतींना किंवा नियमांना तो चिकटून राहिलेला नाही. तसेच त्याचे कार्य कधीही थांबलेले नाही, तर प्रत्येक सरत्या क्षणाबरोबर ते पुढे सरते आहे. पवित्र आत्म्याचे कार्य परिवर्तनीय आहे असे जर तू म्हणत असशील, तर यहोवाने पाद्र्यांना मंदिरात आपली सेवा करण्यास सांगितले असतानाही, येशूने मंदिरात प्रवेश केला नाही. येशू आला तेव्हा लोक त्याला श्रेष्ठ पाद्री म्हणत होते, तसेच तो स्वतः डेव्हिडच्या घराण्यातला, श्रेष्ठ पाद्री आणि थोर राजा होता, तरीही त्याने मंदिरात प्रवेशही केला नाही. तर हे असे का घडले? येशूने देवाला कोणतेही बळी का अर्पण केले नाहीत? मंदिरात प्रवेश करणे काय किंवा न करणे काय—ही सर्व देवाचीच लीला नव्हे काय? माणसाला वाटत आहे त्यानुसार जर येशू परत आला आणि अखेरच्या दिवसातही तो येशू म्हणूनच ओळखला जाऊ लागला; तसेच अजूनही जर तो पांढऱ्या मेघांवर आरूढ होऊन आला आणि येशूची प्रतिमा धारण करूनच माणसांमध्ये अवतरला: तर ती त्याच्या कार्याची पुनरावृत्ती नव्हे का? पवित्र आत्मा जुन्या गोष्टींना असा चिकटून राहू शकतो का? मनुष्य ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्या सर्व धारणा आहेत आणि मनुष्याला जे समजते ते सर्व शब्दश: अर्थाप्रमाणे तसेच त्याच्या स्वतःच्या कल्पनेनुसार समजते. हे पवित्र आत्म्याच्या कार्याच्या तत्त्वांविरुद्ध आहे, तसेच देवाच्या हेतूंशी ते सुसंगत नाही. देव अशाप्रकारे काम करणार नाही; देव इतका मूर्ख आणि मंदबुद्धीचा नाही, तसेच तुला वाटते तितके त्याचे कार्य सोपे नाही. मनुष्याने केलेल्या कल्पनेप्रमाणे पाहिले, तर येशू एका मेघावर आरूढ होऊन येईल आणि तुमच्यामध्ये उतरेल. जो ढगांवर बसून येईल आणि मी येशू आहे असे तुम्हाला सांगेल, त्याच्याकडे बघा, त्याच्या हातांवरील नखांच्या खुणादेखील बघा. त्यावरून तो येशू आहे हे तुम्हाला कळेल. तो पुन्हा एकदा तुम्हाला वाचवेल आणि तुमचा सामर्थ्यवान देव होईल. तो तुम्हाला वाचवेल, तुम्हाला एक नवीन नाव प्रदान करेल आणि तुम्हाला प्रत्येकाला एक पांढरा दगड देईल, त्यानंतर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याची अनुमती मिळेल आणि नंदनवनात तुमचा स्वीकार होईल. या अशा श्रद्धा म्हणजेच मनुष्याच्या धारणा नव्हेत का? देव मनुष्याच्या धारणांप्रमाणे कार्य करतो का? की तो मनुष्याच्या धारणांच्या विरुद्ध कार्य करतो? मनुष्याच्या सर्व धारणा सैतानाकडून येत नाहीत का? सर्व मनुष्य सैतानाने भ्रष्ट केलेले नाहीत काय? जर देवाने मनुष्याच्या धारणांप्रमाणे आपले कार्य केले असते, तर तो स्वतःच सैतान झाला नसता का? तोदेखील स्वतः निर्माण केलेल्या प्राणिमात्रांप्रमाणेच झाला नसता काय? त्याने निर्माण केलेले प्राणिमात्र सैतानाने आता इतके भ्रष्ट केले आहेत, की मनुष्य हा आता सैतानाचेच घर झाला आहे. जर देवाने सैतानाच्या गोष्टींना अनुसरून कार्य करायचे ठरवले, तर तोदेखील सैतानाच्याच गोटात जाणार नाही काय? मनुष्याला देवाच्या कार्याचे आकलन कसे होऊ शकेल? म्हणून तर देव कधीही मनुष्याच्या धारणांप्रमाणे कार्य करणार नाही आणि तू कल्पना करता त्या पद्धतीने वागणार नाही. काहीजण असे म्हणतात की, आपण मेघांवर आरूढ होऊन येऊ असे स्वतः देवानेच सांगितले आहे. देवाने स्वतःच असे सांगितले हे खरे आहे, पण कोणाही मनुष्याला देवाचे गूढत्व समजून येणार नाही हे तुला ठाऊक नाही काय? कोणीही मनुष्य देवाचे बोलणे स्पष्ट करून सांगू शकणार नाही, हे तू जाणत नाहीस काय? तुला पवित्र आत्म्याने ज्ञान दिले, प्रकाशमान केले, याबद्दल तुझी निःसंशय खात्री आहे काय? पवित्र आत्म्याने नक्कीच तुला असे थेट काही दाखवले नसणार. तुला सूचना देणारा तो पवित्र आत्मा होता, की तुझ्या स्वतःच्या धारणांमुळेच तुला तसे वाटले? तू म्हणालास, “हे खुद्द देवानेच सांगितले.” मात्र देवाचे शब्द तोलून बघण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या धारणा आणि विचार वापरू शकत नाही. यशयाने उच्चारलेल्या शब्दांविषयी बोलायचे तर तू अगदी खात्रीशीरपणे त्याच्या शब्दांचा अर्थ उलगडून सांगू शकतोस काय? त्याच्या शब्दांचा अर्थ उलगडून सांगायची तू हिंमत तरी करू शकतोस काय? जर यशयाच्या शब्दांचा अर्थ सांगण्याची हिंमत तू करू शकत नाहीस, तर येशूचे बोलणे उलगडून सांगायची हिंमत तरी तू का करावीस? येशू आणि यशया या दोघांमध्ये अधिक थोर कोण आहे? याचे उत्तर येशू असे आहे, तर तू येशूने उच्चारलेल्या शब्दांचे स्पष्टीकरण का देतोस? देव आपल्या कार्याबद्दल तुला आगाऊ कल्पना देईल काय? त्याविषयी एकाही प्राणिमात्राला ठाऊक असू शकत नाही, स्वर्गातील देवदूतांना माहीत असू शकत नाही, मनुष्याच्या पुत्राला ते ठाऊक असू शकत नाही, तर तुला कसे माहीत असेल? मनुष्यात खूप कमतरता आहेत. आत्ता तुम्हा लोकांसाठी महत्त्वाचे काय असेल, तर त्याच्या कार्याचे तीन टप्पे माहीत करून घेणे. यहोवाच्या कार्यापासून ते येशूच्या कार्यापर्यंत आणि येशूच्या कार्यापासून ते आत्ताच्या टप्प्यातील कार्यापर्यंत, या तीन टप्प्यांचा मिळून होणारा एक सलग धागा देवाच्या व्यवस्थापनाचा अखंड आवाका व्यापतो आणि ही सर्व कार्ये एकाच आत्म्याची कार्ये आहेत. जगाच्या निर्मितीपासून देव कायमच मनुष्यजातीच्या व्यवस्थापनाचे कार्य करत आला आहे. तोच आरंभ आहे आणि अखेरही तोच आहे. तोच आदि आहे आणि तोच अंतही आहे. युग सुरू करणारा तोच आहे आणि युगाची सांगता करणाराही तोच आहे. विविध युगांमधले आणि विविध ठिकाणांचे कार्याचे तीन टप्पे हे एकाच आत्म्याचे कार्य आहे यात शंका नाही. या तीन टप्प्यांमध्ये फरक करणारे सर्वजण देवाच्या विरोधात आहेत. पहिल्या टप्प्यापासून ते आजपर्यंत पार पडलेले सर्व कार्य हे एकाच देवाचे कार्य आहे, एकाच आत्म्याचे कार्य आहे हे जाणून घेणे हे आता तुझे कर्तव्य आहे. याविषयी कोणतीही शंका असू शकत नाही.